मूळ

मूळ कधीच दिसत नाही
झाड मात्र दिसतं.
झाड सुंदर दिसलं तरी
मूळ लपूनच बसतं.

खोडा सकट झाड हलत
मूळ घट्ट असतं ना.
त्याचा विचारच होत नाही
झाडा खालून जाताना.

मुळान्ना ही वाटत नसेल
आपण ही बाहेर यावं
सगळं श्रेय खोडाच्या वर
आम्हीच का मागे राहावं.

नाचावं खेळावं खूप हलावं
दव झेलून किरणांना शिंपडाव.
केसांत सजण शक्य नाही
निदान बांधायला तरी वापरावं.

पण मुळान्ना नसतात प्रश्न असले
मुळान विना झाडच वठले.
झाड सुंदर ठरावे म्हणूनच
मूळ जमिनीत दडून बसले.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

आवडली. चेतनागुणोक्ती काय कायसं म्हणतात ना या कवितेला? जाणकारांनी प्रकाश टाकावा. म्हनजे पाने-फुल-पक्षी आदिंवर मानवी स्वभावाचे आरोपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयत्न चांगला आहे पन सुदलेकनाकडं बगा की जरा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0