थापाच मारणारा -

संसार हा सुखाचा दोघात चाललेला
पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला

त्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा
शेतास खाउनीया ज्यानेच घात केला

का सापळ्यात आला उपदेशतो सभेला
नादात तोच नेता मोहात लालचेला

थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता
निवडून तोच येता मतदार भारलेला

भजनात आळवीता भावात देव आहे
बाजार का न सहता तो भाव वाढलेला

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संसारात दोघांच्या आज, तिसरा फार गरजेचा,
निरखून पहावा तुम्ही, हा संदेश मालिकांचा

कुंपणावरीच त्यांनी बैसून ऐश केली
शेते चरून खाणे, हक्क जन्मतः मिळाला !

थापा तुम्हा अम्हाला दिसतात मारलेल्या
मतदान करणारा, नोटांत विकतो मताला!

न सभेत जातो आम्ही, नाहीच मतदानाला
चिकटून टीव्ही ला, हे सांगतो नेटफ्रेंडला

चालायचेच सारे, हा दोष ना कुणाचा
सोडूनी द्यायचा का, खटाटोप जगण्याचा?

प्रतिसाद लिहीताना, टायपून फार गेलो,
हलकेच घ्या हो थोडे, आवरा उद्वेगाला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>>पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला
हे काही पटले नाही ब्वॉ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही