विकास म्हणजे नक्की काय?

पुणे आणि आसपासचा परिसर , घणसोली ,नवी मुंबई परिसर ,पेण - पनवेल इत्यादी परिसरात भूखंड / जमीन विक्रीतून आलेल्या प्रचंड पैशातून निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि पर्यायाने बोकाळलेली गुंठामंत्री संस्कृती (?) इत्यादी पहाता या भागाचा विकास झाला आहे,असे म्हणणे योग्य ठरेल का?

महाराष्ट्रात जे चालले आहे त्याच वर्णन करायला एकाच शब्द आहे, तो म्हणजे 'महाभयंकर'! ह्याला उद्योगीकरण म्हणतात काय? शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या (किंवा) विकायला मोहात पाडायचं आणि तिथे Concrete Jungle उभ करायचं ह्याला म्हणायचे शहरीकरण? जमिनींचे भाव वाढणे, गाड्यांची संख्या वाढणे. मस्त प्रवास चालू आहे विनाशाच्या दिशेने. उद्योगपती आणि त्यांचे मीध्ये झालेले राज्य सरकार व कात्रीत सापडलेले सामान्य नागरिक. नैसर्गिक संपत्तीचा विनाश राज्यातल्या मोठ्या शहरांत गेल्या ३० वर्षात झाला. आता लहान शहरांची व गावांची वेळ.

संपूर्ण राज्यच आपल्या डोळ्या समक्ष उध्वस्त होताना दिसत आहे! महात्मा गांधी म्हणायचे भारत देश हा खेड्यात आहे! भारतचा विकास म्हणजे खेड्यांच विकास! ह्याला विकास म्हणायचं कि भकास म्हणायचं? उद्या हे टीनपाट उद्योग बंद पडले (किंवा पाडले) तर काय होईल? ह्या सर्वांच्या मागे आहेत ते राजकीय नेते, त्यांच्या Builder Lobbies, 'उद्योजक' आणि Media पत्रकार! आपण कुठल्या कुठे फेकलो गेलो आहोत आणि सावरायला कुठलेही पक्ष नाहीत!

फक्त भूसंपादन पण उद्योग कुठे आहेत? पैसा मिळाला पण कुणाला? हा पैसा फक्त चौकात flex लावण्यासाठी आणि पांढरे कपडे मणभर सोन घालून scorpio गाड्या लोकांच्या अंगावर घालण्यासाठी वापरला जाईल..यातून कितीन engineers न जोब मिळालाय? किती संपत्ती चांगल्या पगाराच्या नौकरितुन निमण झाली आहे? किती रोजगार निर्माण झालाय? काहीच नाही.....हि धूळफेक थांबवा...जर नौकरया / उद्योग create करू शकत नाही तर कमीत कमी या गाव गुंडांना तरी create करू नका...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

ह्याला उद्योगीकरण म्हणतात काय? शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या (किंवा) विकायला मोहात पाडायचं आणि तिथे Concrete Jungle उभ करायचं ह्याला म्हणायचे शहरीकरण?

होय. काहिसं असंच आहे.
आता हेच गुजरातेत याहून अधिक वेगाने, सरकारी पायर्‍या गाळून वगैरे झालं तर लोकं गोडवे गातात, इथे झालं की श्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण गुजरातेत मोठ्या प्रमाणात उद्योग आले ,नोकर्या आल्या !

पण महाराष्ट्रात फक्त भूसंपादन , उद्योग कुठे आहेत?
पैसा मिळाला पण कुणाला?
हा पैसा फक्त चौकात flex लावण्यासाठी आणि पांढरे कपडे मणभर सोन घालून scorpio गाड्या लोकांच्या अंगावर घालण्यासाठी वापरला जातो..
यातून कितीन engineers न जोब मिळालाय?
किती संपत्ती चांगल्या पगाराच्या नौकरितुन निमण झाली आहे?
किती रोजगार निर्माण झालाय?
?
?
?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

हा विकास नसून सूज आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

डेव्हलपमेंट अ‍ॅज फ्रीडम ____ अमर्त्य सेन. (Look who is recommending Dr. Sen's book.)

विकास या शब्दाचा अर्थ हा की व्यक्तीजवळ विकल्प असायला हवेत. आता ही अतिजनरल अतिबेसिक व्याख्या झाली.

पण "जमिनींचे भाव वाढणे व गाड्यांची संख्या वाढणे" हा विकासाचा अनिवार्य परिणाम आहे. व हे इष्ट आहे असे माझे म्हणणे आहे. विशेषतः जमिनींचे भाव वाढणे म्हंजे ज्या भागाचा विकास झाला त्या भागातील जनतेस त्यांच्या जमिनी जास्त किंमतीस विकता येऊ लागल्या. हे अनिष्ट का आहे ? ( आता त्यांना बाजारभावाने दर मिळत नसतील/फसवले जात असेल तर तो मुद्दा भिन्न आहे.)

जगातला असा एक तरी देश दाखवा की ज्यात गाड्यांची संख्या अजिबात न वाढता प्रचंड विकास झाला. आता तुम्ही - पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त असायला हवा - असे आर्ग्युमेंट कराल ... पण गाड्या असणे हे लोकांना जास्त विकासाचे वाटते - हे त्याचे कारण आहे. Individuals value their flexibility to pull out their own car/bike rather than waiting at the bus-stop.

-----

नैसर्गिक संपत्तीचा विनाश राज्यातल्या मोठ्या शहरांत गेल्या ३० वर्षात झाला. आता लहान शहरांची व गावांची वेळ.

हे कसे काय होत आहे ते फक्त सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेव्हलपमेंट अ‍ॅज फ्रीडम ____ अमर्त्य सेन

हेच आम्ही म्हटलं की आम्ही येडे.
मग आम्हाला टोल फ्री रोडचा फ्रिडम/चॉईस/ऑप्शन हवा यात काय चुकाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो पण जाण्याचा आणि न्-जाण्याचा चॉइस आहेच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खिक्.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेच आम्ही म्हटलं की आम्ही येडे.

बाकी अमर्त्य सेनांनी समर्थन केलेले मॉडेल हे बिहार मॉडेल आहे. जगदीश भगवतींनी गुजरात मॉडेल चा पुरस्कार केलेला आहे. जगदीश भगवती हे आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयातले तज्ञ आहेत. व सेन हे कल्याणकारी राज्य संकल्पनेचे तज्ञ. (मला अर्थातच जगदीश भगवती जास्त आवडतात.)

बाकी दोस्तानु, http://mruniversity.com/ इथे विकासाचे अर्थशास्त्र यावर डझनावारी व्हिडिओज उपलब्ध आहेत. साधी सोपी भाषा व सामान्य व्यक्तीस समजेल एवढेच डिटेल्स - हा गाभा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमर्त्य सेनांच्या ह्युमन डेव्हलपमेंट इन्डेक्स थेअरीप्रमाणे विकासाची व्याख्या करायला हरकत नाही, त्यात पब्लिक ट्रान्सपोर्टही थोड्याफार प्रमाणात अंतर्भूत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताची प्रगती झालेलीच नाही, कायम रसातळाला चाललेला आहे वगैरे ओरड आपल्याला कायम ऐकू येते. हे साफ चुकीचं आहे. गेल्या शतकात आणि विशेषतः भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून सर्वच क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती झालेली आहे.
- आयुर्मान वाढलेलं आहे
- शिक्षण (साक्षरता आणि उच्चशिक्षणाचं प्रमाण) वाढलेलं आहे
- सुबत्ता वाढलेली आहे (एके काळी वरच्या दहा टक्क्यांनाच जे मिळायचं ते आता सुमारे साठेक टक्के लोकांना मिळतं)
- शेती आणि अन्नधान्य उत्पादन वाढलेलं आहे.
- तंत्रज्ञानात प्रगती झालेली आहे
- अनेक गावांत वीज पोचलेली आहे
- बहुतांश लोकांकडे सेलफोन्स आहेत

मी या विषयांवर एक लेखमाला लिहिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जानेवारी २०१४ मधे दिल्लीत माझे ऑफिस जिथे आहे त्याच्या २-३ कि मी त्रिज्यच्या एरियात (निगमबोध घाट, काश्मीरी गेट) ८५ लोक थंडीने मेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जुन्या काळी यापेक्षा जास्त लोक मरत नसत असा विदा द्या मगच पुढचे बोलू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रगती आणि सद्य परिस्थिती याबाबत नेहमीच गल्लत केली जाते. 'सद्य परिस्थिती वाईट आहे' याचं नकळतपणे 'परिस्थिती बिघडत चालली आहे' असं रूपांतर होतं. मी एक उदाहरण देतो - समजा मी काही वर्षांपूर्वी काही कर्ज घेतलं. आणि दर महिन्याला नियमितपणे हप्ते फेडतो आहे. अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेलं नाही याचा अर्थ असा नाही की माझं कर्ज वाढतंय. कर्ज आहे म्हणजे मी पूर्णपणे मोकळा झालेलो नाही. पण दरवर्षी ते कमीकमी होतं आहे म्हणजे प्रगती आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच उदाहरण मी असं देतो.
समजा माझे पूर्वज गावात सुतार होते. तर गावात बैलगाड्या बनवून आमचे घर चाले. पिढ्यान पिढ्याची शाश्वती.

आता माझा मुलगा एम बी ए आहे. मार्केटींग मॅनेजर. फर्निचरचा. त्याच्या कंपनीचे उत्पादन फॅशनमधे होते तेव्हापर्यंत ठीक. नंतर त्याची फॅशन गेली. कंपनी बंद पडली. नोकरी गेली. आता दुसरी नोकरी करण्याचे कौशल्य पून्हा मूळापासून घ्या. त्या कौशल्याची जितकी मागणी त्यापेक्षा जास्त पुरवठा. ज्या जगात स्रोत कमी होत आहेत (किंवा मोजक्या लोकांच्या हातात एकवटत आहेत) आणि लोकसंख्या अपरंपार वाढत आहे तिथे कौशल्य पुरवठा जास्त आणि मागणी कमी असणारच. मग जगण्यासाठी पूर्वजांनी ठेवलेले असेट विका. कमी मोबदल्याचे काम करा. मी जगत राहण्यासाठी खूप काम करा. कारण असे नाही केले तर लगेच रस्त्यावर. आणि कोणताही कॅपिटल असेट हा मंथली सेविंग पोटेंशियलच्या साधारणतः १००० पट. मग काढा कर्ज. आता म्हणा झाली प्रगती म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी व्हॅल्यू आणि रेट ऑफ चेंज यातला फरक सांगतो आहे. लो व्हॅल्यू (सध्याची वाईट परिस्थिती) डझ नॉट नेसेसरीली मीन दॅट द व्हॅल्यू इज नॉट इंप्रूव्हिंग ओव्हर टाइम (प्रगती). म्हणजे
१. सध्या वाईट परिस्थिती आहे.
२. दहा वर्षांपूर्वी याहूनही वाईट परिस्थिती होती.
३. विधान १ आणि २ सत्य असेल तर गेल्या दहा वर्षांत परिस्थिती सुधारली आहे असं म्हणावं लागतं.

हे फारच सर्वसाधारण विधान आहे. किंबहुना प्रगती म्हणजे काय याची व्याख्या आहे. आधी तुम्हाला ही व्याख्या पटली नसेल तर सांगा. (प्रत्यक्षात १ आणि २ सत्य आहेत की नाहीत यावर नंतर वाद घालता येईल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सिंपल मॅथ आहे. अर्थातच मान्य आहे.

१ व २ बद्दलचा वादच चर्चेचा विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्तम. आता प्रश्न येतो तो म्हणजे कुठच्या बाबतीतले, कुठचे निकष प्रगतीसाठी वापरायचे याचा. मी माझ्या लेखमालेत खालील निकष वापरले आहेत
१. जन्मवेळचं अपेक्षित आयुर्मान
२. साक्षरतेचं प्रमाण, उच्चशिक्षितांचं प्रमाण
३. सुबत्ता (अन्नधान्याची आणि दूधदुभत्याची उपलब्धता)

या सर्व निकषांवर गेल्या अनेक दशकांत सतत प्रगती होताना दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम.
तुमची धारणा माणूस जास्त वर्षे जगला, त्याने जास्त शिक्षण घेतले आणि भरपूर खाल्ले म्हणजे जास्त प्रगत झाला अशी दिसते.

आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो.
१. जास्त जगणे हे जास्त चांगले असेल तर जगणे हे चांगले हे आलेच. म्हणजे माणूस पूर्वी चांगला जगत होता तो पिरियड आता वाढला आहे असे आपल्याला म्हणायचे आहे. पण समजा जर पूर्वी जगणे हे वाईट (दु:खदायक, इ) असेल तर तश्याच प्रकारे अजून जास्त जगावे लागणे म्हणजे जास्त चांगले का वाईट? नुसते आयुष्य वाढवून (आणि लोकसंख्या वाढवून) प्रगती झाली आहे असे म्हणणे अर्धवट आहे. प्रगतीचा निकष किती जगला पेक्षा कसा जगला हा असायला हवा. आता कसा जगला चे सगळे/काही निकष जर सुधारलेले आढळले तर आयुष्य वाढणे सोन्याहून पिवळे. अन्यथा मला त्याबद्दल प्रश्न चिन्ह आहे.
१ अ. हे अधिकचे आयुष्य फुकट मिळत नाही. तसा माणूस नशीबवान असेल तरी १०० वर्षे जगू शकतो. Life expectancy at birth किती टक्के ने वाढायला (अगोदर ५५ असेल तर नंतर ६० व्हायला) प्रचंड मोठी फार्मा-मेडिसीन्-हेल्थ इंडस्ट्री उभी राहीली आहे. दोन बिंदू घेऊन किती आयुष्यमान वाढायला किती world health gdp वाढला हे पाहून जगाने याची किती किंमत मोजली आहे याची कल्पना यावी. इतक्या किंमतीची जगाची इतर सुबत्ता गेली म्हणायला हरकत नाही.
१ ब. असेच सगळे लोक जगू लागले आणि जास्त जगू लागले तर ...असू द्या विषय मोठा आहे.

२. साक्षरता
२ अ. शिक्षण ही लायाबिलिटी आहे. ते काही जेवण नाही. ते जीवनाच्या इतर उद्दिष्टांचे साधन आहे. त्याला प्रगतीचा निकष म्हणणे चूक असावे. त्याचा एखादा परिणाम घेतला तर बरे होईल.
२ ब. शिक्षण बोर असते. त्याने सगळे बालपण सडते. स्वतःचे पैसे खर्च होतात. सरकारचे पैसे खर्च होतात.
२ क. भारतातले ६५% लोक शिक्षित आहेत असे निदर्शित करणारी कुठली सामाजिक डेवलपमेंट सांगू शकता का (जी अन्यथा शक्य नाही)?

३. सुबत्ता
तसे सुबत्तेचे बरेच मानक असावेत. पण असो. अन्नधान्य घेऊ.
उत्पादन हा एकच निकष होऊ शकत नाही. Composition, variety, availability, affordability, distribution of ownership, prices, price variations, preferences, quality, nutrition, taste, असे अनेक घटक आहेत. पण हा एक अतिशय योग्य निकष आहे. या निकषावर प्रगती झाली आहे का हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या डायमेंशन्स मधे काय काय झाले आहे ते पाहणे गरजेचे आहे. शिवाय नैतिकता पण मधे येऊ शकते. म्हणजे अगोदर १०० लोक ठीकठाक खायचे पण आदर्श प्रमाणापेक्षा कमी, ५० लोक कमी खायचे पण जगायचे आणि नव्या केस मधे १४८ लोक आदर्श खातात पण २ लोक सरळ मरतातच असे दिसून आले तर तुलना कशी करायची?

आता हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा, व्यवसाय, वेळ असणे(आपले लेबर नीट किमतीचे असणे आणि जीवनशैली नीट असणे), मनोरंजन, स्वच्चता(सौंदर्य, प्रदूषण नसणे), स्वातंत्र्ये (संचार, वक्तव्य, इ), जि़ज्ञासापूर्ती (विज्ञानाची प्रगती, इ), विश्वशांतीची भावना (सुखासमाधानाची भावना,एकूण जग ठिक दिशेने चालले आहे अशी भावना, तशा घटना, पुढच्या पिढ्यांसाठी सर्व आलबेल आहे अशी भावना) या खर्‍या प्रगतीच्या निदर्शक आहेत असे मला वाटते. यात तुम्ही बदल सुचवू शकता. मग या पैकी प्रत्येकाला वेट द्यायचे आणि मिनिमम डिझायर्ड लेवल तरी ओलांडली नाही ना हे पाहायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी आकडेवारी दिलेली आहे. हे तीन निकष जगभर मानले जातात. तुम्ही प्रश्नचिन्हं उभी केली आहेत. ठीक आहे. पण जोपर्यंत तुम्ही वाढलेलं आयुष्य किंवा वाढलेलं शिक्षण हे समाजाच्या ऱ्हासाचं निदर्षक कसं आहे हे आकडेवारीसकट सांगू शकत नाही, तोपर्यंत माझा मुद्दा बाद होत नाही. मी एकेका निकषाबाबत एकेक लेख लिहिलेला आहे, तसा तुम्हीही लिहावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात माणूस स्वार्थी आहे आणि आपल्या फायद्याच्या गोष्टी तो कधीच बदलत नाही हे अरूणजोशींना पटत नाही असा माझा दावा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि स्वार्थी या शब्दाची शक्य तितकी निगेटिव्ह अर्थच्छटा विचारात घेतल्यानेच ते पटत नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१४ जानेवारी १७६१, संक्रांतीला पानिपत युद्ध झालं.
लाखाच्या आकडयत गेलेली मराठी सेना कमी होण्याचं कारण हे तेव्हाची कडक थंडी व भूक कैक सैनिकी देहांनाही झेपली नाही व ते देह संपले; हे ही होतं.
लाखाच्या घरातील सेना नजरेत यावी इतपत घटावी म्हणजे मृत्यू हजारावरतरी झालेच असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हजाराच्या वर (समजा) मृत्यू झाले, तर त्या प्रत्येक मृत्यूचे पर क्यापिटा मूल्य कमी झाले नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही बातमी पहा. खरी आहे असे गृहित धरूया.

हे विकासाचे लक्षण आहे की विकासाच्या अनुषेशाचे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याआधीच्या दहा वर्षांत किती जणांना आपलं घर सोडून शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं होतं हे कळल्याशिवाय बदल कुठच्या दिशेला आहे हे सांगणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२५ वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्याला बारावीला ९१% टक्के गुण मिळाले आणि एका शासकीय कॉलेजमध्ये इंजिनियरींगला अ‍ॅडमिशन मिळाली. आज तितकेच गुण मिळाले तरी त्याच कॉलेजमध्ये त्याच इंजिनियरींगला अ‍ॅडमिशन मिळणार नाही. ही प्रगती आहे की अधोगती? (सफरचंद ते सफरचंद तुलना करण्यासाठी, तेव्हा किती खाजगी कॉलेज होती, आता किती आहेत हा मुद्दा येऊ नये म्हणून शासकीय कॉलेजचा आधार घेतला आहे. २५ वर्षांनंतरही, महाराष्ट्रात शासकीय कॉलेज अजूनही जवळपास तितकीच आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रगती आहे की अधोगती?

हेही सांगणं कठीण आहे. परीक्षा आणि गुणपद्धती तीच राहिली का? परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली का? कदाचित असं म्हणता येईल की एका विशिष्ट परीक्षेत ९१ च्या वर गुण मिळवणारांची संख्या प्रचंड वाढली. ही वरवर तरी प्रगती आहे. शासकीय कॉलेजं वाढली नाहीत, याला प्रगती नाही असं म्हणता येईल. पण खाजगी वाढली. ही प्रगती पुरेशी आहे का? देशाला जितक्या इंजिनियर्सची गरज आहे ती भागते आहे का? हुशार मुलांना शासकीय कॉलेज नाही तरी इतर संधी पंचवीस वर्षांपूर्वीपेक्षा अधिक आहेत की कमी आहेत?

पंचवीस वर्षांपूर्वीचं माहीत नाही. पण सत्तरच्या दशकातली तरुण पिढी प्रचंड नैराश्यग्रस्त होती. डिग्री असूनही नोकरी नाही आणि आसपास प्रचंड महागाई याने ग्रासली होती. त्याआधी चाळीस पन्नासच्या दशकांत म्हणण्यासाठी सुशिक्षित पिढीच नव्हती. आत्ता तितकी वाईट परिस्थिती नाही असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याआधीच्या दहा वर्षांत किती जणांना आपलं घर सोडून शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं होतं हे कळल्याशिवाय बदल कुठच्या दिशेला आहे हे सांगणं कठीण आहे.

दणकट प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विकासाचे लक्षण आहे की विकासाच्या अनुषेशाचे ?

'केल्याने देशाटन ... मनुजा चातुर्य येतसे फार' असं जुनं काव्य आहे. त्या न्यायाने प्रगती मोजायची का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.