आपली वैशालीतील भेट

हा फार फार पूर्वी एका संस्थळावर टाकलेला लेख इथे परत टाकते आहे.
यातील शैली अभिषेक यांच्या शैलीशी जुळती आहे. अन ती आठवल्याने हा लेख टाकते आहे. Smile
_______________________________________
त्यादिवशी रवीवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, फर्ग्युसन समोरच्या वैशालीत. तू अमेरीकेहून नुकताच परतला होतास. बघण्याचा कर्यक्रम मोठ्या माणसांबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट.
त्या रात्री अधीरतेनी, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता पोशाख घालायचा, त्यावर कोणते डूल घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.
तू जरी अमेरीकेत रुळलेला असलास तरी मी पहील्या भेटीत स्लीव्हलेस घालणं तुला कितपत रुचेल याबाबत मी साशंकच होते त्यामुळे ते रद्दबातल झालं. माझ्याकडे सुंदर शुभ्र पांढरा पोशाख होता पण अतिशुचितेचा काकूबाई रंग म्हणून त्यावर काट मारली गेली. गुलाबी फार coquettish न जाणो अधीरतेचं गुपीत फोडायचा नकोच. गडद जांभळा माझ्यावर अतिशय खुलतो पण तुला अमेरीकेत राहून राहून पेस्टल रंग आवडत असतील आणि न जाणो जांभळा भडक वाटेल म्हणून मी जांभळ्याच्या वाटेला गेले नाही. शेवटी पिस्ता रंग निवडला. ना भडक ना अतिसौम्य. नंतर खोलीचं दार लावून वेगवेगळे डूल, कानातल्या रिंगा यांची रंगीत तालीम झाली. एवढं होऊन, जेवण होइतो दुपार टळून गेली होती. "Butterflies in stomach" म्हणजे काय ते मला पहील्यांदा कळत होतं. परत बोलायचं काय त्याची तयारी शून्य सगळा भर दिखाव्यावरच याबद्दल मन कोसत होतं ते वेगळच. पण मी तिकडे दुर्लक्ष केलं.
संध्याकाळी मस्त आंघोळ करून, तो पिस्ता पंजाबी चढवला, काजळ-कुंकू केलं, कानातले घालून, मॅचींग चपला, पर्स वगैरे जय्यत तयारी करून बाहेर पाहीलं तो पावसाची लक्षणं. आभाळ अगदी आत्ता कोसळेल का मग इतकं दाटून आलेलं. मला काळजी वाटू लागली ती माझ्या साज-शृंगाराची.
रीक्षा केली तोपर्यंत वार्‍यानी जोर धरला होता.आतापावेतो तड तड पाऊसही सुरू झाला होता. नेमकी रीक्षाला ताडपत्री नव्हती मग काय व्हायचं तेच झालं.पाऊस आत येऊ लागला. ओढणी अंगाला चिकटली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, केस विस्कटले. डोळे चोळल्याने का़जळ फिसकटलं.
शेवटी रीक्षा १० किमी अंतर पार करून कशीबशी वैशालीच्या दारात पोचली. तू आधीच हजर होतास. नीटसं आठवत नाही पण पावसात भीजल्याच्या सहानुभूतीपर काहीसं बोललास. पण हे नक्की आठवतय की भीजलेली मी छान दिसतेय अशा प्रकारचं विनोदाच्या अंगानी जाणारं बोललास : ) .... मी थोडी रिलॅक्स झाले.
जुजबी, इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर मुख्य बोलणं सुरू झालं.आपल्या आवडी-निवडी, अपेक्षा, मित्र-मैत्रिणी, बालपण वगैरे. जसजसे तुझे विचार कळत गेले तसतसे त्यामागची प्रगल्भता, चिंतन, दूरदृष्टी जाणवत होती. मला तू "शॅलो/ सुपरफिशिअल" अजीबात वाटला नाहीस. मी अ‍ॅट इझ झाले. एव्हाना संकोचाचा पडदा बराचसा गळून पडला होता. माझं काजळ फिसकटलय की रेखीव आहे याची चिंता तर केव्हाच डोक्यातून गेली होती. तुझे विचार ऐकण्यात, तुला प्रतिसाद, उत्तरं देण्यात मी तन्मय होऊन गेले.अबोल मला, तू बोलकं केलस्.मला तुझ्याइतकं मुद्देसूद, आखीव-रेखीव बोलता येत नसेल पण मी प्रयत्न तर नि:संकोच करू लागले. आपण खूप बोललो. तू वादपटू देखील होतास. तुझा मुद्दा तू कौशल्यानी मांडत होतास, माझे विचार प्रश्न विचारून काढून घेत होतास. खरं तर मी मनसोक्त एन्जॉय केली ती भेट.
पण आता अंधार पडू लागला होता एव्हाना. निघायची वेळ जवळ आली होती. माझं मन समाधानानी काठोकाठ भरलं होतं. आता एक मी मनाशीच ठरवलं होतं - आपल्या दुसर्‍या भेटीत मी बिनदिक्कीत साधीसुधी येणार होते मात्र हो मी त्यावेळी भरभरून बोलणार होते, मी विषय निवडणार होते. तुला पूर्ण engaged ठेवणार होते माझ्या संभाषण्-कौशल्याने. कारण मला विश्वास मिळाला होता - तू बाह्यांगाला भुलणार्‍यातला नाहीस.
मला तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं. मला तू खूप आवडला होतास.
मला निघाल्यावर रीक्षात बसल्यावर कविता आठवत राहीली -

"देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेणार्‍याने एके दिवशी
देणार्‍याचे हात घावे"

तसं तुझ्या गप्पा ऐकता ऐकता, मी देखील माझ्याही नकळत गप्पीष्ट व्हायची, बोलकी, बोलघेवडी व्हायची स्वप्न बघत होते

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पुढे काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL सगळा बट्ट्याबोळ झाला
लग्न हो Wink
____
खरच आमचा दाखवायचा प्रोग्रॅम झाला त्याची ही कहाणी आहे Smile म्हणजे सत्य कथा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बस भी कर पगले, अब रुलायेगा क्या Wink ROFL
बोला ना बट्ट्याबोळ!! हाहाहा
_____
नंतर एकदम engagement झाली. दोघांची पसंती होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

च्यायला एवढं रोमँटिक वगैरे झकास आहे. भावना अचूक आल्यात शब्दात. १४ फेब्रुवारीला टाकायचा ना लेख. विहिंपला म्यारिज सर्टिफिकिट इमेल करता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपने पास चक्की है भौ! तुम्ही म्हणता तर व्हॅलेंटाईन डे ला एक टाकतेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आम्ही गहू निवडून ठेवतो मग व्हॅलंटाईन डे करता.

कळावे आपला,
पीठ पेरलेली भाजी आवडणारा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पुढे काय झालं?

बरैलीच्या बाजारात झुमका पडला.

(अतिअवांतर: 'पुढे काय झालं?' हा काहीतरी पेंढार्‍यांचा वगैरे गळाबिळा कापण्याचा संदेशबिंदेश की कायसासा असतो ना म्हणे? बोले तो, असे काहीतरी ऐकले होते ब्वॉ. चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे काय झालं?

नक्की कोणत्या टैमफ्रेमकरिता उत्तर अपेक्षित आहे, ते कळवावे, म्हणजे तदनुसार रिपोर्ट बनविता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी: खी: क्या बात है. चरणस्पर्श स्वीकारावा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

सुंदर लेखन!
गोड उतरलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हे ऐसीवरच वाचल्यासारखं वाटतय. छान लिहीले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिपावर आहे पूर्वी टाकलेले. ऐसीवर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

छान. नशिबवान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

भेंडी इसमें खवचट काय आहे? टोकदार मते नसलेली व्यक्ती भेटणं हे नशिब नाही तर काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोकदार मते नसलेली व्यक्ती भेटणं हे नशिब नाही तर काय?

सहमत आहे १००% सहमत आहे. १०० कारण त्याहून जास्त टक्के देता येत नाहीत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

१००% म्हणजे सहमतीचे टोकच की हो! (ही पिंक उगाच.)

आवडणारा माणूस भेटणे हा आनंददायी योग आहे, खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्षरशः थरथरतं लेखन आहे. झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स गवि Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

छान रोमॅंटिक लिखाण. हुरहुरीचं चित्रण खूपच मस्त केलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद राघा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वैशालीत हादडलं काय ते सांगा की...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ह्येच बोल्तो.

कारण येकदा का शुभमंगल झालं की बाकी पब्लिकला जेवणच महत्त्वाचं असतं. 'मिष्टान्नमितरेजना:' नामक श्लोकचतकोरच आहे तशी. अगोदरच्या श्लोकांत पुरोगामी फिल्टरखाली न बसणारे विचार आहेत म्हणून इथे देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

याच जागी आम्ही कालेजात असताना सुतजुळवोच्छुक होतो तेव्हा एकीबरोबर गेलो होतो. तिथला मैसूर डोसा पहिल्यांदाच मागवला तेव्हा. तो डोसा इतका भारी निघाला की तो डोसा संपेपर्यंत तिच्याशी काही बोलायची इच्छाच झाली नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्ही कर्क दिसता संदर्भ - आमचा राशीविषयक फुटकळ धागा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

याच धर्तीवरचा येक विनोद वाचलेला.

"गर्लफ्रेंड की शादी का कार्ड आया. जाऊं की ना जाऊं? लेकिन बादमें सोचा मोहब्बत अपनी जगह और बिर्यानी अपनी जगह".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा - मस्त!!! टू गुड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

शादी का कार्ड आया था की मेनू कार्ड ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आलि वाचताना. detailing फार सुन्दर केलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत

धन्यवाद अभिषेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वैशालि ओव्हर रेटेड आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मान्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

<ओढणी अंगाला चिकटली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, केस विस्कटले. डोळे चोळल्याने का़जळ फिसकटलं.>

गदिमा उवाच -

<सुटली वेणी, केस मोकळे, धूळ उडाली, भरले डोळे.
काजळ गाली सहज ओघळे.
ह्या साऱ्याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा.>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile सुंदर. माझं आवडतं गाणं आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आहे चांगलं परंतू टैमफ्रेम (=कथानकाचा काळ) कपड्याच्या फैशनमधून कळतो. खूप जुना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच लेखन आहे. रोमँटिक.
---------------------------
ओढणी अंगाला ... हा पिक पॉइंट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ओढणी अंगाला ... हा पिक पॉइंट आहे.

हाच प्वाइंट तुम्ही 'पिक' केल्यामुळे पिक पॉइंटही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बस आता. अजून पिक पॉईंट्स नको शोधणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.