|| जन्मली गीता ||

|| जन्मली गीता ||
पंचसहस्त्रावधी सन पूर्वी उजाडला मार्तंड
प्रत्यया सर्वश्रेष्ठ नीतिचे बोल संभाषण ||१||

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा दिवस होता
चाहूल लागली होती महाभयानक महाभारता ||२||

धनंजय अडला धर्म संकटी सापडला
निमित्त साधून धर्माध्यक्ष उपदेशला ||३||

कुरूक्षेत्रा समेत अनुभवले संजय अन धृतराष्ट्रा
थरारले ब्रम्ह वधे, मोक्ष तो 'ज्ञान-कर्म' ऎकता ||४||

धर्म कळवाया जनाला अवतरला तो अनंता
मुरली मुखातून मुरली स्वराने स्फुरली गीता ||५||
- श्रीकांत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

जुन्या धाटणीची ही कविता खूप आवडली. सकाळी सकाळीच वाचली होती. प्रसन्न वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंचसहस्र वर्षांपूर्वी - आणि तीसुद्धा मार्गशीर्ष एकादशीला - गीता जन्मली अशा अर्थाचे विधान वरील कवितेत आहे. त्याला काही आधार आहे काय?

आजच लोकसत्तेमध्ये हा अग्रलेख वाचला. त्यामध्ये गीतेचे निर्मितिवर्ष आणखीच सूक्ष्म, ५१५१ वर्षे, असे दाखविले आहे. असल्या विधानांमुळे भारताचा प्राचीन इतिहास डोक्यावर उभा केला जात आहे आणि त्याला सरकारी पाठिंबा आहे असे जाणवू लागले आहे.

गीतेच्या उगमाविषयी 'ऐसी'मधीलच हा पूर्वीचा धागा पहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री अरविंद जी ,
प्रतिक्रीये बद्दल आभार.
कविता करण्या पूर्वी हे खालील संकेत स्थळ बघितले होते,
mahiti
ज्याप्रमाणे गीता उगम ५००० वर्ष पूर्वीच ( ३१३७ ख्रिस्त पूर्व = ५१५१ वर्षे पूर्व ). एवढा संदर्भ पुरे वाटला.
मार्गशीर्ष एकादशी बाबत पुढील संदर्भ पुरे वाटला
http://en.wikipedia.org/wiki/Mokshada_Ekadashi
विविध अभ्यासकानुसार गीता जयंती रचने बद्दलचे मत वेग-वेगळे आहे.
मग आता सगळ्यांसाठी किती कविता कराव्यात ?
माझ्या मते कवी आणि अभ्यासकांमध्ये ह्या सीमा स्पष्ट असाव्या.

असल्या विधानांमुळे भारताचा प्राचीन इतिहास डोक्यावर उभा केला जात आहे आणि त्याला सरकारी पाठिंबा आहे असे जाणवू लागले आहे.
विधानाचे तात्पर्य समजले नाही.

ही केवळ भावार्थ कविता असल्याने, आजच्या किंवा कालच्या सरकारचा धागा जुळत नाही.
माझ्या मते एसी अक्षरे हे मचाण साहित्यी चलन देण्यासाठी आहे. आयुष्यात प्रकाशित केलेली ही माझी पहिलीच कविता आहे.
राजकारण आणि साहित्य यामधील सीमा रेषाही स्पष्ट असाव्या अशी विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते कवी आणि अभ्यासकांमध्ये ह्या सीमा स्पष्ट असाव्या

ठीक. 'पंचसहस्त्रावधी' वैग्रे गोष्टी सोडून देऊ.

परंतु मराठीत विभक्ती प्रत्यय हे शब्दाला लागून येतात (हिंदीप्रमाणे) स्वतंत्रपणे येत नाहीत, हे ठाऊक असण्याची अपेक्षा एका (मराठी) कवीकडून करावी काय?

नीति चे, एकादशी चा हे अनुक्रमे नीतिचे, एकादशीचा, असे लिहिले असतेत तर, डोळ्यांना खटकले नसते!

महाभयानक महाभारता, हे महाभयानक महाभारता(ला) असे वाचणे अपेक्षित आहे काय?

धर्माध्यक्ष उपदेशाला, हे धर्माध्यक्ष उपदेशला, असे हवे होते काय?

कुरूक्षेत्रा समेत अनुभवले संजय अन धृतराष्ट्रा
थरारले ब्रम्ह वधे, मोक्ष तो 'ज्ञान-कर्म' ऎकता

ह्याचा नीट अर्थ लागला नाही.

आयुष्यात प्रकाशित केलेली ही माझी पहिलीच कविता आहे

पुलेशु.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री सुनीलजी,
आपली प्रतिक्रिया आवडली आणि सुधारोख वाटली.
विभक्ती प्रत्यय(मुद्रण-त्रुटी.) बद्दलचे परिष्करण वर केलेले आहे. भविष्यात दखल घेण्यात येईल.

महाभयानक महाभारता, हे महाभयानक महाभारता(ला) असे वाचणे अपेक्षित आहे काय?

होय.

धर्माध्यक्ष उपदेशाला, हे धर्माध्यक्ष उपदेशला, असे हवे होते काय?

होय.

कुरूक्षेत्रा समेत अनुभवले संजय अन धृतराष्ट्रा
थरारले ब्रम्ह वधे, मोक्ष तो 'ज्ञान-कर्म' ऎकता

भावार्थ : गीता उच्चाराचे मंत्र कुरुक्षेत्रासमेत संजय आणि धृतराष्ट्र यांनी देखील अनुभवले.
(संजय यास व्यास ऋषींचे दूरदृष्टी वरदान असल्यामुळे... )
ब्रम्हांड थरारले (वातावरण निर्मिती ) जेव्हा श्री कृष्णांनी गीता मंत्राद्वारे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे ऎक समाजणाऱ्यास मोक्ष प्राप्ती होते असे अर्जुनास समजावले(या व्यतिरिक्तही अजून अखंड बिंदू आहेत. मला हा बिंदू नोंद्वासा वाटला )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विभक्ती प्रत्यय सुधारणेबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुधारोख आणि परिष्करण म्हणजे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...साफसफाई करून व्यवस्थित नीटनेटके करणे. बाकी सुधारोख बोले तो काय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताचा प्राचीन इतिहास डोक्यावर उभा केला जात आहे आणि त्याला सरकारी पाठिंबा आहे असे जाणवू लागले आहे.

डोक्यावर पडलेले लोक सरकारात आल्यामुळे हे असे सुरु झाले आहे. एका कमळासाठी आम्ही चिखल का सहन करायचा ? आणि तेही 'कमळ' आहे की नाही हे सिद्ध व्हायचेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0