छोटू सरदार

लटके कमरेला तलवार
ऐटीत फिरे छोटू सरदार ..

समोर दिसता माशा झुरळे
म्यानातून निघे तलवार ..

सपासप होती हवेत वार
माशा झुरळे मरती चार ..

हा हा हसे छोटू सरदार
कौतुक करी सारे घरदार ..

"भो भो" आवाज येता कानी
गडबडतसे छोटू सरदार ..

फेकुन देत हातची तलवार
आईच्या पदराआड पसार ..
.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

असेच काहीसे गाणे लहानपणी पाठ केले होते. ट्यावरच्या धीट आणि घाबरलेल्या राणीची चित्रे अजून लक्षात आहेत.

शाळेमधल्या नाटकातली
मर्दानी ती झाशीवाली

बांधुनि फेटा संदर मोठा
कमरेला तलवार लटकती

ढाल छातिशी पुत्र पाठिशी
घेउन लढण्या सिद्ध जाहली

अंगरख्याच्या आत राणिच्या
लांब मिशांचे झुरळ मिळाले

कसले नाटक कुठली झाशी
राणीचे अवसान गळाले

कविता चांगलीये. पण धाग्यातली मूळ कविता ऐसीच्या दृष्टीने जास्त पोलोटिकली करेक्ट वाटते. Wink

धाग्यातली मूळ कविता

मूळ कविता? झाशीवालीची कविता ही वरील 'मूळ' कवितेवरून प्रेरणा घेऊन केलेली रचना नाही. लहानपणी एका गाण्यांच्या पुस्तकात वाचलेले गाणे आहे. काळाच्या दृष्टीने पहता झाशीवालीच 'मूळ' म्हणायला लागेल Wink

ऐसीच्या दृष्टीने जास्त पोलोटिकली करेक्ट वाटते. (डोळा मारत)

कळले नाही

वा! किती गोड.

शहराजाद, काव्या, घाटावरचे भट ..

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद !