आनंद विरुद्ध कार्लसन - डाव १
सुमारे दिवसभराने बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठी विश्वनाथन आनंद विरुद्ध मॅग्नस कार्लसन यांच्यातल्या स्पर्धेचा पहिला डाव सुरू होतो आहे. ही स्पर्धा सोची, रशिया इथे होणार आहे. ८ नोव्हेंबरच्या शनिवारी पहिला डाव तिथल्या (मॉस्को टाइम) दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. त्यावेळी भारतात संध्याकाळचे ५:३० वाजलेले असतील तर अमेरिकेत इस्ट कोस्ट टाइमनुसार शनिवारी सकाळचे ७:०० वाजलेले असतील. ८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १२ डाव खेळले जातील. जर यांत बरोबरी झाली तर २७ नोव्हेंबरला टायब्रेकरसाठी वेळ ठेवलेला आहे.
ही मॅच पाहण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मी स्वतः अॅंड्रॉइड अॅप डाउनलोड केलेलं आहे. https://play.google.com/store/apps/details?id=ch.bullfin.chesswc2014&hl…
खाली तुम्हाला लाइव्ह खेळ दिसेल.
ही फिडेची अधिकृत वेबसाइट
http://www.sochi2014.fide.com/
तसंच चेसडॉम.कॉम चेस.कॉम या काही चांगल्या साइट्स आहे.
http://www.chessdom.com/carlsen-anand-2014
http://www.chess.com/tv
युट्यूबवरही प्रक्षेपण मिळेल.
चला तर, एकमेकांच्या सहाय्याने या डावात नक्की काय घडलं, कसं घडलं हे समजावून घेऊ. जमल्यास 'अरे, साला तेंडल्याने इथे स्क्वेअर कट मारायला हवा होता रे.' वगैरे कॉमेंटाही करू.
आनंदचा एक जबरदस्त गेम खाली
आनंदचा एक जबरदस्त गेम खाली पाहता येईल. एकाच वेळी आपला हत्ती, उंट आणि घोडा 'अरे, खा की!' म्हणत त्याने अरोनिअनला दिला होता. पण त्यामुळे आक्रमणाची धार वाढलेली होती.
13. O - O - O ..... c6
तेराव्या मूव्हला आनंदने क्वीनसाइड कॅसल केलं. यानंतर कार्लसेनने विचार करण्यात प्रचंड वेळ घालवलेला आहे. आनंदच्या खेळी फक्त चार मिनिटात झाल्या, तर कार्लसेनची पंचेचाळीस मिनिटं गेली आहेत. शेवटी कार्लसेनने आनंदच्या प्याद्यांच्या मालिकेवर हल्ला करण्यासाठी प्यादं c6 वर आणलं. आता कार्लसेन त्याची उजवी बाजू मोकळी करणार आणि पांढऱ्या राजावर हल्ला करणार तर आनंद त्याच्या उजव्या बाजूने h प्याद्याने हल्ला करून राजाचा किल्ला मोडून काढण्याचा प्रयत्न करणार.
14 Qc3 ... f6 15 Bh3 ... cxd5 16 exd5
प्रचंड विचार करून आनंदने वजीर c3 वर नेला. ताबडतोब दोनतीन गोष्टी झाल्या. काळ्याच्या वजीरावर पांढऱ्याच्या हत्तीचा रोख आला. तसंच काळ्याचा घोडा राजापुढे अडकला. त्यामुळे काळ्याला घोड्याच्या आणि राजाच्या मध्ये प्यादं घालणं अत्यावश्यक होतं. कार्लसेनने ते ताबडतोब केलं. पुढच्या मूव्हसाठी आनंदने पुन्हा बराच विचार केला आणि उंट h3 वर नेऊन ठेवला. आता आनंदचा प्रयत्न एक प्यादं पुढे नेऊन त्याचा वजीर करण्याचा आहे. त्यासाठी एक प्यादं अधिक राहून सगळे मोहरे अदलाबदल करून टाकायचे असा प्लॅन वाटतो. cxd5 16 exd5 प्याद्यांची मारामारी झाली. कार्लसेन पुन्हा प्रचंड विचार करतो आहे. बघूया पुढे काय होतं ते.
16 exd5...Nf7 17. f4... Qd6 18 Qd4 Rad8 19. Be6 Qc6 20. Qd2
आनंदच्या टांगत्या राहिलेल्या प्याद्यावर सगळी मारामारी आता चालू आहे. दोन्ही वजीर आणि दोन हत्ती त्या उभ्या ओळीत आलेले आहेत. आनंदने आपला उंट अतिशय महत्त्वाच्या जागी नेऊन ठेवलेला आहे. आता कार्लसेनने वजीराने हल्ला सुरू केला आहे. आनंदला सध्यातरी राजाच्या बाजूचं आक्रमण चालू ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या प्याद्यांना त्याने वजीर हलवून जोर दिलेला आहे.
मधल्या २० खेळींमध्ये खेळाचं
मधल्या २० खेळींमध्ये खेळाचं चित्र पार पालटलं. वेगवेगळ्या शक्यता असलेला क्लिष्ट डाव आटपून सुलभीकरण झालं. उंट, घोडे व हत्ती एक्श्चेंज झाल्यामुळे आनंदची राजाच्या बाजूने हल्ला करण्याची क्षमता जवळपास नष्ट झाली आहे असं म्हणता येईल. उजव्या बाजूला दोन प्यादी एकमेकांपासून सुटी असल्यामुळे त्यांचा बचाव करणं सोपं असलं तरी त्यांच्याकडून काही हल्ला होणं शक्य दिसत नाही. आता दोघांकडे राजा, हत्ती, वजीर आणि चार प्यादी शिल्लक आहेत. त्यामुळे एंडगेमला सुरूवात झालेली आहे. सुरूवातीला आक्रमक आणि आकर्षक दिसणाऱ्या आनंदच्या डावातून हवा काढून घेण्यात कार्लसेनला यश मिळालेलं आहे.
आत्ता या क्षणी आनंद जिंकू शकेल असं वाटत नाही. जिंकलाच तर कार्लसेन, पण तीही शक्यता कमी वाटते.
काय गुर्जी
इतकी घाई धागा काढण्याची. अहो प्रतिसादाविना बोर्डाबाहेर जाईल ना. उद्या उद्घाटन नि परवा पहिला सामना आहे. तोवर झोपेल की धागा. पिन करून ठेवता येतोय का पहा बरं