Skip to main content

पुराणमतवादी म्हणजे नक्की कोण?

(संपादक : संस्थळांची किंवा सदस्यांची तुलना किंवा त्यांवर टीका / चिखलफेक न करता पुराणमतवादी आणि पुरोगामी अशा मूलभूत संकल्पनांवर चर्चा व्हावी ह्यासाठी मूळ धाग्यातून हे वेगळे काढलेलं आहे. 'पिसाळलेला हत्ती' हवं तर चर्चाप्रस्ताव त्यानुसार संपादित करू शकतात.)

मिसळपाववर पुराणमतवादी सदस्यांची संख्या सध्या जास्त आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य नितिन थत्ते आणि अतिशहाणा यांनी केले आहे.मला मिसळपाव विरूध्द ऐसीअक्षरे असे भांडण लावायचे नाही.तरीही पुराणमतवादी म्हणज्जे नक्की कोणत्या स्वरूपाचे लिखाण करणारे सदस्य यांना अपेक्षित आहेत हे कळले नाही.मी मिसळ्पाववरचा अगदी प्रत्येक लेख आणि प्रत्येक प्रतिसाद (आणि ऐसीवरचेही बरेचसे लेख आणि प्रतिसाद) वाचला आहे.मला स्वत:ला चांगले लिहिता येत नाही म्हणून इतर कोणी चांगले लिहित असेल तर त्यातून चार गोष्टी शिकता आल्या तर चांगले असा माझा उद्देश असतो. मी जे काही मिसळपाववर वाचले आहे त्यावरून लिहितो:

१. मिसळपाववर स्त्रीशिक्षणाला विरोध कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
२. मिसळपाववर स्त्रीयांनी चूल आणि मूल सोडून तिसरी गोष्ट करू नये असे कोणी म्हटल्याचेही ऐकिवात नाही.
३. मिसळपाववर तथाकथित सामाजिक उतरंडीतील खालच्या जातीतील लोकांचे वास्तव्य गावकुसाबाहेरच असावे, त्यांनी कमरेला झाडू लावून चालावे आणि गळ्यात मडके घालावे असेही कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही.
४. मिसळपाववर स्त्रियांनी नवरा गेल्यानंतर एकतर केशवपन करावे किंवा सती जावे असे कोणी म्हटल्याचे मी तरी कधी वाचले नाही.
५. तथाकथित सामाजिक उतरंडीतील वरच्या जातीतील लोकांसोडून इतर कोणाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असे मिसळपाववर कोणीही म्ह्टल्याचे मी तरी वाचलेले नाही.

असे अनेक गोष्टींविषयी लिहिता येईल.मग थत्तेचिच्चा आणि अतिशहाणा म्हणत आहेत ते पुराणमतवादी नक्की कोण? (इथे नावे अपेक्षित नाहीत तर पुराणमतवादीपणाची लक्षणे अपेक्षित आहेत).की कॉंग्रेसचे समर्थन करण्याऐवजी मिसळपाववर भाजप समर्थकांची संख्या जास्त आहे म्हणून पुराणमतवादी हा शिक्का तुम्ही मारत आहात? तसा राजकीय मतभेदांसाठी पुराणमतवादी हा शिक्का मारत असाल तर दोन गोष्टी--

१. वर कोणीतरी म्हटले आहे की विरोधी मत सहन होत नसेल तर यांची पर्वा का करावी. ही गोष्ट सर्वप्रथम थत्तेचाचा आणि अतिशहाणा यांना लागू होत नाही का? आणि ही गोष्ट लक्षात न घेता असल्या प्रतिसादांना मार्मिक वगैरे श्रेणी येते हेच श्रेणीपध्दत फेल गेल्याचे लक्षण नाही का?
२. तुम्ही भाजपसमर्थकांना पुराणमतवादी म्हणत असाल तर तुम्हालाही कॉंग्रेस समर्थनाबद्दल इतरांना भ्रष्ट म्हणायचा हक्क का नाही?मिसळपाववरही या कॉंग्रेस समर्थनावर राजकीय टिका थत्तेचाचांवर भरपूर झाली आहे आणि होतच राहिल.तरीही त्यांना भ्रष्ट वगैरे कोणी म्ह्ट्लेले नाही.आणि तसे म्ह्टले तर ते चुकीचेच असेल हे पण सांगतो.हाच तुमच्या भाषेतल्या पुराणमतवादी मिसळपाववरच्या सदस्यांच्या सभ्यतेचा आणि सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही का?

बॅटमॅन Sun, 04/05/2014 - 18:22

In reply to by अनुप ढेरे

भाजप आणि मोदी व आरेसेस यांना शिव्या न घालणे म्ह. पुराणमतवाद असे अभिप्रेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असो, लक्षणे जाणून घ्यायला आवडतील.

नितिन थत्ते Tue, 06/05/2014 - 15:07

In reply to by बॅटमॅन

असेच काही नाही. माझ्या मता विरोधी जे जे काही असेल त्याला शिव्या न घालणे म्हणजे पुराणमतवाद असेही असू शकेल. :)

आता शिरेसली...

मी आरएसएस ला पुराणमतवादी म्हणतो/समजतो. त्यांचे बॅगेज घेऊन भाजप आली म्हणून आणि ते बॅगेज झुगारता येत नाही म्हणून भाजपही पुराणमतवादी..... त्यांचा सध्याचा चेहरा म्हणून मोदीपण पुराणमतवादी.

मिसळपाववरील सदस्य संघाच्या कोणत्या गोष्टींचे समर्थन करतात आणि कोणत्या गोष्टींचे करत नाहीत ते साधारणपणे लक्षात येते. त्यावरून मिपा कधीकधी पुराणमतवादी आणि कधीकधी लिबरल असते असे माझे मत मी मांडलेले आहे.

पुरोगामी म्हणजे काय याविषयी माझे विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. ज्यांनी मिपापरील प्रत्येक लेख आणि प्रतिसाद वाचले आहेत त्यांनी तो वाचला असेलच.

बाकी मिपा श्रेष्ट आहे की ऐसी या वादात मला पडायचे नाही. म्हणून यावर मी आणखी प्रतिक्रिया देणार नाही.

बॅटमॅन Tue, 06/05/2014 - 16:38

In reply to by नितिन थत्ते

मिसळपाववरील सदस्य संघाच्या कोणत्या गोष्टींचे समर्थन करतात आणि कोणत्या गोष्टींचे करत नाहीत ते साधारणपणे लक्षात येते. त्यावरून मिपा कधीकधी पुराणमतवादी आणि कधीकधी लिबरल असते असे माझे मत मी मांडलेले आहे.

सहमत.

लेख वाचला, त्याच्याशीही सहमत आहे.

एकाच चौकटीचा हट्टाग्रह धरणारांना त्याचे काय होय म्हणा पण. असो.

सरळसोट Sun, 04/05/2014 - 22:02

व्याख्या इतकी साळसूद नाहीये दुर्दैवाने, पिसाळलेला हत्ती जी! मिसळपावला मी तर नळावरील भांडणेच म्हणतो. तिथले कंपूबाज, दुराग्रही लोक कळपाने जे काही करतात त्याला. तिथल्या बर्‍याच लोकांना भाजपाला वा शिवसेनेला वा संघाला केलेला विरोध सहन होत नाही- मग भले तो कितीही सभ्यपणे, संयतपणे वा मुद्देसूद असो. तिथे तुमचं चारित्र्यहनन, घाणेरड्या भाषेत अर्वाच्च्य शिविगाळ, "फाट्यावर मारणे", विषयाला सोडून भलत्याच गोष्टी करुन विरोधकांचे खच्चीकरण करणे, संपादकाकरवी प्रतिसाद/लेख उडवणे यापैकी कुठलेही उपाय वापरले जातात. काही अभ्यासाचा आव-बिव आणून उगाच तुमचा मुद्दा आम्ही कसा खोडतोय असा आभास इतर सदस्यांपुढे निर्माण करतात. थोडक्यात, मिसळपाव ही मराठी संकेतस्थळांची झोपडपट्टी आहे असं म्हटलं तर खोटे नाही. विशेष म्हणजे या चिखलफेकीत काही संपादक मंडळी सुद्धा हिरिरीने सहभागी होतात. संघविरोधी अनेक लेख प्रकाशित होण्यापूर्वीच नाहीसे होतात. प्रतिसाद सुद्धा सिलेक्टिव्हली उडवले जातात. तुमचे एखाद्या संघीया सोबत भांडण झालेले असले प्रतिसादातून, तर तुमचे "वादग्रस्त" प्रतिसाद उडवले जातात आणि त्या सदस्याचे तसेच ठेवले जातात. लेख का उडवला, प्रतिसाद का उडवला याचे कुठलेही स्पष्टीकरण तुम्हाला कधीच मिळत नाही. मिसळपाव ही एक भेकड आंतरजालीय पांढरपेशी गुंडगिरी आहे.

बरेच लोक तुम्ही म्हणता तश्या वरील १-५ पैकी गोष्टी उघडपणे म्हणत नाहीत कारण त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. पण बरीच लोक छुपी रेसिस्ट आहेत आणि तो रेसिसम निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होतो. एकांगीपणा, विरोध सहन न होणे, आपलेच ते खरे, जातीयवाद, ही जर पुराणमतवादाची लक्षणे असतील तर ती मिसळपाव वरच्या बहुसंख्य सदस्यांना अचूक लागू पडतात आणि किमान या अर्थाने तरी मिसळपाव पुराणमतवादी आहे.

अतिशहाणा Mon, 05/05/2014 - 19:46

मला पुराणमतवाद काय आहे असे वाटते व मला पुराणमतवादाची उदाहरणे कोणती वाटतात त्याचे नमुने खाली पाहा. आणखीही उदाहरणे देता येतील परंतु ते संकेतस्थळ सध्या बंद असल्याने शोधाशोधीचा फारसा त्रास घेतला नाही. तुमची पुराणमतवादाची व्याख्या वेगळी असल्यास तुम्हाला ही उदाहरणे अयोग्य वाटण्याची शक्यता आहे.

१. अलीकडे मुंजीसंदर्भात काहीतरी चर्चा चालू होती, त्यावरील चर्चेत 'ब्राह्मण कितीही उच्चभ्रू झाले तरी इतक्या खालच्या पातळीवर जातील असे वाटत नाही त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव काल्पनिक आहे' स्वरुपाचा प्रतिसाद व त्यावर काही सहमतीचे प्रतिसाद आले होते. त्याचा प्रतिवाद करावा असे कोणाला वाटले नाही.
२. काही दिवसांपूर्वी मुलायमसिंग यांनी बलात्कारासंदर्भात काही वादग्रस्त विधाने केली होती त्यासंदर्भातील चर्चेत 'बलात्काराच्या खटल्यात फक्त मुसलमान आरोपी असतात' अशा स्वरुपाची विधाने एकदोघांनी केली. त्याचा हिरीरीने प्रतिवाद करावा असे फार जणांना वाटले नाही.
३. महाराष्ट्रातील निवडणुका व सामाजिक परिस्थिती संदर्भातील चर्चेमध्ये जसे काही देश चालवण्याची क्षमता केवळ ब्राम्हणांमध्येच आहे या अविर्भावात 'मराठे आता आता ब्राम्हणांना त्रास देत असल्याने ब्राम्हणांना देशाचे काही पडलेले नाही त्यांनी देशाची काळजी करणे सोडून द्यावे' असे विधान एका सदस्याने केले होते. त्यात प्रतिसाद देऊन असहमती व्यक्त करण्याइतके फारसे कोणाला वावगे वाटले नाही.

खालील उदाहरण पुराणमतवादासंदर्भात नाही.
४. संकेतस्थळावरील माजी मालकाने काही सदस्यांचे पैसे बुडवल्याचे कळले होते. त्या मालकाची अनुपस्थिती अनेकांना खटकते व त्याच्या आठवणीचे उसासे अनेक प्रतिसादांमधून टाकले जातात. मात्र त्याचवेळी काँग्रेस सरकारचा भ्रष्टाचार खटकतो हे थोडेसे विसंगत वाटते.

तुम्ही सांगितल्यानुसार कमरेला झाडू लावावा व गळ्यात मडके घालावे असे काहीजणांना वाटतही असावे. मात्र असले तरी सांगण्याची हिम्मत अॅट्रॉसिटी व तत्सम कायद्यांमुळे होणार नाही. त्यामुळे तितपत बिलंदरपणा सर्वच संकेतस्थळांवरील सदस्यांमध्ये नक्कीच आहे असे वाटते. त्यामुळे अॅट्रॉसिटीसारख्या कायद्यांना शक्य होईल तितका विरोध केला जातो.

*शुद्धलेखनाच्या काही दुरुस्त्या केल्या आहेत.

चिंतातुर जंतू Tue, 06/05/2014 - 17:02

मला कोणत्याही संस्थळावर टिप्पणी करायची नाही, म्हणून खालच्या उद्धृतातून तो भाग वगळला आहे, पण पुराणमतवादाची उदाहरणं म्हणून जी काही यादी पिसाळलेले हत्ती ह्यांच्या प्रतिसादात आहे ती मला उद्बोधक वाटली.

>>१. स्त्रीशिक्षणाला विरोध
२. स्त्रीयांनी चूल आणि मूल सोडून तिसरी गोष्ट करू नये
३. तथाकथित सामाजिक उतरंडीतील खालच्या जातीतील लोकांचे वास्तव्य गावकुसाबाहेरच असावे, त्यांनी कमरेला झाडू लावून चालावे आणि गळ्यात मडके घालावे
४. स्त्रियांनी नवरा गेल्यानंतर एकतर केशवपन करावे किंवा सती जावे
५. तथाकथित सामाजिक उतरंडीतील वरच्या जातीतील लोकांसोडून इतर कोणाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही

जसा काळ बदलला तसा भारतीय समाज प्रगत होत गेला हे मान्य केलं तर सहज लक्षात यावं की कोण कशाला विरोध करतात ह्यावरून पुराणमतवादी स्केलदेखील बदलत जातं. माझ्या मते आज महाराष्ट्रातला सुशिक्षित मध्यमवर्ग (जो जालावर मोठ्या प्रमाणात वावरत असतो) पाहिला, तर खालच्या गोष्टींबाबत लोक काय मत प्रदर्शित करतात हे पाहणं पुराणमतवादाच्या संदर्भात अधिक रोचक ठरतं -

  1. विवाहांतर्गत बलात्कार
  2. लिव्ह-इन
  3. LGBT समाजाचे प्रश्न
  4. कला/जाहिरात/पुस्तकं/भाषणं इ. प्रकारच्या अभिव्यक्तींमुळे धार्मिक/जातीय/प्रांतिक इ. अस्मिता किंवा श्रद्धा किंवा भावना दुखावणं

असो.

अतिशहाणा Tue, 06/05/2014 - 18:50

In reply to by नितिन थत्ते

  1. विवाहांतर्गत बलात्कार
  2. लिव्ह-इन
  3. LGBT समाजाचे प्रश्न
  4. कला/जाहिरात/पुस्तकं/भाषणं इ. प्रकारच्या अभिव्यक्तींमुळे धार्मिक/जातीय/प्रांतिक इ. अस्मिता किंवा श्रद्धा किंवा भावना दुखावणं

या प्रश्‍नांबाबत पुरोगामी भूमिका काय आहेत हे कळणे आवश्यक आहे.

चिंतातुर जंतू Tue, 06/05/2014 - 18:56

In reply to by अतिशहाणा

>> या प्रश्‍नांबाबत पुरोगामी भूमिका काय आहेत हे कळणे आवश्यक आहे.

सुशिक्षित मराठी मध्यमवर्ग ही सँपल स्पेस आहे. त्यात बहुसंख्यांचा कल कुठे असेल? त्याहूनही अधिक सुधारणा ज्यांना हव्या आहेत असे अल्पसंख्य लोक काय म्हणत असतील? ह्यात ह्या प्रश्नाचं उत्तर सापडावं.

पटकन सुचलेली ही चार उदाहरणं होती. अजूनही असतील. सुशिक्षित मराठी मध्यमवर्गापैकी बहुसंख्यांना मान्य आहेत त्याहून अधिक सुधारणा मागणारे अल्पसंख्य लोक ही सँपल स्पेस घ्या. ते कोणकोणत्या सुधारणा मागत आहेत ते पाहा.

अतिशहाणा Tue, 06/05/2014 - 19:06

In reply to by चिंतातुर जंतू

प्रतिसादाचा रोख समजला नाही. निव्वळ अल्पसंख्य मागत आहेत म्हणून त्या सुधारणा पुरोगामी आहेत आणि बहुसंख्य मागतात त्या सुधारणा प्रतिगामी आहेत असा अर्थ निघतो आहे असे मला वाटते आहे.
अल्पसंख्य किंवा बहुसंख्य या मुद्द्यांचा विचार न करता निव्वळ प्रश्‍नांचा विचार करुन पुरोगामी भूमिका ठरवता येतील. विवाहांतर्गत बलात्कारांसंदर्भात ४९८च्या वापराच्या मर्यादा समजणे आवश्यक आहे किंवा लिव-इनच्या संदर्भात प्रचलित विवाह कायद्यासंदर्भातील कोणत्या गोष्टी नको आहेत हे लिवइन वाल्यांनी सांगणे आवश्यक आहे.

बॅटमॅन Tue, 06/05/2014 - 19:24

In reply to by अतिशहाणा

निव्वळ अल्पसंख्य मागत आहेत म्हणून त्या सुधारणा पुरोगामी आहेत आणि बहुसंख्य मागतात त्या सुधारणा प्रतिगामी आहेत असा अर्थ निघतो आहे असे मला वाटते आहे.

ज्जे बात!!! अतिशहाणाजी, आपण तुमचे फॅन झालो.

चिंतातुर जंतू Tue, 06/05/2014 - 19:45

In reply to by अतिशहाणा

>> प्रतिसादाचा रोख समजला नाही. निव्वळ अल्पसंख्य मागत आहेत म्हणून त्या सुधारणा पुरोगामी आहेत आणि बहुसंख्य मागतात त्या सुधारणा प्रतिगामी आहेत असा अर्थ निघतो आहे असे मला वाटते आहे.

मुद्दा काहीसा असा होता -
क्रांती किंवा हिंसा किंवा एखादा तुघलकी सम्राट वगैरे कारणानं अचानक होणारे बदल वगळता पाहिलं, तर प्रत्येक समाजात सामाजिक सुधारणा हळूहळू होत राहतात. आपण ज्यांना मध्यमवर्ग म्हणतो तो अनेकदा सुधारणा करण्याला आधी बिचकतो. सुरुवातीला तो विरोध करतो, पण हळूहळू सुधारणा होत जातात तसा हा विरोध कमी होत जातो. पुढे जाऊ इच्छिणारा तो पुरोगामी हे लक्षात घेऊन आणि असे लोक अल्पसंख्य असतात हे लक्षात घेऊन शोध घेतला तर आजच्या पुरोगाम्यांचे मुद्दे काय आहेत ते पाहता येईल. ह्याउलट, म्हणजे पिसाळलेला हत्ती ह्यांनी जे मुद्दे मांडले होते ते जर आज बहुसंख्य सुशिक्षित मराठी मध्यमवर्गाला मान्यच असतील, तर त्यात पुरोगामित्व (पुढे नेणारं) नाही. ती तर प्रचलित समाजमान्य विचारधारणा झाली.

अतिशहाणा Tue, 06/05/2014 - 20:23

In reply to by चिंतातुर जंतू

पुढे जाऊ इच्छिणारा तो पुरोगामी ही व्याख्या बरोबर आहे. पण पुरोगामी आणि अल्पसंख्य यातील संबंध चुकीचा वाटला. निव्वळ मुद्द्यांच्या गुणवत्तेवरुन पुरोगामी व प्रतिगामी ठरवता यायला हवे.
पुरोगामी हे अल्पसंख्य असतात हे बरोबर पण अल्पसंख्य हे पुरोगामी असतातच असे नाही.
http://en.wikipedia.org/wiki/Correlation_does_not_imply_causation

मात्र तुमच्या प्रतिसादावरुन अल्पसंख्य हे नेहमी पुढेच जात असतात व त्यावरुन अल्पसंख्य जी दिशा घेतात तीच नेहमी योग्य असा निष्कर्ष निघत आहे.

अजो१२३ Tue, 06/05/2014 - 20:28

In reply to by अतिशहाणा

पुरोगामी हे अल्पसंख्य असतात हे बरोबर पण अल्पसंख्य हे पुरोगामी असतातच असे नाही.

हो, नाहीतर काय. तुरुंगातले कैदी / लोकसंख्या हा रेशो किती असतो? जरा क्वालिटेटिव आर्ग्यूमेंट करा म्हणा ना राव!

चिंतातुर जंतू Tue, 06/05/2014 - 22:26

In reply to by अतिशहाणा

>> पुरोगामी हे अल्पसंख्य असतात हे बरोबर पण अल्पसंख्य हे पुरोगामी असतातच असे नाही.
http://en.wikipedia.org/wiki/Correlation_does_not_imply_causation

मात्र तुमच्या प्रतिसादावरुन अल्पसंख्य हे नेहमी पुढेच जात असतात व त्यावरुन अल्पसंख्य जी दिशा घेतात तीच नेहमी योग्य असा निष्कर्ष निघत आहे.

माझं मूळ उद्धृत -

सुशिक्षित मराठी मध्यमवर्ग ही सँपल स्पेस आहे. त्यात बहुसंख्यांचा कल कुठे असेल? त्याहूनही अधिक सुधारणा ज्यांना हव्या आहेत असे अल्पसंख्य लोक काय म्हणत असतील? ह्यात ह्या प्रश्नाचं उत्तर सापडावं.

ह्यातल्या अल्पसंख्यांना 'बहुसंख्यांहूनही अधिक सुधारणा ज्यांना हव्या आहेत ते' हे विशेषण लावलेलं आहे. त्यामुळे ते कोणतेही अल्पसंख्य नाहीत. त्यामुळे कोणतेही अल्पसंख्य हे पुरोगामीच असतात असं त्यात म्हटलेलं नाही.

अजो१२३ Tue, 06/05/2014 - 19:02

In reply to by नितिन थत्ते

चिंजंच्या जुन्या स्केलवर सारं जग प्रगत आहे, नव्या स्केलवर सारं जग मागास (विचारांचं) आहे. चिंता नको.

गब्बर सिंग Wed, 07/05/2014 - 11:44

पुराणमतवादी म्हंजे काँझर्व्हेटिव्ह असा एक विचार असू शकतो. प्रा. हायेक यांनी कॉन्स्टिट्युशन ऑफ लिबर्टी या पुस्तकास एक पोस्टस्क्रिप्ट जोडले होते. मी काँझर्व्हेट्व्ह का नाहिये - असा मथळा होता त्याचा. यात त्यांनी काँझर्व्हेटिव्ह म्हंजे काय याची ही लक्षणे मांडलेली आहेत - मी काँझर्व्हेट्व्ह का नाहिये ____ हायेक

हायेक यांच्या प्रभावाने प्रेरित झालेले प्रा. जेम्स ब्युकॅनन यांनी Why, I too, am not a conservative अशा मथळ्याचे पुस्तक लिहिलेले होते.

मी Wed, 07/05/2014 - 11:53

पुराणमतवादी म्हणजे निगेशन/अ‍ॅबसेन्स ऑफ पुरोगामित्व, त्यामुळे पुरोगामी म्हणजे काय असा प्रश्न विचारायला हवा. पुरोगामित्व म्हणजे आपले सर्व गोष्टींबाबतच्या विचारांची(श्रद्धा, विश्वास)उपलब्ध(करुन घेतलेल्या) माहितीनुसार, चिंतनात्मक तर्कानुसार वारंवार चिकित्सा करणे, चिकित्सेचा उद्देश्य विचारांची सकारात्मकता आणि एकात्मिकता साधणे हा असावा.

कला/जाहिरात/पुस्तकं/भाषणं इ. प्रकारच्या अभिव्यक्तींमुळे धार्मिक/जातीय/प्रांतिक इ. अस्मिता किंवा श्रद्धा किंवा भावना दुखावणं.

सहमत, पण उलटपक्षी काही पुस्तकांमुळे(उदा. मनुस्मृती) पुरोगाम्यांच्या भावना दुखावत असल्यास त्यांना पुरोगामी म्हणावे काय?

चिंतातुर जंतू Wed, 07/05/2014 - 12:00

In reply to by मी

>> पण उलटपक्षी काही पुस्तकांमुळे(उदा. मनुस्मृती) पुरोगाम्यांच्या भावना दुखावत असल्यास त्यांना पुरोगामी म्हणावे काय?

मनुस्मृतीतल्या विचारांची चिरफाड करण्यापेक्षा तिनं भावना दुखावून घेत असतील अशांना पुरोगामी म्हणू नये हे माझं व्यक्तिगत मत आहे.

चिंतातुर जंतू Wed, 07/05/2014 - 13:56

In reply to by अजो१२३

>> मग आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, ते प्रतिगामी असे झाले.

तुमच्या मते आंबेडकरांनी मनुस्मृतीतल्या विचारांची चिरफाड केली होती की नव्हती? त्यावर तुमचं उत्तर अवलंबून ठेवा म्हणजे झालं, कारण माझं उद्धृत असं आहे -

मनुस्मृतीतल्या विचारांची चिरफाड करण्यापेक्षा तिनं भावना दुखावून घेत असतील अशांना पुरोगामी म्हणू नये

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 14:14

In reply to by चिंतातुर जंतू

विचारांची चिरफाड केल्याशिवाय कोणतीही दहने, बंद्या येत नाहीत. आता ती चिरफाड तुमच्या प्रोग्राम नुसार करणे म्हणजे चिरफाड करणे अन्यथा तो "हिंसाचार" असे म्हणायचे असले तर उपाय नाही. "भावना दुखतात म्हणून या पुस्तकावर बंदी आणा" असे निवेदन देणे, मोर्चा काढणे हे पुरेसे असावे. आमच्या देवाला शिवी दिली तर आमच्या भावना कश्या दुखतात यावर थेसिस लिहायची गरज नसावी.

आणि मनुस्मृतीमुळे आंबेडकरांच्या, दलितांच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या असणार. नाहीतर त्यांनी एवढी दखल घेतली नसती, अगदी दहन, इ करण्याइतकी.

चिंतातुर जंतू Wed, 07/05/2014 - 15:07

In reply to by अजो१२३

>> विचारांची चिरफाड केल्याशिवाय कोणतीही दहने, बंद्या येत नाहीत.

आं? म्हणजे सलमान रश्दीच्या 'सॅटनिक व्हर्सेस'ची वैचारिक चिरफाड केल्यानंतरच त्यावर बंदी घालण्याची मागणी आली होती असं तुम्ही म्हणताय की काय?

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 15:27

In reply to by चिंतातुर जंतू

अर्थातच. उगाच खोमेनींने रश्दींना मारण्याचे फर्मान काढले म्हणजे सॅटॅनिक व्हर्सेस समर्थनीय होत नाही. जो जगातला सर्वात मोठा दुसरा धर्म आहे, कितीतरी बिलियन लोक तो पाळून गुण्यागोविंदाने जगतात त्यांच्या सर्वोच्च आदरस्थानाला सैतानाच्या ओव्या अशी भाषा वापरणे चूकच. त्यावर बंदी यायलाच हवी. "कोण्या विशिष्ट लोकांच्या विशिष्ट वर्तनांना" झापताना सामान्य लोकांना मधे घेऊ नये. भाषा संयमाची असावी.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 15:34

In reply to by मन

होय. शिवाय ती मध्यरात्रीची मुले व मूरचा अखेरचा नि:श्वास ही पुस्तके (इंग्रजीत) वाचली आहेत. आमची विस्मरणशक्ती जबरदस्त आहे पण शून्य नाही.

मी Wed, 07/05/2014 - 15:33

In reply to by अजो१२३

त्यावर बंदी यायलाच हवी.

आक्षेप, लिहिलेले न वाचण्याचे स्वातंत्र्य जोपर्यंत आहे तो पर्यंत बंदी आणण्याची गरज नाही. वाचणार्‍याच्याच भावना दुखावू शकतात.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 15:37

In reply to by मी

मग भारतातली लोकशाही कशी उलथवायची, हा देश कसा फोडायचा, इथे दंगली कश्या घडवून आणायच्या, इ इ पुस्तके (प्रयोग म्हणून) छापून देशभर सगळ्या स्टॉलवर ठेऊन द्यायला आपली हरकत नसावी.

मी Wed, 07/05/2014 - 15:42

In reply to by अजो१२३

तुम्ही पुस्तक-वाचन आणि कृती ह्यामधले कोरिलेशन तुमच्या अनुभावाने/तर्काने मांडत आहात काय?

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 15:53

In reply to by मी

मला आपल्या वाक्याचा संदर्भ कळला नाही. अर्थ ही कळला नाही.

माझा मुद्दा -
मी माझा ईश्वर क्ष नि त्याची पत्नी य यांना खूप मानतो. रोज खूप भक्ती करतो. उद्या कोणी त्यांना पात्रे म्हणून वापरून पॉर्न बनवले तर अर्थातच ते मीच काय बरेच लोक पाहणार नाहीत. पण मला जर कळले की असले पॉर्न आहे तर मी दुर्लक्ष करावे का? "काय बनत आहे याला मर्यादा असावी" हे तर मला म्हणायचे आहेच शिवाय "अशी मर्यादा अतिशय नाजून भावनांना ठेस पोहोचेल अशा शब्दांत/अभिनयांत, इ इ त मांडू नये" असेही म्हणायचे आहे.

अर्थातच "लोकभावना फारच नाजूक होऊ लागल्यात बाबा!" असे म्हणणे, वा "लोकभावनेच्या नावाखाली नको ते लोक स्वातंत्र्य दडपत आहेत" वा "दूरगामी भविष्यासाठी काही लोकभावनांना हलवणे गरजेचे आहे" असे म्हणणे केस पाहून मान्य करायला हरकत नाही.

आणि रश्दींची या तिन्हीतली एकही केस नाही.

मी Wed, 07/05/2014 - 16:20

In reply to by अजो१२३

मी भक्तीभावाने एक ग्रंथ वाचतो पण तो ग्रंथ असे सांगतो की माझ्या पत्नीस तुमच्या मृत्यूनंतर सती जावे लागेल, तर मी त्या ग्रंथातील मला राग आणणार्‍या मजकुराकडे दुर्लक्ष करावे का? मी म्हणतो हो दुर्लक्ष करावे. लिहिलेले पटत नाही म्हणून दुर्लक्ष करावे.

पण थोडा अधिकविवेकी विचार असा कि समाजाचा मोठा भाग व्हल्नरेबल असतो त्यांना 'उचकावणारे' महाभाग सापडले की ते दुर्लक्ष करु शकत नाहीत, त्यामुळे डॅमेज कंट्रोल म्हणून 'तात्पुरती' बंदी व मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन करावे.

'न'वी बाजू Wed, 07/05/2014 - 16:30

In reply to by मी

तो ग्रंथ असे सांगतो की माझ्या पत्नीस तुमच्या मृत्यूनंतर सती जावे लागेल,

श्री. अरुणजोशी यांच्या मृत्यूनंतर तुमच्या पत्नीस सती जावे लागणे निव्वळ अतर्क्य आहे.

बाकी चालू द्या.

मी Wed, 07/05/2014 - 16:41

In reply to by 'न'वी बाजू

श्री. अरुणजोशी यांच्या मृत्यूनंतर तुमच्या पत्नीस सती जावे लागणे निव्वळ अतर्क्य आहे.

:) म्हणूनच तर दुर्लक्ष करा असे म्हणत होतो.

अवांतर - बुचाची परतफेड केली जाईल.

मन Wed, 07/05/2014 - 17:01

In reply to by 'न'वी बाजू

तुमचे प्रतिसाद यायला लागण्यापूर्वीचे दिवस चांगले दिवस होते ;)

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 16:34

In reply to by मी

वेल, यात अमान्य करावं असं काहीच नाही. आपण दोघे बहुधा एकच गोष्ट म्हणत आहोत.

दुर्लक्ष न करू शकणारे लोक - उचकावणारे महाभाग - तात्पूरती बंदी - समाज प्रबोधन असे आपण म्हणत आहात.

दुर्लक्ष करायची गरज नसलेला जून्या ग्रंथांतील भाग - उचकावणारे बाह्य लेखन - कायमची बंदी हे मी म्हणत आहे.

आडकित्ता Wed, 07/05/2014 - 18:30

In reply to by अजो१२३

मग भारतातली लोकशाही कशी उलथवायची, हा देश कसा फोडायचा, इथे दंगली कश्या घडवून आणायच्या, इ इ पुस्तके (प्रयोग म्हणून) छापून देशभर सगळ्या स्टॉलवर ठेऊन द्यायला आपली हरकत नसावी.

मनुस्मृती अश्या प्रकारचे पुस्तक आहे काय?
मी वाचलं नाहिये, पण तुम्ही सांगताहात तेव्हा त्यात तथ्य नक्कीच असावे.

मेघना भुस्कुटे Wed, 07/05/2014 - 15:36

In reply to by अजो१२३

विशिष्ट संदर्भांत वापरले जाणारे काही शब्दांचे अर्थः

चीरफाडः आवश्यकता, इतिहास, कारणपरंपरा, परिणाम या सगळ्याच / यांपैकी कुठल्याही अंगांनी केलेली एखाद्या गोष्टीची चिकित्सा. एखादी गोष्ट मागून-पुढून-वरून-खालून-अंतर्बाह्य तपासून पाहणे.

दहनः एखादी गोष्ट कोणत्याही कारणांनी निषेधार्ह वाटल्यास ती वस्तू / त्या वस्तूचे प्रतीक / संबंधित व्यक्तीची प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी जाळणे. यात निषेधाच्या घोषणांचा आणि विरोधकांच्या दखलपात्र गर्दीचा समावेश असतो. या दहनाचा आणि वस्तूवर घातलेल्या बंदीचा अर्थाअर्थी संबंध नाही.

बंदी: एखादी गोष्ट समाजविघातक असल्याचे मान्य झाल्यास त्या वस्तूच्या सामाजिक / सार्वजनिक / पुनर्निमित वापराला केलेली मनाई. ही ओलांडल्यास शिक्षा / दंड संभवतो. अशा प्रकारची बंदी सहसा मुस्कटदाबी करणारी असते.

मी व्यक्तिशः चिरफाडीला विरोध करत नाही (काही संदर्भांत करते, जसं की - ललित साहित्याची संदर्भहीन चीरफाड. पण तो क्षीण विरोध), दहन हे एक उपयुक्त हत्यार असल्याचं मानते, बंदी ही तिच्या हेतूच्या बरोबर विरोधी दिशेनं काम करणारी आणि लोकशाहीविरोधी गोष्ट असल्यामुळे कुठल्याही प्रकारची बंदी मला मानवत नाही.

आता प्रश्न असा: मनुस्मृतीचं दहन आणि मलिका अमरशेखांच्या पुस्तकावर घातलेली बंदी हे दोन्ही तुम्ही एकाच तराजूत तोलता काय?

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 15:41

In reply to by मेघना भुस्कुटे

चीरफाडीमधे समाजभावना पाहता सबब पुस्तक बाजारात असणेच योग्य आहे का हे अ‍ॅड करेन. बाकी सगळे मान्य.

अमरशेखांच्या पुस्तकावर घातलेली बंदी

अज्ञान.

मेघना भुस्कुटे Wed, 07/05/2014 - 15:49

In reply to by अजो१२३

मलिका अमर शेख यांच्या 'मला उद्ध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर बंदी आहे. पण ते एक असो. दुसरं उदाहरण - तस्लिमा नसरीन यांच्या 'लज्जा'चं. त्या पुस्तकावर घातलेली बंदी आणि मनुस्मृतीचं दहन या दोन गोष्टी एकसारख्याच आहेत की त्यांत काही फरक आहे असं तुम्ही मानता?

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 16:13

In reply to by मेघना भुस्कुटे

आंबेडकर, तस्लिमा नि रश्दी या सगळ्यांचीच तुलना उचित असेल.

सामाजिक कारणे, व्यक्तिगत अन्याय झाल्याची भावना ही पहिल्या दोन केस मधे आहे. पैकी आंबेडकरांनी केलेली चिरफाड, तिची कुणी दलित वाचत नाही, म्हणून सवर्णांच्या ग्रंथांवर टिका करणे ही दलितांत फॅशन आहे. म्हणून दहन 'लक्षात' राहिले, 'चिरफाड' विसरली गेली, इतके आंबेडकरांचे चुकले.

बांग्लादेशात स्त्रीयांच्या सुधारणांवर बॅन नाही. पण तस्लिमाने आपला सगळा आक्रोश तिच्या पुस्तकात ओतला (मी फक्त रिव्ह्यू वाचली आहे.). इतके ठिक होते. 'अल्ला का फल्ला' असले अतिशय नाजूक भावनांवर हात घालणारे शब्द वापरून तिने आपलीच स्वीकार्यता कमी केली. तिने संयम ठेवला असता तर तिला प्रसिद्धी कमी मिळाली असती पण कितीतरी मुस्लिमांनी तिचे खुल्या दिलाने स्वागत केले असते. समाजकार्य जास्त झाले असते. इतके तिचे चुकले.

रश्दी मात्र डावे. त्यांच्या लिहिण्यात एक उन्मत्तपणा असतो. सगळे लोक, देश, धर्म कसे मूर्ख आहेत , इ इ . शिवाय ते शुद्ध व्यापारी लेखक आहेत. आंबेडकरांची नि तस्लिमाची पार्श्वभूमी पाहता, मोठेपणा पाहता, त्यांच्या चूकांतही एक ओरिजनॅलिटी आहे. पण रश्दींचे काय? केवळ बौद्धिक कंडूशमनासाठी ते इस्लामला अद्वातद्वा बोलू शकत नाहीत. अर्थातच मी केवळ 'बॅन' चे समर्थन करतो, बाकी कडवट मुस्लिमांना त्यांना सळो कि पळो करून सोडले त्याचे नाही.

मेघना भुस्कुटे Wed, 07/05/2014 - 17:01

In reply to by अजो१२३

दहनामध्ये बंदी नाही. दुसर्‍या माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा नाही. केवळ तीव्र निषेध आहे. बंदीमध्ये मुस्कटदाबी आहे. त्यामुळे दोहोंची तुलना चुकीची ठरते.

बाकी हे अवांतर आहे. यावर वाद संभवत नाही. वाचायचं असल्यासच, प्रतिक्रिया म्हणून वाचावं:- च्यायला, अल्लाच्या नावे बाईला काय वाट्टेल ते बरळलेलं चालतं. नि बाईनं अल्लाबद्दल बोलताना भावनांची गळवं संभाळायची होय? नि वर ती नाही सांभाळली, तर लोक 'चुका' दाखवणार. साला अजब न्याय आहे.

मन Wed, 07/05/2014 - 17:16

In reply to by मेघना भुस्कुटे

अवांतर शंका :-
पुरोगामी लोकांना मनुस्मृती जाळली तर ते पटते.
उद्या एखादा पुरोगामी कुर् आन (किंवा अगदि बायबलही!) मध्ये काही भयंकर आक्षेपार्ह वगैरे जाणवलं म्हणून जाहिर जाळून दाखवेल काय ?
("दा विंची कोड" वर रोमनदेशात, इटालीत बंदी नव्हती ; पण भारतात होती! जय हो!)

पुरोगामी हिंदु धर्मावर अनंत उपकार करत आहेत हे मान्य आहे.
(संदर्भ :- "आम्हीच खरे धर्मश्रद्ध" लेख --नरेन्द्र दाभोळकर )
पण पुरोगामी लोकं कुरान वगैरे मामल्यात जरा टरकूनच असतात, नै का ?

हिंदुत्ववाद्यांशी संपर्क केल्यास तुम्हाला बोंब ठोकण्यासारखं लै मटिरियल मिळू शकेल कुराणाबद्दल.
कुराण कुणालाच जाळावसं वाटत नाही की कुणाची जाळायची हिंमत नाही हे जाणण्यास अतीव उत्सुक आहे.

एक अत्यंत सोप्पा बायपास :-
प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले बरे. हा घिसापीटा सवाल हिंदुत्ववादी म्हणवणारे विचारत असतात. त्यांच्या तोंडी काय लागायचे?
थुत त्या हिंदुत्ववाद्यांच्या.

कळकळीची विनंती :- कोण म्हणतय ह्या पेक्षा काय म्हटलं जातय ह्याकडे बघितलत तर लय उपकार होतील पहा.
"आमचे ग्रंथ का जाळता, त्यांचे जाळून दाखवा" ह्या च्यालेंजला पुरोगामी लोक बालिश म्हणतात. माझं आर्ग्युमेंट ते नाही.
माझे म्हणणे आहे "आमचेही जाळा. अगदि आनंदाने जाळा. आणि हो. इतर कुणाकुणाचे जाळू शकता तेही एकदा कळवा."

टिप :- कुराण काय काहिच जाळावं ह्या मताचा मी नाही. पण ज्यांना जाळणे मान्य आहे, त्यांच्या योग्य तिथे दम आहे काय
हे जाणून घेण्याची लै उत्सुकता आहे.

चिंतातुर जंतू Wed, 07/05/2014 - 17:20

In reply to by मन

>> पुरोगामी लोकांना मनुस्मृती जाळली तर ते पटते.
उद्या एखादा पुरोगामी कुर् आन (किंवा अगदि बायबलही!) मध्ये काही भयंकर आक्षेपार्ह वगैरे जाणवलं म्हणून जाहिर जाळून दाखवेल काय ?

एक मूलभूत गोंधळ दिसतोय : 'इतरांना एखादी गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य असावं' असं म्हणताना त्यातली प्रत्येक गोष्ट स्वतः करून दाखवायची माझ्यावर जबाबदारी येते का? 'ज्यांना जो धर्म पाळायचा आहे त्यांना तो पाळण्याचं स्वातंत्र्य (इतरांच्या स्वातंत्र्यांच्या आड न येता) असावं' असं मला वाटतं. पण माझा कोणत्याही धर्मावर विश्वास नाही; मग असं म्हणण्यासाठी मी आपोआप नालायक ठरतो का?

मेघना भुस्कुटे Wed, 07/05/2014 - 17:25

In reply to by मन

जगातला कुठलाच धर्म बाईशी बरा वागलेला नाही. अल्ला नाही, राम नाही, येशू नाही. अगदी समतेच्या नावानं ढोल पिटणारा बुद्धही नाही.

त्यामुळे कुठल्याही धर्मातलं काय वाट्टेल ते जाळायला माझी ना नाही. नाही पटलं आपल्याला, जाळा तिच्यायला. करा निषेध. हां, मात्र 'तुमच्या गांडीत दम आहे ना, मग त्यांचं ते हेपण जाळून दाखवा' छापाची आउटसोर्स्ड कंत्राटं घेतली जाणार नाहीत. तुम्हांला जाळायचंय, तुम्ही जाळा. माझा फुल्ल पाठिंबा. बंद्याबिंद्या घालायचं काम नाही. कु णा व र च.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 17:37

In reply to by मेघना भुस्कुटे

याला अल्ला अपवाद आहे. इस्लामपूर्व काळात स्त्रीयांची सौदीत हालत प्रचंडच बेकार होती. जन्मली पोरगी कि टाक पुरून असा हिशोब होता. अल्लाने एक्सप्लिटली मोहम्मदाला सांगून ती सुधरावली.

मेघना भुस्कुटे Wed, 07/05/2014 - 17:41

In reply to by अजो१२३

असेल. पण नंतर हजार बकवास अन्याय करवले गेले त्या दयाघन-कृपासिंधू अल्लाच्या नावानं. त्यांचा हिशेब करता अल्ला काही अपवादबिपवाद नाही.

'न'वी बाजू Wed, 07/05/2014 - 17:56

In reply to by अजो१२३

इस्लामपूर्व काळात स्त्रीयांची सौदीत हालत प्रचंडच बेकार होती.

इस्लामपूर्व काळात 'सौदी' अस्तित्वात असण्याबद्दल साशंक आहे.

बाकी चालू द्या.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 18:00

In reply to by 'न'वी बाजू

टेक्टोनिक प्लेटची गती किती आहे याबद्दल आपला भयंकरच गैरसमज झालेला दिसतो. म्हणजे ही (गती) अगदी कोणाच्याही कल्पनेबाहेर निघाली तरी, ती जागा काही मीटर इकडे तिकडे असेल. पण तो उपखंडच भूपृष्ठाखाली होता, लाव्हा होता इ इ म्हणणे म्हणजे अति झाले. त्यासाठी बिलियनमधे वर्षे लागतात.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 18:09

In reply to by मन

मनोबा, अमेरिकेचा शोध ५००-६०० वर्षापूर्वी लागला. पण अमेरिकेचा त्यापूर्वीचाही इतिहास मी अमेरिकेचा इतिहास म्हणूनच वाचतो. तेव्हा ( स्टोनहेंज, इ वाचताना) खरेतर नवी बाजू आज जिथे राहतात त्या भागाला 'तेव्हा' अमेरिका म्हणायचे का?

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 18:17

In reply to by अजो१२३

अवश्य वाचावा.

पण सौदी, अमेरिका, इ. संज्ञांमागे एक संदर्भचौकट सर्वसाधारणपणे अपेक्षित असते, त्यामुळे इ.स. ७०० सालची सौदी काय अन महाभारत काळातले पाकिस्तान काय, हास्यास्पद वाटणे साहजिक आहे. इतिहास वाचताना प्रदेशवाचक संज्ञेमागील संदर्भ न पाहता तुम्ही वाचू शकत असाल, तर अवश्य तसा शब्द वापरा. फक्त तसे बोलल्याने अन्य लोकांना कन्फूजन होणे परम साहजिक आहे, हे सांगण्याकरिता हा प्रतिसादप्रपंच.

आडकित्ता Wed, 07/05/2014 - 18:35

In reply to by अजो१२३

तेव्हा ( स्टोनहेंज, इ वाचताना) खरेतर नवी बाजू आज जिथे राहतात त्या भागाला 'तेव्हा' अमेरिका म्हणायचे का?

स्टोनहेंज अमेरिकेत आहे का?

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 18:17

In reply to by अजो१२३

तसे तर त्यांच्यावर सटायर करणार्‍या कवयित्रीस ठार मारण्याचे आवाहनही केले (ज्याची नंतर अंमलबजावणी करण्यात आली) असेही उल्लेख आहेत. ते नाकारणार काय? झैद नामक मानसपुत्रासंबंधीचा प्रसंग, मक्कस्थ टोळ्यांबरोबरच्या बोलाचालीसमयी टोळीप्रमुख बायकांचे अधिकारयुक्त बोलणे खुपणे, इ.इ. उल्लेखही नाकारणार असला तर सपष्ट सांगावे.

काये ना, परस्परविरोधी अनेक घटना प्रत्येक मोठ्या नेत्याच्या चरित्रात दिसतात. पण नक्की आधिक्य कशाप्रकारच्या घटनांचे दिसते हे ठरवायला विवेक पाहिजे. आता वरील घटना या अनधिकृत हदीसात येतात की अधिकृत हदीसात इ.इ. "फिक्ह" विवेचन करण्याइतपत आपला अभ्यास नाही, पण एकाच बाजूने अर्ग्युमेंट केल्यास त्यातील गफलत दाखवून देणे गरजेचे आहे.

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 18:20

In reply to by अजो१२३

अल्ला आणि इतरेजनांत मोहंमद येत असल्याने तसे होणे साहजिकच आहे. कुरान म्ह. अल्लाचे शब्द असले तरी मेसेंजर मोहंमद आहे अन भूलोकावरील कर्ता तोच आहे, सबब ते समीकरण योग्यच आहे.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 18:26

In reply to by मेघना भुस्कुटे

स्वातंत्रोत्तर काळातले भारतातले सगळे स्त्रीयांवरील गुन्ह्यांचे स्टॅटिस्टिक्स द्यायचे नि मग म्हणायचे "जाळा ती घटना. जाळा ते सगळे कायदे. खड्ड्यात घाला लोकशाही." असा प्रकार वाचला कि वाटले म्हणून हसू आले.

"व्यवस्थेचा उद्देश", "व्यवस्थापकांचा उद्देश", "प्राप्त परिस्थिती" नि "व्यवस्थेचा इफेक्टीवनेस" यांच्यात प्रचंड कोटीची गल्लत होत आहे.

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:28

In reply to by अजो१२३

'तत्कालीन' घटनेमध्ये 'प्राप्त परिस्थितीत' सुधारणा करता येते. मनुस्मृतीमध्ये सुधारणेचे कोणते मार्ग आहेत?

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 18:29

In reply to by अतिशहाणा

धर्मशास्त्रात स्मृतींमध्येही उत्क्रांती झाल्याची उदा. आहेत की. देवलस्मृतीत चक्क धर्मांतराला प्रायश्चित्त आहे. हा सुधारणेचा मार्ग नव्हे काय?

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:34

In reply to by बॅटमॅन

(जोपर्यंत सुधारणा होत होत्या तोपर्यंत मनुस्मृती कोणी जाळली नाही असा युक्तिवाद करावा की काय असा विचार करत आहे...)
शाहू-फुले-आंबेडकर-पेरियार-रानडे-गोखले काळापासून सुरु झालेल्या सामाजिक प्रतिक्रियांना पूरक अशा किती सुधारणा करण्याची तयारी हिंदू धर्माचार्यांनी दाखवली व त्या अनुषंगाने सुधारणा केल्या आहेत?

जितके वाचनात आले आहे त्यानुसार ब्रिटिशांनी सुरु केलेल्या काही सुधारणांचा वापरही असंतोषासाठी केला गेला इतकेच माहिती आहे.

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 18:42

In reply to by अतिशहाणा

वेगवेगळ्या जातींचे सामाजिक उन्नयनाची प्रक्रिया ही ब्रिटिश काळापासून फार जास्त प्रमाणात सुरू झाली याचा अर्थ जुन्या काळी काहीच नव्हते असा होतो हे माहिती नव्हतं. ब्राह्मण आणि दलित सोडूनही प्रचंड जाती आहेत हिंदू धर्मात. त्यांचं उन्नयन मध्ययुगीन किंवा त्याही आधीच्या काळात काहीएक प्रमाणात झालेलं आहे- विरोध होऊनही.

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:52

In reply to by बॅटमॅन

दलित (एस सी व एस टी) लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के. इतर मागासवर्गीय एकूण लोकसंख्येच्या ४१ टक्के. उरलेल्या ३३ टक्क्यातल्या निम्म्या बायका. यांच्या प्रगतीचा ब्रिटिशपूर्व काळातील वेग हा शून्याच्या जवळ जाणारा होता. म्हणजे फक्त १६ टक्के लोकसंख्येचे उन्नयन झाले असे म्हणता येईल. या १६ टक्क्यातीलही सर्वांचे उन्नयन झाले असण्याची शक्यता कमीच आहे.

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 19:03

In reply to by अतिशहाणा

दलितांच्याही उन्नयनाची तुरळक का होईना, उदा. आहेत. त्यातही मी म्हणेन एस सी वाली उदा. च घ्या, कारण कैक एस टी वाले लोक हे तथाकथित जातीव्यवस्थेच्या बाहेर होते.

शिवाय बायका सरसकट दबल्या-पिचलेल्या होत्या, गोठ्यातल्या गुरांपेक्षा त्यांची स्थिती खराब होती, इ.इ. क्लिशे पण चुकीची अर्ग्युमेंट्सही परिचित आहेत.

आजच्यापेक्षा ऑन द होल परिस्थिती चांगली नव्हती हे मान्य आहे पण आजही उन्नयन झालेल्या लोकांचे % पाहिले तर ते २०% पेक्षा फार जास्त नसावे.

त्या काळात जगभर जे प्रमाण होते त्या तुलनेत भारतातील प्रमाण तेवढेच, किंबहुना जास्त असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

आंधळे समर्थन करतोय असे नाही पण एकांगी अर्ग्युमेंट्स पुढे करून अतिशय भीषण आणि चुकीचे चित्र रंगवले जाते त्याला माझा आक्षेप आहे. असो.

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 19:09

In reply to by बॅटमॅन

परिस्थिती अगदी भीषण होती की नाही हे तुम्ही कोणत्या परस्पेक्टिवने पाहताय त्यावरच अवलंबून आहे. तुरळक उदाहरणांच्या तुलनेत आजची परिस्थिती ही प्रचंड चांगली म्हणावी लागेल असे वाटते. (अजून बराच पल्ला गाठायचा आहेच.)

धर्मराजमुटके Wed, 07/05/2014 - 21:01

In reply to by मेघना भुस्कुटे

"जगातला कुठलाच धर्म बाईशी बरा वागलेला नाही. अल्ला नाही, राम नाही, येशू नाही. अगदी समतेच्या नावानं ढोल पिटणारा बुद्धही नाही. "
ही धर्मांची नावे आहेत होय. मी तर इतके दिवस त्यांना त्या त्या धर्माचे प्रेषीत / अवतार समजत होतो. :)

१००% समता शक्य नाही हो ! मात्र माणसाने माणसाला (पक्षी बाईमाणसाला) माणसासारखे वागवावे या भावनेशी सहमत.
शिवाय आता हयात असलेला कोणताही धर्म बाईने स्थापन केला नसल्यामुळे कदाचित त्यांच्यावर अन्याय झाला असू शकतो. कोण्या बाईने पुढाकार घेऊन असा एखादा धर्म काढणे गरजेचे आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 08/05/2014 - 10:25

In reply to by धर्मराजमुटके

धर्म-धर्मातले ईश्वर-प्रेषित... इतपत गोंधळ चालायचाच. इतकं चिरेबंदी चोख चलाख लिहायला मी काय मुसु नैतर चिंजं आहे काय? ;-)

बाईनं धर्म काढायचा? राहू दे. इतकं काय धर्मावाचून अडलेलं नाही हो!

धर्मराजमुटके Thu, 08/05/2014 - 11:22

In reply to by मेघना भुस्कुटे

अहो चिरेबंदी वाड्यांना देखील तुम्ही धडका मारुन मारुन त्याचे चिरे खिळखीळे केले आहेत.
निदान प्रयत्न म्ह्णून तरी एखाद्या बाईने नवीन धर्म, किमान पंथाची स्थापना करायला काय हरकत आहे ? आता हयात असलेल्या धर्मांनी आतापर्यंत लढायांसाठी, चर्चांसाठी इतके मटेरीयल पुरविले आहे. तुम्हीही थोडी जबाबदारी घ्या की !
दुसर्‍याने पुरविलेला शिधा किती दिवस पुरवून पुरवून खाणार ?

मेघना भुस्कुटे Thu, 08/05/2014 - 11:35

In reply to by धर्मराजमुटके

पण धर्म म्हणजे शिधा असतो हे तर मानलं पाहिजे की नाही मी? तुमचं आपलं या चालीवर चाललंयः "प्रयत्न म्हणून तरी कुणावर थोडा अन्याय करून पाहाल की नाही?" ;-)

(हे 'दामिनी'मधल्या 'मुझे नही चाहिये इन्साफ!'च्या चालीवर वाचावे:) मुझे नही चाहिये धर्म!

नितिन थत्ते Thu, 08/05/2014 - 11:36

In reply to by धर्मराजमुटके

>>चिरेबंदी वाड्यांना देखील तुम्ही धडका मारुन मारुन त्याचे चिरे खिळखीळे केले आहेत.

वाडा जेव्हा चिरेबंदी होता तेव्हा म्हैलांना वाड्याच्या दरवाजावर धडका मारायचा काय स्कोप नव्हता. पुर्षांनीच (आतून-बाहेरून) धडका मारून चिरे खिळखिळे केले आणि खिळे बोथट केल्यावर म्हैलांना सुद्धा धडका मारणे शक्य झाले आहे.

अनुप ढेरे Thu, 08/05/2014 - 11:49

In reply to by नितिन थत्ते

भारतातली स्त्री मुक्ती ही पुरुषांमुळे झाली असं म्हणायचय का थत्तेचाचा तुम्हाला?

नितिन थत्ते Thu, 08/05/2014 - 12:36

In reply to by अनुप ढेरे

वेल....

म्हैलांना हव्या असलेल्या पण (अल्पसंख्यसुद्धा) पुर्षांना मान्य नसलेल्या सुधारणा होणे शक्य आहे/होते का कधी?

बॅटमॅन Thu, 08/05/2014 - 12:37

In reply to by नितिन थत्ते

अगदी सहमत. अल्पसंख्य पुरुषही जर तशा मताचे नसले तर म्हैलामुक्ती व्हनार कशी?

हा पर्तिसाद स्त्रीद्वेष्टा वाटला तर वाटूदे, पण स्त्रीद्वेष्ट्या समाजात दुसरे काय अपेक्षिणार? हेच लॉजिक पर्तिसादासही लावोन पहावे म्ह. वराडनार नैती कुनी.

मन Thu, 08/05/2014 - 12:44

In reply to by नितिन थत्ते

दोन वेगळ्या गोष्टी आहेत अण्णा त्या.
"काही" पुरुषांचा सपोर्ट्/समर्थन असणे व महिलांनी धडका देणे.
महिलांनी धडका दिल्याच नाहित (किंवा त्या देता येत नव्हत्या) दार तोडायला असं काहिसं पहिल्या प्रतिसादातून दिसतय.
काही पुरुषांचं समर्थन असलं तरी महिलांनी हातपाय आपटलेच नाहित असं म्हणता येइल का ?

नितिन थत्ते Thu, 08/05/2014 - 13:49

In reply to by मन

पुर्षांनी (उदा राममोहन राय) बहुधा महिलांच्या धडकांमुळे इनिशेटिव्ह घेतलेले नाही. (महिलांचा आक्रोश पाहिला असेल). पण बाहेर्चे जग पाहून इनिशिएटिव्ह घेतले असे म्हणता येईल.

The cause got helped by the alien rule. (स्वराज्य पाहिजे. स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा सुरू आहेत. - लो. टिळक)

ऋता Wed, 07/05/2014 - 18:36

In reply to by मन

धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य हवे पण धर्माची दहशत नको. घडणार्‍या घटनांमध्ये कोणत्या धर्माची किती दहशत आहे हे दिसून येतेच. पण एका धर्माचे पुरोगामी लोक(अथवा निधर्मी म्हणवणारे) दुसर्‍या धर्माच्या आचरण स्वातंत्र्याबद्द्ल जागरूक असण्याच्या नादात त्या धर्मातील दहशतीलाही आळा घालू शकत नाहीत/ पाठीशी घालतात.

मन Wed, 07/05/2014 - 20:00

In reply to by ऋता

हेच आणि असच म्हणायच होतं.
तुम्ही नेमक्या शब्दांत मांडलत.

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 22:54

In reply to by ऋता

पण एका धर्माचे पुरोगामी लोक(अथवा निधर्मी म्हणवणारे) दुसर्‍या धर्माच्या आचरण स्वातंत्र्याबद्द्ल जागरूक असण्याच्या नादात त्या धर्मातील दहशतीलाही आळा घालू शकत नाहीत/ पाठीशी घालतात.

आणि असं सांगितलं नाही की आम्ही कंत्राट घेतलं नै म्हंटात.

(आता पहा, कसा मारा सुरू होतो की नै ते. मज्जा!)

मेघना भुस्कुटे Thu, 08/05/2014 - 10:28

In reply to by बॅटमॅन

मी स्वतःबद्दल बोलते. बाकी 'रीती वर्तमानकाळ' मरू दे:

यच्चयावत धर्म बाईवर अन्याय करतात असं विधान मी केलं आहे. यात कुणाला पाठीशी घातलं रे? बाकी जाळण्याचं म्हणशील, तर मी मनुस्मृतीही जाळलेली नाही. तिला फाट्यावर मारणं मला पुरतं. ज्यांना ते पुरत नाही, त्यांनी करावी जाळपोळ. निषेधाचं कारण मला नीट सांगितलंत नि मला पटलं, तर शेजारी घोषणा द्यायला मी नक्की येईन. :ड

मन Wed, 07/05/2014 - 15:44

In reply to by मेघना भुस्कुटे

आणि लोकशाहीविरोधी गोष्ट असल्यामुळे कुठल्याही प्रकारची बंदी मला मानवत नाही.

अच्छा म्हणजे बंदी घालण्यालाच बंदी घातली पाहिजे असं म्हणायचय तर ;)

मी Wed, 07/05/2014 - 15:45

In reply to by मेघना भुस्कुटे

आता प्रश्न असा: मनुस्मृतीचं दहन आणि मलिका अमरशेखांच्या पुस्तकावर घातलेली बंदी हे दोन्ही तुम्ही एकाच तराजूत तोलता काय?

बंदी घातली असे गृहीत धरुन, एकाच तराजूत न तोलण्यासाठी पुस्तक आणि समाजविघातक कार्य ह्याच्या कोरिलेशन बरोबर कॉजेशनही दाखवावे लागेल.

............सा… Wed, 07/05/2014 - 15:56

In reply to by मी

एक कालबाह्य लिखाण दिसतंय तर दुसरे काळाच्या ४ पावले पुढचे असावे.
खरं तर दोन्हीचे दहन चुकीचेच वाटते आहे. एका (मनुस्मृती) कडे दुर्लक्ष करावे तर अन्य (लज्जामधील विचारांचा) स्वीकार व्हावा...... ज्या पेसने व्हायचा त्या पेसने. ...... मी दोन्हीही पुस्तके वाचलेली नाहीत पण तदनुषनगिक मतामतांच्या गलबल्यामधून वरील गोष्टी जाणवल्या त्या मांडल्या आहेत.

चिंतातुर जंतू Wed, 07/05/2014 - 16:59

In reply to by अजो१२३

>> विचारांची चिरफाड केल्याशिवाय कोणतीही दहने, बंद्या येत नाहीत. आता ती चिरफाड तुमच्या प्रोग्राम नुसार करणे म्हणजे चिरफाड करणे अन्यथा तो "हिंसाचार" असे म्हणायचे असले तर उपाय नाही. "भावना दुखतात म्हणून या पुस्तकावर बंदी आणा" असे निवेदन देणे, मोर्चा काढणे हे पुरेसे असावे. आमच्या देवाला शिवी दिली तर आमच्या भावना कश्या दुखतात यावर थेसिस लिहायची गरज नसावी.

  1. "भावना दुखावतात म्हणून या पुस्तकावर बंदी आणा" असे निवेदन देणे, मोर्चा काढणे ह्या गोष्टी तुमच्या मते 'वैचारिक चिरफाड' ह्याअंतर्गत समाविष्ट होतात का?
  2. 'आमच्या देवाला शिवी दिली तर आमच्या भावना कश्या दुखतात यावर थेसिस लिहायची गरज नसावी' हे विधान तुमच्या मते वैचारिक आहे की भावनिक?

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 18:15

In reply to by चिंतातुर जंतू

वैचारिक आहे की भावनिक?

खमोचा.
भावना ब्रेन स्टेम मधे असतात, विचार निओकॉर्टेक्स मधे असतात. पण सगळ्म इतकं क्लिअर नाही. संशोधन अजून चालू आहे.
खमोबं.

विचार नि भावना अशा वेगळ्या करता येत नाही. ते एकमेकांचा आधार, कारण नि अर्थ असतात. "बंदी नसावी" अशी भावना आहे कि विचार आहे हे पडताळाल तर ओव्हलॅप किती आहे ते कळेल.

चिंतातुर जंतू Wed, 07/05/2014 - 18:24

In reply to by अजो१२३

>> विचार नि भावना अशा वेगळ्या करता येत नाही. ते एकमेकांचा आधार, कारण नि अर्थ असतात. "बंदी नसावी" अशी भावना आहे कि विचार आहे हे पडताळाल तर ओव्हलॅप किती आहे ते कळेल.

एखाद्या गोष्टीवर 'बंदी घालावी' अशी मागणी करणारे लोक नक्की कशामुळे तसं म्हणताहेत हे पाहिलं, तर बहुतांश वेळा असं लक्षात येतं की ज्यांचा त्या गोष्टीचा आणि संबंधित विषयाचा अभ्यास आहे, ज्यांनी त्या गोष्टीचं ह्या अभ्यासाच्या बळावर विश्लेषण केलेलं आहे आणि अशा विश्लेषणाला सार्वजनिक करून मग जे बंदीची मागणी करताहेत असे लोक (असलेच तर) अल्पसंख्य असतात. त्या गोष्टीमुळे 'आमच्या भावना दुखावल्या जातात' असं म्हणणारे मात्र पुष्कळ असतात. जे भावनेच्या बळावर बंदीची मागणी करताहेत आणि जे विचारांती अशी मागणी करताहेत ह्या दोन प्रकारच्या लोकांत तुमच्या मते फरक करता येतो की येतच नाही?

सलील Wed, 07/05/2014 - 18:44

In reply to by चिंतातुर जंतू

वरील सगळी चर्चा म्हणजे वादासाठी वाद असे वाटते बुवा. म्हणजे आपला मुद्दा कोणीच सोडणार. बहुदा हल्ली मुद्दामहून वाक्याचा किस काढून सोयीस्कर अर्थ काढणे ह्याला प्रतिष्ठा आली आहे म्हणा. वकील जसे एक मुद्दा सोडून भलतीकडेच जातात तसे बऱ्याच चर्चांमधून वाचायला मिळते. पण हा माणसाचा स्वभावाच आहे. किंबहुना वाद घालणे आणि दुसऱ्यावर विजय मिळवून जास्त समाधान वाटते. त्यातून हिदुत्ववादी समोर असेल तर अजूनच मज्जा. असो. ह्यातुन दोघांपैकी नक्की कोणाचे समाधान झाले तर जरूर तसे लिहा.

मेघना भुस्कुटे Thu, 08/05/2014 - 10:37

In reply to by सलील

चर्चांना नावं ठेवण्याची फ्याशन आहे अलीकडे. असो द्यावी. पण चर्चांमधून मतं नेमकी होतात. योग्य पद्धतीनं वाद घातल्यास आणि डोकं खुलं ठेवल्यास बदलू शकतात. शिवाय काव्यशास्त्रविनोदयुक्त वादांची मज्जा लुटायला आणि खुमखुमी जिरवायला मिळते ती वेगळीच.

माझं झालं बॉ समाधान.

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:10

In reply to by अजो१२३

आंबेडकरांची मनुस्मृतीदहनाची कृती ही प्रतिकात्मक होती. विदेशी कपडे हे जसे पारतंत्र्याचे प्रतीक मानून जाळण्यात आले तशीच मनुस्मृती ही पारतंत्र्याचे प्रतीक म्हणून जाळण्यात आली. इतरांनी मनुस्मृती वाचू नये अशी बंधने आंबेडकरांनी घातली नाहीत.

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:06

In reply to by मी

(उदा. मनुस्मृती) पुरोगाम्यांच्या भावना दुखावत असल्यास

मनुस्मृती आणि सॅटॅनिक व्हर्सेस यांची तुलना चुकीची आहे. सॅटॅनिक व्हर्सेस ही कलात्मक अभिव्यक्ती आहे. मनुस्मृती ही कलात्मक अभिव्यक्ती नसून हा वर्णाश्रमाचा आधारभूत कायदा आहे. मनुस्मृतीमुळे हजारो पिढ्यांना शिक्षणाचा, संपत्तीचा, सन्मानाने जगण्याचा आधार नाकारला गेला आहे.

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:13

In reply to by मन

मग कुराणाबद्दल काय म्हणणे आहे?

काहीच म्हणणे नाही.

(मनुस्मृतीची तुलना कुराणाशी करण्याऐवजी 'शरिया'शी करता येईल. शरिया कायदा किती मुसलमानांना चांगला वाटतो?)

मी Wed, 07/05/2014 - 18:51

In reply to by अतिशहाणा

मनुस्मृती ही कलात्मक अभिव्यक्ती नसून हा वर्णाश्रमाचा आधारभूत कायदा आहे. मनुस्मृतीमुळे हजारो पिढ्यांना शिक्षणाचा, संपत्तीचा, सन्मानाने जगण्याचा आधार नाकारला गेला आहे.

म्हणून भावना दुखावणे आणि त्यामुळे बंदीचे समर्थन योग्य आहे काय?

अतिशहाणा Wed, 07/05/2014 - 18:54

In reply to by मी

बंदीचे समर्थन योग्य नाही. मात्र माझ्या स्वतःच्या भावना दुखावत असतील तर मी विकत घेतलेली सॅटॅनिक व्हर्सेसची प्रत वाचण्याची किंवा जाळण्याची कायदेशीर परवानगी अादर्श व्यवस्थेमध्ये मला असावी.

मन Wed, 07/05/2014 - 12:02

पुराणमतवादी म्हणजे नक्की कोण?

जो पुरोगामी नाही तो पुराणमतवादी.

;)

मग पुरोगामी म्हणजे नेमके कोण ?
ह्याचे उत्तर सोप्पे आहे.
स्वच्छ चारित्र्याचा, सज्जन , चांगला म्हणजे कोण? असे भारतात विचारले तर काय उत्तर द्याल ?
आप, केजरीवाल किंवा अण्णा हजारे ह्यापैकी कुणीही तुम्हाला सज्जन, स्वच्छ चारित्र्याचा असल्याचं सर्टिफिकेट
दिलेलं असणं आवश्यक आहे.

तस्सच, ऐसीमधील डिफॉल्ट स्वघोषित तथाकथित पुरोगाम्यांनी तुम्हाला तुम्ही पुरोगामी असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं असणं आवश्यक आहे.

जो "आप"चारी किंवा "केजरी"चारी नाही तो भ्रष्टाचारी.
जो अमेरिकावादी नाही तो दहशतवादी.
जो ऐसीमतवादी नाही तो पुराणमतवादी.

तळटिपा :-
१. तळटिपांच्या लाटेत आपणही स्वार होण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आला आहे
२. डिफॉल्ट, तथाकथित,स्वघोषित हे शब्द आम्ही न वापरल्यास पुरोगामी लोक तो फाऊल धरतील म्हणून यादी करुन ते शब्द घुसडण्यात आले आहे. ही यादी अवश्य वाढवता येउ शकते. संपर्क करावा.
३.आधीच्या तलटिपेत सर्व तपशील मिळालेले असतानाही ही तळटीप वाचायला आलात म्हणजे प्रतिसाद वाचण्याचे
कुतूहल, उत्सुकता, खाज फारच दिसते. ह्या तळटिपेत काहीही नाही. पुढे वाचायला लागा.
४.यादी वाढवता येइल; पण वाढवली जाइलच, असे नाही. थोडक्यात अंतिम निर्णय हा मनोबांचाच असेल.

;)

ह घ्या

............सा… Wed, 07/05/2014 - 15:36

सर्व कुटुंबीयांनी रात्री एकत्र जेवावे ...... लिव्ह इन च्या शी conflict

संध्याकाळी २ फक्त २ मिनिटे का होईना देवाची प्रार्थना म्हणावी, ......... नास्तिकते शी conflict

यशस्वी व उत्तम बालसनगोपनासाठॆ आई व वडील दोघांचीही गरज असते ...... होमोसेक्शुअलिटी बरोबर conflict

म्हणजे पुराणमतवादी असावे.

___________________________

बाकी सतीप्रथा पाळाव्या, केशवपन करावे, स्त्रियांनी व का ही जातीनी शिकू नये - हे अतिपुराणमतवादी झाले.
____________________________
लिव्ह इन, होमोसेक्शुअलिटी, नास्तिकता, आदि भिन्न मतामतांचा स्वीकार हे पुरोगामी म्हणावे.

आडकित्ता Wed, 07/05/2014 - 18:39

In reply to by ............सा…

सर्व कुटुंबीयांनी रात्री एकत्र जेवावे ...... लिव्ह इन च्या शी conflict

कसे ते समजले नाही.

............सा… Wed, 07/05/2014 - 19:09

In reply to by आडकित्ता

लिव्ह इन मध्ये कौटुंबिक बांधिलकी, जबाबदारी आदि विवाहांतर्गत सकारात्मक व रचनात्मक स्ट्रक्चरचा अभाव असतो असे येथे गृहीत धरले आहे.

धनंजय Wed, 07/05/2014 - 19:54

In reply to by ............सा…

मुद्दा १
> विवाहांतर्गत =>(पूर्ण समान)
मुद्दा २
> "सकारात्मक व रचनात्मक स्ट्रक्चर"
असे येथे गृहीत धरले आहे असे भासते आहे.

असा युक्तिवाद आहे का? असा युक्तिवाद हेतुपुरस्सर असेल, तर विचार करता येईल. म्हणजे त्याचा व्यत्यास
विवाहबाह्य = सकारात्मक व रचनात्मक स्ट्रक्चरचा अभाव
असे होते, आणि मग त्यानंतर
विवाहबाह्य => सकारात्मक व रचनात्मक स्ट्रक्चरचा अभाव => नकारात्मक आणि रचनानाशक प्रवृत्ती => (वगैरे)
हा युक्तिवाद समजू येईल.

मग मुद्दा १ => मुद्दा२ हे गृहीतक चुकीचे आहे, असे दाखवणारी खरीखुरी उदाहरणे प्रस्तुत करता येतील, सुसंवाद साधेल. (माझ्या मते "=>" असे नसून अनेक सकारात्मक-रचनात्मक स्ट्रक्चरांपैकी एक स्ट्रक्चर "विवाहांतर्गत आहे.)

मात्र जर "विवाहांतर्गत => "सकारात्मक व रचनात्मक स्ट्रक्चर" हे गृहीतक असल्याचे तुमच्याकरिताच अस्फुट असेल, तर मात्र अशी उदाहरणे दाखवण्यात काहीच हशील नाही. कारण अशी उदाहरणे बघितल्यानंतरही या अस्फुट गृहीतकामुळे "या उदहरणांत मुळी स्ट्रक्चर नाही" अशी धारणा होऊ शकेल.

............सा… Wed, 07/05/2014 - 20:08

In reply to by धनंजय

माझ्या मते "=>" असे नसून अनेक सकारात्मक-रचनात्मक स्ट्रक्चरांपैकी एक स्ट्रक्चर "विवाहांतर्गत आहे.

होय बरोबर आहे. काही लिव्ह इन देखील सकारात्मक + रचनात्मक असू शकतात
काही विवाह हे देखील "सकारात्मक + रचनात्मक" च्या विरुद्ध असू शकतात.
___________
त्यामुळे लिव्ह इन मध्येदेखील मुले संध्याकाळी त्यांच्या पालकांबरोबर नेमाने, आनंदाने जेवू शकतात. त्यादृष्टीने पहीला मुद्दा पुराणमतवाद्यांनी स्वीकारण्यास प्रत्यवाय नाही. जरा हे पचायला कठीण आहे आणि अशी उदाहरणे आढळल्यास पुष्टी व पुष्टीतून येणारी व्हॅलिडीटी अनुभवास येऊ शकेल.

मी अजून एकही लिव्ह इन पाहीले नसल्याने कोता दृष्टीकोन असू शकतो.
____________________________________________
धनंजय आपल्या प्रतिसादाची तर्कशुद्ध (प्युअर गणितीच म्हणा ना)** मांडणी आवडली.

** प्रत्येक तर्क हा गणिती"च" असतो असे इथे म्हणायचे नाही. तसे भासल्यास क्षमस्व.

अजो१२३ Wed, 07/05/2014 - 20:18

जे भावनेच्या बळावर बंदीची मागणी करताहेत आणि जे विचारांती अशी मागणी करताहेत ह्या दोन प्रकारच्या लोकांत तुमच्या मते फरक करता येतो की येतच नाही?

@ चिंज - फरक करता येतो.

१. पण भावनेच्या बळावरची बंदीची मागणी चूक नि वैचारिक ती योग्य हे म्हणणे अयोग्य आहे. योग्यायोग्यतेचा निकष विचार कि भावना हा नसून योग्य विचार/भावना कि अयोग्य विचार/भावना असा हवा.
२. मानवी उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर (किंवा जग कसे बनले आहे हे पाहिले तर) भावना या अगोदर विकसित झाल्या आहेत, विचार नंतर. आज तर शास्त्रज्ञ म्हणतात कि वैचारिक बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्दिमत्ता श्रेष्ठ आहे.
३. मानवी भावना धार्मिक, सामाजिक नि अलिकडे शास्त्रीय संस्कारातून बनल्या आहेत. प्रत्येक भावनेमागे प्रचंड मोठा इतिहास असतो. विचार साधार नि भावना निराधार असतात असे म्हणणे अयोग्य आहे.
४. प्रत्येक काळातल्या प्रत्येक संस्थेच्या मर्यादा असतात. तत्कालीन लोकच दुष्ट होते नि व्यवस्थांचा अधिकृत उद्देशच अन्याय करणे हा होता हा हिणकस विचार आहे.
५. जर असे म्हटले तर आजही घरात १० बायका असताना, कर्तृत्ववान असताना, १ महिन्याच्या शेंबड्या पोराला, ते एकटाच पुरुष असेल तर, कायद्यानुसार 'कर्ता' म्हणता येते. इतकेच नव्हे तर असे केल्यास करातून सवलत मिळते. आता ही वेळ काय घटना नि कायचे जाळायची नि बंदी आणायची आहे का?
६. काही लोक हाच युक्तिवाद समलैंगिकांसाठी करतील. स्वतंत्र भारतातल्या तथाकथित महान सर्वोच्च न्यायालयाने काय केले? सांसदांनी काय केले?
७. असाच युक्तिवाद वैवाहिक बलात्कारांसाठी होईल.
८. कालांतराने मनुष्यजात जेव्हा खूप सभ्य होईल तेव्हा 'दोन लोकशाहींत सैनिक मारणारी युद्धे होत' याची खिल्ली उडवली जाईल. मानहानीकरिता सजा होई नि हत्येकरिता नाही असे म्हणतील. 'मानवता' शब्द उच्चारायची आपली लायकी नव्हती असे आपले वंशज म्हणतील. आज काय करावे?
९. जर अर्थशास्त्रात गती असेल तर असे कळून येईल एतत्कालीन राजकारण, अर्थकारण यांमधे कल्पनेच्या पलिकडे अन्याय आणि मूर्खपणा आहे. यांवरची थट्टा (आपल्या आत्म्यांना) ऐकावी लागणार आहे.
१०. मग आपण आपल्या लोकशाहीची थट्टा उडवणार? आपले तिच्याशी भावनिक नाते आहे.
११. अगदी राज्यशास्त्र घेऊन शिकणार्‍या मुलीने पण घटना वाचली नसणार. राज्यसभा टीवीवर घटना कशी घडली ती सिरियल पाहिली नसणार. पण ती आनंदाने, उत्साहाने मतदान करेल. याला भावनिकता म्हणून हेटाळायचे? ती जे काही करेल, त्यात समाजावरील विश्वासाने बराच विचार ओतला गेलेला असतो. समाज बराच विचार करतो नि एक वर्तन आपलेसे करतो. प्रत्येकाने ते विचार सवत्याने करायची गरज नाही.
१२. इतिहासातल्या प्रत्येक काळात समाज हा नेहमी संतुलित राहिला आहे. मुझ्झपूरनगरमधे दंगे झाले, बदला घेण्याची आव्हाने इ इ झाली. विद्वेष प्रचंड पेटला आहे असे चित्र होते. किती % अधिक मतदान झाले? उर्वरित भारतापेक्षा काही वेगळे दिसले का तिथे? म्हणजे जे झाले त्याचा लोकांना विधीनिषेध नव्हता. नाहीतर झाडून १००% मतदान झाले असते.
१३. म्हणून बहुसंख्य भावनिक अविचारी/प्रतिगामी असतात आणि अल्पसंख्य वैचारिक पुरोगामी असतात असे म्हणणे चूक आहे. जास्त्तीत समाज ( ८०% -अजो आकडा) लोक मध्यमगामी, परंपरावादी आणि कशाचाही चांगला अर्थ काढायला पाहणारे असतात. म्हणून समाज नेहमी स्थिर असतो. बहुसंख्य लोक प्रतिगामी आहेत म्हणून अल्प पुरोगाम्यांच्या शक्तीचे गुणगाण (कमी असून पुढे खेचून आहेत) करायची आवश्यकता नाही.
१४. समाज हा योग्य जागी नाही आणि त्याला एका विशिष्ट जागी नेणे गरजेचे नि निकडीचे आहे असे मानणेही चूक आहे. आहे त्या व्यवस्थेतले घोळ, दुर्व्यवहार नीट केले तरी मोप फरक पडेल.
१५. समाजाला शॉक ट्रीटमेंट देऊ नये. त्याने दुफळ्या पडतात. एक क्रॅक गेल्यासारखी वाटली तरी दुसरी निर्माण होती. कारण शेवटी पुरोगाम्यांचे गहन तत्त्वज्ञान वाचायची कोणाचीच इच्छा नसते. कधी कधी उलटे परिणाम होतात.
१६. समाजाच्या सर्वमान्य श्रद्धास्थानांना धक्का देईल असे काही लिहू बिहू नये. लिहिले तर त्याला बॅन करावे. कारण त्यात धर्म इ मधली स्पेसिफिक टर्म वापरली जाते नि लोकांचा रिस्पॉन्स कुठल्या कुठे जातो.
१७. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची तलवार पाजळणे नि 'खरोखरच समाज सुधारणे' यात फरक आहे. म्हणून धर्मग्रंथात चूक असली तरी गप्प बसावे. प्रबोधनानंतर ती चूक आहे हे सर्वमान्य होते. तेवढी कळ काढावी. असे खूपदा झाले आहे.
१८. अखिल समजाकडून शिक्षणाची अपेक्षा ठेवावी, वैचारिकतेची नाही. लोकांच्या तथाकथित चांगुलपणाला चुचकारून चालावे. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली पण हिंदूच्या मनातील अशा 'सर्व' (यात बहुतेक गीताही आहे) ग्रंथांचा आदर ज्यात वर्णव्यवस्थेतेला गौरविले आहे तो जाणे दृष्टीपथात आहे का? उलट लोक चवताळून समर्थन करून लागले आहेत. तस्लिमाच्या केसमधे अल्लाबद्दल लोकांचे मत कधी बदलेल? ते तर असंभव आहे. मुळाच असे करणे हा उद्देशच असावा का? नाही. आंबेडकर दलितांचे नेते होते, त्यांचे कल्याण आंबेडकरांचे दायित्व होते नि त्यांचा उद्देश महान होता म्हणून 'एक वेगळी स्ट्रेटेजी' म्हणून त्याकडे मी आदराने पाहिन.
१९. पण महान नसलेल्या रश्दीसारख्या बुद्धीगंडवादी, व्यापारी लोकांनी जगातल्या एका महान धर्माला हिणवणे चूक आहे. त्यावर बॅन असला पाहिजे. त्यात माझे भारत सरकारला समर्थन आहे.

आडकित्ता Wed, 07/05/2014 - 20:51

In reply to by अजो१२३

१६. समाजाच्या सर्वमान्य श्रद्धास्थानांना धक्का देईल असे काही लिहू बिहू नये. लिहिले तर त्याला बॅन करावे. कारण त्यात धर्म इ मधली स्पेसिफिक टर्म वापरली जाते नि लोकांचा रिस्पॉन्स कुठल्या कुठे जातो.

याला म्हणतात प्रतिगामी.

अन याच्यासाठीच तर श्रद्धावानांच्या श्रद्धांची खिल्लीच उडवायला पाहिजे.

अजो१२३ Thu, 08/05/2014 - 10:40

In reply to by आडकित्ता

दुर्देवाने जगात बुद्धिचे इतके वावडे आहे कि पुरोगाम्यांची खिल्ली उडवली तर त्यांना ती कळत नाही नि हसायची तर त्यांची मानसिकताच नसते.

बाय द वे, मी प्रतिगामीच नव्हे तर प्रतिगत आहे याची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही.

मेघना भुस्कुटे Thu, 08/05/2014 - 09:40

In reply to by अजो१२३

भारतीय घटना आणि धर्मशास्त्र यांतले काही महत्त्वाचे फरकः

१. घटना अपौरुषेय असल्याचा दावा नाही. तशीच ती अपरिवर्तनीय नाही. धर्मशास्त्र दोन्हीही असल्याचा दावा करतात.
२. घटनेत काही दोष आहेत. पण ती समाजाच्या सगळ्या घटकांना समान अधिकार आणि कर्तव्यं देते. धर्मशास्त्र सर्वांना समान मानत नाही.

"धर्मग्रंथात चूक असली तरी गप्प बसावे. प्रबोधनानंतर ती चूक आहे हे सर्वमान्य होते."

प्रबोधनाची सुरुवातच बर्‍याचदा चूक बोलून दाखवण्यापासून होते. गप्प बसणं हा कधीही उपाय असूच शकत नाही. (काहीसं गंभीरपणे आणि काहीशा वात्रटपणानं असंही म्हणता येईल की, 'गप्प बसा' म्हणण्यानं माझ्यासारखे लोक चवताळतात, क्रॅक निर्माण होते, दुफळ्या पडतात इत्यादि. ;-))

समाजाला शॉक ट्रीटमेंट देण्याबाबतः

समाजाला धक्के आणि संथ-चिवट ढकलणी अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता असल्याचं दिसतं (रधों आणि महर्षी). दोन्हीच्या आपापल्या भूमिका असतात, दोन्ही गरजेच्या.

चिंतातुर जंतू Thu, 08/05/2014 - 16:02

In reply to by अजो१२३

>> १२. इतिहासातल्या प्रत्येक काळात समाज हा नेहमी संतुलित राहिला आहे. मुझ्झपूरनगरमधे दंगे झाले, बदला घेण्याची आव्हाने इ इ झाली. विद्वेष प्रचंड पेटला आहे असे चित्र होते. किती % अधिक मतदान झाले? उर्वरित भारतापेक्षा काही वेगळे दिसले का तिथे? म्हणजे जे झाले त्याचा लोकांना विधीनिषेध नव्हता. नाहीतर झाडून १००% मतदान झाले असते.
१३. म्हणून बहुसंख्य भावनिक अविचारी/प्रतिगामी असतात आणि अल्पसंख्य वैचारिक पुरोगामी असतात असे म्हणणे चूक आहे. जास्त्तीत समाज ( ८०% -अजो आकडा) लोक मध्यमगामी, परंपरावादी आणि कशाचाही चांगला अर्थ काढायला पाहणारे असतात. म्हणून समाज नेहमी स्थिर असतो. बहुसंख्य लोक प्रतिगामी आहेत म्हणून अल्प पुरोगाम्यांच्या शक्तीचे गुणगाण (कमी असून पुढे खेचून आहेत) करायची आवश्यकता नाही.

जर जास्तीतजास्त लोक स्थितिशील असतात तर पुरोगामी (पुढे जाणारे) अल्पसंख्यच असणार. कोणतेही अल्पसंख्य पुरोगामीच असतात असं माझं म्हणणं नाहीच. पुरोगाम्यांचं गुणगान करण्याचा मुद्दा नव्हताच. बाकी मुद्दे (उदा : विरोध वैचारिक की भावनिक आहे हा फरक कधी कधी करता येतो वगैरे) तुम्हाला मान्यच आहेत. सबब वाद नाही. वर कुणी तरी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर - माझं समाधान झालेलं आहे.

गब्बर सिंग Thu, 08/05/2014 - 00:22

यहुदी (ज्यू) धर्माच्या इतिहासात स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक दिली गेलेली आहे ? एखादी व्यक्ती यहूदी आहे की नाही हे त्या व्यक्तीची माता यहूदी आहे की नाही यावर ठरते असे माझ्या एका यहूदी ऑफिसबंधूने सांगितल्याचे आठवते. रेलिग्युलस मधे बिल माहर ने याबद्द्ल चर्चा केली होती का ? पिक्चर बघून खूप दिवस झालेले असल्याने आठवत नाही. (माहर च्या मातोश्री ज्यू आहेत असे वाचल्याचे आठवते.).

राही Thu, 08/05/2014 - 09:17

इथे सैतानाच्या ओव्यांवर भरपूर चर्चा झाली पण रिडल्स किंवा लीळाचरित्रची कुणालाच आठवण झाली नाही हे कसे काय? संदर्भ आणि तुलना म्हणूनही नाही? इतक्या लवकर स्मरणातून जाण्याएवढे हे वाद क्षुल्लक होते काय? ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये परखड टीका होती, अपशब्द नव्हते असे आठवतेय. पुस्तके वाचून पुष्कळ दिवस झाले. सध्या उपलब्ध असलेल्या रिडल्सच्या प्रतींत भावनादुखावक असा तो अध्याय नाही. लीळाचरित्र तर पुन्हा पहायलाही मिळाले नाही. कुणाच्या आठवणी ताज्या असतील त्यांत नक्की काय होते ते खुलासेवार जाणून घ्यायला आवडेल.

मन Thu, 08/05/2014 - 11:49

In reply to by Nile

प्लीझ लिहाच.
बादवे, नायल्याला कधीपासून प्रतिसादातील तपशील ठरवायला परवानगी लागायला लागली ?
तुझ्याच एका सर्टिफिकेटाची गरज होती बाबा पुरोगामी म्हणून सिद्ध होण्यासाथी सदस्यांना.
तू प्रशस्तिपत्र देच.

Nile Thu, 08/05/2014 - 18:34

In reply to by बॅटमॅन

अपेक्षेप्रमाणे अज्ञानमूलक प्रतिसाद आलेच!

मराठी संस्थळांवर कोण किती पुराणमतवादी/प्रतिगामी आहे हे त्यांच्या प्रतिसादांवरून स्पष्टपणे कळत असताना असा प्रश्न विचारणे गमतीदार आहे हे औपरोधिकपणे लिहले होते. असो.

बाकी, मराठी संस्थळांवर माझ्याइतका पुरोगामी शोधून सापडणार नाही. एकमेव अपवाद आमच्या फ्रेंच गुर्जींचा, ते फ्रेंच असल्याने त्यांना अनफेअर अडवांटेज आहे म्हणून!

अजो१२३ Thu, 08/05/2014 - 17:02

१. दलितकारण पुढे नेण्यामधे जर तुलना करायची झाली तर मला आंबेडकरांपेक्षा मायावतीचे खूप जास्त कौतुक आहे.
२. इथे हे नाकारून चालणार नाही कि मायावतींना सुकर काळ येण्यासाठी आंबेडकरांनी घातलेला पाया फार महत्त्वाचा आहे, पण ...
३. आंबेडकरांच्या शैलीमुळे त्यांची स्वीकार्यता कमी राहिली. इतकी कि स्वतः निवडणूक हरले.
४. त्याउलट मायावतीचे पाहा. प्रथम भाजपच्या पाठींब्यावर ती मुख्यमंत्री झाली. त्यात एवढे नवल नाही. पण पुढे ती 'स्वबलावर' जगातल्या मोठ मोठ्या देशांपेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या राज्याची मुख्यमंत्री झाली. कोणी दलित भारतात स्वकर्तृत्वाने इतके मोठे पद कमवण्याची ही पहिलीच घटना आहे.
५. मायावती नेहमी आपले धोरण कसे सर्वसमावेशक आहे याचा दिंडोरा पिटत असतात.
६. मायावती आज देशभरात बसपाचे जे जाळे फैलावू पाहत आहेत तो प्रकार वाखाणण्यासारखा आहे. आज भ्रष्टाचार, विकास, सांप्रदायिकता हे मुद्दे आहेत. उद्या जर राष्ट्र्व्यापी 'दलित अस्मिता' नावाचा प्रकार जागा झाला तर बसपाचे पोटेंशियल खूप आहे.
७. महाराष्ट्रात आंबेडकरांनी, दलित नेत्यांनी 'ज्याला वरकरणी/अंशतः अँटी-सवर्ण म्हणता येईल' असा पावित्रा घेतला. हे लोक सत्तेपासून प्रचंड दूर राहिले. आजही 'आर पी आय चे (व्हाटेवर उपशाखा) सरकार' हा प्रकार असंभव वाटतो, शब्दही ऐकायला अवघड वाटतो.
८. त्या तुलनेने बसपाचे प्रत्येक राज्यात मतदान निवडणूकीगणित वाढत चालले आहे.
९. मायावतीमुळे, उद्या कदाचित बसपाला, से पुढच्या पिढित, १-२ चांगले स्ट्रॅटेजिस्ट मिळाले तर, हे जाळे चांगलेच विस्तारू शकते. किमान तो पहिला वा दुसरा मुख्य विरोधी पक्ष बनू शकतो.
१०. या सगळ्याला कारणीभूत मायावतींचा 'सवर्ण फ्रेंडली' अजेंडा आहे. तो असा पॅकेज केला आहे कि तो दलित लेड वाटत नाही.
११. प्रतिगाम्यांना घेऊन चालावे, शिंगावर घेऊ नये, यातच आपले भले आहे हे राजकारण्यांना कळावे नि बुद्धिवंताना कळू नये हा ही विरोधाभासच आहे.

डिस्क्लेमर - १. मायावती भ्रष्ट आहे कि नाही याचा इथे संबंध नाही.
२. आंबेडकरांच्या काळात 'सवर्ण फ्रेंडली' टॅक्टीक्स चालले असते का , अधिक परिणामकारक काय राहिले असते, हा वादाचा मुद्दा असू शकतो.

ए गपे.

१. दलितकारण पुढे नेण्यामधे जर तुलना करायची झाली तर मला आंबेडकरांपेक्षा मायावतीचे खूप जास्त कौतुक आहे.
२. इथे हे नाकारून चालणार नाही कि मायावतींना सुकर काळ येण्यासाठी आंबेडकरांनी घातलेला पाया फार महत्त्वाचा आहे, पण ...
३. आंबेडकरांच्या शैलीमुळे त्यांची स्वीकार्यता कमी राहिली. इतकी कि स्वतः निवडणूक हरले.

उद्या पेशव्यांनी एकूणात जास्त भूभाग जिंकला म्हणून शिवाजी महाराजांहून थोर ठरतील असं म्हटलं जाइल.
उदा :-
शिवाजी महाराजांची युद्धपद्धती व एकूणच नेतृत्व पेशव्यांहून कमअस्सल होते. त्यामुळे त्यांची स्वीकार्यता कमी राहिली.
कैक प्रस्थापित सरदार घराण्यांनी त्यांना विरोध केला. त्यांना विरोध केलेले कैकजण पेशव्यांच्या काळात मराठेशाहीत आले.
.
.
मायावतींना सुकर काळ येण्यासाठी आंबेडकरांनी घातलेला पाया फार महत्त्वाचा आहे
हे वाक्य मात्र मान्य आहे. in fact तेच वाक्य ठेवून इतर प्रतिसाद बायपास केला तरी चालेल.

उगमापाशी कोणतीही नदी लहानच असते.

पैगंबराच्या काळात फार तर आज आपण ज्याला सौदी अरेबिया म्हणतो तेवढा भूभाग, आसपासचे येमेन, ओमानचे काही भाग इतकच अरबी साम्राज्यात आलं होतं. मात्र पैगंबराच्या निधनानंतर फक्त दशकभराच्या अवधीत आख्खी उत्तर आफ्रिका, इराक, इराण, सिंध- बलुचिस्थानचा काही भाग (तात्पुरता का असेना) जिंकली. पैगंबरापेक्षा हे दसपट तरी जास्त असावं.
पण म्हणून पैगंबरापेक्षा अबु बकर, उमर , उथमान ,अली हे पुढचे चारही खलिफा काही दसपट थोर लष्करी नेते ठरतात का ?

आकडे आणि समोर दिसणार्या घटना ह्या वस्तुस्थिती दाखवतात. पण वस्तुस्थितीमागची जी प्रेरणा असते आणि इतर कारणे असतात ती अशी थेट दिसत नाहीत, समजून घ्यावी लागते, ती आकड्यात धरता येणार नाही.

अवांतर :-
बादवे, पैज लावूया. एक मोठा व दणकट कांदा घेउ. जो एका बुक्कीत फोडेल तो विजेता.
फक्त अट एकच पहिला अटेम्प्ट अरुणराव करणार, मनोबा त्यानंतर अटेम्प्ट करतील.
try to understand . मी कांदा फोडण्याची शक्यता अधिक आहे. माझ्या आधी
एक बुक्की कांद्यावर मारुन झाली आहे.

धर्मराजमुटके Thu, 08/05/2014 - 17:36

In reply to by अजो१२३

त्यांची नदीसारखी अवस्था नाहीये. त्यांना बोअरवेलची उपमा जास्त योग्य दिसेल. आजूबाजूच्या शेतांत दुसर्‍यांनी बोअरवेल खोदल्यामुळे त्यांचे पाणी दिवसेंदिवस आटत चाललेय.

सलील Thu, 08/05/2014 - 19:14

In reply to by अजो१२३

मायावती आणि आंबेडकर ह्यांची तुलना करणे बरोबर नाही. दोन प्रचंड भिन्न कालखंडात आणि परिस्थितीत त्यांचे कार्य आहे. आंबेडकरांची प्रेरणा शतकानुशतके चालू राहील पण मायावतींचे असे होईलच असे नाही. त्यामुळे तुलना होऊ शकत नाही. बाकी मायावतींच्या मागे कांशीराम होते आणि त्यांनी बरेच हुशारीने राजकारण खेळले. पण आरपीआय चळवळीमधल्या लोकांना नक्की काय पुढे करायचे आहे ह्याची कल्पना अजूनही आहे असे वाटत नाही. मला वाटते की टोकाच्या गीरीबी आणि प्रचंड अन्यायकारक परिस्थितीत उद्भवलेली प्रतिक्रिया होती ती. तो जोश उतरला त्यातल्या बऱ्याच नेत्यांना आर्थिक आणि सामाजिक लाभ झाले आणि ते ढिले पडले. किंवा ह्यापुढे काय आणि ह्यातून नक्की काय करायचे तेच माहिती नसल्याने प्रत्येक सत्तेत येणाऱ्या पार्टीशी फक्त तोडपाणी करून आपला लाभ करणे हाच त्यांचा उद्योग राहिला आहे. मागे कधीतरी मधू कांबळे ह्यांचा ह्याच विषयावर लोकसत्तेत लेख आला होता. आरपीआयचे अपयश हे नेत्यांचे आहे असा काहीतरी त्याचा निष्कर्ष होता.

अजो१२३ Thu, 08/05/2014 - 19:22

In reply to by सलील

अर्थातच आपले सगळे मुद्दे मान्य आहेत. लेखाच्या/धागाच्या विषयाच्या अनुषंगाने, जर महाराष्ट्रात दलित नेते एकत्र राहिले असते, नि भ्रष्ट, विभाजित, इ इ राहिले नसते पण त्यांची 'सवर्ण विरोधी' इ इ वर्तन/प्रतिमा तशीच राहिली असती तर ते आज सत्तेत असते असे आपल्याला वाटते का?

सलील Thu, 08/05/2014 - 19:31

In reply to by अजो१२३

माझे असे स्पष्ट मत आहे की सवर्ण म्हणजे फक्त ब्राह्मण नाहीत. जे लोक महाराष्ट्रात गेली ५०-६० वर्ष सत्तेत आहेत त्यांनी हुशारीने ह्या लोकांना गंडवले असेच म्हणावे लागेल. दलित नेत्यांना पण हे कळत नाही. मायावती त्या बाबतीत हुशार आहेत. पण मायावती यशस्वी होण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांच्या पक्षात त्या सर्वेसर्वा आहेत. मायावातीनशिवाय बाकीचे कोणी माहिती नाहीत. इथे महाराष्ट्रात दलितांचे बरेच नेते आहेत आणि ते एकत्र नंदू शकत नाहीत हा खरा प्रोब्लेम आहे. नाहीतर ते बरोबर सत्ता संपादित करू शकले असते.

अजो१२३ Thu, 08/05/2014 - 19:36

In reply to by सलील

बसपाचे पक्षांतर्गत राजकारण काही का असेना, मायावतींना, भारतात पहिल्यांदाच कोण्या दलित पक्षाला, एकहाती स्पष्ट बहुमत मिळण्याचे कारण, त्यांनी केलेली सोशल इंजिनिअरींग आहे, हे सर्वमान्य आहे.

अशी सोशल इंजि. न करता, महाराष्ट्रात वा उ प्र मधे देखिल, कोण्या दलितप्रधान पक्षाला (नेत्याला नव्हे), सत्ता मिळेल असे आपणांस वाटते काय?

सलील Thu, 08/05/2014 - 19:45

In reply to by अजो१२३

तुम्ही म्हणता ते वरवर मान्य आहे. पण मला प्रश्न आहे की ह्याला सोशल इंजिनिअरींग का चाणाक्ष निर्णय म्हणावा. म्हणजे बघा कुठल्याही पक्षाला जो फक्त ठराविक समाजासाठी आहे त्याला एकहाती सत्ता मिळणे शक्यच नाही. तेवढी मतसंख्याच नाहीये ना. भाजप पूर्वी फक्त ब्राह्मणांचा पक्ष होता. त्यांना फार काही जागा मिळत नसत. मग ओबीसी जोडले गेले. आता परत ते करूनही सत्ता मिळत नाही म्हणून मोदीबाबा १०० करोड भारतीय अशी भाषा बोलतात. शेवटी दोन समाज आपल्या फायद्यासाठी एकत्र आले ही फ्याकट आहे. त्याला तुम्ही सोशल इंजिनिअरींगचे गोंडस नाव देऊ शकता. पण इथे म्हणजे तुझ्या बरोबर माझा पण फायदा हाच न्याय आहे आणि तो मायावतींनी ओळखला. किंबहुना कांशीरामाननी ते महाराष्ट्रात बघितले आणि चुका टाळल्या असे म्हणता येईल

किंबहुना कांशीरामाननी ते महाराष्ट्रात बघितले आणि चुका टाळल्या असे म्हणता येईल

सहमत, मायावतीच्या मागे कांशीरामांची पुण्याई(कर्तुत्त्व मान्य करुन) होती असे मलाही वाटते.

अजो१२३ Thu, 08/05/2014 - 17:33

In reply to by मन

अवांतर :-
बादवे, पैज लावूया. एक मोठा व दणकट कांदा घेउ. जो एका बुक्कीत फोडेल तो विजेता.
फक्त अट एकच पहिला अटेम्प्ट अरुणराव करणार, मनोबा त्यानंतर अटेम्प्ट करतील.
try to understand . मी कांदा फोडण्याची शक्यता अधिक आहे. माझ्या आधी
एक बुक्की कांद्यावर मारुन झाली आहे.

अवांतर टाळलेले बरे.

मी उसाचे कांड (नोड सोडून इतर जागून) वाकवतो. १०० दा. मग मनोबांना अजून १०००० चान्स. उस तोडा म्हणून. उस एकदा पिचकला कि कितीही वाकवून फायदा नाही.

आहे त्या मुद्द्याची गुणात्मक चर्चा करणे. संदर्भ (नीट) न जुळणारी उदाहरणे देऊ नका.