Skip to main content

पुरोगामी महाराष्ट्र. एक भ्रम..

महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महिन्यावर निवडणुका येवून ठेपल्यात. सारे पक्ष आपापल्या उमेदवार याद्या जाहीर करण्यासाठी पितृपक्ष संपण्याची वाट पाहत आहेत पितृपक्षाचा पंधरवडा संपताच या उमेदवारांची यादी जाहीर होणार.
असे का ?
पितृपक्ष इतका अशुभ असतो?

महाराष्ट्रात एखादी अंधश्रद्धेची घटना घडली कि वृत्तपत्रात छापून येते कि पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडली हा कलंक आहे वैगरे वैगरे. परंतु पुरोगामी हा शब्द आता फक्त वृत्तपत्रात राहिला आहे. राज्यातील राजकीय पक्ष हेच स्वत पितृपक्ष वैगरे सारख्या अंधश्रद्धेने बरबटलेले आहेत कि त्यांनी पुढे भाषणात पुरोगामी हा शब्द काढणे हे चुकीचे ठरेल.

महाराष्ट्र पुरोगामी कधीच नव्हता जे काही थोडेफार पुरोगामी समाजसुधारक येथे होवून गेले त्यांना जिवंतपणी त्रासच भोगावा लागला नि त्यांच्या मरणानंतर त्यांचे कौतुक सुरु झाले. बाकी पूर्ण समाज हा प्रतिगामी होता नि प्रतीगामीच राहिला हे सत्य आहे.

एकीकडे आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास करण्याच्या गोष्टी करतो नि दुसरीकडे असले मागास विचार करत राहतो हे मागास मनुवृत्तीचे निर्देशक आहे. जर समजुतीनुसार पितृ पक्षात आपले पूर्वज भूतलावर येत असतील तर त्यांच्या उपस्तिथित एखादे शुभ कार्य होणे हे योग्य ठरेल पण आपण आपले पूर्वज भूतलावर येतात त्याच काळाला अशुभ मानतो असे का?

'महाराष्ट्र हा पुरोगामी कसा नाही' हे दर्शवणारी अजून उदाहरणे असतील तर कृपया देण्यात यावीत हि विनंती

वामा१००-वाचनमा… Sun, 21/09/2014 - 15:37

अगदी अगदी आपले बापजादे साले अंधश्रद्धाळू, वाय झेड अन वाया गेलेले, वैज्ञानिक दृष्टी नसलेलेच आहेत. पितृपक्ष वगैरे मानायचे. बाकी अमेरिकेतही हालोवीन नंतर ऑल सेन्ट्स डे येतो, मेक्सिकोतही पूर्वजांकरता एक दिवस राखून ठेवलेला आहे.
पण ते एक असोच .... आपण %$#^& हेच!!!