दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
मृत्युदिवस : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)
---
आंतरराष्ट्रीय दाई दिवस
१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- मार्मिक गोडसे
- बॅटमॅन
प्रतिक्रिया
जाउद्या....
जाउद्या लय लोड घेऊ नका...
व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी
धन्यवाद
जेंव्हा मी सल्ला विचारला होता आणि बरेच वेळ लेख अस्तित्वात होता तेंव्हा तुम्ही सोडून एकानेही प्रतिसाद दिला नाही. म्हणून सर्व डीलीट केले कारण लोकांना बहुदा काही सुचले नसेल किंवा काय उगाचच असल्या गोष्टी इथे लिहिता. किंवा बेनिफिट ऑफ दौट म्हणून ह्या लोकांनी वाचला नाही असे म्हणतो आणि थोडक्यात पुन्हा लिहितो.
माझा एक मित्र आहे. २ किडन्या निकामी झाल्या आहेत. दारू पिवून स्वतःच्या हाताने हे झाले आहे. बाकीची कर्मकहाणी पण भरपूर आहे. आईला क्यानसर आहे. वडिलांना सर्व धक्याने प्यारालेसीसचा झटका बसला आहे. धाकटा भाऊ प्रचंड टेन्शन मध्ये आहे. नातेवाईक फारसे कोणी मदत करायला तयार नाहीयेत. २ दिवसात अजून टेस्ट करून कळेल कि फक्त डायलेसिस करून काही दिवस हा जिवंत राहील कि किडनी ट्रान्सप्लांट करायची. त्यासाठी धाकटा भाऊ विचारतोय काय करू. माझे पहिले मत मारू देत असे आहे. स्वतःच्या हाताने केले आहे बाकीच्या लोकांनी त्रास का सहन करावा. पण नंतर आपण दिला असा सल्ला आणि खरच मेला तर माझ्या मनाला रुखरुख लागून राहील. म्हणून एक मत विचारले होते.
मात्र नुसते टिंब दिसल्यावर जरा जान आली आणि गम्मत चालू झाली. असो
गंमत?
(गं)मतः तुमची स्वतःची किडनी त्याला डोनेट करा.
प्रश्न वेगळा आहे.
बहुदा मौजमजा असल्याने तुम्हाला प्रश्न निट कळला नसावा. प्रश्न वेगळा आहे. ज्याने स्वतःच्या हाताने हे ओढवून घेतले आहे. ज्याला किमान १० वर्ष लोक समजून सांगत आहेत त्याच्यासाठी बाकीच्यांनी किती खस्ता खाव्यात. ह्यावर काही मला चर्चा अपेक्षित होती पहिल्यापासून.
अवांतर : हे असं क्सं सांगता
अवांतर : हे असं क्सं सांगता येणार हो? या परिस्थितीत सापडलेल्या प्रत्येक माणसागणिक, त्याच्या त्याचा स्वभावाप्रमाणे वेगवेगळे उपाय असणार ना! एवढं खरं की जे काही ठरवावं ते केवळ त्या आजारी माणसावर किंवा त्याच्या कुटुंबियांवर उपकार म्हणून ठरवू नये. मनापासून ईच्छा असेल तर ठरवावे नाहीतर त्याचं आणि कुटुंबियांचं जे होईल ते होईल. कर्मसिद्धांत आहेच टोचणी दूर करायला.
सल्ला: एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घेऊ शकलात तर बघा. काही माहिती मिळाली तर कळवेन.
लेख आवडला. विषयाचे इतके
लेख आवडला.
विषयाचे इतके मुद्देसूद आणि सविस्तर विवेचन आजवर पाहिले नव्हते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तिसरा मुद्दा!
वरून तिसर्या मुद्द्याबद्दल आपणाशी एकदा चर्चा करायची आहे!!
इतर मुद्द्यांशी सहमत!
इतका मजेशीर लेख आधी आला
इतका मजेशीर लेख आधी आला नसल्यअने कॅटेगरी बदलून "मौजमजा" केली आहे.
इथे करायचई ती मजा करून झाली की धागा मनातील विचारांच्या धाग्यावर हलवण्यात येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हे उडवता येईल काय
हे उडवता येईल काय? तशी काही सोय आहे का? तसही मी बरेच पर्सनल लिहिले होते आणि म्हटले पण होते कि २-३ दिवसांनी काढून टाकावे. तेंव्हा उद्या रात्री उडवता आला तर उत्तम.
वाचनमात्र
इथे धागे सहसा उडवले जात नाहीत. तुमच्या वरच्या प्रतिसादातील परवानगी गृहित धरून धागा वाचनमात्र करत आहे
(मी केवळ टिंब बघितल्याने व नंतरची मजा बघितल्याने धागा मौजमजेत हलवला होता. असो.)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लेखाचा सूर खटकला.
लेखाचा सूर खटकला.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
लेखावर उगाच खवचट कॉमेंट
लेखावर उगाच खवचट कॉमेंट करण्यात काय अर्थ आहे?
कोणता सूर खटकला याचे सविस्तर विवेचन करावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कोमल निषाद जरा कमी लागला
कोमल निषाद जरा कमी लागला होता. विशेषतः अवरोही तानांमध्ये हा सूर विशेष खटकत होता.
सॉरी. मी फक्त टिंब पाहिलं आणि
सॉरी. मी फक्त टिंब पाहिलं आणि आगावपणा केला. मित्र-किडनी हा पूर्वावतार सलील यांचा वरचा प्रतिसाद वाचून समजलं. प्रतिसाद धाग्याच्या गंभीर पूर्वावताराला उद्देशून नव्हता.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सॉरी नको हो.... मी पण टिंबच
सॉरी नको हो.... मी पण टिंबच पाहिलं होतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सॉरीची गरज नाही हो.
सॉरीची गरज नाही हो. ठीक आहे. माझ्या प्रश्नावर जरा चर्चा झाली तर काही वेगळी मते काळतील. तसाही उद्या काहीतरी निर्णय घ्यायचाच आहे. त्याधी कधी मते वाचायला मिळाली तर उत्तम होईल.