Skip to main content

डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ

दैनिक सकाळ बातमी

आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?

अस्वल Sat, 12/07/2014 - 10:13

बातमीतून -

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास करताना पुणे पोलिसांनी प्लॅंचेटसारख्या अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या माध्यमाचा वापर करणे खेदजनक आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.

पोलिसांनी प्लँचेटचा वापर केला? म्हणजे नक्की काय झालं? चौकीत जमून पोलिसांनी प्लँचेट केलं आणि आत्म्यांतर्फे खुनाची चौकशी करवली?
कठीण आहे, आशा करूया की ही बातमी खोटी असेल!
अनिसची भूमिका योग्यच वाटते.

माहितगारमराठी Sat, 12/07/2014 - 10:18

खर म्हणजे संबंधीत बातमीची हेडलाईन पाहूनच दुर्लक्ष केले होते, कारण बातमीमागे संबंधीत नियतकालिकाचा खप वाढवण्याची स्टंटबाजी अथवा तपासयंत्रणांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवण्यासाठी कुत्सीत टिका करणारे विडंबन किंवा satire असू शकेल असे अधीक वाटले.

प्रत्यक्षात प्लँचेटवगैरे करण्या एवढ्या तपासकामात अंधश्रद्धा जपण्या एवढ्या तपासयंत्रणा खुळ्या नसाव्यात अशी प्राथमीक अपेक्षा गृहीत धरता यावयास हवी. पण प्रत्यक्षात हा खुळेपणा खरच केला गेला असेल तर अनिसच्या भूमीकेत फार काही चुकले असे वाटत नाही. अनिसच्या भूमीकेचा अनिसला या प्रकरणातील कारवाई पेक्षा दबावतंत्र म्हणून अधीक उपयोग असेल. नीयतकालिकाचा खप वाढवण्यासाठी स्टंटबाजी केली असेल तर त्या केस मध्ये ही अनिसने दबावतंत्र वापरून प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग अंधश्रद्धा वाढवण्यासाठी होऊ नये अशी भूमीका घेणे सयूक्तीक वाटते.

अर्थात भूमीका घेताना तपासयंत्रणांच्या नाकर्तेपणावर टिकाकरणारे विडंबन असेल, अथवा अशा अंधश्रद्धा शक्य नाहीत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल, अथवा एखाद्या नाटकाच्या तालिमीचा भाग असेल तर भूमिका सौम्य ठेवावयास हवी.

जनतेच लक्ष मुख्य विषयाकडून डायव्हर्ट होईल एवढ ही चघळू नये. खरा मुख्य विषय केवळ दाभोळकरांच्याच म्हणून नव्हे तर सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत सर्वसाधारण पणेही पुणे आणि महाराष्ट्रात गेल्या काही दशकात सातत्याने घसरण होत चालली आहे जी आर्थिक विकासास पोषक नाही. मतदार या बाबतीत मतपेटीतून येत्या काळात व्यक्त होईलच.

धनंजय Sat, 12/07/2014 - 22:49

खाजगी व्यक्तींनी काही केले असेनाका, गुन्हा होणार नाही.

पण पोलिसांनी असा काही प्रकार केला असल्यास काहीतरी अयोग्य वाटते. (म्हणजे पोलिसांनी अधिकृतरीत्या कृती केली असेल तर, कोण्या पोलीस कर्मचार्‍याने खाजगीरीत्या कृती केल्यास वरीलप्रमाणे.) परंतु दंडसंहितेला मान्य असा कुठला गुन्हा असेल की नाही, याबाबत साशंक आहे.

चिंतातुर जंतू Mon, 14/07/2014 - 16:02

In reply to by ऋषिकेश

>> प्रत्यक्षात गुन्हा कोणत्या कलमांतर्गत दाखल करावा?

कलम वगैरे माहीत नाही, पण अशा तपासपद्धती वापरणारे पोलीस अकार्यक्षम किंवा अक्षम आहेत असा दावा करून त्यांच्याकडून तपास काढून घेतला जावा अशी मागणी करता यावी.

ऋषिकेश Mon, 14/07/2014 - 16:41

In reply to by चिंतातुर जंतू

-१
ज्याच्या खुनाचा तपास चालु आहे त्याच्या विचारधारेशी नाळ जोडण्याची सक्ती पोलिसांवर असू नये (अपेक्षा असणे, टिका करण्याचे स्वातंत्र्य आहेच. कारवाई का?)

चिंतातुर जंतू Mon, 14/07/2014 - 17:08

In reply to by ऋषिकेश

>> ज्याच्या खुनाचा तपास चालु आहे त्याच्या विचारधारेशी नाळ जोडण्याची सक्ती पोलिसांवर असू नये (अपेक्षा असणे, टिका करण्याचे स्वातंत्र्य आहेच. कारवाई का?)

असं माझं अजिबातच म्हणणं नाही. कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी प्लँचेट वापरलं असं सिद्ध झालं तर पोलीस अक्षम असल्याचा दावा करता येईल असं वाटतं.

गब्बर सिंग Mon, 14/07/2014 - 21:24

In reply to by ऋषिकेश

ज्याच्या खुनाचा तपास चालु आहे त्याच्या विचारधारेशी नाळ जोडण्याची सक्ती पोलिसांवर असू नये (अपेक्षा असणे, टिका करण्याचे स्वातंत्र्य आहेच. कारवाई का?)

वाह.

कोणाच्या व कोणत्या अधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करावी ?

माहितगारमराठी Mon, 14/07/2014 - 20:32

In reply to by प्रकाश घाटपांडे

(अंध)श्रद्धेचा हवाला देऊन निरपराध व्यक्तीला गुन्हेगार म्हणून पकड्ले तर चालू शकेल ?

ए भौ! तपास नाय लागला तरी चालेल पण अंधश्रद्धेचा गैरवापर नाय पायजेल! - हे बरोबर होईल !

प्रकाश घाटपांडे Mon, 14/07/2014 - 16:43

मला स्वत:ला चौकशी करावी हे पटते पण अगदी गुन्हा दाखल करावा हे पटत नाही. याठिकाणी प्रबोधनाला प्राधान्य असावे.किंबहुना ही संधी आहे असे मानावे. शिवाय जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हे प्रकरण बसवता येणार नाही.
तपास तर शास्त्रीय/शासकीय पद्धतीने चाललाच आहे सोबत हे पण करुन पाहू, एखाद्या गंभीर रुग्णाला आधुनिक उपचार चालूच आहेत सोबत अंगारा असलेला बरा! वाईट तर काही होत नाही ना! हा विचार असतो तसे! पोलिस खात्यात हे शासकीय जीवन व हे खाजगी जीवन अशी ठळक सीमारेषा नसते. त्याची सरमिसळ झालेली असते. पाउस पडावा म्हणुन मुख्यमंत्री पांडुरंगाला साकड घालतात. पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजा होते. सरकारी खात्यात अशा अनेक पुजा सर्रास होतात. ज्या काही अंधश्रद्धा बाळगायच्या आहेत त्या तुमच्या घरी बाळगा इथे शासकीय आवारात नको अशी भुमिका घेणे अवघड असते.
तपास लागत नाही याचा मानसिक ताण हा पोलिस खात्यातील लोकांवर येतोच. इस्रो चे शास्त्रज्ञ यशस्वी अंतराळ उड्डाणासाठी येणारा ताण घालवण्यासाठी पुजेचा आधार घेतात तर तिथे पोलिस किस झाडकी पत्ती हे वास्तव नाकारता येत नाही. असो..

माहितगारमराठी Mon, 14/07/2014 - 17:57

In reply to by प्रकाश घाटपांडे

याठिकाणी प्रबोधनाला प्राधान्य असावे.किंबहुना ही संधी आहे असे मानावे.

या गोष्टीशी अंशतः सहमत आहे. तरीपण पांडुरंगाला साकडे, देवाची पुजा याची आणि प्लँचेटची तुलना होऊ शकत नाही. आजच्याच दै. सकाळ एका वाचकाचे पत्र आहे त्यात त्यांनी प्लँचेटने गुन्हे उलगडत असतील आणि खूनी मिळत असतील तर आता पावेतो जगातले बहुतेक गुन्हेही उलगडले गेले असते असा काहीसा मुद्दा मांडून यातील विरोधाभास दाखवला आहे.

प्रश्न तपासा सोबत एका आत्म्याची प्रार्थना केली काय फरक पडतो असा नाही, यशस्वी तपासासाठी तर्कसुसंगत विचार पद्धतीची गरज असू शकते. तपासाची केवळ नाटकं रचून प्रत्यक्षात तपास केले गेले नाहीत तर्कसुसंगतता गुंडाळून ठेवली गेली तर काय ? आणि आयूक्ता सारखे वरीष्ठ पातळीवरील व्यक्ती असे वागली असेल या वर माझा विश्वास नाही पण उद्या राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृह सचीव आता पर्यंत नागरीक सहकार्य करत नाहीत म्हणत असतील तर या पुढे प्लँचेटवरील आत्मे सहकार्य करत नाहीएत हे उत्तर ऐकण कुणाला आवडेल ?

अजो१२३ Mon, 14/07/2014 - 18:06

In reply to by माहितगारमराठी

प्लँचेटने गुन्हे उलगडत असतील आणि खूनी मिळत असतील तर आता पावेतो जगातले बहुतेक गुन्हेही उलगडले गेले असते असा काहीसा मुद्दा मांडून यातील विरोधाभास दाखवला आहे.

पोलिस खात्याची जी सामान्य (मंजे नॉन प्लँचेट) प्रक्रिया आहे तिच्याने देखिल कितीतरी गुन्हे उलगडले गेलेले नाहीत. जे उलगडले गेले आहेत ते ज्या प्रकारे उलगडले आहेत ते सत्य आहे असे जे आपण मानतो ते ही तसे नसू शकते. पण त्याच्यामुळे ती प्रक्रिया त्यागावी का?

अजो१२३ Mon, 14/07/2014 - 17:04

पोलिस खात्याच्या नियमांनुसार तपास होत आहे का हे महत्त्वाचं. मग ते प्लँचेट करोत नाहीतर अजून काही. अनिंस ते आवडलं नाही तर ती आपलं मत व्यक्त करू शकते. खटला वैगेरे नाही.

चिंतातुर जंतू Mon, 14/07/2014 - 18:15

In reply to by अजो१२३

>> पोलिस खात्याच्या नियमांनुसार तपास होत आहे का हे महत्त्वाचं. मग ते प्लँचेट करोत नाहीतर अजून काही.

पोलीस खात्याच्या नियमांत प्लँचेट बसेल ह्याची इतकी खात्री आहे का?

बॅटमॅन Mon, 14/07/2014 - 18:21

In reply to by चिंतातुर जंतू

प्लँचेटमुळे रेग्युलर तपास बायपास झाला आहे की नाही याची खातरजमा न करता नियमांत काय बसेल याबद्दलचं सूचक अर्थनिर्णयन पाहून रोचक वाटलं.

अजो१२३ Mon, 14/07/2014 - 18:35

In reply to by चिंतातुर जंतू

मग म्हणजे त्याव्यतिरिक्त. दाभोळकरांच्या आत्म्याला बोलावणे नि त्यांचा मारेकरी शोधायला जाताना गणपतीच्या पाया पडणे नि खाकी खाकीच कपडे घालणे यात काही म्हणजे काही फरक नाही. मग हे दोन्ही-तीन्ही स्टेशनात का केलेलं असेना. खात्याचे नियम, संकेत जोपर्यंत पाळले जात आहेत तोपर्यंत लोकांच्या अंधश्रद्ध असण्याच्या अधिकारावर गदा आली नाही पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/07/2014 - 19:25

In reply to by अजो१२३

खाकी गणवेशामुळे लोकांना चटकन पोलिस कोण हे समजतं. गर्दीच्या, गोंधळाच्या ठिकाणी खाकी वर्दीचा फायदा होतो. असा कुठलाही फायदा प्लँचेट आणि गणपतीमुळे होत नाही.

अजो१२३ Mon, 14/07/2014 - 19:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खाकीचा प्रचंड तोटाही असू शकतो. केवळ तो माणूस स्पष्ट पोलिस आहे हे दिसत असल्याने चोर अजून नीटपणे लपत असणार. प्लँचेट नि गणपतीचा असा कोणताही तोटा नाही.

अजो१२३ Mon, 14/07/2014 - 19:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतात तरी "या प्रकारच्या पोलिसांची गाडी येत आहे" इतकी माहिती "बेकायदेशीर चालणारे उद्योग लपवा" करिता उपयुक्त ठरते. इथेच खाकीच काय एका विशिष्ट प्रकारची गाडी देखिल परिणाम करून जाते.

सतीश वाघमारे Mon, 14/07/2014 - 21:16

देव आहे असा दावा करणारे वा दावा न करता मनातल्या मनात देव आहेच हे मानणार्यांनी पोलिसांनी प्ल्यान्चेट केल्याबाबत गळे काढू नयेत . प्ल्यान्चेट केल्याने अंधश्रद्धा वाढते आणि शासकीय पूजा केल्याने , हातात माणिक पोवळे पाचू घातल्याने काय वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागतो काय ? देव असणे हि तुमची श्रद्धा असेल तर आत्मा आणि भूत असणे ही त्यांची श्रद्धा म्हणून पहायला पाहिजे . आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे कार्टे हे ठीक नाही .

विशेष टीप : आपण देव भूत आत्मा यांना काहीच मनात नसल्याने आपली ठोस भूमिका आपोआपच सिद्ध होतेय .याची नोंद घ्यावी .

माहितगारमराठी Tue, 15/07/2014 - 08:14

In reply to by सतीश वाघमारे

देव आहे असा दावा करणारे वा दावा न करता मनातल्या मनात देव आहेच हे मानणार्यांनी पोलिसांनी प्ल्यान्चेट केल्याबाबत गळे काढू नयेत .

देव न मानणार्‍यांच्या बाजूने उभे टाकले तरी सुद्धा असे मुळीच वाटणार नाही. जो पर्यंत समाजाच्या (सु)धारणेत व्यत्यय येत नाही तो पर्यंत व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग म्हणून व्यक्तीगत विश्वासांचा आदर केला पाहीजे. देव न मानणारे अधीक गुन्हे करतात असे नव्हे.पण देव मानणार्‍यांमधला मोठावर्ग गुन्हेगारी पासून दूर राहून समाज धारणेस, कायदा सुव्यवस्थेस अप्रत्यक्षच असेल पण मोलाचा हातभार लावत असतो. जिथे व्यक्तीस्वातंत्र्य समाजाच्या (सु)धारणेत व्यत्यय आणते तेथेच लगाम घातला पाहीजे; त्यामुळे यात प्रतिसाद देणार्‍याची गल्लत होती आहे इश्वर मानून पोलिसांनी कामाचे काम सोडून प्ल्यान्चेट मध्ये वेळ वाया घालवल्या बद्दल तक्रारीचा सूर लावण्यात कोणताही विरोधाभास नसून इश्वरावर विश्वास ठेवतानाही, सामाजीक जबाबदारीच भान ठेवतो हि एक आदर्श भूमीका असू शकते आणि अशा आदर्श सहकार्यपूर्ण भूमीकांचे स्वागत करण्यास काहीच हरकत नाही.

अजो१२३ Mon, 14/07/2014 - 22:57

दाभोळकरांची हत्या केली म्हणजे त्या लोकांची लायकी समजून यावीच. कदाचित त्यांची बुद्धिमत्ता विचित्र चालत असेल. म्हणजे वैचारिक विरोध असता तर हत्या वैगेरे केली नसती. ऑपोझिशनमधला सालस माणूस जिवंत ठेवलेलेच फायद्याचे असते. ज्यांनी हत्या केली त्यांचे "फंडे" सॉलिडच गंडलेले असावेत. मग त्यांच्या हातून काहीतरी चूक व्हावी, 'त्यांच्या प्रकारांनीच ते फसावेत', इ इ म्हणून पोलिसांनी सापळा देखिल रचलेला असू शकतो. त्याचा हा भाग असू शकतो.
अन्यथा पोलिसांनी तपासात प्लँचेट वैगेरे करू नये हे जगन्मान्य आहे, त्यावर बहस कशाला?

Nile Mon, 14/07/2014 - 23:24

खटला करणे योग्य आहे.

१. प्लॅंचेट वगैरे करण्याकरता पोलिसांचीच गरज काय?
२. पोलिस हे सरकारी खाते जनसामान्यांच्या पैश्याने चालते. कोणत्याही नव्या तंत्राचा वापर करण्याआधी त्या तंत्राला 'योग्य अशी' मान्यता मिळाल्याशिवाय करणे हे चूक आहे.
२अ. समजा प्लॅंचेटने शोध लागला असा दावा केला गेला तर समाजाला इथून पुढे पोलिसांनी केसेस प्लॅंचेट आणि तत्सम तंत्राने सोडवलेल्या चालतील काय?
२ब. ज्याप्रमाणे 'पोलिस ट्रेनिंग' दिले जाते त्याप्रमाणे प्लँचेट वगैरे ट्रेनिंग नसताना पोलिसांवर अशा तंत्राचा उपयोग करताना आम्ही विश्वास कसा ठेवायचा?
२क. अशा तंत्रानी आरोपीला पकडल्यावर त्याला कोर्टात आरोपी हे सिद्ध कसे केले जाणार आहे? न्यायव्यवस्थेत त्या करता काही सोय आहे का?
२ड. अशा तंत्राने ज्याला पोलिसांनी आरोपी म्हणून पिंजर्‍यात उभे केले आहे त्याला तो कसा चॅलेंज करणार? जसं दुसर्‍या डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिझल्ट घेता येतो तसा दुसर्‍या मांत्रिक-तांत्रिकाचा प्लँचेट रिपोर्ट मिळतो काय?
३. प्लँचेट करणार्‍यांना सरकारने नोकरीवर ठेवलेले आहे असे समजावे काय?
३अ. ३ चे उत्तर हो असेल तर तांत्रिक पात्रता, कोणत्या परिक्षा द्याव्या लागतात वगैरेबद्दल काही माहिती?
३ब. ३ चे उत्तर नाही असेल तर अशांकडून कोणताही 'बायस' नाही याची खात्री कशी केली जाते?
४. वरील गैरप्रकार होऊ नयेत म्हणूनच न्यायव्यवस्थेत प्लँचेट सारख्या (सिद्ध न झालेल्या) गोष्टी गृहित धरल्या जाऊ नयेत असे कलम जर असेल तर अशा गोष्टींचा वापर करणार्‍या सरकारी यंत्रणेविरूद्ध काय करावे?

४ चे उत्तर माझ्याकरता स्पष्ट आहे म्हणूनच खटला करणे योग्य आहे असे माझे मत आहे.

माहितगारमराठी Tue, 15/07/2014 - 07:58

In reply to by Nile

तर्कसंगत मांडणी पॉपूलर असते असे नव्हे पण तर्कसुसंगत लेखनाच्या प्रयत्नाला श्रेणी देणार्‍याने 'निरर्थक' अशी श्रेणी देणे म्हणजे (त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून) हाइटच म्हणावी लागेल. श्रेणीला श्रेणी देण्याची सुविधा नसते काय ?

चिंतातुर जंतू Tue, 15/07/2014 - 11:44

In reply to by माहितगारमराठी

>> श्रेणीला श्रेणी देण्याची सुविधा नसते काय ?

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. एकाच प्रतिसादाला कितीही श्रेणी देता येतात. त्यामुळे एखाद्या प्रतिसादाला चुकीची श्रेणी मिळाली आहे असं वाटत असेल तर ह्या गोष्टी करता येतात -

  • तुम्ही श्रेणीदाते असाल, तर योग्य ती श्रेणी देऊन तुम्ही अन्यायाचं निराकरण करू शकता.
  • प्रतिसादाला चुकीच्या श्रेणी खूप अधिक प्रमाणात मिळाल्या आहेत का, हे त्या सदस्याच्या खात्यात जाऊन पाहू शकता. उदा : नाईलसाठी हा दुवा. इथे गेल्यावर आता असं दिसतं आहे की त्या प्रतिसादाला दोन श्रेणी मिळाल्या आहेत. त्यापैकी एक आधीची निरर्थक असावी, आणि नंतर (तुमचा प्रतिसाद पाहून कदाचित) कुणी तरी मार्मिक दिली असावी.
  • चुकीच्या श्रेणी खूप अधिक प्रमाणात मिळाल्या असतील, किंवा देण्यासाठी तुमच्यापाशी श्रेणी शिल्लक नसेल, किंवा तुम्ही श्रेणीदाते नसाल, तर जाहीर प्रतिसाद देऊन लोकांच्या ध्यानात हे आणून देता येईल. त्यायोगे इतरांच्या सहकार्यानं श्रेणी दुरुस्त करता येईल.

प्रकाश घाटपांडे Thu, 24/07/2014 - 09:12

एबीपी माझावर चर्चा पाहिली. मला वाटत की आता या प्रकरणाच राजकारण व्हायला लागल आहे.जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत यावर कारवाई करता येणार नाही याचा शाम मानव यांनी पुनरुच्चार केला आहे.
आशिष खेतान यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की असे प्रकार हे पहिल्यांदाच होताहेत असे नाही. शिवाय तपास जणुकाही फक्त प्लँचेटच्याच आधारे होतो आहे असे चित्र निर्माण होउ लागले आहे ते चुकीचे आहे.
पोलिस हे समाजातीलच घटक असल्याने समाजातील असलेल्या अंधश्रद्धांपासुन ते मुक्त नाही. तशी अपेक्षा करण ही चुकीचे आहे प्रबोधन ही चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. पोलिसांच्या ट्रेनिंग मधे अंधश्रद्धा निर्मूलनाचा समावेश केला म्हणजे पोलिस अंधश्रद्धा मुक्त होतील असे अजिबात नाही पण त्यांच्या विचारप्रक्रियेला सुरवात होईल ही बाब विसरुन चालणार नाही.
अंधश्रद्धेचा आधार घेतो म्हणुन कर गुन्हा दाखल असा संदेश या प्रकरणातून जर जात असेल तर चळवळीला घातक आहे. समाजापासून तुटुन पडण्याचा धोका यात निर्माण होतो.अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते. अंधश्रद्ध व्यक्तिंबाबत क्रोधापेक्षा करुणे ची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते हे तर अंनिसतील बीज वाक्य आहे.
अंधश्रद्धेच उगम हा मेंदुत आहे..माणसाची सश्रद्द वा अश्रद्ध असणे ही अवस्था एका जैविक प्रक्रियेचा भाग आहे असे मला वाटतेच. अंधश्रद्धा हा भाग केवळ अज्ञान व अगतिकता यातून आला नसुन तो एक मानवी मेंदुच्या उत्क्रांतीतील अवशेषात्मक भाग आहे. अश्रद्धतेचा वा सश्रद्धतेचा अतिरेक हा मला मनोविकाराचाच भाग वाटतो. अतिरेक शब्दाची व्याप्ती सापेक्ष आहे हे मान्यच. हे नानावटींच्या लेखावर प्रतिक्रिया देताना मी म्हटले होते.

प्रकाश घाटपांडे Mon, 28/07/2014 - 10:22

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/planchet-murder…
पहा डॉ भटकर काय म्हणतात. जरी प्लँचेटला वैज्ञानिक आधार नसला तरी शक्यतेचा विचार व्हायला हवा. मी कार्यक्रमाला उपस्थित होतो. पुर्वी होनी अनहोनी कार्यक्रमाच्या वेळी जस अंनिस ने म्हटल होत की हा अंधश्रद्धा पसरवणारा कार्यक्रम आहे तसच या पुस्तकाबाबत वा डॉ मेधा खासगीवाले यांच्या प्रयोगाबाबत म्हणता येईल.ते बा़की काही असो आपले मनोरंजन झाले बुवा!

मन Mon, 28/07/2014 - 11:10

In reply to by प्रकाश घाटपांडे

संपूर्ण अवांतर प्रतिसाद देत आहे.

दुव्यातील शेवटची ओळ पुन्हा पुन्हा वाचली .
अवांतर १
अतिंद्रिय शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींचा अनुभव मी घेतलेला आहे. आत्मा ही संकल्पना नाकारता येत नाही.

भटकरांच्या औरंगाबादमधील व्याख्यानाला गेलो होतो तेव्हाही त्यात "प्रकृती - पुरुष, परब्रम्ह , अध्यात्म " हे की वर्ड्स होते असे आठवते. अर्थातच भाषण समजले नाही.
.
.
अवांतर २
स्वामी विवेकानंद वगैरेंनीही "पवहारी बाबा" म्हणजे "पवन/हवा खाउन जिवंत राहणारा माणूस/बाबा" , हठयोगाच्या मदतीनं चमत्कार वाटावेत असे प्रकार करणारी माणसे , विविध सिद्धी वगैरेंचा अनुभव घेतल्याचा उल्लेख केलाय.
इतकं करुन पुरोगामी मंडळी विवेकानंद नामक प्रभृती आमचेच विचार सांगत होती असं म्हणतात तेव्हा मौज वाटते.
अल्याडच्या पुस्तकात विवेकानंदांनी "छी थू त्या जातिसंस्थेच्या." , "जय हो समानता की." , " भौतिक स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले आधुनिक विज्ञानवादीच शिवाशिव पाळणार्‍यांपेक्षा वेदांताच्या जवळ आहेत." असा उपदेश केलेला असतो; म्हणून आजच्या पुरोगाम्यांतली काही मंडळी त्यांचा वारसा सांगू पाहतात.
पण ह्या अल्याडच्या पुस्तकांशिवाय पल्याडच्या पुस्तकात विवेकानंदांनीच सिद्धी, चमत्कार, त्याबद्दलचे अनुभव, पवहारी बाबा वगैरेबद्दल जे लिहिलय ते लेखन मात्र सोयीनं विसरलं जातं. "विज्ञानालाही न समजलेल्या गोष्टी आहेत.(आणि त्या आमच्या जादुटोणा किंवा अध्यात्मवाल्यांना समजल्यात)" असं म्हणणारी निओ धार्मिक मंडळीही विवेकानंदांचाच वारसा सांगतात.

जय हो.

माहितगारमराठी Mon, 28/07/2014 - 13:41

In reply to by प्रकाश घाटपांडे

पोलिसांकडून तपासाचा भाग म्हणून 'प्लँचेट'चा वापर केला जाण्यात काही गैर नाही,' असे मत डॉ. भटकर यांनी मांडले. मात्र, याबाबतचा कोणताही वाद आपल्याला ओढवून घ्यायचा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
...
संदर्भ तपासात ‘प्लँचेट’चा वापर गैर नाही! म. टा. Jul 28, 2014, 01.03AM IST

सूपर हिट, "हाय काय, नाय काय !! " :)

शशिकांत ओक Mon, 28/07/2014 - 21:02

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाश जी,
आज चिंतातुर यांनी दिलेल्या लिंकवरून आऊटलुक मधील खैतानांचा लेख वाचल्यावर त्यात प्लॅन्चेट हा शब्द वाचायला मिळाला नाही. मग आपणासकट अगदी डॉ विजय भटकर यांच्या पर्यंत सर्व प्लॅन्चेट या शब्दावर चर्चा करताना दिसतात. हे काय गौडबंगाल आहे? यावर खुलासा होईल काय?

शशिकांत ओक Tue, 29/07/2014 - 22:56

In reply to by प्रकाश घाटपांडे

च्या लेखात प्लँचेट हा शब्द आहे काय? ही विचारणा होती. नंतर उद्भवलेल्या चर्चेतील कथनात माझी विचारणा नाही.

प्रकाश घाटपांडे Wed, 30/07/2014 - 10:13

In reply to by शशिकांत ओक

चर्चा तांत्रिक शब्दोच्छला साठी नाही. तपासासाठी कोणत्या ना कोणत्या रुपाने आत्म्याची मदत घेतली याच्याशी संबधीत आहे.ती पुढे त्या अनुषंगाने विस्तारता ही येते

शशिकांत ओक Thu, 31/07/2014 - 23:16

In reply to by प्रकाश घाटपांडे

पटकीने गेला काय किंवा देवीच्या मुळे दगावला काय शेवटी मेलाच ना! असे म्हटल्यासारखे आहे. कटककरांचे प्लॅन्चेटचे वर्णन व खेतानांसमोर मनीष ठाकुरने दाखवून दिलेला दाभोलकरांचा आत्मा संचार करून आणल्याचा दावा असे असता प्लॅन्चेटॅचे उल्लेख जाणून बुजून केला जातोय असे वाटले म्हणून तुम्हाला विचारणा केली होती.

प्रकाश घाटपांडे Sat, 02/08/2014 - 13:01

In reply to by शशिकांत ओक

या प्रकाराला प्लँचेट कॅटॅगरीत बसवायचे का? हा प्रश्न आहे खरा. पण मिडियाने त्याला बसवून टाकले आहे. एखाद्या बाईच्या अंगात देवी येते व ती प्रश्नांची उत्तरे देते असे काहीसे आहे असेही म्हणता येईल.

शशिकांत ओक Sat, 02/08/2014 - 15:06

In reply to by प्रकाश घाटपांडे

असे म्हणत असाल तर आता २१लाखाच्या बाता करून डॉ विजय भटकर यांच्या प्रत आव्हान करून समितीने काय केलेय. जर मीडियावाल्यानी प्लॅन्चेटॅचाउल्लेख जाणून बुजून केला होता तर आपल्या सारख्या हितचिंतकांनी चुकीच्या गृहितकांवर आधारलेला प्रयोग मांडला जातो आहे याची जाणीव समितिस करून दिली जाईल असे निदर्शनास आणणे गरजेचे नाही काय? इतक्या वर्षांचे आपले वरिष्ठत्व पाहता आपल्याला ते कोलून लाऊ शकत नाहीत. असे अपेक्षित आहे. या उप्पर अहो मला कसले ते विचारतायत असा विश्वामित्री पवित्रा आपला नसो. अशी ही इथल्या पुरोगामी सदस्यांची आशा असेल.

प्रकाश घाटपांडे Sat, 02/08/2014 - 15:52

In reply to by शशिकांत ओक

>>या उप्पर अहो मला कसले ते विचारतायत असा विश्वामित्री पवित्रा आपला नसो. अशी ही इथल्या पुरोगामी सदस्यांची आशा असेल.
अहो आपली आशा आहे ती इथल्या पुरोगामी सदस्यांची नसेल. आन ही आव्हान जुनीच आहेत. आता फक्त भटकरांच्या विधानाने ती पुनरूज्जीवित झाली. अमाउंट पण वाढली बर का? २१ लाख. अंनिसच्या कार्यपद्धतीचा तो एक ढाचा आहे.
आता विज्ञानाने या गोष्टी सिद्ध होत नाहीत हे भटकरांनाही माहिती आहे आन अंनिसलाही.

विवेक पटाईत Tue, 29/07/2014 - 13:20

भीती एकच आहे दबावाला बळी पडून, कुणा निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्लेन्चेट किंवा जादू-टोण्याच्या सहायाने गुन्हेगार शोधता येत नाही.
'पोलीस ची गरज काय भगत हे काम सहज एका दिवसात करतील. तपासाचा विषय आहे या पूर्वी कित्येक निर्दोष व्यक्तींना दोषी ठरवून जेल मध्ये तर टाकले नाही ना.????

माहितगारमराठी Wed, 30/07/2014 - 13:17

In reply to by विवेक पटाईत

पोलीस ची गरज काय भगत हे काम सहज एका दिवसात करतील. तपासाचा विषय आहे या पूर्वी कित्येक निर्दोष व्यक्तींना दोषी ठरवून जेल मध्ये तर टाकले नाही ना.????

आपली प्रतिक्रीया स्वाभावीक आहे पण... ती (पित)पत्रकारीतेच्या आधारे तुमच्या नकळत पण त्यांच्या जाणीवपुर्वक घडवली जात नाहीएना हे चिमुटभर मीठा सोबत तपासण्याची गरज वाटते आहे. शशिकांत ओकांचा प्रतिसाद वाचल्यामुळे ऑटलूक मासिक आणि सदर लेख लिहिणारा पत्रकार दोन्हीचा सर्वसाधारण पुन्हा एकदा लेखा जोखा घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराचा नेहमीच चष्मा तपासत बसतो असे नाही पण शशिकांत ओकांच्या प्रतिसादामुळे पत्रकाराची पार्श्वभूमी तपासाताना तसा योग आला. पुन्हा पत्रकारीतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करूनही मासिकं खपवण्यासाठी सनसनाटी लिहाव लागत त्यासाठी विशीष्ट चष्मा वापरला तरी चालतो, अशाशी संबंधीत मासिक आणि संबंधीत पत्रकार पीतपत्रकारीतेच्या जवळपास असावेत असा माझा ग्रह झाला आहे. तुमची "....या पूर्वी कित्येक निर्दोष व्यक्तींना दोषी ठरवून जेल मध्ये तर टाकले नाही ना.????"अशी प्रतिक्रीया मिळण म्हणजे आशिष खेतान या पत्रकाराला पोलीसांना पूर्ण नकारात्मक रंगात रंगवून जे साधावयाच होत ते साधलं, या पत्रकार महाशयांना न्यायालयांची निष्पक्षता नाकारण्याची सवय असावी असे दिसते (त्यांची इतर वार्तापत्रे वाचली तर त्यांचा चष्मा लक्षात येतो) . पोलिसांच्या नाकर्तेपणाचा रागच आहे, पण कळत नकळत सामान्य माणूस (समाज) पितपत्रकारीतेच्या भोवर्‍यात सापडला जाण याचीही खंत वाटते. माहित नाही या ऑऊटलूक मासिकाची मालकी सध्या कुणाकडे आहे पण ते काही विशीष्ट प्रभावांखाली कललेले आहे किंवा काय अशी एकुण शंका वाटली. याला विशीष्ट चष्मे लावलेल्या (पित) पत्रकारीतेचा अप्रत्यक्ष विजय म्हणावयाचे काय असा सध्या प्रश्न पडला आहे.

प्रकाश घाटपांडे Wed, 30/07/2014 - 14:45

In reply to by माहितगारमराठी

मिडिया वाले समूह मन वातावरण निर्मिती करुन आपल्याला हव तस हाकतात.

माहितगारमराठी Wed, 30/07/2014 - 15:12

In reply to by प्रकाश घाटपांडे

होना, सगळेच साध्या सरळ मनाने चर्चा इत्यादीत सहभाग घेत असतो. चर्चेत आणणारे (मिडियावाले) विशीष्ट हेतु ठेवून आहेत हे आपल्या सहजी ध्यानी मनीही येत नाही. (माझ्यासहित) आपण सगळेच मिडियाच्या एखाद्या झाश्यात केव्हा आणि कसे जाऊ हे सांगणे कठीण.

अजो१२३ Wed, 30/07/2014 - 16:25

In reply to by प्रकाश घाटपांडे

New order of life मधे लोकांनी आपसांत थेट संवाद न करता आपापल्या फ्लॅटमधे बंद राहणे पसंद केले आहे म्हणून माध्यमे आता सामाजिक संवादांतील एजेंट्स बनले आहेत. त्यातल्या त्यात 'माध्यमांचा हेतू' मग तो अब्सॉल्यूट पातळीवर कसा का (बरा/वाईट) असेना, त्यांचा त्यांचेशी विशुद्ध असला तरी बरे. पण इथे 'माध्यमांचे हित' कुठे औरच आहे.
-----------------------
सही - नव्या जीवनप्रणालीचा जयजयकार असो.

प्रकाश घाटपांडे Thu, 31/07/2014 - 15:28

आजच्या मटा मधे वाचकांच्या पत्रात ज्योतिषी एम कटककर यांचे आलेले पत्र पहा

ऋषिकेश Thu, 31/07/2014 - 16:21

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्याहून मला दुसरं पत्र अधिक भेदक वाटलं..

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/08/2014 - 01:19

In reply to by ऋषिकेश

पहिलं पत्रं टिपीकल आहे. मला अनुभव आले म्हणजे प्लँचेट ही अंधश्रद्धा नाही, होमिओपथी हे शास्त्र आहे वगैरे. यात कुठल्याही पद्धतीने कार्यकारण सिद्ध करण्याचा प्रयत्न नाही, प्रयोग पुन्हा पुन्हा केला तर तेच उत्तर मिळतं का याचा उल्लेख नाही ... थोडक्यात अंधश्रद्धा नाही हे सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या कसोट्या लावायला पाहिजेत त्यांचा सुतराम म्हणता संबंध नाही.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 10:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडक्यात अंधश्रद्धा नाही हे सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या कसोट्या लावायला पाहिजेत त्यांचा सुतराम म्हणता संबंध नाही.

या कसोट्या कोणत्या?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/08/2014 - 19:28

In reply to by अजो१२३

आधीच्या प्रतिसादातलं वाक्य -

यात कुठल्याही पद्धतीने कार्यकारण सिद्ध करण्याचा प्रयत्न नाही, प्रयोग पुन्हा पुन्हा केला तर तेच उत्तर मिळतं का याचा उल्लेख नाही ... थोडक्यात अंधश्रद्धा नाही हे सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या कसोट्या लावायला पाहिजेत त्यांचा सुतराम म्हणता संबंध नाही.

............सा… Fri, 01/08/2014 - 19:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरं आहे -
प्रयोगाचे उत्तर (फाईंडींग) -
(१) व्यक्ती सापेक्ष नसावे
(२) ते कालसापेक्ष नसावे
(३) स्थानसापेक्ष नसावे.

या काही कसोट्या म्हणता येतील.

अजो१२३ Thu, 31/07/2014 - 17:29

In reply to by प्रकाश घाटपांडे

एक मृत पेशी नि एक जिवित पेशी यांमधे कंपोझिशनल फरक काय आहे हे विज्ञानाने एकदा सांगून टाकले कि लोक प्लँचेटसारखे पांचट प्रकार करणार नाहीत.

प्रकाश घाटपांडे Thu, 31/07/2014 - 18:02

पुण्यात जोशी अभ्यंकर खून प्रकरणात प वि वर्तक व तत्सम मंडळींनी प्लँचेट चा आधार घेतला होता. डिटेल्स लक्शात नाहीत. पण श्री नावाच्या एका सवंग साप्ताहिकात याची स्टोरी आली होती.

शशिकांत ओक Mon, 18/08/2014 - 00:20

In reply to by प्रकाश घाटपांडे

आणि अर्थिक पिळवणूक

या प्रकरणात पोळ व अन्य शोध पथकांवर अंनिस व अन्य माध्यमांनी आणलेल्या दबावाचा रेटा इतका असह्य झाला असावा म्हणून शिवाय आपल्याच खात्यातील एक जर अर्थिक पिळवणूक न करता मृताच्या आत्म्याला अंगात आणून पद्धतीने काही सुगावे देत असेल तर का चाचपू नये या विचारानी त्यांनी केलेली कारवाई आता निषिद्ध मानणे तितकेसे बरोबर नाही असे पत्र लेखकाचे मत आहे असे वाटते. प्रकाश भाईंना ते जवळचे वाटले असावे. (म्हणून तर त्यांनी ते आवर्जून इथे डकवले असावे)...

मात्र प्लँचेट करून ते केले होते किंवा नाही यावर कोणी प्रकाश टाकताना दिसत नाही...

प्रकाश घाटपांडे Tue, 19/08/2014 - 10:05

In reply to by शशिकांत ओक

प्रकाश भाईंना ते जवळचे वाटले असावे. (म्हणून तर त्यांनी ते आवर्जून इथे डकवले असावे)...

होय,पण केवळ ते कारण नाही. या विषयीची मतमतांतरे या धाग्यावर वाचकांना एकत्रित वाचायला मिळावीत या प्रमुख उद्देश आहे. पण चळ्वळीची भुमिका ही कधी कधी सामाजिक रेट्यातून म्हणा वा प्रतिमेशी सुसंगत म्हणुन म्हणा किंवा चळवळीची स्ट्रॅटिजी म्हणुन म्हणा अपरिहार्यपणे येते. त्यातील अपरिहार्यता पण लक्षात घेतली पाहिजे. काही लोकांना ती हटवादीपणाची वा दुराग्रही वाटते ते देखील त्यांच्या जागी खरेच आहे. समाजातील काही सुजाण लोकांना अस वाटते कि पोलीसांनी प्लँचेटचा आधार घेणे हे योग्य नसले तरी क्षम्य आहे हे वरील पत्रातून अधोरेखीत होते.

विलासराव Sun, 17/08/2014 - 13:08

मला अंनीसची भुमीका पटते. मी समर्थक नाही अंनीसचा.
त्यामुळे त्या व्यक्तीने जिवनभर घेतलेले कष्ट वाया जातील.
जाइनात का? मग अनेक लोक त्याचा वापर करु लागतील.
करीनात का ? मग कायदा व्यवस्था( असलेली) आणखीनच धोक्यात येईल.
येइनात का? मग त्याला आवर घालण्याची मागणी होइल.
होइना का? मग जर हेच करायचे होते तर ते आताच का करु नये?

करीनात का? न का करिनात हे माझे मत आहे .