स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास
स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास
.
जेथे स्त्रीच्या शरीराची आदर्श मोजमापे जाहीरपणे उगाळली जातात, आदर्श (ideal) सुंदर स्त्रीच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाचे उदा. बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे, थोडेसे पुढे वाकलेले खांदे असे वर्णन ठरवले जाते. शयनेषु रंभा, अमुक अमुकेषु दासी अशा तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात.
मात्र यासाठी फक्त पुरुषच जबाबदार आहेत का याचाही विचार केला पाहिजे.
अनेक जाहीर समारंभांमध्ये बापे थ्रीपिस सूट मध्ये दिसतात व तथाकथित सेलिब्रिटी स्त्रिया उतु जाईल एवढे अंगप्रदर्शन करण्यात आघाडीवर असतात. एवढेच नव्हे तर अनेक आधुनिक आया वस्त्रप्रावरणाच्या बाबतीत आपल्या मुलींशी स्पर्धा करताना दिसत असतात. स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बाबतीत कमीत कमी वस्त्रे परिधान करणे हेच जरी एकमेव कारण नसले, तरी त्यातून निर्माण होणारी अनिर्बंधतेची संस्कृती जबाबदार असते हे नजरेआड करून चालणार नाही. मुले बहकली आहेत असे आपण म्हणतो, तसे मुलींचेही आदर्श भ्रष्ट झालेले आहेत हे वास्तव का नाकारावे?
काळानुरूप स्त्रियांचा पेहराव बदलत गेला असे सांगितले जाते. तो जाणारच. विविध संस्कृतींचा एकमेकांवर परिणाम होणारच. पण इतिहासाकडे पाहून आजचे निष्कर्ष काढणे योग्य नाही. आपण कितीतरी गोष्टी इतिहासाच्या विरूद्ध करतो. याच बाबतीत कोणी काही करू शकत नाही असे म्हणत पळवाट काढू नये. कारण कधी नव्हे ते जग इतके जवळ आले आहे. दोष कपडे घालणा-याचा नव्हे तर पाहणा-याचा असतो, किंवा बलात्कार करणा-यांमध्ये अनेक बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून होतात किंवा अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात ही बराच काळ वापरलेली टेप आता निरर्थक झाली आहे.
वरील युक्तीवादाला मला आठवते त्याप्रमाणे माझ्या एका पोस्टवरील कमेंटमधून स्त्रीवर्गातीलच कोणीतरी सडेतोड उत्तर दिले होते. ती कमेंट अशी की तोकडे वा कामुक वस्त्रपरिधान करणा-या स्त्रीवरच बलात्कार होईल असे समजण्याचे कारण नाही. अशा स्त्रीच्या अशा देहाकडे पाहणा-या व्यक्तीच्या वासनेची बळी कोणी वेगळीच परिचयातील, जवळची, अनोळखी अशी कोणतीही मुलगी/स्त्री व केव्हाही होऊ शकते. तेव्हा सनी लियोनेसारख्या व्यक्तींना केवळ त्याच उद्देशाने लोकांसमोर आणण्यामुळे लोक चेकाळण्याची व त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारांमध्ये वाढ होण्याचीच शक्यता असते. निव्वळ देहप्रदर्शनाने आपल्यासमोर वर्षानुवर्षे तग धरणा-या व जितके पैसे अधिक तेवढे अधिक कपडे कमी करणा-या सिनेनट्यांकडूनही वेगळे काही घडत नसते हे लक्षात घ्यायला हवे. एरवी चित्रपटातील दृश्याची मागणी असते असा लटका युक्तिवाद करणा-या अशा 'अभिनेत्री' (?) एरवी विविध मासिकांना व वर्तमानपत्रांमध्ये छापु देण्यासाठी उत्तान-कमी कपड्यांमधील छायाचित्रे का घेऊ देतात? हा एक प्रकारचा शरीरविक्रयाचा प्रकार नाही का? मग अशा व्यक्तींविरूद्ध कोणी ओरड केली की त्यांना संस्कृतीरक्षक म्हणून हिणवायचे. खरे तर अशा स्त्रियांच्या पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्या असे वागतात व त्याला ब-याचदा बळी पडतात समाजातल्या सामान्य मुली-स्त्रिया. पूर्वीपासूनच ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, पण आता त्यांचा इतका मारा होत आहे की मुला-मुलींचे लहानपण फारच मर्यादित झालेले आहे हे मी आधीही मांडले होते. परंतु आपण या गोष्टी इतक्या गृहित धरल्या आहेत की त्यामुळे हा धोका किती प्रमाणात वाढला आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. उलट वर म्हटल्याप्रमाणे अनिर्बंधतेचा पुरस्कार व आग्रह धरणारेच पुढे आहेत. आनि मग सोयीप्रमाणे व सवडीप्रमाणे मुलांचे बालपण हरवत चालले आहे हे आपणच म्हणायचे.
स्त्रीशरीराचे नको तेवढे प्रदर्शन या विषयावर स्त्रियांची मोठी चळवळ का उभी रहात नाही? आजकाल टीव्हीवरच्या जाहिरातीत ज्यापद्धतीने स्त्रियांचा वापर केला जातो त्यावर निव्वळ चवीपुरते बोलायचे. कृती मात्र काही करायची नाही. काही आठवड्यांपूर्वी सॅनिटरी नॅपकीन जेथे बसवतात तेथे पिसासारखी वस्तु जाऊन बसते असे दाखवणारी एक 'कल्पक' जाहिरात दाखवली गेली तेही चालवून घेतले गेले. काही दिवसात वास्तवतेच्या आग्रहापोटी निळ्याचे लाल झाले तरी आश्चर्य वाटायला नको. हे थोडे विषयांतर झाले असे वाटले, तरी जागरूक स्त्रियांची या समाजात फार कमतरता आहे हे वास्तव विसरायला नको.
मोबाईल फोनच्या कंपन्या सनि लियोने, शेर्लिन चोप्रा यांच्यासारख्याचे फोटो त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात, तेव्हा हे फोटो कोणाच्या म्हणजे कोणत्या वयोगटातल्या मुलांच्या हातात पडत असतील याबद्दल कोणाला काळजी वाटते का? परफ्युम स्प्रेसारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये एका पुरूषाच्या मागे अनेक तरूणी बेभान होऊन जात आहेत अशा दृश्यांमधून कोणत्यामानसिकतेला खतपाणी घातले जाते या व अशा गोष्टींबाबत कोणी आवाज उठवलेला पाहण्यात आलेले आहे का? अशी
एकीकडे ही वस्तुस्थिती तर दुसरीकडे भगवी वस्त्रे लेयलेल्यांच्या समाजशुचितेच्या व योनीशुचितेच्या भलत्याच टोकाच्या कल्पना. अर्थात त्या मात्र सर्वांनीच हाणून पाडायच्या हे नेहमीचे ठरलेले.
स्त्रीच स्त्रीची वैरीण असे म्हणण्यापेक्षा आजच्या जगात स्त्रीही स्त्रीची वैरीण आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको.
मला सांगा, उत्तानतेचे जाहिर प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरी याबाबातचा शेवटचा गुन्हा केव्हा नोंदवला गेला व त्याबद्दल कोणाला शेवटची शिक्षा झाली?
स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचार करणार्यांच्या मानसिकतेचे समर्थन करण्याचा येथे अजिबात हेतु नाही. पण समाजात जे चालले आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, या समस्येच्या मुळाशी जी कारणे आहेत त्यांच्यापर्यंत न पोहोचता असे अत्याचार हा जो अंतिम परिणाम दिसतो आहे व वरचेवर दिसतो आहे आहे, त्याविरूद्ध दिशाहीन आरडाओरडा करण्यात समाधान मानणार आहोत का हे आपणच ठरवायचे आहे.
परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा निर्भया ज्योती सिंगच्या अल्पवयीन गुन्हेगाराला थोड्याशा शिक्षेनंतर सोडून देण्याबद्दल तावातावाने बोलत होत्या. कोणते व कसे कपडे घालावेत हे ठरवणे हा स्त्रिचाच हक्क आहे असे म्हणत आयोगाच्या त्यांच्या आधीच्या अध्यक्षाच पेहरावाबाबतच्या अशा अनिर्बंधतेचे समर्थन करत होत्या, याची नवीन अध्यक्षांना कल्पना आहे काय? तेव्हा वर मांडलेली दुसरी बाजुही त्यांच्यापर्यंत कधी पोहोचते, तिचे गांभिर्य त्यांच्या कधी लक्षात येते हे पाहू. त्यांच्याव्यतिरिक्त स्त्रियावरील अत्याचाराला जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी काही अशा वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या कारणांकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देते का ते पाहू.
स्त्रीदेहाचे माध्यमांमधील ओंगळ व अनवश्यक दर्शन याविरूद्ध काही दमदार पावले उचलली गेली तरीदेखील या दिशेने काही योग्य होत आहे असे समजता येईल. मी वर म्हटले तसे लैंगिक अत्याचारांना आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र येथे उहापोह केलेली कारणे मुळात त्यास जबाबदार नाहीच असे म्हणत हे वास्तव नाकारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, त्यामुळे कोणाचे कसे भले होणार आहे हा प्रश्न आहे.
+१
पुरुषांनी स्त्रियांकडे बघणं ही भावना जशी नैसर्गिक आहे तशी येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही पुरुषाला लाईन न देणं, (भाजी निवडल्यासारखं) चूझी असणं ही स्त्रियांची भावना नैसर्गिक आहे. एखादा पुरुष आपल्याकडे बघत असेल आणि आपल्याला ते समजूनही आपण त्यावर आक्षेप घेतला नाही तर त्यातून आपण त्या पुरुषाला काही संकेत देत आहोत, असा अर्थ बहुतेकदा दोन्ही बाजूंनी लावला जातो. जर त्या स्त्रीला त्या पुरुषात रस नसेल तर त्याला हुडूत् करणं हे काही प्रमाणात नैसर्गिक आणि काही प्रमाणात सामाजिक कंडीशनिंग आहे. ("तू का त्याला बढावा दिलास?", "सातच्या आत परत का आली नाहीस", "तू थोडी काळजी का घेत नाहीस?" छापाची वाक्यं नवीन नाहीत.)
गब्बर मोड ऑन : (न आवडलेल्या) पुरुषाला हुडूत् करणं हे त्या मुलीचं/स्त्रीचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. सभ्य समाजाने हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य केलंच पाहिजे.
स्त्री ही भोगवस्तू* समजणे
स्त्री ही भोगवस्तू* समजणे म्हणजे नक्की काय?
तिर्हाईत स्त्रीला भोगवस्तू न समजता आणखी काय समजणे अपेक्षित आहे? [एकाच स्त्रीला कधी हुषार व्यक्ती, कधी कर्तबगार व्यक्ती आणि कधी ऑब्जेक्ट ऑफ डिझायर समजता येणे शक्य नाही का?]
*बळजबरीने कोणतीही कृती करण्यास माझा विरोधच आहे.
तिर्हाईत स्त्रीला भोगवस्तू न
तिर्हाईत स्त्रीला भोगवस्तू न समजता आणखी काय समजणे अपेक्षित आहे? [एकाच स्त्रीला कधी हुषार व्यक्ती, कधी कर्तबगार व्यक्ती आणि कधी ऑब्जेक्ट ऑफ डिझायर समजता येणे शक्य नाही का?]
मला वाटतं तुम्ही प्रश्न विचारून कंसातच लगेच उत्तरही दिलेलं आहे. वस्तुकरणाच्या बहुतेक तक्रारींमध्ये 'निव्वळ वस्तुकरण' यालाच आक्षेप असतो. समाजात जर इतरही रूपं दिसली तर वस्तुकरण योग्य प्रमाणात आल्याबद्दल हरकत राहाणार नाही.
मेघनाने बेख्डेल टेस्टविषयी लिहिलेलं होतं. त्या चर्चेतही तसाच मुद्दा होता.
परवानगी!!!! मागितलीये कोणी?
परवानगी!!!! मागितलीये कोणी? कोणाकडे?
स्त्रीयांना व पुरूषांनाही कोणते कपडे घालावे अगर घालु नये यासाठी परवानगी मागायचे दिवस न येवोत ही सदिच्छा! (आधीच ड्रेस कोडच्या नावाखाली काही कंपन्यांत या स्वातंत्र्यावर अतिक्रमण चालु असते. आता आणखी इतर समाजात ते लोण न पसरो)
ड्रेसकोड
आधीच ड्रेस कोडच्या नावाखाली काही कंपन्यांत या स्वातंत्र्यावर अतिक्रमण चालु असते.
माझ्या पहिल्या नोकरीपासून नेहमी ड्रेसकोड बघत आलो आहे. स्त्रियांना आणि पुरुषांना पण. (उदा: जीन्स पँट चालणार नाही, टीशर्ट घालायचा तर बिनकॉलरचा नको इ.) तुमच्या मते कंपन्यांमध्ये असणारा ड्रेसकोड अयोग्य आहे का? हे अतिक्रमण आहे का?
तुम्हाला जर ड्रेस कोड अयोग्य
तुम्हाला जर ड्रेस कोड अयोग्य वाटत असेल तर स्वताची कंपनी काढा.
कंपनीत जायलाच पाहिजे असे काही तुमच्यावर बंधन नाही. कुठल्याही कंपनीत मी जाईन आणि मला पाहीजे तसाच वागीन असा मुलभुत हक्क आहे असे घटनेत लिहीलेले नाही.
गेल्या काही आठवड्यात ऐसी अक्षरे नावाच्या कंपनीत पण एक जण "मी मला पाहिजे तो धागा काढीन/ कीतीही काढीन" असे म्हणत घुसला होता, पण ऐसी च्या मालक्/ संपादकाने त्यांना पाहीजे तसाच ड्रेस त्या आयडीला घालायला लावला. वर काही जणांनी तुम्ही स्वताचे संस्थळ का काढत नाही असा प्रश्न पण विचारला होता.
आणि नॅचरल सुंदर नसणार्यांना?
आणि नॅचरल सुंदर नसणार्यांना? किंवा नॅचरल सुंदर असून आपलं शरीर दाखवण्याची आवड ज्यांना आहे, त्यांना?
बाकी विचार करायचा असेलच, तर -
- तशी लग्नाचीही गरज नाही. नुसता शरीरसंबंध ठेवला तरी आनंद मिळतो / मुलं होतात.
- तशी कुणीच कपडे घालण्याची गरज नाही, नुसतं योग्य आडोशाला राहिलं तरी हवामानापासून संरक्षण होतं.
... यादी कितीही वाढवता येईल. पण हे झेपतं का बघा. तर पुढे जाऊ.
हेमंतराव, एका दुसर्या
हेमंतराव,
एका दुसर्या बाजूकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो.
१) व्हॅल्यु जजमेंट - तुम्हाला पुण्याहून दिल्लीला जायचंय की मुंबई ला जायचंय की इटानगर ला जायचंय ? तुम्हाला चित्रकला बघायला आवडते की नृत्य पहायला की शिल्पकला पहायला ?
२) सायंटिफिक जजमेंट - तुम्ही पुण्याहून दिल्लीला कार ने जाणार की विमानाने की ट्रेन ने ? तुम्हास चित्रकला बघायची तर तुम्ही चित्रकला प्रदर्शनात पाहणार की चित्रं विकत घेऊन पाहणार की इंटरनेट वर मोफत पाहणार (उदा. images.google.com वर).
सर्वसामान्यपणे लोकशाहीत दुसर्या/तिसर्या व्यक्तीस थेट त्रास होत नसेल तर "व्हॅल्यु जजमेंट" हे आक्षेपार्ह मानले जाऊ नये असा विचार असतो. व हेच स्वातंत्र्य तुम्हासही दिलेले आहे. सर्वसाधारणपणे पुरुषांवर जेवढी बंधने आहेत त्याच्या अनेकपटीने जास्त बंधनं स्त्रियांवर आहेत. जेवढी बंधने जास्त तेवढे स्वातंत्र्य कमी. व म्हणून या सांस्कृतिक्/सामाजिक बंधनांविरोधी विचार मांडले जातात. वरच्या एका प्रतिसादात तुम्ही तोकडे कपडे घालण्याची गरजच काय आहे स्त्रियांना असा प्रश्न विचारलेला आहे. एखाद्याला नृत्य शिकायची गरजच का वाटते ? शिल्पकला पहायची गरजच का वाटते ? उत्तर - ज्याचा त्याचा विकल्प.चॉइस. हेच नेमके व्हॅल्यु जजमेंट च्या संकल्पनेनुसार नुसार चालते.
स्त्रियांच्या तोकड्या कपड्यांवरच आक्षेप घ्यावासा तुम्हास का वाटतो ? एखाद्या स्त्री ने तोकडे कपडे घातले तर तुम्हाला नेमका कोणता त्रास होतो ? अनेक रस्त्यांवर जी घाण असते (जिच्यामुळे तुमच्या व इतरांच्या सुद्धा आरोग्यावर थेट परिणाम होतो) तिच्यावर आक्षेप घ्यावासा का वाटत नाही ? याचे उत्तर एकच - तुमचा विकल्प/तुमचा चॉईस.
बायकांनी लांब कपडे घालावेत
बायकांनी लांब कपडे घालावेत ह्याची काही ठोस कारणे तुमच्या माहितीत आहेत काय? असल्यास कृपया सांगावीत.
कोल्हटकरजी, वाद हा तोटक्या कपड्यांविषयी आहे. त्यावर बोला. ज्या मुद्यावर वादच नाही, त्याबद्दल बोलू नका. कोणी स्त्री अंगभर कपडे घालीत असेल, तर कोणीही आक्षेप घेत नाही. घेण्याचे कारण नाही.
बायकांच्या कपड्यांच्या मापात शिरायची तुम्हांला काय गरज आहे.
बायकांच्या कपड्यांच्या मापात शिरायची कोणालाही हौस नाही. आपली ‘मापे’ दाखविण्याची बायकांनाच एवढी का हौस आहे, या प्रश्नाचे उत्तर दिल्यास ही चर्चा सार्थकी लागेल.
कपडे -- तेजा
कपड्यांचं काय की बाबा .
.
.
पण तेजा ह्यांच्या प्रोफाइलमध्ये http://www.aisiakshare.com/user/615 इथं अशी माहिती दिसली :-
छंद
मुलीन्शी गप्पा झोड्णे.
व्यवसाय
फुगे विकतो. खासकरून मुलींना.
तुम्ही विषयांतर करीत आहात.
तुम्ही विषयांतर करीत आहात. ‘टिव्ही सिनेमात कोणी तोकडे कपडे वापरीत नाहीत..’ असे ठोस विधान तुम्ही केलेत, म्हणून ही लिंक दिली. या फोटोतील कपडे तोकडे नाहीत, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, असे कपडे लेकी-बाळींनी वापरणे चांगले आहे, असे आपले मत आहे काय?
.................
ब्लॉगच्या जाहिरातीचा मुद्दा गैरलागू आहे. बहुतांश ऐशीकरांना हा ब्लॉग आधीच माहिती आहे. ऐशीवर त्याची चर्चाही झालेली आहे.
या फोटोतील कपडे तोकडे नाहीत,
या फोटोतील कपडे तोकडे नाहीत, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, असे कपडे लेकी-बाळींनी वापरणे चांगले आहे, असे आपले मत आहे काय?
होय आणि होय.
हे कपडे चांगले, व्यवस्थित आहेत आणि ज्यांना हवे त्यांनी असे कपडे वापरावेत. लेकीबाळींनीच कशाला, लेकाबाळांनी असे कपडे वापरले तरीही माझं काहीही म्हणणं नाही. लोकांच्या कपड्यांवर निर्बंध आणण्याच्या बाजूने बोलण्यासाठी मी काही किम जोंग उन (का सावली, सॉरी, राहवलं नाही) नाही.
आपले विधान खरोखरच दुर्दैवी
आपले विधान खरोखरच दुर्दैवी आहे. बायकांना बुरख्यात डांबून ठेवणे जसे वाईट आहे, तसेच बिकिन्या किंवा थाँग असल्या चिरगुटांना वस्त्रे म्हणून मिरविणे, त्यांची प्रतिष्ठा वाढविणे वाईट आहे. कपडे हे अंग झाकण्यासाठीच असतात, अंग दाखविण्यासाठी नाही. हा आमचा विचार आहे. तो आम्ही मांडीत राहू. एक दिवस तुम्हाला आमचा हा विचार पटेल, अशी आशा करतो आणि तूर्त थांबतो.
बाकी काही असो, मेघनाला 'गंमत
In reply to या सगळ्या धाग्यावर by मेघना भुस्कुटे
बाकी काही असो, मेघनाला 'गंमत आणि तिरकेपणा बाजूला ठेवून' मनापासून, सरळसरळ बोलण्यासाठी एक स्वतंत्र मोड घ्यावा लागतो हे रोचक वाटलं.