प्रिय 'प्र' ...
प्रियतम 'प्र',
आज सकाळी सहस्ररश्मीने माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर अलगद फुंंकर मारली. मी डोळे उघडले आणि तत्क्षणी तुझी आठवण मला घायाळ करू लागली. 'प्र', राजा का रे गेलास मला सोडून? खिडकीत जाऊन उभी राहिले, वाऱ्याने त्याच्या मुलायम पावलांनी माझ्या अंगाअंगावर अलगद पावले उमटवली. जणूकाही तुझाच रेशमी स्पर्श 'प्र'!! सारं मन ... सारं तन थरारून उठलं. एक अलवार शिरशिरी आली. काय करत असशील असा विचार करत ब्रश करायला घेतला. आरशात स्वतःचे रुपडे पाहिले. हीच का ती मी... जिच्यावर तू आपल्या प्राणांची कुडी ओवाळलीस. आणि मी माझ्या पंचप्राणांची ज्योत तुझ्या आत्म्यासमोर तेवत ठेवली. हो!! तीच ती मी. तुझी... फक्त तुझीच प्र! प्र अरे तू फुलवलंस मला. माझ्या मनमोराचा पिसारा तूच डौलाने उघडलास. माझ्या मनाच्या कळीला तुझ्या मोरपंखी प्रेमाने अलगद खुलवलं. माझं देहभान तू झालास. या जगतावर मला त्या परमेशाने फक्त तुझ्याचसाठी पाठवलं रे!
आता तू जवळ नाहीस प्र. पण असं जाणवतंय की आपण एकच आहोत. जणू मी नदी... आणि तू वारा. माझ्या अंगाला स्पर्श करत माझी काया झंकारणारा मरुत्दूत... तूच तो. प्र, वीण घट्ट आहे रे आपल्या नात्याची. तू दोरा आहेस या वातीचा, तू गंध आहेस या मातीचा, तू सत्यवान आहेस या सतीचा. माझ्या साऱ्या साऱ्या संवेदना तू उजळवून टाकल्या आहेस. मन कसं फुलपाखरू होऊन बागडतं आहे तुझ्या आठवणीत.
उठले... आंघोळीला गेले. शॉवर चालू केला आणि विचार तरंगला मनात. तू असा जलधारांसारखा बरसशील माझ्यावर, नाही? या विचारांनी सिंदूरलाली चढली गालांवर... तुझं हे लाजाळूचं रोपटं पार हळवं होऊन गेलं. शॉवरच्या पाण्यात माझ्या अर्धोन्मिलीत नेत्रांतल्या जलधारा कधी मिसळून गेल्या ते उमजलंच नाही मला प्र!!!
बाहेर आल्यावर डोळ्यात काजळ रेखताना उमगलं की माझ्या नशीबावर पण तू या काजळरेषेसारखा उमटला आहेस. आज तू भेटणार नाहीस मला!!! अजून एक आठवडा नाही. काय करू रे??? तुला काही झालं तर!!! वेडं मन सैरभैर झालं. काळेकुट्ट ढग निळ्याभोर आकाशात जणू दाटून यावेत! दुःखाने मन पार हेलावून गेलं. पोखरलेल्या उदार, उद्विग्न, असहाय्य मनगंगेला दिलासा म्हणून तुझा फोटो बघितला पर्समधला.
परत एकदा हिरव्याकंच पाचूसारखं मन थरारलं. असं वाटलं जणू फोटोतूनच तू बघतोयस माझ्याकडे! काळीज चिरत गेली तुझी प्रेमनजर. फोटोला कृष्णतीट लावली. नजर न लागो माझ्या प्रला! त्या राधेच्या विरहवेदनाच भोगल्या जणू!!!
पुन्हा मन बहरलं!!! अंगांग फुललं. तृषार्त जमिनीवर पोपटी अंकुर खुलला जणू. कारणच तसं होतं. मोबाईल वाजला आणि त्यावर नाव आलं ... Pra calling!!!
तुझीच,
वीणा
७ फेब्रुवारी २०१५
प्र ?
अहो एवढं रोमँटीक लिवलय तर जरा नाव बी रोमँटीक घ्यायचं की ! प्र काय प्र ? आम्ही शाळेत असताना प्रश्न चे लघुरुप म्हणून प्र. लिवायचो नी उत्तर चे लघुरुप म्हणून उ लिवायचो त्याची आठवण आली. गेलाबाजार राजा, सोनुल्या, छकुल्या तरी म्हणायचं किंवा लेटेस्ट फॅशनप्रमाणे 'माय बेबी', 'जानू' 'डियर' तरी ?
आणी अजून एक प्रियकराला जलधारा नका म्हणू बरे ! त्या आज केरळात बरसतात तर उद्या कोकणात. काय भरोसा त्यांचा ?
असहमत.आधीच ऐसीवर् ललित
असहमत.
आधीच ऐसीवर ललित लेखनाला पुरेसा वाव मिळत नाही. कधी कुणी काही लिहिलंच तर त्याच्यावर लोक आवेशानं तुटून पडतात. अवांतराच्या माळा लागतात.
अशा वेळी 'थट्टा करताना जरा विचार करावा' अशी कानपिचकी खुद्द अदितीकडून बघून आश्चर्य वाटलं.
असो.
वीणाबाईंना शुभेच्छा. अस्वल म्हणतंय तसं हे विडंबनात्मक लेखन असेल, तर प्रयत्त अशक्य भारी आहे! या पत्रांची मालिकाच वाचायला आवडेल. जरूर् लिहा.
ऐसीवर स्वागत! विविध प्रकारचे
ऐसीवर स्वागत!
विविध प्रकारचे ललित लेखन ऐसीवर येते आहे हे चांगलेच आहे. अशा शैलीचा एक खास वाचकवर्ग आहेच आहे.
==
मला पत्र आवडले. फार गोग्गोड वगैरे असले तरी अश्या प्रकारच्या पत्रांनी विव्हळात आपल्या प्रियकराची/प्रेयसीची वाट पाहणार्या काही गुलाबी व्यक्ती परिचित असल्याने वर अनेकांना संशय आहे तशी मौजमजा वाटली नाही. आणि असलीच तर उच्च आहे!
==
प्र, वीण घट्ट आहे रे आपल्या नात्याची
इथे अक्षरश: फुटलो!
येऊ दे असेच काही
--
अवांतरः आधी फक्त "प्रिय" या व्यक्तीसाठी जालावर झालेलं लेखन प्रसिद्ध आहेच. हे त्याच्याशी संबंधित काही?
आक्षेप!
नाही म्हणजे, हर्मिट क्रॅब यांनी सभ्य असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु, त्यांना ऐसीवरील सर्वात सभ्य आयडी म्हणणे हा ऐसीवरील इतर सभ्य आयडींचा१ अपमान नव्हे काय?
'हर्मिट क्रॅब' हा ऐसीवरील सभ्यतेचा मानदंड२ कधीपासून झाला?
..........
१ जे/ज्या कोणी असतील ते/त्या. आम्हीं त्यांत मोडत नाही; सबब तेवढी आतील कडी लावण्याची कृपा कराल काय?
२ 'हर्मिट क्रॅबपेक्षा सहापट सभ्य!!!'
नाही म्हणजे, हर्मिट क्रॅब
नाही म्हणजे, हर्मिट क्रॅब यांनी सभ्य असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु, त्यांना ऐसीवरील सर्वात सभ्य आयडी म्हणणे हा ऐसीवरील इतर सभ्य आयडींचा१ अपमान नव्हे काय?
खांद्यांवर चिपा असतील तर कुठलीही गोष्ट अपमाणच वाटनार.
तदुपरि ते आमचे मत आहे असे 'असाव्यात' या क्रियापदातून ध्वनित होत नाही काय?
कालिदासाने यक्षाला, त्याच्या
कालिदासाने यक्षाला, त्याच्या सुंदर बायकोला, त्यांच्या नगरीला, घराला ज्या ज्या उपमा दिल्या आहेत त्या * त्या यक्षाला आणि त्याच्या बायकोला झेपतीलच असे नाही.
==================
त्या दोन 'त्यां'चा अर्थ काढण्यासाठी 'त्यां'त थोडे थांबावे लागते. तिथे कॉमा दिला तर वाक्यरचना चुकते वाटते.
झालय झालय गेला व्हॅलेन्टाइन
झालय झालय गेला व्हॅलेन्टाइन डे साजरा होण्याआधीच डोहाळे लागलेले ;)
http://aisiakshare.com/node/3772
गेल्या कुठे या वीणामॅडम ?
गेल्या कुठे या वीणामॅडम ? अस्वलरावांनी मागे त्यांना विचारले होते की "तुम्ही प्रेमपत्रं लिहिण्याच्या ऑर्डरी स्वीकारता काय ?". त्यावर आधारित स्टार्टप सुरु केला की काय वीणामॅडम नी ?
( तिकडे खफ वर गेल्या आठवड्यात ऑनलाईन शॉपिंग ची चर्चा चालली होती तिचा व या स्टार्टप चा काही संबंध आहे का ? )

?
हे काय आहे नेमके?