वीणा माहेरी जाते

वीणा - प्र ए प्र. ऐक ना. इकडे बघ ना जरा.

<प्र चं लक्ष नाही. आतापर्यंत संसारात बायकोचा आवाज कानाआड करून तंद्री लावण्यात तो तरबेज झाला आहे.>
.
वीणा - प्र SSSSSS अरे मी तुझ्याशी बोलतेय.
.
प्र <दचकुन> - बोल ना ऐकतोय मी. जरा असाच विचार करत होतो. पण विशेष काही नाही तू बोलत रहा.
.
वीणा - उम्म्म आम्हाला माहिते स्वारीच्या मनात काय विचार चाललाय तो. कल्पनेतही माझा विरह सहन होत नाही ना राजा? मग माहेरी जाणं स्थगितच करू का गडे?
.
प्र <आता खरच फारच दचकुन> - आँ नको नको अगं जाउन ये तू. आणि हे बघ सावकाशीन ये. मी स्वार्थी वाटलो का तुला की माझ्या सुखासाठी माहेरी जायला तुला बंदी घालीन? आणि मंजुळा आहेत ना आपल्या स्वयंपाकॆण बाई हां त्या करून घालतील मला. हाकानाका.
.
वीणा - <उगाचच तिरसटुन> हूं त्या मंजुळेला मेलीला मी १५ दिवसाची भरपगारी रजा दिलीये. तुला तुझाच बघावं लागेल बघ. हातानीच रांधावं लागेल.
.
प्र <मनातल्या मनात अरेरेरे!! घातला का बिब्बा! पण उघडपणे > अगं त्यात काय लग्नापूर्वी नाही मी हातानेच रांधायचो. तू आलीस अन लाडावून ठेवलास बघ. रोज सम्मोर गरमागरम .....
.
वीणा - <लाजून लाल होत> इश्श्य!!! चावट कुठला. अशा गोड बोलण्यानं पाय निघेल का माझा?
.
प्र . - <डोळे मिचकावत> आँ मी काय ब्वॉ चावटपणा केला? पण रांधेन मी.
.
वीणा - <नजरेतून कौतुक ओसंडून वहात) कसा गं समजुतदार आहे माझा प्रिया. पण एक मुळी आमचं ऐकायचं हां त्या नानु भावजी बरोबर उंडारायला मुळ्ळी मुळ्ळी जायचं नाही.संध्याकाळी आल्यावरती पीत सुटायचं नाही. तब्येत जपायची. gallary ta फार वेळ उभं राहून येणारी जाणारी 'हिरवळ' बघात बसायचं नाही. अरबट चरबट चरत सुटायचं नाही. ऐकशील ना सख्या?
.
प्र - अगं म्हणजे काय? नानू ना हां तो तर कामानिमित्त बदलापूर ला गेलाय अन पिण्याचं म्हणशील तर माझा कधी तोल सुटतो का?
.
वीणा - तोल सुटतो का म्हणे , पहिल्या ग्लासानंतर काय काय झालं तुला लक्षात राहील तर ना. ते एक असोच. मी बघ अश्शी गेले अन अश्शी आले.
.
प्र - अगं निघ तू राणी ऊशीर होतोय तुला.

<प्र ची वीणा वेळ खात खात शेवटी निघून गेल्यावर प्र फक्त लेझीम घेउन नाचायचा बाकी रहातो. लग्गेच नानू ला फोन लावतो . >
.
प्र - अरे नान्या या शनिवारी maTini टाकू लेका. नंतर जोरकस पार्टी हां एकदम ओली पार्टी without सोडा काय. अन मग रात्री एखाद्या बारमध्येच "मंगळागौर" जागवायची. आणि मग रविवारी दुपारी ....अरे त्यापेक्षा या वीकेंडला गोवाट्रीप करु यात का? काय ती बीचवरची गर्दी ..... हाय!! नान्या नान्या तुला सांगतो ....
.
नानू - अरे हो हो हो. झालं काय? असा चेकाळलायस का ?
.
प्र - नान्या नान्या मी १५ दिवस गावाला सोडलेला वळू आहे. माझी गरीब गाय तेजायाला क्वचित शिंग ही उगारता येतात बरका तिला, ते एक असोच हां तर गाय गेलीये माहेराला.

<शीळ घालत> गोमू माहेराला जाते हो नाखवा , तिच्या घोवाला फेणी ही पाजावा ... आजादी वरचा हा "पुलाव खयाली' यांचा शेर ऐक. बरं का इर्शाद है ... "जश्न -ए- आझादी ए बर्क-ए-तूर-ए-सफीना ..."

<इतक्यात सुटकेस घेउन वीणा परत येते. प्र तीन ताड उडतोच आणि फोन ठेऊनच देतो >
.
प्र - अगं तू गेली होतीस ना?
.
वीणा - नाही रे प्रटुल्या मी नाही जाउ शकत तुला सोडून . असं करते आईलाच बोलावून घेते. मी काही ऐकणार नाही तुझं. चेहरा बघ लब्बॉडाचा कसा पडलाय. तू नको गुन्हेगार वाटून घेउ हा निर्णय मीच घेतलाय. मी इथेच रहाणार, आणि दिवसरात्र तुझी सेवा करणार. हस पाहू आता.

<तिकडे नानू ने केलेला फोन वाजत रहातो. प्र डोक्याला हात लाउन मटकन पलंगावर बसतो अन वीणा त्याचं डोकं चेपू लागते.>

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

कल्पणा छाणे, पण जरा ओल्ड फ्याशन्ड झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरय. आता वाटतं की संस्थळ/फेसबुक/व्हॉटसॅप वगैरे वरची भरारी घालून खुसखुशीत अन आधुनिक करता आलं असतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधुनिक म्हणजे फक्त तंत्रज्ञान आधुनिक घातलं असं कसं चालेल?

दोघंही आपापल्या उद्योगांमध्ये आहेत. पण हे दोघे वायझेड आहेत. म्हणून दोघे एकमेकांना सरप्राईज म्हणून सुट्ट्यांचं बुकिंग करतात. तुझं बुकींग का माझं बुकींग यावरून भांडतात. मग बदला म्हणून हे दोघे भलत्याच लोकांशी (बाई, बुवा, क्विअर कोणीही आणि कितीही चालतील) पोचट-पांचट रोमँटिकपणा करतात. त्यामुळे पकून सगळे नवे भलते लोक यांना वाटेला लावून देतात. त्यामुळे चुकलेला मुल्ला मशीदीत आल्याप्रमाणे हे दोघेही शेवटी एकमेकांशी जोडून घेतात असंतरी काही येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉलिड!!! Smile हे मला सुचलच नसतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं करते आईलाच बोलावून घेते.

बोंबला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोंबला.

ऑ बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता यातलं ललित वगैरे समजलं नाही तर मला डॅाक्टरलाच दाखवतो.मौजमज्जातला एक ज राहिलाय काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झ्याक . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'प्र'धागे वर आल्यावर त्या निमित्ताने शुचिमामींनी नवा आयडी काढायची हौसही भागवून घेतलेली दिसतेय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या शुचि आय डी चे पास्वर्डच रिसेट करता येत नाहीये. अदितीला फोन करेन नंतर. I am not getting email Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0