Skip to main content

गंगा शुद्धीकरण -एक शिवधनुष्य

पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन!

प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .

या महाकाय प्रकल्पातील मोठी आव्हाने-

१, गंगा किनार्यावर असणार्या प्रदूषणकारी प्रकल्पांचे विस्थापन

२, साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर गंगेचे दोन्ही काठ कॅनॉल प्रमाणे बांधून दोन्ही तीरावर मोठी गटारे बांधणे

३, धार्मिक व अन्य कारणामुळे होत असलेले प्रदूषण रोखणे , ज्यात मॄतदेह गंगेत फेकणे / गंगाकिनारी प्रेत जाळून राख नदीत फेकणे इत्यादी गोष्टी ना(श्रद्धा न दुखावता) पर्यायी व्यवस्था निर्माण करणे

४,वाराणसी व गंगा किनारी राहणार्या रहिवाश्यांचे प्रबोधन करून गंगा शुद्धीकरण व स्वच्छता नियमांचे महत्त्व पटवणे , ज्यायोगे भविष्यातही गंगा शुद्ध राहिल .(असे नको की वारेमाप पैसा खर्च करून सरकारने गंगा स्वच्छ आणि शुद्ध करायची आणि लोकानी पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत पुन्हा अशुद्ध करायची )

५, वाराणसी ते कोलकाता एवढ्या प्रचण्ड अन्तराच्या भागावर ही योजना राबवणे व त्यासाठी आवश्यक त्या प्रचंड खर्चाची तरतूद करणे / कामाचा दर्जा उच्च राखणे

अशी अनेक आव्हाने आहेत . तरीही काल वर्तमान-पत्रात आलेल्या या बातमीने मन हरखून गेले -

http://timesofindia.indiatimes.com/india/A-waterway-from-Varanasi-to-Ko…

अशी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्या महापुरुषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम!

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!

तसेच यातून गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर होत असलेला प्रचंड खर्च देखिल वसूल होईल अशीही शाश्वती वाटते!

आपणास काय वाटते?

मंदार कात्रे Tue, 10/06/2014 - 19:46

हा अतिभव्य प्रकल्प राबवण्याचे मनावर घेतल्याबद्दल मोदीजींचे आभार अन अभिनन्दन!

राही Tue, 10/06/2014 - 23:29

गंगेमध्ये मालवाह्तूक आधीपासूनच होते आहे. गंगा मुखापासून जवळजवळ अलाहाबादपर्यंत नॅविगेबल आहे. कलकत्त्यापासून पुढे मुखापर्यंत भरती-ओहोटीच्या प्रवाहावर वाह्तूक होते. समुद्री जहाजे १४०कि.मी.पर्यंत आत येतात. पुढे भागीरथीमध्ये फराक्का बंधार्‍यातील पाण्याद्वारे वाहतूकयोग्य अशी जलपातळी राखली जाते. फराक्काच्या पलीकडे गंगेच्या मुख्य प्रवाहात इन्लँड जहाजे वहातूक करतात. हे सर्व विकीवर आहे.

ऋषिकेश Wed, 11/06/2014 - 14:02

एकुणच नदी जोड प्रकल्पाचा उत्तम उहापोह करणारा हा लेख आजच्या डीएनएमध्ये आला आहे. नुसटी टिकाच नाही तर फायदे, टिका, संभाव्य आव्हाने, सामाजिक पडसाद आदी विविध अंगाने ही चिकित्सा आहे.