कबुतर जा जा जा

गेल्या शनिवारी दिल्ली पब्लिक लायब्ररीत गेलो होतो. सहज म्हणून ऋग्वेदाचा एक खंड उचलला, काही पानें चाळली. एका सुक्तावर वर नजर पडली:

वा: कपोत इषितो यदिच्छन् दूतो निऋर्त्या इदमाजगाम I
तस्मा अर्चाम कृणवाम निष्कृतिं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे II


शिव: कपोत इषितो नो अस्त्व नागा देवा: शकुनो गृहेषु I
अग्निर्हि विप्रो जुषतां हविर्न: परि हेति: पक्षिणी नो वृणक्तु II

(ऋ. १०/१६५/१-2)

ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे.

या वरून काही गोष्टी कळतात, वैदिक युगात ही कबुतरांचा उपयोग संदेश देण्यासाठी होत होता. कबुतर बोलून संदेश देऊ शकत नाही. सांकेतिक रुपात का होईना, लिखित भाषेचा जन्म ही त्या काळी झाला असेलच. शिवाय दूत हा अवघ्य असतो.

मुगल काळात संदेशवाहक म्हणून हजारोंच्या संख्येने कबूतर बादशाह पाळायचे. गेल्या दोन्ही महायुद्धात कबुतरांचा उपयोग सैन्य संदेश देण्यासाठी युद्धरत देशानीं केला होता. आज ही जासूसी साठी कबुतरांचा उपयोग होतोच, विशेषकर सीमा प्रांतात. जुन्या दिल्लीत आज ही लोक कबुतरे पाळतात. कबूतरबाजीच्या प्रतियोगिता ही होतात. या खेळात जो कबूतर जास्त वेळ आकाशात राहतो, तो विजेता ठरतो.

जुन्या हिंदी सिनेमांमध्ये प्रेयसी आपल्या प्रियकराला सन्देश पाठविण्यासाठी कबुतरांचा उपयोग करायची. त्यांचा मिल्नत कबुतरांचा मोठा वाटा असे. लग्नानंतर सौ. सोबत मैने प्यार किया" हा सिनेमा बघितला होता.(प्रेम विवाह नसूनही). कबूतर जा जा जा, हे त्या सिनेमातले अत्यंत लोकप्रिय गाणे. त्या वेळी गाण्याचा खरा? अर्थ समजला नाही.

आज दिल्लीत कबुतरांची संख्या भयंकर रीतीने वाढते आहे. मांजर, कुत्रे, माकडां पासून सुरक्षित असे २०-२० फूट उंच मेट्रोचे पिलर हे कबुतरांच्या राहण्यासाठी सुरक्षित स्थान झाले आहे. या शिवाय टोलेगंज सरकारी इमारती ही दिल्लीत भरपूर आहेत. लोकांनी पक्ष्यांसाठी टाकलेला सर्व दाणा-पाणी कबुतरेच चट करून जातात. त्या मुळे मैना (साळुंकी), चिमणी इत्यादी लहान पक्ष्यांचे जिणे दूभर झाले आहे. त्यांची संख्या कमी होत चालली आहे. दिल्लीत जिथे पहा तिथे केवळ कबुतरे आणि कावळेच दिसतात.

प्रथमदर्शनी कबुतर अत्यंत निरुपद्रवी पक्षी वाटतो. पण खंर म्हणाल तर, कबुतरांच्या विष्ठे आणि पिसांमुळे अलर्जी, निमोनिया इत्यादी अनेक रोग पसरतात. रोगराई व घाण पसरविणारी कबुतरांना आता शहरातील लोक कंटाळली आहे. आज दिल्ली, मुंबईतल्या लोकांना खरोखरंच अमंगलकारी कबुतरे शहरातून दूर निघून गेली पाहिजे असे वाटते. लोक ही कबुतरांच्या विरुद्ध आवाज उठवू लागले आहेत. सध्यातरी कुठल्या ही सरकारी यंत्रणेने या बाबत दखल घेत नाही आहे. जर कबुतरांना हाकलणे शक्य नसेल तर किमान सरकारी यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर कबुतरांना राहण्यायोग्य झाडे इत्यादी लावली पाहिजे. त्याना दाणा-पाणी घालण्यावर ही काही निर्बंध लावली पाहिजे. एवढे केलेतरी काही प्रमाणावर कबुतरांचा त्रास कमी होईल.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ऋग्वेदात अमंगलकारी बातमी आणणारी कबुतरं आता स्वतःच अमंगलकारी झाली आहेत! तुमच्या लेखनाचा हिंदिष्ठित बाज आवडतो. प्रतियोगिता = स्पर्धा असणार. पण 'दूभर' पहिल्यांदाच ऐकला. फारसा वापरात नसतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

कबुतर अत्यंत घाणेरडा प्राणी आहे राव. गाडीच्या टपावर हगून ठेवतो. त्याची विष्ठा इतकी अॅसिडिक की जिथे हगून ठेवलंय तिथला रंग उडायला लागलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबुतर अत्यंत घाणेरडा प्राणी आहे राव.

Smile माणूस स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी मानतो अन तीच अपेक्षा अन्य पशु-पक्षांकडून करतो.
____
मलाही पालीची अतिशय घाण वाटते सो आय अ‍ॅम नॉट पॉइन्टिंग फिंगर. असच लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सूक्ताही ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद. वाचायला पाहिजे. (सूक्तातील सर्व ऋचा कबूतराबाबत आहेत, पण सूक्ताची देवता "विश्वेदेवा" आहे, का ते वाचून बघितले पाहिजे.)

कबूतरे बरीच घाण करतात, खरे.

कबूतराचे मांस हे कामवर्धक आहे, असे कुठेतरी ऐकले होते. परंतु भली मोठी बाजारपेठ उपलब्ध असूनही या सहजप्राप्य कबूतरांची शिकार ज्या अर्थी मोठ्या प्रमाणात होत नाही, त्या अर्थी ही अफवा बिनपायाची असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दूभर' जसा ऐकला नव्हता म्हणालो वरती तसा तुझ्या प्रतिसादातला 'बिनपायाची" पण ऐकला नव्हता. "बिनबुडाचा / बिनबुडाची" वापरला जातो. "दावा बिनबुडाचा निघाला" किंवा "मुळात त्याची समीकरणंच बिनबुडाची निघाली" असं. 'बिनपायाची' हे didn't have a leg to stand on चं म.टा.छाप रूपांतर का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पाया नसलेले ते बिनपायाचे. रूपांतर नाही. स्वतःच्या हिमतीवर केलेले रूपक.

("दुर्भर", टंकनदोष? तितकासा चपखल अर्थ येत नाही, पण ठीकठाक.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिनपायाची=बेसलेस=बिनबुडाची?

बाकी कबुतरांचे मांस कसे लागते हीच शंका विचारायला आलो होतो. तित्तर, होला वगैरे पक्षी खाल्ले जातात पण कबुतरे नाहीत हे जरा आश्चर्यकारक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिनबुडाचा हा पर्याय चांगला असला तरी ते माझे रूपक नव्हे Smile
उद्या कोणी म्हणेल, "कमळासारखा सुंदर म्हणण्याऐवजी गुलाबासारखा सुंदर, असे लिही". दोन्ही उपमाच आहेत, ठीकही आहेत, परंतु बोलणारा त्या क्षणी आपल्याला सुचते, ती उपमा वापरतो. अर्थात उपमा विलक्षण अनोळखी गोष्टीची दिली (क्रिसँथेममसारखा सुंदर), तर वाचकाला समजणार नाही, असा मैत्रीपूर्ण सल्ला देणे चांगलेच.
पाया हा जमिनीत खणून भरतात, आणि त्यात रोवल्यामुळे इमारत स्थिर राहाते. बूड हे रोवलेले वगैरे नसते. अर्थात जमिनीला टेकल्यामुळे बूड वस्तूचा आधार होते, म्हणून बुडाचे रूपक चांगले आहे. तरी ते माझे रूपक नव्हे.
मराठी वाचकाला पाया असलेली इमारत सुद्धा बऱ्यापैकी ओळखीची असणार, त्यामुळे हे रूपकसुद्धा समजणार. नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा 'अफवा' म्हटल्यावर बुड शोधण्यात अर्थ नाही मात्र ती पसरायला पाय हवेतच!
तेव्हा बिनपायाची अधिक योग्य वाटले नी आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अफवेची प्रकृती लक्षात घेता मी 'बिनपंखाची' हे वापरलं असतं. पण ही धनंजयनं उभारलेल्या 'पाया'वरची पश्चातबुद्धी, वर्जिनल नव्हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"चटपटीत" आणि "विषयाबाबत" ही द्विरुक्ती Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाया हा शब्द ओळखीचा असला तरी "बिनपायाची" हा शब्द वाचल्यावर "पाय नसलेली" असा अर्थबोध झाला (कदाचित माझ्या आत्मकेंद्री/सजीवकेंद्री पक्षपातामुळे). अर्थबोधात अडचण येणार नसेल तर कमळाऐवजी गुलाबाची उपमा द्या असे कोणी म्हणणार नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित माझ्या आत्मकेंद्री/सजीवकेंद्री पक्षपातामुळे

हे निरीक्षण रोचक आहे. गुंतागुंतीच्या कल्पनांचं वा विचारांचं मॅपिंग आपल्या दैनंदिन क्रियांशी करणं, ही तशी सहजप्रवृत्ती (आणि कदाचित उत्क्रांतीची मर्यादाही) आहे. रुपक-उपमा-सामंतर्य यातून हे इतक्या वेळेस होत असतं की ते निराळी उपमा वापरल्याशिवाय चटकन ध्यानी येत नाही.

Embodied cognition हा तसा व्यापक विषय आहे, पण भाषेच्या परिप्रेक्ष्यात कन्सेप्च्युअल मेटॅफोरचे (संकल्पनात्मक रूपक?) उदाहरण पाहता येईल -

For example, people will typically use language about journeys to discuss the history and status of a love affair, a metaphor Lakoff and Johnson call "LOVE IS A JOURNEY". It is used in such expression as: "we arrived at a crossroads," "we parted ways", "we hit the rocks" (as in a sea journey), "she's in the driver's seat", or, simply, "we're together". In cases like these, something complex (a love affair) is described in terms of something that can be done with a body (travel through space).

अधिक उदाहरणे येथे (Metaphors We Live By)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा सिव्हिल ईंजिनीअर पाया = पाय ऐवजी पाया = foundation असा अर्थ लावण्याची शक्यता जास्त आहे का? असो. एखाद्या गोष्टिचा अर्थ लावताना आपण कीती रीस्ट्रिक्टेड असतो आपल्या जाणीवांमुळे, रोजच्या व्यवहारांमुळे, 'ज्ञाना'मुळे त्याची दोन उत्तम उदाहरणं;
१. पाण्याचा फॉर्म्यूला काय? मुलगा म्हणाला HIJKLMNO. H2O = H to O असा अर्थ मला बापजन्मात सुचला नसता!
२. एका लहान मुलासाठी आईने ग्रोसरीमधनं 'animal crackers' चा पुडा आणला. मुलाला दिला. थोड्या वेळाने बघते तर तो खायच्या ऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीतले क्रॅकर्स निरखत बसला होता. आईने काय करतोयस विचारल्यावर त्याने वाक्य दाखवलंन छापलेलं त्या पुडक्यावर - "Do not use if seal is broken". म्हणून तो त्यातला 'seal' प्राण्याचा क्रॅकर शोधत होता - तो मोडलेला नाहिये ना बघायला!! हा किस्सा खरंच झालाय का माहित नाही. पण अगेन, हे ईंटर्प्रिटेशन भन्नाट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

सरः पाण्याचा फॉर्म्युला सांग.

'विध्यार्ती': एचटूहो, एनेसीएल, एचटूएसोफोर, एचेनोथ्री.

सरः हे काय?????

'विध्यार्ती': महापालिकेच्या पाण्याचा फॉर्मिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विध्यार्ती म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'विद्यार्थी' या शब्दाचा काहीजण करतात तो उच्चार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर्धमान महावीरांचा मृत्यू कबुतराचे शिळे मांस खाल्याने झाला होता, असे कुठेतरी वाचले होते. म्हणजेच कबुतरे (तेव्हा तरी) खाण्यात होती.

बादवे, हल्ली शहरांतील वस्त्यांतून जी दिसतात (ज्याला काही मंडळी दाणे भरवीत असतात) ते पारवे. कबुतरे नव्हेत. कबुतरे पांढरी शुभ्र असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महावीर नाही हो.
सिद्धार्थ गौतम ऊर्फ गौतम बुद्ध ऊर्फ तथागत असे त्या इसमाचे नाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शक्य आहे. फार्फार वर्षांपूर्वी वाचले होते.

मूळ मुद्दा कबुतराच्या (पांढरी कबुतरे,जी शांततेचा संदेश वैग्रे देण्यासाठी उडवली जातात ती. ज्यांना सामान्यतः कबुतरे म्हटले जाते ते पारवे नव्हेत) मांसाबद्दल होता. तो सिद्ध होत आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साफ चूक.

बुद्धाचा मृत्यू 'सूकरमद्दव' नामक पदार्थ खाल्ल्याने झाला असे म्हणतात. त्यातील सूकर या शब्दाचा अर्थ डुक्कर असा आहे. कबूतर कुठेच येत नाही त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुरुस्तीबद्दल आभार.
कन्फ्युज केलयबद्दल सॉरी सुनिलशेट.
.
.
अवांतर माहिती क्र१:-
बादवे, त्या कबुतराचा उल्लेख आहे त्यात खाण्यासाठी म्हणून कोण्या माणसाने मुद्दाम कबूतराला मारल्याचा उल्लेख नाही.
कथा साधारण ह्या धर्तीवर आहे :-
आचार्य( तथागत का महावीर जो कोण महात्मा असेल तो म्हणाला) त्यांच्या एका अनुयायास म्हणाले की अमुक ठिकाणी अमुक व्यक्तीच्या घरात
एका मांजराने त्याच्या उपजत प्रवृत्तीनुसार एका कबूतरास मारले आहे. त्या कबूतराचे मांस रुचकर आहे. पण त्या मांजराने काही कारणाने त्या
क्लबूतरास मारल्यानंतर खाल्ले नाही. ते रुचकर मांस खाण्याची माझी इच्छा आहे. कबूतराच्या हत्येचा दोष मला लागत नाही; कारण हत्या
मी केलेली किंवा घडवून आणलेली नाही; मांजराच्या नैसर्गिक आचरणानेच ते घडले आहे.
शिवाय आता जे शिल्लक आहे ते मृत कलेवर्/प्रेत आहे. त्यात जीव नाही. ते मी आता भक्षण करु इचइच्छितो.
.
.
लोकहो, ही ऐकिव माहिती आहे. सात्त्विक अहिंसक आचार्यांनी मांस खाल्लेच कसे वगैरे विचारत , त्यांच्या अहिंसेचा उद्घोष करीत मला
बदडायला हिंसक जमाव घेउन अहिंसेचा प्रचार करायला येउ नका. नैतर माझा प्रतिसाद उडिवला तरी चालेल.
.
.
अवांतर तर्क :-
मशिन्स त्यांच्या उपजत प्रवृत्तीप्रमाणे कीम्वा निसर्गनियमाप्रमाणे प्राणी मारीत असतील, तर ती मेलेली कलेवरे खाल्लेली चालावीत काय ?
किंवा निदान काही कुत्री अथवा मांजरी पाळून त्यांच्याकडून अशा पक्षी-बोकड वगैरेंची होलसेल हत्या करुन घ्यावी, व त्यांच्या हादण्यातून शिल्लक
राहिलेले नैसर्गिक प्रवृत्तीयुक्त मांस खाल्लेले आजही चालावे काय ? हा "अहिंसक मांस" प्रकार एक पूर्णवेळ धंदा होउ शकतो काय ?
(ज्यूंचे कोशर, मुस्लिमांचे हलाल, शीखांचे "झटके का " असते तसे काही ?)
.
.
अवांतर माहिती क्र २ :-
मी रुढार्थाने शाकाहारीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवांतर माहिती क्र. ३.

http://en.wikipedia.org/wiki/Vyadha_Gita

एका गर्विष्ठ ब्राह्मणाला वादविवादात पराभूत करणार्‍या धर्मनिष्ठ खाटिकाची कहाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पूर्ण सूक्त असे आहे:

राल्फ टी एच ग्रिफिथ ह्यांचे भाषान्तर असे आहे:

[10-165] HYMN CLXV. Visvedevas.

1. GODS, whatsoe'er the Dove came hither seeking, sent to us as the envoy of Destruction,
For that let us sing hymns and make atonement. Well be it with our quadrupeds and bipeds.

2 Auspicious be the Dove that hath been sent us, a harmless bird, ye Gods, within our dwelling.
May Agni, Sage, be pleased with our oblation, and may the Missile borne on wings avoid us.

3 Let not the Arrow that hath wings distract us: beside the fire-place, on the hearth it settles.
May, it bring welfare to our men and cattle: here let the Dove, ye Gods, forbear to harm us.

4 The screeching of the owl is ineffective and when beside the fire the Dove hath settled,
To him who sent it hither as an envoy, to him be reverence paid, to Death, to Yama.

5 Drive forth the Dove, chase it with holy verses: rejoicing, bring ye hither food and cattle,
Barring the way against all grief and trouble. Let the swift bird fly forth and leave us vigour.

कबुतरांचा उपयोग संदेशवहन असल्या काही गोष्टींसाठी केला जात असावा हे अर्थाकडे पाहता पटत नाही. ह्यातील कबुतराची सूक्तकर्त्याला असलीच तर भीतीच दिसते आणि त्याने काही अमंगल करू नये आणि लवकरच दूर जावे अशी त्याची इच्छा दिसते.

'दुभर' हा शब्द भीमसेन जोशींच्या एका चीजेमध्ये ऐकला आहे - दैय्या बाट दुभर (प्रियकरा, रस्ता अवघड आहे). श्रवणमात्र कानसेन असल्यामुळे अधिक काही सांगू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. आचार्य वेदान्त तीर्थ यांच्या पुस्तकातून अर्थ घेतला आहे. बाकी वेद पाणिनी पूर्व काळातले असल्या मुळे प्रत्येक भाषांतर करणार्याने आपापल्या परीने त्यांचा अर्थ लावला आहे. सन्देश वाहक हा अर्थ अधिक उपयुक्त ठरतो. त्याने अमंगलकरी अर्थात सैन्य आक्रमण इत्यादी बातमी न आणावी अशी अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थ थोडाबहुत वेगळा असू शकतो येथपर्यंत ठीक आहे पण वेदांचा अर्थ समजण्यासाठी मी ग्रिफिथसारख्या सर्वमान्य भाषान्तरकारावर अवलंबून राहणे पसंत करतो, ज्याचे भाषान्तर गेले १०० हून अधिक वर्षे विद्वन्मान्य मानले जाते.

ह्याच सूक्तावरचे सायणभाष्यहि मी पाहिले. सायणाचार्यांनाहि ग्रिफिथचाच अर्थ दिसतो आणि त्यांनाहि कोठे संदेशवहन आढळलेले नाही. वानगीदाखल ह्या सूक्तातील पहिल्या दोन ऋचांचा सायणाचार्यांनी लावलेला अर्थ दाखवतो.


(सायणाचार्यांचा अर्थ सुबोध संस्कृतमध्ये आहे त्यामुळे त्याचा मराठी अर्थ देऊन अधिक लांबवत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घाणेरडा कबुतर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबुतरे मूर्ख / निगरगट्ट पक्षी आहेत. कितीही ढोसा, पुन्हा मार खायला हजर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण सिमेंटच्या जंगलात कबुतरे मात्र उरली. परवा एका व्यक्तीकडे गेलो व्यावसायीक अरेबीक कबुतर जोडी पाहिली, १० लाख किंमत . तिकडे कबुतरांच्या दिर्घपल्याच्या रेस अजुनही चालतात जे कबुतर जिंकेल त्याला मोठे ब़क्षिस असते. जिपीएस लावुन देतात सोडुन.... जे प्रथम प्रवास पुर्ण करेल ते जिंकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

http://www.huffingtonpost.ca/2014/11/18/secret-life-of-pigeons-nature-of...

pigeons have impressive ability to recognize people who feed them and remember routine.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...