८ हजार बिशप आणि कार्डिनल वर मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप: पोप

कॅथलिक चर्चमधील २ टक्के पाद्रींवर लैंगिक शोषणाचे आरोप असल्याची खळबळजनक बाब समोर आली असून ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लैंगिक अत्याचाराची ही विकृती रोखण्यासाठी पाद्रींना लग्न करण्याची मंजूरी देण्याचा विचारही या निमित्ताने पुढे आला आहे.

इटलीतील एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पोप फ्रान्सिस यांनी लहान मुलांच्या या लैंगिक शोषणाची तुलना कुष्ठरोगाशी केली. ब्रह्मचर्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. 'येशूच्या मृत्यूनंतर ९०० वर्षांनी ही प्रथा सुरू झाली. ही प्रथा बदलणं सोपं नाही. मात्र, काही तरी चांगला पर्याय शोधण्याचा माझा प्रयत्न आहे', असे ते म्हणाले. बाल लैंगिक शोषणाचे प्रकार व्हॅटिकन सिटी खपवून घेणार नाही, असेही त्यांनी पुढे निक्षून सांगितले.

पोप फ्रान्सिस यांना त्यांच्या सल्लागारांमार्फत लैंगिक शोषणाचा तपशील मिळाला आहे. जगभरात ४ लाख १४ हजार पाद्री असून त्यातील दोन टक्के पाद्रींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असेल तर तो आकडा ८ हजार एवढा होतो. या दोन टक्क्यांमध्ये पाद्रींबरोबरच बिशप आणि कार्डिनल यांचाही समावेश असल्याचे पोप यांनी नमूद केले.

लैंगिक अत्याचाराचे बळी ठरत असलेल्या अनेक पीडितांनी 'व्हॅटिकन'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. अत्याचाराचे आरोप असलेल्या पाद्रींना पाठीशी घातले जात असल्याने ही नाराजी आहे. गेल्याच वर्षी पोप फ्रान्सिस यांनी लैंगिक शोषणाबाबतचे कायदे कठोर केले होते. जे या अत्याचाराला बळी पडलेत त्यांचीही पोपनी माफी मागितली होती.

सन्दर्भ---मटा ऑनलाइन वृत्त ।http://maharashtratimes.indiatimes.com/international/Pope-Francis/articl...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

बरे झाले पोप नीच मान्य केले...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

आपले प.पू. वगैरे कधी मान्य करणार? कारण बुवाबाजीच्या नावाखाली बाईलबाजी पण चांगली चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरोप गंभीर आहेत मात्र पोप म्हणतात तशी माफी मागून त्यांना तोंडी माफ करणे पुरेसे वाटत नाही.
त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे त्या त्या व्यक्तींना योग्य ती कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आजघडीचा पोप आजवरचा सर्वात चांगला पोप आहे असे वाटते.
-------------------------------------------------------------------------------------
धर्मप्रसार करणार्‍या पाद्र्यांना विवाह करण्याचे ऑप्शन असावे. त्याने त्यांचे कोणतेही अधिकार कमी होऊ नयेत.
-------------------------------------------------------------------------------------
अविवाहित असणे नि लैंगिक अत्याचार यांचे असे कोरिलेशन मांडणे स्वीकार्य असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.