शून्य

अथांग प्रवास
नको असण्याचा भास
गवसेल शून्य
तसा मिसळेल श्वास . . . १

दिवा उजेडास
जावे जरा आस-पास
स्वयं प्रकाशित
व्हावे शून्य शोधण्यास . . . २

दिसे गुण-दोष
घ्यावे सामावून त्यास
गळतील टोके
येई शून्य आकारास . . . ३

धरावे ढगास
काही लागेना हातास
येईल प्रचीती
कसे साधावे शून्यास . . . ४

सोडोनिया पाश
काही नसताना शेष
चालत राहावे
होई शून्य समावेश . . . ५

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

एकुणात शुन्य तुमचे आवडते दिसतेय Smile

याही कवितेचे नाव शून्य आहे. त्यामुळे एकच धागा दोनदा प्रकाशित झाला की काय वाटले Smile
तेव्हा योग्य वाटल्यास शीर्षक शुन्य-२ किंवा जसे योग्य वाटेल तसे बदलावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे शून्य जमलं नाहिये. 'बिगरी ते मॅट्रिक' मधे पुलनी म्हंटलंय की "आम्हाला कर्ता आला, कर्म आलं, फक्त ईंग्लिश आलं नाहि"! तत्सम, या रचनेत यमक आहे, नादमयता आहे पण कविता नाहिये ;-). 'शून्य' हे नाव काढून वाचून पाहिली पण तरीहि काहिहि हाताशी लागलं नाही. तुझी दुसरी 'शून्य' मात्र सुरेखच आहे.

ऋषिकेश म्हणतोय त्याप्रमाणे या कवितेचे नाव बदलावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....