Skip to main content

बुधाचे अधिक्रमण

बुध हा ग्रह या क्षणाला सुर्यावरून जात आहे. त्याचा टिपलेला एक क्षण खाली देत आहे. नीट दिसावा या करता फोटोवर संस्कार करून तीन वेगवेगळे फोटो दाखवत आहे.

तांत्रिक माहिती: ३०० मिमि, १/२०००, ५.६. घरगुती सोलार फिल्टर.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

.शुचि. Mon, 09/05/2016 - 22:27

सॉलिड. कसला लहान लाल स्पॉट टिपलाय. फोटो आवडला. मुख्य ऐसीवर किती वेगवेगळ्या बौद्धिक/सामाजिक स्तरातील लोकांची विविधता आहे आणि जी वाढतच आहे ते पाहून छान वाटले.
.
पण २ लाल स्पॉटस दिसतायत :( तो दुसरा काय आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/05/2016 - 22:31

शुचि, आता सूर्यासाठी चांगलं फेस क्रीम सुचव बघू. चेहेऱ्याचं तापमान एकसारखं टिकवता येत नाहीये आणि त्यावर आणखी तो एवढासा चिंटूसा ग्रह अतिक्रमण करतोय.

राजेश घासकडवी Mon, 09/05/2016 - 23:04

फोटू आवडले.

धाग्याचं शीर्षक मी आधी 'बुधाचे अतिक्रमण' असं वाचलं. पण असल्या काहीतरी चमचमीत गोष्टी सोडून काहीतरी वैज्ञानिक आहे हे पाहून थोडा नाराज झालो.

बायदवे, हे फोटो काढताना नक्की किती मध्यमवर्गीय मेले याची काही मोजदाद?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/05/2016 - 23:11

In reply to by राजेश घासकडवी

शीर्षक मी आधी 'बुधाचे अतिक्रमण' असं वाचलं. पण असल्या काहीतरी चमचमीत गोष्टी सोडून काहीतरी वैज्ञानिक आहे हे पाहून थोडा नाराज झालो.

शनि किंवा मंगळ सोडून बुधाला जरा जास्त भाव मिळतो हे बघून तुमच्यासारखे परंपरावादी नाखूष होणारच. पण विज्ञान वाचत जा थोडं. वाचायचं असेल तर वैज्ञानिक लेखन वाचा, 'हे लोक वाईट आहेत, ते लोक वाईट आहेत', असलं डॉकिन्सछापाचं नका वाचू. ISO प्रमाणित वैज्ञानिक लेखन शोधा.

चिमणराव Wed, 11/05/2016 - 06:38

आवडीचा विषय.मागे राहूने सूर्याला गिळले याचे फोटो काढले असतील तर तेही द्या.
तुमच्याकडे टेलिस्कोप असेल तर मोबाइलचं छोटं लेन्स 'आइपीस'समोर धरता येतं.EXIF data ही फोटोबरोबर जातो.

आदूबाळ Wed, 11/05/2016 - 18:15

या निमित्ताने ल्यापटापचा स्क्रीन पुसणं झालं.

अवांतरः कॉमिक सान्स वापरणार्‍यांना कीबोर्डान्त प्रायश्चित्त द्यायला पाहिजे.