भावनिर्णयन - यीट्सची "Before The World Was Made"

यीट्सच्या ह्या कवितेविषयी इथल्या वाचकांच्या प्रतिक्रिया हव्या आहेत -

Before The World Was Made

If I make the lashes dark
And the eyes more bright
And the lips more scarlet,
Or ask if all be right
From mirror after mirror,
No vanity's displayed:
I'm looking for the face I had
Before the world was made.

What if I look upon a man
As though on my beloved,
And my blood be cold the while
And my heart unmoved?
Why should he think me cruel
Or that he is betrayed?
I'd have him love the thing that was
Before the world was made.

- William Butler Yeats (१८६५ - १९३९)

ही कविता १९३३ साली The Winding Stair ह्या संग्रहात प्रकाशित झाली. संग्रहात १२ कवितांचा एक उपविभाग होता - A Woman Young and Old - त्यात ती समाविष्ट होती.

व्हॅन मॉरिसननं त्या कवितेचा केलेला संगीताविष्कार -

कार्ला ब्रूनीनं केलेला आणखी एक संगीताविष्कार -

वाचकांना विनंती ही की त्यांनी जालावर शोध घेऊन काही म्हणण्यापेक्षा कविता वाचून आपल्याला काय वाटलं त्याविषयी सांगावं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संगीताविष्कार सध्या अनुभवू शकत नाही, पण कविता वाचून असे वाटले -

परिप्रेक्ष्याची हि रुढ/घट्ट आवरणे बनली नसलेल्या जगात तुला तुझे स्वत:चे परिप्रेक्ष्य बनवायला मिळो, मी अशाच परिप्रेक्ष्याचा शोध घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली शारीर ओळख निर्लेप नसते. सतत त्या रूपावर वर काहीतरी संस्कार झाल्याने ते आदीम-निष्कलंक नसते. पहिल्या भागात त्या मूळ रूपाचा ध्यास जाणवतो. नंतरच्या भागात आत्मिक पातळीवर आदीम व्यक्ति कशी असू शकेल याबद्दल काही शक्यता तसेच या रूपाचे कदाचित दुष्ट वाटावे असे आंतरीक स्वरूप जाणवते. तरूण-टवटवीत पण तरंगहीन आणि पुटे चढवलेले पण खोल-गुंतागुंतीचे अशा दोन ओळखींवर ही कविता भाष्य करत आहे असे वाटले.

अवांतरः खूप खूप पुर्वी मी मराठीत एका कुठल्या अध्यात्मिक गुरूंच्या मुलीने लिहीलेले चरीत्र वाचले होते. ती लेखिका (वासंती ??) आणि गुरूजी दोन्हींची नावे आठवत नाही पण त्या पुस्तकात या गुरूंचा येट्सवर प्रभाव असावा असा दावा होता असे अंधूकसे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आधी शंकानिरसन; मग मतप्रदर्शन' हे समजल्यानंतर या धाग्यावर प्रतिक्रिया लिहीण्यापुर्वी शंकानिरसण करून घेणे आवश्यक होते हे समजले. तर वाचकांच्या प्रतिक्रिया का हव्या होत्या, रायबा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका संहितेतून वेगवेगळी रोचक / वैध भावनिर्णयनं होऊ शकतात हे तत्त्वतः मान्य आहे, पण तशी प्रत्यक्ष निर्माण होताना पाहणं विलक्षण शैक्षणिक असतं. आतापर्यंत तरी प्रतिसाद रोचक आहेत. अजून वाट पाहतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कविता आवडलेली आहे. कवितेतील नायिका आदिम/premordial .... द्वंद्व रहीत , अचल, अविकारी रुपाने प्रियकराला मोहवू इच्छिते असं काहीसं. माय-पुरुष अन सर्व काही अविचलीत/निराकार असताना, त्यांच्यातील सर्वात पहील्यांदा आलेला संबंध असं काहीसं मनात येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता वाचून गवसता गवसता हातातून निसटल्याची भावना निर्माण झाली. इंग्लिश कविता वाचताना अचूक शब्दार्थ, छटा माहीत नसल्यामुळे कविता पूर्णपणे न सापडण्याचा प्रश्न आहेच. तरीही बऱ्याच वेळा वाचल्यानंतर काही समजलं ते असं.

माझ्या भुवया कोरून, आणि ओठ रंगवून
मी अनेक आरशांना प्रश्न केला.
पण कुठच्याच प्रतिबिंबातून
अभिमान दिसला नाही त्या रूपाचा
मीच माझा चेहरा शोधते आहे
हे जग बनण्यापूर्वीचा

एखाद्या पुरुषाकडे नजर वळवावी
आणि विरून जावी तीमधली अपेक्षित आसक्ती
थिजून जावं रक्त पेटण्याऐवजी.
होतं असं कधी.
यात मला का दोष द्यावा त्याने?
मीच माझा चेहरा शोधते आहे
हे जग बनण्यापूर्वीचा

हे रूपांतर करताना मला डोळ्यासमोर दोन गोष्टी आल्या. एक म्हणजे स्वतःची जगाला दिसणारी प्रतिमा. मोठे होताना आपण ही प्रतिमा जगासाठी उजळत जातो. तीवर पुटं चढवत जातो जगन्मान्य सौंदर्याच्या व्याख्यांचे. एखादीने गालावर लाली फासावी त्याप्रमाणे. आणि कधीतरी जेव्हा आपल्याला हा रंगवलेला चेहरा दिसतो, तेव्हा आपल्यालाच प्रश्न पडतो की हा कोण आहे? इतरांच्या अपेक्षांचं इतकं ओझं बाळगावं खांद्यावर की त्याखाली आपणच दिसेनासं व्हावं. इतकी रंगोटी करणं पसंत नाही, पण त्या पुटांखाली दडलेला चेहरा आहे कुठे, याचा शोध घ्यावासा वाटतो. ही पुटं आपण चढवलेली असली तरी त्यांत कर्ता करवता हात असतो इतरांच्या अपेक्षेचा.

दुसरा पैलू म्हणजे आपल्या आकांक्षांचा. एखाद्या स्त्रीने अनेक पुरुषांवर भाळावं तसं आपण अनेक स्वप्नांच्या प्रेमात पडतो. त्यातलं एखादं स्वप्न जर मनातून उतरलं तरी त्याबद्दल कधी कधी आपल्यालाच रुखरुख लागते. 'एके काळी मी काय सुंदर चित्र काढायचो, पण आता ते सगळं गेलं. मी ते सोडायला नको होतं' पण ही आत्म्याला टोचणी का द्यावी आपण?

या दोन्हींचा वरवर संबंध लागत नाही. तो लागण्यासाठी हे लक्षात घ्यावं लागतं की आपण कसल्याकसल्या प्रेमात आहोत याचे मानदंडच आपण आपल्या सौंदर्याचं निधान ठरवून ठेवतो. हे मानदंड जर जगाने ठरवले असले तर? मग यांना नाकारून या पुटांखालचा खरा चेहरा काय हे शोधावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हॅन मॉरिसन म्हणतो - "And YOUR lips more scarlet", वगैरे.

हा संपादनाने अर्थ वेगळ्या दिशेला स्थिर होतो. चिंज यांनी दिलेल्या मूलपाठ्यात "माझा चेहरा की दुसर्‍या कोणाचा चेहरा" या बाबतीत मला तरी संदिग्धता वाटत आहे.
अर्थात त्या नव्या दिशेने जाताना व्हॅन मॉरिसनने पुढे ओळीच्या ओळी बदललेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंगवून अधिक मोहक केलेला चेहरा म्हणजे उथळ नटणे (व्हॅनिटी) नव्हे. किंबहुना या स्खलनशील वास्तव जगाच्या पूर्वी असलेला (तात्त्विकदृष्ट्या पूर्वी = मूलभूत) परिपूर्ण (पर्फेट, आयडियल) चेहर्‍यास शोधून साकार करण्याचा प्रयत्न मी करत आहे.

या माणसाकडे बघताना प्रियकर म्हणून माझे रक्त सळसळत नाही, माझे हृदय धडधडत हे कमतरता असलेले वास्तव आहे. माझ्या या स्खलनशील आणि क्रूर वास्तवाने त्याचा घात केला, असे त्याने मानू नये. या वास्तवाच्या पूर्वी एक परिपूर्ण "मी" आहे, त्या "मी"वर या माणसाने प्रेम करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

​गानफिती न ऐकता फक्त ओळी वाचून प्रतिसाद देतो आहे.
--
पहिले कडवे वाचल्यावर जाणवलेला अर्थ -
या आताच्या मुखवटे चढविण्यास भाग पाडणार्‍या बेगडी जगात येण्याआधी अनाघ्रात / निर्गुण असलेल्या 'स्व'कडे कवितेच्या नायिकेला परतायचे आहे. काही कारणाने तिचे आत्ताचे वा इतरांच्या अपेक्षेत आकर्षक ठेवलेले व्यक्तिमत्व ती सध्या निभावून नेत आहे. मात्र त्या पूर्वीच्या पुटे न चढलेल्या 'ती'कडे परतण्याची आस तिला लागून राहिली आहे. मात्र त्या 'स्व'चा स्वीकार इतरांकडून त्या स्वरूपात कुठलेही ठप्पे (लेबले) न लावता होईल का याचा विचार ती करते आहे.

मात्र दुसर्‍या कडव्यामुळे पहिल्या कडव्याचा अर्थ हाच आहे की नाही याबाबत शंका आली.
कारण कडव्यात 'त्या'चे येणे.

दुसर्‍या कडव्याची सुरुवात थोडी गोंधळात टाकते.
What if I look upon a man
As though on my beloved,
यात on मुळे ही वाक्यरचना नीट कळली नाही. पण look on = look upon असे गृहित धरून पुढे जात आहे.

दुसर्‍या कडव्यामुळे कवितेच्या अर्थाची दुसरी शक्यता -
या स्त्रीचे पूर्वीचे जग, जे तिला प्रिय होते, ते उध्वस्त झाले आहे, असे वाटते. तिचे हे जग म्हणजे तिचे प्रेम, तिचा प्रियकर. काही कारणाने ते प्रेम (तो) तिच्यापासून दूर गेल्याने तिच्यातील जीवनरस नष्ट झाला आहे. ती जणू निव्वळ टरफलाप्रमाणे उरली आहे. त्या निश्चेष्ट अवस्थेतून सावरण्यासाठी, या जगात वावरण्यासाठी तिला चेहर्‍यावर बेगडी पुटे चढवावी लागत आहेत. ती पूर्वीच्या 'स्व'कडे जाण्यासाठी आतुर आहे, धडपडते आहे.
पण ते कसे साध्य होईल; वा साध्य होईलच की नाही याबाबत तिला शंका आहे.
त्यामुळे आता कुठल्याही पुरुषाकडे पाहताना ती पूर्वीप्रमाणेच जीव ओवाळून टाकून प्रेम देऊ शकेल की नाही, याबाबत तिला खात्री उरलेली नाही. असे झाल्याने तिच्यावर निरनिराळे ठप्पे (लेबले) लावली जातील, तिच्याविषयी मते बनविली जातील. मात्र पूर्वी जीवनासक्त असलेल्या आणि ओसंडून प्रेम देऊ शकणार्‍या 'ती'चे दर्शन ती त्याला घडवू इच्छिते. आत्ताच्या टरफलापेक्षा पूर्वीच्या आतल्या कोवळ्या जिवावर त्याची एकवार नजर पडावी, हे तिला हवे आहे.
---

ही कविता वाचताना श्री. सतीश काळसेकर यांच्या एका कवितेची फार म्हणजे फारच आठवण होत राहिली. ती दीर्घ कविता खाली देत आहे.
-----

(कवितासंग्रह : विलंबित, पृष्ठ क्र. ८४)

...असं तर व्हायला नको होतं

आपलं आपल्याला असं तर व्हायला नको होतं

हातचं राखून बोलायचं नव्हतं कुणाशी
बोलताना कुठल्याच शब्दावर अडखळायचं नव्हतं
क्षणभरही.

सगळ्या आयुष्यातल्या बर्‍यावाईटाचं हलाहल पचवून
त्याचं निळंशार शालीसारखं आभाळ पसरायचं होतं
सगळ्यांवर कवितांच्या ओळींतून थेट.

आपल्याला नको होती आयुष्यात
कुठलीच अधलीमधली विरामचिन्हं
सरळच जायचं होतं पूर्णविरामाकडे
तर मध्ये किती ही वाढली
नको असलेली घरंगळ.

रुपयाची किंमत हवी होती आपल्याला फक्त रुपयाच
न अधिक न उणी
दारूला म्हणायचं होतं फक्त दारूच
कशालाच जोखायचं नव्हतं काही कमी-जास्त
वावरताना वावरायचं होतं
नुकताच जन्म घेतल्यासारखं.

कुठून कुठं आलो आपण
वस्त्रं घातली आयुष्याला भरजरी
नको त्याला झाकायला शिकलो
आणि किती चढवले मुखवटे
खरं आणि खोटं याची मोजदाद करीत राहिलो
कसबी उलाढाल्यांसारखे लिहीत राहिलो
हिशोबाच्या दुहेरी वह्या
कधी आणि कसे चढले
मुखवट्यावर मुखवटे
आणि हरवतच गेला
आपला चेहर्‍याआतला चेहरा.

आपल्याला नको होत्या आपल्याभोवती
अशा अंधार आवळत आणणार्‍या भिंती
प्रकाश भरपूर असावा
म्हणून आणल्या विशाल खिडक्या
तर त्यावर वाढतच राहिल्या
साठीषण्मासी पडद्यांच्या कनाती.

आयुष्याभोवती निर्माण करावं
गूढतेचं वलय
असं तर कधीच नव्हतं वाटलं आपल्याला
तरीही वर्षानुवर्षांच्या रात्रीनंतर ही कासाविशी
कुठून कसं आणि काय उलटलं
आणि सगळी मुळं गेली विस्कटून
असं नव्हतं आपल्याला विखरू द्यायचं मातीला.

भर मध्यानी उघड्या आभाळाखाली
आपण झेलला आनंदात
सूर्याचा प्रखर प्रकाश तापल्या वाळूत
पाठीवर आणि पोटावर
तसा आयुष्यभर सहवासात
उभा करायचा होता सहकार
तर आपण फुत्कारतच राहिलो सगळा विखार
आणि नासवूनच टाकलं कलेवर.

कसा झाला र्‍हास सार्‍या सोन्यासारख्या
मानवी संबंधांचा
आणि निर्जीव वस्तूत बदलून गेलं
आपलं वस्तुजात.

कसे कळू लागले आपल्याला आपल्या नकळत
खरेदी विक्रीचे अमानुष व्यवहार
आणि सगळ्या जिवाशिवाच्या नाते संबंधात
उगवलं आर्थिक संबंधांचं तण निबर.

शरीरातल्य सहस्त्र कळ्यांना बहर आणायचा होता
परस्परांच्या स्पर्शातून
रोमारोमांत पसरायचं होतं चैतन्य
तर आपण दिवसादिवसागणिक
त्यांना मरू दिलं अकालीच
आतल्याआत वाळून करपू दिलं
सगळं हिरवं रान.

परस्परांच्या सावलीत राहून
स्वतंत्र करायची होती आपली मनं
सर्व दिशांतून पसरावीत त्यांची पाळंमुळं
आणि सजीवही ठेवायची होती
आपली ही मर्त्य शरीरं
तर पाहता पाहता चरतच गेला
मालकी हक्काचा कॅन्सर
आपल्या अवघ्या आयुष्यावर.

आपण हरवतच गेलो आपल्याला
साध्य-साधनांच्या अरण्यात.
स्वतःला शोधत आत आत पोचायच्या प्रवासात
अधिकाधिक बाहेरच फेकले गेलो
कातडी सोलत.

निमित्तमात्र करायचं होतं शरीर
आणि घ्यायची होती एक आध्यात्मिक उडी
तिथूनच झाली असती
खरी सुरुवात

तर शरीरातच गुंतून राहिली शरीरं
आणि उभारणीसाठी
जमवता जमवता विटा
विटाच जमवण्यात
संपत गेली उभारणी.
---------------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःवरचं प्रेम उडालेल्या व्यक्तीवर कोणीच प्रेम करू शकत/धजत नाही (अगदी ती व्यक्तीही जिच्यामुळे स्वतःवरच प्रेम उडालंय) असं काहिसं म्हणायचंय असं वाटलं.

मात्र मांडणी, शब्दयोजना, लय सगळंच कंटाळवाणं वाटलं, बेसिकली असेल प्रसिद्ध वगैरे पण मला कविता आवडली मात्र नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्रे असे आहे का हे? मला तर वाटल की स्वतःतल काहीतरी हरवत जाव आणि काय हरवलय हे शोधताना आपल्यातले बदल लख्ख समोर यावेत. असा काहीतरी आहे या कवितेत..मग हे बदल तिच्या स्व मधले किंवा बाह्य रूपाशी निगडीतही असू शकतील... म्हणजे “पुलाखालून बराच पाणी वाहून गेलाय गड्या..” असा आपल्याला आपल्याच विषयी वाटावं... एक खानोलकरांची (बहुदा) कविता आहे..

कुठे हरपली नयनातील ती नक्षत्रांची फैर ?
अन गात्रातील चापल्याच्या मल्हाराची खैर ?
भरतीआधी ढळले कैसे अंगलरिचे काठ ?
तुला पाखरा जडली कैसी वहिवाटीची वाट ?
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0