शकुन

काल भारद्वाजाच्या शकुनावर मकरंद दामलेने विचारलेल्या अनपेक्षित (Superstitious OR Optimistic ?) प्रश्नाने भंबेरी उडाली. पण मी शकुनावर विश्वास ठेवतो का याचे प्रामाणिक उत्तर "हो" आणि "नाही" असेच आहे. ’नाही’ अशासाठी की मीठ सांडल किंवा मांजर आडवं गेलं तर मी अपशकुन नक्कीच मानत नाही. पण ज्या बाह्य घटनांनी माझी मानसिक अवस्था बदलते त्या मला शकुनासारख्याच वाटतात. उदा. काही माणसांना माझ्यात सगळं वाईटच दिसत आलेलं असतं, त्यांना फकत माझ्या अपयशाची चर्चा आणि चिकित्सा करण्यात रस असतो. अशी माणसं मी नक्की अपशकुनी मानतो. कारण अशी माणसे भेटले की फक्त चोची मारायचेच काम करतात किंवा कडवट स्मृतीना जागं करायचा प्रयत्न करत बसतात. बर्‍याचवेळा असे लोक समोरून आल्यास मी फुटपाथ बदलतो किंवा आजकाल चक्क अपमान करून हाकलुन देतो. पण अचानक एखादी मनाला प्रसन्न करणारी घटना घडली किंवा व्यक्ती भेटली तर आशा निर्माण व्हायला किंवा टिकुन राहायला मदत होते. विशिष्ट घटना विशिष्ट मानसिक अवस्था निर्माण करतात.
तुमचं मला माहित नाही, पण मला तरी माझी मानसिक अवस्था at will अजुनही बदलता येत नाही, हे कबुल करायला मला लाज कमीपणा वाटत नाही.

मग भारद्वजाचा शकुन का बरं?

७८ साली कोथरूडला राहायला आलो तेव्हा आम्ही अगोदर जिथे राहात होतो तिथे बरीच परिस्थिती विचित्र होती. घर बांधायचा निर्णय आईवडिलांनी मनाचा हिय्या करून घेतला होता. घर बांधुन झाले आणि सगळी पुंजी त्यात संपली. तोपर्यंत जी माफक मौजमजा आमच्या तिघांच्या आयुष्यात होती ती पण संपली. त्या परिस्थितीत अनेक बाबतीत झालेली दडपणुक उफाळुन यायची. मार्क असुनही, धाकट्या भावाला शिकायला मिळाले पाहिजे, म्हणुन आईला मेडिकलला जाता आले नव्हते. पुढे रिझर्व्ह बॅंकेत आईला नोकरी लागली तेव्हा आईच्या हॉकीला तिथे भरपूर वाव मिळाला आणि आर्थिक स्वातंत्र्य (आईचा पगार होता महिना र १८० आणि आजोबांचा रु१४०!) आणि स्थैर्य पण मिळाले. त्यामुळे आई तिथे मनोमन रमली होती. पण लग्न झाल्यावर नोकरी करण्यावर सासर्‍याने नुसती गदा आणली नाही तर मी काही महिन्यांचा तान्हा असताना आईला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला होता (आईची ६३ सालची ८पानी विस्तृत सुसाईड नोट मला २०००साली आई गेल्यावर सापडली तेव्हा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मला मिळाली). या मानसिक आघातांनी ती खचली ती कायमचीच...प्रचंड उर्जा असलेल्या व्यक्तीचे सातत्त्याने खच्चीकरण झाले की काय होऊ शकते याचे अत्यंत नमुनेदार उदाहरण म्हणजे माझी आई.

नव्या घरात राहायला आल्यावर मात्र आर्थिक चणचणीमुळे काही प्रश्न नव्याने निर्माण झाले. त्यात जमेची बाजु एव्हढीच की वडिलांना कसलेही व्यसन नव्हते आणि कोणतेही आतबट्ट्याचे व्यवहार त्यांनी कधी केले नाहीत. नेमके त्याच वेळेस आईच्या वडिलांनी आईला सांगितले की, "अगं तुमच्या घराभोवती इतके भारद्वाज आहेत म्हणजे ही तुमची वास्तू तुम्हाला लाभणार बरं का?" आजोबांनी दिलेल्या धीरामुळे काही वेळ का होईना भारद्वाजाचे दर्शन झाले की आईचे मन उभारी धरायचे.

मला आजही भारद्वाज दिसला की आईचा तो उजळलेला चेहेरा आठवतो आणि म्हणुनच तो एक शुभ शकुन वाटतो...

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ! अस आम्ही म्हणायचो.मुंगूस थबकून वळायच. त्याच तोंड दिसल कि आम्हाला बरं वाटायच. चला शुभशकून झाला. आजही एखाद्या भुभ्याने आढेवेढे न घेता पंजा दिला की बरं वाटत. त्याची शुभशकून अशीच अंतर्मनात नोंद होते. धार्मिक व सश्रद्ध वातावरणातच वाढलो त्याचा परिणाम असतोच ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

त्याकाळी मेडीकलला जाण्याइतके चांगले मार्क, आजोबांपेक्षा जास्त पगार वगैरे म्हणजे खरंच अॅडमायरेबल! चित्रकलादेखील छान होती ना त्यांची?
इतर काहीच पर्याय सुचत नसतील तर शकुन, देव, श्रद्धा वगैरेंचा आधार घ्यायला हरकत नाही. फक्त त्यावर रिसेर्सेस, वेळ वाया घालवू नये, शरीराचे हाल करून घेऊ नये आणि इतरांना वेठीस धरू नये हे माझे वैयक्तीक मत. हा भारद्वाजाचा शकुन हार्मलेस वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकृतदर्शनी हार्मलेस वाटणारी अंधश्रद्धा ही समाजाला दुर्बळ बनवते असा एक आक्शेप काही लोकांकडून घेतला जातो. अर्थात हा वादाचा विषय आहे.असो,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ज्यांना क्षणार्धात निर्णय घ्यावे लागतात किंवा निर्णय घेण्यासाठी जे प्रतिक्षिप्त क्रियांवर (रिफ्लेक्सेसवर) अवलंबून असतात, त्यांच्याकडे "सकृतदर्शनी हार्मलेस" अंधश्रद्धा असल्या तरी त्या घातक ठरू शकतात. त्या अंधश्रद्धांचा त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

यावरून एक किस्सा आठवला. एक नातेवाईक आयुध निर्माणी कारखान्यात फायर फायटर होते. रोज निरनिराळ्या कारणांमुळे आगी लागत, आणि आग लागली की त्याचं कारण काय असावं हे चट्कन कळत नसे. आसपासच्या परिस्थितीवरही उपाय अवलंबून असत. त्यामुळे क्षणात निर्णय घ्यायला लागे. त्यांना या अंधश्रद्धांची, आणि त्यामुळे होणार्‍या संभाव्य परिणामांची कल्पना होती. त्यामुळे ते "आपल्याला अंधश्रद्धांची लागण चुकूनही होऊ नये" यासाठी दक्ष असत. त्यासाठी (इतरेजनांना) विनोदी वाटणारे उपाय योजत. उदा. रोज वेगवेगळ्या रस्त्यांनी फॅक्टरीत जाणे, सिगरेट ओढायला वेगवेगळ्या टपर्‍यांकडे जाणे, एकूणच कशाची सवय होऊ न देणे, सश्रद्धांची कडक टिंगल करणे, वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हम्म. नकळतपणे आपण डिपेंडन्सी क्रिएट करत असतो हे लक्षात आले नव्हते. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारद्वाजाचा शकून आमच्या बाबतीत तरी खरा आहे. आम्ही टुअरला स्वत:च जातौ त्यामुळे बरीच धाकधुक असते की प्रवासाची वाहने वेळेत नेतील का, चांगले हॉटेल चार पाचवेळा मिळेल का वगैरे. मग सकाळी भारद्वाज दिसला की आजचा दिवस चांगला जाणार हा आडाखा पक्का झाला आहे. आता काही वेळा भारद्वाज कामानिमित्त घरट्याबाहेर पडू शकत नाहीत आणि मोरांना पाठवतात तरी आम्ही चालवून घेतो. आमची मुलगी गाडीच्या खिडकीतून पाहायची आणि "आई मोर दिसतोय चालेल का ?"
बाकी न आवडणारी माणसे अनपेक्षितरित्या शुभशकूनी निघाली आहेत. ती वॉर्निँग देण्यासाठीच दर्शन देतात याबद्दल खात्री झाली आहे.आपण जे ठरवलं आहे त्यात काहीतरी गफलत आहे. ते पुन्हा तपासा अथवा तेच काम उद्या परवा केलेत तर बिनबोभाट होणार हे नक्की. नवीन मोबाइल घेण्यास जात असाल तर थांबा दुसरे चांगले मॉडेल दोन दिवसांनी येणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..हृदयस्पर्शी.
..तुम्ही जे लिहिलंय ते शकुन अपशकुन याविषयी अजिबात नाहीये.... एक खोल मनातली भावना अन आठवण हळुवार दाखवली आहेत.

..यावर श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे वाद नकोतच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर प्रतिसाद आहे. हेच शब्द नीट सुचत नव्हते. म्हणजे इतकं मर्मबंधातील अन दु:खाची किनार असलेले लिहीले आहे की काय बोलावे हेच कळेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0