लोकनिंदा करु नका - अति आदर्शवाद? की आचरणयोग्य मूल्य?
मलादेखील एक छान गोष्ट आठवते आहे-
एक सत्शील, मेहमान-नवाज, कनवाळू गाव असतं. गावात एकदा, एक अतिशय सत्शील दंपती काही धार्मिक कार्य घालतात. सर्वांना बोलावतात, तीर्थप्रसाद व खीर-पुरीचे जेवण असा थाट असतो. पण होतं काय खीरीच्या भांड्यात पाल पडून २ ब्राह्मणांचा मृत्यु ओढवतो. सर्वच जण हळहळतात. पण त्या दंपतीविरुद्ध कोणी ब्र काढत नाही की तसे कोणाच्या मनात येत नाही.
स्वर्गात चित्रगुप्त जमाखर्च लिहीत असतो. त्याला संभ्रम पडतो की हे ब्रह्महत्येचे पातक कोणाच्या माथी लिहायचे? तो जातो देवांकडे. देव सांगतात - गावात गुप्तपणे फिर अन मला येऊन सांग या घटनेबद्दल कोण काय बोलते ते.
बरं म्हणतो. त्या गावात कोणीच त्या दंपतीला वाईट बोल लावत नसतात. फक्त नशीबाला बोल लावत असतात. प...ण एका पाणवठ्यावर २ स्त्रिया कुचुकुच बोलताना दिसतात - अशी कशी पाल पडली? नक्कीच काहीतरी मेख आहे. माझा संशय तर यजमानांवर आहे.
देव ही घटना ऐकून चित्रगुप्तास म्हणतात - ह्म्म ब्रह्महत्येचे पातक या २ स्त्रियांच्या माथी घाल.
__________
परनिंंदेविरुद्धची, ही कथा एका बुद्धिस्ट पुस्तकात वाचली.
पुढे बरच विवेचन होते की दुसर्याची रेघ कमी करुन आपली मोठी करु नका.
वाचिक हिंसा टाळा,
लेबलिंग टाळा,
जजमेंटल राहू नका.
हे सर्व आदर्शात ठीक आहे. पण मनुष्यस्वभाव असा आहे की परनिंदेतून एक आनंद मिळतो. त्याचे काय. अन ही धार्मिक पुस्तके असे लहान-लहान आनंद हिरावून घेतात. अर्थात लहान नाही हा आनंद, कोणाकरता तरी हार्मफुलच आहे. पण बरेचदा ऑफीसमध्ये दिसते की ४ डोकी एकत्र येतात अन गॉसिप सुरु होते, आपण भाग घेतला नाही, गप्प गप्प राहीलो तर प्रवाहाविरुद्ध पोहून लोकनिंदा ओढवण्याची भीती रहाते = दुसर्या वेळी लोक टाळतील.
"परनिंदा" हे "बाँडींगचे" एक टूल म्हणूनही आचरणात आणून पाहीले आहे. इन्स्टन्ट बाँडींग होते पण मग खूप गिल्टी वाटते असा अनुभव. (तसंही आम्हाला गिल्टी
वाटायला कारण लागत नाहीच. ह. पा. गिल्टी वाटतय :() अन झालेले बाँडींग टिकत नाही ते नाहीच.
पण क्वचित कुचु कुचु बोलणे ही गरज असल्याचेही जाणवले आहे.
मुख्य म्हणजे, "जजमेंटल राहू नका" ला काही अर्थ आहे का? जजमेंट ही मेंदूची एक फॅकल्टी आहे, प्रत्येक क्षणी आपण कळत-नकळत जजमेंट करतच असतो.
त्यामुळे हा अतिआदर्शवाद कसा आचरणात हा प्रश्नच आहे ब्वॉ.
मला खात्री आहे हा प्रश्न अनेकांना बाळबोध वाटेल. Long back you must have surmounted it / wrapped your head around it.
पटाईतजी आपल्या कमेंटबद्दल
पटाईतजी आपल्या कमेंटबद्दल आभारी आहे.
________
मला तर आताशा असे वाटू लागले आहे की बुद्धीझम वाचणे म्हणजे स्वतःचे दात व नखे स्वतःच पाडणे. It's a jungle out there. Whom are you preaching? अन त्यामुळे तुम्हाला नक्की काय फायदा आहे?
काही मूल्ये overrated च नाही तद्दन निरुपयोगी वाटतात. जाम conflict होतो राव.
त्यापेक्षा "स्वान्ताय सुखाय" हा सोपा मंत्र आचरणात आणावा काय?
____
हां बायबलमधील हे वाक्य शोधत होते -
"Blessed is the man who doesn't walk in the counsel of the wicked, nor stand in the way of sinners, nor sit in the seat of scoffers;"
आता यात जजमेन्ट नाही का? निंदा नाही का?
मग सर्व धर्म एकच गोष्ट शिकवतत हे तरी कसे म्हणावे? :(
बुद्धीझम वाचणे म्हणजे स्वतःचे
बुद्धीझम वाचणे म्हणजे स्वतःचे दात व नखे स्वतःच पाडणे
नुस्ते दात नखे पाडणे नाहीये अपुली ताई. बर्याच असल्या तत्वज्ञान वाचुन, ऐकुन माझ्या अनुभवाप्रमाणे सुरुवातीला एकदम इंप्रेस होतो आपण, पण नंतर जाणवते की.
१. हे तर नुस्ते शब्दांचे बुडबुडे आहेत, फार काही स्ट्फ नाहीये.
२. अजुनही बेसिक प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीयेत. बर्याच तत्वात परस्पर विरोध आहे.
३. जे काही सांगत आहेत ते प्रत्यक्षात आणणे शक्य नाहीये आणि मुख्य म्हणजे ते प्रत्यक्षात आणण्याची गरज तरी आहे का?
आणि मी नेहमी कुठल्याही तत्वज्ञानाच्या अनुयायांचे पुढे काय झाले किंवा ते पुढे कसे वागले ते बघते.
१००% वेळेला, त्या तत्वाच्या अनुयायांनी त्या तत्वांपासुन लगेचच फारकत घेतलेली असते.
म्हणजेच ही तत्वज्ञाने खुळचट आहेत.
--------------------------------------------------
त्या पेक्षा माझे तत्वज्ञान बघा.
प्रत्येकाने स्वताच्या शॉर्ट टर्म आणि लाँगटर्म स्वार्थाचा ( ह्यात आनंद, समाधान वगैरे गोष्टी पण आल्या ) ह्याचाच सतत विचार करावा. आपली प्रत्येक कृती आणि विचार आपल्या शॉर्टटर्म आणि लाँगटर्म स्वार्थाशी अलाइन होतो आहे का ते बघावा आणि बिनधास्त ती कृती/विचार करावा.
प्रत्येकाने स्वताच्या शॉर्ट
प्रत्येकाने स्वताच्या शॉर्ट टर्म आणि लाँगटर्म स्वार्थाचा ( ह्यात आनंद, समाधान वगैरे गोष्टी पण आल्या ) ह्याचाच सतत विचार करावा. आपली प्रत्येक कृती आणि विचार आपल्या शॉर्टटर्म आणि लाँगटर्म स्वार्थाशी अलाइन होतो आहे का ते बघावा आणि बिनधास्त ती कृती/विचार करावा.
इर्शाद !!!
- स्वहितसंबंध जपणे हेच जगातले सर्वोच्च मूल्य आहे.
- क्रौर्य हे सुद्धा अतिशय सुंदर, उच्च, व उपयुक्त मूल्य आहे.
धन्स गब्बर.स्वार्थ शब्द
धन्स गब्बर.
स्वार्थ शब्द वापरायला मी घाबरत होते. कारण स्वार्थ ह्या शब्दाचा आपल्या कडे फक्त मटेरिअयलच अर्थ घेतला जातो.
अपुली ताईंच्या स्पेसिफिक प्रश्ना बद्दल ( निंदा करण्याच्या ).
जर आपल्याला तात्कालिक आनंद मिळत असेल तर जरुर करावी. पण जर सातत्याने दुसर्याची निंदा केल्यामुळे जर लोक आपल्याला टाळणार असतील ( किंवा अगदी फिजिकली मारणार असतील ), तर निंदा करणे हे आपल्या लाँग टर्म स्वार्थाच्या विरुद्ध जाते आहे.
तेंव्हा ती करु नये. पण not because कोणीतरी तत्वज्ञान सांगितले म्हणुन, पण माझा स्वार्थ सर्व्ह होतो आहे म्हणुन.
कोणी असा नशिबवान असेल की ज्याला सतत लोकनिंदा करुन पण त्याच्या स्वार्थाला हानी होत नाही त्याने ती जरुर करत रहावी.
स्वार्थ शब्द वापरायला मी
स्वार्थ शब्द वापरायला मी घाबरत होते. कारण स्वार्थ ह्या शब्दाचा आपल्या कडे फक्त मटेरिअयलच अर्थ घेतला जातो.
अगदी.
मटेरियल अर्थ घेणे परवडले. पण .... आपल्याकडे** स्वार्थ या शब्दाचा अर्थ - "दुसर्याचे नुकसान करून मिळवलेल्या लाभात आनंद मानणे" असा घेतला जातो.
आता तुमच्या वर (आयन) रँडियन असण्याचा आरोप पण होईल. व आणि वर "पण शेवटी मानवताच जिंकते" अशी "डाबर जनम घुंटी" पिलवली जाईल. होमो इकॉनॉमिकस हा बकवास असून त्यागभावना, परार्थभावना महत्वाची आहे - असे ही लेक्चर तुम्हास झाडले जाईल. बघाच तुम्ही.
** आता आपल्याकडे म्हंजे नक्की कुठे, गब्बर - असा सिनिकल प्रश्न सुद्धा विचारला जाईल.
पण-
तुमच्या दोन मुद्द्यांत नवीन काय आहे? प्रत्येक जण स्वार्थासाठीच सर्व काही करत असतो (लाँग आणि शॉर्ट टर्म).. असं तर नाही म्हणत ना कोणी, की समोरच्या बाबू वाण्याला आवडतात म्हणून मी आज भजी खातोय.. इ.इ.
तेव्हा स्वार्थासाठी जगणं फार बेसिक असावं, त्यासाठी तत्त्वज्ञान काय को?
===========
अवांतर - ज्याचा त्याचा स्वार्थ ह्या नावाखाली एखाद्याने काहीही (बेकायदेशीर वगैरे कृत्य) करू शकण्याला तुमचा पाठींबा आहे का?
ज्याचा त्याचा स्वार्थ ह्या
ज्याचा त्याचा स्वार्थ ह्या नावाखाली एखाद्याने काहीही (बेकायदेशीर वगैरे कृत्य) करू शकण्याला तुमचा पाठींबा आहे का?
योग्य प्रश्न.. नेहमी स्वार्थच पहावा. पण इतरांना इजा न करता.. कारण मलाही उलटटपाली इजा होणे स्वार्थाविरुद्ध.. परस्परसंमतीने केल्यास काहीही चालेल.. अश्या अनेक अटी वाढत वाढत शेवटी मागल्या अंगणातून फिरुन आजचे जे जगणे जसे चाललेय त्याच जागी येऊन पोचते.
मला कोणी त्रास देऊ नये अशी इच्छा असल्यास आपण इतरांना त्रास देऊ नये (आणि व्यत्यासाने, माझी त्रास भोगायची तयारी असेल तर इतरांना फायद्यासाठी आणि प्रसंगोपात्त कितीही नडावे) इतकंच म्हणता येईल आरुनफिरुन.
ज्याचा त्याचा स्वार्थ ह्या
ज्याचा त्याचा स्वार्थ ह्या नावाखाली एखाद्याने काहीही (बेकायदेशीर वगैरे कृत्य) करू शकण्याला तुमचा पाठींबा आहे का?
जर कोणाचा लाँग टर्म स्वार्थ बेकायदेशीर कृत्य करुन साधत असेल तर तो करणारच आणि करावे. कायदा वगैरे फार रीलेटीव्ह आहे.
तसेही माझा पाठींबा आहे की नाही ह्याला काय किंमत आहे? उलट असले प्रश्न मनात आणुन स्वताला त्रास करुन घेऊ नये हेच तर मला म्हणायचे होते.
उलटटपाली मला इजा होणार नसेल
उलटटपाली मला इजा होणार नसेल तर उगाचच तत्वज्ञानाचा बाऊ करु नये, स्वार्थ पहावा.
एक्झॅक्टली तेच तर म्हणतोय. उलटटपाली मला इजा होणे हे माझ्या (लाँग अथवा शॉर्ट टर्म) स्वार्थासाठी विपरीत ऊर्फ अहितकारक असल्याने अश्या वेळी स्वार्थ पाहणे टाळावे.. अश्या नियमांचा स्वीकार करत करत आपण सध्या जसे वागतोय त्याच स्थितीला पोहोचतो.
तुमच्या वरील म्हणण्याचा अर्थ जर असा असेल की समोरुन मला अपाय होण्याची शक्यता नसेल (उदा. बालक, गरीब, एकाकी यासारखी व्यक्ती समोर असेल आणि तिला अपाय करुन माझा लाँग टर्म स्वार्थ साध्य होणार असेल तर तसे करावे) तर तसे मान्य करणे कठीण आहे कारण अश्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास झाल्याबद्दल दु:ख होणे हे देखील एखाद्याच्या बाबतीत घडत असेल तर तसे होणेही लाँग टर्म स्वार्थाला अहितकारक आहे, कारण असे इतरांना दु:ख देऊन मिळालेले सुख त्याला सुख वाटत नाही अशी त्याची मनोधारणा असली तर स्वार्थ साध्य होणारच नाही. पण तसं काही दु:ख वगैरे होत नसेल तर मग अश्या गोष्टी कराव्यात का?
उदा. पैसे मिळवणे आणि साठवणे हा "क्ष" या व्यक्तीचा सुखद शॉर्ट आणि लाँग टर्म गोल आहे.
आता रस्त्यात एक लहान मूल दिसले. त्याला कुठेतरी विकून "क्ष" ला बरेच पैसे मिळतील. पण ते मूल काही "क्ष" वर याबद्दल उलट वार करु शकणार नाही.
नंतर "क्ष"ने एका वृद्धेला घरात एकटी राहात असल्याचे पाहून ठार केले आणि तिच्याकडचे दागिने लुटले. पैसे मिळवण्याच्या आणि साठवण्याच्या शॉर्ट आणि लाँग टर्म गोलकडे वाटचाल झाली. वृद्धा एकाकी असल्याने, वृद्ध असल्याने आणि आता मेल्याने उलट सूड घेणार नाही याची खात्री आहे.
हे चालेल का?
अशा वेळी स्वतःला (क्ष ला) मात्र कोणी इतर बलवानाने त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यातली नैतिकता / (निव्वळ तात्विक असला तरी) हक्क क्ष ने गमावला असं म्हणता येईल का?
काय मत आहे?
तुमच्या वरील म्हणण्याचा अर्थ
तुमच्या वरील म्हणण्याचा अर्थ जर असा असेल की समोरुन मला अपाय होण्याची शक्यता नसेल (उदा. बालक, गरीब, एकाकी यासारखी व्यक्ती समोर असेल आणि तिला अपाय करुन माझा लाँग टर्म स्वार्थ साध्य होणार असेल तर तसे करावे) तर तसे मान्य करणे कठीण आहे कारण अश्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास झाल्याबद्दल दु:ख होणे हे देखील एखाद्याच्या बाबतीत घडत असेल तर तसे होणेही लाँग टर्म स्वार्थाला अहितकारक आहे,
जर तुम्हाला दुसर्याला अपाय करुन दुख होणार असेल तर ती गोष्ट तुमची लाँग टर्म स्वार्थाची असू च शकत नाही. मी वर लिहीलेच होते, स्वार्थात आनंद मिळणे, समाधान मिळणे ह्या गोष्टी पण येतात.
एखाद्याचा जर दुसर्याला अपाय करुन जर शॉर्ट आणि लाँग टर्म स्वार्थ साधला जाणार असेल ( ह्यात त्याला पश्चात्बुद्धीने दुख होणार नाही हे पण आलेच ) तर तो तसा अपाय करेलच.
उदा. पैसे मिळवणे आणि साठवणे
उदा. पैसे मिळवणे आणि साठवणे हा "क्ष" या व्यक्तीचा सुखद शॉर्ट आणि लाँग टर्म गोल आहे.
आता रस्त्यात एक लहान मूल दिसले. त्याला कुठेतरी विकून "क्ष" ला बरेच पैसे मिळतील. पण ते मूल काही "क्ष" वर याबद्दल उलट वार करु शकणार नाही.
नंतर "क्ष"ने एका वृद्धेला घरात एकटी राहात असल्याचे पाहून ठार केले आणि तिच्याकडचे दागिने लुटले. पैसे मिळवण्याच्या आणि साठवण्याच्या शॉर्ट आणि लाँग टर्म गोलकडे वाटचाल झाली. वृद्धा एकाकी असल्याने, वृद्ध असल्याने आणि आता मेल्याने उलट सूड घेणार नाही याची खात्री आहे.
हे चालेल का?
१. पैसे मिळवणे किंवा साठवणे हा गोल असतोच पण खरा गोल सिक्युरीटी, स्वातंत्र्य, आनंद मिळवणे हा असतो. पैसे हे त्याचे फिजिकल रुप झाले.
२. जर "क्ष" ला लहान मुल विकुन पैसे मिळणार असतील आणि त्याला त्याच्या कृत्याचा त्रास पण नंतर होणार नसेल तर तर त्याने ते विकावे मुल. (त्रास ची व्याख्या = त्रास हा स्वताच स्वताच्या मनाला करुन घेतलेला असेल किंवा मुल विकले म्हणुन तुरुंगवास असेल.) आणि अशी लोक असतात
अशा वेळी स्वतःला (क्ष ला)
अशा वेळी स्वतःला (क्ष ला) मात्र कोणी इतर बलवानाने त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यातली नैतिकता / (निव्वळ तात्विक असला तरी) हक्क क्ष ने गमावला असं म्हणता येईल का?
"क्ष" नी जरी दुसर्या निर्बलांना त्रास दिला तरी तो त्याला कोणी त्रास देवू नये अशी अपेक्षा करण्याचा हक्क गमावत नाही. कारण तो हक्क त्याचा त्यानीच त्याला स्वताला दिलेला असतो. अशी पण माणसे असतात गवि.
अवांतर : मूर्ख आपल्यासारखी असतात ज्यांना टोचणी वगैरे लागते.
तुमच्या दोन मुद्द्यांत नवीन
तुमच्या दोन मुद्द्यांत नवीन काय आहे
नविन काहीच नाहीये, पण आपणच स्वताला ह्या बेसिक जगण्यापासुन दुर नेतो आणि स्वताला त्रास्/दुख करुन घेतो.
म्हणत ना कोणी, की समोरच्या बाबू वाण्याला आवडतात म्हणून मी आज भजी खातोय
पण लोकनिंदा करावी की नाही वगैरे प्रश्न पाडुन त्रास तर करुन घेतात ना अपुलीताई.
काय कथा!
काय बंडल कथा आहे च्यायला! (कथेची निंदा नको असे लेखात म्हणलेले नाही.) बाकी, तुमचा शंकरच ना मारणारा? मग त्याच्या माथी का नाही लावत म्हणे ते ब्रह्महत्येचं पाप. किंवा त्यांच्या भाळी मरण लिहणारा कोण तो त्याच्या माथी लावा. च्यायला, चोर सोडून सन्याशांना फाशी!
माणसानी माणसासारख वागाव गं
माणसानी माणसासारख वागाव गं अपुली (माणूस म्हणजे human being, त्यात बाईमाणूस पण आलीच..!!). कधी वंदाव, कधी निंदाव. सगळे पालथे धंदे करावेत आणि मग रितीनुसार गिल्ट पण येऊ द्यावा.
मला तर अती positive thinking पण नैसर्गिक प्रेरणेच्या विरुद्धच वाटतं.
बाकी, तुझी ती गोष्ट वाचून, आजच्या काळात तरी न्यायव्यवस्था देवाच्या हाती नाही याबद्दल मला हायस वाटलं. ही गोष्ट आत्ता घडती, तर त्या caterer चा दोष मानला गेला असता. ;;)
बाकी, तुझी ती गोष्ट वाचून,
बाकी, तुझी ती गोष्ट वाचून, आजच्या काळात तरी न्यायव्यवस्था देवाच्या हाती नाही याबद्दल मला हायस वाटलं. ही गोष्ट आत्ता घडती, तर त्या caterer चा दोष मानला गेला असता. (सरोज खरे)
खरय :)
कधी वंदाव, कधी निंदाव. सगळे पालथे धंदे करावेत आणि मग रितीनुसार गिल्ट पण येऊ द्यावा.
हाहाहा, हे मस्त कन्फर्म केलस!!! ;)
परवा एक मुलगी भेटली होती.
परवा एक मुलगी भेटली होती. चिकणी होती. ती मेक्सिको ला जाऊन आली. परतताना तिने काही प्रवास रेल्वे ने केला. तिथे रेल्वे स्टेशनवर एक अर्भक कुणीतरी सोडून दिलेले होते. व शेजारी चिठ्ठी होती की - Don't judge me. Please take care of the baby.
आता समजा कुणीतरी (गंगाप्रसादजी ऑफ अंगूर फेम) त्या अर्भकाचे संगोपन केले - तर ते करण्यापूर्वी त्या संगोपन करणार्याने शून्य जज केले असे म्हणता येईल ??? खरंच ???
रोचक कथा. आणि तुझ्या
रोचक कथा. आणि तुझ्या शंका/कंफ्युजन बरोबर आहे.
मी जर एखाद्या ग्रुपचा पार्ट असेन आणि त्यातल्या काहीजणांनी 'सतत' एका त्रयस्थ व्यक्तीबद्दल गॉसिप केलं तर काही दिवसांनी मीच तो ग्रुप सोडून देते. असे का करते, हे वागणं बरोबर की चूक माहीत नाही. खरंतर त्या त्रयस्थ व्यक्तीशी माझं काही देणंघेणं नसतं. आणि माझा ग्रुप माझ्याशी चांगलंच वागत असतो, मदत वगैरे करत असतो. तरीही मी दूर जाते.
!
खीरीच्या भांड्यात पाल पडून २ ब्राह्मणांचा मृत्यु ओढवतो.
पालींची बदनामी थांबवा!!!!!!
पण, बाकी, जिथे बुद्धाचे पालीवरचे प्रेम इतके, की त्याने आपला सारा उपदेश पालीतून केला, तिथे त्याच बुद्धाच्या नावावर खपवले जाणारे बुद्धिष्टवाङ्मय इतके पालीद्वेष्टे, हा निव्वळ दैवदुर्विलास आहे.
गो टु फर्स्ट फोर
गो टु फर्स्ट फोर प्रिन्सिपल्स
एकट्याने जगण्यापेक्षा कळपाने जगणे सुखकर असते.
कळपाने आपल्याला कळपाचा मेंबर समजायला हवे.
त्यासाठी कळपाचे नियम पाळले पाहिजेत.
कळप मोडून जाईल अशी कृत्ये कुठल्याच मेंबरने करू नयेत.
या प्रिन्सिपल्सच्या परिप्रेक्ष्यात आपापला स्वार्थ साधून घ्यावा.
एवढे केले तर बरीच अन्यायकारक/मूर्खपणाची वाटणारी तत्त्वे रीझनेबल वाटू लागतील.
कळप आणि झुंड
कळपाने जगणे हे सुखकर असते आणि त्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटते, पण या कळपाची झुंड बनायला वेळ लागत नाही. म्हणून कळपामध्ये विरून जाऊ नये. आपली म्हणून काहीतरी वेगळी ओळख, वेगळे नियम ठेवावे. जसे, एखाद्या मोठ्या वर्तुळाचा आपण भाग आहोत तरी त्याअंतर्गत आपलेही एक वर्तुळ असू शकते आणि ह्या आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हे दोन्ही एकच असले पाहिजेत असे नाही. मोठ्या वर्तुळाचा जितका भाग आपल्या (छोट्या) वर्तुळामुळे आच्छादित होतो, तेव्हढ्यापुरते आपण त्या मोठ्या वर्तुळाचा भाग असतो. हे थोडेसे सेट आणि सबसेट असे आहे.
तसेही मोठ्या समाजामध्ये व्यक्तीचे स्वातंत्र्य कितीही म्हटले तरी मर्यादितच असते. म्हणून छोट्या वर्तुळाने फारसे काही गमावले असे नाही आणि कमावले असेही नाही.
Would you rather be the
Would you rather be the world’s greatest lover, but have everyone think you’re the world’s worst lover? Or would you rather be the world’s worst lover, but have everyone think you’re the world’s greatest lover?”
world is going to have an opinion of you, whether you like it or not. But if you’re true to yourself, it won’t matter.
वॉरन आजोबा बफे
"स्वतः" म्हणजे काय? तर आपल्या
"स्वतः" म्हणजे काय? तर आपल्या नजरेत आपली ओळख.
त्यातही आपल्या नजरेत आपली ओळख ही आपण प्रत्यक्षात कसे आहोत + प्रत्यक्षात आपण कसे ह्वो अशी स्वतःची इच्छा + प्रत्यक्षात आपल्याला लोकांनी कसे बघावे असे वाटते + प्रत्यक्षात आपल्याला लोक असे बघतात अशा वेगवेगळ्या पातळ्यांचा मिलाफ असते.
थोडक्यात आपली आपल्याशी शक्य तितकी शक्य तितक्या रोल्समधील अधिकाधिक ओळख होऊन स्थळ-काल-व्यक्ती/गटसापेक्ष असे आपले वर्तन आपण जितके कंट्रोल करू शकतो तितके आपण "मोठे होत" असतो. आपले वर्तन स्थळ-काल-व्यक्ती/गटसापेक्ष बदलत नसेल तर; आपण तितके समंजस/स्वतःवर कंट्रोल असलेले; नसण्याची शक्यता बरीच अधिक असते.
===
आम्ही इन्स्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी आमच्या टीशर्टांवर सम स्क्रू, सम कनेक्ट, वी कंट्रोल असे द्वर्थी वाक्य मोठ्या अभिमानाने मिरवायचो :P
तर सर्व बाह्य पॅरामिटर्स लक्षात घेऊन स्वतःवर योग्य तो कंट्रोल निर्माण करणे (उदा. कुठे, कधी, कसे, किती, केव्हा, कोणाला, काय वगैरे बोलायचे हे ठरवणे -पुढिल पातळीवर आपोआप योग्य वर्तन होणे) सर्वात महत्त्वाचे!
सर्वांचे प्रतिसाद वाचले.
सर्वांचे प्रतिसाद वाचले. थोड्या वेळापूर्वी (आमच्याकडे रात्री) अनु राव अन गब्बर याचे वाचले होते, ते वाचून हादरले होते. अनु राव यांनी "वैयक्तिक स्वार्थास" महत्त्व दिले आहे. जे निदान digestable आहे पण गब्बर्चे "क्रौर्य हे उपयुक्त व सुंदर मूल्य आहे" या वाक्याशी अज्जिबातच सहमत नाही.
थत्ते यांचे विचार मननिय वाटले.
गविंनी लहाने मूले, वृद्ध यांच्यासंदर्भात जो प्रश्न विचारला होता तो मार्मिक होता व माझ्याही मनात आला होता. ज्या व्यक्तीचा धर्म "स्वतःचा स्वार्थ पहाणे" हाच असेल, त्याला रस्त्यावरचे मूल विकण्यापासून कोणती गोष्ट थांबविते हे मला अजुनही उलगडलेले नाही.
सर्व प्रतिसाद्कांचे आभार.
स्वतःचा स्वार्थ पहाणे" हाच
स्वतःचा स्वार्थ पहाणे" हाच असेल, त्याला रस्त्यावरचे मूल विकण्यापासून कोणती गोष्ट थांबविते हे मला अजुनही उलगडलेले नाही.
कोण म्हणते थांबवते म्हणुन. मुले विकणे किंवा त्यांना विरुप करुन भिक मागायला लावणे हा मोठा धंदाच नाही का?
आत्ता पर्यंतच्या शेकडो खासदार, हजारो आमदार, लाखो नगरसेवक ह्यातल्या ९८ % लोकांना, बाकीच्या कोट्यावधी लोकांचे वाटोळे करुन थोडातरी मानसिक त्रास, दु:ख, टोचणी वगैरे लागलेली बघितली आहे का तुम्ही.
तुझ्या म्हणण्याचे दोन भाग
तुझ्या म्हणण्याचे दोन भाग आहेत असं मला वाटतं (१) जजमेंटल असणे आणि २) गॉसिपिंग.
(१) रोजच्या जीवनात जजमेंटल नसणे म्हणजे बावळट मठ्ठ असणे. हां पण त्यात टाळावे काय तर लेबलींग. माणसाचे वागणॆ आणि प्रतिक्रिया या त्याचे संस्कार आणि विचार या दोन्ही वर अवलंबून असतात. संस्कार आणि विचार हे परस्पर विरोधीसुद्धा असू शकतात, ओव्हरलॅपींग देखील. मग सारख्या परिस्थितीला सामोरे जाताना एकाच माणसाचे वागणे वेगळे वेगळॆ असू शकते. त्यामुळे हा दुष्ट, तो दयाळू वैगेरे विशेषणे आणि खास करून त्यावर आधारित दुषणे देणे तरी टाळावे. अर्थात आपले मन नकळतपणॆ ते करतेच पण त्या, त्या माणसांशी वागताना मनात अशी कुंपणं घालून न वागण्याचा प्रयत्न करता आला तरी खुप झालं. अर्थात आपल्या समोर येणारी माणसं बव्हंशी नॉर्मल परिस्थितीतलीच असतात त्यामुळे ’खून्याशी पण प्रेमळपणे वागावे का?’ वैगेरे प्रश्न गैरलागू आहेत. कारण अश्या अपवादात्मक परिस्थितीत अगदी तत्वज्ञानी देखील ( तत्वज्ञान गेलं चुलीत असं म्हणून) त्याच्या त्याच्या अत:प्रेरणेनेच किंवा सहजप्रेरणेनेच वागेल.
(२) आता गॉसीपिंग रुटीन जगण्याला नमकीन बनवते हे खरच. त्यामुळे त्याचं प्रमाणही जेवणातल्या मीठाएवढंच असावं. गॉसीपिंगशिवाय जगणं निरर्थक वाटू नये. देवाच्या नैवेद्याच्या पानावर मीठ वाढू नये असा संकेत असतो; तसंच आपलं गॉसीपींग चांगलं कार्य बिघडवत नाही ना याचं भान ठेवून निर्वीष गॉसीपींग करणं यात काहे गैर आहे असं मला तरी वाटत नाही . कारण, ते अगदीच टाळल्यास (वर म्हटल्याप्रमाणे) कळपातल्या आपलं स्थान धोक्यात येउ शकतं. आणि रोजच्या जगण्यात कोणत्याना कोणत्या कळपाचा भाग असणं हे अपरिहार्य असतं, आणि प्रत्येक कळपात काही न काही गॉसीप्स असणं हे ही. आपलं गॉसिप कोणाच्या मुळावर उठू नये याची काळजी घ्यावी आणि आपण गॉसीपचा विषय बनत असलो तर त्याचा त्रास करून घेउ नये.
बाकी, स्वहीत आणि स्वार्थ यातला फरक ओळखून वागावं हे तर आहेच.
हुश्श. ;) अपुली, का गं असे विषय काढतेस? नुसतं वाचनमात्रे रहाण्याचा त्रास होतो ना. बाकी कुठलंही तत्वज्ञान फार मनावर घेउन वागलं तर कफनी घालून हिमालयात जाण्याचीच वेळ येईल. :p
निंदा करताना काय तो आनंद
निंदा करताना काय तो आनंद मिळतो. आपण मोठ्या मोठ्या लोकांची वाट लावतो. खंर म्हणाल तर ज्या लोकांचे आपण काहीच नुकसान करू शकत नाही केंव्हा ती शक्ती आपल्यात नसते. मग एकच मार्ग वाचतो, म्हणजे त्याची निंदा करा आणि आनंदाचा आभासी अनुभव घ्या.