आकडे आणलेले खरड

१.
मेट्रोमध्ये हेलकावणारी शहरी संवेदना पुसून टाकू म्हणता टाकता येत नाही. काहीतरी तिसरं होऊन मला शीपिश वाटू लागते. अंग चोरून बसण्याखेरीज शरीराची गरज फारशी नाही हे पटू लागते.सब-वे मेट्रो मधली ही भावस्थिती सर्व भूतलावर सारखीच असावी. मी कानात सिल्विया लावून देतो.

इथल्या विहारात जाण्यात कोणाला फारसा रस नसणार हे माहित असूनही दोघा-तिघांना उपचार म्हणून विचारून झाले. शिवाय नंतर कुठे गायब होतास ही विचारणूक आपोआप टाळली जावी. त्यांना उडवून लावावे इतपत ते कसले माझे गुन्हेगार नाहीत, त्यामागची आस्था तर माझ्यालेखी आदरणीय असतेच पण मुळात बोलण्याच्या ओघ मला आवरणे कठीण होते. उगाच फाटे फुटत राहतात!
‘मी’ चे पाल्हाळ विस्कटून जीभ कातरून टाकावी मला बोलण्याचा तिटकारा येऊ लागतो.
केंद्रीभूत होऊन ब्रम्हांडाचा विचार सोपा नाही. ज्या थोर आत्म्यांना ते जमतं त्यांच्या सावलीत आयुष्याच्या अर्थांचे कवडसे पडले असतात, ते वेचण्याची कुठली धडपड असते मला शांतवलेल्या एका चेहऱ्याकडे पाहून वाटते. तिच्या लेखी समग्रता काय? तिचे विश्व समर्पून एका अजून मोठ्या आयामात ती मिसळून जात असता मला विलक्षण वाटत असते. अमिताभ बुद्ध. अज्ञात, अमर्याद आणि गूढसातत्य असण्याऱ्या वैश्विक चिंतनाकडे जायचं नाहीय, मी इथे-तिथे रेघ आखून घेतोय.
पण खरेच तसे होते का.
अनुभव अनुभव ह्या एका गोष्टीला फारच लाडावून ठेवलेय.
सगळी रात्र विचित्र जाणार आहे याची चाहूल लागते. हूकअप? हा हा हा. करुत करुत.अजून विहाराची पायरी सोडली नाही तरी अंग तापू लागतं!
२.
स्वच्छतेचे, रेखीवतेचे बरेच मापदंड उभेकरून शहर पसरलंय. पुलांवर जाताना हानचे मोठे पात्र चित्ताचे एकवटलेपण मागत असता पुन्हा रो-गिल्स च्या जाळ्यात गुरफटून घेताना एक अवस्था कातरत असते. प्लास्टिक असे काही जिवंत लालसर काळजावर चढत असते. मोठाच malignant tumor हा. फुटून भडक पेशी खाळ बाहेर पडतील, एकेक गिल आमीबी छद्माखाली घेत सगळं शहर झावळून टाकतील.मद्य ढोसून दात काढत दुर्वासणाऱ्या माणसांना गिळत जातील.
इतक्यात कुणीतरी लक्ष वेधून घेतं.त्यांच्या शरीरांचे अवशेष सांडून ते निघूनही जातात.मनावर प्रवासाचं मोहोळ चालून येते तेव्हा अंगासाठी निद्रेचे मूलभूत वस्त्रही अपोआप गळून पडते. एकमेकांच्या खांद्यावर स्वप्नांचे घोस झुलवत समोरचं जोडपं शांत झोपी गेलेलं असतं.मेट्रोचा धक्का बसता अधिक घट्ट धरून ठेवले जाणारे त्यांचे तळहात समोर झर्रकन दिसून जातात.
मोबाइलच्या एव्हढ्याश्या जगात लहानग्यांचे चित्त हरवून गेलेले असते. त्याचं काय बरं, त्यांचं जग. आपलं जग. अवकाश लहान-मोठा होतो.पण तो असतोच ना. त्यांच्या तसल्या जगात विनासायास अतिगति पळणारे प्रोग्राम्स असतात, भावनाखेरीज. तेही बरंच असतं त्यांच्यालेखी. गुह्य प्रश्नांचा तगादा लावत नाहीत.समजून घेणं-नाही घेणं, रागलोभ, असल्या मानवी गोष्टींपासून बरीच लांब जावून बसलेली कोवळी विश्वं.
असले contrasts उगाच येत जात असतात. नाहीतरी गुंतवून घेणं गरजेचंच असतं. तेवढ्यासाठी स्थळ-काल शोधायचे. माणसं शोधायची.ते झालं नाही तरी ‘मी’ शोधायचं. माणसापुरतं जाऊ दे. आता समुद्रावर जीव लावून बसुत.
खामोशी भी अजीब गहराई है, जो चुप है वो समंदर है, असला एक शेर मागे कुणीतरी पाठवून दिला होता. समुद्राचे आणि शांततेचे नाते गाजेने ठळक होत होते. तासनतास लाटा कानावर आदळाव्या वाटतात. दुसरं काही नको. तो वाहत असतो याच ते प्रमाणच आहे. कुठेतरी जावच लागतं.आता कुठल्या किनाऱ्यावर मी उभा आहे?
३.
सिल्विया,
काय ग तुझा सिंड्रोम केला की उरलेल्यांनी.
कुणाकुणाच्या मेंदूत तुझ्या तीक्ष्ण नख्या ओरखडून गेलीस.
गेलीस कशी, रोवून धरलाय तुझा खिळा,
तो घुसता घुसत नाही तरी वरून केवढ्या मणाचे घण घाल घाल असतो सतत आम्ही,
तुझे हे ओझं कसं फेडायचं पोरी,
कळत नाही.
४.
इथून मागे पाहून सरळ जाणे शक्य वाटत नाही. सरळदेखील कुणी जात असतो म्हणा. पण असं वाटत राहते. याला sorted उत्तर नाही. मी हे काय खरडत बसत असतो.कसले उन्मन ध्यास लावून घेतले आहेत जीवलागी. चक.
५.
हा नाला हान नदीला जातो. तिथून समुद्राला. फेर धरायचा. मी सायकल घेऊन कितीवेळा नदीला वळसे घालतोय. पाण्यातले बदक, पोटातला बदक,टोकावर फडफडणारा बदक .हुश्श. दमून समाधानाचा सुस्कारा येतो, प्रसन्न वाटू लागते.उगाच गालावर हसू घेऊन पोरांना डिवचत घरी येणे.
बोललो भसाभस. कितीतरी दिवसांतून तोही कोणाशी तरी इतका बोलला असं म्हणतो.समुद्रावर झालेली कातर स्थिती त्याला सांगितली.तो म्हणतो काही complicated नसतं. उगाच ताप घेऊ नको.
मग त्याने गाठलेली टोकं सांगितली. फेर धरला मग आम्ही.तो मोकळा होतोय आणि आमच्यातल्या बऱ्याच विसंवादी कड्या आम्ही मोडीत काढल्या. तो ही मनातलं बोलला,
‘दारं उघडून ठेवावीत नुसती’ असं म्हणाला. ते त्याच्यापुरतं तरी मी उघडलंय, त्याचा सहज वावर व्हावा. मी खाऊन झोपून गेलो.परत उठलो. नुसरत लावला.परत झोपलो. सकाळी अनिकेत खुडबुड करू लागला तेव्हा जाग आली. ह्या मोठ्या घरात राहूनसुद्धा त्याचं नाव अनिकेत हे वाटून गम्मत वाटली आणि मी बाथरूम काबीज केलं(!).
६.
बाजूच्या चर्चमधून कोरिअन ऑर्गन्स सुरु लागले.छान सूर्यप्रकाश सांडत असता त्यांच्याबरोबर त्या सुरावटी खोली मंदपणे भरून टाकत होत्या.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दीर्घकाळ रेंगाळू शकणारी आत्ममग्न शब्दचित्रे आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी एकदा मनात वाचलं. मग मोठ्याने वाचलं. मोठ्याने, स्वतःशीच वाचलेलं जास्त समजलं, भावलं, डोळ्यांसमोर आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोरियन ऑर्गनचे आर्त सूर आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नीट समजलं नाही, थोडं जड वाटलं.
जेवढं समजलं तेवढं आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars