विनोबा भावे अध्यात्म्यातील वन लायनर्स

नमस्कार,
या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे. टायपिंग च्या मर्यादेमुळे मला आवडलेले काही निवडक उतारे येथे देत आहे.
शिर्षक : विचार पोथी
लेखक :विनोबा भावे.
दुसरी आवृत्ति १९४६ ( प्रथम कधी प्रसिद्ध झाले ते माहीत नाही.)
विषय अर्थातच अध्यात्म.
एकूण ७३६ वाक्ये किंवा वचने
प्रस्तावनेत बाबा लिहीतात.
हे विचार सुभाषिता सारखे नाहीत सुभाषिताला आकार लागतो हे जवळजवळ निराकार आहेत.
इंग्रजी मध्ये वन लायनर प्रसिध्द आहेत. खालचा प्रकार त्या वन लायनर सारखाच आहे.
1. [list=1]
[*]सत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, बळाचा अभिमान, रूपाचा अभिमान, कुळाचा अभिमान, विद्वतेचा अभिमान, अनुभवाचा अभिमान, कर्तुत्वाचा अभिमान, चारित्र्याचा अभिमान,हे अभिमानाचे नउ प्रकार आहेत. पण मला अभिमान नाही असे भासणे ह्यासारखा भयानक अभिमान नाही.
[*]2. आई तु मला जे दिलेस ते कोणीच दिले नाही, पण तु मेल्यावर जे देत आहेस, ते तू ही जिवंतपणी दिले नाहीस. आत्म्याच्या अमरत्वाचा एवढाच पुरावा मला बस आहे.
[*]3. आमची आई म्हणे, "देशे काले च पात्रे च हे एक थोतांड आहे. दयेने वागावे म्हणजे झाले." मी म्हणे, "अपात्री दान करण्यात दान घेणाऱ्याचे ही अकल्याण आहे." ह्या वर तीचे उत्तर ठरलेले होते, "पात्र-अपात्र आपण कोण ठरवणार? जो गरज मागायला आला तो परमेश्वरच असतो,"
[*]4. गीता अनासक्ति सांगते. पण ईश्वरात आसक्त हो म्हणतेच.
[*]5. छातीवर पिस्तूल रोखून धान्य लुबाडणे आणि सोन्याची मोहोर देउन ते विकत घेणे ह्यांत पुष्कळवेळा मुळीच फरक नसतो.
[*]6. स्वधर्म सहजप्राप्त असतो. मुलाला दूध पाजण्याचा धर्म आई मनुस्म्रृतीतून शिकत नाही.
[*]7. मला बाहेरून किती मिळाले आणि माझे स्वत:चे आतले किती, हे मी पाहतो तेंव्हा माझे स्वत:चे असे काही उरत नाही. ‘इदं न मम’ ही भावना करण्याचे मला काहीच कारण नाही.
[*]8. धुमसत असताना प्रगट होऊ नये. पेटल्यावर दिसेलच.
[*]9. स्वप्न म्हणजे झोपेत जागणे, आणि अनवधान म्हणजे जागृतीत निजणे, पुष्कळवेळा ही एकमेकांची कार्यकारणे असतात.
[*]10. हिमालय उत्तरेस का आहे? मी त्याला उत्तरेस राहू दिले म्हणून. मी उद्या त्याच्या उत्तरेस जाऊन बसलो म्हणजे तो दक्षिणेकडे फेकला गेलाच की.
[*]11. व्यासांनी विष्णु सहस्त्रनाम लिहीले त्यात आधी ॐकाराचा उच्चार केला आहे, ॐ हे विष्णु सहस्त्रनामाचे अतिसंक्षिप्त रूप आहे.
[*]12. गायत्रीत व्यक्तीगत उपासनेचा मानेलेला आहे. पण ’धीमहि’ -आम्ही ध्यान करतो- हे बहुवचनी पद समुदायाचे सूचक आहे. ंहणजे गायत्री उपासना व्यक्तीने करावयाची आहे, पण ती आपल्या ठिकाणी सर्व समुदायाची-विश्वात्म्याची-कल्पना करून करायची आहे.
[*]13. पाश्चात्य भाषेत ’संताचे अनुवर्तन’ असा प्रयोग आढळून येतो आपल्याकडे ’संताचे गुणगान’ म्हणतात. ’गुणगान’ म्हणण्यात नम्रता आहे पण त्यात ’अनुवर्तन’ गृहीत असेल तरच ती नम्रता शोभेल
[*]14. कमीत कमी परिग्रहातून ज्यास्तीत ज्यास्त कस कसा काढावा हे अपरीग्रह शिकवतो.
[*]15. वेदार्थ स्वच्छ समजत असेल, घटकाभर समाधी लागत असेल, नामस्मरणाने सात्विक भाव उमटत असतील म्हणून काय झाले? आचरणात उतरेल तेच खरे.
[*]16. जीवनात भिती राखली म्हणजे मरण निर्भय होईल.
[*]17. वेदात सहते या धातुचे दोन अर्थ आहेत; एक सहन करणे आणि दोन, जिंकणे. जो सहन करतो तोच जिंकतो.
[*]18. नम्रता म्हनजे लवचिकपणा. लवचिकपणात तणावाची शक्ती आहे, जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकष्टा आहे.
[*]19. अल्प श्रद्धेच्या माणसाला लोक परमार्थ पचनी पडू देत नाहीत, हा लोकांचा उपकार आहे.
[*]20. निंदास्तुतींची वजाबाकी करणारा मनुष्य आपोआप मोकळा होतो.
[*]21. दोन धर्माचा कधीही झगडा नसतो. सर्व धर्माचा अधर्माशी झगडा असतो.
[*]22. अर्थ म्हणतो, ’हक्काचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे’ धर्म म्हणतो, ’ कर्तव्य करीत राहणे हा हक्क आहे’.
[*]23. पर म्हणजे दुसरा तसेच पर म्हणजे श्रेष्ठ. दुस~याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानून चालावे ही साधकाची मनोभूमिका.
[*]24. संन्यास ही नोट आहे तर कर्मयोग हे नाणे आहे, किंमत एकच.
[*]25. सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.
[*]26. ’यथेच्छसि तथा कुरू’ असे सांगून पुनः ’मामेकं शरणं व्रज’ आहेच. स्वतंत्रतेने संयमाला वरावे ह्यात स्वारस्य आहे.
[*]27. अंकुर केव्हा फुटावा हे पेरणा~याच्या हातापेक्षा गव्हाला अधिक समजते.
[*]28. नेहमी अपयश येते ह्यात आश्र्चर्य नाही. यश म्हणजे समाप्ती. ती नेहमी कशी येईल? ती एकदाच यायची.
[*]29. तू म्हणतोस-- प्रयोगावरून ठरले म्हणून पक्के. मी म्हणतो-- प्रयोगावरून ठरले म्हणूनच कच्चे.
[*]30. “मला काय उपयोग? “असे न म्हणता "माझा काय उपयोग?" असे म्हणावे. म्हणजे उपयुक्ततावादाचे सार्थक होईल.
[*]31. अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत.
[*]32. अभय दोन प्रकारचे असते. आपण कोणास न भिणे, आणि आपले कोणास भय न वाटणे. हे दुहेरी अभय आहे.
[/list]
कापूसकोन्ड्या

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे वाटते. पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.
त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली.

खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाली गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.
आपली चूक कबूल करावी.दुसर्‍याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाक्ये आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अखेर आंतरजालावर विनोबाजींची दखल ठळकपणे कुणीतरी घेतली ह्याचाच अत्यानंद झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0