.
.
शिया घराणेशाहीने धर्मगुरु
शिया घराणेशाहीने धर्मगुरु ठरवतात आणि सुन्नी तसे करत नाहीत. बरोबर?
साधारणत: होय.
शिया हे पैंगबराचा जावई मुहम्मद व चुलत भाऊ अली यांना पैगंबराचा अधिकृत उत्तराधिकारी समजतात. तर सुन्नी मंडळी पैगंबराचा उत्तराधिकारी असणेच नाकारतात.
तसा क्याथलीक आणि प्रोटेस्टंटमधे मुख्य फरक काय?
रोमन चर्च (पोप) ला मानणारे ते कॅथलिक्स (पोप सर्वोच्च व त्याची वाणी हा देवाचा आदेश वगैरे) आणि रोमन चर्चला न मानता व फक्त येशूला मानणारे व बायबलमधील आपले इंटरप्रिटेशन अंतीम मानणारे, ते प्रोटेस्टन्ट्स. हे अगदी वरवरचे वर्गीकरण झाले.
हे वाचा ...
ह्या लेखातून (आणि धम्मकलाडू यांच्या प्रतिसादातून) काही माहिती मिळेल! ;)
ता.क. ही झैरात नै ;)
युकरिस्ट
प्रोटेस्टंट सुधारक चळवळ अनेक स्थानिक युरोपीय राजकीय कारणांमुळे, आणि पुढे छापखान्यांसारख्या तांत्रिक कारणांमुळे पसरली.
पण कॅथलिक चर्च मधे फूट पडण्यास एक महत्त्वाचे तात्त्विक कारण "Transubstantiation" या संकल्पनेचा अर्थ होता. चर्च सर्विसच्या अखेर दिल्या गेलेल्या युकरिस्ट मधे (ब्रेड आणि वाइन मधे) येशू ख्रिस्टाच्या शरीराचे आणि रक्ताचे खरे अंश असतात हे मानावे की नाही, हा त्यातला मूळ प्रश्न. मार्टिन लूथर इत्यादी विचारवंतांनी चर्चने या संकल्पनेच्या लावलेल्या अगदी शब्दशः अर्थाला विरोध केला, आणि आजही अनेक प्रोटेस्टंट पंथांतील (प्राथमिक) फरक या संकल्पनेच्या अर्थछटांवर आधारित आहेत.
या पोटजातीही खंडीभर असाव्यात.
या पोटजातीही खंडीभर असाव्यात. १९व्या शतकात लै फेमस झालेल्या मॉर्मन पंथीयांची केस तर हैटच आहे. त्याचा संस्थापक ब्रिघॅम यंग याला २७ बायका होत्या. त्याच्या लाष्टच्या बायकोने 'द २७थ वाईफ' नामक पुस्तक लिहिलेले आहे. या ब्रिघॅम यंगला प्रख्यात साहसवीर रिचर्ड बर्टन त्याच्या अमेरिकावारीदरम्यान भेटला होता.
तदुपरि-८वा हेन्री म्हंजे इंग्लंडच्या फेमसवाल्या एलिझाबेथ राणीचा बाप तोच ना तो?
मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील विविध पंथ
वरती उल्लेख असलेले :-
कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन , प्रेसबिटेरिअन्स, मेथडिस्टस्, इव्हेंजिलिकल्स , ह्याव्यतिरिक्त भारतातील सिरियन ख्रिश्चन,
मध्य पूर्वेत असणारे किमान काही मिलियन ख्रिश्चन (ह्यांचे पुन्हा अनेकानेक प्रकार आहेत; पण आज प्रामुख्याने जो श्रिश्चन धर्म आपल्याला
भारतातून दिसतो, ते मूळचा ख्रिश्चन धर्म + विविध युरोपिअन(ग्रीको-रोमन ते अगदि स्कॅन्डिनेव्हिअन,) चालीरिती असं एकत्रित कॉकटेल आहे.)
भारतीय सिरियन व मध्यपूर्वेतले ख्रिश्चन हे चालीरिती वगैरेनुसार बरेच वेगळे आहेत.
तिकडे रशिया वगैरे भागातला इस्टर्न ऑर्थॉडॉक्स हा ख्रिश्चन धर्माचा अजून एक फ्लेवर.
बॅट्या म्हणतो तसं मॉर्मन काय किंवा येशू अमेरिका खंडात मान्वतेचा संदेश देउन गेला असे मानणारे later day saints काय
लै व्हरायटी आहे.
तिकडे दक्षिण अमेरिकेत कॅथलिक म्हणवून घेणार्या गैरयुरोपीय ख्रिश्चनांच्या पद्धतीत तिथल्या कोलंबसपूर्व पद्धतींचा प्रभाव दिसतो म्हणतात.
ह्या सर्वा व्यतिरिक्तही इतर शेकडो प्रकार असणारच. काही शे कोटी अनुयायी आहेत म्हटल्यावर तर किमान काही शे पंथ , उपपंथ
असणं शक्य आहे.
मुस्लिम :-
शिया - सुन्नी इतकं ऐकून ठाउक असतं. पण पुन्हा शियांतही twelvers shiyaa वगैरे उपपंथ आहेत.
कट्टर वहाबींमधले काही स्वतःची ओळख इतरांपेक्षा पूर्ण वेगळी (शुद्ध!) सांगतात/मानतात.
एक अगदि बारकासा प्रवाह म्हणजे भारत-पाक मधला अहमदिया पंथ.
बहुतेक पाकिस्तानमध्ये "अहमदिया हे मुस्लिम नाहित" असा काहीतरी नियम आहे म्हणे!
ह्याही बाबतीत तेच. अनेकानेक प्रवाह असणारच.
अधिक माहिती कुणी देउ शकला तर बरं होइल.
द्रूझ आचारविचारानं मुस्लिमच वाटतील; पण त्यांना मुस्लिम म्हणायला गेलात तर इतर मुस्लिम तुमच्या अंगावर धावून येतील!
द्रूझ हा मुस्लिमातलाच उपप्रकार आहे का स्वतंत्र धर्म आहे नक्की कल्पना नाही.
ह्याशिवाय काही वांशिक्-सांस्कृतिक भिन्नतेमुळे आलेल्या गोष्टी पब्लिकला ठाउक असतीलच.
उदा :- इंदोनेशियातले हिंदू संस्कृतीचा प्रभाव असणारे मुस्लिम, पठाण , बोहरी ह्या लोकांची धार्मिक कमी आणि वांशिक ओळख
अधिक ठळक असणं वगैरे.
संपूर्ण प्रतिसादाचा थोडक्यात सारांश :-
विषय लैच मोठा आहे. मला त्यतली काहिच कल्पना नाही.
त्यामुळे प्रतिसाद वाचला नाहित तरी चालेल. ;)
आख्ख्या
आख्ख्या जगातील प्रमुख मुस्लिम देशात इराण हाच काय तो शियाबहुल आहे.
इतर सर्व प्रमुख देशात शिया हे अल्पसंख्य आहेत.
इराक बद्दल मला खात्री नाही .
(तिथे दोन्ही लोक comparable संख्येने असावेत. एक अगदिच खूप मोठा आणि दुसरा अगदिच लहान गट असे तिथे नाही.
( टक्केवारीमध्ये ९५-५,९०-१०, ८०-२० असे नाही.)बरेचसे भारतीय उपखंडातल्या एकूण हिंदु-मुस्लिम संख्येसारखे.)
इराण हा शियाबहुल आहे. तसा
इराण हा शियाबहुल आहे. तसा इराकही शियांचे प्राबल्य असलेलाच आहे. करबला हे स्थान तिथेच आहे. दक्षिण इराकमध्ये शियांची खूप धर्मस्थळे आहेत. मात्र इराकमध्ये शियांचे निर्विवाद बहुमत नाही.
इराणची सुद्धा एक गंमत आहे. अरब टोळयांनी पर्शिया जिंकल्यावर तिथे इस्लाम हळूहळू पसरला. त्यामागे अनेक कारणे आहेत. पण सुरूवातीला सुन्नींचेच प्राबल्य होते. पर्शियन्स मुस्लिम झाले तरी अरबांनी आपली संस्कृती धुळीला मिळवली ही सल त्यांच्या हृदयातून गेली नाहीच. (ती आजही गेली नाहीये. कुठे तरी ही जखम खोलवर जाऊन बसली आहे.) त्यामुळे बहुसंख्येने सुन्नी असलेल्या अरबांच्या विरोधात एक स्टेटमेंट म्हणून शिया पंथाचा प्रसार इराणमधे झाला. अरबांपासून आपले वेगळेपण राखण्याच्या महत्त्वांकांक्षेचा तो एक भाग होता.
अरबांनी आक्रमण करायच्या अगोदर
अरबांनी आक्रमण करायच्या अगोदर इराणमध्ये 'जरथुश्त्री' अर्थात आज ज्याला आपण 'पारशी' म्हणतो तो धर्म होता.
आपण ज्यांना पारशी म्हणतो ते लोक इ.स. ८००-९०० च्या आसपास कधी तरी इकडे आले. पहिल्यांदा गुजरातेत संजाण इथे आले. त्याबद्दल किस्सा-इ-संजाण नामक कविताही उपलब्ध आहे.
अन "पूर्वीचं(इस्लामपूर्व) इराण राहिलं नाही" ही रड किमान १००० वर्षे जुनी आहे. याचा पहिला उद्गाता शाहनामाकार फिरदौसी मानला जातो.
तदुपरि अरब हे बहुसंख्य सुन्नी म्हटले तरी त्यांतही शिया अरब आढळतातच. इतकेच कशाला, 'अरब ख्रिश्चन' नामक प्रकारही अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे पंजाबी लोक हे मुसलमान, हिंदू व शीख सर्वच असतात त्याचप्रमाणे. धर्मबिर्म सोडून पंजाबी नामक आयडेंटिटी कॉमन असते तद्वतच इथेही प्रकार.
+१
+१
किंचित दुरुस्ती :-
पंजाबी ऐवजी जाट हा शब्द अधिक शोभून दिसेल.
जाट वंशातील लोक हे मुस्लिमही आहेत; काही हिंदू आहेत; काही जाट शीखही आहेत.
यप्स. अरब वंशाचे ख्रिश्चन अरबस्थानात खूपच कमी संख्येने (फक्त काही लाख) असले, तरी आहेत हे खरे.
शिया अरब प्रामुख्याने आहेत ते अरबस्थानाच्या किनारपट्टीच्या आसपास.
नेमक्या तेलविहीरीही इथेच सर्वाधिक आहेत म्हणे.
"माझे कित्येक मुस्लिम मित्र
"माझे कित्येक मुस्लिम मित्र "अरे वो 'अॅक्च्युअली' मुस्लिमही नहि है" असा दावा करतात. त्यात सुन्नी मित्रही आले नी शियासुद्धा. म्हणून हे काय प्रकरण आहे समजेना."
कित्येक हैद्राबादी सुन्नी मित्रांकडून शियांबद्दल कैच्याकै ऐकले आहे. मनोरंजन झाले. शिया मुस्लिमच नाहीत, हिंदू परवडले, उघडपणे गैरमुस्लि आहेत, पण शिया हे छुपे शत्रू आहेत. घरभेदी आहेत. ते हराम आहेत. मातम मनवून झाल्यानंतर श्रमपरिहार म्हणून वाट्टेल ते चाळे चालतात (उदा. एकमेकांच्या बायका शेअर करणे वगैरे). माझ्याशी खूप चांगले वागणारे सुन्नी मित्र शिया म्हणलं की अक्षरश: शून्य मिनिटात पसार व्हायचे. माझा एक शिया मित्र सौदी अरेबियामधे तब्बल पाच वर्षे सुन्नीचे सोंग घेऊन राहिला. त्यामुळे त्याला बायकोला तिथे नेता आले नाही, कारण मग सोंग वठवणे अजून अवघड झाले असते. या पाच वर्षात त्याला ऑफिसमधील इतर सहकार्यांसोबत नमाज पढायला जावे लागायचे. अर्थातच, सुन्नी मशिदीत. (सौदी अरेबियात शिया मशिदी सहसा दिसत नाहीत. परवानगीच नाही. देशाच्या पूर्व भागात शियाबहुल भाग आहेत तिथेच काय त्या तुरळक दिसतात.) सुन्नी मशिदीत जाऊन नमाज पढणे शक्यतो टाळायचा तो. पण बहुतेकदा जावेच लागायचे. त्यामुळे होणार्या यातना तो माझ्याजवळ बोलून दाखवायचा. धार्मिक छळाची चुणूक फार जवळून बघायला मिळाली. असो.
अवांतर
मशिदीकडे बघून सुन्नी मशीद की शिया मशीद हे कळते कसे? की ऐकून समजते-"तिकडे फक्त सुन्नी-इकडे फक्त शिया" इ.इ. असे काहीसे?
माझ्या दोन मुसलमान मित्रांना हा प्रश्न विचारला असता फरक काय नसतो असेच उत्तर आले. सुन्नी मशिदीत जमणारे सुन्नी अन शिया मशिदीत जमणारे शिया इतकाच काय तो फरक. तदुपरि मक्केच्या दिशेस असलेली कमान, असलाच तर मिहराब, अन बाकीची हिरवट कलरची रंगसंगती अन बाकी सर्व अगदी आहे तस्से.
आँ?
१९९२चा दंगा शांत झाल्यावर काहीकाळाने ऐकण्यात आले की काही राष्ट्रवादी म्हणवणार्या मुस्लिमांनी राम मंदिरास
पाठिंबा दिलाय. हे असे कसे ? ह्या प्रश्नाचा शोध घेतल्यावर ऐकण्यात आले की मशीदीवर/मशीदीच्या जागेवर दावा/श्रद्धा
सुन्नी वक्फ बोर्डाची आहे. राम मंदिरास होकार देणार्या मुस्लिमांना काय जाते होकार द्यायला? ते साले सारेच शिया!
थोडक्यात, माझ्याकडील ऐकिव माहिती ही तुमच्या अगदि उलट आहे.
मशिदीच्या बांधणीत किंवा
मशिदीच्या बांधणीत किंवा दिसण्यात असा फारसा फरक नसतोच. मशिदीचे व्यवस्थापन मात्र शिया अथवा सुन्नी मंडळींकडे असते.
पण मुख्यत्वे फरक असतो तो कर्मकांडात.
शिया मशिदीत अझान थोडी वेगळी असते. शिया लोक नमाझ अदा करताना डोके टेकायचे असते (ज्याला सज्दा म्हणतात) तो करताना समोर एक छोटासा दगड ठेवतात आणि त्यावर डोके टेकतात. सुन्नी व शिया दोन्ही मतांनुसार थेट मातीवर डोके टेकवता येते. पण सुन्नींमधे रग अथवा सतरंजीवर डोके टेकवलेले चालते. शिया मात्र आवर्जून छोटा दगड समोर ठेवून त्यावरच डोके टेकवतात. लाकूडही चालते. कित्येक शिया खास करबलाच्या मातीने बनवलेले फरशीचे तुकडे वापरतात. नमाझ पढताना हात कसे ठेवायचे याचेही निय्म वेगळे आहेत. (हे नियम सुन्नींच्या विविध धर्ममतांनुसारही वेगळे आहेत. माझा एक सुन्नी मित्र मला बाहेर गाडीत बसवून मशिदी नमाझाला गेला. मशिदही सुन्नीच होती. त्याला बाहेर यायला वेळ लागला. कारण विचारले तर म्हणला की, नमजह झाल्यावर तिथल्या इमामने त्याचे तौर तरिके कसे चुकीचे आहेत यावर लेक्चर दिले. काय चुकत होते असे विचारले तर म्हणला की उभे राहिल्यावर हात छातीवर न ठेवता खाली मांड्यासमोर एकत्र आणुन उभा राहत होता तो. त्यावरून अर्धा तास प्रवचन मिळाले.)
अजून एक म्हणजे, अरबी लोकांच्यात डोक्यावर जे कापड असते, ते सुन्नी लोक सहसा लाल चौकड्यांचे किंवा पांढरे वापरतात. शिया लोक बव्हंशी काळ्या चौकड्यांचे किंवा पांढरे कापड वापरतात. सुन्नींमधे दाढी वाढलेली / कधी न कापलेली अशी बघायला मिळते. शियांमधे दाढी व्यवस्थित ट्रिम वगैरे केलेली दिसते सहसा. दिसण्यावरून शिया की सुन्नी हे अंदाजे लक्षात येऊ शकते. नावांवरूनही. फॅमिली नेम्सही वेगळी असतात.
हॅ हॅ हॅ
म्हणला की उभे राहिल्यावर हात छातीवर न ठेवता खाली मांड्यासमोर एकत्र आणुन उभा राहत होता तो. त्यावरून अर्धा तास प्रवचन मिळाले.)
हॅ हॅ हॅ. आम्हाला वआतलं गंध उभं लावायचं की आडवं ह्यावर वितंडवाद घालणारे आम्हीच काय ते आहोत.
शियांमधे दाढी व्यवस्थित ट्रिम वगैरे केलेली दिसते सहसा. दिसण्यावरून शिया की सुन्नी हे अंदाजे लक्षात येऊ शकते. नावांवरूनही. फॅमिली नेम्सही वेगळी असतात.
नावांवरुन ओळखता येते असे ऐकले होते. दिसण्यावरून ओळखता येत असेल तर कमाल आहे!
कट्टर नमाझी
शिया लोक नमाझ अदा करताना डोके टेकायचे असते (ज्याला सज्दा म्हणतात) तो करताना समोर एक छोटासा दगड ठेवतात
नमाझ अदा केल्यामुळे कपाळाला एक काळ्या रंगाचा डाग पडतो, ते जरा भारी समजले जाते म्हणजे कट्टर वगैरे. त्यामुळे बळेच तो डाग पाडून घेणारे असतात असे वाटते. हे खरे का?
मशिदीच्या बांधणीत किंवा
मशिदीच्या बांधणीत किंवा दिसण्यात असा फारसा फरक नसतोच.
असे असेल तर खुद्द मुसलमान लोकांना नव्या गावी गेल्यावर समोर दिसणारी मशीद कोणती हे कसे कळते? नव्या गावात चुकून शिया - सुन्नी एकमेकांच्या मशीदीत गेले तर त्यांना काय ट्रीटमेंट मिळते?
चर्चांवर अनेकदा सपष्ट लिहिले तरी असते
विषय निघालाच आहे म्हणून -
विषय निघालाच आहे म्हणून -
'माय बिग फॅट ग्रीक वेडिंग' बघितल्यामुळे कधीचा प्रश्न पडला होता. एका पंथातले लोक दुसऱ्या पंथातल्या लोकांना "चालत नाहीत" असा प्रकार नक्की काय असतो? अर्थात हा प्रकार आपल्या जातींसारखा नसल्यामुळे एकाचं दुसऱ्या पंथात जाणं सोपं असतं. युरोपमध्ये जिथे जिथे पाहिलं तिथे साधारण एका रस्त्यावर एक किंवा दोन प्रकारची चर्चं दिसली. अमेरिकेत बऱ्याच पंथांची चर्चं (बाप्टीस्ट, मेथॉडिस्ट, सदर्न मेथॉडिस्ट, प्रेसबिटेरियन, ल्यूथेरन) दिसतात. त्यांची आपसांत काही मारामारी (किंवा असा काही मनोरंजक प्रकार) असतो का? का या लोकांचा राग फक्त नास्तिकांवरच असतो?
.
आज एकवीसाव्या शतकात अमेरिकेसारख्या ठिकाणी मेथॉडिस्ट वि बॅप्टिस्ट वगैरे हाणामार्या होत नसाव्यात. आणि त्यांच्यातले फरक मुख्यतः तात्विक असावेत. त्याफरकामुळे रोजच्या आचार-व्यवहारात फरक पडत नसेल तर एरवी त्यांच्यातले वितुष्ट दिसून येणारही नाही.
एक आठवणः एकदा रात्री ठाण्याला ट्रेनने उतरल्यावर एका महिलेने आसपास चर्च आहे का अशी विचारणा केली. तिला पुढे कुठेतरी जायचे होते पण आजची रात्र चर्च मध्ये घालवण्याचा तिचा विचार होता. ती कोणत्या प्रकारची ख्रिश्चन होती हे ठाऊक नाही पण मला ठाउक असलेल्या सर्वात जवळच्या चर्चचा 'सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्चचा' पत्ता सांगितल्यावर बॅप्टिस्ट चर्च असे ऐकल्यावर तिचा चेहरा थोडासा उतरल्याचे स्पष्ट आठवते.
तू उल्लेखिलेल्या बहुतेक
तू उल्लेखिलेल्या बहुतेक प्रोटेस्टंट पंथांची सुरुवात एखाद्या तात्त्विक फाट्याने झाली. काहींच्या अनुयायींना कमीअधिक प्रमाणात युरोपात राजकीय त्रास सोसावा लागला, आणि अमेरिकेत पुढे स्थलांतर झालं. हा ढोबळ इतिहास असला तरी प्रत्येकाच्या वाढीत आचार-विचारांमधे फरक आहेत. अमेरिकेत स्थल-कालाप्रमाणे "चालत नाही" चा कर्मठपणा कमीअधिक जाणवतो. म्हणजे दक्षिणेकडे बॅप्टिस्ट आणि लूथरन यांच्या तात्त्विक फरकासहित दैनंदिन सामाजिक व्यवहारातही पंथाला महत्त्व असावे. बॉस्टन मधे आइरिश आणि इटॅलियन कॅथलिकांमधे ही बरेच काही "चालत नाही", पण काँग्रेगेशनललिस्ट, प्रेस्बिटेरियन आणि लूथरननांमधे फारसा फरक जाणवणार नाही.
वर नावं तीच असली तरी युरोपात त्याच नावाच्या प्रोटेस्टंट पंथाचा, आणि अमेरिकेत स्थलांतरित त्याच्या समाजाचा इतिहास बराच वेगळा आहे, वेगळ्या राजकीय-सामाजिक संदर्भांनी घडवला गेला आहे. आता चक्क मारामार्या होत नसाव्यात, पण चर्चला मानणार्यांच्या दैनंदिन जीवनात या फरकांचे महत्त्व नगण्य मात्र नाही.
तुलना करायचीच झाली तर जातींपेक्षा कर्नाटकात स्मार्थ-माध्व यांच्यातील फरक असाच काही आहे - बोले तो एकदम सीरियस अद्वैत-द्वैत फरक, बोले तो सिर्फ आडवे कुंकू-उभे कुंकू फरक, बोले तो परिवार के प्रेफरेन्स पे रोटी-बेटी व्यवहार है भी, नहीं भी. पूजेच्या वेळेला, सणावारी लहान-सहान गोष्टींमधे फरक लक्षात येतात.
मनोरंजक प्रकारावरून आठवलं - हापिसात यूट्यूब बंद आहे, पण माँटी पायथन च्या "मीनिंग ऑफ लाइफ" सिनेमातील प्रसिद्ध प्रोटेस्टंट - कॅथलिक फरकावरचं गाणं "एवरी स्पर्म इज सेक्रेड" कोणीतरी इथे डकवा की रे.
इस्लाममधील सुन्नी व शिया हे
इस्लाममधील सुन्नी व शिया हे मुख्य पंथ आपल्याला माहित असतात. जगभरातील मुस्लिम बव्हंशी याच दोन पंथात विभागले गेले आहेत. तसे असले तरी या दोघांच्याही बाहेर बरीच मुस्लिम जनता आहे. सुन्नी, शिया व इबादी असे तीन पंथ प्रामुख्याने धरले जातात. त्यात परत द्रूझ या वांशिक गटाची भर पडते. सिरियातील अलावी या पंथाचे लोकही स्वतःची या सर्वांपासून वेगळी अशी ओळख सांगतात.
***
सुन्नी : पौगंबरांच्या निधनानंतर त्यांचे एक सहकारी अबु बकर यांनी मुस्लिम उम्माचे (उम्मा = समुदाय असा काहीसा अर्थ) नेतृत्व करावे (खलिफा व्हावे) असे पैगंबरांच्या एका ज्येष्ठ सहकार्याने, उमर इब्न अल खत्ताब यांनी सुचविले. बहुतेकांनी ते मान्यही केले. पैगंबरांचा स्वतःचा एकही पुत्र जिवीत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वारस नेमणे शक्य नव्हते. अबु बकर यांना ज्यांनी मानले ते सुन्नी. सुन्नाह या अरबी शब्दावरून हे नाव आले आहे. सुन्नाह म्हणजे पैगंबरांच्या वर्तणुकीवरून व त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबरहुकुम आपली वर्तणुक ठेवणे.
***
शिया : मात्र, काहींनी अबु बकर यांचे नेतृत्व अमान्य केले. त्यांच्या मते पैगंबरांनी जिवीत असतानाच त्यांचा चुलतभाऊ व जावई असलेल्या अली याला आपला उत्तराधिकारी नेमले होते. त्यांनी अलीचा पक्ष घेतला. या लोकांना शिया म्हणतात. अरबी भाषेत 'शि' या क्रियापदाचा अर्थ 'बाजू घेणे, सामिल होणे, पक्ष घेणे' असा काहीसा आहे. या शि वरून शिया हा शब्द आला आहे. अबु बकर खलिफा झाले तेव्हा आणि नंतरच्या तीनही खलिफांच्या वेळेस उम्मा एकजूट रहावा या कारणाने अली यांनी शांत राहून त्या त्या खलिफांना पाठिंबा दिला. मात्र चौथ्या खलिफा, उस्मान यांच्या खुनानंतर अली यांना काही गटांकडून खूप आग्रह झाल्याने त्यांनी खुले बंड पुकारले. शिया पंथ खरा इथून सुरू झाला. या बंडाला इस्लाम मध्ये फितना असे म्हणतात. नंतर काही वर्षांनी अलीचा मुलगा हुसेन व तत्कालिन खलिफा याझिद यांच्यामधे एक करबला येथे एक निर्णायक युद्ध झाले. या युद्धात शियांचा पराभव झाला. हुसेन व त्याच्या घरातील सहा महिन्याच्या मुलासकट सर्व पुरूषांची हत्या झाली व स्त्रियांना बंदी बनवले गेले. या युद्धापासून शिया सुन्नी यांच्यातले वैर सुरू झाले ते आजतागायत मिटलेले नाही. या कत्तलीच्या स्मरणार्थच मुहर्रम पाळला जातो. या वेळी जे मातम मनवले जाते ते याच शहीदांच्या स्मरणार्थ. करबलाच्या युद्धात पाण्यावाचून शिया तडफडले होते म्हणून मुहर्रमच्या वेळेस सगळीकडे पाण्याचे माठ वगैरे दिसतात. मुहर्रम हा सण नाही तर ते मातम आहे. (एकदा एका शियाला मुहर्रमच्या शुभेच्छा देणार होतो तितक्यात त्याला ते लक्षात आले व त्याने माझे प्रबोधन केले! :) )
शिया पंथिय हे तसे सुन्नींच्या तुलनेने कमी कर्मठ किंवा कडक असल्यामुळे असावे, पण सुन्नींच्या तुलनेत शियांमधे अनेक पंथ उपपंथ आहेत. शियांमध्ये इत्नाशरी असा एक उख्य उपपंथ आहे. इतनाशर म्हणजे बारा ही संख्या. अली यांच्यापासून सुरू झालेली १२ इमामांच्या मालिकेवर यांची श्रद्धा आहे. त्यांच्या मते शेवटचा इमाम अजूनही जिवंत असून अज्ञातवासात आहे. योग्य वेळी तो प्रकट होईल. इतनाशरींमधेही अनेक उपपंथ आहेत.
***
इबादी : हा पंथ बहुतेक ओमानमधेच बघावयास मिळतो. इतर काही देशांमध्ये त्यांचे तुरळक अस्तित्व आहे. या पंथाची मुळेही वारसाहक्काच्या भांडणात दिसून येतात. तिसरा खलिफा उस्मान व अली या दोघांचा संघर्ष झाला तेव्हा असेही काही लोक होते ज्यांचा या दोघांनाही पाठिंबा नव्हता. त्यांचे नेतृत्व अब्दल्लाह इब्न इबाद याच्याकडे होते. त्यामुळे या पंथाला इबादी असे नाव पडले. सुन्नी व शिया यांच्या प्राबल्यामुळे इबादींचे जगणे मुश्किल झाले व ते विखुरले. एक ओमान सोडता (व ओमानच्या अधिपत्यामुळे झांझिबारही सोडता) त्यांचे प्राबल्य कुठेही नाही. आजही ओमानमध्ये इबादींचे प्राबल्य आहे. (ओमानी लोक पैगंबरांच्या हयातीतच इस्लामच्या प्रभावाखाली आणले गेले होते. पैगंबरांच्या मृत्यूनंतर इस्लामविरूद्ध बंड करणारे ओमानीच होते. त्यांच्या बरोबरीने वाळवंटात राहणारे आदिवासी, ज्यांना बदू असेही म्हणले जाते, त्यांनीही बंड केले. पण ही दोन्ही बंडे मोडून काढली गेली. मात्र वाळवंटात अतिशय आतमध्ये राहणारे बद्दू आजही पुरेसे मुस्लिम नाहीत असे म्हणले जाते. कर्मठ सौदी अरेबियामध्ये ही बाब अतिशय हिरिरीने लपविली जाते.)
***
असे हे तीन पंथ वेगळे असले तरी इस्लामच्या प्राथमिक तत्त्वांवर त्यांची श्रद्धा आहे. शहादा (श्रद्धा), सलाह (प्रार्थना / नमाझ), झकात, साव्म (उपास / रोझे), हाज हे ते पाच पिलर्स ऑफ इस्लाम. शियामधील काही उपपंथ यांच्यातही काही बदल करतात. पण मुख्यत्वे हेच पाच असतात.
या पाच पिलर्स व्यतिरिक्त अजून एका बाबतीत बहुसंख्य मुस्लिम पंथांमधे एकवाक्यता आढळते, ती म्हणजे 'फायनॅलिटी ऑफ प्रॉफेटहूड'. मुहम्मद हेच शेवटचे पैगंबर आहेत अशी ती मान्यता. त्यांच्या आधी अनेक पैगंबर (मूळ अरबी शब्द नबी अथवा रसूल) होऊन गेले आहेत. अब्राहम (इब्राहिम) हे पहिले. त्याच मालिके मोझेस (मुसा) व जीझस (इसा) हे ही येतात व इस्लाममधे त्यांना मानाचे स्थान आहे. वारंवार पैगंबर पाठवूनही मानवजात मूळ धर्मापासून दूर जात राहिली म्हणून शेवटी मुहम्मद यांची पाठवणी झाली. आता मात्र या नंतर पैगंबर नाही. म्हणूनच हे लोक कुर'आनला फायनल टेस्टामेंट असेही म्हणतात. त्यांच्यामते गैरमुस्लिम इस्लाममध्ये कन्व्हर्ट होत नाहीत, तर रिव्हर्ट होतात.
सुन्नी पाच वेळा नमाझ पढतात तर शियांमधे पाचपैकी काही नमाझ एकत्रित करून तीन वेळा नमाझ पढण्याची पद्धत आहे. (कोणते नमाझ एकत्र करतात ते विसरलो. फझर, असर, धुहर, मघरिब आणि इशा असे पाच नमाझ असतात.)
***
या प्रमुख पंथांखेरीज द्रूझ हा एक प्रकार आहे. पण द्रूझ हा प्रकार धार्मिक कमी आणि वांशिक जास्त आहे. द्रूझ हा एक वंश आहे. त्यांनी इस्लामची काही तत्त्वे घेऊन स्वतःचाच एक धार्मिक विचार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांना इतर मुस्लिम, मुस्लिम समजत नाहीत.
***
सिरिया-लेबनॉनमध्ये अलावी हा एक प्रमुख शिया उपपंथ आहे. त्यांची संख्या लक्षणिय आहे. बहुसंख्य नाहीत पण तेथील राज्यकर्ते अस्साद कुटुंब या पंथाचे असल्यामुळे प्राबल्य आहे.
***
सुन्नींमध्ये उपपंथ असे नसतात. पण त्यांच्यात कुर'आन, हदिस, शरि'आ यांच्या इन्टरप्रिटेशनवरून निरनिराळे विचारप्रवाह आहेत. हनाफी, हनबाली, शा'फी, मलिकी असे हे चार स्कूल ऑफ थॉट्स आहेत. त्याशिवाय भारतात उगम पावलेल्या देवबंदी आणि बरेलवी या ही विचारधारा आहेत.
***
सुन्नींमधून भारतिय उपखंडातून उदयाला आलेला एक पंथ म्हणजे अहमदिया. हा पंथ एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाला पंजाबात कादियान येथे मिर्झा गुलाम अहमद यांच्या शिकवणुकीनुसार उदयाला आला. त्यामुळे त्यांना अहमदिय्या किंवा कादियानी असे म्हणले जाते. इस्लामच्या इतर पंथांपासून यांच्या वेगळेपणाचे एक मुख्य लक्षण म्हणजे ते फायनॅलिटी ऑफ प्रॉफेटहूड मानत नाहीत. आणि मुख्यत्वे याच कारणामुळे त्यांना बहुतेक मुस्लिम देशांमध्ये गैरमुस्लिम म्हणून घोषित केले आहे. त्यांना हाजला सुद्धा जाता येत नाही. त्यांच्या मशिदी वेगळ्या असतात. पाकिस्तानात तर अहमदिय्या असणे म्हणजे मृत्यूला आमंत्रणच.
***
गेल्या शतकात सौदी अरेबियात उदयास आलेला वह्हाबी (सलाफी) हा एक मुख्य पंथ. इस्लामचे अतिशय काटेकोर आणि कर्मठ इन्टरप्रिटेशन हे यांचे वैशिष्ट्य. हे लोक अतिशय कडवे, कठोर असतात. आज जगभर इस्लामच्या आधारे चालू असलेल्या दहशतवादाचे वह्हाबी विचारधारा हे एक प्रमुख कारण आहे.
***
इस्लामचे पंथ व त्यांचे आपापसातील नाते दर्शविणारा हा एक तक्ता.
व्यवस्थापकः width="" height="" हे टॅग्ज काढले आहेत
__/\__
सादर दंडवत बिका, धागा वेगळा काढताना तुम्ही, शहराजाद यांच्याकडून विशेष अपेक्षा होत्याच. आभार!
बाकी हातासरशी आता सुफी पंथावरही थोडे येऊच द्या
शिवाय या चार्टात अकबरी नावाचा पंथ दिसतोय. आपले मुघल (अकबर) सुन्नी होते, तेव्हा हे काहीतरी वेगळे असले पाहिजे. त्याबद्दल माहिती असेल तर (स्वतः विकीवर शोधत बसण्यापेक्षा मराठीतून) वाचायला आवडेलच
दुरुस्ती
अब्राहम (इब्राहिम) हे पहिले
???
अब्राहम हा प्रथम संभाव्य ऐतिहासिक एकेश्वरवादाचा उद्गाता असला तरी पहिला प्रेषित तो नाही.
पहिला अॅडम म्हणजेच आदम... त्याच्यानंतर नोहा (जलप्रलय वगैरे नंतर मानवजातीस तारणारा "मनु" सदृश कथेचा नायक) वगैरे.
आणि नंतर अब्राहम/इब्राहिम.
बाकी प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच दमदार.
इद्रिस हा इनॉक आहे बहुतेक.
इद्रिस हा इनॉक आहे बहुतेक. Enoch.
प्रत्येक प्रेषिताच्या नावाचे अरबी रूप आहेच. अॅडम = आदम, अब्राहम = इब्राहिम, जॉब = आयुब, डेव्हिड = दाऊद, मोझेस = मुसा, जीझस = इसा, सॉलोमन = सुलेमान ... इ.इ.
इद्रुस हा इद्रिसचाच अपभ्रंश असावा. अरबी भाषेत असे एक सारखे वाटणारे पण अर्थ पार भिन्न असणारे शब्द आहेतच. उदा. हरम = देवाचे घर, पवित्र حرم (मक्केतील काबा असलेल्या मुख्य मशिदीला हरम असे संबोधतात) ... हराम = निषिद्ध, अपवित्र حرام.
असाच ख्रिश्चन धर्माचा तक्ता
वरील तक्ता पाहून कानावर पडणार्या पण निश्चित अर्थ माहीत नसलेल्या संज्ञांचा अर्थ कळण्यास मदत झाली.
नेमका असाच अर्थाचा घोळ माझ्यातरी डोक्यात ख्रिश्चनांच्या धर्मातील पन्थोपपन्थांबाबत आहे. विकिपीडियामधील खालील तक्ता पाहून थोडा बोध झाला
हा तक्ता पाहिल्यानंतरहि पाश्चात्य देशात नेहमी कानावर पडणार्या बॅप्टिस्ट, अॅनाबॅप्टिस्ट, ल्यूथेरन, पेंटेकोस्टल, मॉर्मन,सेवन्थ-डे अॅडवेन्टिस्ट, आमिश, मेननाइट अशा अनेक पन्थोपपन्थांबाबत, त्यांची उतरंड कशी आहे आणि त्यांच्यातील प्रमुख भेद काय ह्याबाबत काहीच माहिती नाही.
रशियन ऑर्थोडॉक्स चर्च - जे ९व्या शतकात कॉन्टँटिनोपलमधून तेथे पोहोचले - हे ह्या सर्व पसार्यात कोठे बसते अशा प्रकारच्या शंका आहेतच. (त्यांच्या क्रॉसमध्ये नेहमीच्या अधिक चिह्नापलीकडे खाली एक वाकडी फळी असते. ती का?)
ह्याखेरीज जेझुइट, मोराविअन इत्यादि 'ऑर्डर्स' कशा उत्पन्न होतात आणि मुख्य चर्चशी त्यांचा संबंध कसा असतो हेहि ठाऊक नाही. मदर तेरेसा ह्यांनी कलकत्त्यामध्ये Missionaries of Charity नावाची ऑर्डर स्थापन केली म्हणजे काय केले? तिचा पोपच्या कॅथलिक चर्चशी कसा संबंध पोहोचतो हे मला ठाऊक नाही.
सर्वात गूढ म्हणजे अमेरिकेतील Evangelist उपदेशक, जे गावोगाव हिंडून सर्कससारखे तंबू उभारून हजारो लोकांपुढे प्रवचने देतात त्यांचे काम कसे चालते आणि त्याचा मुख्य चर्चशी संबंध काय?
असे अनेक गुन्ते डोक्यामध्ये आहेत.
हा तक्ता पाहिल्यानंतरहि
हा तक्ता पाहिल्यानंतरहि पाश्चात्य देशात नेहमी कानावर पडणार्या बॅप्टिस्ट, अॅनाबॅप्टिस्ट, ल्यूथेरन, पेंटेकोस्टल, मॉर्मन,सेवन्थ-डे अॅडवेन्टिस्ट, आमिश, मेननाइट अशा अनेक पन्थोपपन्थांबाबत, त्यांची उतरंड कशी आहे आणि त्यांच्यातील प्रमुख भेद काय ह्याबाबत काहीच माहिती नाही.
तुम्ही दिलेल्या तक्त्यात हे सगळे पंथ हिरव्या धाग्यांमधे मोडतात - बहुतेक सगळेच १६व्या शतकात मार्टिन लूथरच्या बंडामुळे सुरू झालेल्या प्रोटेस्टंट चळवळीचे विविध धागे आहेत.
रशियन ऑर्थोडॉक्स चर्च - जे ९व्या शतकात कॉन्टँटिनोपलमधून तेथे पोहोचले - हे ह्या सर्व पसार्यात कोठे बसते अशा प्रकारच्या शंका आहेतच. (त्यांच्या क्रॉसमध्ये नेहमीच्या अधिक चिह्नापलीकडे खाली एक वाकडी फळी असते. ती का?)
हा सुरुवातीचा इतिहास गुंगागुंतीचा आहे. चर्च मधे ५व्या शतकातच रोम आणि कॉन्स्टॅंटिनोपल या दोन शहरांमधे राजकीय फूट, तसेच तात्त्विक फरक-वाद उत्पन्न झाले. उदा. तक्त्यात दाखवलेल्या दोन काऊंसिलांचे जीजस च्या दैवी/मानवी स्वरूपावरून आणि होली ट्रिनिटीवरून झालेल्या वादासाठी महत्त्वाचे आहेत. पण रोमच्या ओसरत्या, आणि बिझंटियमच्या वाढत्या राजकीय महत्त्वाचे देखील प्रतीक आहेत. हे वाद वाढतच गेले (अनेकानेक स्किझम) आणि पश्चिमेत जर्मॅनिक टोळ्यांपुढे रोम पडल्यावर पूर्वेकडील बिझंटियम मधे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च बळावले. ११व्या शतकात हे फरक ठळक झाले, आणि पश्चिमेत पोप, तर पूर्वेच्या चर्च वर पेट्रियार्क ऑफ कॉन्स्टँटिनोपल चे नेतृत्व प्रस्थापित झाले.
क्रॉसच्या चिन्हांचा इतिहासही रोचक आहे - तिसर्या बारचे अनेक अर्थ लावले जातात (क्रॉस वर चढवलेल्या जीजस चे पाय अशा आडव्या फळीवर होते; ती थोडी वाकडी असल्याचे कारण त्याला उतरवताना त्याचे पाय त्यावरून घसरले; ती उजवीकडे वाकलेली असते कारण जीजस सहित क्रॉसवर चढवलेल्या उजवीकडचा चोराचे प्रतीक आहे, वगैरे वगैरे. पूर्वेकडच्या चर्चांमधील बारीक फरक दर्शवण्यासाठी या तिसर्या फळीचा वापर केला जातो)
ह्याखेरीज जेझुइट, मोराविअन इत्यादि 'ऑर्डर्स' कशा उत्पन्न होतात आणि मुख्य चर्चशी त्यांचा संबंध कसा असतो हेहि ठाऊक नाही. मदर तेरेसा ह्यांनी कलकत्त्यामध्ये Missionaries of Charity नावाची ऑर्डर स्थापन केली म्हणजे काय केले? तिचा पोपच्या कॅथलिक चर्चशी कसा संबंध पोहोचतो हे मला ठाऊक नाही.
हे ऑर्डर्स निराळे पंथ नाहीत - पश्चिमेतल्या चर्चचा प्रसार करण्यासाठी, मध्ययुगात ठिकठिकाणी मोनॅस्टरीज मधे स्थित ब्रह्मचर्य पालन करणार्या, चर्च ला सबंध जीवन वाहिलेल्या स्थानिक मंक आणि नन्स चे ऑर्डर्स प्रस्थापित झाले. या बहुपेढी संस्था होत्या - धर्मप्रसारासहित चर्चच्या वाढत्या आर्थिक-सामाजिक व्यवहार, खासकरून चर्च चे वाढती जमीन-शेतीचे काम बघायचे. प्रोटेस्टंट बंडानंतर जेजुइट इत्यादी ऑर्डर्सने कॅथॉलिसिझम ला पुनर्स्थापित करण्याचे काम केले - जेजुइट मंक्स यांनी खास शिक्षणाच्या क्षेत्रात ही कामगिरी बजावली. अशीच समाजसेवा पासून कट्टर धर्मबचावाचे काम क्रुसेड्स च्या जमान्यापासून निराळ्या ऑर्डर्स ने केले आहे. ऑर्डर्स हा प्रकास सहसा कॅथॉलिक चर्चमधेच आहे - प्रोटेस्टंटांमधे नाही (असा माझा अंदाज आहे, ठाम माहित नाही).
सर्वात गूढ म्हणजे अमेरिकेतील Evangelist उपदेशक, जे गावोगाव हिंडून सर्कससारखे तंबू उभारून हजारो लोकांपुढे प्रवचने देतात त्यांचे काम कसे चालते आणि त्याचा मुख्य चर्चशी संबंध काय?
काही मुख्य तात्त्विक/ भक्तीपर मुद्द्यांवर एकमत आहे, नाहीतर ऑर्गनाइजेशनच्या दृष्टीने मुख्य (कॅथॉलिक) चर्च शी संबंध नाही. इवँजेलिझम, म्हणजे धर्मप्रसार हा सगळ्याच ख्रिस्ती पंथांमधे आहे, पण "इवँजेलिकल" चळवळ ही भक्तिपर १९व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंड मधे सुरू झाली - तिचे पुढे एक स्वतंत्र प्रोटेस्टंट पंथात परिवर्तन झाले. आज अमेरिकेत इवँजेलिकल चळवळ ही जहाल, मूलतत्त्ववादी प्रोटेस्टंट चळवळ समजली जाते.
+१
अगदी अगदी.
बाकी पुलंच्या जागी आपले नाव पाहून 'न.बा.लोक्यूटा एस्ट१, कॉसा फिनिटा एस्ट२'
१,२आमचे आपले कंट्री लॅटिन हो, न-वीबापू!३
३आंतूनियस बर्वियस मेडियस वेनेल्लियस, रत्नांग्रियस.
तपशील
अधिक माहिती मराठीत, सोप्या पद्धतीने लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.
खालील धागे पहावेत. बरीच इंटरेस्टिंग/रोचक माहिती मिळेल.
http://www.misalpav.com/node/17293
http://www.misalpav.com/node/17324
http://www.misalpav.com/node/17365
http://www.misalpav.com/node/17500
ह्याच शीर्षकाचे धागे उपक्रमावरही लिहिलेत.
उपक्रम, मिपा दोन्हीकडे लेखासारखीच माहिती कित्येक प्रतिसादकांनीही दिली आहे.
ज्यू , ख्रिश्चन, इस्लाम ह्या तिन्हींना एकत्रि अब्राहमिक religions असे म्हटले जाते.
गंगा नदीचे पात्र प्रचंड विस्तारत मुखापाशी समुद्राला मिळताना त्यास फाटे फुटत अनेक लहान नद्या बनतात.
ह्या तीन पंथांचे तसेच म्हणता यावे.
+१ बिका आणि रोचना यांचे
+१ बिका आणि रोचना यांचे प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण आहेत _/\_. इतर चर्चाही रोचक.
मनोबाची लेखमाला वाचली. त्यावरून अजून एक प्रश्न मनात आला. मआंजावर मायन, इजिप्शियन, फिनीशियन, मेसोपोटेमिया वगैरे संस्कृतींवर लेखमाला असतील असे वाटतेय. पण त्यात काय होत एक 'ठिकाण' फिक्स असते आणि तिथे वेगवेगळ्या काळात कोणत्या संस्कृती नांदल्या याची माहिती असते. त्याऐवजी एक पर्टीक्युलर 'काळ' घ्यायचा (शतक/द्विशतक) आणि त्या काळात, कुठल्या प्रदेशात, कोणती संस्कृती होती, त्यांची एकमेकात युद्धे झाली का वगैरे. अशी काळ हे सेंटर मानून कोणी माहिती संकलीत केली आहे का?
काळ सेंटर मानून करतात की
काळ सेंटर मानून करतात की लेखन. पण काये की समजा काळ घेतला ब्राँझयुग तर तुम्हांला भारत, चीन, युरोप, आफ्रिका, मध्यपूर्व, इ. सर्वच ठिकाणचे ब्राँझयुग सांगत बसायला पाहिजे. इतकी माहिती नीट एखाद्या थीमच्या साच्यात बसवणे औट ऑफ ह्यांडल जात असल्याने काहीएक प्रदेश शक्यतोवर फिक्सवला जातो इतकेच, उदा. ब्राँझयुगीन युरोप किंवा ग्रीस इ.इ.
हे सर्व 'ऐतिहासिक' कालखंडाला जास्त लागू आहे. 'प्रागैतिहासिक' कालखंडाला हे जरा कमी रिजिडली लागू होते.
यासारख्या ढोबळ स्रोतांपासून
यासारख्या ढोबळ स्रोतांपासून सुरुवात करून विशिष्ट संस्कृतीबद्दल अधिक माहिती वाचता येईल -
http://www.timemaps.com/history
ब्याट्स, नितिन थत्ते, मन,
ब्याट्स, नितिन थत्ते, मन, नंदन आभार :-).
माझा इतिहासाचा अजीबात अभ्यास नाही. त्यामुळे होतं काय की, 'इसपूर्व २०००वर्षे अमेरीकेत क्ष संस्कृती होती; ती लोकं अ आ हे देव मानत; युद्धात ब क ड शस्त्रास्त्रे असत; नौकाबांधणी व्हायची; गणितात ही एवढी आकडेमोड करायचे; वस्त्रे, खेळांचे स्वरूप असेअसे होते' असे काही वाचलं की 'त्यावेळी युरोप, आशिया, अफ्रिका, ऑस्ट्रेलीयात काय होतं? त्यांचे एकमेकांशी व्यापार, युद्धे व्हायची का?' असे प्रश्न पडतात. हेच धर्म, वंश याबद्दलदेखील. त्यामुळे काळानुरूप अगदी थोडक्यात का होइना पण माहिती मिळेल तर बरे असे वाटले. नंदनने दिलेला दुवा यासाठी परफेक्ट आहे.
अवांतर
ख्रिश्चन, मुस्लिम हे रुढार्थाने religion वाटतात.
अनेकानेक वंश , संस्कृतीमधील लोक त्यात आहेत.
तुलनेने ज्यू ही ओळख religion म्हणून असली तरी संस्कृती, वंश ह्याही अर्थाने होउ शकते-- निदान मुस्लिम - ख्रिश्चन ह्यापेक्षा तरी.
ज्यू ही संज्ञा त्या अर्थानं " पारशी " ह्या संज्ञेच्या जवळ जाते.
पारशी ही धार्मिक, वांशिक व सांस्कृतिक अशा तीन्ही अर्थाने ओळख म्हणून वापरता यावी.
(पारशी हा बाय डिफॉल्ट झोरोष्ट्रियन धरलाय. "अझोरोष्ट्रियन पारशी " अशा अतिमायनर स्ट्रिमकडे बोट दाखवून उणीदुणी काढू नयेत प्लीझ.)
थोडक्यात इतर धर्मीयांचे "ज्यू बनणे " किंवा "पारशी बनणे" नगण्य म्हणता यावे.
ह्याउलट कित्येक इतर धर्मीयांचा मात्र जन्मरिलिजन वेगळा असला तरी नंतर ते "मुस्लिम बनले" किंवा "ख्रिश्चन बनले" असे दिसते.
अर्थात हे सर्व रोजच्या पाहण्या ऐकण्यात येतं त्यावरून बनवलेलं मत/अंदाज आहे.
कुणी काही दुरुस्ती सुचवली तर स्वागत असेल.
फरक
क्याथ्लिक रोमच्या पोप सायबाला आपला मुख्य धर्मगुरू मानतात तर प्रॉटेस्टन्ट कॅन्टरबरीच्या आर्चबिशपाला!
बाकी क्याथ्लिक आणि प्रॉटेस्टन्ट दोघेही तसे संत पीटरचेच अनुयायी. म्हणजे बेसिक फरक नाहीच.
संत थॉमसचे वैग्रे अनुयायी म्हंजे एकदमच वायले!