संस्थळाचे दर्शनी पान - भाग २

ऐसी अक्षरेवर वेगळे काय? हा प्रश्न अधूनमधून उपस्थित होतो. इतर संस्थळांप्रमाणेच हीही एक अभिव्यक्तीची जागा, इतकंच आहे का? संस्थळ सुरू केलं तेव्हापासून केवळ इतकंच राहू नये असा कायमच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. सुरुवात झाली ती मुक्त वातावरणात अभिव्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देऊन. कमीतकमी संपादन करून प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा, लेखांना तारका देऊन आत्तापर्यंत आलेलं चांगलं लेखन सांभाळून ठेवण्याची सोय केलेली आहे. त्याच मार्गाने पुढे पावलं टाकून गेले काही दिवस आम्ही ऐसी अक्षरेचा लोगो वेगवेगळ्या दिवशी बदलता ठेवला. आता सुरुवात करत आहोत ते नवीन मुखपृष्ठाची....

ऐसी अक्षरेच्या लोगोवर टिचकी मारल्यास संस्थळाचे 'होमपेज' दिसेल. विविध चित्रकार, छायाचित्रकार आणि संस्थळाच्या कलादालनातून प्रताधिकारमुक्त चित्रे प्रदर्शित केली जातील. संगीत आणि इतर बहुमाध्यमी घटकांचादेखील यथोचित वापर मुखपृष्ठावरच्या इतर अवकाशात केला जाईल.

(आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---

वा माणिक वर्मा यांचे फार गोड गाणे मुखपृष्ठावर एम्बेड केले आहे. आत्ता ऐकते आहे. सुंदर!!!

"आणिले धागे तुझे तू मी ही माझे आणिले,
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरुन जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरुन जा"
________________

मुखपृष्ठावरती नेहमी एक गाणे असावे. फार सुंदर वाटते.

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

फिडेल कॅस्ट्रो ने ऐसी अक्षरे वर ही प्रभाव टाकला शेवटी

आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महापुरुष महास्त्रीयांचे निधन झाले
पण ऐसी अक्षरे वर पहील्यांदाच म्हणजे लोगो वर आपला ठसा उमटवला तो
फिडेल कॅस्ट्रोनेच बहुधा (स्माईल) (स्माईल) (स्माईल)
मला माहीत नाही ऐसीच्या इतिहासात अगोदर असे झाले होते का कि इथुन शुभारंभ झालेला आहे ?

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

केला इशारा जाता जाता?

>> ऐसीच्या इतिहासात अगोदर असे झाले होते का कि इथुन शुभारंभ झालेला आहे ? <<

इतक्या वेळा प्रयत्न करूनही न गेलेला खोकला आज सुंठीवाचून गेला. चला आता अमेरिका ग्रेट करायला सज्ज व्हा असा इशारा / धमकी तर देत नसतील?

किंवा, आताच फेसबुकवर दिसलेली ही प्रतिमा -

https://scontent-sin6-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/15135970_693221677469537_6939024737989615309_n.jpg?oh=d58e6e18c357e506464761112b47f6a2&oe=58FB5164

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फिडेल कॅस्ट्रोचा फोटो मला का

फिडेल कॅस्ट्रोचा फोटो मला का दिसत नाहीये?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

तो पहायला कम्युनिस्टी आशिकची नजर पाहीजे

तो पाहायला कम्युनिस्टी आशिकची नजर पाहीजे. (स्माईल) (स्माईल) (स्माईल)
गब्बरने तर अगदी डोळे ताणले, चष्मे लावले, भारीचे भिंगकाच आणले तरी
त्याला तो फोटो दिसणारच नाही गॅरंटी
विचारा एकदा गब्बरला आज लोगो काही वेगळा वाटतोय का ?
किंवा सहज चर्चा केल्यासारख निरागसपणे विचारा ऐसी च्या लोगोतलं शाईचं पेन जुन झालय का ? अस काहीतरी
तो लोगोविषयीच चर्चा करेल त्याला फिडेल कॅस्ट्रोचा फोटो दिसणारच नाही
कारण एकच
कॅपीटलीझम च्या काविळीने.......
(स्माईल) (स्माईल) (स्माईल)

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

-लोगो अगदी उचित रंगात

Logo

-

लोगो अगदी उचित रंगात रंगवलेला आहे. लाल. रक्तरंजित.

---

कॅपीटलीझम च्या काविळीने.......

नाय ओ.

प्रोलेटेरियट च्या बद्दल असलेल्या माझ्या तिटकार्‍याच्या कावीळीने.

गब्बर भौ

हा फोटो तुम्हाला दिसला याचाच अर्थ कम्युनिझम ने तुमच्या ह्रद्यात तुमच्याही नकळत कुठे तरी स्थान मिळवलेले आहे.
जुदा होके भी तु मुझ मे कही बाकी है....
सारखा प्रकार आहे हा कैतरी.

प्रोलेटेरियट च्या बद्दल असलेल्या माझ्या तिटकार्‍याच्या कावीळीने.

अर्र्र्र गल्ली चुकली हो गब्बर ...
ह.घ्या. ही विनंती.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

हा फोटो तुम्हाला दिसला याचाच

हा फोटो तुम्हाला दिसला याचाच अर्थ कम्युनिझम ने तुमच्या ह्रद्यात तुमच्याही नकळत कुठे तरी स्थान मिळवलेले आहे.

प्रश्नच नाही.

"Socialism in general has a record of failure so blatant that only an intellectual could ignore or evade it." - Thomas Sowell

ब्राउजरची कॅशे क्लिअर करावी

ब्राउजरची कॅशे क्लिअर करावी लागेल बहुधा.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

किंवा कंट्रोल + आर

किंवा कंट्रोल + आर

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कंट्रोल + आर करून

दिसला ग बाई दिसला!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला पण !! म्हणजे ऐसीचाच कैतरी

मला पण !!

म्हणजे ऐसीचाच कैतरी प्रॉब्लेम होता तर !!!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

दोन्ही करूनही मला कॅस्ट्रोचा

दोन्ही करूनही मला कॅस्ट्रोचा फोटो दिसत नाही.

फायरफॉक्स, आय ई आणि क्रोम तिन्ही ट्राय केले.

(मला तो पहायचाच आहे असे नाही).

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

एक प्रश्न अत्यंत प्रामाणिक गंभीरतेने

फिडेल कॅस्ट्रोचे ऐसी अक्षरे लोगोवर ज्या अर्थी चित्र घेतलेले आहे. त्या अर्थी हा त्याचा एक प्रकारे केलेला सन्मान आहे असे मी समजतो.
याचा अजुन एक अर्थ जी राजवट ज्या काही विचारसरणीच्या आधारे चालवली ती बाजुला ठेवली तरी
तो एक भला मनुष्य होता त्याची तत्वे भली होती असे गृहीतक या सन्मानामागे असावे.
तर यात फिडेल कॅस्ट्रो हा इतकी वर्षे एका देशाच्या सलग एकटाच एकच निरंकुश सत्तेवर राहीला व निवृत्ती नंतरही त्याच्याच इछेनुसार त्याच्याच भावाला
राष्ट्रप्रमुख करुन मगच निवृत्त झाला. तर सर्वात मुलभुत प्रश्न असा की
१- ऐसीच्या मते म्हणजे ज्या कोणी लोगोवर कॅस्ट्रोंची स्थापना केली त्यांच्या मते तो एक निरंकुश हुकुमशहा होता की नाही ?
२- तो एक हुकुमशहा होता, लोकशाही विरोधी होता तर अशी तत्वे बाळगणारा माणुस ( साम्यवाद बाजुला ठेवा कृपया ) याने त्याच्या देशात कुठलीच व्यक्ती विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी कुठल्याना कुठल्या स्वरुपात ऐसीच्या मते ( म्हणजे जे कोणी संबंधीत) केली नाही का ?
३-वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर अशा व्यक्तीचा असा सम्मान करणे योग्य आहे का ?
४-समजा क्र. ३ चे उत्तर हो असेल तर यापुढे समजा जेव्हा केव्हा इतर निरंकुश हुकुमशहा ज्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात त्यांच्या देशात व्यक्ती/विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केलेली आहे अशा व्यक्तीचे पोस्टर लोगो वर लावण्यात येइल का ?
५-समजा क्र.४ चे उत्तर हो असेल तर ऐसी अक्षरे अधिकृतपणे अशा विचारसरणीचे अशा हुकुमशहांचे अशा व्यक्ती/ विचारांच्या मुस्कटदाबीचे वैचारीक समर्थनच नव्हे तर याला प्रोत्साहनही देते का ? असे जर कोणाला वाटले तर त्याचे वाटणे चुक आहे का ?
कॅस्ट्रो हा निरंकुश हुकुमशहा नसल्यास व त्याने कुठल्याही प्रकारची व्यक्ती विचार ची मुस्कटदाबी करुन त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणले नसल्यास त्याने हे जादुई वाटावे असे आश्चर्य जनक महान कार्य ( इतकी वर्षे एका देशाचा सर्वेसर्वा बनुन राहणे ) कसे केले असेल याचेही विवरण कृपया द्य्वावे.

फिडेल लोगो
(संदर्भासाठी सदर लोगो इथे डकवला आहे. - व्यवस्थापक)

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

या चर्चेच्या निमित्ताने

या चर्चेच्या निमित्ताने अनेकदा रिफ्रेश करून पाहिल्यावर अचानक आता लोगो दिसू लागला आहे.
ऐसीने अश्या लोकशाही तत्वांना हरताळ फासणार्‍या लोकांचे फोटो लावलेले बघुन दु:ख झालं. Sad

आता किम जोन-युन्ग (किंबा Kim Jong-un याचा जो उच्चार असेल तो) किंवा माओ याचं चित्रं लागेल उद्या अशी भिती वाटू लागली आहे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ - तुला दु:ख झाले ठीक आहे पण

ऋ - तुला दु:ख झाले ठीक आहे पण आश्चर्य वाटले का हे सांग?

होय सखेद आश्चर्य!

होय सखेद आश्चर्य!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनधिकृत

टीप : हे ऐसीचं अधिकृत उत्तर नाही आणि मी ऐसीचा अधिकृत प्रवक्ताही नाही.

विसाव्या शतकातला एक मोठा कालखंडभर जगभरातल्या लाखो तरुणांसाठी कॅस्ट्रो (आणि चे गव्हेरा) विशिष्ट मूल्यांचा चेहरा होते. त्याचा किंचित आढावा इथे वाचता येईल. त्या मूल्यांचा प्रभाव असलेले आणि एक प्रकारच्या स्वप्नाळू आदर्शवादानं नव्या युगाची आशा बाळगणारे अनेक (आता वय झालेले) लोक आपल्या परिसरात कार्यरत आहेत. शिवाय, जागतिकीकरण असा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा कॅस्ट्रो, त्याची सिगार, चे आणि लाल तारा वगैरे प्रतिमा जगभरातल्या प्रतिमाविश्वातला एक आयकॉन होते. त्या सगळ्याचा विचार करता कॅस्ट्रोला जागतिक संभाषितात एक स्थान आहे.

(ह्याचा अर्थ त्याच्या राजवटीतल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करावं असं नाही. मी स्वतःच काही कॅस्ट्रोभक्तांना 'स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट'ची आठवण करून दिली आहे.)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिजं - एक कॅस्ट्रो विशेषांक

चिजं - एक कॅस्ट्रो विशेषांक काढायचा का ऐसीवर? मी २-३ लेख तर नक्की पाडीन कॅस्ट्रोच्या कौतुकाचे. मराठी साहित्यजगतात असा अंक निघणे शक्यच नाही. ऐसीनीच पुढाकार घेतला तर कॅस्ट्रोला ती खरी श्रद्धांजली ठरेल.

हान तेजायला .... पुर्गी आयकत

हान तेजायला .... पुर्गी आयकत न्हाय.

चिंज जी

सर्वप्रथम स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट च्या दुव्यासाठी धन्यवाद. या फिल्मची माहीती नव्हती ही नक्की बघतो.
दुसर तुम्ही अधिकृत नाहीत त्यामुळे ज्यांनी हे लावलय त्यांचे नेमके मत जाणुन घेण्याची उत्सुकता आणखीच वाढली.
मला इत्यंभुत माहीती आहे कॅस्ट्रो विषयी असे मी म्हणत नाही मात्र अरुण साधुंचे पुस्तक आणि कॅस्ट्रोवरील काही डॉक्युमेंटरीज या बघितलेल्या आहेत.
इंटरनेटवर काही वाचन केलेल आहे ( फेसबुक वर एक परुळेकरांनी शेअर केलेले नाव आठवत नाही त्यांचा या चळवळीचा अभ्यास आणि बहुधा ते सक्रीय आहे त्यांच्या ही काही पोस्ट वाचलेल्या.. इंद्राज पवारांचाही एक चांगला लेख मिपावर होता अस मर्यादीतच माहीत आहे. पण या अगदी प्राथमिक मटेरीयल वरुनही काही बाबी फार स्पष्ट आहेत आणि त्या मान्य आहेत उदा.
१- गव्हेराचे टी शर्ट चे वेड, कॅस्ट्रोची सिगार इ, त्यांचे युथ आयकॉन असणे इ. कधी काळी त्यांनी काही जुलुमी राजवटींविरोधात केलेला आंतरराष्ट्रीय ( स्वराष्ट्रा पलीकडे जाऊन ) पातळीवरचा संघर्ष
२-त्यांचा विशिष्ट मुल्यांचा चेहरा असणे हे ही सहर्ष मान्य आहे.
३- त्यांनी अनेकांच्या आयुष्याला विधायक प्रेरणा दिलेली आहे त्यानेही अनेक ठिकाणी अन्याया विरोधात लढा इ. अनेक सकारात्मक बाबी एकेकट्या व्यक्तीगत पातळीवर झालेल्या आहेत. हे आणि हे हे सर्वच जे काय सकारात्मक आहे ते मान्यच आहे.
पण. खरा पण असा की वरील सर्व वजा करुनही फिडेल कॅस्ट्रो हा एक निरंकुश हुकुमशहाच होता व त्याच्या दृष्टीने वा त्याच्या विचारसरणीने कसेही का असो. त्याने शेकडो लोकांच्या मुलभुत मानवी हक्कांचा, अगदी किमान व्यक्ती स्वातंत्र्याचा, मुस्कटदाबी गळचेपी हे दोन शब्द नाही चालत असतील तरी किमान त्याने संकोच केला आहे असे निश्चीतपणे मला वाटते.
त्याने तसा केला नसल्यास इतकी वर्षे तो निरंकुश सत्तेवर सातत्याने राहणे व नंतर स्वतःच्याच भावाला देणे हे अशक्य आहे. मुळात लोकशाहीच नसल्याने ती अपेक्षाही नाही. मात्र
ज्या उदार उदात्त मुलभुत मानवी मुल्यांना आपण सर्वसाधारणपणे मानतो त्याचा तो शत्रु च आहे. ( आता त्याचे पद काय होते साम्यवादाच्या व्याख्येत तो भाग वेगळा मी स्वतःला जनसेवक वा लोकपाल म्हणुनही हुकुमशहा असु शकतो )
तर ऐसी अक्षरे इन जनरल ज्या उदात्त मुलभुत मानवी हक्क , व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मुल्ये इ.इ. चा इन जनरल सपोर्टर आहे त्याने अशा व्यक्तीला आपल्या मुळ लोगोवर स्थान देणे हे विसंगत मला तरी माझ्यापुरते वाटते. अर्थात इतक, सीरीयसली घेण्याची गरजही नसेल कदाचित पण एकच तुलना करतो
समजा इंदिरागांधी ( आणीबाणी विचारात घेता) वा मोदी (गुजरात दंगल इ. विचारात घेता ) यांचा वा बाळासाहेब ठाकरे ( यांचे मराठी माणसांच्या मुलभुत हक्कासांठे वगैरे योगदान लक्षात घेता ) यांचे चित्र असे लोगोवर घ्यायला हवे अशी कोणी मागणी केल्यास ती चुकीची आहे असे जर म्हटले व कॅस्ट्रो व या तिघातं फरक दाखवायचा झाला तर कसा दाखवणार हे बघण्याची मोठी उत्सुकता आहे.
मी या विषयात तज्ञ व्यक्ती नाही माझा असा अभ्यासही नाही मी केवळ लेमॅन पाँइट ऑफ व्ह्यु हे विचारत आहे की सर्वसाधारणपणे मला यात विसंगती जाणवते व ती चुक कशी आहे म्हणजे मी कुठे चुकतोय हे जाणुन घ्यायला मनापासुन आवडेल.
धन्यवाद

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

मुलभुत मानवी हक्क , व्यक्ती

मुलभुत मानवी हक्क , व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मुल्ये इ.इ. चा इन जनरल सपोर्टर

बर्‍याचदा लोकांचा एक अजेंडा असतो जो एखाद्या गोष्टीचं समर्थन असा नसून कोणाचा तरी विरोध या पायावर उभा असतो. त्यातून असे विरोधाभास तयार होतात. तुम्ही कितीही कृरकर्मा असलात तरी अमेरिकेला विरोध या भांडवलावर अनेक विचारवंतांची सहानुभुती मिळवू शकता. भारतीय परिप्रेक्ष्यात कॅस्ट्रो कम्युनिस्ट टाइप आहे, त्यामुळे इथल्या उजव्यांना नाही आवडत तो सो मला कॅस्ट्रो आवडतो, (उघड नसला तरी छुपा) असा काहिसा प्रवास असतो. माझ्यामते आयकॉन असणे हे दुय्यम आहे. तसं म्हटलं तर संघाची खाकी चड्डी, संचलन वगैरे हिटलर प्रेरीत होतं आणि ते कॅस्ट्रोआधीच इथे पोचलं होतं. पण त्यामुळे हिटलर जयंती मयंतीला इथे हिटलरचा फटु लागेल असं नाही.

---
अर्थात ऐसी हे खासगी संस्थळ आहे. चालकांना वाटेल तो फोटो ते लावतील. बाकीचे बोलणारे कोण? असा विचार करून हा विषय काढला नाही आधी. मारवांनी उकरलाच म्हणून हे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

समर्पक प्रतिसाद आहे, आवडला.

समर्पक प्रतिसाद आहे, आवडला. हा फोटो पाहिला तेव्हा मनात आलेला पहिला विचार - तुमचा दाऊद तर आमचा छोटा राजन.

प्रोप्रायटर साहेब

मी तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी ( हिंदु डॉन) असा बाळासाहेब ठाकरेंचा वाचलेला डायलॉग आठवतोय.
असेल म्हणजे छोटा राजनही असेल. एक सहज आठवण सांगतोय.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

मारवाजी तुमचे बरोबर आहे,

मारवाजी तुमचे बरोबर आहे, बाळासाहेब अरुण गवळीच म्हणाले होते.
मी राजन लिहीले कारण मला फोटो पाहिल्यावर, जेव्हा राजन बँकॉकहून पळाला होता तेव्हा मित्रमंडळीत झालेल्या चर्चा आठवल्या. माझ्या माहितीतल्या बर्‍याच जणांना तो हिरो वाटायला लागला होता. कंपनी रीलिज झाल्यावर तर याला उत आला. त्याला कल्ट स्टेटस मिळाले आणि "बर्‍याच" लोकांच्या मनात तु.दा.त.आ.छो.रा. अशी भावना होती. नाहीतरी अंडरवर्ल्ड हे असतेच ना, तो परिस्थितीनेच त्या मार्गाकडे वळाला, त्याने रॉला नाही का मदत केली एवढे सगळे आहे तर त्याच्या पूर्वीच्या काही गुन्ह्यांकडे कानाडोळा करायला काय हरकत आहे, असे बर्‍याच जनतेचे मत होते.
एकूणच कॅस्ट्रो गेल्यानंतर जे उदात्तीकरण चालू आहे ते तंतोतंत याच विचारसरणीचे आहे असे वाटते.

दाउद गेल्यावर दाऊदचा फोटो पण

दाउद गेल्यावर दाऊदचा फोटो पण येइल लोगो वर, काळजी नसावी.

दाऊद पण आयकॉनिक फिगर आहे, त्याचा जनसामान्यांवर पगडा पण आहे. त्याचे/त्याच्या विचारसरणीचे हजारो फॉलोअर्स आहेत भारतात. अश्या माणसाचा फोटो तर यायलाच पाहिजे.
मी दाऊदच्या फोटोची वाट बघत नाहीये, इन्शाल्ला दाऊदभाई की उमर बहोत लंबी हो.

स्पॉट द डिफरन्स

>> तसं म्हटलं तर संघाची खाकी चड्डी, संचलन वगैरे हिटलर प्रेरीत होतं आणि ते कॅस्ट्रोआधीच इथे पोचलं होतं. <<

कुणाच्या राजवटीत किती कमी काळात किती मोठा मानवसंहार झाला वगैरे बाबी जरा बाजूला ठेवू. हिटलर आणि कॅस्ट्रो-गव्हेरा यांची जर निखळ विचारसरणीवरून तुलना करायची झाली तर एक कळीचा मुद्दा दुर्लक्षित करता येत नाही -

हिटलरची विचारसरणी एका अत्यल्पसंख्य गटाला श्रेष्ठत्व बहाल करून त्या गटाला आपलं गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी इतरांचा द्वेष करायला शिकवणारी होती. त्यामुळे भारतातही त्याचे समर्थक एका अत्यल्पसंख्य पण पूर्वप्रस्थापित गटातून आले. त्याउलट कॅस्ट्रो-गव्हेरा पददलितांचा उद्धार करणारा सर्वसमावेशक विचार मांडत होते. त्यामुळे (उदा.) भारताविषयीच सांगायचं तर आयआयटीपासून दलित वस्त्यांपर्यंत अनेकविध गटांत त्यांना आयकॉनिक स्टेटस मिळालं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यामुळे (उदा.) भारताविषयीच

त्यामुळे (उदा.) भारताविषयीच सांगायचं तर आयआयटीपासून दलित वस्त्यांपर्यंत अनेकविध गटांत त्यांना आयकॉनिक स्टेटस मिळालं.

अनेक टी शर्ट वर चे चे पोस्टर मिरवणार्‍या पैकी किती तरुणांना चे विषयी त्याचा देश कोणता होता, तो कोणत्या लढाईत मारला गेला, त्याची विचारसरणी नेमकी काय होती, इतर देशातही सशस्त्र हिंसा इ. कशी केली इ. माहीती असते ( विशेषतः भारतातल्या ) हा संशोधनाचा विषय ठरावा.
अनेकदा हे एका फॅड मधुन वरवरच्या उथळ आकर्षणातुन झालेले दिसते. अर्थात सिरीयस फॉलोइंगही असेलच काहींची , इन जनरल मै हु अण्णा च्या टोप्या एकेकाळी, बिइंग ह्युमन चे शर्ट घालणारी तरुणाई सारखा फॅन फॉलॉइंग प्रकार अधिक आहे. यावर माझे अधिक मत देण्यापेक्षा श्री महेश पवार जे "अर्वाचीन व्यासपीठ " सारखे दर्जेदार कार्यक्रम चालवतात व मुख्य म्हणजे या चळवळीचे समर्थक सहानुभुती बाळगणारे आहेत त्यांची ही प्रतिक्रिया वाचनीय आहे.

फिडेल क्रास्टो , चे गव्हेरा आणि मंडळी !
- महेश पवार
.... आज दुपारी नाना चौकातल्या जाड्या कम्युनिस्ट मित्राचा फोन आला . म्हणाला, 'काय रे, बघितलस ... 'फिडेल' ची बातमी या मीडियाने कशी पद्धशीरपणे दाबून टाकली ते ? ' हो म्हणण्यावाचून काही इलाजच नव्हता . कारण सध्याच्या इंटरनेट पिढीला फिडेल व चे गव्हेरा चे काहीही सोयर सुतक नाहीये हे काल पासून नव्हे तर गेली दोन दशके पाहात आलोय . अगदी १९९० साली आपल्या देशात 'मंडल कमिशन' च्या शिफारसींविरोधात जेव्हा तत्कालीन विद्यार्थी वर्गाकडून जो उठाव झाला तो शेवटचाच असावा . १९९० साल पर्यंत विद्यापीठामध्ये 'निवडणुका ' घेतल्या जात , वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडत , मग त्यात भले डावे , उजवे सगळे विद्यार्थी अगदी हिरीरीने भाग घेत व त्यातून विद्यार्थ्यांची 'आंतरराष्ट्रीय राजकारणाशी ' तोंडओळख तरी होत असे . कालांतराने १९९० पासून अगदी पद्धतशीरपणे या विद्यार्थ्यांच्या निवडणुका देशातील ' विद्यापीठातून ' काढून टाकल्या गेल्या व विद्यार्थी फक्त एम टी व्ही , मोटार सायकल , गर्लफ्रेंड आणि जमलेच तर आय टी व करियर या जंजाळात घुसत गेला . उदाहरहणार्थ सांगतो माझ्या मोबाईल फोन आणि लैपटॉप वर 'चे गव्हेराचा' फोटो स्क्रीन सेव्हर म्हणून आहे . तीन चार वर्षांपूर्वी माझा जुना लैपटॉप खराब झाला म्हणून एका किरिस्ताव अभियंत्याला बोलावले होते . त्याने माझ्या लैपटॉप वर ' चे गव्हेराचा ' फोटो पाहून सरळ विचारले की ,' क्या सर , आप भी चरस मारते हो क्या ?' मी चक्रावून का विचारले तर म्हणाला की ,' मेरे एरियामे सभी चरसी लोग इसाका फोटोवाले टी शर्ट पहनते है !'
त्या क्षणाला मला जाणवले कि आजच्या पिढीला फिडेल क्रास्टो , चे गव्हेरा वगैरे नावे अजिबात माहित नाहीयेत , मग त्यांनी भांडवलशाहीच्या विरोधात केलेले बंड तर विसरूनच जा
. अशातच एकदा मराठीतील प्रसिद्ध ( सुमार ) लेखकद्वयी मधील एका लेखकाचे ' फिडेल क्रास्टो ' वरचे पुस्तक वाचनात आले आणि हतबुद्द्य झालो . हे लेखक महाशय प्रस्तावनेतच सांगतात की,' मी अनेक वर्षे अमेरिकेत राहिलो पण २०१० सालापर्यंत मला फिडेल क्रास्टो कोण ते माहित नव्हते . २०१० साली मी एका अमेरिकन वाहिनीवर फिडेल क्रास्टो ची डॉक्युमेंटरी पहिली आणि मग मी त्याची माहिती जमा करून हे पुस्तक(खरे तर पुस्तिका म्हणायला पाहिजे ) एका महिन्यात ' मराठी वाचकांसाठी ' लिहून काढले . आता या अशा कॉपि पेस्ट करणाऱ्या नवलेखकांबद्दल काय बोलावे ? इथे फिडेल , चे , माओ इत्यादी विचार सरणी समजावून घेण्यात अख्खी हयात जाते आहे आणि हि अशी गल्लाभरू मंडळी इंटरनेटवरून माहिती जमा करून स्वतःच्या तुंबड्या भरून खुशाल जगताहेत . हे असे चित्र आजच्या काळात असेल तर ' फिडेल' च्या मृत्यूची बातमी जास्त टी आर पी देणार नाहीये हे माहित असलेला 'विकाऊ मीडिया ' या बातमीला का बरे महत्व देईल ?

सहज यांचा मिसळपाववरील चर्चेतला एक मार्मिक विचारणीय असा प्रतिसाद आहे

हा 'चे' जर दिसायला कुरुप असता तर इतक टि-शर्टप्रिय झाला असता का? युथ - रेबल - गुड लुक्स - पोरींना असे काही आवडणे व एक फॅशन. एक सोशलिस्ट नेता 'चे' चे 'भांडवलशाही' लोकांकडून टिशर्टच्या माध्यमातून विकला गेला. हा टि शर्ट घालणार्‍या कित्येक लोकांना त्याचे पूर्ण नाव व काम माहीत नसते. हा टिशर्ट विकला गेला नसता, फॅशन म्हणून याची विक्री झाली नसती तर किती लोकांना आजही लक्षात असता?
एका देशाच्या माणसाने दुसर्‍या देशात जाउन सशस्त्र कारवाया करणे याला काय म्हणले जाईल?
तो काळ वेगळा होता, सत्ता चालवणारे तसे जुलमी होते. सशस्त्र क्रांतीला साथ मिळत होती. सोशलिस्ट क्रांती बदल घडवेल असा विश्वास होता. जग ह्या दोन विचारसरणीत विभागले जात होते. ज्या कॅस्ट्रोने सत्ता हस्तगत केली पुन्हा जनतेचे गोरगरीबांचे राज्य आणले का? सोशलिस्ट म्हणवत भांडवलशाहीला नावे ठेवत एकदा सत्ता हस्तगत केल्यावर काय कार्य?

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

झिझेक आणि कॅस्ट्रो

मोठा प्रतिसाद लिहायला वेळ नाही, पण स्लावोय झिझेकचा 'The Left’s Fidelity to Castro-ation' हा लेख वाचा अशी शिफारस करेन. त्यात कॅस्ट्रोवर आणि पाश्चात्य कम्युनिस्टांवर भरपूर टीका आहे. त्यामुळे ज्यांना कॅस्ट्रोची नालस्ती करायची आहे त्यांनाही त्यात दारुगोळा मिळेल. आणि तरीही साठ-सत्तरच्या दशकातल्या ज्या भाबड्या रोमँटिक स्वप्नाळू आदर्शवादाचा मी संदर्भ देत होतो त्याच्याशी त्याचा संबंध आहे. झिझेक काय म्हणतो आहे ते त्यासाठी नीट वाचायला मात्र लागेल. बाकी जी ट्रोलगिरी खाली चालू आहे ती चालू द्या. (पक्षी : संस्थळ आहे घरचं होऊ द्या खर्च.)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

झिझेकचा लेख नक्कीच शांतपणे वाचतो त्यापुर्वी एक मत असे की

आणि तरीही साठ-सत्तरच्या दशकातल्या ज्या भाबड्या रोमँटिक स्वप्नाळू आदर्शवादाचा मी संदर्भ देत होतो त्याच्याशी त्याचा संबंध आहे

तुम्ही म्हणता तसा आदर्शवाद नक्कीच साठ सत्तरच्या काळात अस्तित्वात होता. प्रश्न आजचा २०१६ मध्ये तुम्ही व मी आहोत व आपल्याला
१- त्या आदर्शवादाची प्रत्यक्षात कशात परीणीती झालेली आहे हे नीट माहीत आहे. आज २०१६ मध्ये आपल्या समोर एका स्वप्नाची अखेर नेमकी कशात झाली त्याचे संदर्भ रशिया व इतर अनेक साम्यवादी राष्ट्रांच्या स्थितीवरुनच पुरेसे स्पष्ट आहे. आपल्या समोर पुर्ण सिनेमा स्क्रिप्ट सहीत उपलब्ध आहे.
२- याच्या असंख्य कारणांत त्या विचारसरणीच्या मुळातच असलेल्या अंगभुत दोषांसहीत त्याहुन महत्वाचे त्या विचारसरणीच्या नायकांनी ( ज्यांकडे ६०-७० मध्ये एक मोठा वर्ग सर्व नाही स्वप्नाळु अपेक्षेने बघत होता ) केलेली प्रचंड प्रतारणा केलेली कृष्णकृत्ये केलेली मुस्कटदाबी तुडवलेली मानवी मुल्ये राबवलेले दबावतंत्र आचरलेली निर्दयी हुकुमशाही (इथे कॅस्ट्रो च्या संदर्भात घ्यावे. आपल्या समोर अनेक पुराव्यांनीशी उपलब्ध आहे.
३- तर जी विचारसरणी आपण आदर्श व तिचे नायक उदात्त मानले गेलेत त्या दोहोंचे २०१६ मधील प्रत्यक्ष वास्तवाचे आपण साक्षीदार आहोत.
४- तर आज २०१६ मध्येही हे सर्व जाणुनही आपण जर आज त्या नायकाचे उदात्तीकरण करत असु तर त्याचे कारण आपल्या स्मरणरंजनातुन आपण बाहेर येण्यास तयार नाही हे एक किंवा आपण दांभिक हे दुसरे किंवा अजुनही वास्तव आपल्या पर्यंत कदाचित पोहोचले नसेल हे तिसरे अशी कारणे असु शकता असे म्हणण्यास वाव आहे.
किंवा त्या मुळ विचारसरणीने आपल्यावर केलेल्या गारुडातुन अजुन आपण बाहेर आलेलो नाही. (१)
५-त्याहुन जी बाब मला सर्वात जास्त आक्षेपजनक वाटली ती अशी की ऐसी अक्षरे संस्थळ हे मुक्त निष्पक्ष संस्थळ आहे असा माझा व अनेकांचा ठाम विश्वास आहे. ऐसी हे अधिकृतपणे कुठल्याही विचारसरणीला वाहीलेले नसतांना ही आणि ही निष्पक्षता मुक्त व्यासपीठ असणं हीच ऐसी अक्षरे ची सर्वात मोठी कोअर स्ट्रेंथ असतांना (थोड गंमतीने म्हणायच तर ऐसी हे बीएचयु किंवा एएमयु किंवा जेएनयु नसुन हे सिम्बॉयोसिस आहे किंवा शांतीनिकेतन आहे ) तर इथे उघड संस्थळाच्या वतीने मुख्य लोगोवर कॅस्ट्रोचे चित्र लावणे हे उघड उघड एका विशिष्ट विचारसरणीला ( जी व जीचा नायक अनेक बाबतीत दोषी आहे ) मानणारे प्रोत्साहन देणारे असे हे संस्थळ आहे असे कुणाला वाटले तर ते गैर कसे म्हणावे ? विशेषतः आज २०१६ मध्ये कॅस्ट्रो संदर्भातील सर्व नागडी सत्ये ( त्यातील विवादास्पद सोडुन देऊन निव्वळ निर्वीवादही जमेस धरली ) उपलब्ध असतांनाही. कॅस्ट्रोचा फोटो लावुन संस्थळाच्या निष्पक्ष भुमिकेसमोर प्रश्नचिन्ह उभे करणे गैर नाही का ?
६- किंवा माझाच ऐसी अक्षरे च्या संदर्भात काहीतरी मोठा गैरसमज तर झालेला नाही ?

टीप-(१) Václav Havel च्या The Power of the Powerless या निबंधात हा मुद्दा मुळ विचारसरणीचे गारुड ज्यावर आधारीत ज्यातुन आलेली राजवट हुकुमशहा कितीही भयंकर वागले पुढे जाऊन तरी कमी होत नाही त्या संदर्भातला हा परीच्छेद फार रोचक आहे. यात पारंपारीक हुकुमशाही व साम्यवादी हुकुमशाहीतला फरकही मोठा मार्मिकतेने दाखवलेला आहे.
In the second place, if a feature of classical dictatorships is their lack of historical roots (frequently they appear to be no more than historical freaks, the fortuitous consequence of fortuitous social processes or of human and mob tendencies), the same cannot be said so facilely about our system. For even though our dictatorship has long since alienated itself completely from the social movements that give birth to it, the authenticity of these movements (and I am thinking of the proletarian and socialist movements of the nineteenth century) gives it undeniable historicity. These origins provided a solid foundation of sorts on which it could build until it became the utterly new social and political reality it is today, which has become so inextricably a part of the structure of the modern world. A feature of those historical origins was the "correct" understanding of social conflicts in the period from which those original movements emerged. The fact that at the very core of this "correct" understanding there was a genetic disposition toward the monstrous alienation characteristic of its subsequence development is not essential here. And in any case, this element also grew organically from the climate of that time and therefore can be said to have its origin there as well.

One legacy of that original "correct" understanding is a third peculiarity that makes our systems different from other modern dictatorships: it commands an incomparably more precise, logically structured, generally comprehensible and, in essence, extremely flexible ideology that, in its elaborateness and completeness, is almost a secularized religion. It of fears a ready answer to any question whatsoever; it can scarcely be accepted only in part, and accepting it has profound implications for human life. In an era when metaphysical and existential certainties are in a state of crisis, when people are being uprooted and alienated and are losing their sense of what this world means, this ideology inevitably has a certain hypnotic charm. To wandering humankind it offers an immediately available home: all one has to do is accept it, and suddenly everything becomes clear once more, life takes on new meaning, and all mysteries, unanswered questions, anxiety, and loneliness vanish. Of course, one pays dearly for this low-rent home: the price is abdication of one’ s own reason, conscience, and responsibility, for an essential aspect of this ideology is the consignment of reason and conscience to a higher authority. The principle involved here is that the center of power is identical with the center of truth.

याच निबंधात एक जबरदस्त उदाहरण येते जे लोगो वर लावलेल्या चित्रासंदर्भात फारच समर्पक आहे. व्हॅक्लाव्ह कम्युनिस्ट दडपशाही असलेल्या देशात ग्रीनग्रॉसर आपल्या स्टोअर समोर एक स्लोगन लावतो. त्या स्लोगन लावण्याचे त्या साध्या प्रतिकात्मक कृतीचे खोलवर उलगडलेले अर्थ संबंध व्हॅक्लाव्ह फार मार्मिकतेने उलगडुन दाखवतात. इथेही आपण एक स्लोगन सारखेच चित्र चिकटवलेले आहे म्हणुन हा संदर्भ मला फार महत्वाचा वाटला.

The manager of a fruit-and-vegetable shop places in his window, among the onions and carrots, the slogan: "Workers of the world, unite!" Why does he do it? What is he trying to communicate to the world? Is he genuinely enthusiastic about the idea of unity among the workers of the world? Is his enthusiasm so great that he feels an irrepressible impulse to acquaint the public with his ideals?
Obviously the greengrocer is indifferent to the semantic content of the slogan on exhibit; he does not put the slogan in his window from any personal desire to acquaint the public with the ideal it expresses. This, of course, does not mean that his action has no motive or significance at all, or that the slogan communicates nothing to anyone. The slogan is really a sign, and as such it contains a subliminal but very definite message. Verbally, it might be expressed this way: "I, the greengrocer XY, live here and I know what I must do. I behave in ihe manner expected of me. I can be depended upon and am beyond reproach. I am obedient and therefore I have the right to be left in peace." This message, of course, has an addressee: it is directed above, to the greengrocer's superior, and at the same time it is a shield that protects the greengrocer from potential informers. The slogan's. real meaning, therefore, is rooted firmly in the greengrocer's existence. It reflects his vital interests. But what are those vital interests?

Let us take note: if the greengrocer had been instructed to display the slogan "I am afraid and therefore unquestioningly obedient;' he would not be nearly as indifferent to its semantics, even though the statement would reflect the truth. The greengrocer would be embarrassed and ashamed to put such an unequivocal statement of his own degradation in the shop window, and quite naturally so, for he is a human being and thus has a sense of his own dignity. To overcome this complication, his expression of loyalty must take the form of a sign which, at least on its textual surface, indicates a level of disinterested conviction. It must allow the greengrocer to say, "What's wrong with the workers of the world uniting?" Thus the sign helps the greengrocer to conceal from himself the low foundations of his obedience, at the same time concealing the low foundations of power. It hides them behind the facade of something high. And that something is ideology.

Ideology is a specious way of relating to the world. It offers human beings the illusion of an identity, of dignity, and of morality while making it easier for them to part with them. As the repository of something supra personal and objective, it enables people to deceive their conscience and conceal their true position and their inglorious modus vivendi, both from the world and from themselves. It is a very pragmatic but, at the same time, an apparently dignified way of legitimizing what is above, below, and on either side. It is directed toward people and toward God. It is a veil behind which human beings can hide their own fallen existence, their trivialization, and their adaptation to the status quo. It is an excuse that everyone can use, from the greengrocer, who conceals his fear of losing his job behind an alleged interest in the unification of the workers of the world, to the highest functionary, whose interest in staying iu power can be cloaked in phrases about service to the working class. The primary excusatory function of ideology, therefore, is to provide people, both as victims and pillars of the post-totalitarian system, with the illusion that the system is in harmony with the human order and the order of the universe.

http://vaclavhavel.cz/showtrans.php?cat=clanky&val=72_aj_clanky.html&typ...

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

इथल्या चर्चेच्या अनुषंगाने हा

इथल्या चर्चेच्या अनुषंगाने हा लेख समतोल वाटला. (लेखाचं शिर्षक गंडलय).

त्या मुळ विचारसरणीने आपल्यावर केलेल्या गारुडातुन अजुन आपण बाहेर आलेलो नाही. (१)

हे असेलही खरं. पण त्यात चुकीचं काय आहे? भांडवलशाहीचा पुरेपूर फायदा घेणार्‍यांवर असं गारूड असावं (हे नकारात्मक वा हेटाळणीयुक्त नाही) हे त्यांच्या संवेदनाशीलतेची साक्ष देणारं आहे असं म्हणावं की ढोंगीपणाचं असं म्हणावं? (पळा)
आपल्या देशातील मध्यमवर्गाच्या संदर्भात बघितलं तर आपल्या पिढीला वर येण्यासाठी डाव्या विचारांकडे झुकलेल्या समाजवादी विचाराच्या लोकशाहीने मोठा हात दिला, ते लगेच विसरूनच जावे का?

दुष्कृत्ये विचारसरणीला अनुसरून(?) केली जातात तेव्हा ती जास्त तिरस्कारणीय ठरतात की केवळ फायदा बघून केली जातात तेव्हा?

इथल्या चर्चेच्या अनुषंगाने हा

इथल्या चर्चेच्या अनुषंगाने हा लेख समतोल वाटला. (लेखाचं शिर्षक गंडलय).

प्रकाश बाळ यांनी लिहिलेल्या त्या लेखात मार्क्सवादाची लिमिटेशन्स संक्षिप्तपणे उधृत केलेली आहेत तसेच स्टिग्लिट्झ व पिक्केटी यांचे म्हणणे समोर ठेवून आर्थिक विषमता वाढल्या बद्दल व त्यामुळे शोषणाचा अंत न झाल्याबद्दल भांडवलवादावर खापर फोडण्यात आलेले आहे. पिक्केटीं व स्टिग्लिट्झ यांच्याच साहित्याचा हवाला देऊन. पण ज्यांचे शोषण होते त्यांचे दोष कधीही लक्षात न घेण्याची तरतूद नेमक्या कोणत्या इझम मधे आहे ? शोषित लोकांच्या शोषणासाठी नेहमी इतर लोकच का जबाबदार ? ज्यांचे शोषण होते तो शोषण होणारा हा शोषणास जबाबदार असूच शकत नाही हे गृहितक कुठुन आले ? का उत्तरादाखल नेहमी प्रमाणे हे "सच्चाईसे जिनका नाता टूट चुका है उनके खयाली पुलाव" म्हणणार ?

शोकात्म

आदर्शवादाची परिणती आणि २०१६ : हा निकष लावायचा ठरला तर गांधी, नेहरू, सावरकर, आंबेडकर किंवा आपल्या कोणत्याही राष्ट्रीय आदरस्थानाचं स्मरण करता येणार नाही. शिवाय, ह्या युक्तिवादानुसार उजवीकडच्या दिनवैशिष्ट्यावरही आक्षेप घेता येईल.

उदात्तीकरण : नायकाचं उदात्तीकरणच सोडा, मला कुणाचं नायकीकरणही फारसं पटत नाही. पण, मी वर म्हटलं त्याप्रमाणे जगभरातल्या लोकांवर झालेला (चांगला) परिणाम आणि जागतिक प्रतिमाविश्वावर झालेलं (चांगलंवाईट) गारूड हे घटक मला महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे निव्वळ एका व्यक्तीचं किंवा विचारसरणीचं उदात्तीकरण (किंवा नुसतं समर्थनही) असं त्याकडे पाहण्यापेक्षा मी त्यामागच्या जनतेच्या स्वप्नांचा आणि त्याहूनही अधिक ती प्रत्यक्षात आली नाहीत ह्या शोकात्मतेचा विचार करतो आहे. ज्याच्याकडून खूप लोकांच्या खूप अपेक्षा होत्या अशा विसाव्या शतकातल्या एका मोठ्या शोकात्म नाट्याचं हे मला प्रतीक वाटतं.

बाकी संस्थळाच्या निष्पक्षपातीपणाविषयी मी काही म्हणू शकत नाही.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाह !!!!!!!!!!!!!!!! सरजी क्या बात है !!!!!!!!!!!!!!

त्यामुळे निव्वळ एका व्यक्तीचं किंवा विचारसरणीचं उदात्तीकरण (किंवा नुसतं समर्थनही) असं त्याकडे पाहण्यापेक्षा मी त्यामागच्या जनतेच्या स्वप्नांचा आणि त्याहूनही अधिक ती प्रत्यक्षात आली नाहीत ह्या शोकात्मतेचा विचार करतो आहे. ज्याच्याकडून खूप लोकांच्या खूप अपेक्षा होत्या अशा विसाव्या शतकातल्या एका मोठ्या शोकात्म नाट्याचं हे मला प्रतीक वाटतं.

काय दुर्मिळ प्रतीची संवेदनशीलता तुम्हाला लाभलेली आहे ! असा विचार माझ्या मनात डोकावलाही नाही.
फार च सुंदर प्रतिसाद मनापासुन आवडला !
धन्यवाद
अती अती अवांतर - शोकात्म विश्वरुप दर्शन -स.रा.गाडगीळ तुम्ही वाचलयं का ? नसल्यास जरुर बघा एकदा

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

आणखी एक फिल्म

वर ज्याचा दुवा दिला आहे ती 'स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट' तशी साधीसरळ आहे, पण कॅस्ट्रोच्या क्यूबाविषयी खरंच गुंतागुंतीचं काही पाहायचं असलं तर त्याच दिग्दर्शकाच्या (तोमास आलिआ) 'मेमरीज ऑफ अंडरडेव्हलपमेंट'ची शिफारस करेन. 'कम्युनिस्ट राजवटीत एलियनेट झालेला एक बूर्ज्वा ऐन क्यूबन मिसाइल क्रायसिसमध्ये आपल्या आयुष्याच्या श्रेयस-प्रेयसाविषयी विचार करतो आहे' एवढंच वर्णन मी करेन.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आफ्रिका आणि कॅस्ट्रो

कॅस्ट्रोकडे केवळ क्रूरकर्मा म्हणून पाहणं हा कसा पाश्चात्य वसाहतवादी दृष्टिकोन आहे आणि आफ्रिकेत कॅस्ट्रोची प्रतिमा वेगळी का आहे, ते मांडणारा एक लेख :

To so many Africans, Fidel Castro is a hero. Here’s why

Mandela writing from Robben Island: “It was the first time that a country had come from another continent not to take something away, but to help Africans to achieve their freedom.”

At the end of his Cuban trip, Mandela responded to American criticism about his loyalty to Castro: “We are now being advised about Cuba by people who have supported the apartheid regime these last 40 years. No honourable man or woman could ever accept advice from people who never cared for us at the most difficult times.”

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नेल्सन मंडेलाच्या कौतुक यादीत इतरही हुकुमशहा दहशतवादी आहेत

https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2013/12/10/the-last-gr...

http://www.ibtimes.com/mandela-dictators-freedom-fighter-complicated-pas...

रॉबर्ट मुगाबे

One of Mandela's most notorious allies may have been Robert Mugabe, who has ruled Zimbabwe for now 33 years. Half a century ago, when Mandela was not viewed as favorably in the West as he is today, but Mugabe was viewed perhaps more favorably, the two African liberation leaders were not so different. Both had embraced violence.

मुअम्मर गद्दाफी

Although we in the West see Mandela and Gaddafi as polar opposites, one a democratically elected leader who sought to help his people and the other a militaristic dictator who exploited them, from within the wider liberation movement their points of commonality are more apparent. Mandela, we like to forget, was isolated and opposed for years by the United States and Britain. But his movement could count on financial and political support from Gaddafi, who shared a desire to resist Western as well as Soviet meddling, a longing for more innately African institutions and a willingness to embrace violence in the pursuit of revolutionary ideals.

General Sani Abacha

General Sani Abacha seized power in Nigeria in a military coup in November 1993. From the start of his presidency, in May 1994, Nelson Mandela refrained from publicly condemning Abacha’s actions. Up until the Commonwealth Heads of Government meeting in November 1995 the ANC government vigorously opposed the imposition of sanctions against Nigeria. Shortly before the meeting Mandela’s spokesman, Parks Mankahlana, said that “quiet persuasion” would yield better results than coercion. Even after the Nigerian government announced the death sentences against Saro-Wiwa and eight other Ogoni activists, during the summit, Mandela refused to condemn the Abacha regime or countenance the imposition of sanctions.

सुहार्तो

Two of the ANC’s biggest donors, in the 1990s, were Colonel Muammar Gaddafi of Libya and President Suharto of Indonesia . Not only did Mandela refrain from criticising their lamentable human rights records but he interceded diplomatically on their behalf, and awarded them South Africa ‘s highest honour. Suharto was awarded a state visit, a 21-gun salute, and The Order of Good Hope (gold class).

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

गुलामांचं वास्तव

>> नेल्सन मंडेलाच्या कौतुक यादीत इतरही हुकुमशहा दहशतवादी आहेत <<

हुकूमशहांविषयी मंडेलांना कितीही प्रेम असलं तरी गोर्‍या पाश्चात्य राष्ट्रांनी आफ्रिकेला गुलाम केलं, तिला लुटलं आणि वंशभेदी सरकारचा पुरेसा प्रतिकार केला नाही हे वास्तव बदलत नाही. आणि त्यामुळे अशा काळात मदत करणार्‍या कॅस्ट्रोच्या ऋणाविषयीचा लेखातला मुद्दाही खोडला जात नाही.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बेगर्स कॅनॉट बी क्रिटीसायजर्स

त्यामुळे अशा काळात मदत करणार्‍या कॅस्ट्रोच्या ऋणाविषयीचा लेखातला मुद्दाही खोडला जात नाही

स्वाभाविक आहे जो मदत करतो त्याच्याविषयी कृतज्ञ असणे स्वाभाविक आहे. अशा वेळेस उपकारकर्त्याचे कठोर वस्तुनिष्ठ मुल्यमापन न करणे , टीका टाळणे, त्याच्या इतर चुकांकडे दुर्लक्ष करणे, पापांना नजर अंदाज करणे हे योग्यच. कारण असे करण्याचे मुळात स्वातंत्र्य ही नसते ते परवडतही नाही व असे करणे कृतघ्नपणाच ठरतो एक प्रकारचा.
कॅस्ट्रोंवर स्तुतीसमने उधळणे हे योग्यच.

वंशभेदी सरकारचा पुरेसा प्रतिकार केला नाही
हे फार रोचक आहे वंशभेद दोन्ही बाजुंनी आहे. वंशभेद म्हटल्यावर फक्त गोरे जो काळ्यांच्या संदर्भात करतात हाच नव्हे. मंडेलानी ज्यांना सातत्याने एक दिर्घकाळ पाठींबा दिला होता ते हुकुमशहा वंशवादी रॉबर्ट मुगाबे गोर्‍यां विरोधात वंशभेद च राबवत होते. त्यांची धोरणे व वक्तव्ये उदा.

“The only language that the mabhunu (white man) will understand is the language of the gun. The more you kill, the nearer you get to your objective.”

White farmers are “hard‐hearted, you would think they were Jews”.

“They (white farmers) will not be treated like special creatures. Why should they be treated as if they are next to God? If anything, they are next to he who commands evil and resides in [the] inferno.”

“Our party must continue to strike fear in the heart of the white man, they must tremble…. The white man is not indigenous to Africa. Africa is for Africans….The white man is part of “an evil alliance.”

http://nehandaradio.com/2012/11/30/racial-discrimination-in-zimbabwe-a-s...
http://www.csmonitor.com/World/Africa/2014/0711/Robert-Mugabe-s-racial-d...

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

प्रकाटाआ

रीपीट प्रतिसाद
प्रकाटाआ

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

असो

फायरिंग स्क्वाड, देशाबाहेर जाणार्‍यांची कत्तल, समलैगिकांचं पर्सेक्युशन हा सर्वसमावेशक अजेंडा नाही.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

फायरिंग स्क्वाड

फायरिंग स्क्वाड

Below is a photograph of a firing squad victim being blindfolded by a young Raul Castro. It’s important to note that Raul the current Cuban dictator who is often touted as a soft-hearted and pragmatic man

1

http://www.therealcuba.com/?page_id=55

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

त्याउलट कॅस्ट्रो-गव्हेरा

त्याउलट कॅस्ट्रो-गव्हेरा पददलितांचा उद्धार करणारा सर्वसमावेशक विचार मांडत होते.

(लोळून हसत)

मनोबा - लोळुन हसणारी बाहुली टाकायला शिकवल्या बद्दल धन्यवाद.

---------
कॅस्ट्रो-गव्हेरा : ह्या जोडीतल्या एकानी दुसर्‍याला जीवे मारले ना चिंज?

ऐसी हे निष्पक्ष मुक्त व्यासपीठ आहे

ऐसी हे डाव्या उजव्या वा कुठल्याही विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधलेले नाही. कुठल्याही एकांगी विचारसरणीचा पुरस्कार ऐसीवर अधिकृतपणे होत नाही.
असे मला प्रामाणिकपणे वाटते. व हे खासगी जरी असले तरी चालक हे मुक्त विचार मुक्त संवाद विशीष्ट विचारसरणी मुक्त असे आहेत. आणि हीच या संस्थळाची ताकद आहे.
असा मला माझ्यापुरता समज आहे. व कुठलाही प्रश्न आपण निर्भयतेने विचारु शकतो यावर माझा पुर्ण विश्वास आहे. तुमच्या म्हणण्यातुन ध्वनित होतो तस हे संस्थळ मनमानी अरेरावी भुमिका घेणार प्रायव्हेट क्लब सारख ( आमची मर्जी टाइप ) नाहीच अस मला माझ्या मर्यादीत अनुभवा वावरावरुन खात्रीपुर्वक वाटते. म्हणुनच मी बिनधास्त माझ्या मनातला खटकणारा प्रश्न विचारला.
मला तोच फरक समजुन घ्यायचा आहे की इथे इंदिरा ठाकरे मोदी यांचा फोटो लागेल का ? नसल्यास का नाही ?
व्यक्तीस्वातंत्र्याचा मुलभुत मानवी मुल्यांचा संकोच प्रमाणानुसार बघितला तर या तिघांच्या तुलनेने कॅस्ट्रो ने किती प्रमाणात केला
कॅस्ट्रो या तिघांच्या तुलनेत किती जास्त वा कमी हुकुमशहा आहे
आयकॉन च जर म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे हे अधिक जवळचे मराठी माणसाचे आयकॉन ( अनेक मराठी तरुणांना आत्मविश्वास आत्मसम्मान इ. इ. ) कॅस्ट्रोच्या तुलनेत कमी कसे ? (आपण सर्व मराठी माणसे व मराठीचा आग्रह धरणारे इ. धरुन का नाही ?

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

माझे सुलभीकरण :असे वाटते कि

माझे सुलभीकरण :असे वाटते कि गल्लीतल्या मोठ्या दादाला बिनधास्त दगड हाणून , त्याला न भिता खुन्नस देणारा छोटू जसा पॉप्युलर होऊन राहतो तसं हि काहीसं असावं. ( रोमँटिक ऑरा का हा विषय वेगळा आहे.तो पुन्हा केव्हातरी) इतर बरेच असावे , आहेच .. पण ते इतरांकडून ऐकायला आवडेल .

मारवा - तुम्ही ऐसीवर नविन

मारवा - तुम्ही ऐसीवर नविन आहात का?

तरी बरे ५ मार्च १९५३ ला ऐसी नव्हते.

डोक्यावरुन गेल राव ! काहीच कळल नाही

मारवा - तुम्ही ऐसीवर नविन आहात का?

तरी बरे ५ मार्च १९५३ ला ऐसी नव्हते.

जरा गाठी सोडुन सांगितल तर कळेल तारखेचा संदर्भ पण नाही कळला.
प्लीज एलाबोरेट

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

स्टॅलिन मेलाय म्हणे त्या

स्टॅलिन मेलाय म्हणे त्या दिवशी.

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

फुकटची चौकशी- स्टॅट्स

ऐसीवर कुठला आयडी किती अ‍ॅक्टीव आहे, किंवा महिन्याचे टॉप पोस्ट कुणी टंकले किंवा सर्वाधिक लेख कुणी लिहिले
-असल्या चांभारचौकशा तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत काय?

होय बहुदा.

होय बहुदा.

लॉग्ज साठवले जातात, ते नीट चाळून घेतले तर समजेलही. चाळणी लावून कधी पाहिलेलं नाही. टॉप पोस्ट म्हणजे काय याच्या व्याख्येवर अवलंबून आहे. सर्वाधिक लेख कोणी लिहीले याची चळत लावायची सोय केलेली नाही; पण सहज करता येईल (असा अंदाज आहे.). सगळ्यात जास्त क्लिक कोणी केलं ही यादी आपोआप गाळून मिळते.

अस्वला, तुझा दरवेशी तुला काय विदा खायला घालतो काय?

---

इथे प्रतिसाद दिलेला आहे म्हणून अधिकची माहिती -

टचस्क्रीनवाल्या फोनवरून खरडवही उघडताना चुकून लॉगाऊट होत असल्याची तक्रार आली होती म्हणून लॉगाऊट बटण 'महत्त्वाचे दुवे' या भागात सगळ्यात खाली हलवलं आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उगीच जरा....

गुगल ग्रूप्सवर अशी माहीती आहे, म्हणून म्ह्टलं इथेही आहे का बघूया!
विद्यापेक्षा सांख्यिकी (पक्षी: नसत्या चौकशा) मध्ये जास्त रस आहे (दात काढत)

आजचे चित्र

आजचे दर्शनी पानावरचे 'अलीबाबा'चे रेखाचित्र मस्तच आहे, फारच आवडले. ऑब्रीच्या रेखाचित्राची दखल घेतल्याबद्दल आभार.

तारांकित विषयी

तारांकित ह्या सदरात ज्या लेखांना ५ तारे मिळाले आहेत, ते लेख दिसताहेत.
ह्यात थोडी गडबड जाणवली
१. काही लेखांना एकाच ऐसीकराकडून ५ तारे मिळाले आहेत, तरी असा लेख तारांकितमध्ये दिसला, जे पटलं नाही.
२. कदाचित हा सगळ्याच संस्थळांसाठी प्रश्न असू शकेल - पण ऐसीवर येऊन गेलेले दर्जेदार (सर्वांना आवडलेले/ संपादकांना आवडलेले) लेख एकत्रित करता येतील का? हे खूप मस्त होईल, almost like a showcase full of trophies on the front page.
तारांकित ह्या सदरात जर असे लेख टाकता आले तर?

कुठंय

कुठंय हे तारांकित सदर?

महत्त्वाचे दुवे

लॉगिन केल्यावर
महत्त्वाचे दुवे
-> लेखन करा
-> तारांकित

असं दिसतं मला

ओके

मिळाले. धन्यवाद.

तारांकित मध्ये गेल्या दोन

तारांकित मध्ये गेल्या दोन आठवड्यांतले अधिकतम तारका मिळालेले (ताजे, चांगले) धागे एके काळी दिसत असत. सध्या ते काही कारणाने सर्व इतिहासातले दिसतात. पुन्हा एकदा तपासून बघतो.

'निवडक' मध्ये जाऊन पहा. दर महिन्याप्रमाणे तारकानुरुपच निवडलेले असतात, पण फक्त पाचवाले दिसत नाहीत. दर महिन्याला सुमारे शंभर लेख येतात. त्यापैकी चाळीसेक धागे, ज्यांना चारपेक्षा अधिक तारका मिळालेल्या आहेत, ते दिसतात. त्यामुळे त्यातले वरचे काही चाळले तर निश्चितच त्या महिन्यातलं चांगलं लेखन दिसावं.

'ऐसीवरील सर्वोत्तम' अशी जनरल कॅटेगरी करण्यापेक्षा '२०१३ सालचे सर्वोत्तम विनोदी', '२०१३ सालचे सर्वोत्तम ललित' वगैरे करणं सोयीचं होईल. ते तसं करता यावं यासाठीच तारका देणं सुरू केलं होतं. जितके लोक जास्त तारका देतील तितकी ही पहिली चाळणी म्हणून उपयुक्त होईल. तुम्हाला जर एखादा लेख ५ तारकावाला, एकानेच तारका दिलेला दिसला, तर जरूर अजून एक मत नोंदवून लेखाला योग्य तारका देण्याचा प्रयत्न करा. हेच उलट्या बाजूनेही लागू आहे. जर एखादा चांगल्या दर्जाचा लेख कमी तारका मिळालेला, कमी जणांनी मतं दिलेला दिसला, तर जरूर तुमचं मत नोंदवा.

योग्य आहे..

ही "निवडक" ची आयडिया चांगली आहे. वापरून बघेन.
+१ to तारे - बरेचदा लेखांना प्रतिक्रिया दिसतात पण तित्क्या प्रमाणात तारे दिसत नाहीत. आता द्यायला सुरूवात करीन म्हण्टो!

संगीतबद्ध केलेली आरती

संगीतबद्ध केलेली आरती प्रभूंची एक कविता मुखपृष्ठावरून ऐकता येईल.

दूव्यात गडबड आहे काय? दिसत नाहीये.

दर्शनी पानावरचे गाणे

तो दुवा चालत नसल्यास इथे तेच गाणे ऐकता येईल. फक्त गायिका उत्तरा केळकर आहेत.
तसेच इथे मोडकांची बरीच गाणी मिळतील.

गायिका

>> फक्त गायिका उत्तरा केळकर आहेत. <<

'आठवणीतली गाणी'वरची माहिती चुकीची आहे. साउंडक्लाउडवरचा दुवा माझ्याकडे चालतोय. ते गाणं खुद्द आनंद मोडकांनीच साउंडक्लाउडवर चढवलेलं आहे आणि त्याच्या गायिका माधुरी पुरंदरे आहेत असं त्यांनीच म्हटलं आहे. मोडकांनी संगीतबद्ध केलेल्या आरती प्रभूंच्या आणखी काही कविता आणि नंदू भेंडेसोबत त्यांनी केलेलं मराठी पॉपसुद्धा तिथे आहे. गेल्या वर्षी त्यांनी 'लोकसत्ता'त सदर लिहिलं होतं. त्या अनुषंगानं ही गाणी त्यांनी चढवली असावीत, कारण त्यांच्या चित्रपटगीतांसारखी ती इतरत्र सहज सापडत नाहीत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गायिका : केळकर की पुरंदरे

'आठवणीतली गाणी'वरची माहिती चुकीची आहे.
................साउंडक्लाउडवरचे गाणे मी ऐकले आहे आणि त्या गायिका माधुरी पुरंदरेच आहेत याबद्दल मला अजिबात शंका नाही. मात्र हे ध्वनिमुद्रण एखाद्या कार्यक्रमात मुद्रित केल्यासारखे वाटते. 'आठवणीतली गाणी'वरील गाण्याचे ध्वनिमुद्रण वेगळे आहे (उदा. पार्श्वसंगीतात सारंगी नाही) आणि अधिक जुने (मूळ) वाटते. तसेच आवाजावरून तरी गायिका उत्तरा केळकरच (आणि माधुरी पुरंदरे नाही) आहेत, असे मला वाटते. ही दोन वेगळी ध्वनिमुद्रणे असल्याने माहिती चुकीची नसावी असे सकृद्दर्शनी वाटते आहे.
'आठवणीतली गाणी'च्या संस्थापिका/व्यवस्थापिका अलका विभास यांना मी विचारणा केली आहे. त्यांचे उत्तर आल्यावर कळवेन.

बरोबर

'आठवणीतली गाणी'वरचं ध्वनिमुद्रण ऐकलं. तुम्ही म्हणता ते बरोबर असावं. (गाण्यात काही जान नाही!)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद, कॉम्बिनेशन भारी होतं

धन्यवाद, कॉम्बिनेशन भारी होतं म्हणून ऐकावं वाटलं.

random आर्टिकल

विकिपिडिया वर ज्याप्रमाणे "random आर्टिकल" असते, तसे ऐसीच्या मुखपृष्ठावर टाकता येइल काय?
सर्व लेख हे शेवटी नोडस असल्याने तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य असावे असा अंदाज आहे.

होकुसाई

माउंट फुजीचे चित्र उत्तमच आहे, त्यातल्या धुरात ड्रॅगनचा होणारा भास आणि रंगनिवड जबरदस्त आहे. उकिजोए किंवा वुडब्लॉक प्रिंट् शैलीचे हे चित्र 'Thirty-Six Views' ह्या मालिकेतले एक आहे, होकुसाईने त्याच्या फुजी पर्वताच्या प्रेमातून फुजीची/फुजीवरुन वेगवेगळ्या कोनतुन ३६(किंवा अधिक) चित्रे काढली.

होकुसाईचे हे अजुन एक चित्र, हे बहुदा अनेक जणांनी पाहिले असेल.

'ऐशा रसां ऐसे रसिक...' या

'ऐशा रसां ऐसे रसिक...'
या दर्शनी पानावरच्या विभागातून असलेल्या लिंक्स सध्या त्यातल्या चालू धाग्यांवर (भागांवर) न जाता जुन्याच धाग्यांवर (कुठल्याशा आधीच्या भागांवर) जात आहेत. त्या लिंक्स योग्य धाग्यांवर जायची व्यवस्था होऊ शकली तर बरीच सोय होईल. धन्यवाद.
(उदरभरण नोहे मध्ये काही लिहावं वाटलं पण चालू असलेल्या भागाचा शोध घ्यावा लागला तेव्हा हे लक्षात आले.)

सूचना

सूचना महत्वाची वाटली. मीही हेच सांगणार होतो.
बादवे, अशा धाग्यांची कल्पना आवडली. एकदीच एकोळी धाग्यांचा, लिंकांचा वर्षाव होण्यापासून असे धागे संस्थळाला वाचवतात.
चर्चा वाढलीच, तर ती वेगळी काढता येतेच. इथले हे वैशिष्ट्य आपल्याला लै आवडते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद! नक्की हेच सांगायचे

धन्यवाद! नक्की हेच सांगायचे होते पण विसरून गेलो होतो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

धन्यवाद!

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दुवे अद्ययावत केले आहेत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डोरोथी लँज

डोरोथी लँज या छायाचित्रकाराच्या जन्मदिनानिमित्त (२६ मे) तिनं काढलेलं एक छायाचित्र मुखपृष्ठावर दिलं आहे

तिचं 'ग्रेट डिप्रेशनचं' हे छायाचित्र प्रसिद्ध आहे.