समरांगणसूत्रधार ग्रन्थातील यन्त्रविधान आणि विमानविद्या
’समरांगणसूत्रधार’ हा इसवी सनाच्या १०व्या-११व्या शतकाच्या पुढेमागे लिहिला गेलेला हिंदु वास्तुशास्त्रावरील संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. धारानगरीचा विद्वान राजा भोज ह्याने हा ग्रन्थ रचला अशी श्रद्धा आहे. म.म. टी. गणपतिशास्त्री ह्यांनी सर्वप्रथम उपलब्ध हस्तलिखितांच्या आधारे ह्या ग्रन्थाची मुद्रणयोग्य आवृत्ति तयार केली आणि बडोदा संस्थानच्या ग्रन्थालयाच्या माध्यमामधून दोन खंडामध्ये ती १९२४ साली प्रसिद्ध केली. तिचाच उपयोग मी पुढील लेखनामध्ये केला आहे. त्यातील संस्कृत श्लोकांची - काही जागी थोडी स्वैर अशी - भाषान्तरे माझी आहेत.
८३ अध्यायांच्या ह्या ग्रंथात वेगवेगळ्या आकाराच्या नगरांसाठी, ग्रामांसाठी आणि खेटकांसाठी (खेडी) जमीन कशी निवडावी, त्यांचे आराखडे कसे असावेत, त्यांमध्ये राजप्रासादापासून वेगवेगळ्या आकाराची घरे कशी आणि कोठे बांधावीत, राजप्रासाद कसे असावेत, वेगवेगळ्या देवतांची देवालये कोठेकोठे असावीत अशा प्रकारच्या स्थापत्यविषयक विचारांपासून, मूर्ति कशा कोराव्यात, चित्रे कशी काढावीत अशा प्रकारच्या कला आणि सजावटीपर्यंतच्या अनेक विषयांवर विवेचन सापडते. आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारची नगरे पायापासून बांधायला मोकळी जागाहि उपलब्ध नाही आणि आधीच अस्तित्वामध्ये असलेली नगरे सांभाळणे बाजूस ठेवून नवी नगरे निर्माण करण्याचे कारणहि नाही. राजप्रासादासारख्या वास्तु बांधणे आता कालबाह्य झाले आहे कारण त्यात राहण्यासाठी ऐतिहासिक प्रकारचे राजेच उरलेले नाहीत. थोडक्यात म्हणजे ह्या ग्रंथात वर्णिलेल्या गोष्टी आता बह्वंशी कालबाह्य झाल्या आहेत आणि केवळ इतिहासाचा अभ्यास असे त्याचे आता प्रमुख महत्त्व उरले आहे. त्यातील विवेचनाचा आजच्या काळातील स्थपतीला - आर्किटेक्ट - विशेष काही उपयोग नाही हे खरे आहे.
सध्या ह्या संस्थळावर चालू असलेल्या दुसर्या धाग्यावरून दिसते की प्राचीन आणि मध्यकालीन हिंदुस्तानात यन्त्रविद्या कशी होती - आणि विशेषत: प्राचीन भारतात विमाने बनविण्याचे ज्ञान होते काय ह्या अनुषंगाने ’समरांगणसूत्रधार’ ह्या ग्रंथाचा उल्लेख वारंवार केला गेला आहे. त्याचे कारण असे आहे की ह्या ग्रंथाच्या एकूण ८३ अध्यायांपैकी ३१वा अध्याय (२२३ श्लोक) ’यन्त्रविधान’ ह्या विषयाला वाहिलेला आहे. प्रासाद, वाटिका, नगरे, मन्दिरे इत्यादि सजविण्यासाठी उपयोगी ठरतील चीजांची निर्मिति हा वास्तुशास्त्राचाच भाग आहे आणि म्हणून ’यन्त्रविधान’ हेहि ह्या अध्यायामध्ये वर्णिलेले आहे. जल, वायु, अग्नि, तसेच नाना धातु, लाकूड, चर्म इत्यादींचा युक्तीने उपयोग करून नाना चमत्कृतिदर्शक ’यन्त्रे’ कशी बनविली जातात ह्याची वर्णने येथे आहेत. अधिक मनोरंजक म्हणजे आकाशात उडणारे विमान कसे करता येते हेहि अध्यायात वर्णिले आहे.
(येथील विमानविषयक भाग वाचून माझे तरी असे मत झाले आहे की ह्या यन्त्रविधान अध्यायातील अन्य बहुसंख्य वस्तूंप्रमाणे हे ’विमान’हि मनोविनोदनाचा भाग, सोप्या शब्दात एक प्रकारचे खेळणे, अशा स्वरूपाचे दिसते. ही विमाने दूरच्या प्रवासाच्या अथवा युद्धाच्या कामाची होती असे वाटत नाही.)
हे वाचून कोणी उत्सुकतेने अध्याय पाहू लागला तर त्याच्या पदरी बरीचशी निराशा येते. ह्या निराशेची कारणे तीनचार आहेत. एकतर बरीचशी ’यन्त्रे’ ही कारंजी, फवारे, कठपुतळी बाहुल्या अशा प्रकारच्या आज अगदी सोप्या वाटणार्या गोष्टी आहेत. १०व्या ११व्या शतकामधील औद्योगिकपूर्व साध्या दिवसांमध्ये ह्याचे कौतुक निश्चित वाटत असणार पण आता काळ आणि समज पुष्कळच पुढे गेले आहेत. दुसरे कारण म्हणजे ह्या वस्तूंची वर्णने अगदी त्रोटक स्वरूपात दिली आहेत आणि केवळ त्या वर्णनांवरून ती वस्तु बनविणे शक्य होईल असे वाटत नाही. सर्वांना विशेष स्वारस्य असणार्या विमानाचे वर्णनहि अगदीच उडतउडत आहे. ते वाचून तसे विमान बनविणे आणि ते कसे उडते हे समजणे शक्य वाटत नाही. ही वर्णने अशी त्रोटक का आहेत ह्याचे उत्तरहि अध्यायातच दिले आहे. त्यासाठी श्लोक ७९-८१ पहा:
यन्त्राणां घटना नोक्ता गुप्त्यर्थं नाज्ञतावशात्॥ ७९
तत्र हेतुरयं ज्ञेयो व्यक्ता नैते फलप्रदा:
कथितान्यत्र बीजानि यन्त्राणां घटना न यत्॥ ८०
तस्माद् व्यक्तीकृतेष्वेषु न स्यात्स्वार्थो न कौतुकम्
वस्तुत: कथितं सर्वं बीजानामिह कीर्तनात्॥ ८१
यन्त्रे का चालतात हे गुप्तता राखण्याच्या हेतूने सांगितलेले नाही. असे न सांगण्याचे कारण अज्ञान हे नाही. ७९
न सांगण्याचा हेतु असा आहे हे लक्षात घ्यावे. हे सांगण्यामुळे काहीहि फळ मिळणार नाही. त्याची बीजे अन्यत्र सांगितलेली आहेत, यन्त्रे का चालतात हे सांगितलेले नाही. ८०
ते स्पष्ट करून सांगण्याने काही साधणारहि नाही आणि त्यामध्ये काही विशेषहि नाही. वस्तुत: बीजांच्या वर्णनातून येथे ते सर्व सांगितलेलेच आहे. ८१
अध्यायाचे पहिले सुमारे ४० श्लोक हे ’बीज’ म्हणजे काय आणि बीजांच्या कमीअधिक प्रभावाने नाना यन्त्रे कशी निर्माण होतात ह्या विवेचनासाठी आहेत. ’क्षितिरापोऽनलोऽनिल:’ म्हणजे पृथ्वी, आप, अग्नि. आणि वायु ह्या चार भूतांची बीजे - त्यांचे अंगभूत गुण - ह्यांच्या कमीअधिक उपयोगाने यन्त्र निर्माण होते. ह्या चारी भूतांना पायाभूत असल्याने ’आकाश’ हेहि पाचवे भूत मानले गेले आहे. ’सूत’ (पारा) हे एक भूत आहे असे जे एक मत आहे ते चुकीचे आहे असे ग्रन्थकर्ता सांगतो कारण ’सूत’ हा प्रकृतीने पार्थिव म्हणजे पृथ्वीभूताचेच रूप आहे. [प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे भूते, त्यांची बीजे आणि त्या बीजांच्या संमिश्रणातून निर्माण होणारी यन्त्रे ह्याचा अर्थ मला समजलेला नाही. जालावर जे थोडे पाहायला मिळाले त्यावरून ’भू्त’ म्हणजे भौतिक (Natural Philosophy) आणि ’बीज’ म्हणजे पारलौकिक (Occult) अशा दोघांच्या सहकार्यातून यन्त्र निर्माण होते असे सुचविले आहे असे दिसते. ग्रीक तत्त्वज्ञ ऍनक्झागोरस (ख्रि.पू. ५००-४२८) ह्याने जी ’seeds’ अथवा ’live principles’ वर्णिली आहेत त्याच्याशी प्रस्तुत ग्रन्थातील ’बीजा’चा संबंध दर्शविला आहे. तसेच ’बीज’ ही संकल्पना समरांगणसूत्रधार ह्या ग्रन्थामध्ये प्रथमच पाहायला मिळते असेहि सांगण्यात आले आहे. पहा 'The Concept of Yantra in the Samarangana-sutradhara of Bhoja' by Mira Roy, The Indian Journal of History of Sciences, 19(2): 118-124 (1984)]
हे मुख्य तत्त्व सांगितल्यावर ग्रन्थकर्ता यन्त्रांच्या प्रकारांकडे आणि यन्त्रांच्या स्वयंवाहक, बाहेरून एकदा प्रेरणा लागणारे अशा प्रकारच्या वर्गीकरणाकडे वळतो. तदनन्तर यन्त्रामुळे काय चमत्कार दिसू शकतात - उदा. जलामध्ये अग्नि आणि अग्निमध्ये जल - असे वर्णन येते. यन्त्रज्ञानामुळे धन, विलास, राजाची कृपादृष्टि, प्रमदांचे प्रेम, विस्मयकारक वस्तु, देवादिकांच्या दर्शनाने त्यांची कृपा अशा सर्व ईप्सित गोष्टी साध्य होतात असे सांगितले आहे.
ह्यानंतर काही चमत्कृतिपूर्ण यन्त्रांचे प्रत्येकी एकदोन ओळींमध्ये वर्णन येते. वर्णनाच्या त्रोटकपणामुळे मला तरी त्यामधून विशेष बोध होत नाही. काही उदाहरणे पहा:
शय्याप्रसर्पण यन्त्र -
विधाय भूमिका: पञ्च शय्या त्वादिभुवि स्थिता
प्रतिप्रहरमन्यासु सर्पन्ती याति पञ्चमीम्॥ ६५
पाच आधार (= भूमिका) निर्माण करून पहिल्या आधारावर ठेवलेली शय्या प्रतिप्रहर अन्य आधारांवर सरकून पाचव्यावर जाते.
नाडीप्रबोधन यन्त्र -
क्रमेण त्रिशतावर्तं स्थाले दन्ता भ्रमन्त्यसौ ॥ ६६
तन्मध्ये पुत्रिका कॢप्ता प्रति नाडिं प्रबोधयेत्
स्थालीमध्ये उभी बाहुली क्रमाने तीनशे दात्यांमधून फिरते आणि दर नाडीला इशारा देते. (घडयाळासारखा escape mechanism वापरून तीनशे दात्यांचे चक्र फिरते आणि दर नाडीला आवाज करते असा ह्याचा अर्थ असावा असे वाटते. नाडी = अर्धा मुहूर्त = २४ मिनिटे.)
गोलभ्रमण यन्त्र -
गोलश्च सूतिविहित: सूर्यादीनां प्रदक्षिणम्॥ ६९
परिभ्राम्यत्यहोरात्रं ग्रहाणां दर्शयन् गतिम्
पार्यावर (सूति = quicksilver, मोनिअर-विल्यम्स) आधारित असा गोल सूर्य इत्यादींचे भ्रमण आणि ग्रहांची गति दर्शवीत अहोरात्र फिरत राहतो.
दूरगमन यन्त्र -
गजादिरूपे रथिकरूपतां गमित: पुमान्॥ ७०
भ्रान्त्वा नाडिकया तस्या: पर्यन्ते हन्ति योजनम्
गज इत्यादि अथवा रथारोही रूपातील पुरुष (बाहुली) नाडीमधून (tube) तिच्या अन्तापर्यंत एक योजन प्रवास करतो.
दीपतैल यन्त्र -
दीपिकापुत्रिका कॢप्ता क्षीणं क्षीणं प्रयच्छति॥ ७१
दीपे तैलं प्रनृत्यन्ती तालगत्या प्रदक्षिणम्
दीपातील बाहुली तालावर नृत्यामधून प्रदक्षिणा करत करत दिव्यामध्ये थोडेथोडे तेल घालत जाते.
जलपान करणारा हत्ती -
यावत्प्रदीयते वारि तावत्पिबति सन्ततम्॥ ७२
यन्त्रेण कल्पितो हस्ती न तद्गच्छत्प्रतीयते
यन्त्रातील हत्ती जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत पीत राहतो. तो जागेवरून हलतांना दिसत नाही.
नाचणारे-गाणारे पक्षी आणि प्राणी -
शुकाद्या: पक्षिण: कॢप्तास्तालस्यानुगमान्मुहु:॥ ७३
जनस्य विस्मयकृतो नृत्यन्ति च पठन्ति च
पुत्रिका वा गजेन्द्रो वा तुरगो मर्कटोऽपि वा॥ ७४
वलनैर्वर्तनैनृत्यंस्तालेन हरते मन:
तालावर नाचणारे आणि बोलणारे पक्षी पाहणार्याच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण करतात. बाहुली, हत्ती, घोडा, माकड तालावर घिरटया घेत नृत्य करून मन रिझवतात.
गाणारे लाकडी पक्षी -
अङ्गुलेन मितमङ्गुलपादेनोच्छ्रितं द्विपुटकं तनुवृत्तम्
संविधेयमृजु मध्यगरन्ध्रं श्लिष्टसन्धि दृढताम्रमयं तत्॥ ८९
दारवेषु विहगेषु तदन्त: क्षिप्तमुद्गतसमीरवशेन
आतनोति विचलन्मृदुशब्दम् शृण्वतां भवति चित्रकरं च॥ ९०
एक अंगूळ व्यासाची तांब्याची दोन वर्तुळे एकमेकांपासून पाव अंगुळाइतकी दूर बसवून त्यामध्ये रन्ध्र पाडून त्याच्या आत लाकडी पक्षी ठेवल्यास येणार्याजाणार्या वार्यामुळे गोड गातात आणि ऐकणार्याचे चित्त रिझवतात.
पुढील तीन श्लोकांवरून मला काहीच बोध होत नाही.
सुश्लिष्टखण्डद्वितयेन कृत्वा सरन्ध्रमन्तर्मुरजानुकारम्
ग्रस्तं तथा कुण्डलयोर्युगेनमध्ये पुटं तस्य मृदु प्रदेयम्॥ ९१
पूर्वोक्तयन्त्रे विधिनोदरेऽस्य क्षिप्तेऽथ शय्यातलसंस्थमेतत्
ध्वनिं तत: सञ्चलनादनङ्गक्रीडारसोल्लासकरं करोति॥ ९२
अस्मिञ् शय्यातलविनिहिते मुञ्चति व्यक्तरागम्
चित्राञ्शब्दान्मृगशिशुदृशां याति भीत्येव मान:
किञ्चैतासां दयितमभितो निर्भरप्रेमभाजाम्
प्रौढिं गच्छन्त्यधिकमधिकं मन्मथक्रीडितानि॥ ९३
दोन खण्ड एकमेकावर चांगले बसवून मुरज वाद्यासारखा (मुरज - डफ अथवा कंजीरा) आकार देऊन आणि मध्ये एक रन्ध्र पाडून त्यामध्ये एक मऊ स्तर द्यावा. ह्याआधी वर्णिलेले यन्त्र त्याच्या आतमध्ये नीट बसविल्यावर आणि त्याला शय्येच्या खाली ठेवल्यावर अनंगक्रीडेला उत्तेजित करणारा ध्वनि ते करते. शय्यतलावर त्याला ठेवल्यावर आणि त्याने चित्रविचित्र आवाज केल्यावर मृगनयनांचा मान जणू घाबरून निघून जातो. एवढेच नाही तर आपल्या प्रियकराविषयी बन्धरहित प्रेम निर्माण झालेल्या त्यांची मन्मथक्रीडिते अधिकाधिक वृद्धि पावतात.
वाद्ययन्त्रे -
पटहमुरजे वेणु: शङ्खो विपञ्च्यथ काहला
डमरुटिविले वाद्यातोद्यान्यमून्यखिलान्यपि
मधुरमधिकं यच्चित्रं च ध्वनिं विदधात्यलम्
तदिह विधिना रुद्धोन्मुक्तानिलस्य विजृम्भितम्॥ ९४
पटह (ढोल), मुरज (डफ), बासरी, शंख, विपंची (Indian Lute - मोनिअर विल्यम्स, सतार, वीणा अशासारखे वाद्य), काहला (काहल एक वाद्य - मोनिअर विल्यम्स), डमरु, टिविल (टिव् टिव् असा आवाज करणारे काही वाद्य - एक तर्क) अशा प्रकारची आघात करून वाजवायची वाद्ये आहेत. असे वाद्य मधुर आणि चित्रविचित्र जो ध्वनि निर्माण करते तो अडवून धरलेल्या आणि मोकळ्या केलेल्या वायूचे विलसित आहे.
ह्यापुढील चार श्लोक विमानसंबंधी आहेत -
लघुदारुमयं महाविहङ्गं दृढसुश्लिष्टतनुं विधाय तस्य
उदरे रसयन्त्रमादधीत ज्वलनाधारमधोऽस्य चातिपूर्णम्॥ ९५
तत्रारूढ: पूरुषस्तस्य पक्षद्वन्द्वोच्चालप्रोज्झितेनानिलेन
सुप्तस्वान्त: पारदस्यास्य शक्त्या चित्रं कुर्वन्नम्बरे याति दूरम्॥ ९६
इत्थमेव सुरमन्दिरतुल्यं सञ्चलत्यलघु दारुविमानम्
आदधीत विधिना चतुरोऽन्तस्तस्य पारदभृतान् दृढकुम्भान्॥ ९७
अय:कपालाहितमन्दवह्निप्रतप्ततत्कुम्भभुवा गुणेन
व्योम्नो झगित्याभरणत्वमेति सन्तप्तगर्जद्ररसरागशक्त्या॥ ९८
हलक्या वजनाच्या लाकडातून मोठया पक्ष्याचा मजबूत आकार निर्माण करून त्याच्या पोटामध्ये पार्यावर चालणारे यन्त्र ठेवावे आणि त्याच्या खाली अग्नि लावून ठेवावा. त्यामध्ये आरूढ असलेली पुरुषाकृति बाहुली दोन पखांच्या वरखाली करण्याने उत्पन्न झालेल्या वार्यामुळे पार्याच्या शक्तीने आश्चर्यवत् दूरवर जाते. अशाच प्रकाराने देवळाच्या आकाराचे मोठे लाकडी विमानहि तसेच दूरवर जाते. त्यासाठी पारा धारण करणारे चार मोठे कुम्भ त्यामध्ये ठेवावेत. लोखंडापासून बनविलेल्या कवटीच्या आकाराच्या (= पसरट) भांडयातील अग्निमुळे तापलेल्या कुम्भांच्या गुणामुळे तापलेल्या आणि मोठा आवाज करणार्या पार्याच्या शक्तीने ते विमान लगेचच आकाशाचे आभूषण बनते.
भीतिदायक आवाजाचे सिंहनाद यन्त्र -
वृत्तसंधितमथायसयन्त्रं तद्विधाय रसपूरितमन्त:
उच्चदेशविनिधापिततप्तं सिंहनादमुरजं विदधाति॥ ९९
स कोऽप्यस्य स्फार: स्फुरति नरसिंहस्य महिमा
पुरस्ताद्यस्यैता मदजलमुचोऽपि द्विपघटा:
मुहु: श्रुत्वा श्रुत्वा निनदमपि गम्भीरविषमम्
पलायन्ते भीतास्त्वरितमवधूयाङ्कुशमपि॥ १००
पक्के आणि वर्तुलाकृति लोखंडी यन्त्र आत पार्याने भरून उंच जागी ठेवून तप्त केल्यास सिंहनादासारखा ढोलाचा आवाज करते. जणू काही नरसिंहाचा पसरलेला महिमाच असा हा गंभीर आवाज असा असेल की हा कानी पडल्यावर मदमत्त हत्ती भयभीत होत्साते अंकुशाच्या टोचणीची पर्वा न करता पलायन करतील.
हलणार्या-डोलणार्या कठपुतळी बाहुल्या -
दृग्ग्रीवातलहस्तप्रकोष्ठबाहूरुहस्तशाखादि
सच्छिद्रं वपुरखिलं तत्सन्धिषु खण्डशो घटयेत्॥ १०१
श्लिष्टं कीलकविधिना दारुमयं सृष्टचर्मणा गुप्तम्
पुंसोऽथवा युवत्या रूपं कृत्वाऽतिरमणीयम्॥ १०२
रन्ध्रगतै: प्रत्यङ्गं विधिना नाराचसङ्गतै: सूत्रै:
ग्रीवाचलनप्रसरणविकुञ्चनादीनि विदधाति॥ १०३
करग्रहणताम्बूलप्रदानजलसेचनप्रमाणादि
आदर्शप्रतिलोकनवीणावाद्यादि च करोति॥ १०४
नेत्र, मान, हाताचा तळवा, मनगट, हात, मांडया, बोटे असे संपूर्ण शरीर त्यात जागोजागी छिद्रे ठेवून तुकडयातुकडयांनी बनवावे. खिळ्यांनी त्याला पक्के घट्ट करून पुरुषाच्या वा तरुणीच्या सुंदर रूपामध्ये त्याला बनवून कमावलेल्या कातड्याने झाकावे. विशिष्ट औषधी (नाराच = a particular medicament मोनिअर विल्यम्स) लावलेल्या आणि छिद्रांतून ओवलेल्या दोर्यांच्या वापराने मान हलविणे, लांब वा आखूड करणे, हातात हात देणे, ताम्बूल देणे, पाणी शिंपडणे, आरशात निरखणे, वीणावादन करणे इत्यादि गोष्टी हे शरीर करते.
द्वारपाल, रक्षक अशी कार्ये करणार्या बाहुल्या -
पुंसो दारुजमूर्ध्वं रूपं कृत्वा निकेतनद्वारि
तत्करयोजितदण्डं निरुणद्धि प्रविशतां वर्त्म॥ १०६
खड्गहस्तमथ मुद्गरहस्तं कुन्तहस्तमथवा यदि तत्स्यात्
तन्निहन्ति विशतो निशि चौरान् द्वारि संवृतमुखं प्रसभेन॥ १०७
लाकडापासून केलेले पुरुषाचे रूप निवासस्थानाच्या द्वारात ठेवल्याने त्याच्या हातात दिलेला दंड आत प्रवेश करू पाहणार्यांचा मार्ग अडविते. ते रूप तोंड झाकलेले आणि हातामध्ये खड्ग, मुसळ अथवा भाला धारण करणारे असेल तर ते रात्री प्रवेश करू पाहणार्या चोरांना द्वारातच निर्दयतेने मारून टाकते.
ह्यानन्तर श्लोक १०९ ते १७१ ह्यांमध्ये नाना जलयन्त्रे आणि धारागृहे कशी निर्माण करावीत ह्याचे विस्तृत वर्णन आहे. उंचावरून खाली पडणारे अथवा जमिनीखालील बोगद्यातून (सुरंग) आणलेले पाणी सच्छिद्र वा छिद्रविरहित नालिकांचा उपयोग करून कसे खेळवावे, त्यातून कारंजी कशी करावीत अशा प्रकारचे हे वर्णन आहे. त्याच्या शेवटी -
वापीस्थलस्थितमथ त्रपयावनम्र-
माच्छादितस्तनभरं करपल्लवेन।
गाढावसक्तवसनं जलरोधमुक्ता-
वालोकते प्रणयिनीजनमत्र धन्य:॥
जलविहाराच्या वापीमध्ये लाजेने खाली दृष्टि लावलेल्या, स्तनभार हातांनी झाकणार्या, अडविलेले पाणी सुटल्यावर अंगाला वस्त्र चिकटलेल्या प्रणयिनींना जो पाहातो तो धन्य आहे.
अखेरीस चार प्रकारचे झोपाळे कसे करावेत ह्याच्या वर्णनानंतर हा यन्त्रविधान अध्याय समाप्तीला येतो.
(अवान्तर - ’यन्त्रसर्वस्व’ नावाच्या ग्रन्थामध्ये भारद्वाजऋषींनी विमानविद्येचे निरूपण केले आहे अशी श्रद्धाळूंची श्रद्धा आहे. ह्या लेखासाठी वाचन करतांना हा निबंध माझ्या वाचनात आला. निबंधकर्त्या प्राध्यापकांना, जे Indian Institute of Science madhIla praadhyaapaka aaheta, भारतात प्राचीन कालामध्ये विमान विद्या होती हे विश्वासार्ह वाटत नाही आणि प्राचीन भारतातील विमानविद्येची ही सर्व गोष्ट २०व्या शतकातच निर्माण झाली आहे असे मत त्यांनी मांडले असून ते मत का आणि कसे निर्माण झाले हेहि दाखविले आहे.)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
पुन्हा तपासून पहा ब्वॉ
कोल्हटकरजी, नक्की तुम्हाला ते वैदिक संस्कृत समजलं नसावं नीटसं. किंवा काही कोड्यात लिहलेलं असेल. किंवा एखादं पान वगैरे गळालं असेल त्या पुस्तकाचं. विमानविद्या असं लिहलं असेल अन त्यात ती विद्या नसेल असं आमचं प्राचीन पुस्तक असूच शकत नाही. बहुतेक संस्कृताचे काही अगम्य ज्ञान असावे जे आज लुप्त झालेले आहे.
आता विज्ञान परिषदेत चर्चा
आता विज्ञान परिषदेत चर्चा होते नी तुम्ही खेळणी म्हणता! छ्या!
नायल्या म्हणतो तसे तेव्हाचे संस्कृत वेगळे असेल किंवा एखादे महत्त्वाचे पान गळाले असेल!
आपल्याकडे विमानच काय अंतरिक्षप्रवास, प्रकाशापेक्षा जास्त वेगाने बहुमितीय प्रवास वगैरे सगळॅ होते.
टाईममशीन तर कित्येक जण हातावर बांधूनच फिरत. त्यांना देव म्हटले जायचे. (नै का रामानंदानी त्यांचे शुटिंगही करून ठेवले आहे. क्षणात प्रकट वा क्षणात अंतर्धान पावणारे देव म्हणजे दुसरे काही नसून हातावर टाईम मशीन बांधलेले पुरातन योगीच होत. आता शुटिंग केल्याचा पुरावा आहे म्हणून बरे नैतर आले असते डांबिस विज्ञानवादी लगेच तोंडे वेंगाडत!)
पार्याचे गुण
पार्याला ऊर्जानिर्मितीचे साधन म्हणून येथे का उल्लेखिलेले आहे हे मला सांगता येणार नाही कारण केमिस्ट्री ह्या आणि तत्संबंधी शास्त्रांचे मला काहीहि कळत नाही. वाचकांपैकी कोणास ह्याचा काही अंदाज असल्यास त्यांनी लिहावे. मलाहि हे जाणून घ्यायला आवडेल.
सामान्यज्ञानातून मला हे माहीत आहे की पारा - ज्याला आयुर्वेदामध्ये 'रस' असे संबोधले जाते - हा अल्केमी ह्या प्राचीन पद्धतीचा प्रमुख भाग होता. अल्केमीमध्ये भौतिक (physical) आणि पारलौकिक (occult)अशा दोन्ही विचारांचा समन्वय असे. आधुनिक केमिस्ट्री ह्यातूनच उन्नत झाली आहे. आयुर्वेदामध्येहि ही अल्केमी दिसते आणि त्याच मार्गाने आयुर्वेदामध्ये पार्याचा प्रवेश झाला असावा. आयुर्वेदामध्ये पारा (रस), गंधक आणि नाना क्षार ह्याना महत्त्वाचे स्थान आहे असे मी Materia Medica of the Hindus (Uday Chandra Datta) ह्या जुन्या पुस्तकामध्ये वाचले आहे. तेथे पार्यापासून केलेल्या अनेक औषधांची नावे आहेत. 'सूतशेखराची मात्रा' आपण सर्वांनीच कधी ऐकलेली असावी.
परि तू जागा चुकलासी...
विमान बनवण्याच्या रेशिपीचे जौद्या. वेदकाळात विमाने होती, म्हटल्यावर त्यातले एखादेतरी कोठेतरी, कधीतरी कोसळलेच असते की नाही?
चला, वेदकालीन ब्ल्याकबॉक्साच्या शोधास लागा पाहू!
पाऱ्यात कोणतीही विस्फोटक
पाऱ्यात कोणतीही विस्फोटक शक्ती नाही हे त्यांना माहिती होते. परंतू त्याच्या विचित्र गुणधर्मांमुळे जसे प्रवाहीपणा, जडपणा, सोन्याला चिकटणे त्यात काही शक्ती असावी असे कल्पून लिहिले असावे.
आयुर्वेदाने मात्र त्याची {आणि इतर शिसे, तांबे जडधातुंची} कमालीची दोषमारक शक्ती (अॅंटिबायोटिक) ओळखून त्याचा औषधांत वापर केला. आता इतकी शक्तीमान प्रवाही वस्तु असल्यावर त्याला महादेवाचे वीर्य कल्पिले आहे.
हलक्या वजनाच्या लाकडातून
हलक्या वजनाच्या लाकडातून मोठया पक्ष्याचा मजबूत आकार निर्माण करून त्याच्या पोटामध्ये पार्यावर चालणारे यन्त्र ठेवावे आणि त्याच्या खाली अग्नि लावून ठेवावा. त्यामध्ये आरूढ असलेली पुरुषाकृति बाहुली दोन पखांच्या वरखाली करण्याने उत्पन्न झालेल्या वार्यामुळे पार्याच्या शक्तीने आश्चर्यवत् दूरवर जाते. अशाच प्रकाराने देवळाच्या आकाराचे मोठे लाकडी विमानहि तसेच दूरवर जाते. त्यासाठी पारा धारण करणारे चार मोठे कुम्भ त्यामध्ये ठेवावेत. लोखंडापासून बनविलेल्या कवटीच्या आकाराच्या (= पसरट) भांडयातील अग्निमुळे तापलेल्या कुम्भांच्या गुणामुळे तापलेल्या आणि मोठा आवाज करणार्या पार्याच्या शक्तीने ते विमान लगेचच आकाशाचे आभूषण बनते.
वरील वर्णनावरुन हे आतिषबाजीचा प्रकार (आकाशकंदिल कम रोषणाई) वाटताहेत.
त्यांचं तंत्रज्ञान नक्की काय
त्यांचं तंत्रज्ञान नक्की काय होतं, असावं याबद्दल इथे चर्चा करण्यात काही हशील नाही. त्यात काही खरं नाही असं मानलं तर काहीही रिजेक्ट करता येतं. आणि उगाच रेटून ते कसं वर्केबल असू शकतं याचा कुठपर्यंतही युक्तिवाद करता येतो. आजच अकाउस्टिक लेविटेशनवरची बातमी वाचली. त्यात आवाजाच्या उर्जेने पदार्थ उचलला नि हलवला देखिल आहे. ध्वनीउर्जा इतकी क्षीण असते, आणि इतक्या विचित्र रुपात असते कि पदार्थ उडवण्यासाठी वापरली जाऊ शकते हे खरे वाटत नाही. अगदी वॅट साहेबांनी वाफ पाहून पातेल्यावरचे झाकण ते रेल्वे इंजिन इतकी लांबलचक कल्पनाशक्ती कशी खेचली असेल? तसंच उद्या ही ध्वनी उर्जा अजून जाड वस्तू उचलायला नि हलवायला वापरली जाऊ लागली तर?
आणि मागच्या काळातल्या विमानांच्या बाबतीत, सगळी तंत्रज्ञाने कळायला प्रचंड बुद्धिमत्ता नि प्रचंड चिंतन लागते हे कशावरून? म्हणजे एखादे लै भारी तंत्रज्ञान लकिली मागच्या काळात निरीक्षणास आणि कामास येऊच शकले नाही हे आणि आजच्या लोकांच्या नजरेतून सुटले नाही हे कशावरून? इतकी खात्री कशावरून? पदार्थांचे गुणधर्मच काळानुसार बदलत नाहीत हे कशावरून? कारण प्रत्यक्ष रेकॉर्ड खूप कमी काळाचं आहे.
असो.
विद्यमान पुरावा त्यांना
विद्यमान पुरावा त्यांना पुरेसा वाटला आहे. केस भरकटवू नका. तुमच्या किंवा आजच्या अप्रेजल मधे ते अर्थहिन आहे पण आजची अप्रेजल मेथड फूल्प्रूफ नाही
..निव्वळ तांत्रिक युक्तिवाद वाटतो. ..आरोपीला निर्दोष शाबीत करायचा उद्देश नसून निव्वळ संशयाला जागा असल्याचे पटवून फायदा मिळवणे अशा प्रकारचा.
त्यांना पुरेसा वाटला आहे
त्यांना पुरेसा वाटला आहे म्हणून ते गंभीर आहेत. आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही टिंगल करतो. तुम्ही कशाला उगाच वाद घालताय?
----------------
शास्त्रीय वर्तुळांत वेगवेगळ्या हास्यास्पदतेच्या पातळींची बरीच विधाने वरचे वर होत असतात. टिंगल करायचा जोर एका विशिष्ट जागीच उसळतो तेव्हा मला वाद घालायची इच्छा होते.
आकाशदिवा असावा हा तर्क बरोबर
आकाशदिवा असावा हा तर्क बरोबर आहे गवि. गरम हवेने तो वर आकाशात जातो आणि तरंगताना त्याचा कल जाऊ नये यासाठी कमी आकाराची जड वस्तु म्हणून तळाकडच्या लोखंडी भांड्यातला पारा असेल अर्थात हेच दोन धातू विमान उडण्यास कारण आहेत असा कविंचा आणि सामान्यजनांचा समज झाल्यास जे न देखे रवि--ते देखे गवि कवि.
...
थोडक्यात, हॉट एअर बलून?
त्या काळाच्या मानाने ही प्रगती अगदीच वाईट म्हणता यावी काय? अंडरलाइंग प्रिन्शिपल (निदान सामान्यजनांचे तरी) साफ गंडलेले असले तरी?
हेच दोन धातू विमान उडण्यास कारण आहेत असा कविंचा आणि सामान्यजनांचा समज झाल्यास
तत्कालीन सायण्टिष्ट-इन्व्हेण्टरांनी डॉक्युमेण्टशनचे काम स्वतः करण्याची टाळाटाळ करून ते काम सामान्यजनांकडे औटसोर्स केले (किंवा, रादर, सामान्यजनांनी ते टेकओव्हर केले - परिणाम एकच!), तर दुसरे काय होणार?
जे न देखे रवि--ते देखे गवि कवि.
व्हेअर द सन डोण्ट शाइन... (अॅट द रिस्क ऑफ रिपीटिङ्ग मायसेल्फ अॅड नॉशियम,) दुनियेतील तमाम कविकल्पनांचा उगम कोठून असावा, हे यावरून लक्षात यावे.
तत्कालीन
तत्कालीन सायण्टिष्ट-इन्व्हेण्टरांनी डॉक्युमेण्टशनचे काम स्वतः करण्याची टाळाटाळ करून ते काम सामान्यजनांकडे औटसोर्स केले, तर दुसरे काय होणार?
आजरोजीला हे आउटसोर्सींगचे काम जास्त, मागच्या जमान्यापेक्षा जास्त जोमाने केले जात आहे. त्याचं सुचक म्हणजे "वैज्ञानिक दृष्टिकोन" नावाची अर्थहिन आणि मूर्खपणाची संकल्पना! पण असो.
या माहितीनुसार आधुनिक
या माहितीनुसार आधुनिक विज्ञानाला प्राचीन काळातील विमानांचे अस्तित्व मान्य नाही असा निष्कर्ष सहज काढता येतो.
-----------------
अर्थातच प्राचीन काळातले सगळे साहित्य आज उपलब्ध आहे असे म्हणता येत नाही. असल्यास तेव्हाची कोणतीही गोष्ट डिक्यूमेंट करायची पद्धत आजच्या लोकांना विश्वासार्ह वाटू शकत नाही. शिवाय यात आधुनिक विज्ञानाच्या इगोचा पण प्रश्न आहे. इतकी अवघड, कठिण गोष्ट तेव्हाच्या मागास लोकांना यावी हा आजच्या तथाकथित विज्ञानवादी लोकांना अवमानच वाटेल.
-----------------------
बाकी मागच्या काळात विमाने नव्हतीच असे मी कधी म्हणणार नाही. त्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
१. मानवतेचा खूप सारा इतिहास डिटेलमधे आणि विश्वासार्हरित्या उपलब्ध नाही.
२. उत्क्रांतीची दिशा वरच्याच बाजूला नाही. म्हणजे नेहमी माणूस जास्त बुद्धिमानच बनतो असे नाही. म्यूटेशन्स रँडम होतात आणि काहीही होऊ शकते. तेव्हा गेल्या २५ लाख (ऑर फॉर दॅट मॅटर ३६० कोटी) वर्षांत आपणच सर्वात हुशार आहोत का हे माहित नाही आणि नक्की काय काय नैसर्गिक संकटे आली, लढाया झाल्या आणि काय काय नष्ट झालं याचीही कल्पना नाही.
----------------------
याचा अर्थ मागे काय काय होतं याबद्दल कोणी काहीही म्हणेल तेव्हा काय करणार. मला वाटतं कि विधान १००% खोडता येत नाही तोपर्यंत सन्मानाने घ्यावं.
न संपणारा वाद
प्राचीन काळातील भारतीयांनी ह्या वा त्या क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप मारली होती असे वाद सुरू झाले की त्यांना अन्त नसतो. भारतीय विमान विद्येचे तसेच आहे. प्राचीन भारतीयांना विमानविद्या अवगत होती असे मानण्याच्या संद्र्बात एक मला सुचलेला विचार मांडण्याचा प्रयत्न करतो.
कोठल्याहि तन्त्रज्ञानाची आजची आपल्या आसपास दिसणारी प्रगति पाहिली की असे दिसते की अशी प्रगति ही अनेकांच्या, अनेक वर्षे (कधीकधी काही शतके) चालणार्या संशोधनाचे फलित असते. एके दिवशी कोणी द्रष्टा सकाळी उठला आणि त्याला आत्मस्फूर्तीमधून काही मौलिक विचार सापडला अथवा काही गोष्ट त्याने तयार केली असे कधी होत नाही. विमाने बनविण्याचा ऐतिहासिक प्रयत्न जो सुरू झाला तो पक्ष्यांप्रमाणे पंख हलवून उडण्याचा होता. ग्रीक इकेरसची - Icarus - कथा अशीच आहे. तुकाराम सदेह वैकुंठाला गेला तो पंख हलवणार्या गरुडाच्या पाठीवरून. (ह्याबाबतचा 'संत तुकाराम' चित्रपटातील देखावा येथे पहा.) लहानपणी स्टुलावरून उडी मारून पंखासारखे हात हलवत उडण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केलेला असावा. तेव्हा समरांगणसूत्रधारकाराला लाकडी पक्षी पंख हलवत दूर जातो असे विमान सुचणे नैसर्गिकच आहे.
प्रत्यक्षात असे दिसते पंख हलविण्याच्या उघडउघड कल्पनेच्या पलीकडे जाऊन जेव्हा पंखाच्या वर आणि खाली हवेचे कमी आणि अधिक दाब निर्माण करणे जेव्हा सुचले आणि शक्य झाले तेव्हा राइट बंधूंचे विमान खरेखुरे आकाशात उडले. ते मुख्यत्वेकरून लाकूड आणि कापड ह्यांचेच बनले होते पण तदनंतर शंभर वर्षात वरकरणी विमान विद्येशी संबंध न दिसणार्या अनेक ज्ञानशाखा - विद्युतशास्त्र, धातुशास्त्र इ. इंधनशास्त्र - जेव्हा विकसित झाल्या तेव्हा बोइंग-७८७ च्या आकाराची विमाने निर्माण होऊ शकली. त्यामागे जगभरच्या शेकडो संशोधनशाला, कारखाने, धातूच्या खाणी, खनिज तेलाचा जगड्व्याळ व्यवसाय ह्यांचे जाळे उभे आहे.
प्राचीन भारतामध्ये असे काही न होताच विमाने विकसित झाली असे म्हणता येईल काय? असे शक्य असेल काय की भारद्वाज नावाच्या एका द्रष्टया मुनींना आपल्या आश्रमातील कॉटेज इंडस्ट्रीमध्ये पारा आणि लाकडातून विमान करता येईल असे स्फुरले आणि त्यांनी तसा एक प्रोटोटाइप आपल्या शिष्यांच्या मदतीने बनविला? हे मान्य असले तर ह्या वादाचे ते एक उत्तर आहे. ते अमान्य असेल आणि सध्याच्या आसपास दिसणार्या मार्गानेच मुनि भारद्वाजांनी विमान बनविले हे मान्य करायचे असेल तर पुढचा प्रश्न उभा राहतो की त्या विमानाच्या मागे असलेल्या प्रचंड कारखान्यांचे, संशोधनशालांचे जाळे किंवा त्याचा एखादा तुकडाही उत्खनामध्ये का सापडत नाही? ६५ कोटि वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरची हाडे शिल्लक उरतात तर भारद्वाजांच्या काळातील एखादातरी धातूचा तुकडा का मिळत नाही?
वेद हे अपौरुषेय असतात, ते कोणीच 'रचलेले' माहीत तर मन्त्रद्रष्ट्या ऋषींना ते आतून स्फुरले आणि त्यांनी ते केवळ उच्चारले अशी श्रद्धाळूंची श्रद्धा असते. पैगंबरालहि कुराण तसेच 'सुचले' अशी मुस्लिम श्रद्धाळूंची श्रद्धा असते. अशीच श्रद्दा विमाननिर्मितीच्या बाबतीत मानायची का नाही हाच कळीचा प्रश्न आहे. त्याला काही सर्वमान्य उत्तर दिसत नाही.
६५ कोटि वर्षांपूर्वी नष्ट
६५ कोटि वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरची हाडे शिल्लक उरतात तर भारद्वाजांच्या काळातील एखादातरी धातूचा तुकडा का मिळत नाही?
ही मागणी विचित्र आहे.
१. सोने नि तत्सम धातू निसर्गात शुद्ध धातू अवस्थेत मिळतात. इतर प्रत्येक धातू डिके होतो. अगदी जगात सगळीकडे एक किलो एक किलो म्हणून वापरला जाणारा प्रसिद्ध एक किलोचा धातू , तो सुद्धा एक किलो राहिलेला, आणि अगदी अलिकडच्या कालातला असून नि इतका नीट जपून. शेवटी त्याला व्याख्येतूनच हद्द्पार करायचा विचार आहे.
विकिपेडिअया -
The International Prototype Kilogram was commissioned by the General Conference on Weights and Measures (CGPM) under the authority of the Metre Convention (1875), and is in the custody of the International Bureau of Weights and Measures (BIPM) who hold it on behalf of the CGPM. After the International Prototype Kilogram had been found to vary in mass over time, the International Committee for Weights and Measures (CIPM) recommended in 2005 that the kilogram be redefined in terms of a fundamental constant of nature. At its 2011 meeting, the CGPM agreed in principle that the kilogram should be redefined in terms of the Planck constant. The decision was originally deferred until 2014; in 2014 it was deferred again until the next meeting.[3]
२. समजा एक नागरी संस्कृती होती नि ती विमाने बनवत होती तर तिथे होणारे अपघात, युद्ध, यादवी, नैसर्गिक संकटे, इ इ हे सगळं असंच झालं पाहिजे कि एक अवशेष तरी उरलाच पाहिजे?
म्हणजे आजची दिल्ली पाहून किंवा पुणे पाहून कोणीही म्हणणार नाही कि या लोकांना आज टाउन प्लॅनिंग माहित आहे. इतका अनागोंदी कारभार आहे. मग हजारो वर्षापूर्वी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्लॅन केलेले टाउन्स निघणे हे तर महाअसंभव म्हणून खारीजच केले पाहिजे. पण इतिहासात जिथे कनेक्टचा एक मोठा गॅप पडला आहे त्याच्यामागे अचानक लोकांना टाउन प्लॅनिंगचे ज्ञान होते असे दिसत आहे. अरविंदजी म्हणतात तसे टाउन प्लॅनिंग करायला इतर १० विज्ञाने विकसित झालेली पाहिजेत.
इथिओपियामधे बाईचा सर्वात जुना अख्खा सांगाडा सापडला म्हणून सारं मानववंश शास्त्र तिथून चालू झालं असं शिकवलं गेलं. तेच पुढे जस्टीफाय करण्यासाठी माणसे आणि निअँडरथॅल्स या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत असे गृहित धरावे लागले. त्यासाठी माणसांचा नि निअँडरथॅल्सचे ब्रीडींग न झालेले आवश्यक होते. सुरुवातील मानववंशशास्त्रात याच सगळ्या श्रद्धा होत्या. आता सिद्ध झाले कि आपण होमो सॅपियन आणि निअँडर्थॅल्स या दोन्हीचे वंशज आहोत. मग आफ्रिकेतल्या या सर्वात जुन्या सांगाड्याचे काय करावे हा विचार चालू आहे. तितक्यात पुढील घटना घडली.
http://news.nationalgeographic.com/news/2013/12/131204-human-fossil-dna…
Discovery of Oldest DNA Scrambles Human Origins Picture
PHOTOGRAPH BY JAVIER TRUEBA, MADRID SCIENTIFIC FILMS
By
Karl Gruber
for National Geographic
Published December 4, 2013
New tests on human bones hidden in a Spanish cave for some 400,000 years set a new record for the oldest human DNA sequence ever decoded—and may scramble the scientific picture of our early relatives.
Analysis of the bones challenges conventional thinking about the geographical spread of our ancient cousins, the early human species called Neanderthals and Denisovans. Until now, these sister families of early humans were thought to have resided in prehistoric Europe and Siberia, respectively. (See also: "The New Age of Exploration.")
But paleontologists write in a new study that the bones of what they thought were European Neanderthals appear genetically closer to the Siberian Denisovans, as shown by maternally inherited "mitochondrial" DNA found in a fossil thighbone uncovered at Spain's Sima de los Huesos cave.
"The fact that they show a mitochondrial genome sequence similar to that of Denisovans is irritating," says Matthias Meyer of Germany's Max Planck Institute for Evolutionary Anthropology in Leipzig, lead author of the study, published Wednesday in Nature.
"Our results suggest that the evolutionary history of Neanderthals and Denisovans may be very complicated and possibly involved mixing between different archaic human groups," he said.
Neanderthals and Denisovans arose hundreds of thousands of years before modern-looking humans spread worldwide from Africa more than 60,000 years ago. The small traces of their genes now found in modern humans are signs of interbreeding among ancient human groups.
Previously, the oldest human DNA sequenced came from bones that were less than 120,000 years old.
Meyer said stable temperatures in the cave helped preserve the mitochondrial DNA, and credited recent advances in gene-sequencing technology for establishing the basis for the new milestone.
Mixed Up or Mixing It Up?
For humanity's tangled past, the new mitochondrial DNA results raise an unexpected question: How does a Spanish early human species end up with Siberian DNA?
The authors propose several possible scenarios. For instance, Sima hominins could simply be close relatives of the Denisovans. But that would mean they lived right alongside Neanderthals without having close genetic ties to them.
The Sima hominins could also be a completely independent group that mingled with Denisovans, passing on their mitochondrial DNA, but it would be hard to explain why they also have Neanderthal features.
Another possibility, suggested by anthropologist Chris Stringer of the Natural History Museum in London, is that mitochondrial DNA from the Sima people reached the Denisovans thanks to interspecies sexual adventures among early humans, which introduced the DNA to both the Sima and Denisovans.
In the end, the identity of these ancient people remains a mystery, and further work is needed to clarify their identity. "The current genetic data [mitochondrial DNA] is too limited to conclude much about their population history," Meyer says.
As with the Denisovans, only the decoding of the full genetic map or genome, and not just the mitochondrial DNA, will provide convincing evidence of Sima family history, Meyer says.
-------------------------
इतिहासात प्रचंड गॅप्स आहेत. त्यातले काही विज्ञान सोडवेल. काही तसेच राहू शकतात. तेव्हा "अवशेष" , ते ही ७००० वर्षे जुने, मागणे अवाजवी आहे.
हं!
१. सोने नि तत्सम धातू निसर्गात शुद्ध धातू अवस्थेत मिळतात. इतर प्रत्येक धातू डिके होतो.
शुद्ध सोने कोठे सापडते? अन इतर प्रत्येक धातू डिके होतो? च्यायला काय फेकता हो जोशीबुवा! (एकिकडे तत्सम वापरून अनेक धातू पारड्यात घ्यायचे अन दुसरीकडे इतर प्रत्येक म्हणून सगळ्यांना वगळायचे. म्हणजे नंतर सारवासारव करायला सोप्पं, नाही का!)
पुरावे वगैरे मॉडर्न
पुरावे वगैरे मॉडर्न मूर्खपणाच्या गोष्टींमध्ये अजो पडत नाहीत. अंदाधुंद बेशिस्त गोळीबार करणे इतकेच त्यांना जमते. पुरावे काय आहेत हे बघायचं नाही, बघितलं तरी त्यांत साधकबाधक विचार स्वतः करायचा नाही, आणि असा विचार करणार्यांना "तुमचे ज्ञान अपूर्ण आहे" असे हिणवू पहायचे इतकाच एकूण मामला दिसतो. पण इतरजण १०० पैकी १० पावले पुढे गेले तर त्यांना ९० पावले का मागे आहात असे म्हणणार्यांची स्वतःची प्रगती मात्र ० पाउले आहे ते बघा म्हणावं की.
शास्त्राबद्दल स्वतः घंटा काही न वाचता सवरता अशी सरसकट अज्ञानमूलक टीका करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. तिकडे आतातरी दुर्लक्ष करायला शिका.
शास्त्राबद्दल स्वतः घंटा काही
शास्त्राबद्दल स्वतः घंटा काही न वाचता सवरता अशी सरसकट अज्ञानमूलक टीका करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
शास्त्रज्ञांनी लिहिलेले रीसर्च पेपर वाचलेले असणे हेच विज्ञान वाचलेले असण्याचा एकमात्र निकष आहे ही एक महान विचारसरणी आहे तुमची. म्हणजे रिसर्च पेपर न वाचणारे सगळे इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर, विद्यार्थी, इतर लोक हे विज्ञानाबद्दल काहीही बोलण्यास पात्र नाहीत, त्यांना घंटा कळत नाही आणि त्यांचे ज्ञान ० आहे म्हणणे विचित्र आहे. थोडक्यात ऐसीवर नाईल* सोडून या विषय इतर एकही** जण काढण्यास पात्र नाही म्हणजे.
* त्याने रिसर्च पेपर वाचले असण्याची संभावना आहे. तसे रेग्यूलर इंजिनिअर मधे ते करावे लागत नाही.
** ए गेस
तुम्ही सर्वज्ञ आहात हा तुमचाच
तुम्ही सर्वज्ञ आहात हा तुमचाच दावा आहे ना? तो अगोदर सिद्ध करा मग पुढचे बोलू. एव्होल्यूशन, बिग बँग थेरी, इ. मधले सगळे तुम्ही वाचले आहे म्हणता? काय वाचले याची लिस्ट द्या, मग काय नाही वाचले त्याची दुप्पट मोठी लिस्ट मी देतो. त्या लिस्टेतले प्रत्येक आर्टिकल वाचा, मग तुमचा सर्वज्ञपणा मान्य करू. बोला, आहे तयारी?
मनात आकस भरलेला असला आणि
मनात आकस भरलेला असला आणि न्यूनगंड ओतप्रोत असला कि स्यूडोसायन्सचा उदोउदो सिलेक्टिवली करायचा ही वृत्ती वाढते. मला रासायनिक प्रक्रिया आणि अणुनाभीय प्रक्रिया यांच्यातले काहीच कळत नसावे असे इथेच आपल्या दोघातच आण्विक विघटन आणि सांख्यिकी यांच्यावर लांबलचक चर्चा होऊनही तुम्हाला वाटले आहे म्हणजे धन्य आहे. तुमच्याशी चर्चा करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
http://www.aisiakshare.com/no
http://www.aisiakshare.com/node/3025?page=1#comment-66470
इथे इतकी चर्चा झाली असताना किमान अशी चर्चा झाल्याची आठवण असायची अपेक्षा होती. असो, मूर्खात काढायचे असेच ठरवलेले असले तर इलाज नसतो.
क्षणभर मी मान्य करतो कि मला
क्षणभर मी मान्य करतो कि मला अदितीचा प्रतिवाद करता आला नाही. मुद्दा हा आहे कि तिथे १०० माकडउड्या मारून इथे तुम्ही माझ्या डिके शब्दाचा अर्थ काय काढून चर्चा कुठे नेली आहे. I just said decay, not nuclear decay and you used that as a pretext to prove that I don't even know the basic difference in chemical and nuclear reactions.
याला न्यूनगंडाची परिसीमा म्हणतात. न्यूनगंड अति असला कि पश्चिमेतल्या विश्वविद्यालयांतल्या प्राध्यापकांनी काहीही बरळले कि डोळे झाकून टाळ्या वाजवायच्या आणि भारतात कोणी काही म्हटले स्वतः महान तज्ञ असल्याप्रमाणे टिकेची झोड उडवायची ही प्रवृत्ती दिसते.
नाही. यात स्वतःच्या बेशिस्त
नाही.
यात स्वतःच्या बेशिस्त विधानांना इतरांनी समजून घ्यावे आणि इतरांच्या शिस्तबद्ध विधानांना मात्र आपण कैच्याकै इल्लॉजिकल प्रतिवाद करून हास्यास्पद ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा हा दुटप्पीपणा दिसतो.
शिवाय, सर्वज्ञपणाचा दावा सिद्ध कधी करणार? ज्या आवेशाने तुम्ही तो दावा करता ते पाहता तो सिद्ध केल्याशिवाय तुमचे कुठलेच म्हणणे ग्राह्य धरायचे नाही असे ठरवले आहे. कशावरून तुम्ही एव्होल्यूशन आणि बिग बँगमधलं सगळं वाचलंय? याचे पुरावे अगोदर द्या.
१. सोन्याची सुद्धा सल्फाईड
१. सोन्याची सुद्धा सल्फाईड वगैरे ओर्स सापडतात.
म्हणजे शुद्ध सोने सापडत नाही असे का? सायनाईड सुद्धा सापडतात.
२. सोन्याचे ओर्समध्ये अलॉय वगैरे असतात, त्यात संयुंगंसुद्धा असतात.
मग ? मी कधी म्हणालो कि अॅलॉय ज्याच्याशी बनते त्या धातूची संयुगे बनत नाहीत. सोन्याची रासायनिक क्रियाशीलता इतर धातूंच्या मानाने खूपच कमी असते.
३. याचा अन डिके होण्याचा काही संबंध नाही. (अन पर्यायाने अवशेष न सापडण्याचाही नाही.)
मी सांगीतलेला संबंध तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. "सोने टिकते" म्हणून, परंपरागत रित्या पास करता येते म्हणून, सोन्याला भाव आहे. पण विमान बनवायला लागणारे धातू रासायनिक दृष्ट्या जास्त क्रियाशील असू शकतात. ते ७००० वर्षे टिकणार नाहीत म्हणून त्याचे अवशेष मागणे चूक आहे.
अन त्या डीके वर पुन्हा तेच पालुपद का? डिके हा शब्द काय न्यूक्लिअर डिकेसाठी पेटेंटेड आहे का? प्राणी मरतात तेव्हा त्यांचे जे होते त्याला देखिल डीके म्हणतात. http://www.oxforddictionaries.com/definition/english/decay
दातांचा डिके होतो. धातूंचा होतो म्हणण्यात संबंध नाही?
निसर्गाच्या, म्हणजे जमिनीच्या किंवा पाण्याच्या सतत सान्निध्यात जर धातू राहत असेल तर त्याचा डीके होतो. होऊ नये म्हणून त्याचे कंटिन्यूवस इलेक्टृओप्लेटिंग करावे लागते. उदा. गेलच्या देश भरात पसरलेल्या गॅस पाईप्सचे नेटवर्कचे इलेक्ट्रोप्लेटिंग करत राहण्याचे त्यांना वर्षभराचे प्रचंड बिल येते.
उगाच विरोधासाठी विरोध म्हणून काहीही म्हणणार का?
म्हणजे?
मी सांगीतलेला संबंध तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. "सोने टिकते" म्हणून, परंपरागत रित्या पास करता येते म्हणून, सोन्याला भाव आहे. पण विमान बनवायला लागणारे धातू रासायनिक दृष्ट्या जास्त क्रियाशील असू शकतात. ते ७००० वर्षे टिकणार नाहीत म्हणून त्याचे अवशेष मागणे चूक आहे.
म्हणजे आपल्या (थोर) पुर्वजांना सोन्याविषयी ही माहिती नव्हती असे तुम्हाला म्हणायचे आहे का? नाही म्हणजे, ७००० वर्षेही न टिकणारे कनिष्ठ धातू त्यांने वापरावे!! छ्या!
अन त्या डीके वर पुन्हा तेच पालुपद का?... धातूंचा होतो म्हणण्यात संबंध नाही?
कोणत्या धातूंचा ७००० वर्षात डिके होईल? (अर्थातच, जिथे हाडांचा, इतर अवशेषांचा झाला नाही तिथे धातूंचा बरा झालाय.)
उगाच विरोधासाठी विरोध म्हणून काहीही म्हणणार का?
आता कळलं ना कसं वाटतं ते?
कोणत्या धातूंचा ७००० वर्षात
कोणत्या धातूंचा ७००० वर्षात डिके होईल?
विकिपेडीया वरून -
The English term noble metal can be traced back to at least the late 14th century[1] and has slightly different meanings in different fields of study and application. Only in atomic physics is there a strict definition; in all other fields the term denotes relative fit with a particular characteristic or set of characteristics. For this reason there are many quite different lists of "noble metals".
In chemistry, the noble metals are metals that are resistant to corrosion and oxidation in moist air (unlike most base metals). The short list of chemically noble metals (those elements upon which almost all chemists agree) comprises ruthenium, rhodium, palladium, silver, osmium, iridium, platinum, and gold.[2]
More inclusive lists include one or more of mercury,[3][4][5] rhenium[6] or copper as noble metals. On the other hand, titanium, niobium, and tantalum are not included as noble metals despite the fact that they are very resistant to corrosion.
तर इथे सांगीतलेल्या सोडून (आणि इथल्या देखिल बर्याच गोष्टी धरून) मेटल्स झिजतात.
त्यातली त्यात सोने चांदी इ पेक्षा जास्त केमिकली इनॅक्टीव आहे. विमानात ते प्रचंड घनतेचे आहे म्हणून देखिल वापरले जाण्याची शकता कमी आहे अनलेस देअर इज सम ग्रेट टेक्नोलॉजी.
While the noble metals tend to be valuable – due to both their rarity in the Earth's crust and their usefulness in areas like metallurgy, high technology, and ornamentation (jewelry, art, sacred objects, etc.) – the terms "noble metal" and "precious metal" are not synonymous.
अर्थातच, जिथे हाडांचा, इतर अवशेषांचा झाला नाही तिथे धातूंचा बरा झालाय.)
हाडे अगोदरच रासायनिक प्रक्रिया झालेली असतात. त्यांचे झिजणे धातूंपेक्षा खूप कमी आरामात असू शकते. प्लास्टीक देखिल धातूंपेक्षा कमी वेगाने झिजते.
आता कळलं ना कसं वाटतं ते?
गंमत आहे. आपल्याच बुद्धीने काहीही अर्थ काढून तुम्ही स्ट्रॅटेजी लढवता कि काय?
महोदय,हजारो वर्षे टिकणारी
महोदय,
हजारो वर्षे टिकणारी हाडे 'फॉसिलाईझ' झालेली असतात.
म्हणजे नक्की काय, ते उत्क्रांतीशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या आपणासारख्यांना ठाऊक असेलच ;)
जौद्या.
उग्गं लेग पुलिंग करत होतो. तुमची हाडात गोची झाली आहे हे मात्र खरे.
btw. bones are NEVER stable chemical compounds, they are a living tissue.
अंडी सुद्धा होतात फॉसिलाइज.
अंडी सुद्धा होतात फॉसिलाइज. कधी कधी मांस सुद्धा होते. कोणाच्या नशिबाला किती केमिकली रिअॅक्टिव वातावरण आहे इ इ महत्त्वाचे.
--------------------
हाडांबद्दल मला म्हणायचं होतं कि ते प्यूअर कॅल्शियम इ नसतात. संयुगे असतात.
----------------
अहो, पुन्हा तेच. जिवंत पेशी या देखिल केमिकल कंपाऊंडस (त्यांची मांदीयाळी), यानी के संयुगे, असतात. पण मी (केमिकल) इलिमेंटस नसतात असे लिहित होतो.
------
लेग पुलिंग करता करता चड्डी पूलिंग नका ना करू. ;)
हो ना?
कोणाच्या नशिबाला किती केमिकली रिअॅक्टिव वातावरण आहे इ इ महत्त्वाचे.
असे जर असेल तर मग संपूर्ण प्राचीन विमान तंत्रज्ञानातील काहीच अवशेष उरू नये याचे आश्चर्य व्यक्त केल्यावर तुम्ही त्यांचा "डिके" झालेला असू शकतो असे कसे म्हणालात? (म्हणूनच ही प्रतिसाद शृंखला सुरू झाली.) तुम्हीच तुमच्यामुद्द्यातील चूक दाखवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता मी मरायला मोकळा.
प॰रेल्वे मुंबईच्या लोकल
प॰रेल्वे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्रत्येक घोषणेनंतर" ओवरहेड वायरमध्ये पंचवीस हजार---"ही घोषणा गेली दोन वर्षे ऐकवत आहेत.=
1)ही प॰रेल्वेची सही आहे ?/
2)ऐकीव डॉक्युमेंटेशन आहे ?/
3)रेल्वे रिक्षाच्या बैटरीवर चालते हा सामान्यजनांचा {गैर}समज दूर करायचा आहे?
...तरीही लोक रोज टपावर चढून
...तरीही लोक रोज टपावर चढून कोळसा बनतात. म्हणून सूचना देत राहणं प्राप्त असावं.
१५०० डीसी ऐवजी २५००० एसी हा "विजेच्या धक्क्याने मरणे" या धोक्याच्या संदर्भात "वाढीव" धोका आहे का?
लहानपणी चाळीत शेजारी राहणा-या काकूंनी केलेलं वर्णन आठवलं.."ट्रक अंगावरुन गेला बिचा-याच्या अन तो ट्रकही विटानी भरलेला.."
वाढीव
असू शकेल. नक्की माहित नाही.
डीसी च्या केसमध्ये प्रत्यक्ष स्पर्श आवश्यक असावा. हाय व्होल्टेज एसी मध्ये प्रत्यक्ष स्पर्शाशिवायही विद्युतप्रवाह जाऊ शकतो. [कपॅसिटर मधून डीसी करंट पास होत नाही पण एसी करंट पास होतो]. म्हणजे टपावर बसलेल्या व्यक्तीला आपण वायरपासून सहा* इंचावर आहोत असे वाटले तरी त्या स्थितील विजेचा धक्का बसू शकतो.
*सहा हा प्लेसहोल्डर आहे. पॉइंट इज- तारेला स्पर्श न होता इलेक्ट्रोक्यूशन....
हे पहा पंतप्रधान काय म्हणतात.
प्राचीन भारतातील विमानविद्येची चर्चा सुरू आहे ती अगदीच बिनबुडाची नसावी. पंतप्रधानहि अशाच विचारांचे समर्थक आहेत तेव्हा खालच्यांना तेच म्हटले पाहिजे.
प्राचीन भारतातील प्लॅस्टिक सर्जरीबाबतचे पंतप्रधानांचे विचार त्यांच्या वेबसाइटवर लिखिले आहेत. ते असे आहेत -
हम गणेश जी की पूजा करते हैं, कोई तो प्लास्टिक सर्जन होगा उस जमाने में, जिसने मनुष्य के शरीर पर हाथी का सर रख कर के प्लास्टिक सर्जरी का प्रारंभ हुआ होगा। अनेक ऐसे क्षेत्र होंगे जहां हमारे पूर्वजों ने बहुत सारा योगदान दिया होगा। और कुछ बातों को तो हमने स्वीकार किया है। आज अगर Space Science को देखें तो हमारे पूर्वजों ने Space Science में बहुत बड़ी ताकत दिखाई थी किसी समय। उस समय सदियों पहले आर्यभट्ट जैसे लोगों ने जो बातें कही थी, आज विज्ञान उसको स्वीकार करने में…, सफलतापूर्वक उसकी मान्यता हो गई है। कहने का तात्पर्य यह है कि यह वो देश है, जिसके पास ये सामर्थ्य रहा था। इसको हम फिर कैसे दोबारा regain करें.>
ह्यापुढे दिसणारी मोठीच विडंबना अशी आहे की त्याच भाषणामध्ये असले संस्कृत लिहिले आहे:
राजा के कर्तव्य का वर्णन करते हुए- ना त्वहम कामयेव राज्यम, ना स्वर्गम, ना पुनर्भावम, कामयेव दुख: तप्तनाम, प्राणिन: अर्त्रिनष्टम।>
हा श्लोक खरा असा हवा:
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम्।
कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्॥
खेदाची गोष्ट आहे की पंतप्रधानांची भाषणे असल्या हाउलर्सपासून मुक्त राहावीत ही काळजी घेऊ शकणारे वैयक्तिक सचिव त्यांच्यापाशी नाहीत!
...
मोदींचे समर्थन करण्याचा हेतू नाही (Two wrongs don't make a right.), परंतु "In the good old days of Ramrajya, when Hindus, Muslims, Sikhs and Christians used to live in peace and amity" असले हौलर्स, किंवा 'ऐतिहासिक'ऐवजी 'इतिहासिक' असल्या (बेसिक) चुका करण्यास श्री. राजीव गांधीसुद्धा जेथे capable होते तेथे...
असो.
गाडीतली चर्चा : पहिला :कसं
गाडीतली चर्चा :
पहिला :कसं चाललंय आपल्या चाळीत ?
दुसरा: तुम्ही गेलात तरी सुधारले नाहीत शेजारी.
पहिला : ?
दु :परवा चौथ्या मजल्यावरचीअमुक बाई खिडकीत तवा ठेवायला गेली अन दाणकन तवा खाली पडला.
पहिला : तवा गरम होता का ?
तात्पर्य :चिकित्सा केली तर विज्ञानाची प्रगती होते.अचरट प्रश्न संशोधनाची प्रेरणा असतात.
घ्या...या लेखात
घ्या...
या खाली दिलेल्या लिंकमधील लेखात म्हटल्याप्रमाणे तपशील खरा असला (जो व्हेरिफाय करणेबल संदर्भांसहित दिलेला आहे) तर या सध्या उल्लेखल्या जाणार्या पौराणिक विमानांचा विषयच संपला. खलास.
लोकसत्ता रविवार पुरवणीतला लेख. अत्यंत सरळपणे आणि मुद्द्याला धरुन लिहीलेला.
पूर्ण लेख सर्वांनीच वाचावा असा आग्रह. खालील अवतरण पाहिल्यास हा ग्रंथ मुळात जुनाबिनाच वगैरे नाहीच आहे आणि तो तुलनेत हल्लीच म्हणजे गेल्या शतकात एका "सिद्धी प्राप्त असलेल्या" आणि "समाधीअवस्थेत गेल्यावर श्लोक सुचणार्या" बाबामहाराज दर्जाच्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेला आहे. आणि या बाबाजी स्वामींनी कुठून विद्या मिळवली तर त्यांच्या गुरुंकडून म्हणजे "गुरुजी महाराज" नावाच्या अन्य गूढ बाबामहाराजांकडून.
विषय संपला.
पंडितजींकडे विशिष्ट अतिंद्रिय शक्ती होत्या. ते जेव्हा समाधीत जात तेव्हा त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडत. शर्माजी ते लिहून ठेवीत. शास्त्रीजींचा मृत्यू १९४१ मध्ये झाला. तत्पूर्वीच या श्लोकांची हस्तलिखिते तयार करण्यात आली होती. ती नंतर ठिकठिकाणी गेली. त्यातील एक बडोद्यातील ग्रंथालयात गेले. सुब्बराय शास्त्रींच्या चरित्रानुसार, त्यांना गुरुजी महाराज या थोर साधुपुरुषाने विमानविद्या शिकविली होती. ते मुंबईलाही येत असत आणि तेथेच विमानशास्त्राचे काही श्लोक त्यांनी सांगितले होते. १९०० ते १९१९ या काळात त्यांनी एल्लप्पा नामक एका ड्राफ्ट्समनकडून काही आकृत्याही काढून घेतल्या होत्या. शिवकर बापूजी तळपदे यांनी सुब्बराय शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली विमान तयार केले होते, पण ते उडू शकले नाही, असे मुकुंद यांनी नमूद केले आहे.
मुकुंद यांच्यासमोर आता सुब्बराय यांनी सांगितलेले श्लोक होते. त्यातले संस्कृत वैदिक वळणाचे नव्हते. श्लोकांचा छंद अनुष्टुभ होता, पण भाषा साधी आणि आधुनिक होती. त्यातील अंतर्गत आणि निगडित पुरावे लक्षात घेता ते प्राचीन असणे अशक्य असल्याचे मुकुंद यांनी म्हटले आहे. 'वैमानिकशास्त्र' हा ग्रंथ १९०० ते १९२२ या काळात पं. सुब्बराय शास्त्री यांनी रचला असून तो भारद्वाज ऋषींचा आहे याला कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे या ग्रंथाचे प्राचीनत्व उडाले. तो तर विसाव्या शतकातला निघाला. आता मुद्दा राहिला त्यातल्या आकृत्या आणि माहिती यांतील तथ्यांचा आणि त्यातल्या मांत्रिक, तांत्रिक आणि कृतक विमानांच्या खरेपणाचा. या ग्रंथात शकून, सुंदर, रुक्म आणि त्रिपूर अशा चार प्रकारची कृतक विमाने वर्णिली आहेत. आपल्या या शास्त्रज्ञ पंचकाने त्यांतील तत्त्वे, भूमिती, रसायने व अन्य सामग्री अशा विविध बाबींचे संशोधन केले आणि शेवटी थेटच सांगून टाकले की, यातले एकही विमान उडू शकत नाही. त्यात ते गुणधर्मही नाहीत आणि क्षमताही. त्यांची भौमितिक रचना भयंकर आहे आणि उड्डाणविषयक तत्त्वे उडण्याला साह्य़ करण्याऐवजी विरोधच करणारी आहेत.
चांगला लेख आहे. विमानविद्या
चांगला लेख आहे. विमानविद्या बाजूला ठेवून असे सांगतो की जयपूरच्या राजाने त्या वेधशाळा बांधल्या नसत्या तर ती यंत्रेही फक्त संशोधनाचा विषय झाली असती. एक पितळी जाळीदार चेंडूमध्ये तेलाचा दिवा पेटवून जमीनीवर सरपटवून सोडला तरी आतला दिवा कलंडायचा नाही हे 'यंत्र' अजून राजस्थानातल्या वस्तुसंग्रहालया आहे. थोडीफार यांत्रिक कला होती एवढं नक्कीच म्हणू शकतो.