नेमाडेंवर नेम

काल महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी नेमाडेंनी दिलेल्या ह्या व्याख्यानावर काही आक्षेप

अल बेरुणीविषयीचे त्यांचे वक्तव्य : अल्लाहची शपथ घेउन बोलतो म्हणजे तो खोटे बोलणार नाही! मुसलमान अल्लाहची शपथ घेऊन खोटे बोलत नाही. म्हणजे महमदाचा दरबारी इतिहासकार अल्बेरुणी सोमनाथ लुटीचे समर्थन करणार नाही हे तर नेमाडे गृहीत धरतातच शिवाय तो केवळ अनाचार सुरु होता म्हणूनच मह्मदाला कळवळून आले असे ठसवायचा प्रयत्नहि करतात. (सोमनाथ आणि हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा ह्याच्याशी सहमत व्हायचे इथे काही कारण नाहीच. रोमिला थापरने तिच्या पुस्तकात त्या प्रकरणाचा उलगडा केला आहेच). पण महमदाने सोमनाथ मंदिरात अनाचार वाढतो म्हणून १७ वेळा मन्दिर लुटले असे त्यांचे म्हणणे असेल तर महमद हा फुल्यांहून अधिक आक्रमक क्रांतिकारी समाजसेवक म्हणावा लागेल.
२) मराठी भाषा संस्कृतहून सत्तावन्नहजार वर्षे जुनी आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि संथाळ लोक मराठी बोलत. संथाळी लोकांची वस्ती कोणत्या भागात होते आणि आहे? शिवाय सगळे माळी व अन्य बहुजन समाजातले लोक हे त्या मुंड आणि संथाळी लोकांचे वंशज आहेत का? महाराष्ट्रातले ब्राह्मण संस्कृत मातृभाषा असलेले शुद्ध आर्य आहेत?
3) नेमाडे कोणाची अस्मिता, का आणि कोणत्या व्यासपीठावरून प्रज्वलित करीत आहेत?
भुजबळांच्या समता परिषदेच्या व्यासपीठावर. महात्मा फुलेंनी एक बहुजनकेंद्री इतिहास मांडला. तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेच्या साठी तो एक अतिविशेष प्रयत्न होता हे मान्यच आहे आणि ती मोठी कामगिरी आहे त्यांची! पण म्हणून ते तर्कशुद्ध इतिहासकार ठरत नाहीत! त्यांच्या समाजसुधारणेच्या अमूल्य कार्यासाठी त्यांना बहुजन अस्मिता चेतावायची होती. आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीची जाण असलेल्या नेमाडेना ती आक्रमकता आता पुंन्हां रुजवायचा प्रयत्न करून काय साधायचे आहे? महाराष्ट्रात सामाजिक राजकीय विषयावर बोलतानाचे समता परिषदेच्या व्यासपीठाचे राजकीय महत्त्व नेमाडेना माहिती नाही असे नक्कीच नाही.
४) ह्याशिवाय त्यांनी 'च' वगैरे वरून मराठी माणूस ओळखावा वगैरे केलेली विधाने अतिशय उथळ आहेत. विदर्भात आणि कोकणात अनेक ठिकाणी 'च'चा उच्चार 'चकोर' शब्दातील 'च'प्रमाणे तालव्य आहे.
५) फुलेंच्या संस्कृतायजेशनच्या प्रयत्नात असलेले अनेक लोक, ब्राह्मणी वर्तुळाची मान्यता मिळवून संस्कृताईज्ड होऊ पाहाणारे पुरोगामी विचारवंत, अतुल पेठेंच्या नाटकाला झालेला बहुजनांचा विरोध मोडून काढू पाहातात. विजय कुंजीरांचा ह्यासंबंधीचा लेख महत्त्वाचा आहे. त्यातील जहाल ब्राह्मण-विरोधी भाषा सोडल्यास त्यातील आक्षेपांत वावगे काही वाटत नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

वरच्या लिंकमध्ये दाखवलेले नेमाडेंचे भाषण मी ऐकले. भाषण साधारणपणे अशा वेळी होते अशाच प्रकारचे आहे. त्यावर अधिक काही लिहावे असे नाही.

मात्र मला ज्याचे सत्य जाणून घ्यायला निश्चित आवडेल असे एक विधान त्या भाषणात आहे. प्रा.नेमाडे हे विद्वान आणि अभ्यासू प्राध्यापक आहेत आणि ते प्रत्येक विधान पुराव्यासहितच करत असणार ह्याची मला खात्री आहे. तरीपण पुढील विधानाचा मला काहीहि पुरावा सापडलेला नाही. कोणा अभ्यासू वाचकाने तो मला दाखवून द्यावा अशासाठी हे लिहीत आहे.

भाषणामध्ये १६.३९ च्या पुढेमागे नेमाडे अशा अर्थाचे काही म्हणतात: ज्योतिरावांनी महम्मद गझनीवर एक पोवाडा लिहिला होता आणि त्यामध्ये सोमनाथाचे देऊळ त्याने जे उद्ध्वस्त केले त्याचे कारण असे दाखविले आहे की त्या देवळामध्ये पुजार्‍यांचा अनाचार आणि गोरगरीबांना फसवून आणि शंकरपार्वती दाखवितो अशा प्रकारच्या भूलथापा देऊन त्यांचे द्रव्य काढून घेणे हे इतक्या टोकाला गेले होते की त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महम्मदाला सोमनाथाची मोहीम काढावी लागली. त्याने हे चांगलेच कृत्य केले. ( नेमाडेनाहि हा आशय मान्य दिसतो कारण अल बिरूनीच्या पुस्तकात त्यांना ह्याचा आधार मिळाला असे ते म्हणतात.)

आता माझ्या शंका. जोतिबांनी असा काही पोवाडा खरोखरीच लिहिला आहे काय? य.दि.फडके संपादित समग्र फुले वाङ्मयात (५वी आवृत्ति) तरी असा काही पोवाडा वा अन्य लिखाण मला दिसत नाही. फुले महम्मद गझनीवर अल बिरुनीच्या साक्षीने काही लिहू शकले असते हेहि मला विश्वासार्ह वाटत नाही. ते १८९० साली वारले. एडवर्ड साखाउ ह्यांचे 'अल्बेरुनीज इंडिया' हे पुस्तक १९१० साली प्रकाशित झाले . त्या पुस्तकातील सर्व लेखन अल बिरुनीला हिंदु शास्त्रे, तत्त्वज्ञान इत्यादि कसे दिसले ह्याबाबत आहे. ह्यापूर्वी १८६९ मध्ये एलिअटसंपादित History of India as told by its own historians Vol II हे पुस्तक १८६९ मध्ये प्रकाशित झाले होते. त्यामध्ये अल बिरुनीचा अल्प भाग दिलेला आहे पण त्यात महम्मदाच्या सोमनाथ स्वारीविषयक काहीच लिहिलेले नाही. त्याच पुस्तकामध्ये अन्य मुस्लिम इतिहासलेखकांचे सोमनाथ स्वारीचे वर्णन आहे पण त्यामध्येहि महम्मदाने भोंदू ब्राह्मणांना धडा शिकविण्यासाठी ही स्वारी केली असा काहीच उल्लेख नाही. हिंदु देवळे नष्ट करणे, त्यातील मूर्ति फोडणे, तेथील संपत्ति लुटणे, कत्तली करणे आणि गुलाम पकडून नेणे ह्यापलीकडे महम्मदाचे काही अन्य, भोंदू ब्राह्मणांना धडा घालणे असे काही उद्दिष्ट होते असे कोणाच्याच वर्णनात येत नाही. त्याची ही कृत्ये त्या मुस्लिम इतिहासकारांच्या दृष्टीने प्रशंसापात्रच होती.

तेव्हा प्रश्न असा पडतो की जोतिबांना असा पोवाडा लिहिण्यास - त्यांनी तो लिहिला असे मानून, कारण प्रा. नेमाडे तसे म्हणतात - साहित्य आणि माहिती कोठून मिळाली असावी? इकडे अन्य कोणासच हे काही माहीत नव्हते. जोतिबांचा १०-११ व्या शतकातील मुस्लिम इतिहासाचा आणि पर्शियन भाषेचा काही अभ्यास होता काय ज्यामुळे अल बिरुनीचा ग्रंथ त्यांना उपलब्ध होता आणि त्यांनी तो वाचला होता असे आपण मानावे?

त्याहि पलीकडे जाऊन असे विचारावेसे वाटते की पुजारी जरी दुष्ट आणि गोरगरीबांस लुटणारे असे होते तरीसुद्धा हिंदुस्थानातील देवळे फोडणार्‍या आणि मूर्ति मशिदींच्या पायात पुरणार्‍या महम्मदाचे उदात्तीकरण एका भारतीयाने करावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुलेंनी महंमद पैगंबरांवर हे अखंड लिहिले होते! त्याचा उल्लेख बहुधा नेमाडेंना करायचा असावा!! त्यांनी तो उल्लेखदेखील चुकीचाच केला असे दिसते!

हजरत महंमद पैगंबरांचा पोवाडा
महंमद झाल जहामर्द खरा ।
त्यागीले संसारा ।
सत्यासाठी ।। धृ ।।
खोटा धर्म सोडा-सांगे जगताला ।
जन्म
घालविला । इशापायी ।। १ ।।
जगहितासाठी लिहिले कुराण ।
हिमतीचा राणा ।
जगीवीर ।। २ ।।
जगाचा पालक निर्मिक अनादि ।
सर्वकाळ वंदी ।
निके सत्य ।। ३ ।।
मन केले धीट , धरीली उमेद ।
नाही भेदाभेद ।
ठावा ज्याला ।। ४ ।।

-महात्मा जोतीराव फुले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

त्याहि पलीकडे जाऊन असे विचारावेसे वाटते की पुजारी जरी दुष्ट आणि गोरगरीबांस लुटणारे असे होते तरीसुद्धा हिंदुस्थानातील देवळे फोडणार्‍या आणि मूर्ति मशिदींच्या पायात पुरणार्‍या महम्मदाचे उदात्तीकरण एका भारतीयाने करावे काय?

हा मुद्दा बरोबर असला तरी नेमाडपंथी लोक तो कधी विचारात घेणार नाहीत. जे जे प्रस्थापित आहे त्याचे भंजन करायचे, मग ते योग्य असो वा अयोग्य, हाच त्यांचा मूलमंत्र आहे. मात्र, साहित्यसंमेलन भरवणे, हा कालापव्यय आहे, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> य.दि.फडके संपादित समग्र फुले वाङ्मयात (५वी आवृत्ति) तरी असा काही पोवाडा वा अन्य लिखाण मला दिसत नाही.
> तेव्हा प्रश्न असा पडतो की जोतिबांना असा पोवाडा लिहिण्यास - त्यांनी तो लिहिला असे मानून, कारण प्रा. नेमाडे तसे म्हणतात - साहित्य आणि माहिती कोठून > मिळाली असावी?

'समग्र फुले' हे पुस्तक माझ्या वाचनात आलेलं आहे. एखादं मत मांडण्याआधी फुल्यांना बळकट आधाराची गरज वाटत असे असा ग्रह ते वाचून निदान माझा तरी झाला नाही. अर्थात त्यांनी असा काही पोवाडा लिहिलाच नसेल तर प्रश्नच मिटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

समग्र फुले' हे पुस्तक माझ्या वाचनात आलेलं आहे. एखादं मत मांडण्याआधी फुल्यांना बळकट आधाराची गरज वाटत असे असा ग्रह ते वाचून निदान माझा तरी झाला नाही.
+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुजारी जरी दुष्ट आणि गोरगरीबांस लुटणारे असे होते तरीसुद्धा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुजारी जरी दुष्ट आणि गोरगरीबांस लुटणारे असे होते तरीसुद्धा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुंजीरांचा लेख (पब्लिक डोमेनमध्ये) उपलब्ध आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरेच्या! मला वाटलं "इंग्रजी शाळा बंद केल्या पाहिजेत" या विधानावर लेख असेल म्हणून जरा बोटे सरसावणार तर हा लेख..
असो. माझा पास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरब लुटारूं जिथे गेले तिथल्या देवस्थानांना त्यांनी नष्ट केले, आपल्या देशात हजारोंच्या संख्येने बोद्ध विहार आणि नालंदा सारख्या विद्यापीठानां ही नष्ट केले (तिथे कुठे ब्राहमण दुराचार करीत होते). बोद्ध भिक्षुना आपले ग्रंथ घेऊन तिब्बत येथे प्रयाण करावे लागले. उत्तर भारतात बोद्ध धर्म नष्ट झाला त्याचे कारण इस्लाम. लुटलेला पैसा जनतेच्या भल्या साठी वापरला गेला नाही तो लुटून परदेशी गेला. देश्यात सर्वत्रच मंदिरे आणि बोद्ध विहार लुटल्या आणि जाळल्या गेले. हिंदू धर्म लवचिक असल्या मुळे घरी सुद्धा देवतांची आराधना होऊ शकत होती. परंतु विहाराच्या अभावी बोद्ध धर्म उत्तर भारतात काळाच्या गर्तीत गेला.
फुले असो की नेमाडे यांना 'विजेतांकडून अर्थात त्यांच्या दृष्टीने (प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार करायचा होता) लिहिलेला इतिहास' माहित होता. शिवाय अशी विधाने करून प्रसिद्धी मिळते आणि पैसा ही. मग सत्य माहित असले तरी ही असली विधाने केली जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0