छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे
अतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.
उदाहरणादाखल -
१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग
२. नितळ जलाशयातली एकाकी होडी
३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्याला आधार देणे इ. लीळा)
४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)
५. गडावर जाऊन क्षितिजाकडे विचारमग्न मुद्रेने पाहत काढलेले फोटो. (अधिक तिघांची 'दिल चाहता है' पोझ)
६. झाड - फूल - फळ - पान - पक्षी
. . .
अर्थात, ही यादी कितीही वाढवता येईल, कारण एखाद्या बाबीचं 'क्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं!
त्यामुळे,
- विषयाचं बंधन पाडून घेऊ नका.
- मूठभर हुच्चभ्रू काय म्हणतील याचा विचार न करता, क्लिशेंना आपलं म्हणा.
फोटो पाठवण्याची अंतिम तारीख - १ मे, २०१५.
(अडगळीस्तव इतर नियम कॉपीपेष्टवणे टाळले आहे. ते इथे वाचा.)
स्पर्धा का इतर?
काय तरी त्या स्वाक्षर्या ?
काय तरी त्या स्वाक्षर्या ?
'न'वी बाजूंना त्यांच्या स्वतःचे पालक पशु आहेत अशी खात्री का वाटत असावी ?
मी ऑलरेडी सांगीतलय हो की असे नका बोलू पण उत्तर मिळाले नाही. तुम्ही पुन्हा जाहिरपणे तीच गोष्ट नका हो विचारु ! :)
अवांतर : आम्हाला शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या पुस्तकात एक कविता की धडा कायतरी होता. पुर्ण आठवत नाही पण मतितार्थ असा होता की पुत्र कुपुत्र हो सकता है पर माता कभी कुमाता नही हो सकती. 'न'वी बाजूंच्या स्वाक्षरीने का कोण जाणे पण ही गोष्ट एकदम आठवली.
आईचे अनावश्यक ग्लोरिफिकेशन
जाऊ दया हो. जास्त टेंशन घेऊ नका. तो (जुना) काळच तसा होता. त्याकाळी 'मेरे पास माँ है |' ला केवढतरी वजन होतं !
मात्र आईचे अनावश्यक ग्लोरिफिकेशन जसे योग्य नाही तसे पुत्राने आईवडीलांना 'पशू' म्हणून अनावश्यक व्हिलन होण्याचे देखील कारण नाही.
काये की बुंद से गयी तो फिर हौद से नही आती !
'न'वी बाजू हे तुमचे किंवा फॉर
'न'वी बाजू हे तुमचे किंवा फॉर द्याट म्याटर कोणाचेही म्हणणे ऐकून त्यांची स्वाक्षरी बदलतील, विशेषतः असलेला मजकूर काढून टाकतील असं तुम्हाला कोणत्या बेसिसवर वाटलं असावं असा विचार करतो आहे.
ते आणखी चार कमेंटा (भरपूर स्ट्रिंग्जची फोडणी घालून) पेष करतील आणि आईवडील हे उपयुक्त पशू असल्याच्या पुढच्या (आणखी एक फ्लाईटलेव्हल उच्चस्थानी असलेलं) आणखी एक तत्व त्या स्वाक्षरीत जोडतील हे तुम्हाला इतक्या काळाच्या जालीय वावरात लक्षात आलं नाही का?
तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला .. इ इ.
कोणाचेही म्हणणे ऐकून त्यांची स्वाक्षरी बदलतील
'न'वी बाजू हे तुमचे किंवा फॉर द्याट म्याटर कोणाचेही म्हणणे ऐकून त्यांची स्वाक्षरी बदलतील, विशेषतः असलेला मजकूर काढून टाकतील असं तुम्हाला कोणत्या बेसिसवर वाटलं असावं असा विचार करतो आहे.
ते तसे करणार नसतील तर त्यांनी 'न'वी बाजू हा आपला आयडी बदलून 'जु'नीच बाजू असा ठेवावा. तुम्ही केलेल्या अभ्यासावरुन असं वाटतयं की हा आयडी आता जास्तीत जास्त प्रेडीक्टेबल होत चाललाय. तो कसा व्यक्त होणार हे आता जालावर अनेक लोकांना माहित झालय ? तर मग नवीन काय ? हा प्रश्न उरतोच.
अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांन
अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांनो,
आपण आग्रह केलात तसेच मला पटले म्हणून मी तुमच्यासोबत अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी झालो. पण कृपया मला जास्त विचार करायचे काम देऊ नका. प्रत्येक गोष्टीत इतका विचार करायला मला वेळ नसतो तसेच प्रत्येक गोष्टीत पद्धतशीर विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी 'फ्रेम ऑफ माइंड' तसेच बुद्धिमत्ता, जी आपल्याकडे असावी, माझ्याकडे नाही. तर कृपया फोटो काढायचे स्वातंत्र्य मला कि न काढून घ्यायचे पुढच्याला हे कृपया सुलभ शब्दांत सांगणे.
-------------------------------------------------------
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारांसाठी फार डोके लावायचे अॅडिशनल काम न दिले तर या समाजावश्यक विचारसरणीला अधिक फॉलोअर्स मिळतील असे वाटते.
--------------------------------------------------------
ऋषिकेशला ते चित्र नक्की कोणत्या सिद्धांतावर काढायला लागले इतके तरी सांगावे. आम्ही तो नियम पाळण्याचा प्रयत्न करू. ते चित्र काढण्यापूर्वी काही लोकांनी ते पाहिलेले दिसते. मग त्यांनी चित्रातील लोकांचा जो काही हक्क भंग केला आहे (असेल तर), त्याचे प्रायश्चित्त (सौम्य शब्द सुचला नाही म्हणून प्रायश्चित्त) काय?
:(
ऋ,
सॉरी. नेमकं काय होतय माहित नाही.
मी दरवेळी चेष्ट म्हणून कैतरी काडी सारु पाहतो आणि गोष्टी शिरेस होउन जातात.
मला फक्त ती टिपिकल तार्किक(किम्वा तर्कट) वादावादी होइलसं वाटलं होतं.(सार्वजनिक जागेवर कुणीही फटु काढू शकेल ;
असं कुणीतरी म्हण्ण; मग कुणीतरी अजून कैतरी पॉइण्ट काढणं वगैरे. वरती दोन चार प्रतिसादात म्याटर खलास झालं.
तू फटू इथून हटवलास.) मला वाईट वाटतं आहे.
.
.
ह्यापुढे चेष्टा मस्करी करायची की नै ह्या विचारात पडलोय.
त्या फोटोत काय होतं ते जाऊदे.
त्या फोटोत काय होतं ते जाऊदे. समजा तुझ्या कुटुंबातली विविध वयातील मुलंमुली, स्त्रिया, कदाचित पुरुषही घरगुती समारंभात बसलेले असताना कोणीतरी फोटो काढत फिरत आहे. तेव्हा ती व्यक्ती ते फोटो थेट एखाद्या फोरमवर स्पर्धेसाठी चढवेल असं आपण गृहीत धरतो का? उदा तुझ्या, किंवा कोणाही "क्ष"च्या पंधरा वर्षाच्या मुलीचा किंवा लहान मुलाचा किंवा पत्नीचा नटलेला फोटो उद्या लोकसत्तामधील स्पर्धेत थेट कोणीतरी "स्त्रीजातीची नटण्यामुरडण्याची हौस" अशा कॅप्शनने झळकवला आहे असं दिसलं तर "क्ष"ला अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे की नाही? तशी असूच शकत नाही का? सार्वजनिक समारंभ सोड.. तल्लीन होऊन शहाळ्यातलं पाणी पिणारी मुलगी म्हणून निकट कुटुंबियाचा चौपाटीच्या नारळवाल्याजवळ उभा असलेला जवळून घेतलेला फोकस्ड फोटो कोणा नागरिकाने यासम वृत्तपत्रीय पुरवणीत "तृषार्त तरुणाई" अशा कॅप्शनने पाठवला आणि छापवला तर नेसेसरिली ते आवडेल का बहुसंख्यांना?
निकाल
ह्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनःपूर्वक आभार. (क्लिशे ट्रान्स्लेट्ररः रिकामटेकडे सदस्य सगळे, दुसरं काय! दॅट रिमाइंड्स मी - तो रिकामटेकडा आयडी कुठे गायबला बरं?)
ह्या धाग्यावर आलेले सगळेच फोटो अतिशय आवडले. (क्लिशे ट्रान्स्लेटरः आधुनिक शाळांत प्रत्येक मुलाला किमान एक तरी मेडल मिळतं, तसलं काहीतरी वाटतंय राव.)
त्यातून एकच एक विजेता निवडणे अतिशय कठीण गेले. (क्लि. ट्रा.: Yeah, right!)
तरीही क्लिशे विषय + तांत्रिक सफाई यांचे सुयोग्य मिश्रण म्हणून 'मुळापासून' यांचे कापूसपिंज्या मुलायम धबधब्याचे चित्र या स्पर्धेत विजेते ठरले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढचा विषय त्यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. (क्लि. ट्रा.: चला, ब्याद टळली एकदाची!)
(क्लिशे ट्रान्स्लेटरची प्रेरणा येथून :))












प्रसिद्ध विनिमय दराप्रमाणे
In reply to कुठे नेऊन ठेवली फोटोस्पर्धा आमची! by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रसिद्ध विनिमय दराप्रमाणे चित्राऐवजी हजार शब्द देणे आले.