ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा: १ नोव्हेंबर
.... हां, तर -
कट्ट्याची तारीखः १ नोव्हेंबर
वेळ: सकाळी ९:३० १०:३० वाजल्यापासून लोक कंटाळून पांगेपर्यंत
ठिकाणः वहुमान कॅफे, पुणे स्टेशनजवळवाडेश्वर, फर्ग्युसन रोड
ज्यांना जमत असेल, त्यांनी जरूर या.
जमत नसल्यास, जमवा :)
हायला!
म्हणजे चिकन फ्राईड इन एग्ग्ज (स्लर्रर्रप्प्प!) मधल्या एग्ग्जचा जोरदार वास येऊन व्हेजीटेरीअन लोक वैतागणार तर? कोणी जर भेजाफ्राय मागवला तर यांचा भेजा सटकलाच म्हणून समजा! अजून पाचसहाशे प्रतिसाद खर्चून चांगली जागा नस्ती का निवडता आली!! पुण्यातल्या जन्तेमध्ये हे ठाणे अन मुंबईकर आले की असं व्हायचंच!
बदल!
अनेकांनी व्यनीमधुन सांगितल्यानुसार वहुमान कॅफे येथे १५+ च्या ग्रुपला जागा मिळणे कठीण वाटल्याने तसेच पार्किंगचा बराच प्रॉब्लेम होतो असा पूर्वानुभव काहींनी कळावल्याने बहुमताचा आदर करून भेटण्याचे ठिकाण व त्याचबरोबर वेळ बदलत आहोत.
आता वाडेश्वर, फर्ग्युसन रोड इथे सकाळी १०:३० वाजता भेटायचे ठरवले आहे.
तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.
======
माझ्या माहितीत हजर रहणारे सदस्यः
अंतराआनंद
गब्बर सिंग
मेघना भुस्कुटे
सविता
मी
मिहिर
मन
घनु
टिंकू
अमृतवल्ली
बॅटमॅन
केतकी आकडे
अनुप ढेरे
सिफ़र
चिंतातूर जंतू
उत्पल
अर्थात आयत्यावेळी यायचे ठरवणार्यांचे, वाचनमात्रांचे स्वागतच आहे :)
वाडेश्वर कट्टा
प्रस्तुत कट्टयाला मी इतक्या लांबून येऊ शकत नाही तरीहि कट्टयाला माझ्या शुभेच्छा!
ह्या कट्टयाबद्दल मला थोडी अधिकच जवळीक वाटत आहे कारण ह्याच जागी मी कॉलेजविद्यार्थी असतांना १९६०-६१ साली एक वर्ष राहात असे. त्याची कथा अशी:
हे वाडेश्वर - खरे तर व्याडेश्वर, जे कोकणातील एक देवस्थान असून अनेक चित्पावन कुटुंबांचे कुलदैवत आहे, व्याड म्हणजे सर्प, हिंस्र पशु इ. - जेथे आता आहे तेथे पूर्वी भावे नावाच्या गृहस्थांचे दोनमजली घर होते. खाली काही दुकाने अणि वर पुढे गॅलरी आणि मागे तीनचार खोल्या असे हे घर होते. दुकानांपैकी एक व्याडेश्वर नावाची अमृततुल्य प्रकारची टपरीहि होती असे आठवते. ह्या घराच्या छपरावर संडास-बाथरूमसह एकच खोली होती तेथे मी आणि माझा मित्र प्रमोद देव - हा नागपूर विद्यापीठात जर्मनचा प्राध्यापक होता पण सुमारे दहा वर्षांपूर्वी अकाली वारला - एक वर्ष भाडयाने राहात होतो. जागा अगदी मोक्याची होती. आर्यभूषण प्रेस समोरच होता आणि त्याकाळची फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरची तुरळक वाहतूक आणि कॉलेजकडे येणार्याजाणार्या कन्यका न्याहाळत बसायला खोलीची खिडकी अतिशय सोयीस्कर होती.
नंतरच्या काळात ह्या जागेबद्दल काही वाद, कोर्टकचेर्या झाल्या असल्या पाहिजेत कारण अगदी अलीकडे चारपाच वर्षे पूर्वीपर्यंत वरचा मजला आणि त्यावरची आमची खोली हे बेवारस असल्यासारखे मोडकळीस येऊन भग्नावस्थेमध्ये पडले होते. दर दोनतीन वर्षांनी पुण्यात आलो की मी एकदा तेथून खालून जाऊन तिकडे नजर टाकीत असे. खालची टपरीवजा दुकाने मात्र चालूच होती. त्यापैकी व्याडेश्वर टपरीचे आता वाडेश्वर उपहारगृह झालेले दिसते.
कट्टा झाल्यावर - वा त्यापूर्वीहि - ह्या इमारतीचे पुढे काय झाले आणि सध्या तेथे काय आहे असा अपडेट मिळाल्यास उत्तम.
कारण अगदी अलीकडे चारपाच वर्षे
कारण अगदी अलीकडे चारपाच वर्षे पूर्वीपर्यंत वरचा मजला आणि त्यावरची आमची खोली हे बेवारस असल्यासारखे मोडकळीस येऊन भग्नावस्थेमध्ये पडले होते. दर दोनतीन वर्षांनी पुण्यात
आलो की मी एकदा तेथून खालून जाऊन तिकडे नजर टाकीत असे. खालची टपरीवजा दुकाने मात्र चालूच होती. त्यापैकी व्याडेश्वर टपरीचे
आता वाडेश्वर उपहारगृह झालेले दिसते.
>> या वाक्यांमुळे तसे लिहीलेले. सध्या ज्या फॉर्ममधे वाडेश्वर आहे ते तसेच ११ वर्षांपासूनतरी आहे. वरचा मजला आणि खोलीकडे लक्ष गेले नाही. पहायला हवे.
हम तैय्यार है !!!
हम तैय्यार है !!!