गंधर्व गप्पा

स्थळः बालगंधर्व रंगमंदीराबाहेरचा चौथरा
वेळः रात्रौ ९:००च्या आसपास

मी बसलो होतो तिथुन जवळच चार जेष्ठ नागरीक (पैकी ३ पुरूष व १ स्त्री) गप्पा हाणत होते. माझे मित्र पोचायचे असल्याने मी तिथे ई-पुस्तक वाचत बसलो होतो. मात्र या मंडळींचा आवाज चांगलाच लागला होता, त्यामुळे सगळे लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच जात होते. त्यातील काही क्षणचित्रे

================

पु१: हे आता नाटक सुटलं ना त्यात २७ पात्र होती म्हणे (नुकतंच घाशीराम कोतवाल नाटकाचा प्रयोग संपून माणसे बाहेर पडत होती)
स्त्री: २७ म्हणजे फारच झाले नाही, १० ठिक होती फार तर!
पु१: हो ना. त्या कुठल्याशा शिवाजीच्या नाटकात म्हणे ३७ पात्र होती. ही नाटकं कशी!? याला तर सर्कसच म्हणायची!
पु२ (दोघांनाही): अहो पण तुम्ही बघितलंय का हे नाटक?
पु१: छ्या! असल्या सर्कशी कोण बघणार, मी तर पात्रसंख्या ऐकुनच टाळलं
स्त्री: हो ना! मी पण म्हणुनच नाही पाहिलं. त्यात यात ब्राह्मणांवर फार टिकाय म्हणे!
पु१: असणार नाहि तर काय? असं काहितरी केल्याशिवाय यांची नाटकं चालणार कशी?
स्त्री: जिथे तिथे झोडपायचं हो आपल्याला, काही इलाज नाही. असो.
पु१: (तोवर समोरून एक कपल चाललं होतं त्यांच्याकडे बघत) हल्लीच्या पोरांना काही धरबंध राहिलाय का बघा?
(सगळे ज्ये.ना. २०-२५ सेकंद तरी त्या कपलला न्याहाळत होते. अगदी व्यवस्थित चार कपल्स सारखे कपल होते. गप्पा मारत होते, फक्त जरा कोपर्‍यात बसायला चालले होते इतकेच)
स्त्री: आता हिने घरी स्वयंपाक केला नसेलच, मग बाहेरच जेवतील दोघे!
पु३: (अचानक तावातावात) नाहितर काय? घरचे उपाशी आहेत, जेवलेत याची हिला काय फिकीर! पोरं जन्माला घालायची नाहीत, गावभर हिंडायचं, बाहेरच जेवायचं. घरचे म्हातारा-म्हातारी बघतील स्वतःच. वर एक फोन केला की झालं! नुसते एका घरात राहतात, एकमेकांना तोंड दिसतील तर शपथ!
स्त्री: हो ना हो! इथे असले तर ही तर्‍हा नाहितर तिथे अमेरिकेत जाऊन करत बसायचे चाळे.
पु१: असं काही नाहि हं. अमेरिकेत सगळेच चाळे करतात असं काही नाही. आमच्या XXX ला घ्या. त्याच्या मुलाला शुभंकरोती येतं, झालंच तर मला व्यवस्थित 'आजोबा' हाक मारतो. आता बाकी बोलणं, उच्चार, सवयी तिथल्यासारखं आहे. पण ते तसंच हवं
स्त्री: हो ना हो! ते बरोबरच आहे, पण सगळेच काही तसे नसतात
पु२: बाकी आता कुठलं नाटक आहे?
पु१: ते नाहि का? ते दोनच पात्र असलेलं नाटक आहे.
स्त्री: हा! ते रिमा लागुचं?
पु१: छे छे! रिमा लागुचं ते नाही. ते बरंच जोरात चाल्लंय.
स्त्री: हो ना हो! कालच आमच्या शेजारच्या XXX बघुन आल्या
पु१: तेच ते, ते वेगळं. त्यात रिमा आणि ती दुसरी काय भक्ती की काय ती आहे!
स्त्री: भक्ती नाही हो, काय बाई तिचं नाव!
पु१: हो बरोबर भक्ती नाही.. काहितरी वेगळंच नाव आहे, हल्लीची पोरं पण काय नावं ठेवतील सांगता येत नाही
स्त्री: मुक्ता, मुक्ता!
पु१: हा मुक्ता. मुक्ता पटवर्धन!
पु२: पटवर्धन नाही हो बहुदा बापट!
स्त्री: छे हो! रिमा लागु नी मुक्ता कुलकर्णी
पु१: हो बरोबर! कुलकर्णीच. आता नाटकाचं नाव विसरलो
(स्त्री व पु२, हो मी पण नाव विसरलोय या अर्थाची मान हलवतात/पुटपुटतात)
पु१: हा तर ते नाटक नाहिये आत्ता, नाहितर केवढी तरी गर्दी झाली असती. आता ते दुसरं नाटक आहे. इंग्रजी नाव आहे काहि तरी
स्त्री: यातही दोनच पात्र आहेत का?
पु१: हो. पण हे त्या भक्तीच्या नाटकासारखं नाहीये. हे एकदमच अश्लील नाटक आहे! (तेव्हा व्हाईट लीली आणि नाईट रायडर नाटक होतं)
स्त्री: हो ना हल्ली अश्लील नाटकं काय, सिनेमे काय! फार बोकाळलंय. ही पोरं काहितरी बघतात नी मग बलात्कार होत सुटतात!
पु२: आता बघा, समोर दोन मुली दिसतायत, किती ते तंग कपडे! मग कोणालाही वाटेलच ना की हिलाही तेच हवंय
स्त्री: अहो कसला धरबंधच राहिला नाहीये
पु३: (पुन्हा अचानक जागा होत): अख्खी भारतीय संस्कृतीचा नाश होतोय. सगळं पाप चालु आहे. तुम्हाला माहितीये का, आता हे थोड तत्वज्ञान होतंय पण आता तेच गरजेचंय. आता हे बघा माणसाला जमिनीवर पाठवताना त्याच्या नावे दोन खाती असतात
स्त्री: हो ऐकलंय
पु३: तर एक असतं पापचं आनि एक पुण्याचं. तुम्ही पाप केलंत की त्याची नोंद पापाच्या खात्यात नी पुण्य केलं की पुण्याच्या खात्यात होते.
स्त्री: आणि जेव्हा पाप पुण्यापेक्षा अधिक होतं तेव्हा नरकात नाहितर स्वर्गात
पु३: छे तसं नाही, तर शेवटी जर तुमच्या लेखी पापही नसेल आणि पुण्यही नसेल तरच तुम्हाला मोक्षप्राप्ती होती. आणि हे कसं करायचं माहितीये? तर पाप करायचं नाही आणि पुण्य केल्यावर त्याच्या फळाची अपेक्षा धरायची नाही! मग पापाचं अकाऊंटही रिकामं नी पुण्यही साचत नाही. हमखास मोक्षप्राप्ती. सध्या त्या दिशेने माझा प्रवास करायचा मी ठरवलंय.
========
सुरवातीला जरा करमणूक झाली पण मग मी अधिक नाही ऐकलं - ऐकु शकलो. शांतपणे उठून दुसरीकडे जाऊन बसलो.

field_vote: 
2.833335
Your rating: None Average: 2.8 (6 votes)

प्रतिक्रिया

ज्येष्ठ नागरिक फार बोकाळलेत बॉ पुण्यात! (सरसकटीकरणाच्या नावानं बोंबाबोंब चालूच आहे. घ्या तिच्यायला हात धुऊन!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते गप्पा मारणारे लोक ज्येष्ठ नागरिक होते असा उल्लेख कुठे दिसला तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ह्याच धाग्यात तिसर्‍अय ओळीत तसा उल्लेख आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अर्र.. सॉरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

==))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे आणि असेच बथ्थड मध्यमवर्गीय लोकांची संख्या वाढतच चालली आहे.संस्काराच्या नावाखाली मराठी ,हिंदी सिरीअल्समधले हिरो हिरोईन वागतात तस सर्वांनी वागल पाहिजे अशी यांची अपेक्षा असते.
सारासारबुद्धि नावाचा प्रकार नाही. सामाजिक ,राजकीय गोष्टींची झ्याट माहिती नाही.
नुसता टिवी सिरीयल्स बघून अनुकरण करायच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अहो , माठपणा परवडला.
पण मध्यमवर्गीयांची साअमाजिक जाणीव वगैरे उतू जायला लागली की लै बोर मारतात.
कधी मेणबत्ती मोर्चे काय.
कधी फेसबुक स्टेटस शेरिंग काय.
अचान्क ह्यांना अनिल अवचटांच्या लिखाणातून आलेले नवसामाजिक जाणिवेचे उमाळे फुटातात.
थोतरिचे स्वतः प्रत्यक्षात काही करणार नाहित. (म्हणजे धम्माल करायची लाज वाटते आणि सामाजिक कार्य करायचा दम नसतो.) पण "अमुक केलं गेलं पाहिजे" वगैरे बकवास मारतात.
नुसता तथाकथित सामाजिक जाणिवांचा धुमाकूळ.
त्यापेक्षा संस्कारवर्ग क्याटेगरीतले मध्यमवर्ग परवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सौंस्कारवर्गवाले मध्यमवर्गीय काय किंवा आर्मचेअर फिलॉसॉफर्स काय, सगळेच अनपरवडणीय. १२ गडगड्याच्या व्हिरीत घालून बुडवले पायजे त्यांना.

किंवा नको. उगा आपली विहीर बाद व्हायची. त्यापेक्षा सरळ समुद्रात बुडवून टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>> सगळे ज्ये.ना. २०-२५ सेकंद तरी त्या कपलला न्याहाळत होते
--- "बाकी बायका बायकांना जितक्या निरखून पाहतात तितके पुण्यातले पेन्शनरदेखील पाहत नाहीत हो" असं कुणीतरी म्हणून गेलंय ते आठवलं Smile

बाकी ही चौकडी मराठी संकेतस्थळावर सक्रिय सदस्य म्हणून खपून जाईल.

तर पाप करायचं नाही आणि पुण्य केल्यावर त्याच्या फळाची अपेक्षा धरायची नाही! मग पापाचं अकाऊंटही रिकामं नी पुण्यही साचत नाही. हमखास मोक्षप्राप्ती. सध्या त्या दिशेने माझा प्रवास करायचा मी ठरवलंय.

आणि हे संपादक म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--- "बाकी बायका बायकांना जितक्या निरखून पाहतात तितके पुण्यातले पेन्शनरदेखील पाहत नाहीत हो" असं कुणीतरी म्हणून गेलंय ते आठवलं

थोडक्यात, ते चौघेही जण २०-२५ सेकंद फक्त तिला न्याहाळत होते. त्याच्याकडे कुणी बघितलेच नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु२: आता बघा, समोर दोन मुली दिसतायत, किती ते तंग कपडे! मग कोणालाही वाटेलच ना की हिलाही तेच हवंय >>>


हे बोलणार्‍या त्या म्हातार्‍या माणसाच्या एक खणखणीत थोबाडीत द्यावी वाटते. |(

उगीच ज्येष्ठ नागरिक म्हणुन आदर काय करायचा ... आणि मला वाटतं आदर हा वयाचा न करता विचारांचा करावा, मग भले ते विचार आपल्यापेक्षा लहानांचे असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं आदर हा वयाचा न करता विचारांचा करावा, मग भले ते विचार आपल्यापेक्षा लहानांचे असतील.

बालादपि सुभाषितं ग्राह्यम्, गुणा: पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद बॅटॅ Smile

(मला संस्कृत येत नाही पण वरचं संस्कृत वाक्य म्हणजे थोड्क्यात वायाचा आणि लिंगाचा उगीच आदर करु नये, गुणांचा करावा असं काहीसं असावं असा अंदाज लावला आहे Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंदाज बरोबर आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो घनु, बॅटमनला धन्यवाद कसले देता? तुम्हाला 'बाल' असे म्हणून त्याने तुमचा पाणउताराच केला आहे. तुमच्या चांगल्या विचारांना त्याने बालकृत सुभाषित मानून 'शालीतला' मारला आहे बरं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहहाहा हहहा हहाहा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जाउ द्या हो कोल्हटकर... मला काही फरक पडत नाही... मला वाटलं ते विचार मी मांडले. शिवाय मला संस्कृत येत नाही त्यामुळे मला जे तोडकं मोडकं समजलं त्यातून मी मला वाटला तसा सोयिस्कर आणि चांगला अर्थ काढून समाधान मानलेलं आहे Smile हाकानाका!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीझ असं काही करु नका.
उद्या समजा एखादं गब्बर नावाचं आलं पोरग साताठ वर्षांचं आणि नाही पटलं
त्याला आमचं सामाजिक अभिसरण गप्पा वगैरे तर खनकन ठेवून द्यायचं की हो कानाखाली आमच्या.
काय सगळ्यांसमोर साताठ वर्षाच्या पोराकडून थोबाडित खायची काय हो बसल्या बसल्या ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्याला त्याला अभिव्यक्त होण्याचा हक्क आहे अनलेस तो दुसर्याला अडथळा होत नाही किंवा इजा होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हाहाहा छान आहेत गप्पा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु१: हो बरोबर भक्ती नाही.. काहितरी वेगळंच नाव आहे, हल्लीची पोरं पण काय नावं ठेवतील सांगता येत नाही
स्त्री: मुक्ता, मुक्ता!
|
|
... मुक्ता कुलकर्णी
पु१: हो बरोबर! कुलकर्णीच.

'हल्लीची पोरं'? "मुक्ता"???

विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी (हेही योगायोगाने कुलकर्णीच!) 'हल्लीची पोरं' होते काय?

(नाही म्हणायला, त्यांनाही चांगलेच छळले म्हणा त्यांच्या वेळच्या पेन्शनरांनी...)

शेवटी जर तुमच्या लेखी पापही नसेल आणि पुण्यही नसेल तरच तुम्हाला मोक्षप्राप्ती होती. आणि हे कसं करायचं माहितीये? तर पाप करायचं नाही आणि पुण्य केल्यावर त्याच्या फळाची अपेक्षा धरायची नाही! मग पापाचं अकाऊंटही रिकामं नी पुण्यही साचत नाही. हमखास मोक्षप्राप्ती. सध्या त्या दिशेने माझा प्रवास करायचा मी ठरवलंय.

हं????

ऑलरेडी या ना त्या खात्यावर साचलेले क्रेडिट झीरो-औट करायला कोठली विड्ड्रॉवल स्लिप भरायची म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या मुक्ता कुलकर्णी प्रकरणात मला तिथे हसु दाबणे अशक्य झाले होते. बर्वे! बर्वे!! बर्वे!!! सांगावेसे वाटले होते पण मंडळींची जी टाळी लागली होती ती मोडायला नको म्हणून गप्प बसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(पण मला सांगितलेत हे बरे केलेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>त्या मुक्ता कुलकर्णी प्रकरणात मला तिथे हसु दाबणे अशक्य झाले होते. बर्वे! बर्वे!! बर्वे!!! सांगावेसे वाटले होते<<

"हे असं सार्वजनिक ठिकाणी गप्पा ऐकताना गप्पा मारणारे चुकत असतील किंवा चुकीचे संदर्भ किंवा चुकीची नावें वापरतात तेंव्हा त्यांना संदर्भसहीत स्पष्टिकरण देण्यास आतुर होणे"(हे असे मलाहि कधीकधी होते) हि भावावस्था मराठी संस्थळांची देणगी आहे असे समजावे काय?

>> पण मंडळींची जी टाळी लागली होती ती मोडायला नको म्हणून गप्प बसलो.<<

उच्च मनो-निग्रह काय तो हाच असावा, असं मराठी संस्थळावर करुन दाखवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो इथे अशी टाळी लागु देण्याआधीच जमिनीवर आणले जाते. मला माझा मनो-निग्रह दाखवायची संधीच मिळत नाही Wink

-(साळसूद) ऋ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकच नंबर. असे परिसंवाद वेळोवेळी ऐकलेले आहेत. मनापासून येंजॉय केले आहेत.

तुम्हाला अजून काही जागा सुचवतो:
- पर्वतीवरच्या कार्तिकस्वामी मंदिरामागचा कट्टा (सकाळी साताच्या आसपास)
- कर्वे रस्त्यावरचं हॉटेल कवी (याला बीबीसी - ब्राह्मण बेवडा क्लब - असंही म्हणतात)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
- सोमवारी सकाळी सव्वासहाची स्वारगेट-मंत्रालय एशियाड

यापैकी कुठे ते आठवत नाही (बहुदा पर्वती) "पुण्यात ब्राह्मणांचे घेट्टो तयार होत आहेत" असा निष्कर्ष असलेली चर्चा ऐकली होती!

तुम्ही उठून जायला नको होतंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकदा पुण्यात मनसेच्या सभेला गेळो होतो. सभेच्या आधी टिळकरोडच्या एका गल्लीत सिगारेट मारत उभारलो होतो.
अचानक कुठूनतरी पाणी पडायला लागल अंगावर. वरती बघितल तर कोणी नाही. जागा बदलून उभारलो तर पुन्हा पाणी पडायला लागल.

वरती बघितलं तर ज्येष्ठ नागरीक कपल तांब्यातून आमच्यावर पाणी टाकत होत. का तर म्हणे सिगरेट दुसरीकडे जाऊन ओढा.

दुसर्या मजल्यावर जातो का कधी सिगरेटचा धूर?आणि सांगायचे तर तोंडाने सागायच येणार्या जाणार्या लोकांवर पाणी काय मारतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दांभिक असले म्हणून काय झाले? ज्येष्ठ नागरीक सुखी वाटले.

तर एक असतं पापचं आनि एक पुण्याचं. तुम्ही पाप केलंत की त्याची नोंद पापाच्या खात्यात नी पुण्य केलं की पुण्याच्या खात्यात होते.

एक विज्ञानानंद नावाचा बाबा होता. त्याने मंत्रालयावरून उडी मारून स्वतःला मारून टाकले. तो असल्या हिशोबाच्या चोपड्या शिष्यांना भरून ठेवायला सांगत असे. त्यात सुख आणि दु:ख यांचे बॅलन्सशीट असे. जितके दु:ख जास्त तितकेच सुख म्हणून हा इसम स्वतःस सतत काहीतरी वेदनादायक करत असे. लोणावळ्याच्या आश्रमात तीन दिवस त्याचे रेकॉर्ड केलेले बोलणे ऐकल्याने माझ्या खात्यात तीन दिवसाचे पूर्ण सुख जमा झाले. मात्र तिकडचे जेवण (खासकरून लिंबाचे लोणचे) फारच थोर असल्याने थोडे कमी झाले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

छे छे, त्यांनी प्रकाशसमाधी घेतली म्हणे Smile

आमचे एक सुशिक्षित शेजारी यांचे निस्सीम उपासक होते. संध्याकाळी दिवे मालवून, एका पेटवलेल्या मेणबत्तीभवती जमून ते - "हे प्रकाशमित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. मानसशास्त्राच्या आणि मेंदूशास्त्राच्या शेकडो शाखा असे सांगतात. म्हणून मी तुझ्यावर, तुझ्या स्मरणावर एकचित्त होतो." - अशी सामूहिक प्रार्थना म्हणत असत. कितपत उजेड पडला कुणास ठाऊक!

त्यांच्या नियतकालिकातही यज्ञातला य म्हणजे अनुभव, ज्ञ म्हणजे ज्ञान अशी काहीतरी विनोदी फोड असे. पण त्याला अभिमंत्रित त्रिविक्रमी जलाची सर नाही; हे मात्र मान्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म Smile आमच्या जीन्स-टॉप घातलेल्या मैत्रीणीला काही ज्येष्ठ काकवांनी बोलवून 'असले कपडे घालायचे नाहीत पुरुष चाळवतात' लेक्चरबाझी केलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0