विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी

विकीपीडीयावरच्या मराठी टंकनाबद्दल माहितगारमराठी यांनी काढलेले धागे, उदय यांचा एक प्रतिसाद आणि मागे झालेल्या काही खरडगप्पांमुळे हा धागा काढत आहे. (शिवाय स्वतःचं नाव सातत्याने बोर्डावर दिसायला नको का!)

मराठी टंकनासाठी 'ऐसी'वर जी सोय आहे त्यात 'गमभन' वापरलेलं आहे. ही पद्धत मराठी टंकनासाठी उपयुक्त असली तरी एफीशियण्ट (मराठी?) नाही. मराठीत 'अ' या स्वराचा सगळ्यात जास्त वापर होतो (विदा चिपलकट्टींकडे आहे). पण 'गमभन'मध्ये टंकताना हा अ सुद्धा टंकावा लागतो, अपवाद शब्दाच्या शेवटी अ आला तरच. त्याशिवाय k म्हणजे क होतो, पण K (कॅपिटल के) याचा ख होत नाही, तिथे kh टंकावं लागतं. 'गमभन' फक्त ब्राऊजरमध्येच चालतं. मला सगळ्यात जास्त ताप देणारी गोष्ट म्हणजे - उदा गोष्टीसाठी हा शब्द लिहीताना चुकून गोष्टोसा ... असं लिहीलं. ईकाराच्या जागी चुकून ओकार आला, तर आधीचं व्यंजनही खोडावं लागतं.

त्याला इलाज म्हणजे बोलनागरी वापरणे. बोलनागरीमधली रचना, आपण शब्द लिहीताना शिकतो तशीच आहे. उदा - गोष्टीसाठी हा शब्द लिहीताना ग+ओ+ष+्+ट+ी असं लिहीत जायचं. यातून साधारण ३०% कीस्ट्रोक्स कमी होतात असा माझा अंदाज आहे. खोडाखोड करावी लागली नाही तर. नाहीतर आणखी जास्त.

---

लिनक्समध्ये बोलनागरी आता येतंच. फक्त कीमॅप थोडा बदलावा लागतो. बोलनागरी मुळात हिंदीसाठी असल्यामुळे त्यात ळ, ण, ऱ्या मधला अर्धा र यांची सोय नाही. पण त्यांचे युनिकोड शोधून फाईलमध्ये बदलले की झालं. मी कुबुंटू १२.०४ आणि १४.०४ मध्ये बोलनागरी वापरते आहे. ते सुरू करण्यासाठी ही टेक्स्ट फाईल आपल्या सोयीप्रमाणे बदलून घ्यायची. यातला दुसरा पर्याय हिंदी-बोलनागरी आहे.
/usr/share/X11/xkb/symbols/in
लिनक्स वापरण्याइतपत संगणकी किड्यांना ही फाईल बहुदा आपापल्या सोयीने संपादित करता येईलच. (ज्यांना येत नसेल आणि/किंवा ही फाईल संपादित करण्याचा आळस आहे त्यांना माझी फाईल खाली प्रतिसादात दुवा आहे.)

देवनागरी टंकन सुरू करण्यासाठी -

system settings -> keyboard -> layout

इथे जाऊन नवा कीबोर्ड यादीत वाढवावा. त्यात हिंदी (बोलनागरी) असा पर्याय आहे.

---

विंडोजमध्ये यासाठी किंचित जास्त वेळखाऊ आहे. विंडोजसोबत येणारा मराठी कीबोर्ड फोनेटीक नाही, इनस्क्रिप्टवाला आहे. पण हे बदल करणं लिनक्सच्या तुलनेत बरंच जास्त सोपं आहे.

१. 'कीबोर्ड क्रिएटर' डाऊनलोड करणे.
२. त्यातून कीबोर्डचा नवा नकाशा तयार करता येतो, जो klc प्रकारच्या फाईलमध्ये साठवला जातो. त्यात जोडाक्षरं (फक्त तीन युनिकोडपर्यंतच, म्हणजे क्ष, ज्ञ, त्र, प्र, इ.) साठवता येतात. उदा - p = प, P = फ आणि कंट्रोल + p = प्र असंही करता येतं.
(माझ्या सोयीनुसार माझ्यासाठी बनवलेली klc फाईल हवी असल्यास खाली प्रतिसादात दुवा आहे.)
३. हे संपादन पूर्ण झालं की, त्यातच Project -> Create DLL (का असाच कायतरी पर्याय आहे) हा वापरला की त्यातून setup.exe बनेल.
४. ती इन्स्टॉल केल्यावर language असा पर्याय विण्डोजमध्ये आहे. (हा शोधण्यासाठी स्टार्ट बटणावर क्लिक करून शोधता येईल.) त्यातून एकापेक्षा जास्त लेआऊट सिलेक्ट करता येतात. shift+left alt करून कीबोर्ड लेआऊट रोमन/देवनागरी असा बदलता येतो.

या सूचना क्लिष्ट असू शकतात याची कल्पना आहे; आणखी मदत हवी असल्यास प्रतिसादातच लिहा. त्या नुसार धागाही अद्ययावत करता येईल. विंडोज ८ साठी हे कसं करायचं मला माहित नाही. ही माहिती कोणाला असल्यास प्रतिसादांमधून ते ही लिहा.

---

विंडोज आणि लिनक्स दोन्हींमध्ये देवनागरी टंकन सुरू करण्याआधी कीबोर्डाचा नकाशा आपल्याला हवा आहे तसाच आहे ना याची पक्की खात्री करून घ्या. कारण एकदा सेटिंग सुरू (enable) केलं की ते बदलायचं असल्यास फार कष्ट पडतात.

याशिवाय इतर गॅजेट्स, फोन, टॅबलेट्स आणि अॅपल याबाबतीतही माहितीपूर्ण प्रतिसाद लिहून श्रेणींचे कूल पॉईंट्स मिळवा.

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

कीमॅप

हा बोलनागरीचा कीमॅप.

मी जी फाईल वापरते त्यात ङ, ऽ (उच्चारी अवग्रह), ऋ यांच्या जागा बदललेल्या आहेत. बाकी फार फरक नाही.

विंडोजमध्ये, सिस्टमसोबत इनस्क्रिप्ट येतं. ते नव्यानं शिकावं लागेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके! ट्राय करतो.

ओके! ट्राय करतो.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Phonetic

>> फोनेटिक नसलेले कीबोर्ड वापरता येणार नाहीत मला असं वाटतंय म्हणून बोलनागरीच्या वाटयाला नाही जाते. <<

बोलनागरी फोनेटिक आहे. अपवाद फक्त काही अक्षरांचा - उदा. ट/ठ, ड/ढ, श

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विंडोजसाठी गुगल इनपुट वापरता

विंडोजसाठी गुगल इनपुट वापरता येईल. गमभन इतकं छान नाहीये ते पण वेळेला केळं म्हणून ठीक आहे.

https://www.google.com/inputtools/windows/
इथून उतरवा.

फोनेटिक नसलेले कीबोर्ड वापरता येणार नाहीत मला असं वाटतंय म्हणून बोलनागरीच्या वाटयाला नाही जाते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

देवनागरी टंकन

सध्या ऐसीवर देवनागरी/मराठी टंकनाची अडचण आहे; म्हणून हा धागा वर काढत आहे.

लिनक्समध्ये बोलनागरीची जी फाईल येते ती हिंदी टंकनासाठी अधिक सोयीची आहे. मराठी टंकनासाठी मी फाईल थोडी बदलली आहे, उदाहरणार्थ ऱ्या, ऱ्हा, ळ, ण इत्यादी मराठी उच्चार टंकनासाठी ऱ, ळ, ण चे युनिकोड फाइलमध्ये आहेत. ही फाईल इथून उचलता येईल.

विंडोजमधे देवनागरी टंकनासाठी klc फाईल इथून उचलता येईल.

या संदर्भात आणखी शंका असल्यास इथेच प्रश्नोत्तरं करता येतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बोलनागरी-हिंदी

मी /usr/share/X11/xkb/symbols/in येथील फाईल उघडून पाहिली पण कोणती की म्हणजे काय हे काही कळेना.

त्या फाईलमधला बोलनागरी-हिंदी हा भाग देवनागरी-फोनेटिक आहे. त्याचं कीमॅपिंग बहुतांशी गमभनसारखं आहे.

उदा इंग्रजी यु म्हणजे कोणते key वगैरे पैकी कोणती की आहे हे कसे कळावे?
तसेच शास्त्रशुद्ध आणि योग्य युनिकोड अक्षरे कुठे शोधावीत?

बोलनागरीत इंग्लिश यू = पहिला उकार. कॅपिटल यू = दीर्घ उकार. उ आणि ऊ लिहिण्यासाठी अनुक्रमे राईट आल्ट आणि शिफ्ट+ राईट आल्ट असे पर्याय आहेत. देवनागरी लिपीसाठी युनिकोड इथे सापडतील.

गमभनपेक्षा हा कीमॅप किंचित निराळा आहे. मी जो कीमॅप वापरते त्याची फाईल तुम्हाला इमेल करू शकते. व्यनित तुमचा इमेल पत्ता कळवा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा

चांगला लेख बनवला अहे अभिनव. खुपच मदत झाली.

आता लेखन तरी होते आहे.

पण काही गोष्टी टोचत आहेतच अजून.
जसे की सापडले. असे लिहिले की टींब दिल्या नंतर त्याचे सापडलe. असे रुपांतर होते.

तसेच इतर काही मॅपिंग बदलता येईल का?
जसे कॅपिटल जे या अक्षरावर झ यायला हवा आहे.
किंवा झेड वर झ येणे. तसेच एफ वर नुक्ता असलेला फ येतोय.
त्यामुळे साधा फ काढायला पि एच वापरावे लागते आहे.

(हे सारे प्रश्न तुम्हाला नसतील तर अर्थातच माझी सिस्टिम घोळ करत असावी असे मानायला जागा आहे.)
मदतीबद्दल अनेकानेक धन्यवाद!

-निनाद

छान. (तो लेखही मुळचा माझाच

छान.
(तो लेखही मुळचा माझाच आहे! नंतर त्यात इतर अनेक स्वयंसेवकांनी भर घातली आहे!)
(स्माईल)

त्या दुव्या बद्दल अनेक आभार

त्या दुव्या बद्दल अनेक आभार अभिनव! फार मस्त काम केले.
मी मराठी फोनेटिक कळफलक घेतला होता. त्या ऐवजी आयट्रॅन घेतला आणि प्रश्न मिटला!
आता सगळे व्यवस्थित टंकन करते आहे.
सगळी सिस्टिम पुनर्प्रस्थापित करण्यापासून वाचवलेस!
अनेक धन्यवाद!!

-निनाद

धन्यवाद अभिनव. या सिस्टिमवर

धन्यवाद अभिनव.
या सिस्टिमवर मी गेले काही वर्ष (काहीही माहित नसल्याने) खुपच प्रयोग केले आहेत.)
म्हणूनही माझे फोनेटिक असे विचित्र वागत असेल.

-निनाद

इथुन काही मदत होतेय का बघा:

इथुन काही मदत होतेय का बघा: https://help.ubuntu.com/community/ibus

सविस्तर मदत मी उद्या करु शकेन. तो पर्यंत आस्कयुबुंटूवर शोधा.

तुम्ही १४.१० वापरत असाल तरच

तुम्ही १४.१० वापरत असाल तरच नवी ओएस टाका कारण १४.१० एन्ड ऑफ लाईफ झाले आहे.
१४.०४ असाल तर कृपया समस्या सोडवण्यावर भर द्या. एलटीएस आहे.
नवीन टाकणारच असाल तर, जुनी मुद्दामहुन डिलिट करण्याची गरज नाही. आधी सर्व डेटाचा बॅकअप घ्या व नवी टाकताना तिचे रुट, होम ई. पार्टीशन जुन्याच्याच पार्टीशनवर माऊंट करा व फॉरमॅट करा चा चेकबॉक्स सिलेक्ट करा.

आयबस

आयबस वापरतो आहे. Xubuntu 14.04 आहे. पण रोज काही तरी अपडेट्स होत असतात.
बहुदा नवीन सिस्टिम टाकावी की काय असे वाटते आहे
परंतु जुनी झुबंटु डिलिट कशी करायची?

-निनाद

उ आणि ठ हे अक्षर कुठेतरी

उ आणि ठ हे अक्षर कुठेतरी इंग्रजी इ आणि ड्ब्ल्यु कडे चिकटवले आहे >> इन्स्क्रीप्ट बद्दल मला काही माहिती नाही.
पण आयट्रान्स (फोनेटीक) मफ्धे उ u वरच आहे व ठ Th वर आहे.

सगळे झुबंटु नवीन टकून पाहिले तर? >> शेवटचा पर्याय म्हणुन करा.
झुबुंटुचे १४.०४ / १४.१० यापैकी कोणती आवृत्ती वापरता आहात?
तुम्ही सद्ध्या आयबसच वापरता आहात का?
एकदा .config, .kde वगैरे फोल्डर्स डिलिट करुन (यात ओएसच्या व इतर सर्व "सेटींग" जातील.) रीलॉगीन करुन, परत नव्याने आयबस सेटींग करुन बघा.

धन्यवाद अभिनव,पण मी आधी

धन्यवाद अभिनव,
पण मी आधी म्हंटले आहे तसे उ आणि ठ हे अक्षर कुठेतरी इंग्रजी इ आणि ड्ब्ल्यु कडे चिकटवले आहे. त्यामुळे टंकन करताना घोळ होतात.
की माझे व्हर्जन जुने वगैरे असावे?

मी झुबंटु एक्सफेस वापरतो आहे. १४ च्या पुढचे. त्याचे सर्व अपडेट्स घेतलेले आहेत. पण तरीही किबोर्ड मात्र मिलत नव्हता. मग काही तरी करून तो अचानक दिसू लागला. तो दिसण्यासाठी इतक्या गोष्टी केल्या की कशामुले तो आला हे समजले नाही. आणि त्यात बहुदा जुने काहीतरी आले असावे अशी शक्यता नाकारता येत नाही.
सगळे झुबंटु नवीन टकून पाहिले तर?

-निनाद

निनाद, आपण अनेक डिस्ट्रोंचा

निनाद,
आपण अनेक डिस्ट्रोंचा उल्लेख केलेला आहे व युजर बिन मधिल फाइल्सचाही.

आयबस वापरुन टाईप करताना यापैकी काहीही करावे लागत नाही.
आयबस मधे फोनेटीक (आयट्रान्स) तसेच इन्स्क्रीप्ट दोन्ही पर्याय आहेत.
आयबस फक्त इन्स्टॉल करुन भाषा निवाडावी लागते.
याव्यतीरिक्त काही नाही.

आपण निव्वळ मराठी टाईपिंगसाठी एवढ्या डिस्टृओ बदलण्याचे व एवढ्या फाईल्स मधे जाण्याचे कारण कळले नाही.

लिनक्स कळ्फलक संपादित कसा करावा?

लिनक्स/ युबंटु / उबंटु / झुबंटु कळ्फलक संपादित कसा करावा?
मी फोनेटिक कळफलक वापरण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काही अक्षरे 'अपेक्षित ठिकाणी' सापडत नाहीत.
(उदा. उ आणि ठ हे अक्षर कुठेतरी इंग्रजी इ आणि ड्ब्ल्यु कडे चिकटवले आहे.)

मी /usr/share/X11/xkb/symbols/in येथील फाईल उघडून पाहिली पण कोणती की म्हणजे काय हे काही कळेना.
कुणी मदत करू शकेल का?
उदा इंग्रजी यु म्हणजे कोणते key वगैरे पैकी कोणती की आहे हे कसे कळावे?
तसेच शास्त्रशुद्ध आणि योग्य युनिकोड अक्षरे कुठे शोधावीत?

हे सगळे जाऊ दे!
कुणाकडे गमभन ला जुळवलेली फाईल आहे का?
असल्यास येथे देऊ शकाल का?

धन्यवाद!

-निनाद

प्रकल्प

फॉण्टवर आधारित किंवा bitmap आधारित अक्षरओळख वापरून नॉन युनिकोड मराठी टेक्स्ट पासून युनिकोड टेक्स्ट असा ओपन सोर्स प्रकल्प करणेचे मनी आहे.
फ्रीटाईप, हार्फ़बज़, अक्षरओळखीसाठी जो सर्वोत्तम फुकट आहे तो, पीडीएफ इत्यादि प्रोटो' वापरले
जातील अशी पूर्वकल्पना देतोय.
इच्छुकांनी,हितचिंतक, सल्लागार यांनी कृपया व्यनि करावा. आभार!(स्माईल)

सध्या तरी मला गुगलइनपुटच

सध्या तरी मला गुगलइनपुटच आवडते
tech4marathi.blogspot.in

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण उत्तरासाठी __/\__ मनःपुर्वक धन्यवाद. संगणक टंक कसे तयार केले जातात याची मनमोकळेपणाने माहिती देत आहात ती अत्यंत उपयूक्त आहे. मराठी विकिपीडियावरील अन्य संबंधीत अडचणींबद्दलही आपले मार्गदर्शन घेता येईल असे वाटते. आपल्या मुद्दा क्रमांक १,२ आणि ३ चे कसे उपयोजीत करता येऊ शकतील या बद्दल मनन करतो आहे. या संबंधाने काही मार्गदर्शनाची विनंती लौकरच करेन.

र्‍ साठी लोहित सुधारित आहे हि चांगली माहिती आहे. "नुक्ता वाला र + हलंत = र्‍ " केवळ बॅकवर्ड कॉम्पॅटिबिलिटी साठीच समाविष्ट आहे. या माहितीस आपण दुजोरा दिल्यामुळे र्‍य आणि र्‍ह च्या बाबतीत प्रमाणीकरणाची प्रक्रीया सुलभ होईल असे वाटते.

एक शंका अ‍ॅ (0972 ) साठी सुद्धा लोहित सुधारित आहे का ? आणि पुन्हा लोहीत हिंदीत अ‍ॅ (0972 ) चा अभाव असण्याची शक्यता आहे का? खासकरून वर अ‍ॅरिस्टॉटल लेखात ज्यांना समस्या येते म्हटले ते लिनक्स आणि फायर फॉक्स उपयोग कर्ते आहेत म्हणून एक शंका. अ‍ॅ संदर्भात अजूनही अडचणी आणि शंका शिल्लक आहेत पण त्या आपल्यापाशी थोड्या उशीराने चर्चेस मांडेन.

>>प्रत्येक अक्षर प्रकारच उदाहरण सुद्धा टंकता येईल<< असा निकष म्हणालो कारण आपण जसे क्‍ष ह्या जोडाक्षराचे उदाहरण दिलेत ते कमी वापरावे लागले तरी उदाहरणात क्वचीत दाखवावे लागू शकते खास करून विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे अशी फ्लेक्झीबिलीटीची गरज भासते. द न आणि य जोडून दाखवण्याची विकिपीडियात उदाहरणासाठी आवश्यकता भासू शकते पण त्यामुळे dnya चा ज्ञ बनवताना विकिपीडियात ट्ंकणाऱ्यांना विचार करावा लागतो. dnya चा ज्ञ बनवावाकी नाही याचा ट्रांसलीटरेशन प्रमाणिकरणासाठी विचार करताना असे द न आणि य जोडून दाखवण्याची गरज भासू शकते कि नाही याचाही विचार प्रमाणीत टंकन प्रणाली बनवताना विचार केला पाहिजे असे वाटते.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

एक निरीक्षण -

जर न्याहाळक/वेबसाईट हुशार असेल तर जोडाक्षरांचा समदा समूह उडवला जातो.

जोडाक्षराच्या आधी कर्सर नेऊन डिलीट केलं तर आख्खं जोडाक्षर उडतं आणि पुढे कर्सर नेऊन बॅकस्पेस वापरलं तर एकेक युनिकोड उडतं असं कुबुंटूमधल्या केट या टेक्स्ट एडीटरमध्ये पाहिलं आहे. फाफॉमध्ये मात्र दोन्ही परिस्थितीमध्ये एकेक युनिकोड उडतं, शिवाय जोडाक्षराच्या मध्येच कर्सर जाऊन मधलं युनिकोड कॅरॅक्टर, उदाहरणार्थ हलन्तसुद्धा उडवता येतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोहित

र्‍ साठी लोहित सुधारित आहे. माझा फायरफॉक्स लोहित-हिंदी वापरत असे ज्यातून अर्धा र वगळण्यात आला होता.

>>उपयोग कर्त्यांच्या दृष्टीकोणातून र्‍य मधील य वगळल्या नंतर र्‍ त्या नंतर र् असा क्रम अधीक उपयूक्त वाटतो <<
युनिकोडचे देखील हेच सांगतो आहे."नुक्ता वाला र + हलंत = र्‍ " केवळ बॅकवर्ड कॉम्पॅटिबिलिटी साठीच समाविष्ट आहे.

>>एखादा फॉण्ट अपेक्षीत रेंडरींग देत नसेल तर तो कितपत सुधारता येतो<<
तो नक्कीच सुधारता येतो. पण त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत -

१) फॉण्ट युनिकोड कॉम्पॅटिबिल असावा.
२) त्यामध्ये किमान "अनेक युनिकोड = एक ग्लिफ", "अनेक ग्लिफ्स = एक ग्लिफ", "एक ग्लिफ = अनेक ग्लिफ" असे (GSUB) तक्ते असावेत. उदा . "क + हलंत + र = क्र"
२) ज्या ठिकाणी तो वापरायचा आहे त्या प्रणालीवर अशा तक्त्यांना वापरण्याची सोय असावी.

असे तक्ते तयार करणे हे चांगल्या फॉण्ट संकलक सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. आणि ते जरासे वेळखाऊ आहे. अशा तक्त्यांमुळे फॉण्टची साईज मात्र वाढते.

त्यामुळे सगळेच फॉण्ट सुधारता येणार नाहीत. ते नव्यानेच पुन्हा कंपाईल करावे लागतील.

>>प्रत्येक अक्षर प्रकारच उदाहरण सुद्धा टंकता येईल<<
हे कळाले नाही. म्हणजे नेमके काय.

>>उत्तमपणे सर्व माध्यम<<
'माध्यमा'त हुशार प्रणाली देखील प्रमाणित करायला हवी. आजवर मायक्रोसॉफ्टचे रेंडरिंग आणि शेपिंग अल्गो हे एक मान्य प्रमाण होते. आजवरच्या सर्व शेपिंग अल्गों'च्या
आधाराने बर्‍यापैकी बिनचूक असणारा "harfbuzz ng" हा ओपन सोर्स शेपर अधिकृत म्हणून स्वीकारण्यास हरकत नसावी.

आपल्या अत्यंत माहितीपूर्ण आणि

आपल्या अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचक सुलभ प्रतिसादामुळे बरीच माहिती सहजपणे समजू शकलो. अर्थात बॅकस्पेसने क्लस्टर डिलीट करताना "..........खूपदा युनिकोड एकामागून एक उडवले जातात. म्हणून जोडाक्षरे डीलीट होताना आपल्याला विराम असणारे विरूपे दिसू शकतात. ..." हे मला अनवधानाने झालेली अक्षरलेखन चूक दुरुस्त करताना उपयूक्तच वाटते.

लोहीत प्रमाणे एखादा फॉण्ट अपेक्षीत रेंडरींग देत नसेल तर तो कितपत सुधारता येतो याची मला कल्पना नाही. पण आपण दर्शवलेल्या समस्येत लोहीत फॉण्टात सुधारणा करणे शक्य असल्यास तसे करण्यास प्राधान्य मिळावयास हवे असे माझे व्यक्तीगत मत आहे. (चु.भू.दे.घे.)

प्रमाणीकरणासाठी जे निकष हवे त्यात; भाषेस आवश्यक सर्व अक्षरे टंकता येणे, उत्तमपणे सर्व माध्यमातून वाचता, टंकता आणि देवघेव करता येणे, चांगला टंकण वेग साधता येणे, सुलभ टंकण दुरुस्ती, प्रत्येक अक्षर प्रकारच उदाहरण सुद्धा टंकता येईल एवढी लवचिकता असणे, (अजून सुचले तर अ‍ॅडवूयात)

र्‍य च्या बाबतीत, उपयोग कर्त्यांच्या दृष्टीकोणातून र्‍य मधील य वगळल्या नंतर र्‍ त्या नंतर र् असा क्रम अधीक उपयूक्त वाटतो कि ज्यामुळे मला र्‍य चा र्‍ह असे दुरुस्त करावयाचा असेल तर सुलभ सहज समजणारे जाते. दुसर्‍या ऱ्य च्या बाबतीत दुरुस्तीकरताना रचे नुक्ता असलेले ऱ् विरुप मराठीत नुक्ता कमी वापरात असल्याने आणि दुरुस्तीकरताना र्‍ स्पष्ट दिसत नसल्यामूळे प्रमाणीकरणासाठी दुसरा ऱ्य टाळावा असे माझे मत आहे. दोन्ही र्‍य च्या मागची युनिकोडाधातीत निर्मिती प्रक्रीया महत्वाची असली तरी त्यात न पडता सर्वसामान्य व्यक्तीसाठी म्हणून पहिल्या र्‍य स प्रमाणीकरणासाठी प्राधान्य द्यावे. दुसरा ऱ्य बॅकवर्ड कंपॅटीबिलिटी म्हणून उपलब्ध राहू द्यावा पण प्रमाण नियमीत कळफलकावर त्याची तेवढी आवश्यकता नाही असे माझे सध्याचे मत आहे.

त्यामुळे शक्य असल्यास पहिला र्‍य दिसण्यासाठी लोहीत टंकात योग्य सुधारणा करवून घेणे आणि पहिला र्‍य

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

टेक्नीकॅलिटी

>>र्‍य आणि ऱ्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत का ? तर उत्तर होकारार्थी आहे..<<
पहिला र्‍य असा बनला आहे : हे त्याचे युनिकोड्सः
\u0930\u094D\u200D\u092F. यामध्ये,
\u0930 - र
\u094D - हलंत(पायमोड)
\u200D - हा युनिकोड ZERO WIDTH JOINER म्हणजे जोडाक्षरे बनवताना उपयोगी येणारा एक शून्य जाडीचा काहीही प्रिंट न होणारा युनिकोड. याच्या उपयोगासंबंधी खाली लिहिले आहे. एखाद्या व्यंजनाचा अर्धाच भाग वापरायचा आहे हे ठासून सांगण्यासाठी हा युनिकोड वापरायचा आहे.
\u092F - य

दुसरा ऱ्य:
\u0931\u094D\u092F.
म्हणजे यात
\u0931: "नुक्ता असणारा र" ऱ
\u094D: हलंत
\u092F: य
अशी अक्षरे आहेत.
ISCII standard नुसार eyelash-र येण्यासाठी " ऱ + हलंत " वापरले जातात. हा नियम युनिकोड मध्येही समाविष्ट आहे. जेणेकरून दोघांच्या दृश्यात फरक असू नये. त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत.

र्य :
\u0930\u094D\\u092F

\u0930 - र
\u094D: हलंत
\u092F: य

आता या पहिल्या जोडाक्षरांच्या दृश्यात्मकतेनुसार विचार करा. पहिल्या दोघांसाठी आडवा-र दाखवणे जरूरीचे आहे.
खूपदा आपण वापरत असलेला फॉण्ट या दोन्हींसाठी एकच प्रकार दर्शवू शकत नाही. याला काही अंशी न्याहाळकही जबाबदार असतो. न्याहाळक जर देवनागरी लिपीसाठी स्वतंत्र फॉण्ट वापरू शकत नसेल तर तो ओ.एस. वर अवलंबून असतो. आणि महत्वाचे म्हणजे एखाद्या जोडाक्षराचे "बरोबर" दिसणे हे न्याहाळक, फॉण्ट आणि ओ.एस. या तिन्ही पातळयांवर जमून यायला हवे. न्याहाळक जर या बाबतीत स्वतंत्र असेल, तर तो योग्य फॉण्टच्या मदतीने हे जमवू शकतो.
हे खालील उदाहरणांनी स्पष्ट व्हावे :

ओ. एस : लिनक्स उबंटू १२.०४

मोझिला-(लोहित फॉण्ट्स) : यामध्ये जोडकाम केले गेले नाही. बहुदा चारही युनिकोडकरिता चार ग्लिफ्स दाखवले गेले आहेत. ZERO WIDTH JOINER हा अदृश्य-शून्य जाडीचा असल्याने दिसत नाही.

क्रोम - (नोटो-सॅन्स-देवनागरी फॉण्ट्स)

या दोन्ही युनिकोड-स्ट्रींग्ज मध्ये फरक आहे, आणि गुगल सारखी शोधयंत्रे हे युनिकोड-स्ट्रींग्ज नुसार शोधाशोध करतात म्हणून त्यांच्या उत्तरांमध्ये फरक असतो.
खूपदा युनिकोड एकामागून एक उडवले जातात. म्हणून जोडाक्षरे डीलीट होताना आपल्याला विराम असणारे विरूपे दिसू शकतात. जर न्याहाळक/वेबसाईट हुशार असेल तर जोडाक्षरांचा समदा समूह उडवला जातो.

प्रमाणीकरणाची आवश्यकता नक्कीच आहे. पण ते कोणत्या पातळीवर करायचे हे ठरविणे गरजेचे आहे. कोणत्याही इंडिक कीबोर्ड मध्ये "अर्धी" व्यंजने देणे सुलभ आणि आवश्यक करावे लागेल. "हलंत(विराम)" आणि "हलंत+ZERO WIDTH JOINER" अश्या दोन स्वतंत्र बटनांची गरज आहे का? की चंद्रकोरी "र" (र + हलंत +ZERO WIDTH JOINER) साठी स्वतंत्र बटन ठेवावे?

ZERO WIDTH JOINER चा अजून एक वापर :

"क्ष" हा एकच युनिकोड नसून तीन युनिकोडांचे बनलेले आहे.
[ka क] [virāma ्] [ṣa ष]
हे तीन युनिकोड एकामागून एक आले असता, त्या तिघांसाठी "क्ष" हे एकच अक्षर (ग्लिफ) फॉण्ट मधून उचलून दाखवले जाते.
परंतू आपल्याला क्‍ष हे जोडाक्षर दाखवायचे असेल तर आपल्याला हे संपूर्ण अक्षर नसून क आणि ष यांचे जोडकाम आहे हे दाखवण्यासाठी/ सांगण्यासाठी
[ka क] [virāma ्] [ZWJ] [ṣa ष]
असे चार युनिकोड लागतील.

अ‍ॅरिस्टॉटल मधील अ‍ॅ न दिसण्याची समस्या

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर ॲरिस्टॉटल नावाचा लेख आहे. यात अ‍ॅ या युनिकोडाक्षराची दोन वळण असावीत पण बहुधा युनीकोड संकेतांक एकच (बहुधा 0972) असावा कारण शोधयंत्रातून ती एक सारखे पणानेच शोधली जातात, हा सिंगल ॲ आहे, बहुधा अ + ॅ नव्हे कारण अ + ॅ = अॅ असेल तर बॅकस्पेसने ॅ वगळल्यास अ शिल्लक राहतो तसे ॲरिस्टॉटल लेखातील केसमध्ये होत नाहीए.

अ‍ॅरिस्टॉटल मधील अ‍ॅ ची दोन्ही वळण माझ्या सहीत बहुतांश लोकांना व्यवस्थीत दिसत असावीत, त्याच वेळी खालील चित्राप्रमाणे काही जणांना अडचण येते आहे. त्यांचा ब्राऊजर आणि ओएस ची कल्पना नाही, समजा ब्राऊजर आणि ओएस संबंधीत समस्या असतीतर एकच युनिकोड संकेतांक असलेल एक वळण दिसतय आणि एक वळण दिसण्यात समस्या येते आहे असे व्हावयास नको असे वाटते. समस्येचा ओळखण्यात/ अंदाजा बांधण्यात काही मदत मिळाल्यास हवी आहे.

समस्या येणार्‍याना अ‍ॅरिस्टॉटल लेख खालील प्रमाणे दिसतो.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

र्‍य आणि ऱ्य पैकी अधीक बरोबर कोणता ? आणि का ?

र्‍य आणि ऱ्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत का ? तर उत्तर होकारार्थी आहे. उदाहरणार्थ इथे ऐसीवर टाईप होतोय तो पहिला र्‍य आहे.

हे दोन्ही साध्या डोळ्यांनी सर्वसाधारणपणे सारखेच दिसतात तर वेगळे ओळखायचे कसे ? न्याहाळकाच्या (ब्राऊजरच्या) कंट्रोल F मध्ये यातला एक एक र्‍य आणि ऱ्य वेगळा वेगळा घेऊन शोध घ्या, दोन्ही र्‍य एकमेकांना शोधात ओळखत नाहीत हे दिसून येईल.

फरक ओळखण्याचा दुसरा मार्ग बॅकस्पेस ची कळ वापरून य डिलीट करणे, येथी र्‍य मधील य डिलीट केल्या नंतर र्‍ एवढेच चिन्ह उरते. ऱ्य च्या य ला बॅकस्पेस ने डिलीट केल्यावर ऱ् उरतो म्हणजेच पहिला र्‍य र्‍ + य वापरून निर्मीत केला जातो आणि दुसरा ऱ्य ऱ् आणि य यांच्या संधी जोडाक्षराने साधला जातो. अर्थात हि टेक्नीकॅलिटी आहे. महत्वाचा प्रश्न हा र्‍य बरोबर कि हा ऱ्य बरोबर हाच आहे.

अगदी असाच प्रॉब्लेम इतर कोणत्या अक्षरास आहे का ? र्‍ह आणि ऱ्ह मध्ये सुद्धा आहे.

साध्या डोळ्यांनी फरक पडत नसेल तर कोणता अधिक बरोबर हा उपद्व्याप कशा साठी ?

पहिले आणि सर्वात महत्वाच कारण गूगल आणि इतरही शोधयंत्रात एखाद्या शब्दाचा शोध घेताना काही शोध न दाखवले जाण्याचा संभव आहे. आणि असे शोध दाखवले जात नाहीएत हे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य व्यक्तीस सहज लक्षातही येत नाही पण एखाद्या व्यक्तीचा एखादा शोध यंत्रातील महत्वाचा शोध योग्य माहिती हाताशी न मिळाल्या मुळे अर्धवट राहू शकतो.

दुसरे
कारण काय टाईप केल्यावर कोणत अक्षर दिसाव याच्या प्रमाणी करणाच आहे. आत्तापर्यंत टायपींग संबधीत प्रमाणीकरणाच्या प्रश्नाकडे सर्वसाधारण पणे डोळे झाक करत आलो आहोत पण हि उदासीनता खरेच योग्य आहे का ? बहुतांश लोक कमीत कमी पण उत्कृष्ट टायपींग पद्धती वापरत असतील तर टायपींगचा वेग वाढणे सुलभता साधणे इत्यादी फायदे होऊ शकतात.

तिसरे
मराठी विकिपीडिया विक्शनरी शब्दकोश इत्यादी प्रकल्पात वेगवेगळी टाईपींग पद्धती वापरणार्‍यांकडून होणारी द्विरुक्ती टाळून शोध/माहिती घेणार्‍या वाचकाच्या हाती योग्य लेख सुलभतेने उपलब्ध करणे

*ऐसी वरील र्‍य कसा टंकला जातो = Ry वापरून
*हा दुसरा ऱ्य कसा टंकला जातो = ऱ् + य


असेच काही प्रश्न अ‍ॅ च्या संदर्भाने आहेत पण ते स्वतंत्र प्रतिसादातून मांडेन.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

विंडोज का?

सर्वोत्तम पर्याय: भाषाइंडिया (फ्रॉम मायक्रोसॉफ्ट) http://www.bhashaindia.com/Downloads/Pages/home.aspx

कंप्युटरवर इन्स्टॉल केलं की कुठेही मराठीत टाईप करता येतं, ब्राऊझरच हवा अशी कटकट नाही. (शिवाय, गमभनच्या बरंच जवळंच असल्याने टाईपिंग फार बदलावे लागत नाही.)

मला ही अडचण १४.०४ वर आली.

मला ही अडचण १४.०४ वर आली. (गूगल करण्यापेक्षा पुन्हा इन्स्टॉल करण्याचा पर्याय सोपा वाटला म्हणून) पुन्हा कुबुंटू १४.०४ चढवलं. मला अ‍ॅप्ट-गेट वगैरे काही विचारणा झाली नाही.
(शंका - कदाचित अलिकडे त्यांनी १४.०४ मध्ये बदल केला असेल; मी साधारण तीन महिन्यांपूर्वी १४.०४ वापरायला सुरूवात केली.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला प्रश्न

समजा, माझ्याकडे हापिसात कुठलंही मराठी संस्थळ उघडत नाही. माझ्याकडे अ‍ॅडमिन राइट्स नाहीत. त्यामुळे मी काहीही इन्स्टॉल करू शकत नाही. अशा वेळी देवनागरीत लिहिण्याकरता माझ्याकडे कोणते पर्याय आहेत?

चांगला प्रश्न विचारलात. आधी जरा विकिप्रकल्पाची जाहीरात करून घेतो. विकिपीडिया फिल्टर होत नसलातर प्रश्नच नाही, कुणाला अगदीच इंग्रजी विकिपीडिया अथवा मराठी विकिपीडियावर टायमपास करताय असे वाटायचे नसेल तर इस्टोनीयन किंवा वेगळ्याच भाषी विकिपीडियावर जाऊन विकिवरील वैश्विक भाषा सुविधा, महत्व आणि मराठीचे आणि भारतीय भाषा टायपिंगचा लाभ घ्या. पण समजा फिल्टरला wiki हा शब्दच खटकला तर इंग्रजी विक्शनरी या इंग्रजी शब्दकोश प्रकल्पात जा कारण वेबसाइटचे स्पेलींग wiktionary असे आहे सरळ wiki नसून wikt आहे. हापिसात साधारणतः शब्दकोशांबद्दल आक्षेप घेतला जाण्याची शक्यता कमी आणि इंग्रजी विक्शनरीतही मराठी टंकनाची सुविधा वैश्विक स्वरुपात उपलब्ध करतेच.

हम्म पण विकिमीडियाचे सर्वच सर्वर पत्ते ब्लॉक केले असले तर पंचाईत होईल का ते माहित नाही. समजा तसे झाले तर पर्याय एका खाली एक देतो आहे (लेखन चालू)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

राज ठाकरेकडे तक्रार करण्याचा

राज ठाकरेकडे तक्रार करण्याचा ऑप्शन भारी आहे!

गमभन छान आहे. बरहाही तसंच वापरता येतं. इन्स्टॉलेशनची भानगड नाही. बादवे, माझ्याकडे बरहाची जुनी चकटफू वर्जन आहे. मी तीच वापरते. कुणाला हवी असल्यास सांगा.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्रोममध्ये भाषा मराठी घेतली

क्रोममध्ये भाषा मराठी घेतली आहे सध्या, आणि त्यांचे मराठीतले मेन्यु बरेच चांगले आहेत, नाहीतर पुर्वी काही काही ठिकाणी "go to" चे शब्दशः "ला जा" बघून अगदीच लाजायला व्हायचं आणि "भीक नको, कुत्रा आवर" या उक्तीप्रमाणे मी इंग्लिश भाषा वापरायचे!

ऑर्कूट मध्ये scrap चे "भंगार" इत्यादी वाचून 'आवरा' झाले होते.

शिवाय खूप जास्त संस्कृताळलेले मराठी न ठेवता बर्‍यापैकी नेहमीच्या वापरातले मराठी आहे. तरी "अ‍ॅप्स" चे "अनुप्रयोग" समजून घ्यायला डोकं खाजवावं लागलंच थोडं!

तरी एकूण बरेच चांगले, मग मराठीच ठेवते आता!

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

गमभन प्लगिन

>> कुठलंही मराठी संस्थळ उघडत नाही माझ्याकडे अ‍ॅडमिन राइट्स नाहीत. त्यामुळे मी काहीही इन्स्टॉल करू शकत नाही. अशा वेळी देवनागरीत लिहिण्याकरता माझ्याकडे कोणते पर्याय आहेत?<<

गमभनचं ब्राउझर-बेस्ड प्लगिन आहे. ते ऑफलाइन वापरता येतं. ऑफिसबाहेरच्या मशीनमधून अ‍ॅक्सेस करा आणि इथून डाउनलोड करा. ते इमेलनं पाठवता येईल किंवा गूगल ड्राइव्हवरून शेअर करता येईल. ऑफिसात जीमेल वगैरे अ‍ॅक्सेस होतं असं ह्यात गृहित धरलंय. मी हे कधीही वापरलं नाही, पण एक फाइल मशीनवर कॉपी करण्यापलीकडे काही करावं लागत नसावं असा अंदाज आहे. ते अ‍ॅडमिन राइट्सशिवाय करता यावं.

जाता जाता अनाहूत सल्ला : इतर संस्थळं उघडत असतील आणि मराठी संस्थळं उघडत नसतील, तर राज ठाकरेंकडे तक्रार करून पाहा.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पर्याय

१. गूगल वापरावे.
२. क्विलपॅड वापरावे.
३. मराठी विकिपिडीया वापरावा.
४. प्रॉक्सी सर्वर वापरून मराठी संस्थळ उघडण्याचा प्रयत्न करावा.
५. चतुरभ्रमणध्वनी वापरावा.
६. ऑफिस बदलावे.
७. ऑफिसमध्ये ऑफिसचेच काम करावे, मराठी संस्थळांवर जाण्याचा मोह टाळावा.

तूर्त तरी गूगल अन याहू

तूर्त तरी गूगल अन याहू टायपिंग सोडल्यास अन्य आप्षन्स माहिती नाहीत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

समजा, माझ्याकडे हापिसात

समजा, माझ्याकडे हापिसात कुठलंही मराठी संस्थळ उघडत नाही. माझ्याकडे अ‍ॅडमिन राइट्स नाहीत. त्यामुळे मी काहीही इन्स्टॉल करू शकत नाही. अशा वेळी देवनागरीत लिहिण्याकरता माझ्याकडे कोणते पर्याय आहेत?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"मंगल" फॉण्ट वापरून कंटाळा

"मंगल" फॉण्ट वापरून कंटाळा आला असेल तर हे काही उत्तम युनिकोड फॉण्टः
यापैकी मला गुगलने अ‍ॅन्ड्रॉईड साठी अधिकृत म्हणून वापरलेली "नोटो सॅन्स" फॅमिली, अधिक बग-फ्री, ठळक वाटते. क्रोम ब्राउजर वापरत असाल तर
advanced settings मधून तुम्ही देवनागरी लिपी साठी फॉण्ट बदलू शकता.

१) लोहित मराठी (फेडोरा)
२) नोटो सॅन्स देवनागरी
३) सकल मराठी
४) सिल अन्नपूर्णा फॅमिली
५) उर्वरित जे उपलब्ध होऊ शकतील ते

हे फॉण्ट्स क्रोम, फायरफॉक्स इ. यांमध्ये निवडून, काही चुका असल्यास कळवावे.
(ज्यांना ऑफिसमधून जीमेल फेसबूक अशा गोष्टी उघडता येत नाहीत, उघडल्यास काही अपलोडता येत नाही त्यांनी एकवार Epic browser इन्स्टॉल करून पहावा)

उबंटू १४.०४, ळ, ण, ऱ्या वगैरे

>> बोलनागरी मुळात हिंदीसाठी असल्यामुळे त्यात ळ, ण, ऱ्या मधला अर्धा र यांची सोय नाही. पण त्यांचे युनिकोड शोधून फाईलमध्ये बदलले की झालं. मी कुबुंटू १२.०४ आणि १४.०४ मध्ये बोलनागरी वापरते आहे. <<

मी नुकतंच एका यंत्रावर पूर्ण फॉर्मॅट करून उबंटू १४.०४ टाकलं. त्यानंतर मी बोलनागरी एनेबल केलं तेव्हा आपोआप जरूरीप्रमाणे अ‍ॅप्ट-गेट वगैरे झालं. आता मी बोलनागरी कीबोर्ड वापरला की ळ, ण, ऱ्या येतात. मला फाईल स्वतःहून बदलावी लागली नाही. त्यामुळे ही अडचण जुन्या व्यवस्थेमध्येच येत असावी.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उबंटु १०.४ वर ibus वापरतोय.

उबंटु १०.४ वर ibus वापरतोय. फोनेटिक वापरुन बरच सुटसुटित लिहिता येत. माझा अनुभव चांगला अाहे. सर्वांनी वापरुन पहावा.

-रवी

हा फरक एवढा तीव्र असेल असं

हा फरक एवढा तीव्र असेल असं वाटलं नव्हतं. (कदाचित दुनियाभरच्या गोष्टी गूगल करायची स्वतःला आणि परिसरातल्या लोकांना असलेल्या सवयीमुळेही असेल.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठी संकेतस्थळं आणि गमभन

मराठी संकेतस्थळं आणि गमभन यांनी टंकनासाठी कष्ट करण्याची आवश्यकता नाही असं वाटतं.

नाही अहो, मला वाटत प्रत्यक्ष परिस्थिती बरीच निराळी आहे. माझ्याकडची आकडेवारी दर्शवते ९६ ते ९८ टक्के आंतरजालीय मराठी लोकांना मराठी टायपींग येत नाही. साधारणतः ३० % लोकांना शिकण्याची इच्छा असते पण अगदी छोट्या छोट्या गोष्टीत हि मंडळी अडकतात. उर्वरीत लोक अगदी गळ्याशी येई पर्यंत टायपींग साठी प्रयत्नही करत नाहीत. जेव्हा अगदीच अडतं त्यावेळी नेमकी आणि वेगवान मदत उपलब्ध होतच नाही. मग बहुतांश लोक रोमन लिपीवरच भागवतात आणि त्याचच समर्थनही करतात याचा अजून एक पुढचा पैलु आहे पण तो नंतर वेगळ्या धाग्यावर कधीतरी.

४० % मंडळी डिफॉल्ट सुविधांवर अवलंबून आहेत, खासकरून मिपा सारख्या संस्थळावरील डिफॉल्ट सेवा चार दिवस बंद करून लोकांना इतर सुविधा वापरुन टाईप करा म्हणावे तर परिणाम लक्षात येईल. गूगल पद्धती वापरणारे लोक २५ टक्क्यांच्या आसपास असावेत यातील मेजॉरीटी इतरत्र गुगल इमेल अथवा गूगलच्या ऑनलाईन टाईप सुविधेत टाईप करून इतरत्र कॉपी पेस्टवत असतात चेपुवर इतर बरेच प्रमाण केवळ शेअर करणार्‍यांचे असते त्यामुळे हि मंडळी चटकन लक्षात येत नाही. चेपु आणि मराठी विकिपीडियाकडे खूप मोठा ग्रामीण वाचक वर्ग आहे (ते रोमन लिपीत लिहितात म्हणजे इंग्रजीत लिहिता येते असे नाही) आम्ही आजकाल मराठी विकिपीडियावर चाळण्या लावून रोमन लिपीतील लेखन येऊच देत नाही परस्पर पलटवत राहतो म्हणून तेवढे लक्षात येत नाही. निभन्द् ओन् पोलिस् इन् मराथि, maidan मराठी विकिपीडियावरची हि उदाहरणे गेल्या दोनचार दिवसातली आत्ता लिहिताना तात्काळ समोर दिसलेली एखादी मोठी यादी वेळ काढून देणे अवघड असणार नाही. चेपु वरची पण असंख्य उदाहरणे देता येतील.

हि खालची आकडेवारी एका ऑनलाईन सर्वेमधली आहे. मी महाविद्यालयातन फिल्ड सर्वे पण घेतलेले आहेत आणि इतरही संदर्भाने लिहिले आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

धन्यवाद

फक्त राईट आल्टने (शिफ्ट न दाबता) झाले. धन्यवाद.

ड्रूपालमध्ये सारणी

ड्रूपालमध्ये सारणी बनवण्यासाठी HTML code बनवावा लागतो.

या वरच्या, कळफलकाच्या प्रतिमेमध्ये ज्या बटणावर चार अक्षरं आहेत, विशेषतः स्वरांची, त्यात उजव्या बाजूला खाली-वर जी अक्षरं आहेत त्यांच्यासाठी राईट आल्ट आणि शिफ्ट+राईट आल्ट ही बटणंही दाबावी लागतात.

अनपेक्षीत स्थाने शिकावयाचीच असतील तर इन्स्क्रिप्टच काय वाईट हाही प्रश्न उरतोच.

बोलनागरीत अनपेक्षित स्थानं म्हणून मला चार-पाच बटणांचं मॅपिंग लक्षात ठे‌वावं लागलं. इनस्क्रिप्ट कधीच वापरलं नसल्यामुळे २५ अक्षरांचं मॅपिंग लक्षात ठेवावं लागेल. इनस्क्रिप्टमध्ये फक्त k या बटणावर क आणि ख आहेत. शिवाय इनस्क्रिप्टमध्ये बरीचशी विरामचिन्हं टंकायची सोय नाही, त्यासाठी बदल करावे लागतातच.
पुन्हा, कोणाला काय सोयीचं वाटेल याचा प्रश्न आहे. मला गूगल ट्रान्सलिटरेट फारच गैरसोयीचं वाटतं. अनेकांना त्याशिवाय मराठी/हिंदी टंकन जमत नाही.

लिप्यंतरणाच कि मॅपींग इन्स्क्रिप्ट प्रमाणे करुन विंडोज मधून कार्यान्वीत न करता इन्स्क्रिप्ट वापरण्याची सुविधा विकि देऊ शकते तर हा अधिकचा पर्याय देणे गमभन आणि मराठी संकेतस्थळांनाही अवघड असू नये असे वाटते

हे करणं कितपत सोयीचं आहे याबद्दल मला प्रश्न आहे. फेसबुकावर अनेकांचं मराठी टंकन पाहून हे लोक युनिकोडात लिहीण्यासाठी गूगल ट्रान्सलिटरेट वापरताना दिसतात. स्मार्टफोन, टॅबलेट्सवर देवनागरीसाठी स्वतंत्र अॅप्स आहेत. विंडोज, मॅक आणि लिनक्स तीन सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या कंप्यूटर ओेएसवर देवनागरी टायपिंगची सोय आहे. (माझ्यासारख्या अडेलतट्टू लोकांसाठी, कीबोर्डाचा नकाशा स्वतःच्या हौस, सवयीप्रमाणे बदलण्याची सोय आहे.) अशा वेळेस मराठी संकेतस्थळं आणि गमभन यांनी टंकनासाठी कष्ट करण्याची आवश्यकता नाही असं वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अ, इ, उ इ या स्वरांसाठी राईट

अ, इ, उ इ या स्वरांसाठी राईट आल्ट (आणि शिफ्ट+राईट आल्ट) वापरायचं असतं. a, e, i, o, u या बटणांवरच सगळे स्वर आहेत. मी ऋ माझ्या सोयीनुसार बदलून w वर टाकला आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाग २ बोलनागरीची सुगमता intuitive ?

भाग १ मध्ये म्हटल्या प्रमाणे काही अक्षरे टंकता आली नाहीत, हे तात्पुरते बाजुला ठेवले तरीही प्रथमच मराठी टायपींग शिकणार्‍यासाठी शिकण्याचा कालावधी कमीतकमी ठेवण्यासाठी (लर्निंग कर्व्ह) सहज सुगमता (intuitive) असणे बरेच महत्वाचे असते.

सुगमतेच्या दृष्टीने f ट, F ठ, z श, , v ड, V ढ हि काँबीनेशन्स अनपेक्षीत वाटतात Z ॅ, x ् , X ॉ हि स्थाने सुद्धा वेगळी माहिती करून घ्यावी लागतात M ऽ अवग्रहासाठी वापरले जाते आहे आणि अवग्रहाचा मराठीत वापर कमी असल्या मुळे M अनुस्वारासाठी अधिक योग्य वाटतो. ख साठी kh ऐ साठी ai हे इंग्रजीतून सरावाने सर्वसाधारणपणे येतच असते. मराठी नामांचे रोमनायझेशनमध्ये करताना t त th T ट Th ठ असे सुगम वाटते.


आणि जर अनपेक्षीत स्थाने शिकावयाचीच असतील तर इन्स्क्रिप्टच काय वाईट हाही प्रश्न उरतोच. लिप्यंतरणाच कि मॅपींग इन्स्क्रिप्ट प्रमाणे करुन विंडोज मधून कार्यान्वीत न करता इन्स्क्रिप्ट वापरण्याची सुविधा विकि देऊ शकते तर हा अधिकचा पर्याय देणे गमभन आणि मराठी संकेतस्थळांनाही अवघड असू नये असे वाटते. विकिवरील वैश्विक भाषा सुविधा विस्तारक, द्रुपलमध्ये आयात करता आला तर खूप सारे पर्याय चटकन उपलब्ध करता येतील असे वाटते. (आणि फेसबुकवरही अशी गरज आहे असे वाटते.)

क् ट् असे आधी हलंत लिहून a टाईप करून अक्षर पूर्ण करावे का आधी क ट असे लिहून केवळ जोडाक्षरे लिहिताना पाय मोडावा. जोडाक्षरे लिहिताना पाय मोडताना पाय मोडावा म्हटले की ् हलंत चिन्हा साठी वेगळे अक्षर निश्चित करणे आले वेगळे अक्षर निशित करावयाचे तर प्रमाणीकरण हवे आणि सध्या त्या प्रमाणी करणाचा अभाव आहे. इन्स्क्रिप्ट मधे d ने पायमोडतात मराठी फोनेटीकात f ने आणि हिंदी बोलनागरीत x. एकतर मराठीत जोडाक्षरांची संख्या खूप कमी आहे असे व्यक्तीशः मला वाटत नाही. आणि ही प्रमाणीकरणाची गरज या मुळे प्रत्येकाने आपल्या आवडीची पद्धत चांगली असण्याचे निव्वळ दावे करण्या पेक्षा युनिकोड टायपींगच्या स्पर्धा आयोजीत करून सर्वाधिक वेग आणि सुलभता खरेच कोणत्या पद्धतीत मिळते याचे दूध का दूध पाणी चे पाणी करून सुधारणांची चर्चा का करू नये असे मला वाटते.

मी विकिस्रोत:ऑनलाईन मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा पर्याय उपलब्ध केला. मला शुभेच्छा मिळाल्या पण स्पर्धक अद्यापतरी काही मिळाले नाहीत (स्माईल) खरे तर केवळ दहा विस मिनीटे प्रत्येकाने दिलीतर सहज पणे एक चांगले काम हातावेगळे होते. (त्यासाठी दहावीस मिनीटेही लोक काढताना दिसत नाहीत म्हणून मी फॉर्मॅटला चिटकून राहणे अशी टिका वेगळ्या धाग्यातून केल्याचे स्मरत असेल. विकिवर नाही इतरत्र टायपींग स्पर्धा घेतल्या तरी हरकत नाही पण या विषयाचा व्यवस्थीत सोक्ष मोक्ष होणे गरजेचे आहे असे वाटते.

त्या शिवाय प्रत्येक पद्धतीतील कि मॅपिंग च्या तुलने साठी मराठी विकिपीडियावर (तुलनात्मक कळसूची) तक्ताही उपलब्ध केला,
त्यातही कुणी माहिती भरण्यास पुढाकार घेतला नाही. कोणत्याही क्षेत्रात सिस्टीमॅटीक काम करायचे म्हटले की मराठी माणूस काढता पाय घेताना दिसतो असे बर्‍याचदा वाटून जाते.
).

इन एनी केस बोलनागरीत मराठीच्या दृष्टीने काही सहमती आल्यास विकिपीडियावर मराठी बोलनागरी असा पर्याय देता येईल किंवा विकिवर वैश्विक भाषासुविधेत बोलनागरी प्रमाणेच एक (मराठी) फोनेटीक हा वेगळा पर्याय उपलब्ध असून अगदी कमीत कमी सुधारणांसहीत सहजपणे वापरून पाहता येईल. विकिवरील सध्याचे (मराठी) फोनेटीक वापरून अथवा अभ्यासून काही सुधारणा सुचवल्या गेल्यास आणि त्या पर्यायाचा वापर सुलभ होऊ शकल्यास स्वागतच असेल.

धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

भाग १ बोलनागरी टायपींग बाबत साहाय्य हवे

बोलनागरी बाबत माझ्या प्रतिसादा आधीच मिहीर यांचा प्रतिसाद आला. विकिवरील वैश्विक भाषा सुविधेत आधी हिंदी आणि नंतर बोलनागरी हा पर्याय निवडून प्रयत्न केला. मिहीर यांच्या प्रमाणेच खालील अक्षरे कशी लिहावयाची हा प्रश्न मलाही पडला. 'अर्थ' आणि 'उदाहरण' या शब्दात अ आणि उ असल्यामुळे लिहिता आले नाहीत.

(मिडियाविकि विस्तारक येथे साहाय्य बोलनागरी संबंधीत साहाय्य पान बनवले आहे ते तपासून योग्य असल्याचे खात्री करुन हवे आहे).

{|
|- खालील अक्षरे कशी लिहावयाची ( सोबतच द्रुपलात सारणी/टेबल कसा बनवायचा ?)
|अ || ?
|-
|आ || A
|-
|इ || ?
|-
|ई || ?
|-
|उ || ?
|-
|ऊ || ?
|-
|ओ || ?
|-
|औ || ?
|-
|अं || ?
|-
|अः || ?H
|-
| ऋ || ?
|-
| ॠ || ?
|-
| ऌ || ?
|-
| ॡ || ?
|-
| ऱ्या || ?
|-
| ऱ्ह || ?h
|-
| ॲ || ?Z
|}

हिंदी विकिपीडियावरील बोलनागरी या लेखात खालील छायाचित्र मिळाले पण त्यात दाखवल्या प्रमाणे स्वर-अक्षरे टाईप होताना दिसत नाहीत कदाचित चित्र जुने असावे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

किबोर्ड क्रिएटर ची लिंक गंडली

किबोर्ड क्रिएटर ची लिंक गंडली आहे.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अ?

बोलनागरीमध्ये नेहमीची अक्षरे आणि शिफ्ट दाबून लिहायची अक्षरे सोडून इतर अक्षरे असतात ती कशी लिहायची? उदा. अ, इ, उ इ. सुरुवातीला एक-दोनदा ती अक्षरे न वापरता लिहायचा प्रयत्न केला (चिपलकट्टींकडून प्रेरणा!), पण कंटाळून सोडून दिला.
बाकी गुगलचे मराठी इनपुट टूल्स आहे ते फारच ढ आहे असे वाटते. मी बर्‍याचदा जीमेलमध्ये चॅट करताना मराठी किंवा हिंदी लिप्यंतर वापरतो (गुगलचाच देवनागरी फोनेटिक कळफलक नव्हे). मराठी लिहिताना त्या बाब्याला मध्ये इंग्रजी शब्द आला, की काहीच कळत नाही. त्यामानाने हिंदीत इंग्रजी स्पेलिंगनुसार शब्द लिहिला तरी साधारण बरोबर लिप्यंतर दाखवतो असा अनुभव आहे. हा असा इंग्रजी शब्दांचा संच हिंदीच्या शब्दगटातून सरळ मराठीच्या शब्दगटात टाकला, तरी काम सोपे होईल. तसेही मी हिंदीत दोन मात्रा वापरण्याऐवजी अर्धचंद्र वापरण्यासाठी त्याला बरेच प्रशिक्षण दिले आहे. (डोळा मारत)

आयबसबद्दल वाचलं होतं की

आयबसबद्दल वाचलं होतं की त्यातही जोडाक्षरं एका कीस्ट्रोकमध्ये लिहीता येतात. पण वापरून पाहलेलं नाही. या सूचना वापरून काही उपयोग होतो का बघायला पाहिजे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अायबस

https://code.google.com/p/ibus/

आधी एससीआयएम वापरायचो. सध्या आयबस वापरतोय. अत्यंत उपयुक्त आहे. मी इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरतो त्यामुळे कीमॅप वगैरे बदलावा लागत नाही. फोनेटिक टंकलेखनाबाबत आयबसमध्ये सुविधा आहेत असे ऐकले आहे. बाकी सविस्तर वेळ मिळाल्यास नंतर लिहितो.

(अवांतर)

एफीशियण्ट (मराठी?)

कार्यक्षम.

बाकी चालू द्या.

आणखी पर्याय

बहुधा माहिती असेलच - गूगल मराठी इन्पुट
१. गूगल मराठी इन्पुट वेब ब्राउजर मध्ये - http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ इथे आहे.
२. गूगल language bar - http://www.google.com/inputtools/windows/index.html इथे मराठी साठी डाउनलोड करा.
-> त्यानंतर windows 8 मध्ये language preferences मध्ये > add a language > marathi असा एक पर्याय आहे. तिथे हा पर्याय निवडला की तुमच्या डेस्क्टॉप वर मराठीचा पर्याय दिसत राहील.
-> windows 7 साठी language bar मधे जाऊन मराठी पर्याय जोडता येईल.