'नी' ची कहाणी
हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.
यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.
- नी
स्पर्धा का इतर?
एखादं सुट्टं टोक रहाणार नाही
एखादं सुट्टं टोक रहाणार नाही याची फार खबरदारी घ्यावी लागत असेल नाही (म्हणजे टोचू नये या दृष्टीकोनातून)?
हो अर्थातच घ्यावी लागते. टोके डिझाइन खराब दिसणार नाही अश्या तर्हेने मुडपणे, ती बाहेर रहाणार असतील तर घासून घासून गुळगुळीत करणे वगैरे लागतेच करायला.
यासाठीच प्रॅक्टिस जरूरीची होते.
छान
काळ्या पार्श्वभूमीवर जर्मन-सिल्वरचे काम सुंदर दिसतेय. तुमचे जे 'नी' हे बोधचिह्न आहे, तेही असे तारेत करून मध्ये पदक म्हणून (तांब्याचा पत्रा आणि त्यावर 'नी' च्या वेलांट्या, अथवा एखादा लालसर दगड आणि तो 'नी' या तार-कामाने मढवलेला वगैरे.) गुंफता येईल.
शुभेच्छा.
वरच्या चित्रातला दागिना
वरच्या चित्रातला दागिना अजिबात जड नाही.
माझ्याकडे वजनकाटा नाही पण रेग्युलरली दागिने घालणार्या व्यक्तीला हा अजिबात जड होणार नाही.
त्या चित्रातल्या दागिन्यातल्या दगडाची उंची सव्वा इंचापेक्षा किंचित जास्त व दीड इंचापेक्षा कमी आहे. रूंदी एक इंच. दगडाची जाडी पाव इंचाच्या अर्ध्याच्याही कमी आहे.
फार सुंदर. हे असं तारांचे
फार सुंदर. हे असं तारांचे गळ्यातले बनविताना, एखादं सुट्टं टोक रहाणार नाही याची फार खबरदारी घ्यावी लागत असेल नाही (म्हणजे टोचू नये या दृष्टीकोनातून)?