सेन्सॉर कधी सुधारणार ?
नुकताच spotlight हा ऑस्कर विजेता चित्रपट पाहिला. पण तो 'फक्त प्रौढांसाठी' का आहे ? खरच हा विनोद मला अजूनही कळलेला नाहीये (सेन्सॉर चा). या चित्रपटाला सरळ U सर्टिफिकेट दिले तरी चालेल ईवन द्यायला हवे. मी पाहिलेल्या प्रौढ चित्रपटांमध्ये या चित्रपटावर सगळ्यात जास्त अन्याय झाला आहे . (अबाऊट सर्टिफिकेट ) . काय कारण असावे ? का child molestation हे दोन शब्द ऐकूनच यांनी सरळ A दिले ? म्हणजे एकीकडे मुलांना या गोष्टीपासून सावध करावे यासाठी प्रयत्न होतात आणि हे दुसरीकडे हे असे करणार ? strange way of सेन्सॉर.
बाकी सिनेमा खूप आवडला. इंट्रो जेवढी माहीत होती त्यावरुन ही नीरस डॉक्युमेंटरी होईल वाटले होते. पण सिनेमाने शेवटपर्यंत खिळवून आणि गुंतवून ठेवले. हा सिनेमा धर्मसंस्थेचे वास्तव , ते मनात खोलवर रुजलेले , मीडिया , कायदा आणि व्यवस्थेची भूमिका , श्रद्धेला जाणारे तडे . मान्य न करण्याची इच्छा अशा अनेक गोष्टीवर भाष्य करतो. आशयदृष्टया खूपच चांगला आहे. बघायला हवाच .
>>हा सिनेमा धर्मसंस्थेचे
>>हा सिनेमा धर्मसंस्थेचे वास्तव , ते मनात खोलवर रुजलेले , मीडिया , कायदा आणि व्यवस्थेची भूमिका , श्रद्धेला जाणारे तडे . मान्य न करण्याची इच्छा अशा अनेक गोष्टीवर भाष्य करतो.
यामुळे कोवळ्या मनाच्या मुलांमध्ये धर्माविषयी अप्रीती नै का निर्माण होणार? म्हणून A सर्टिफिकेट.
सविस्तर लिहीन
खरे तर आपल्या सेन्सॉर ने बर्याच वेळेला असे काही चुकीचे आणि झापडबंद निर्णय घेतले आहेत. त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी याचा आधार घेतला होता. जरी इथे म्हणल्याप्रमाणे अमेरिकेत सुधा तो restricted असेल तरी ते माझ्या मते चूक आहे . कारण यात मुलांनी बघू नये अस खरच काही मला जाणवले नाही . काही जणांना त्यातील धर्माच्या वापरबद्दल कुतूहल आणि गैरसमज जाणवत आहे . सिनेमाबद्दल ही कुतूहल आहे . सिनेमा मला आवडलेला आहे. त्यावरती सविस्तर लिहिण्याचा विचार आहे. पण समीक्षेत पहिलाच प्रयत्न असल्याने थोडा वेळ लागेल.
मला पण काही आक्षेपार्ह वाटले
मला पण काही आक्षेपार्ह वाटले नाही. चित्रपट तर सुंदरच आहे यात वादच नाही. मला वाटतंय चित्रपटात काही शब्दांच्या वापरामुळे (ब्लोजॉब , इंटरकोर्स इत्यादी) त्याला अ प्रमाणपत्र दिलं असावं. बाकी दृश्य स्वरूपात तरी काहीही वाकडं लावण्यासारखं नाही. उलट पौगंडावस्थेतील मुलांनी पाहायलाच हवा.
संथ पण शहारे आणणारं पार्श्वसंगीत, आणि साधेसरळ , पण स्पष्ट आणि नेमके संवाद, नैसर्गिक अभिनय, आणि गंभीर विषयाची मांडणी करताना ती अधिक नाट्यमय करण्याचा टाळलेला मोह.सगळंच उत्तम जमून आलंय. चित्रपट जास्तीत जास्त वास्तवदर्शी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरलाय.
प्रुडिश
अमेरिकेत - MPAA: Rated R for some language including sexual references
Sweden:7 / Switzerland:12 / UK:15
हा काही प्रमाणातला अमेरिकन प्रुडिशपणा वाटतो. माझ्या मते १२-१५ वर्षांच्या मुलांना हे दाखवण्यात काहीच अडचण नसावी. चित्रपटात बाललैंगिक शोषणाची तपशीलवार वर्णनं आहेत. उदा. मी मुखमैथुन केलं (ब्लो जॉब), त्यानं माझ्या लिंगावर हात ठेवला, वगैरे. ही वर्णनं कापणं योग्य नाही, कारण त्यामुळे घटनेचं गांभीर्य कमी होतं. (उदा. "माझ्या वडिलांनी नुकतीच आत्महत्या केलेली होती. सांत्वनासाठी धर्मगुरू घरी आलेला होता. 'आइसक्रीम घेऊन देतो' म्हणून तो मला कारमधून घेऊन गेला. आणि मग त्यानं माझ्या लिंगावर हात ठेवला.")
चित्रपट पाहावा अशी माझी शिफारस.
+
चित्रपट अतिशय आवडला. आधी चित्रपटाबद्दल काहीच कल्पना नव्हती. इथला लेख आणि आणि एका एका मित्राच्या शिफारशीवरून मागच्या रविवारी पाहिला.
चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. जसजशी केस उलगडत जाते तसतसा काम करणाऱ्या पत्रकारांवर कसा परिणाम होत जातो हे फार सुंदर दाखवले आहे. अधुनमधून आजीबरोबर चर्चमध्ये जाणारीला आता जावेसे वाटत नाही, किंवा एक संशयित शोषक पाद्री अगदी घराजवळच राहणारा आहे हे कळल्यावर होणारी चलबिचल वगैरे, लहानपणी आवडीने चर्चमध्ये जाणाऱ्याला आता ख्रिसमसच्यावेळी 'सायलेंट नाईट' गाण्याचा सराव करणारी मुले पाहून काय वाटते हे फार छान दाखवलेय. साशा पायफरच्या भूमिकेतली रेचल मॅकअॅडम्सही फार आवडली. :)
चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहे ही गोष्ट पत्रकारितेबद्दल विश्वास वाढवणारी आहे. चित्रपटाचा ट्रेलर इथे पाहता येईल.
सर्टिफिकेट
A सर्टिफिकेट म्हणताय म्हणजे बहुधा भारतीय सेन्सॉरबोर्डबद्दल बोलताय, असा अंदाज.
मी हा चित्रपट बघितला आहे. त्याला अमेरिकेत R (Restricted) सर्टिफिकेट आहे. R सर्टिफिकेट = 'फक्त प्रौढांसाठी'