बिलिंदर राणी
लेक लेकीची
बिलिंदर राणी
पंधरा दिवसाची छकुली
शोभते सर्वांची नानी.
मोठे-मोठे डोळे तिचे
पोपटासारखे नाक
हिमाचली चेहरा तिचा
गोरे-गोरे गाल.
सकाळी सकाळी
गोड -गोड झोपते
आपल्या नानाला
किसी किसी देते.
आत्या म्हणते
गुडीया प्यारी
मावशी म्हणते
बाळ गुणी.
शेजारी म्हणती
किती -किती शांत
लोभस गोंडस
पटाईतांची नात.
डिप्लोमेट
राणी गालात हसते
सर्वांना अशी
मूर्ख बनविते .
रात्र झाली कि
खरे दात दाखविते
आईला आपल्या
रातभर जागविते .
कुशीत नानीच्या
घरभर फिरते
जरा थांबता
टाहो फोडते.
मला पाहून ती
डोळा मारते
माय लेकींची
कशी जिरवली.
लबाड आमची
बिलिंदर राणी
नानांची तिची
गट्टी जमली.
प्रतिक्रिया
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन पटाईत जी.
अभिनंदन पटाईत जी.
अभिनंदन आजोबा.
अभिनंदन आजोबा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अभिनंदन. कविताही गोड. पण
अभिनंदन. कविताही गोड. पण चांगल्या बर्फीसारखी, म्हणजे अतिगोड नाही.
सर्वांनाच धन्यवाद.
सर्वांनाच धन्यवाद.