बाळाची शर्यत-

'
एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मुल उभे राहू लागते, चालू लागते त्यावरची कविता आवडली. फार आनंद होतो अशा क्षणी.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

अरुण जोशी- उशीरा आभार मानतोय. क्षमस्व !