माझे अंदाजः लोकसभा २०१४

प्रत्येक विभागाचे तपशीलवार विवेचन करणारा लेख लिहिला होता पण प्रकाशित करताना तांत्रिक कारणाने काहितरी गडबड झाली आणि लेख प्रकाशित झाला नाही. मी मूर्खपणा असा केला की बॅकअपही घेतला नाही Sad आता पुन्हा इतके सगळे मुद्दे टंकायची शक्ती नाही व वेळही नाही. मी पुढिल काही दिवस जालावर नसेन, तेव्हा आजच आतापर्यंतच्या घडामोडींनंतर, माझे राज्य निहाय अंदाज देतो आहे.

सदर अंदाजांसाठी लोकसभा, विधानसभा निवडणुका,स्थानिक राजकारण व काही ठिकाणी उमेदवार यांचा अभ्यास केला आहे. मात्र कोणतीही एक शास्त्रीय पद्धत वापरलेली नाही. निव्वळ हौस म्हणून हे अंदाज काढत आहे.

युपीए, एन्डीए, तिसरी आघाडी, चौथी आघाडी व इतर असे वर्गीकरण आहे:
तिसरी आघाडी: असे युपीए किंवा एन्डीएत नसणारे पक्ष जे शक्य झाल्यास स्वतंत्र सरकार स्थापु इच्छितात. नपेक्षा काँग्रेसच्या पाठिंब्यावर किंवा काँग्रेसला पाठिंबा देणे शक्य. भाजपाला पाठिंबा देण्याची शक्यता नाही/ फारच कमी.
चौथी आघाडी: असे युपीए किंवा एन्डीएत नसणारे पक्ष जे शक्य झाल्यास स्वतंत्र सरकार स्थापु इच्छितात. न पेक्षा काँग्रेस व भाजपा दोघांपैकी कोणासही पाठिंबा देऊ शकतात.
इतरः असे युपीए किंवा एन्डीएत नसणारे पक्ष जे काँग्रेस व भाजपा दोघांनाही पाठिंबा द्यायला तयार नाहीत + अपक्ष

आता या प्रदेशातील खासदारांची काँग्रेस, भाजपा, तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि इतर अशी गट-विभागणी केल्यास २०१४ मध्ये असे चित्र दिसते:

पूर्व

राज्य एकूण संख्या युपीए एन्डीए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आसाम १४
ओधिशा २१ १(डावे) १७(बिजद)
पश्चिम बंगाल ४२ १०(डावे) २३(तृकॉ)
छत्तिसगढ ११
एकूण ८८ १८ १५ ११ ४०
युपी-बिहार

राज्य एकूण संख्या युपीए एन्डीए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
बिहार ४० २३ १०(जदयु) १(अपक्ष)
झारखंड १४ १(आआप)
उत्तर प्रदेश ८० ३८ १८(सप) १६(बसप)
एकूण १३४ १७ ७० २८ १६
उत्तर

राज्य एकूण संख्या युपीए एन्डीए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
दिल्ली २(आआप)
हरयाणा १० १(आआप)
जम्मू आणि काश्मीर १(पीडीपी)
पंजाब १३ १२
एकूण ३६ २२
पश्चिम

राज्य एकूण संख्या युपीए एन्डीए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
गुजरात २६ २५
मध्य प्रदेश २९ २५
महाराष्ट्र ४८ १७ २७ १ (बविआ) ३(मनसे, आआप)
राजस्थान २५ २३
एकूण १२८ २४ १००
लहान राज्ये / केंप्र

राज्य एकूण संख्या युपीए एन्डीए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
केंद्रशासित
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड १(बसप)
गोवा
पूर्वोत्तर (आसाम सोडून) ११
एकूण २८ १४
दक्षिण

राज्य एकूण संख्या युपीए एन्डिए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आंध्र प्रदेश ४२ १० १८ १४ (वाएसार व टीआरएस)
कर्नाटक २८ १६ १० २(जद)
केरळ २० १२(डावे)
तामिळनाडू ३९ ८(द्रमुक) २६(अद्रमुक)
एकूण १२९ ३६ ३१ २२ ४०

आता यातून सर्वसाधारण चित्र काय दिसते


युपीए एन्डीए तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
१०९ २५२ ६४ १०१ १६


गट संख्या
सद्य यूपीए १०९
सद्य एन्डीए २५२
यूपीए+तिसरी आघाडी+इतर+बसपा २०७
तिसरी आघाडी + चौथी आघाडी + इतर १८१
एन्डीए+अण्णा द्रमुक २७८

तेव्हा एन्डीएला सर्वाधिक मते मिळाली तरी स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. मात्र इतर कोणतीही आघाडी/रचना सत्ता स्थापन करू शकणार नाही. अश्या परिस्थितीत अण्णाद्रमुक/टिआरएस/बिजद/तृमु यांपैकी एक मोठ्या पक्षाचा किंवा दोन लहान पक्षांची मोट बांधुन मोदी सरकार स्थापन करतील असा अंदाज व्यक्त करतो.

या धाग्यावर १-२ दिवसांनंटर प्रतिसाद देणे जमणार नाही, मात्र १६ तारखेला माझे अंदाज कितपत बरोबर येतील ते कळेलच.
तुमचेही अंदाज या धाग्यावर दिलेत तर अधिक मजा येईल

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

ओके....नमो हिटलर-आठवले असे काही वाचल्याचे. मी विसरले होते ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमो हिटलर-आठवले

नै म्हणजे नमो=हिटलर (फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज़ेस) हे वाचलेय, पण बिचार्‍या आठवल्यांना त्या लीगमध्ये ओढण्याचे कारण कळाले नै. कळू शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे "आठवले असे काही वाचल्याचे" हे एक वाक्य आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक्स्प्लेन द जोक & रुईन इट Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आठवले वाचले?

गब्बरच्या भाषेत: "बच गया, **!"

(आणि नुसते वाचलेच नव्हे, तर "असे काही वाचले", "ऐसे बच गये"...)

---------------------------------------------------------------------------------------------------------

'ऐसीअक्षरे'वरचा नव्हे. 'ब्रिटानिया'च्या जाहिरातीतला, झालेच तर अधूनमधून 'शोले'त झळकलेला.

"गब्बर की असली पसंद!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमो 'लीग'वाले आहेत याची कल्पना नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्टात साक्षीदार/वकील म्हणून नाव काढाल!!

प्रमाण मराठी वाच्यार्थाने आणि 'खोडी काढणे' या दक्षिण महाराष्ट्रीय अर्थानेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओरिसा, गुजरात नि राजस्थान सोडून मोठ्या राज्यांत हे विश्लेषण सर्वत्र मोठ्या मार्जिनने चुकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१
त्यातही वर म्हटल्याप्रमाणे युपी, महाराष्ट्रात फरक लई मोठा आहे.
कर्नाटक, केरळ, आसाम, पंजाब, काश्मिरमध्ये वगैरेतर अंदाज केला होता त्यापेक्षा उलट निकाल आहे - तिथे तर कलसुद्धा चुकीचे अंदाजले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सामाजिक , राजकिय मुद्द्यावर भूमिका पुरेशी मॅच्युअर्ड व्यावहारिक पण असंवेदनशील नसलेली असावी असं मला वाटतं.
सगळी परिस्थिती समजून घ्यायची असेल नि संभाव्य तोडग्यांचा विचार करायचा असेल तर वरती दिलेले गुणविशेष विचारांच्या दिशेत असणं आवश्यक.
मिसळपाववर चर्चा करत असताना ' फाळणी ' हा विषय निघाला. ह्याबाबतीत नेहमीचे हिंदु राष्ट्र, द्विराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्ष देश ह्या मुद्द्यांची विविध ठिकाणी जालावर, मिडियामध्ये चर्चा होताना दिसते. अतिकट्टर दोन्ही बाजूंचे लोक " फक्त आमच्यावरच अन्याय झाला. आमचा वंशविच्छेद झाला. दुसर्‍यानं आम्हाला लुटलं, लुबाडलं" असं सुचवू पाहतात.
तर टिपिकल धर्मनिरपेक्ष र्‍हेतोरिक "दोघांवरही (जणू समानच) अन्याय झाला" असं सुचवू पाहतात.
हे सगळं आठवायचं कारण हा प्रतिसाद नि उपचर्चा--
http://aisiakshare.com/node/2797#comment-69041

धर्मनिरपेक्ष राज्य मान्य करणे आणि पाकिस्तानच्या धर्माधिष्ठित व्यवस्थेला मान्य करणे हा मात्र कसा त्यातल्या त्यात सुसह्य फॉर्मुला होता; हे आजच्या धर्मनिरपेक्ष भारताचे जनक, पाठिराखे सुचवतात. पण ह्या "एकूणात सुसह्य" पर्यायात सुद्धा गोची होतीच. दंगे झालेच. आणि त्यात नक्की कोणी काय किती गमावलं; आणि कोणाला काय पर्याय देणयत आले; ह्याचा विचार करत होतो.

धर्मनिरपेक्ष राज्य मान्य करणे आणि पाकिस्तानच्या धर्माधिष्ठित व्यवस्थेला मान्य करणे ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणे ह्यात एक तार्किक गोची आहे. कशी ते सांगतो.
.
.
फाळनीच्या काळात , १९४० च्या दशकात काय परिस्थिती होती, त्याचा विचार करुयात.
आजचा भारत, आजचा पाक- बांग्लादेश असे दोन भूभाग होते. ह्या भूभागात चार प्रकारचे लोक होते (ढोबळमानाने)
१. आजच्या भारतातले हिंदू/ गैरमुस्लिम
२. आजच्या भारतातले मुस्लिम
३. आजच्या पाक-बांग्लादेशातले मुस्लिम
४. आजच्या पाक-बांग्लादेशातले हिंदू/ गैरमुस्लिम
.
.
.
ह्यातल्या हरेकापुढे काय पर्याय होते पाहू.
१. आजच्या भारतातले हिंदू/ गैरमुस्लिम :-
ह्यांनी पाकिस्तानात जायचा प्रश्नच नाही. पाकिस्तान धर्माधिष्ठित देश आहे. मुस्लिमांसाठी आहे. तेव्हा ह्यांनी आहे तिथेच रहायचं ठरवलं असावं. तसं न ठरवता, पाक- बाम्ग्ला देशात जातो असं जरी कुणी म्हटलं; तरी त्या म्हण्ण्याला अर्थ नाही. ते शक्य नव्हतं. ह्यांच्या मर्जीचा, हानीचा थेट प्रश्न तितकासा तीव्र नसावा ( तुलनेने)
.
.
२. आजच्या भारत नावाचय भूभागातले मुस्लिम
भारत सरकारने हा देश फक्त हिंदूंचा असणार नाही. उपासना पद्धतीवर भेदभाव केले जाणार नाहित; जो इथलाच आहे, ज्याला इथेच रहायचय; त्यानं इथे रहावं. आमचे नागरिक म्हणून तुमची सुरक्षा आम्ही करु; असं आश्वस्त केलं होतं. दंगे झाले, तरी सरकारचं अधिकृत धोरण मुस्लिमांना दुय्यम नागरिक करुन सोडणं हलाखीचं जगायला लावणं हे नव्हतं. होता होइल तोवर सरदार पटेल व त्यांच्या गृहमंत्रालयानी कायदा सुव्यवस्था राखायचा प्रयत्न केला. इथल्या मुस्लिमांची इथे राहयची इच्छा असेल तर ती पूर्ण झाली.
जर एखाद्या भारतातल्या मुस्लिमाला वाटलं की भारतापेक्षा माझं, माझ्या कुटुंबाचं भलं पाकिस्तानात होणार आहे; तर त्याच्या स्वागताची भूमिका पाकिस्तान सरकारची होती. " मुस्लिमहो, या, इकडे या. एक नवा देश घडवू इथल्या मुस्लिमांसाठी. तुमची रहाय-खायची वय्वस्था आम्ही करु. निश्चिंत होउन या." असं जणू आवाहन होतं.
( नंतर 'मुहाजिर' आणि त्या प्रश्नाचं काय झालं; ते तूर्तास बाजूला ठेवू.)
म्हंजे इथल्या मुस्लिमाला ऑप्शन होता की उद्योगधंदा इथे असेल तर इथेच रहावे. गरज पडल्यास इथल्या सरकारकडे गार्‍हाणे मांडावे सुरक्षेचे. सरकार कटिबद्ध आहे. नैतर शेजारी देश आहेत.
म्हणजे खरे ऑप्शन ह्यांना उपलब्ध होते.
.
.
३. आजच्या पाक-बांग्लादेशातले मुस्लिम :-
ह्यांना आहे तिथेच राहिल्यास ...म्हणजेच पाकमध्ये राहिल्यास "अधिक प्राधान्याची वागणूक मिळण्याची शक्यता" दिसत होती. किम्वा निदान आहे तिथेच राहिल्यास दुय्यम न ठरण्याची ग्यारंटी होती. शिवाय जर त्यांनी भारतात यायचच ठरवलं काही कारणानं; तर त्यालाही तत्वतः भारत सरकारची ना नव्हती. संख्येने थोडे का असेनात, असेही काही मुस्लिम आलेत.
काही चटकन आठवणारी उदाहरणं --
शाहरुख खानचे एक नातेवाइक ( काका की आजोबा ) आझाद हिंद फौजेत होते. त्यांना पाकिस्तान ही कल्पनाच पटेना. ( 'जमात -ए- इस्लामी हिंद' ह्या धार्मिक , मुस्लिम संघटनेने देखील फाळणीला विरोध केला होता. कारण ? देशाचा आधार समान धर्म नव्हे तर समान संस्कृती असावी; अशी त्यांची निदान अधिकृत भूमिका होती/आहे.) ते चक्क उलट दिशेने आले. मुस्लिम कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले!
राज- देव - दिलीप त्रयीतले स्टार, ज्येश्ठ अभिनेते दिलीपकुमार ऊर्फ युसुफ खान ह्यांचे जन्मगाव पेशावर. पण त्यांनीही फाळणीनंतर भारतात राहणे पसंत केले. (मुंबै- नाशिक पट्ट्यात तयंचा वय्वसायही होता. नि पेशावरला नातलगही. जन्म पेशावरचा.)
.
.
४. आजच्या पाकिस्तानातले गैरमुस्लिम्/हिंदू --
तुम्ही आजवर जिथे रहात आलेले आहात; तो भूभाग आता धर्माधिश्ठित मुस्लिम राष्ट्र म्हणून गणला जाणार आहे; हे त्यांना सांगण्यात आलं. आख्ख्या सरकारी यंत्रणेनं ह्यांचं अस्तित्व नाकारलं. "तुम्ही आता आमच्या पाकिस्तानात रहायचं नाही; असा प्रस्ताव आता फायनल झालेला आहे" असा चमत्कारिक संदेश जणू ह्यांना गेला.
हे न्याय्य होतं काय ? आजपासून तुम्ही इथले नाहितच. असा थेट संदेश.
वरील गटांकडे बघा. त्यांनी कुठे रहायचं ह्याचं त्यांना स्वतंत्र्य आहे. (गट क्र २ व गट क्र ३)
गट क्र१ ला तसे स्वातंत्र्य नसले ; तरी तसे थेट फारसे काही तोटेही नाहीत. ( गट क्र १. चे उदाहरण मह्णजे कर्नाटकातला हिंदू. त्या कर्नाटकातल्या हिंदूला जर सांगितलं की तुझा आजपासून पश्चिम पंजाब ,सिंध , पूर्व बंगाल प्रांताशी संब्म्ध नाही. तू तिथला फर्स्ट क्लास सिटिझन होउ शकत नाहिस. तर त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असनार आहे ? त्यात भावनात्मक मूल्य जरुर असेल. अस्मितेचा प्रश्नही असेल. आपल्या देशाचे तुकडे पडताना पाह्णं हाच क्लेशदायक अनुभव.मान्य. पण थेट व्यावहारिक असं धर्मसंकट असण्याचे चान्सेस कमीच. तो फार तर खांदे उडवत किंचित नाराजीनं "ओके" म्हणेल.)
गट क्र २ व गट ३ ला स्वातंत्र्य आहे. गट क्र १ ला स्वातंत्र्य नाही; पण त्रासही नाही.
गट क्र ४ चे काय ? त्याने कुठे राहायचय हे बाकीच्या तीन गटातल्यांनी मिळून फायनल करुन टाकलेलं आहे.
"तू आजवर कुठे राहत होतस, तुझे वाडवडिल काय करत होते, कशाचा काहीही संब्म्ध नाही. आम्ही ठरवलय. तुझं अस्तित्व शून्य. तुझं जे काही तिथे असेल, उद्योग धंदा, शेती वाडी, घर दार सगळं बर्‍या बोलानं सोड. आणि धावत सूट. जीव घेउन पळत सूट दिल्लीकडे. तिकडे आश्रय मिळेल. तिकडे निर्वासित म्हणून रांगेत उभा रहा आणि भिक्षा म्हणून जे मिळेल ते खा. हात पसरुन उभा रहा."
हा संदेश त्याच्याकडे गेलाय. त्यानं कुठे रहायचं हा निर्णय आधीच केला गेला होता. फार फार मोठ्या प्रमाणावर ठेचला, चिरडला, भरडला गेलेला ,मुस्क्टफ्दाबी झालेला वर्ग हा आहे.
जे दंगे झाले; त्यात उरलेल्या तीन गटांनीही बरच सोसलं. हिंसेत अनेकानेक जीव गेले. दहा वीस लाख )दोनेक मिलियन जीव गेले) असावेत. पण व्यवस्थेनं भक्कम पाठिंबा त्यांच्या शिरकाणास दिला नव्हता.
.
.
बॉस, एकदा शांत डोक्यानं विचार करा. चौथ्या गटाकडे काय ऑप्शन होतं. घर दार सोडून येणं भाग होतं. )विकायची सोय नाही. विकायसाठी भागात स्थैर्य लागतं साहेब. जर सर्व पब्लिकला माहितित्ये की तुम्ही सगळं चंबु गबाळं आवरुन पळणारच आहात; तर तुमच्याकडून घर खरेदी करायची कोणालाच गरज नाही.)
पाकिस्तान जेव्हा म्हणत होतं " या मुस्लिमहो इकडे या रहायला आम्ही तुमच्या रहायची खायची प्यायची वय्वस्था करु. बडदास्त ठेवू." तेव्हा ते अचानक हे सगळे " व्यवस्था " कशी करणार होते ? " बडदास्त " कशी ठेवणार होते ? एक प्लान होता, अशा पळून गेलेल्या हिंदूंची घरं तिकडून करुन ; आलेल्या मुस्लिमांत वाटून टाकायचा!
असो. अवांतर होतय.
सिंधमधल्या हिंदू माणसानं काय करावं ? कुटुंबाचं काय करावं? लेकि बाळींची काळजी कशी घ्यावी? खाणार काय?
.
.
ह्याचवेळी जिन्नांनी चमत्कारिक वाटेल अशी भूमिका मांडली " हे मुस्लिम राष्ट्र असले तरी प्रोग्रेविश असनार आहे. निधर्मी मुस्लिम राष्ट्र राहणार आहे." ( नंतर पाकिस्ताननं जिन्नांच्या ह्या इच्छेचं किती पालन केलं ; तो भाग वेगळा.) ह्या अशा वेळेला चौथ्या गटातल्या लोकांचा संभ्रम वाढला असू शकतो.
बाहेर जाउन खायचे काय, ते माहित नाही, सध्या कसे बसे तगून राहूत. स्थानिकांच्या मदतीने काही दिवस दबून , लपत छपत काढून; परिस्थिती निवळल्यावर पुन्हा आपापला कामधंदा सांभाळूत ; असा विचार केला सणं अशक्य आहे का ?
असा विचार करा. देव न करो पण उद्या पुन्हा माझ्या मायदेशावर असच संकट आलं तर ? आणी घोषित झालं की दक्षिणेतल्या चार राज्यांत काय ते तुम्ही हिंदू राहू शकता. बाकीच्यांनी इथून सटकावं. कल्पना करा. महाराष्ट्रात शेती करणारा माणूस केरळात समुद्र किनार्‍यावर जाइल ? त्यानं का जावं ? त्याच्या वतीनं परस्पर कुणी कसा काय निर्णय घेउ शकतं ? जिवंत राहण्याच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होते आहे.
.
.
फाळणी ही अशी झाली त्यावेळीच चमत्कारिक परिस्थिती घेउन झालेली आहे. त्यावर लागलिच तार्किक वाटेल अशी भूमिका घेउन "ते शत्रू देशाचे नागरिक आहेत" असं त्यांना वागवलं जावं का ? मुळात हे दोन वेगळे देश नव्हतेच. त्यांनी तुमच्या शत्रू राष्ट्रात राहून तिथले टॅक्स पेयर हॉण्याचा निर्णयही स्वतःहून घेतलेला नाही.
तो प्रश्न अजूनही अर्धवट आहे. "तो प्रश्न संपलाय. तिथले नागरिक तिथलेच." असं प्लीझ म्हणू नका; ही कळकळिची विनंती. त्यांना तिथलं सरकार disown करतय. आणि ते तसं केलं जाण्याला इतर तीन गटांतले लोक जिम्मेदार आहेत. त्यांनी परस्पर केलेल्या वाटणीत धिंडवडे चौथ्या गटातल्या लोकांचे निघालेत.
ही गुंत आहे; हे समजते आहे. प्रत्येक गटातल्या लोकांची आपली दु:खं , कन्सर्न असणार हे ठाउक आहे.
पण तुमच्याविषयी संपूर्ण आदर ठेवूनही ही विनंती करतो ही भूमिका काहिशी निष्ठूरपणाची आहे त्यांच्याप्रती.
हा प्रश्न एकरेषीय नाही. गुंतागुम्तीचा आहे. विचार करुन बघा.
.
.
मुस्लिम हे शत्रू आहेत; किम्वा पाकडे कायमचे शत्रूच आहेत; किंवा भारत हिंदूंचाच आहे;
ह्यातली एकही भूमिका मी मांडत नाहिये. इतिहासाच्या चाकच्या विचित्र कात्रीत अडकललेल्या समजाप्रती जरा कणव असू द्या; इतकच म्हणतोय.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने