चित्रकलेचा मास्तर

चित्रकलेचा मास्तर
कधीतरी वर्गात यायचा
पांढरा सदरा आणि पांढरा ढगळ पायजामा घालून नीळची झाक असलेला आणि
काळ्या चेहर्यावरच्या ठळक सुरकुत्या
सर्व मुलांचा दंगा संपल्यावर निर्विकारपणे आमच्याकडे पाठ करून फळ्यावर लिहायचा
"चित्रकला"
पुनहा डस्टरने पुसून रेषा व्यवस्थित करायचा
मग सगळ्यांना काहीही चित्र काढा म्हणायचा
गाय,म्हैस,कुत्रा,झाड,पक्षी ,पान,फुल...
मास्तर खुर्चीत बसून दोन्ही पाय वर घेऊन बसायचा
हातांच्या लयबद्ध हालचालीने तंबाखू मळायचा
त्याच्या अंगाला कायम तंबाखूचा वास यायचा
त्याची जुनी सायकल आणि तो
सायकलवर बसून टांग मारून जात असताना तो खूप आर्टी दिसायचा
बाह्या तश्याच लोंबकळत,हँडल हातात धरून डगमगत सायकल चालवायचा..
मास्तरच घर कुणालाच माहिती नाही
तो फक्त यायचा आणि फळ्यावर
फुल ,डोंगर, पक्षी, समुद्र, झाड काढायचा
मुल दंगा करत पाटीवर काहीही रेषा गिरवून थुंकीने पुसायची
मास्तर काहीच बोलायचा नाही
बहुतेक त्याच्या जाड भिंगाच्या चष्म्याआडून डोळे वटारायचा पण कुणाला कधी त़याची भिती वाटली नाही
पंधरा आँगस्टला तो भारताचा झेंडा रंगीत खडूने काढायचा
आणि दोन झेंडूची फुल वाहायचा
मास्तर एका दिवसापासून यायचा बंद झाला
आम्हाला कळलच नाही
शाळा संपली
मास्तरच पुढे काय झाल माहिती नाही...
आज अचानक आठवल
आज कुणीतरी
फुल डोंगर पक्षी समुद्र झाड काढली होती
माझ्या हातावरच्या सुरकुत्या मास्तरच्या चेहर्यावरच्या सुरकुत्यासारख्या दिसत होत्या
भास झाला मास्तरच्या सायकलच्या घंटीचा
पण मास्तर हरवलाय
कुठेतरी फळ्याच्मा मागे ...
खडूच्या धुरात...

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ह्म्म
कवितेतील कथा नै पोचली.... बहुदा.. पण भाव नेमके पोचले नी खिन्न वाटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्यक्तीचित्रण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0