Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न / विचार - भाग २७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

आधीचे सर्व धागे इथे वाचता येतील. - मनातले छोटेमोठे प्रश्न/विचार

==========
यावरुन काही जाहिराती आठवल्या आणि डोल्यांच्या कडा ओलावल्या:

-हर घर में उजियाला लाये.. सीमा सीमा सीमा सीमा..

-ईसीई बल्ब लाना.. ब् ब ब ब बल्ब..

-जब मैं छोटा बच्चा था.. बडी शरारत करता था..

-हम है लक्ष्मण सिल्वेनिया दुश्मन अंधेरे के.. देश भर में हमारी शान

-उषा आह उषा आह ऊषा... ऊ SS षा..

-हर घर की रोशनी का राझ है सूर्या सूर्या.. सूर्या ट्यूब्ज सूर्या बल्ब्ज..

-ओरेवा आला रे आला बिल बिजली का कम हुआ लाला.(यात टिकू तल्सानिया गात असताना मधेच एका मिलिसेकंदापुरती ती वृद्ध अभिनेत्री का चमकून गेली आहे टेस्ला जाणे)

बल्बसोबत हेही सर्व अस्तंगत झाले वाटते (ओरेवा सोडून)

गवि Fri, 07/11/2014 - 12:37

In reply to by बॅटमॅन

असेलही, पण कशाची

फ्लेवर्ड पंख्यांची.

गवि Fri, 07/11/2014 - 12:30

In reply to by अनुप ढेरे

हो.. त्यात बहुधा एक सुंदर तरुणी उषा पंख्यामुळे भोवळ आल्यासारखे (मादक) हावभाव करते.(म्हणजे सुंदर तरुणी उषा नव्हे. पंखा उषा)

Nile Fri, 07/11/2014 - 22:33

In reply to by गवि

किरकोळ आठवणीवरून, फर्निचर वगैरे काहीही नसलेल्या उनाड खोलीत मध्यावर पंखा ठेवलेला असतो अन घामेजलेली ही तरूणी हवा खात असते?

ऋषिकेश Mon, 10/11/2014 - 15:01

त्या "जब मै छोटा बच्चा था..." च्या चालीवर 'क्यु हो गया ना?' या टुकारपटात एक बहुदा रोम्यांटीक वगैरे (विसरलो) गाणे बेतलेले बघुन त्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शकाची कीव आली होती.

जाहिरात इतकी प्रसिद्ध असूनही चाल चोरायला धैर्य लागते.

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 13:49

मराठी आंतरजालापुरते तरी हे निरीक्षण बहुतांश खरेच आहे. अन्य डिस्कशन फोरम्सवरतीही खरे असावे (यद्यपि तुलनेने जरा कमी खरे), परंतु त्यासंबंधी तितकी खात्री नाही.

ऐसी वा मिपा वा मायबोली इ.इ. ठिकाणी आपण अनेकविध यूजरनेम्स घेऊन वावरतो. त्यांचे क्लासिफिकेशन साधारणपणे खालील प्रकारांत करता येईलः

-स्वतःचे पूर्ण वा अर्धवट नाव आहे तस्से किंवा त्याची जराशी मोडतोड.
-एखादे सिनेमातले/सीरियलमधले/कॉमिकमधले/पुस्तकातले पात्र.
-अ‍ॅब्स्ट्रॅक्ट नाव, उदा. अर्धवट, अतिशहाणा, इ.

तर प्रश्न असा, की यांपैकी "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" कॅटॅगिरीत महिला वा महिलासदृश आयडींचे प्रमाण बरेच कमी असते. याचे कारण काय असावे? इंग्रजी फोरम्समध्येही असेच दिसते का?

गवि Thu, 13/11/2014 - 13:50

In reply to by बॅटमॅन

यांपैकी "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" कॅटॅगिरीत महिला वा महिलासदृश आयडींचे प्रमाण बरेच कमी असते

यह कैसे पता चला तुम्हारेकू ?

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 14:00

In reply to by गवि

मराठी आंजावरील जो काही वावर आहे त्याआधारे मांडलेले निरीक्षण आहे. डुआयडी इ. मान्य करूनही जेन्विन महिलांचे तसे आयडी घेण्याचे प्रमाण कमी आहे असे निरीक्षण आहे. विदा घेऊनही हे सिद्ध करता यावे असे वाटते, पण ते नंतर कधीतरी करू. तूर्तास अ‍ॅनेक्डोटल एव्हिडन्सच्या आधारे बोलतो आहे. एकूणच 'इम्पर्सनल' छाप आयडी घेण्याचे प्रमाण महिलांत कमी आहे असा माझा समज आहे.

आदूबाळ Thu, 13/11/2014 - 15:34

In reply to by बॅटमॅन

सॉलिड प्रश्न आहे. माझ्यामते या तीन प्रकारांना anonymity scale वर बसवलं, तर:
- नावाची मोडतोड = सर्वात कमी अ‍ॅनॉनिमिटी
- पात्र = मध्यम अ‍ॅनॉनिमिटी
- अ‍ॅबस्ट्रॅक्ट = सर्वात जास्त अ‍ॅनॉनिमिटी

स्त्रीआयड्यांना सर्वात जास्त अ‍ॅनॉनिमिटीची गरज भासू नये हे रोचक आहे.

-----------------
उदा. 'न'वी बाजू. ऐसीवरचे सर्वात रहस्यमय व्यक्तिमत्त्व. यह हस्ती कौन हय, क्या (म्हणजे स्त्री की पुरुष) यह कोई नहीं जानता. ग्यारह मुल्कों की पुलीस... वगैरे वगैरे.

अजो१२३ Thu, 13/11/2014 - 16:18

In reply to by आदूबाळ

अहो, असे काय म्हणता? ऐसी मी फक्त १-१ १/२ वाचत आहे. थोडी मेहनत घेतली आणि थोडा तिकिटाचा पैसा वेचला तर आठवडाभरात त्यांच्या अपार्टमेंटखाली थांबून "नवीबाजूजी, नीचे आव" अशी आरोळी लावू शकतो इतकं ते इथे टायपून बसले आहेत.

'न'वी बाजू Thu, 13/11/2014 - 16:41

In reply to by अजो१२३

आठवडाभरात त्यांच्या अपार्टमेंटखाली थांबून "नवीबाजूजी, नीचे आव" अशी आरोळी लावू शकतो इतकं ते इथे टायपून बसले आहेत.

अपार्टमेंटखाली???

(*बीएमडब्ल्यू=बेसिक्समध्ये वांदे.)

काळा मठ्ठ बैल … Thu, 13/11/2014 - 17:20

In reply to by अजो१२३

थोडी मेहनत घेतली आणि थोडा तिकिटाचा पैसा वेचला तर आठवडाभरात त्यांच्या अपार्टमेंटखाली थांबून "नवीबाजूजी, नीचे आव" अशी आरोळी लावू शकतो इतकं ते इथे टायपून बसले आहेत.

पण का?
एक पुरुश
त्यात म्हातारा (४०+)
पुण्यातला बामण
मग एनाराय झाला
आय्टी हमाल वैग्रे
त्यला पुल वैग्रे आवडतात
.....
किति बोर...
अहो का त्याच्या मागे जाता?
कि तुम्ही गे वैग्रे अहात जोशी?
मग ठीके.

राही Thu, 13/11/2014 - 19:41

In reply to by काळा मठ्ठ बैल …

आणि 'अ‍ॅट्लाणss ' अ‍ॅट्लाणss ' विसरलात की काय?

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 17:00

In reply to by आदूबाळ

स्त्रीआयड्यांना सर्वात जास्त अ‍ॅनॉनिमिटीची गरज भासू नये हे रोचक आहे.

अगदी असेच म्हणतो.

नावाची मोडतोड वा पात्र यांपैकी काही नसलेली नावेही स्त्रीआयडी घेतात, उदा. पिशी अबोली, टिंकू, इ. पण त्यात व्यक्तित्वाची छाप कुठेतरी स्पष्ट दिसते. त्याउलट अर्धवट, काळा मठ्ठ बैल, न'वी बाजू, मन, अतिशहाणा, इ. मध्ये असा अर्थबोधही होत नाही. इंग्लिश डिस्कशन फोरम्समध्ये अशी नावे लै आहेत. तिथे तर एकाक्षरी अन अक्षर-अंकी आयडीही लै असतात. (मआंजावरचे उदा. ३_१४ विक्षिप्त अदिती- पण इथेही व्यक्तित्व दिसते आहेच.) व्यक्तिमत्त्व आजिबात न जाणवेलसा आयडी घेणार्‍यांत पुरुष जास्त असतात असे वाटते. पात्रांची नावे प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे घेतो ते आहेच. त्यात प्रेफरन्सेस क्लीअरकट दिसतात. पुरुष आयडी हे कैकदा अ‍ॅक्शन हीरो/जण्रल हीरो/व्हिलन नायतर विझार्ड किंवा सायंटिस्ट इ. चे असतात, उदा. ओबामा, आरागोर्न, बॅटमॅन, गब्बर, इ.इ. त्याउलट स्त्री आयडी मात्र अशा पद्धतीची नावे घेताना दिसत नाहीत तितकेसे. या ना त्या प्रकारे व्यक्तिगत आणि स्त्रीवाचक ओळख ठसावी असा स्त्रीआयडी घेतात असे इन जण्रल पाहिले आहे. अर्थात माझे निरीक्षण तोकडे अथवा चुकीचे असेल तर आय अ‍ॅम ऑल ईअर्स/आईज़ टु सी विदा.

'न'वी बाजू Thu, 13/11/2014 - 17:05

In reply to by बॅटमॅन

नावाची मोडतोड वा पात्र यांपैकी काही नसलेली नावेही स्त्रीआयडी घेतात, उदा. पिशी अबोली, टिंकू, इ.

'टिंकू' ही पात्राच्या नावाची मोडतोड आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

बाकी चालू द्या.

अजो१२३ Thu, 13/11/2014 - 17:13

@ नवीबाजू - चूक आणि भूल यांच्यात काय फरक आहे? इतके दिवस इतक्या चूका, भूली* देऊन घेऊन तुमच्याकडे, तुमच्या लोकांकडे किती उरल्या आहेत? तुम्ही त्यांचे काय करता?

*का भूला?

ऋषिकेश Thu, 13/11/2014 - 17:19

जगाने धर्म आणि आतंकवादाची सांगड घालणे नाकारले पाहिजे हे पंतप्रधानांचे मत जगात जाऊ दे भारतातील किती जनतेला पटत असेल कोण जाणे!

तुम्हाला पटते?

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 17:35

In reply to by ऋषिकेश

बाकी अल्पसंख्याक बांधवांच्या केसमध्ये पटते, परंतु 'भगवा दहशतवाद/आतंकवाद' या संज्ञेबद्दल मात्र सांगड घालावीच लागते असे म्हणतात बॉ लोक.

अनुप ढेरे Thu, 13/11/2014 - 17:36

In reply to by बॅटमॅन

या संस्थळावर अगदी अलीकडे हिंदू तालिबानी ही संज्ञा वाचनात आली.

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 17:39

In reply to by अनुप ढेरे

ती योग्यच आहे, मात्र अल्पसंख्याक समाजाबद्दल मात्र कुणी तसे बोलू नये, चालू फ्याशनच्या विरोधात जातं. फ्याशनचा महिमा अपरंपार!!!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/11/2014 - 20:57

In reply to by अनुप ढेरे

तालिबानी म्हणजे दहशतवादी/अतिरेकी समजले जातात ते लोक नव्हे. धर्माचा अतिरेक करणाऱ्या सनातन्यांना तालिबानी म्हणतात. त्या व्याख्येत सरळसरळ धर्माचाच संबंध आहे.

मारवा Sat, 15/11/2014 - 08:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१- हिंदु जे मुस्लिमद्वेष्टे आहेत ते सहज नेणीवेच्या प्रभावात हिंदु मधील जे जे वाइट अतिरेकी अस असेल त्याला दुषण देतांना नेणीवेतुन जो शब्द उचलतील तो परत एकदा त्यांच्या मनातील मुस्लिमद्वेष व्यक्त करणारा च असेल. त्याला तालिबानी संबोधुन जो मुळ मुस्लिम द्वेष आहे तोच या मार्गाने व्यक्त होत असतो.
२-तालिबानी हा मुळ पुश्तु भाषेतील शब्द ज्याचा अर्थ विद्यार्थी ( जो मुळ शब्द तसा सकारात्मक आहे ) मात्र तो मुस्लिमद्वेष्टा हिंदु असा जो माणुस आहे त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करेल.
३- आता तालिबान्यांच्या कृत्याने जरी ते अतिरेकी हे सिद्ध झाले असले तरी त्यांचा उल्लेख त्या त्या देशातले प्रांतातले ते अतिरेकी असा होऊ शकतो पण असे न होता घाउक सरसकटीकरण सोपे जाते
४- वरती अदिती यांनी जी व्याख्या केली त्यात मुळ अर्थाला सरळ उडवुन लावल दुसरी गंमत अशी की हे जर खुप च शब्द कोरुन काढल्या सारख वाटत असेल तर दुसर उदाहर्ण बघा
अहो बाबा ए आई यातुन या साध्या संबोधनातुन देखील खोलवर नेणीवेत रुजलेला पुरुषप्रधान समाजाचा चेहरा दिसत असतो की नाही तसच हे आहे हिंदु अतिरेक्याला नुसत अतिरेकी न म्हणून थांबता तालीबान हे विशेषण वापरण ( तालीबान्यांनी कितीही शब्दाची बदनामी केली तरी) हे वरील पुरुषप्रधान टाइपच नेणीवेतील हिंदु प्रेम मुस्लिम द्वेष आहे.
५- आता विरोधी उदाहरणाने बाब स्पष्ट होइल आता वारकरी डाउ केमीकल्स विरुद्ध आंदोलन करतात समजा ते उग्र झाल त्यांनी चार टाळकी फोडली, किंवा जादुटोणा विरोधात ते धिंगाणा घालत घालत समजा हिंसक झाले, बंंडातात्या टाइप लीडर हे वास्तवात आणण्याची शक्यता अगदिच नाकारता येत नाही
तर वरील प्रमाणे हिंदुद्वेष्टा मुस्लोम माणुस मग असे संबोधन कदाचित वापरेल ते अस वापरण त्याला आवडेल
मुस्लिम वारकरी मोकाट सुटलेत , मुस्लिम वारकर्यांनी हिंसा माजवली हिंसेचा नंगानाच चालवलाय रस्त्यावर , मुस्लिमांत हि सगळेच वारकरी नसतात
हिंदु मधे देखील वारकरी असता.
प्रत्येक माणुस हा वारकरी नसतो मात्र सर्व वारकरी हिंदु च असतात
इथे हिंदु म्हणतील अहो तुम्ही वारकरी या मुळ शब्दाचा अपमान करत आहात मुस्लिम म्हणतील अहो तो शब्द बदनाम झालेला च आहे. मग केला तर काय हरकत आहे

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/11/2014 - 09:12

In reply to by मारवा

नाझी हा शब्द हिंदू-मुस्लिम नसूनही मला बदनाम वाटतो. फासिस्ट हा शब्दही.

विश्वासघातकी माणसांची सहजच शरद पवारांशी तुलना होते. परंपरेच्या नावाखाली मूर्ख फतवे काढल्यावर, लोकांना देशोधडीला लावल्यावर सहजच खाप पंचायतीची आठवण होते. अस्मिताजन्य मोडतोड करणार्‍यांना ब्रिगेडी म्हणत हिणवलं जातंच.

आपण ज्यांना दहशतवादी म्हणतो ते स्वतःला क्रांतिकारक समजतात. (क्रांतिकारक हा शब्द बदनाम नाही.) त्यांच्याकडे सत्ता, बहुमत, बहुसंख्या नसते. तालिबान्यांकडे सत्ता होती.

मला पुश्तू येत नाही, खाप या शब्दाचं मूळही माहीत नाही. पण ठराविक शब्दांचे अर्थ तयार होतात, बदलतात.

(विदा नसूनही, भटजी, बडवे, उत्पात, पुजारी, साधू, आखाडा प्रमुख लोकांपेक्षा मौलवी जास्त सभ्य, शिकलेले, सुसंस्कृत वाटतात. उस्ताद आणि पंडित दोन्ही सुश्राव्य वाटतात.)

बॅटमॅन Sat, 15/11/2014 - 15:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(विदा नसूनही, भटजी, बडवे, उत्पात, पुजारी, साधू, आखाडा प्रमुख लोकांपेक्षा मौलवी जास्त सभ्य, शिकलेले, सुसंस्कृत वाटतात.

भाषिक न्यूनगंड, दुसरे काय? हाही प्रकार उत्क्रांतीला साजेसाच असावा बहुधा. त्या हिशेबाने 'माझा मराठाचि बोलु कौतुके' इ.इ. उत्क्रांतीविरोधीच.

अजो१२३ Mon, 17/11/2014 - 13:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(देण्यासारखा वेल फॉर्मॅट्टेड) विदा नसूनही पुरोगामी लोक मला महामूर्ख वाटतात.

काळा मठ्ठ बैल … Thu, 13/11/2014 - 17:47

In reply to by ऋषिकेश

जगाने धर्म आणि आतंकवादाची सांगड घालणे नाकारले पाहिजे हे पंतप्रधानांचे मत

खुप उंदीर खाल्ले
आता बोका काशिचा एम्पी झालाय
म्हण्जे बरोबरच्चे मोदि म्हणतो ते

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 17:50

In reply to by काळा मठ्ठ बैल …

पण ते आचार-विचार-संबंध वगैरे मिथ्या आहेत ना सगळे?

काळा मठ्ठ बैल … Thu, 13/11/2014 - 17:53

In reply to by बॅटमॅन

पण ते आचार-विचार-संबंध वगैरे मिथ्या आहेत ना सगळे?

साहेब
सन्स्क्रुत फार वापरू नका
कै कळ्ळत नै

बॅटमॅन Thu, 13/11/2014 - 17:55

In reply to by काळा मठ्ठ बैल …

ज्ञानाप्रमाणेच अज्ञानाचे प्रदर्शनही 'रोचक' असते, तेव्हा उजेड वा अंधार यांपैकी काही न पाडलेत तर अजून बरे.

अजो१२३ Thu, 13/11/2014 - 17:51

In reply to by ऋषिकेश

भारतात तरी मुस्लिम आतंकवाद्यांपेक्षा हिंदू आतंकवादी जास्त आहेत. फक्त ते मेट्रोत स्फोट करत नाहीत म्हणून लाइमलाइट मधे नसतात. शिवाय ते "हिंदू धर्मासाठी" आतंकवादी नक्कीच नाहीत. पूर्वोत्तर भारतात ख्रोश्चन अतिरेकी चिकार आहेत. तेव्हा खालिलप्रमाणे म्हणता येईल-
१. एकतर जगातली कोणतीच धार्मिक तत्त्वज्याने लोकांना आतंकापासून परावृत्त करायला पुरेशी नाहीत किंवा लोक धर्म नीट पाळत नाहीत.
२. जगात इस्लाम प्रेरित आतंकवाद आहे तेव्हा एकतर ते तत्त्वज्ञान आतंकवाद प्रेरित करते किंवा लोक इस्लामही नीट पाळत नाहीत. पण ज्या अर्थी ९९.९९% धार्मिक मुस्लिम जगात सुखाने राहतात तेव्हा तत्त्वज्ञानात खोट नसावी. त्याची एक फॉल्टलाईन वापरून, इस्लामिक नावाचा राजकीय / अर्थिक आतंकवाद चालू असावा.

अजो१२३ Thu, 13/11/2014 - 17:58

In reply to by अतिशहाणा

मोदींना हे जन्मापासूनच पटलेले आहे. २००२ पूर्वीचे, मिडियाचा संबंध न आलेले मोदी उकरून काढा. मोदी कसे आहेत हे तुम्हाला आज कळले हे मात्र फार लेट आहे. पण असो, सगळे सगळ्यांना कळत आहे ही जगासाठी, देशासाठी आनंदाची गोष्ट आहे.

राही Thu, 13/11/2014 - 19:48

मुंबईमध्ये राज्यपालांच्या कालच्या भाषणात सतत 'माझे सरकार', माझे सरकार' असा उल्लेख होता. हे उचित आहे का? या पूर्वी असा उल्लेख राज्यपालांकडून ऐकल्याचे आठवत नाही.

अनुप ढेरे Thu, 13/11/2014 - 19:52

In reply to by राही

असाच असतो उल्लेख. राष्टृपतींच्या भाषणात देखील माझे सरकार अमुक करेल तमुक करेल अशीच वाक्य रचना असते. कारण सरकार हे थेरॉटिकली राज्यपाल/राष्ट्रपती यांचं असतं बहुदा आणि ते मुख्यमंत्री/पंतप्रधान कारभार चालवायला नियुक्त करतात.

मारवा Fri, 14/11/2014 - 17:23

In reply to by राही

१-चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात. चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी. कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ? अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबई त कुठले ? त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ? सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ? ऑथेंटीक मेलीस्सा ऑइल कुठे मिळेल ? कसे ओळखावे ?

२-मकाऊ व लासवेगास मधील कॅसिनोमधील जुगाराची सर्वात कॉम्प्लेक्स मशीन कुठली? जुगाराचा सर्वात चॅलेंजींग गेम कुठला ? का ? कसा खेळला जातो ? त्यात मानवी क्षमतेचा रोल कितपत असतो ?

३-ब्रायडल (नववधु श्रुंगार) मेकअप चे पॅकेजेस कीती किमंती पर्यंत हायएस्ट जाउ शकतात ? त्यात नेमक्या कुठल्या सौंदर्यवृद्धी प्रक्रीयांचा स्टेप्स चा समावेश केला जातो (या मध्ये कमालीची गुप्तता पाळली जाते म्हणुन आपलं एक कुतुहल वाढल )

४-मराठी अभिनेत्रींमध्ये स्तंभलेखनाची (वा लेखनाची) परंपरा जुनी आहे का ? त्यात कोणकोण आहे? उदा. गेला बाजार स्मिता पाटील सद्य बाजार स्प्रुहा जोशी अजुन कोण आहेत? मराठी अभिनेत्रींना ललित च का लिहावेसे वाटते? काय प्रेरणा आहे या मागे ?

५-ब्रह्मकुमारी मध्ये माऊंट अबु च्या हेडक्वॉर्टर मध्ये शिवबाबा एका मोठ्या कार्यक्रमात मुख्य स्त्री च्या अंगात संचार करतात व त्यानंतर शिवबाबांचा विवाह दुसर्या ब्रह्मकुमारीं शी लावला जातो हा काय प्रकार आहे नेमका ? या मागे काय भावना आहे ? यानंतर त्या ब्रह्मकुमारीच्या जीवनात नेमके काय बदल होतात ? बह्मकुमारी ची याबाबत काय स्पष्टीकरण असतात ?

६-बाबा सेहगल , सुनिता राव ( परी हु मै), सिल्क रुट ग्रुप,(डुबा डुबा रहता हु) इला अरुण,(सरसो के खेतो मे पहला उजाला ) हे पक्षी एन्डेनजर्ड स्पेसीज म्हणुन घोषीत झालेत की यांचा डोडो झालाय ? हे कुठे आहेत ,काय करतात, दैनंदिन खर्च कसा भागवत असतील ? यांना परत कधी तरी (इंडीपॉप चा गोल्डन एज संपल्यानंतर) कधी कंठ फ़ुटला होता का ? आणि हो ते सय्योनी, हसन जहांगीर (हवा हवा )कुठे आहेत सध्या ?
हे का संपले व जे टिकले (शान-सोनु आदि) ते का टिकले ?

७-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?

८-इम्पीरीयल ब्ल्यु चा खल पुरुष (जो अनंत काळाने तसाच आहे व तसाच राहणार असे जे सुचित केले जाते )ते पुरुषाचं खर चित्र आहे कि रेमंड चा पुर्ण पुरुष हा खरा पुरुष आहे ? की तो नुसताच एक पोकळ आदर्श आहे ? कि खरा पुरुष तिसरच काही तरी मिश्रण असतं जे अजुन या दोघा जाहीरातदारांना दाखवण्यात अपयश आलेलं आहे? या संदर्भात डिओड्रंट मधील पुरुषी क्षमतांच जे चित्रण आहे ते अतिरेकी आहे की वास्तव ?

९-मे,पु,रेगें नी एक दिर्घ मुलाखत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीं जोशीं ची व मंगेश पाडगावकरांनी एक मुलाखत श्री,पु.भागवतांची घेतलेली आहे, या दोन्ही मुलाखती अत्यंत मार्मिक आहेत असा उल्लेख अनेक ठीकाणी रीपीट झालेला वाचला. या मुलाखती कोणाकडे आहेत का ? कुठल्या पुस्तकात आहेत ? कुठे उपलब्ध होतील ? नुकतीच एक मुलाखत विंदा करंदिकरांची विजया राज्याध्यक्षांनी घेतलेली वाचल्यानंतर वरील भुक नव्याने वाढली.

१०-माझे आवडते मराठीतले महान मुलाखत कार राजु परुळेकर सध्या कुठे आहेत? त्यांच काय चाललय? त्यांचा एखादा कार्यक्रम कुठल्या वाहीनीवर चालु आहे का सध्या ? त्यांनी आयडीयाज आर डेंजरस नंतर अजुन काहि लिहीलय का?

११- इनसेक्ट्स स्मगलींग मध्ये कुठल्या कीटकांच स्मगलींग सर्वात जास्त होत ? त्यांची किंमत कीती पर्यंत जाते ? यात कुठल्या विषयातील तज्ञ कीटक ओळखण्यासाठी लागतो ? भारतात यापैकी कुठले कीटक उपलब्ध आहेत ? भारतातुन कुठुन हे कीटक गोळा केले जातात ?

१२ -सुथबी, ख्रिस्तीज सारख्या लिलाव करणारया कंपन्या एखाद्या वस्तुच्या एन्टीक व्हॅल्यु ची मुल्यनिश्चीती कशी करतात ? यासाठी कुठले निकष वापरले जातात? विशेषत: चित्रांची व्हॅल्यु कशी ठरविली जाते? कुठल्या घटकांवर बोलीची मिनीमम किंमत ठरविली जाते ? म्युझियम मध्ये क्युरेटर नावाचा जो मनुष्य असतो ? तो नेमक काय काम करत असतो ? त्याच्या कामाच स्वरुप काय असत ?

१३-अक्चुरीअल हा इन्स्युरन्स क्षेत्रामध्ये काय काम करतो ? याचे कोर्सेस असतात का ? हे एक खरच ब्राइट करीअर आहे का ? सनराईज फ़िल्ड आहे का ? याच्या कामाच स्वरुप काय असत नेमकं ?

१४-हंसांविषयी जे सांगितल जात की हंसां च जोडपं हे आयुष्यभर एकत्र राहत कधीच एकमेकांना सोडत नाही दो हंसो का जोडा हे नुसतच कविकल्पना आहे की अस खरोखर असत ? हंसांमध्ये व्याभिचार नसतो का ?

१५-बोस च्या साऊंड सिस्टीम्स मध्ये घरातील होम थिएटर मध्ये घेण्यासाठी सर्वात चांगली सिस्टीम कुठली आहे ? कुठल मॉडेल आणि काय वैशिष्ट्य आहेत बोस च्या साउंड सिस्टीम्स ची ? म्हणजे कुठल्या बाबतीत हि सिस्टीम उजवी आहे नेमकी ?

१६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय ?

१७ -डेबोनेर मासिका चे जुन्यात जुने अंक कुठे मिळतील त्यातल्या मुलाखती त्यातील सेंटरस्प्रेड इतक्याच इंटरेस्टींग होत्या त्यातील मुलाखतींच कलेकशन असलेलं एखाद पुस्तक आहे का ? किंवा जुने अंक मिळण्याच मुंबईतील ठीकाण कुठल ?

१८-काळ्या मुंग्या व्यवस्थित पाळायच्या आहेत कशी माती कसे अन्न काय काय व्यवस्था करावी लागेल ? त्यांची वस्ती कशी डेव्हलप करता येईल ?

१९- रांगोळी काढतांना रेषा फ़ार जाड जाड पडतात, त्यासाठी रांगोळी पेन प्लास्टीकचा वापरुन बघितला पण जमत नाही. बारीक रेघ उमटण्यासाठी चिमुट कीतीही हळु सोडली तरी रांगोळी जास्त सांडुन रेघ जाड होते ? यावर काही उपाय आहे का ? प्रॅक्टीस कशी करावी ? की हळुहळु च जमत हे ? पोर्ट्रेट रांगोळी हा काय प्रकार असतो ?

२०- बॅलन्सशीट च्या लायबीलीटी साइड ला पहिला हेड कॅपिटल हा इथे का असतो ? ती तर प्रोप्रायटरने केलेली स्वत:ची गुंतवणुक असते. ती लायबीलीटी का म्हणुन धरली जाते ? त्यामागे काय लॉजिक असत ? स्वत:चीच गुंतवणूक ही तर आपली संपत्ती आहे मग ती लायबीलीटी साइड ला कशी येते? ( अकाउंट हा माझा विषय नाही पण हे कुतुहुल कुठलीही बॅलन्सशीट बघितली की उफ़ाळुन येत. आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ?

२१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ?

२२- राजु परुळेकरांनी एकदा त्यांनी स्वत: दिलेल्या मुलाखतीत एका कवितेचा उल्लेख केला होता ती अफ़्रिकन कविता होती इतकच माहीती आहे.(तो मुलाखतीचा व्हीडीओ नेट वर आहे) व त्यातल इतकच आठवतय. मला प्लिज कुणी ही मुळ कविता पुर्ण देइल का ? मला आठवत असलेल्या मोजक्या ओळींनी मी अजुनही भारावुन जातो. या वयातही माझ्या सरावल्या हातांना कंप सुटु लागतो. ( शब्दांची चुकभुल पुढे मागे देणे घेणे)
जगातल शेवटच झाड जेव्हा उन्मळुन पडेल
जगातल शेवटच फ़ुल जेव्हा गळुन पडेल
जगातील शेवटची नदी जेव्हा सुकुन जाइल
जगातला शेवटचा पक्षी जेव्हा गायचा थांबेल
अस काय काय येत असत आणि शेवटी अशी काहीशी ओळ येते
तेव्हा आणि तेव्हाच माणसाला या निसर्गाची या प्रुथ्वीची किंमत खरोखर कळेल.
हि कविता मला पुर्ण हवी आहे अनुवाद इंग्रजी नेटवर कुठे असेल तर हवा आहे.

मिहिर Fri, 14/11/2014 - 19:13

In reply to by बॅटमॅन

बूच मारले की प्रतिसाद बदलता येत नाही, तशा प्रकारे आयडीला बूच मारता यायला हवे म्हणजे आयडी परत बदलता येणार नाही. :प

मारवा Sat, 15/11/2014 - 00:22

In reply to by मिहिर

अतिशय नाइलाजाने नवनवोन्मेषशालीनी प्रतिभेला आवर घालुन सदरील परीपत्रका प्रमाणे कळविण्यात येते की
यापुढे सदरील आय.डि. अनिश्चीत दिर्घ काळासाठी फ्रिझ करण्यात येत आहे.
कळावे लोभ नसला तरी चालेल
आपला व्यथित मारवा

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/11/2014 - 00:35

In reply to by मारवा

यावेळेस प्रतिसाद अर्धा होईस्तोवर कोणी लिहिला असेल याची कल्पना आली. याबद्दल मी स्वतःचा जाहीर सत्कार आज संध्याकाळी माझ्या घरी करणार आहे. बघताय काय, सामील व्हा.

पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?

=)) =))

नितिन थत्ते Tue, 18/11/2014 - 07:06

इकॉनॉमिक राइटविंगर्स आणि कल्चरल राइट विंगर्स एकमेकांशी अलाइन्ड का असतात?

अल्पसंख्य हे बाय डिफॉल्ट फडतूस* असतात असे त्यांना वाटते का?
*फडतूस आहेत म्हणून तर त्यांना बहुसंख्य होता आले नाही... ;)

गब्बर सिंग Thu, 20/11/2014 - 20:18

In reply to by नितिन थत्ते

इकॉनॉमिक राइटविंगर्स आणि कल्चरल राइट विंगर्स एकमेकांशी अलाइन्ड का असतात?

कारण लिबर्टेर्यन्स हे फ्रिंज वर आहेत. (आता - गब्बर हा कारण व परिणाम यांच्यात गल्लत करीत आहे (रिट्रो काउजॅलिटी) - असा मुद्दा उपस्थित करा.)

नंदन Fri, 21/11/2014 - 04:17

In reply to by नितिन थत्ते

इकॉनॉमिक राइटविंगर्स आणि कल्चरल राइट विंगर्स एकमेकांशी अलाइन्ड का असतात?

निदान अमेरिकेत तरी याला बव्हंशी छुपा वर्णभेद कारणीभूत आहे.
अधिक स्पष्टीकरणासाठी हे पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Dog-whistle_politics#United_States

मिहिर Fri, 14/11/2014 - 19:22

व्यवस्थापकः हा प्रतिसाद या ठिकाणाहून या इथे हलवला आहे.

त्यांच्या हातात कला होती, म्हणून लोक त्यांना कलोदक मोने असे म्हणू लागले.

हात>पाणि>पाणी>उदक हा प्रवास रोचक आहे!

बॅटमॅन Fri, 14/11/2014 - 19:26

In reply to by मिहिर

हाहाहा, एकच नंबर! मस्त कोटी. :)

यावरून एक रीसेंट किस्सा आठवला. बंगालीत बोलताना र्‍हस्व-दीर्घ भेद, तसेच ण-न भेद पाळला जात नाही. त्यामुळे लिहिताना वीणापाणि असे लिहिले असले तरी बिनापानी या शब्दापेक्षा ते कसे वेगळे आहे हे कोणी उच्चारून सांगू शकत नाही. बंगाल गवरमेंटच्या कुठल्याश्या परीक्षेत तोंडी राउंडला वीणापाणि या शब्दाचा अर्थ विचारला तर साहेबांनी सरळ 'पाण्याविना, तहानलेला' इ. सांगून मोकळे झाले. त्यावरनं पुढं बरीच बोंबाबोंब झाली, 'पूर्वीची बंगाली राहिली नाही', इ.इ. आमच्या बोंग बोंधूंच्या भिंती काई दिवस या बोळ्यांनी तुंबल्या होत्या. पण दोष कशात आहे ते बघा म्हणावं की, आडातच नाही तिथे पोहर्‍यात कुठून येणार?

बॅटमॅन Fri, 14/11/2014 - 21:14

In reply to by मिहिर

ते कनेक्शन डोक्यात नव्हतं तेव्हा लिहिताना, फक्त उच्चारसाधर्म्य होतं.

तदुपरि- वीणा आहे पाणिमध्ये जिच्या अशी ती (सरस्वती). षष्ठी तत्पुरुष?

अरविंद कोल्हटकर Sat, 15/11/2014 - 10:21

In reply to by 'न'वी बाजू

वीणा पाणौ यस्य/यस्या: - ज्याच्या/जिच्या हातामध्ये वीणा आहे तो/ती - सप्तमी बहुव्रीहि समास.

पिनाकपाणि, दण्डपाणि ह्याचप्रमाणे.

उत्तर भारतात 'दण्डपाणि' ह्या दक्षिणी विशेषनामाचे रूपान्तर (इंग्रजी स्पेलिंगमुळे आणि मूळ अर्थाच्या अज्ञानामुळे) 'डण्डापानी' झाल्याचे पाहिलेले आहे!

बॅटमॅन Sat, 15/11/2014 - 15:25

In reply to by अरविंद कोल्हटकर

बहुत धन्यवाद कोल्हटकर सर अन नवी बाजू! समास वगैरे पूर्णच विसरून गेलो आहे.

तदुपरि- दण्डपाणि ते डण्डापानी या प्रवासाइतकेच रोचक अजून एक उदाहरण आहे. तमिऴमध्ये लिहिताना क-ग अभेद असतो आणि द लिहिताना dh तर ड लिहिताना d लिहितात. त्यामुळे गुलकंद या शब्दाचे स्पेलिंग kulgandh असे पाहिल्याचे एका जालपरिचितांनी सांगितलेले आहे.

घाटावरचे भट Mon, 17/11/2014 - 09:21

In reply to by बॅटमॅन

'दंडपाणि'चं स्पेलिंग खास दाक्षिणात्य अवतारात 'Dhandapani' असं केल्याने त्याचा उच्चार 'धंदापानी' झालेलाही ऐकलाय...

मिहिर Thu, 20/11/2014 - 16:58

मोठ्या मोठ्या संगीत कॉन्सर्ट्समध्ये व्हायोलिन किंवा चेलो वाजवायला इतके जास्त लोक का असतात? प्रत्येक जण काही वेगळे वाजवत नसणार. भरपूर लोक ऐकणार आहेत तर एका वादकाच्या चुकीने खराब वाटू नये आणि ती एकाची चूक बाकीच्यांच्या बरोबर वाजवण्यात अॅव्हरेज होऊन जावी असा हेतू असतो का? की आणखी इतर काही?

नितिन थत्ते Thu, 20/11/2014 - 18:07

In reply to by मिहिर

ऑल्विन टॉफ्लर याच्या थर्ड वेव्ह मध्ये याचं काहीसं स्पष्टीकरण आहे. (ते बरोबर आहे की नाही ते ठाउक नाही).

फर्स्ट वेव्हमध्ये (सेतीप्रधान राजेशाही/जमीनदारी फेजमध्ये) अभिजात संगीत हे श्रीमंतांच्या दरबारात सादर करण्याची बाब होती. सेकंड वेव्ह (औद्योगिक क्रांती/रेनेसां फेजमध्ये) लोकशाही हळूहळू रुजू लागली होती. त्यामुळे अभिजात संगीत मासेससमोर सादर होऊ लागले. त्या काळात म्हणजे सतराव्या शतकापासून विसाव्याशतकापर्यंत अ‍ॅम्प्लिफायर्सचा शोध लागला नसल्याने आवाज मोठा करण्याचा एक मार्ग म्हणजे भरपूर संख्येने वाद्ये वाजवणे.

शिवाय एक व्हायोलिन आणि २० व्हायोलिन यांच्या आवाजाचा पोत वेगळा येतो हेही कारण आहेच.

मिहिर Thu, 20/11/2014 - 19:58

In reply to by नितिन थत्ते

अ‍ॅम्प्लिफायर्सचा शोध लागला नसल्याने आवाज मोठा करण्याचा एक मार्ग म्हणजे भरपूर संख्येने वाद्ये वाजवणे.

आधीच्या काळासाठी हे मान्य आहे, पण मोठ्या संख्येत व्हायोलिन वाजवणे अजूनही दिसते.

शिवाय एक व्हायोलिन आणि २० व्हायोलिन यांच्या आवाजाचा पोत वेगळा येतो हेही कारण आहेच.

हेही मान्य. २० व्हायोलिन ऐकताना एक डिस्ट्रिब्युशन ऐकू येईल. असे असणे हे संगीतात नेहमीच चांगले समजले जाते का? आणि छोट्या कॉन्सर्ट्समध्ये एकाच माणसाने व्हायोलिन वाजवणे हे केवळ बजेटशीच निगडित आहे का?

लॉरी टांगटूंगकर Fri, 21/11/2014 - 12:44

In reply to by मिहिर

रेझोनन्स . फक्त एक व्हायोलिन ऐकत असल्यास तर आवाज शार्प वाटतो. जवळपास कोणी व्हायोलिनवाला असल्यास एखादी ग्रुपने वाजवलेली ट्युन (पायरेट्स वगैरे) त्याला वाजवायला सांगणे. लगेच लक्षात येईल.
काही गिटारमध्ये १२ तारा असतात (नेहमीच्या गिटारच्या दुप्पट). शेजार-शेजारच्या तारांमधून एकच स्वर येतो पण त्याचा टोन खूप वेगळा असतो.

नितिन थत्ते Fri, 21/11/2014 - 15:04

In reply to by मिहिर

>>पण मोठ्या संख्येत व्हायोलिन वाजवणे अजूनही दिसते.

२० व्हायोलिन ऐकणे छान वाटते हे लक्षात आल्याने ते कंटिन्यू झाले. इनफॅक्ट अनेक गाण्यात २० व्हायोलिन खूप कमी आवाजात बॅक्ग्राउंडला वाजतात. ते अजूनच छान वाटते.

कोणते वाद्य अधिक संख्येने वाजवल्यास चांगले वाटते ते वाद्यावर अवलंबून असेल. २० गिटार वाजवल्या तर कदाचित चांगले वाटणार नाही.

अजो१२३ Fri, 21/11/2014 - 17:26

आनंद कार्लसनचे गेम जे नियमांनी चालू आहेत त्या आंतरराष्ट्रीय नियमांनी चेसचा गेम दोन खेळाडूंनी (संगनमतीने म्हणा तर) लांबवायचाच ठरवला तर ते जास्त्तीत जास्त कीती चाली खेळत ड्रॉ देखिल होऊ शकणार नाहीत?
१. कोणी हारला वा जिंकला कि गेम संपतो.
२. स्टेलमेटझाला कि गेम संपतो.
३. तीनदा त्याच मूव रिपिट झाल्या कि गेम संपतो.
४. पन्नास चालीत प्यादे एक घर तरी "चालले" नाही किंवा प्यादासहित कोणतेही इतर मारले गेले नाही तर (डावात बाकी काहीही परिस्थिती असो, कोणतीही वेळ असो) डाव ड्रॉ होतो.
५. पहिल्या ४० (४०*२ मूव्स) चाली २ तासात खेळायच्या असतात. संपूर्ण डावाच्या दुसरा तास पूर्ण होण्याच्या सेकंदाला ४० चाली नाही झाल्या तर ज्या प्लेअरचे क्लॉक क्लिकत असते तो हरतो.
६. नंतर २० चालींना १ तास मिळतो. मागे न वापरलेला वेळ त्यात जमा होतो.
७. नंतर १५ सेकंदाला एक चाल. मागे न वापरलेला वेळ त्यात जमा होतो.
------------------
हे सगळे नियम पाळून खेळाडू टाईमपास करू लागले तर जास्तीत जास्त किती चाली खेळू शकतात. याला नंबरला मर्यादा आहेच का मुळी?

धनंजय Fri, 21/11/2014 - 21:12

In reply to by अजो१२३

वरील मर्यादा : पटावर मारली जाऊ शकतील अशी ३० प्यादी-मोहरी असतात. मुद्दामून ५०व्या चालींवर एक-एक बळी दिला ५०*३० + ५० (नुसते राजे सरकवत) = इतक्या चालींची कमाल मर्यादा येते = १५५० चाली = ४०+२०+१४९० = २+ १ + १२ तास ४५ मिनिटे = १५ तास ४५ मिनिटे

चालींचा हिशोब बरोबर असला, तरी वेळेचा हिशोब ठीक नाही. कारण आंतरराष्ट्रिय सामन्यातील लांब डावाचा विक्रम २६९ चाली आणि २० तास १५ मिनिटे होता. (http://en.wikipedia.org/wiki/List_of_world_records_in_chess#Longest_game)

असो. कमाल १५५० चाली सुद्धा जास्त आहे, कारण प्यादी हलवण्यामुळे क्दाचित काही मारामारी अपरिहार्य होऊ शकत असेल. ५० खेळ्या खोळंबता येईलच अशी शाश्वती देता येत नाही.

मिहिर Fri, 21/11/2014 - 21:23

In reply to by धनंजय

मुद्दामून ५०व्या चालींवर एक-एक बळी दिला ५०*३० + ५० (नुसते राजे सरकवत) = इतक्या चालींची कमाल मर्यादा येते = १५५० चाली

ह्या ५० चालींमध्ये प्यादी हलणारच नाहीत असे होणे फार कमी वाटते. नियमात बरोबरी होण्यासाठी सलग ५० चालींत मारामारी न होणे व प्यादी न हलणे अशी अट आहे. ह्यामुळे संख्या बरीच घटेल असे वाटते.

राजेश घासकडवी Sat, 22/11/2014 - 19:15

In reply to by मिहिर

ह्यामुळे संख्या बरीच घटेल असे वाटते.

यामुळे खरं तर संख्या बरीच वाढेल. समजा पहिल्या दहा मूव्ह्ज कुठचाही बळी न घेता झाल्या. अकराव्या मूव्हला प्यादं हलवलं. त्यानंतर या १५५० मूव्ह्ज करता येतात. खरं तर दर ४९ व्या मूव्हला एक प्यादं हलवलं तर आकडा काही पट होऊ शकेल. कारण प्याद्यांच्या एकूण खेळी ११२ होऊ शकतात. तत्त्वतः सर्व प्याद्यांचे वजीर होऊ शकतात. म्हणजे (११२ + ३० + १) = १४३*५० = ७१५० ही वरची मर्यादा आहे. (कदाचित यात प्यादं हलवण्याची खेळी केली काळ्याने केली की पांढऱ्याने यामुळे किंचित फरक पडेल बहुधा... तसंच सर्व प्याद्यांचे वजीर होऊ शकतील की नाही हा कदाचित तांत्रिक मुद्दा ठरू शकेल. पण उत्तर १५५० पेक्षा अधिक आहे हे निश्चित.

अजो१२३ Sun, 23/11/2014 - 12:43

In reply to by राजेश घासकडवी

@राजेश, धनंजय - धनंजयने फक ३० पीसेस मरणे घेऊन हिशेब केला आहे.शिवाय प्रत्येक प्यादे ६ घरे पुढे जाते. मग ८*२*६*५०=४८००+३०*५०+५०=४८००+१५५०=६३५० मिनिट . मंजे जवळजवळ १००+ तास. पण तंत्रतः प्यादी नि पीसेस न मारता इतकी घुमवणे असंभव असावे.

यसवायजी Sat, 22/11/2014 - 17:12

गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड असते? म्हणजे, बॅन्का ते सोने विकुन कुठे इन्वेस्ट करतात आणी काही वर्षांनी तेवढेच सोने व्याजासकट परत देतात काय?
काही बॅन्का तयार दागिनेसुद्धा ठेवून घेतात म्हणे. (१% पे़क्षा कमी व्याज देतात). पण त्यांचा काय फायदा आहे त्यात?

नितिन थत्ते Sun, 23/11/2014 - 11:46

मेट्रो रेल्वेचे नेमके वैशिष्ट्य काय असते.

सध्या गेल्या शंभरेक वर्षांपासून बोरीबंदर ते कसारा/खोपोली/पनवेल/अंधेरी आणि चर्चगेट ते डहाणू धावणार्‍या गाड्यांना मेट्रो का म्हणायचे नाही?

पूर्वी मेट्रो म्हणजे भुयारी रेलवे असा माझा समज होता पण आता भारतात नव्याने सुरू झालेल्या कुठल्याच मेट्रो भुयारी नाहीत.

नितिन थत्ते Sun, 23/11/2014 - 13:19

In reply to by 'न'वी बाजू

इतर ट्रेन्सशी ट्रॅक शेअरिग न करणे हा मुख्य फरक आहे.

म्हणजे चर्चगेट ते डहाणू आणि बोरीबंदर ते खोपोली/कसारा या फास्ट लोकल या मेट्रो नाहीत पण दोन्हीकडच्या स्लो लोकल तसेच सम्पूर्ण हार्बर रेलवे आणि ठाणे सानपाडा लोकल या मेट्रो आहेत.

बाकी ट्रेनची फ्रिक्वेन्सी वगैरे गैरलागू मुद्दे वाटतात. चर्चगेट बोरीवली लोकलची फ्रीक्वेन्सी मुंबई आणि बंगलोर मेट्रोपेक्षा खूप जास्त आहे.

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 21:03

In reply to by नितिन थत्ते

इतर ट्रेन्सशी ट्रॅक शेअर न करणे (हे मला वाटते एक्स्क्लूज़िव रैट ऑफ वे या सदराखाली मोडावे.) हा एक आवश्यक भाग आहेच. शिवाय इतर कोणत्याही मोड ऑफ ट्रान्स्पोर्टशी केवळ ट्रॅकच नव्हे (जसे ट्रॅमचे रूळ हे रस्त्यावर असतात - पुन्हा रैट ऑफ वे), तर साध्या लेवल क्रॉसिंगला लागण्यापुरती सुईच्या टोकाइतकी जागासुद्धा शेअर न करणे (हे वर म्हटल्याप्रमाणे ग्रेड सेपरेशनने साध्य व्हावे. याकरिता भुयारी रेल्वे हा एक उपाय झाला, परंतु एकमेव उपाय नव्हे.) हाही एक आवश्यक घटक असावा.

थोडक्यात, ट्रेनची वाट इतर ट्रेन्सनीच नव्हे, पण आड येणार्‍या ट्रॅक ओलांडू पाहणार्‍या पादचार्‍यांनी, रिक्षांनी, स्कूटरींनी आणि संकीर्ण म्हशींनीसुद्धा अडविता कामा नये, इतकी एक्स्क्लूज़िव रैट ऑफ वे पाहिजे.

म्हणजे, दोन्ही मेन लैनींवरच्या स्लो लोकलसुद्धा बहुधा 'मेट्रो' ठरू नयेत. मात्र, हार्बर लैन जेथेजेथे एलेवेटेड आहे, तेथेतेथे कदाचित ठरू शकावी. (चूभूद्याघ्या.)

अजो१२३ Sun, 23/11/2014 - 14:48

In reply to by नितिन थत्ते

मेट्रोत असते ती मेट्रो. इंटर्सिटी नसणे हा पहिला निष्कर्ष. इंटर्सिटीशी इंफ्रा शेअर न करणे हा दुसरा.

नितिन थत्ते Sun, 23/11/2014 - 14:51

In reply to by अजो१२३

मुंबई मेट्रो शहराचा विस्तार कुठवर धरावा?

नौएडा/गुडगाव/फरीदाबाद हे दिल्ली मेट्रो शहराच्या आत येतात का?

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 20:45

In reply to by नितिन थत्ते

माझ्या कल्पनेप्रमाणे, गाडीने सर्व्ह केलेले अंतर इतक्याइतक्यापेक्षा कमी असेल, तर गाडीवर शौचालये पुरवावी लागत नाहीत (अन्यथा, त्याहून जास्त असल्यास पुरवावी लागतात) असा काही नियम/संकेत असावा. मला वाटते, तेचतेच प्रवासी रोजरोज कम्यूट करत असतील, आणि अंतर त्या अंतरापेक्षा कमी असेल, तर मेट्रो, अन्यथा इंटरसिटी, असा काही थंबरूल मानता यावा.

(अवांतर: कल्याण हे उपरोल्लेखित विनाशौचालय अंतरमर्यादेत येते, परंतु कर्जत/कसारा येत नाहीत; मात्र, काहीतरी ट्रिकरी करून, बहुधा कल्याण-कर्जत/कल्याण-कसारा या सेवा (गाडी जरी व्हीटीवरून आलेली तीच असली, तरी) कागदोपत्री वेगळ्या सेवा दाखवून नियम सर्कमव्हेंट करतात, असे कायसेसे पूर्वी कधीतरी ऐकले होते; मात्र, या गोष्टीचे इंडिपेंडंट कन्फर्मेशन नाही. कदाचित ही उपमाहिती चुकीची असू शकेल. चूभूद्याघ्या.)

बाकी, शहराच्या पोलिटिकल सीमांचा यात बहुधा काही संबंध नसावा. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

ऋषिकेश Mon, 24/11/2014 - 14:20

In reply to by नितिन थत्ते

माझ्या मते मेट्रोम्हणजे एखाद्या शहरासाठी शहरांतर्गत असलेली स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था.
इथे शहर म्हणजे एखाद्या लहान भूभागाचा समुच्चय अशी ढोबळ व्याख्या घ्यावी. सदर व्यवस्था त्या गाड्यांसाठी "एक्लुसिव्ह" असते. अन्य कोणत्याही प्रकारच्या गाड्यांना त्या व्यवस्थेचा वापर करता येत नाही (काही शहरांत आपात्कालीन वेळी तसा वापर करता येण्याची सोय दिसते.)

ठाणे-बेलापूर वगैरे त्यात येत नाही. कारण तिथून मालवाहतूक होते. (बहुदा काही कोकण रेल्वेच्याही गाड्या जातात का? प्रगती एक्सप्रेस कशी जाते?)

बहुतांश वेळा मेट्रो ही त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीत असते असे वाटते. (अपवाद दिल्ली मेट्रो)

नितिन थत्ते Mon, 24/11/2014 - 15:55

In reply to by ऋषिकेश

>>बहुतांश वेळा मेट्रो ही त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीत असते असे वाटते. (अपवाद दिल्ली मेट्रो)

आणखी अपवाद- वडाळा-कासारवडवली

>>सदर व्यवस्था त्या गाड्यांसाठी "एक्लुसिव्ह" असते. अन्य कोणत्याही प्रकारच्या गाड्यांना त्या व्यवस्थेचा वापर करता येत नाही

मग बीआरटी बस सिस्टिमसुद्धा मेट्रो म्हणता येईल का?

ऋषिकेश Mon, 24/11/2014 - 17:00

In reply to by नितिन थत्ते

मग बीआरटी बस सिस्टिमसुद्धा मेट्रो म्हणता येईल का?

मेट्रो रेल्वे असे बस सर्विसला म्हणता येऊ नये असे माझ्या अल्पमतीला वाटते.

मेट्रो बस असे काही संबोधायचे असल्यास हर्कत इल्ले

अजो१२३ Sun, 23/11/2014 - 16:59

In reply to by नितिन थत्ते

मेरठ एन सी आर चा पार्ट आहे. प्रचंड प्रमाणात लोक रोज ये-जा करतात. (तेच तेच लोक , त्याच त्याच कामासाठी). पुणे-मुंबईशी तुलना करता येणार नाही कारण पुण्याहून एकच ट्रेन जाते अशा लोकांची. शिवाय फक्त ट्रेननेच यांसाठी पुणे आणि मुंबई जोडली आहेत. मंजे बसने रोज करणे अशक्य आहे. दिल्लीला खेटून गाजियाबाद 'शहर' आहे. नी त्याच्या सीमेपासून ३५ किमीवर मेरठ आहे. तर लोकांसाठी चांगली मेट्रो असेल तर दिल्ली, गाझियाबाद आणि मेरठ मधे फरक नाही.

अजो१२३ Sun, 23/11/2014 - 17:20

In reply to by नितिन थत्ते

कल्याण मुंबई कनेक्शन्सना स्थानिकच म्हणायला लागेल. पोलिटिकल डिविजन्स वेगळ्या आणि प्रत्यक्ष लोकांच्या, बाजाराच्या हालचाली वेगळ्या. त्यांना मिक्स करून इंफ्रा बनवायची पद्धत हळूहळू मोडीत निघेल. राजकीय सीमा नाहीत असे मानून ट्रान्सपोर्ट इंफ्रा बनवायचा ट्रेंड आहे.

आदूबाळ Mon, 24/11/2014 - 23:39

सौदिया एअरलाईन्समध्ये हँड ब्यागेजमध्ये अल्कोहोल चालत नाही. चेक इन ब्यागेजमध्ये चालतं काय? विमान रियाधला बदलायचं आहे फक्त.

अतिशहाणा Tue, 25/11/2014 - 00:10

In reply to by आदूबाळ

मुंबईला उतरल्यावरच ड्युटी फ्रीमध्ये घ्या. सोयीचे पडते. चेकइनमध्ये बाटली फुटली बिटली तर अवघड आहे.

अतिशहाणा Tue, 25/11/2014 - 01:27

In reply to by Nile

एम्बार्किंग विमानतळावरील सेक्युरिटी चेक झाल्यानंतर विमानात बसण्यापूर्वी विकत घेतलं तर चालतं. तुमचा ले-ओवर वगैरेमध्ये पुन्हा सेक्युरिटी चेक करावा लागणार नाही असे अध्याहृत आहे.