अजब खटला - गी द मोपासां

मोपासां

अजब खटला - गी द मोपासां

(गिरगाव पोलिस कोर्टात बायकोने केलेल्या फिर्यादीची सुनावणी)

- रूपांतर - शरद मंत्री

या रूपांतराचे हक्क शरद मंत्री यांच्या वारसांकडे आहेत. अंकात पुनर्मुद्रणासाठी परवानगी घ्यावी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. वाचकांपैकी कुणालाही मंत्री यांच्या वारसांशी संपर्क साधणे शक्य असल्यास कृपया आम्हांला कळवा.

---

आपल्या नवऱ्याने आषाढी अवसेला रात्री पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवून आपला खून करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार सौ. आवडाबाई श्रीधर जाधव हिने गिरगाव पोलिस चौकीत केली. श्रीधर दगडू जाधव आणि शुक्रदेव इंद्रजित परळकर यांना आज पहाटे सहा वाजता पोलिसांनी अटक केली. आज दुपारी मॅजिस्ट्रेट अशोक विक्रमादित्य यांचे समोर फिर्याद मांडण्यात आली. त्याची हकिकत अशी :

'कोर्टात प्रथम सौ. आवडाबाई श्रीधर जाधव यांनी जबानी दिली. त्या म्हणाल्या, "आखाडीला म्हणजे आषाढ अमावस्येच्या रात्री नऊ वाजता माझे यजमान श्रीधर दगडू जाधव हे त्यांचे मित्र शुक्रदेव इंद्रजित परळकर यांना घेऊन घरी आले. दोघेही चिक्कार तर्र झाले होते. त्या अमावास्येला आम्ही गटार अमावास्या म्हणतो. तेव्हा ते दोघे गटारात न पडता घरी कसे आले याचेच मला आश्चर्य वाटले. माझा नवरा म्हणाला, "आवडे, आमची पैज लागली आहे. तुझ्या देहाच्या आकाराएवढी घनफूट दारू हा परळकर आज पिऊन दाखवणार आहे. नाही प्यायला तर तो मला शंभर रुपये रोख देणार आहे. तो काय पितो? आताच त्याला शुद्ध नाही. तेव्हा तो हरणार. आपल्याला शंभर रुपये मिळणार." मलाही परळकरची ताकद माहीत होती. तेव्हा माझ्याही तोंडाला पाणी सुटले. शंभर रुपये जिंकावे म्हणून माझ्या नवऱ्याने जे-जे सांगितले त्याला मी कबूल झाले. आता माझ्या शरीराचे घनफळ कसे काढायचे हा प्रश्न आला. त्यावर माझ्या नवऱ्याने असे सुचवले की आमच्या घरात पाणी साठवण्याची जी मोठी साठ आहे तीत काठोकाठ पाणी भरून तीत मला विवस्त्र बुडवायचे. जे पाणी बाहेर सांडेल ते साठीखाली मोठी परात ठेवून त्यात साठवून घ्यायचे. ते पाणी दारूच्या ७५० मिलिलिटर मापाच्या बाटलीने मोजायचे. त्यातून जेवढ्या बाटल्या भरतील तेवढी दारू माझ्या नवऱ्यानं परळकरला पाजायची. तो पिऊ शकला नाही तर त्याने रोख शंभर रुपये माझ्या नवऱ्याला द्यायचे. मला नवऱ्याने विवस्त्र केले. नंतर नवऱ्याने माझे दोन्ही पाय धरले, परळकराने डोके धरले व परातीत ठेवलेल्या पाण्याच्या साठीत दोघांनी मला बुडवले. माझे डोके पाण्याच्या बाहेर होते ते नवऱ्याने पाण्यात ढकलले. मी गुदमरून ओरडू लागले, तेव्हा दोघांनी मला बाहेर काढले. पुढे काय झाले ते मला माहीत नाही. तोपर्यंत नवरा व परळकर घरातून निघून गेले होते. माझा आरडाओरडा ऐकून शेजारीपाजारी धावत आले. शेजाऱ्यांच्या सल्ल्याने काल रात्री बारा वाजता मी गिरगाव पोलीसचौकीवर तक्रार नोंदवली. नंतरचे मला काही ठाऊक नाही."

नंतर आरोपी क्रमांक एक, श्रीधर दगडू जाधव याची जबानी झाली. ती अशी : "माझी बायको नाकातोंडात पाणी गेल्यामुळे कावरीबावरी झाली, म्हणून मी व परळकर दोघेही घाबरलो. आम्ही तिला वर ओढून काढले व पलंगावर नेऊन झोपवले. नंतर आम्ही साठ बाजूला करून परातीत साचलेले पाणी दारूच्या ७५० मि.लि.च्या बाटलीच्या मापाने मोजले. माझी बायको बुटकी आहे, पण लठ्ठ आहे म्हणून तिचा आकार एकशे सत्याऐंशी बाटल्या भरला. तेवढी दारू मी परळकरला गुत्त्यात नेऊन पाजली. तो मधूनमधून आपला ग्लास माझ्या ओठाला लावी. मी त्याला हरकत घेतली नाही कारण मला खात्री होती की, एकशे सत्याऐंशी बाटल्या परळकर पिऊ शकणार नाही. पण तो प्याला. त्याने सर्व बाटल्या फस्त केल्या, तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. आणि आश्चर्य म्हणजे, परळकर पूर्ण शुद्धीत होता. उलट माझं डोकं चांगलंच गरगरू लागलं होतं. आणि एकाएकी परळकर माझ्याशी भांडू लागला, तू मला फसविलेस. तू सर्व दारू ठरल्याप्रमाणे पाजली नाहीस. तुझ्या बायकोच्या आकाराची सगळी पाजली नाहीस. तिचा आकार मोजण्याची तुझी पद्धत लबाडीची आहे. जवळजवळ सोळा घन इंच दारू तू कमी मोजलीस. तू मला फसवलेस.

त्याचा मुद्दा माझ्या ध्यानात आला. परातीत पाणी जे सांडले त्यात काही इंच पाणी कमी सांडले हे मला पटले. पण ते तो म्हणतो तितकं सोळा घन इंच नव्हते. कारण, 'मी माझ्या बायकोचा नवरा आहे. तेव्हा माझ्या हिशोबाप्रमाणे अदमासे सहा घनइंच पाणी कमी सांडले.' अशी मी त्याच्या हुज्जत घालू लागलो. तो माझं म्हणणे ऐकायला तयार नव्हता. खूप भांडण झाल्यावर तो हसत हसत म्हणाला, "माझा तुझ्यावर विश्वास आहे. घरी जा आणि मापून बघ... सोळा घन इंच की सहा घन इंच हॅऽ हॅऽ हॅऽ" आमचे इतके बोलणे होतेय तोवर दोन पोलीस आम्हाला शोधत त्या गुत्त्यावर आले व त्यांनी आम्हा दोघांना पकडून पोलिस कोठडीत बसवले. नंतरचे मला काही आठवत नाही."

नंतर शुक्रदेव इंद्रजित परळकरची जबानी झाली. तिच्यात थोडा तपशील सोडल्यास ती जाधवच्या जबानीशी तंतोतंत जुळली.

शेवटी कोर्टाने खालील निर्णय जाहीर केला.

"श्री. श्रीधर दगडू जाधव हा मुख्य आरोपी असून, त्याच्याबाबत बायकोचा खून करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा सकृद्दर्शनी कोर्टात सिद्ध झाला आहे. आरोपी क्रमांक दोन, श्री. शुक्रदेव इंद्रजित परळकर, याने आरोपी क्रमांक एकला गुन्ह्यात सहाय्य केले हेही सिद्ध झाले आहे. परंतु दोघेही आरोपी दारूच्या नशेत होते; व फिर्यादी सौ. आवडाबाई श्रीधर जाधव यांच्या जबानीवरून हे सिद्ध झाले आहे की, आरोपी क्रमांक एकचा बायकोचा खून करण्याचा उद्देश नव्हता. परंतु ज्या तऱ्हेने बायकोचे घनफळ काढण्याचा उद्योग आरोपी क्रमांक एकने केला व आरोपी क्रमांक दोनने त्याला सहाय्य केले, तो उद्योग प्राणघातक ठरण्याची शक्यता होती. आता फिर्यादी सौ. आवडाबाई श्रीधर जाधव ह्या मूळच्या प्रकृतीने धडधाकट असल्यामुळे त्या या दिव्यातून वाचल्या, ही वस्तुस्थितीही निकाल देतेवेळी लक्षात घेतली गेली आहे. शिवाय, या कोर्टाने हेही लक्षात घेतले आहे की, आरोपी क्रमांक एक श्रीधर दगडू जाधव, हे तरुण असून एका गिरणीत फोरमनच्या जबाबदारीच्या हुद्दयावर काम करतात. आतापर्यंत त्यांच्या गिरगणीतून वरिष्ठांकडूनही त्यांच्या वर्तनाबद्दल काही तक्रार आलेली नाही. आरोपी क्रमांक दोन श्री. शुक्रदेव इंद्रजित परळकर, हेही एका मान्यवर बँकेत मोठ्या अधिकाराच्या जागेवर काम करतात, व तेही तरुण आहेत. केवळ दारूच्या नशेत दोघांच्या हातून उपरोक्त गुन्हा घडला असे कोर्टाचे मत बनले आहे.

"तरी या दोन आरोपींस, इतक्या प्रचंड प्रमाणात दारूचे सेवन करू नये अशी सक्त ताकीद देऊन हे कोर्ट निर्दोष म्हणून सोडून देत आहे."

***

पूर्वप्रकाशन : अभिरुची, दिवाळी १९७८

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

काय नग आहेत राव. ७८ सालाच्या आधी पण असले टर्कीमिडीज आपल्यात होते याचा अभिमान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या कथेतील गंमत अजिबातच कळली नाही. मोअरओव्हर "पॉर्न" अंकात का घुसडलीये ते ही कळेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) सौ. आवडाबाई जाधव 'हस्तिनी' होत्या की 'मृगी'?

२) श्रीधर जाधव आणि शुक्रदेव परळकर सहा घनइंच आणि सोळा घनइंच याच आकड्यांवर का वाद घालत होते?

३) शुक्रदेव परळकरांना सोळा घनइंचबद्दल एवढी खात्री का होती?

या प्रश्नांची उत्तरे मिळवाल तर ही कथा इथे का आहे याचा अर्थ कळेल आणि पाणी कुठे सरतंय...अपलं मुरतंय ते कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुचि मला शंका होती गं Smile
पण असं पाणी थोडी ना मुरतं ROFL कै च्या कै बाई हा मोंपासा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां प्रयोग आता अजुन करून बघायचा आहे... तो पर्यन्त मुख्य विषयावर चर्चा करुया
म्हणजे
तो पर्यंत मोपासाला पुरुष प्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता म्हणुन शिव्या देउया. कारण (कथेत) हे घडू शकते हे दोन्ही पुरुषांनी मान्य केले आहे , पुन्हा दोघांसमोर बाई विवस्त्र झाली (तिथेच मला शंका आली) यात तिचे किती मोठे शोषण आहे आणि हरामखोर पुरुष न्यायाधिशाने न्यायदानात याची साधी द्खलहि घेतली नाही हां स्त्रित्वा विरुद्धचा किती मोठा गुन्हा मोपासांने केला आहे चाप्लिने बडवून काढुया त्या *डीच्या मोपासाला.

वा रे वा पदराआड़चा वात्सायन मार्मिक अन आमचा मोपासा खवचट ज्याने कोणी याक्षणी खवचट श्रेणी या प्रतिसादाला दिली थ्थु त्याच्या पक्षपाती नालायक पणाला.
तुम्ही निरर्थक , भडकाऊ खवचट श्रेण्यातुन प्रतिसाद दाबू शकता वास्तव न्हवे की मोपासाचे मुळ लेख न्हवे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खवचट श्रेणी मी दिली. आणि खवचट श्रेणी दिल्याने प्रतिसाद दाबला जात नाही उलट त्याचे रेटिंग वाढते. प्रयोग करून पहा हवे तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तर हां प्रतिसादही खवचट म्हणावा लागेल कारण त्यात तुम्ही सुचवलेला उपाय करायचा अधिकार मला नाकारला आहे Sad

तरीही श्रेनीच्या पदराआड़ न द्ड्ता सामोरे आल्या बद्दल मला आपल्याला त्या प्रतिसादाला खवचट का मानावे लागले हे जानुन घ्यायला नक्की आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

गोष्ट पचली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोपासां डँबिस होता आणि कथेचा अनुवाद करणारे मंत्रीसुद्धा गंमतीशीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रूपांतर तितकंच खट्याळ उतरलंय. मला हे खूपच आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मूळ कथेची लिंक कोणी देईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Mr. Mantri was a very interesting man..highly underrated as a writer....

I have a book called "Akshar Gandharva: Sadanand Rege", 1987 by P S Nerurkar...It carries Rege's long interview done by Pra. Shri. Nerurkar, another very interesting and underrated writer.....

Mantri is present and talks (or made to talk) from time to time...it's like a jugalbandi of these three very exciting Marathi writers....(Rege of course was queen bee among them)....

He has written a poem on Rege, actually on Rege's book! It's called Alibaba...I quote just one line - मठ्ठ छताला लोंबत बसली तृष्णा कासीमची....Mantri imagines Rege's collection of poetry as Alibaba's cave...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

मूळ कथेची लिंक माझ्यापाशी नाही आणि फ्रेंचाचे थोर्थोर उच्चार अवगत नसल्यामुळे ताबडतोबीनं शोधणं मुश्किल.
बाकी ड्यांबिस गोष्ट आहे खरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मूळ कथा इथे मिळेल

नावः "ए सेल"

https://archive.org/stream/completeworksgu00unkngoog#page/n80/mode/2up

स्टोरी थोडी वेगळी आहे पण..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0