पांढर धुकं काळ धुकं

आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती. आज डोक्यावरचे सर्व केसं पांढरे झाले, अस्थमा, हृदयरोग इत्यादी ही. कदाचित धुक्याच आणि सुख-सुविधा (भोग) याचं ही नात आहे. मुफ्त मिळणार पांढर धुकं सोडून आपण भरपूर किंमत मोजून काळ धुकं विकत घेतो आहे. पण हे कितपत चालणार.???

शुभ्र पांढर धुकं,
मागासपणाचे लक्षण
आदिम समाजाच,
कष्टप्रद जगण.

काळकुट्ट धुकं,
प्रगतीचे लक्षण.
सुखासीन लोकांच,
रोगग्रस्त जगण.

काळ्या धुक्यात विरला
प्राणी माणूस नावाचा
इतिहास नियतीचा
घडणार का असा?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

कल्पना अतिशय आवडली.
अधिक भेदकपणे फुलवता आली असती असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्मोक आणि फॉग ह्या दोन शब्दांना जोडून इंग्रजीत स्मॉग हा शब्द बनवला गेला. तेच हे काळे धुके!

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातही सकाळी स्मॉगचे आवरण असते. सकाळी ७ वाजतादेखिल हेडलाईटशिवाय गाडी बाहेर काढता येत नाही. आपण पुढच्याला ठोकतो की मागचा आपल्याला, ह्या विवंचनेत कविता वैग्रे काही सुचत नाही (तशाही कधी सुचतात म्हणा! ;))

काही ठिकाणचे अनुच्चारीत अनुस्वार सोडले तर कविता ठीक. कल्पना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहरातल्या कोलाहलात आणि भाऊगर्दीत जन्मलेल्या आणि मोठे झालेल्या लोकांना धुक्याचा रंग बघायला वेळ नाही. एकच हिशेब चालू आहे - आज नेट वर्थ किती आहे , उद्या किती होणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खेड्यातही निसर्गाच्या सान्निध्यात वगैरे जन्मून लोकांचा शहरात जायचा आटापिटा चालू असतो. नेट वर्थचे आकर्षण असे शहरावारी विभागलेले नाही. सगळीकडेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शहरातल्या कोलाहलात आणि भाऊगर्दीत जन्मलेल्या आणि मोठे झालेल्या लोकांना धुक्याचा रंग बघायला वेळ नाही

कै च्या कै!
(आता शक्य नाही तरी आगाऊ सल्ला: शहरात जन्म घेऊन बघा काय मजा असते ती! )

गावात काही दिवस जाऊन रहायला कित्ती कित्तीही मज्जा येत असली तरी ती बालपणात. आता गावांत गेलं की अनेकदा दिसतो तो कचर्‍यांचा ढिग, सुशिक्षित बेकारांची निव्वळ विड्या फुंकणारी टाळकी, त्या टाळक्यांची (तसेच प्रसंगी पारावरील मांडीपत्तुर धोतर वर घेऊन 'स्क्यानिंग' करत बसणार्‍या काही म्हातार्‍यांच्याही) जळजळीत नजरेपासून लपत लगबगीने पदर घट्ट लपेटून चाललेल्या स्त्रिया, कष्टकरी महिला नी त्यांचे दारूडे नवरे.छ्या! गड्या अपुला शहर बरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!