शून्य

चल शून्याच्या बाजू मोजू .
अन मोजुया खोली .
या शून्याचा आवाज कैसा ?
कैसी याची बोली ?

काय असे हो पाठी पुढती ?
अन शून्याच्या भोवती ?
अंत म्हणावा पाताळाचा ?
की शिखराच्या वरती ?

निराकार हा शून्य असे ,
की साकारीत होतो ?
शून्याचे जरी चित्र पुसावे ,
शून्य शेष उरतो .

चल शून्याच्या शोधामध्ये
शून्य उरे हाताशी .
रिक्त मानाने शांत बसावे
शून्य मिळे शून्या सी .

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

पुलंची वाक्यं आठवली:

तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असली टाळ्याखाऊ नि बिनडोक वाक्ये फेकणारे पुलं देखील आजकाल डोक्यात जाऊ लागलेत. त्यांनी फक्त विनोदी लिहावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांगतो त्यांना..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसू का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हसू नका बरे..

-(चंपकप्रेमी)गवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंमळ हळवा जाहलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विषय नेहमीचा असला तरी छान नादमय रचना
काही वाक्यांत मात्रा कमी पडल्याने अडखळलो

बाकी, ऐसीवर स्वागत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर कविता आहे हि. बर्‍याच दिवसानी 'कविता' या सदरनामाला सार्थ करणारी कविता वाचली. सुरेखच जमल्येय. मनात आलं कि "शून्याच्या संकल्पनेवर छान विणल्येय कविता" - आणि पटकन गदिमांचं "एक धागा सुखाचा" गाणं आठवलं. मानवाचं आयुष्य हे एखादं वस्त्र आहे या कल्पनेभोवती विणलेली कविता.


शून्य आहे तरी काय? पासून सुरूवात आणि शेवटी

रिक्त मानाने शांत बसावे
शून्य मिळे शून्या सी

निखिल, व्वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

ह्या कवितेचा स्विस अकाऊंटशी काही संबंध जोडता येईल का ? मोदी सरकार सध्या या शून्यांचीच खोली मोजत बसले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0