यक्ष प्रश्न - भस्मासुराला वरदान देणारे

भस्मासुराची कहाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे. तरीही थोडक्यात सांगतो. भस्मासुराने उग्र तपस्या केली. महादेव प्रसन्न झाले. भस्मासुराने वरदान मागितले, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होईल. महादेवाने पुढचा काहीच विचार न करता तथास्तु म्हंटले. भस्मासुराने महादेवाने दिलेल्या वरदानाचा प्रयोग महादेवावारच करण्याचे ठरविले. महादेवाला स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. महादेवाने भगवान विष्णूंचा धावा केला. भगवंताने मोहिनी रूप धारण केले. स्वत:च्याच डोक्यावर हात ठेऊन भस्मासुर भस्म झाला. इति.

भस्मासुराची कथा काल्पनिक असली तरी त्यात सर्वकालिक सत्य दडलेले आहे. प्रेमाने डोक्यावर हात फिरविणार हा नेहमीच तुमचा हितैषी नसतो, कधी-कधी भस्मासुर हि प्रेमाने डोक्यावर हात फिरवितो. तुम्हाला आमिष दाखवितो, तुमची महत्वाकांशा पूर्ण करण्यास मदत करतो. स्वाभाविकच आहे, पुढचा मागचा विचार न करता, तुम्ही हि त्याची मनोवांच्छित इच्छा पूर्ण करालच. पण भविष्यात भस्मासुरी हात तुमच्या डोक्यावर पडला तर तुम्हाला कोण वाचवेल. महादेवाला वाचविण्यासाठी भगवंताने मोहिनी अवतार घेतला पण या कलयुगात तुम्हाला वाचविण्यासाठी कुणी हि येणार नाही. परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील.

पण जेंव्हा महत्वाकांशा आणि स्वार्थाचा चष्मा डोळ्यांवर चढलेला असतो, भस्मासुराला मदत करण्याचे भविष्यात काय परिणाम होणार हे दिसत नाही. राजा प्रमुखांची महत्वाकांशा मोठी असते, ती पूर्ण करण्यासाठी भस्मासुराची हि मदत घेण्यास ते कचरत नाही. असा आपला इतिहास आहे. पण ज्या -ज्या राज प्रमुखांनी भस्मासुरांची मदत घेतली, त्यांना त्याचे फळ हि भोगावे लागले. भस्मासुरांच्या हातून ते तर भस्म झालेच पण प्रजेला हि त्याची मोठी किंमत मोजावी लागली. असो.

सामान्य माणसांच्या बाबतीत, म्हंटल तर त्यांच्या काही मोठ्या महत्वाकांशा नसतात. काही लोक थोड्या भौतिक सुखासाठी, काही मान-सम्मान किंवा प्रमोशनसाठी भस्मासुरांची मदत करतात. काही लोक तर केवळ दबावाला बळी पडून भस्मासुरांची मदत करतात. अश्या लोकांच्या इच्छित महत्वाकांशा बहतेक पूर्ण होतात हि. पण जेंव्हा भस्मासुराचा हात त्यांच्या डोक्यावर पडतो, त्यांना आपला प्राण हि गमवावा लागतो. पण त्यांच्या करणीचे परिणाम इतरानाही भोगावे लागतात, त्याचे काय. ???

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.25
Your rating: None Average: 2.3 (4 votes)

प्रतिक्रिया

आवडले. आपला आपला भस्म्या + भस्मासुर डोळ्यांसमोर ऊभा राहीला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या डोक्यावर्,लहानपणीच भस्मासुराने हात ठेवला. पण त्यांत माझे भस्म न होता, मला भस्म्या रोग जडला. तेंव्हापासून माझ्यासमोर कितीही अन्न ठेवले तरी त्याचे भस्म होऊ लागले. वजन वाढण्याचे तेच खरे कारण असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त सविस्तरपणे सांगता का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

रेड बुल साहेब, भस्मासुर म्हणजे कोण. विचार करा. आपल्या देशातल्या कुठल्या राज प्रमुखांनी भस्मासुरा वर हात ठेवले. त्याचा परिणाम काय. देश्यात गेल्या १० वर्षात काही घटना घडल्या, त्यांचा अंदाज करून पुन्हा एकदा वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे एकदा जनता पक्ष नावाच्या राज्यकर्त्यांनी जनसंघ नावाच्या भस्मासुराला अभय दिलेले आठवते आहे.

वसंतराव नाईक यांनी शिवसेना नावाच्या भस्मासुराला पोसल्याचे आठवते आहे.

शिवाय आता मोदी हे विविध साध्वी, साधू, महंत, बाबा हे भस्मासूर पोसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.