Skip to main content

सूर्याचे कारकत्व आणि कुंडलीतील त्याचे "स्थान" आणि महत्व!

सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय?

सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल?
सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते?
सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते?
सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?

धर्मराजमुटके Thu, 01/10/2015 - 15:56

In reply to by अनुप ढेरे

एवढ्या सगळ्या प्रश्नांचे फळ हिंदीत केवळ बाबाजीका ठुल्लू मिळाला असता.
त्यापेक्षा मराठी कैकपटीने बरी. कमीतकमी केळं तर केळं. हे ही नसे थोडके.

चिमणराव Sat, 03/10/2015 - 06:49

छोटे मोठे प्रश्न नसून पुर्ण सूर्याचीच कुंडली विचारली आहे.
ह• ना• काटवे यांचे रवि विचार ,कुंडलीची भाषा भाग १\-२-३ वगैरे पुस्तके पहा.
प्रत्यक्ष ज्योतिषापेक्षा कारकत्तव आणि कुंडलीतील प्रभावी ग्रहच ठरवतात प्राक्तन.
रवि ग्रहच कुंडलीतला महान ग्रह आहे ही बय्राच जणांची समजूत असते.५८ नंतर त्याचा प्रभाव संपतो रिटायर्ड.पदं भुषवणारा आणि बरीच वर्षे खुर्ची अडवून ठेवतो."मोठा नोकर. " राजा अथवा मालक होऊ शकत नाही.कित्येक वेळा संसार एकदा तरी जाळतो.तर कधी लायकीपेक्षा मोठ्या पदावर बसवतो.महान कार्य वगैरे करत नाही कारण फक्त आज्ञापालनच करतो.

मनीषा Fri, 09/10/2015 - 15:00

मला वाटते सूर्य कुठल्याही राशीत, कुठल्याही स्थानी असला, तरी जे बीज पेराल ... तेच फळ मिळेल.

म्हणजे पेरूच्या बीया पेराल तर पेरूच मिळतील. फणसाच्या पेराल तर फणस.

बाभळीचे झाड लावून त्याला आंबे कसे लागत नाहीत? असा त्रागा करणे व्यर्थ आहे.