दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ एप्रिल
जन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)
मृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)
--
स्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)
मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.
१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.
१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.
१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.
१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.
१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.
१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.
१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.
२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- पुंबा
पर्याय १ व २- नको -लष्कराच्या
पर्याय १ व २- नको -लष्कराच्या भाकरी भाजु नयेत.
पर्याय ४ - मित्रमैत्रिणींना बिनधास्त सांगा..... पण फुकटात नको काय्ये ना फुकटात मिळालेल्याची किंमत शून्य असते.
पर्याय ३ - मी हेच केलं असतं.
तू गंमतीत म्हणत्येस, राईट?
तू गंमतीत म्हणत्येस, राईट? If you were serious....:-(. कोणाच्या गाडीचा लाईट चालू राहिला, तुमच्या शेजार्याच्या बागेतला नळ चालू राहिला, कॉन्फरंन्स रूममधे कोणी पॅड विसरलेलं दिसलं, स्टोअरमधनं वस्तू घेताना अर्धीच कींमत चार्ज झाली की तू काहीच करत नाहीस?
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
मिसळपाव मला २-३ वेळा $२० तर
मिसळपाव मला २-३ वेळा $२० तर कधी $१५ जास्त मिळाले आहेत म्हणजे दुकानातील कॅशियरने चुकून दिलेले आहेत . ते मी पहील्यांदा ताबडतोब परत केले. परत परत व्हायला लागलं अर्थात २ र्या की ३ र्या वेळी (अर्थातच दर वेळी वेगळ्या कॅशिअरकडून) तेव्हा मलाच कंटाळा आला परत परत काय आपणच दुप्पट काळजी घेत बसायच? मग एकदा $२० ठेवले व नवर्याला फोन केला. तो म्हणाला "नाही. परतच कर. उगाच मनात राहील" व परत केले.
.
एकदा घाटकोपरात लॉटरीचे तिकीट घ्यायला गेले होते तर पायाशी १०० रुपयाची नोट सापडली. तिची ग्लुकोज बिस्किटे घेतली व एका बाळाला स्तनपान करणार्या कामगार मातेला दिली. की घे बाई तुला कॅल्शिअम मिळो.
.
सांगायचा मुद्दा हा की लोभीपणा माझ्यात नाही, सचोटीही आहे. पण जर ऑनलाइन असे काही सापडले तर मी तर ब्वॉ डाऊनलोड करेन आणि त्यामागची कारणमीमांसा मला कळत नाही. उदा मला एक गाणी बेकायदेशीर अर्थात, डाऊनलोड करण्याची साइट पूर्वी माहीत होती. आणि तशा बर्याच सी डी मी बनवल्याही होत्या
पर्याय ४ च्यायला नीट जमत नसेल
पर्याय ४
च्यायला नीट जमत नसेल तर ठेवू नका ना ईबुक्स. उगाच उंटाच्या...मुका...वगैरे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पर्याय १. आणि खरं म्हणजे
पर्याय १. आणि खरं म्हणजे हे चुपचाप न करून टाकता ईथे त्याबद्दल लिहितोयस आश्चर्य वाटलं. पर्याय ४ न वापरल्याबद्दल कौतुक. आणि आय होप की त्याना सांगशील तेव्हा "तुम्हाला बरं नेमकं कळलं?", "तुम्ही मुळात तिकडे नाक खुपसलंतच कशाला?", "तुम्ही नक्की लोकाना सांगितलं असेल त्याबद्दल तुमच्यावर दावा ठोकावा का विचार चालू आहे" असलं सांगणाता आचरट नको भेटूंदे !! शेवटच्या पॉईंटचा सिरीअसली विचार कर.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
बुकगंगा?
हे बुकगंगाबद्दल असावं.
काय भगदाड आहे हे मी काही शोधायला जाणार नाहीये, (म्हणजे तेवढी माझी कंप्यूटिंग पत नाही.) पण त्या लोकांना सभ्यपणे एकदा इमेल टाकावं असं वाटतं. त्यापुढे त्यांनी ठराविक काळात उत्तर दिलं नाही (जे होण्याची शक्यता मला मराठी लोकांच्या बाबतीत फार वाटते) तर मग पुन्हा या प्रश्नाचा विचार करावा. पहिल्या इमेलमध्ये पुरावा जोडता आला तर उत्तमच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
साठे कुठे गुहेत लपलाय?
साठे कुठे गुहेत लपलाय?
स्वल्पविराम, इथे काय चालू
स्वल्पविराम,
इथे काय चालू आहे!
इथे काय चालू आहे! अस्वलाला
अस्वलाला पुरेसं मध मिळालं की आपल्याला गॉसिप मिळेल असं सांगण्यात आलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.