कामशिल्पे

रॉय किणीकर

कामशिल्पे

- रॉय किणीकर


कामव्यवहारासंबंधीचा अंक भारतातील प्रसिद्ध शिल्पकलांतील कामव्यवहार व संभोगशिल्पांसंबंधीच्या लेखनाशिवाय अपुरा राहिला असता. रॉय किणीकर यांच्या 'शिल्पायन' या अनिल किणीकर संपादित लेखसंग्रहातील 'कामशिल्पे’ हा लेख आपल्या अंकाच्या विषयाला साजेसा वाटला. श्री अनिल किणीकरांना या लेखातील काही अंश या अंकात पुनर्प्रकाशित करायची अनुमती विचारली असता त्यांनी ती त्वरित दिली. सदर पुस्तक (शिल्पायन) हे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. 'कामशिल्प' हा प्रदीर्घ लेख जसाच्या तसा इथे न देता अंकाच्या विषयाला धरून त्यातील काही अंशांचे इथे पुनर्प्रकाशन करत आहोत. संपादक आणि प्रकाशक या दोघांचेही विशेष आभार.

---

जगन्नाथपुरीच्या ईशान्येस सुमारे २० मैलांवर कोनॉर्क अथवा कोनार्क किंवा कर्णार्क नावाचे सूर्यमंदिर उभे आहे. भारताच्या पूर्व सागरकिनारी. एकाकी. उद्ध्वस्त. नि:शब्द. गंभीर. जणू काय त्या मंदिराला कालातीत अशी क्वचित समाधीच लागली आहे! कोठूनतरी लांबवरून सागरलाटांचा खळखळाट कानावर आला न आला, इतपतच. जांभळ्या-काळ्या दगडांची ती वास्तू आहे.

आज तुम्ही तिथे गेलात, तर तिथल्या निरामय शांततेचा भंग झालेला आढळणार नाही. यात्रिकाच्या अथवा साधकाच्या तोंडून एखादे सूर्य-स्तोत्र अथवा उषेचे स्तोत्र ओठातल्या ओठात का होईना, निघालेले तुमच्या कानावर येणार नाही. असली ही अद्भुतरम्य आणि भावगर्भ दाट प्रशांतता मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. माझ्या डोळ्यांपुढे या सूर्यमंदिराचे वेगळे तरळते स्वप्नरम्य चित्र होते. आणि मी तिथे पोहोचलो, ते पाहिले आणि ते स्वप्नमय चित्र डोळ्यांतील आसवांनी हळूहळू पुसले गेले, भिजले, वाळले आणि नाहीसे झाले!

ते सूर्यमंदिर आज तिथे उभे आहे. एखादा वठराज खूप वर्षांची तपसाधना केल्यानंतर वठून जावा, तसे त्याचे रूप मला दिसले; पण त्या रूपातही दिव्यसौंदर्याची बीजे, शलाका मला हळूहळू आढळल्या आणि ज्या काळात ते अवाढव्य अप्रतिम शिल्पकाव्य बांधले गेले, तो काळ मला आठवला!

इसवी सनाच्या तेराव्या शतकात कलिंग राजघराण्यातील नरसिंह देव (पहिला) या राजाने ते बांधले. आज तिथल्या त्या भव्य प्राचीन मंदिराचे पाहण्यासारखे अवशेष उरलेले आहेत, ते फक्त 'जगमोहन'च्या सभामंडपाचे. सम्राट अकबराच्या कारकिर्दीत अबुल फजल अलुमी या अखबारविसाने जी काही टिपणे लिहून ठेवलेली आहेत, तेवढ्यावरूनही आपल्याला त्या मूळ भव्य वास्तूची कल्पना करायला मिळते.

इसवी सन १२५० ते १२६२पर्यंत सुमारे १२ वर्षे या मंदिराचे बांधकाम आणि शिल्पकाम चालले होते. सुमारे १२ हजार वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य विशारद, पारथरवट, कलाकार आणि शिल्पकार हे मंदिर घडवण्यासाठी राबत होते. सुमारे ३६ निखर्व सुवर्णमुद्रा हे मंदिर घडवण्यासाठी खर्च केल्या गेल्या.

पण अशा निर्जन आडवाटेच्या एकान्तात हे असे सूर्यमंदिर का घडवले गेले असावे? इतिहासकारांनी आणि शिल्पशास्त्रज्ञांनी यावर खूप भाष्ये लिहिली आहेत; पण ती सर्व भाष्ये वाचूनदेखील मनाचे समाधान होत नाही.

---

कोनार्कचे सूर्यमंदिर पाहताना दोन मुद्दे प्रामुख्याने डोळ्यांपुढे उभे राहतात. पहिला म्हणजे - भारतात एकमेव असे हे (गुजरातेतील छोटेसे मोधुरा सूर्यमंदिर वगळल्यास) सूर्यमंदिर आहे. त्या काळात सूर्योपासना इतरत्र होत नव्हती का? आणि दुसरा - हे जे सूर्यमंदिर बांधले गेले, त्या मंदिरावर कामशिल्पांची जी आरास दिसून येते; त्यामागचा उद्देश, ध्येय अथवा इतिहास काय असावा?

पहिल्या प्रश्नाचे उत्तर उत्कल प्रदेशातील एका लोककथेतून मला ऐकायला मिळाले. राजा नरसिंह-नृसिंहदेव हा सूर्यपूत्र कर्णाच्या वंशातला, अनौरस. कुलदेवतेवरची निष्ठा त्याने सूर्यमंदिर बांधून व्यक्त केली. परंतु त्या मंदिराच्या शिखरावर जी कामशिल्पे बसविली गेली, ती बसवताना नृसिंहाच्या मनात कसलातरी विकृत हेतू असावा की काय? उत्कल प्रदेशातील कथा सांगते, की कुंतीला नियोग पद्धतीने कर्णाची प्राप्ती झाली आणि तीही कौमार्यावस्थेत. त्यामुळे कर्णाला जाहीर रीतीने कुंतीने आपला पुत्र मानले नाही. त्याच वंशातला हा आपला नृसिंह देव (तेराव्या शतकातला). स्त्री-पुरुषांचा संभोग किती पवित्र, किती उदात्त, किती मांगल्याने भरलेला आहे आणि संभोगातून मिळणारी कामतृप्ती हीच जगातील एक सृजनशील अधिशक्ती आहे, तिच्यातच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची बीजे साठवलेली आहेत; असे लोककथाकार सांगतो. कामवासना असणे वाईट नव्हे, ती अहितकारक नव्हे, त्यात समाजघातक नाही, असे कामशास्त्रज्ञ वात्स्यायनही म्हणतो. लिंगपूजा ही तर भारताची प्राचीनतम संस्कृती होती आणि अजून आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तीन दैवते जन्म, प्रगती आणि मृत्यू यांना वाहिलेली. शंकराचे प्रतीक म्हणजे शिवलिंग. सारांश - मृत्यूचे, संहाराचे, विलयाचे महान स्वरूप म्हणजे शंकर! आणि त्या शंकराची प्रतिमा आपण प्रतीकात्मक स्वरूपात जी घेतली, ती म्हणजे शाळुंका आणि मधोमध असलेले लिंग. योनी-लिंगाचे ते स्पष्ट स्वरूप आहे. जगाची उत्पत्ती व्हावी म्हणून जी दोन इंद्रिये वापरली जातात, ती ही! योनी आणि लिंग म्हणजे जन्माचे प्रतीक आणि ते वाहिले कुणाला? तर मृत्यूला! मृत्युदेवतेला! शंकराला! त्यातून पुन्हा या शाळुंकेतून निघालेल्या लिंगाचा सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केला, तर पाहा कसे एक चमत्कारिक आणि अद्भुतरम्य चित्र उभे राहते! शाळुंका जी आहे, ती स्त्रियांची योनीजिव्हा (vagina). योनीमुखात लिंग गेले तर ते आत जाईल, असे बाहेर येणार नाही. शाळुंकेला ज्या वक्राकार वळकट्या आहेत त्या (valva) आंतर-योनीच्या! त्याचाच अर्थ योनिगर्भात शिरलेले ते स्थूल लिंग आहे. सारांश, Time and space quantum ला छेद देणारे, कालगर्भाच्या अमृतत्त्वाला स्पर्श करणारे हे महालिंग आहे!

प्राचीन काळातील प्रचंड, भव्य, उदात्त आणि मानवी संस्कृतीच्या इतिहासात घडवले गेलेले हे कामदर्शन आहे! यात काव्य आहे, यात तत्त्वज्ञान आहे, यात प्रपंचही आहे आणि परमार्थही आहे!

खजुराहो घ्या, भुवनेश्वर घ्या, भारतात हजारो अशी मंदिरे किंवा लेणी सापडतील, की ज्याच्यावर कोठे ना कोठे तरी कामशिल्पाची एखादी रेघ ओढलेलीच असणार!

---

ज्या काळात कोनार्क, खजुराहो इत्यादी प्राचीन मंदिरे बांधली गेली, तो काळ डोळ्यांपुढे आला म्हणजे वाटू लागते; त्या काळातील समाज सधन होता, सुखवस्तू होता आणि सुसंस्कृतही होता. त्याआधी बांधल्या गेलेल्या देवालयांचे अवशेष पाहिले आणि त्यांची कामशिल्पाने विभूषित अशी कोनार्क आणि खजुराहोसारखी मंदिरे पाहिली म्हणजे निश्चितपणे वाटते, की समाजजीवन उत्क्रांत होत चालले होते. समाजाच्या मनात ‘फ्लेश’विषयीचा (flesh) कसल्याही तर्‍हेचा कॉम्प्लेक्स नव्हता. समाज धीट होता. पुष्ट होता. संतुष्ट होता. जी आज आपण चोरून, काळ्या बाजारातील मैथुनचित्रे विकत घेऊन पाहतो; तीच चित्रे कोनार्क आणि खजुराहोच्या शिल्पकारांनी जणू 'ओपन सेक्स आर्ट गॅलरी’त उघड्यावर मांडलेली होती. यांचे कारण एकच. आज आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या कितीही पुढे गेलेलो असलो, तरी मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आज आपण तसे परावर्तित अवस्थेतच आहोत.

देहधर्माविषयी आणि मैथुनकर्माविषयी त्या काळातील लोकांत घृणा नव्हती. परिचय, प्रीती, सहवास, आलिंगन, संभोग या सर्व क्रिया देहाला आणि मनाला भूषविणार्‍या आहेत, समृद्ध करणार्‍या आहेत असे त्यांना वाटत असावे.

शिवलिंगाचे प्रतीक आणि त्या प्रतीकाची पूजा हे त्याच सामाजिक आणि मानसिक अभिनिवेशाचे दर्शक नव्हते काय? स्त्री-पुरुषातील संबंध आणि त्या संबंधातून अभिव्यक्त होणार्‍या शरीराच्या कलात्मक आकृती या अतिशय सुंदर, पवित्र आणि उदात्त आहेत, अशी तत्कालीन समाजधारणा असावी.

कोनार्क आणि खजुराहो येथील मैथुनशिल्पे पाहिल्यानंतर आणि त्या मैथुनशिल्पांतील उच्च कोटीची कलात्मकता अनुभवल्यानंतर पाहणार्‍याच्या मनामध्ये हीन पातळीची कामोत्तेजक भावना निर्माण होणे शक्य नाही. कोनार्कच्या देवालयावरची संभोग-आसनांचे आकृतिबंध हे प्लास्टिक आर्टमधल्या उच्च आणि उदात्त अभिरुचीचे दर्शन घडवणारे आहेत.

---

रॉय किणीकर कामशिल्प

आर्ट लाइज इन कन्सिलिंग आर्ट (Art lies in concealing art) असे प्रबोधन या मैथुनशिल्पातून हटकून होते, असे मी म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. या मैथुनशिल्पांतला निर्मळपणा खरोखर दृष्ट लागण्यासारखा आहे. ती मैथुनशिल्पे पाहिल्यानंतर मन एका सृजनशील स्वर्गीय वातावरणात विहार करू लागते. गर्भसंभवाच्या आणि गर्भपोषणकाळातील ही स्त्री-पुरुषांची शृंगारिक चित्तचित्रे आहेत. ज्या देहधर्माच्या पार्थिव वासनेतून जीवनाचा वेल अंकुरतो आणि गगनाच्या मांडवावर तो वर चढत जातो; त्याला अश्लील, बीभत्स (vulgar, obscene अथवा pornographic) म्हणण्यातून आम्ही किती ढोंगी आहोत, किती जीर्ण आणि बुरसटलेल्या मनाचे आहोत, किती असंस्कृत आणि किती कलाद्रोही आहोत, हेच तर सिद्ध होत नाही काय? काही टीकाकार म्हणतात, की त्या प्राचीन मंदिरावरील मैथुनचित्रे पाहिल्यानंतर यात्रिकाच्या किंवा भाविकाच्या मनात शृंगार आणि कामचेष्टितांविषयी घृणा निर्माण होते; देहात भरून राहिलेल्या वासनेवर तो थुंकतो आणि एका उदात्त मनाच्या अवस्थेत देवालयात देवदर्शन घेण्यासाठी प्रवेश करतो. सब्लिमेशन ऑफ इमोशन्स (Sublimation of emotions) किंवा कॅथार्सिस (Catharsis) असेही नाव टीकाकारांनी या भावनास्पंदनाला दिलेले आहे; पण हे सर्व आपल्याला पटत नाही.

तो काळ असा होता, की जेव्हा मोक्षधर्माविषयी समाजाला ओढ होती. प्रपंच अथवा संसार क्षणभंगुर आहे, हा देह विटाळाचा गोळा आहे, या विषयासक्त देहावर प्रेम करणे पाप आहे, प्रपंच आणि संसार सोडून आणि अंगाला राख फासून रानावनात जावे, चिंतन करावे अशा तर्‍हेची समाजविघातक विचारप्रणाली त्या काळात फोफावत होती. पत्नीच्या गालावरील गुलाबी रंगापेक्षा छाटीचा भगवा रंग अत्यंत श्रेष्ठ आहे, मोलाचा आहे, अशा खुळ्या विचाराने त्या काळातील समाजजीवनाला घेरले-वेढले होते. जन्म, शैशव, कौमार्य, तारुण्य, शेवटी वार्धक्य व पुढे मृत्यू हे चित्र काढताना त्यांच्यापुढे कातड्याच्या पिशवीत शिवून काढलेला सांगाडा म्हणजे एक देह, असे चित्र सदैव तरंगत होते.

---

देह ही छाया आहे. संसार ही माया आहे. स्त्री-पुरुषातील प्रपंचे हे नाटक आहे. देहात्मक वासना या मायिक आहेत आणि सनातन सत्य, शिव आणि सुंदर फक्त तो आत्मा आहे. अशा तर्‍हेच्या तत्त्वज्ञानाभोवती समाज प्रदक्षिणा घालत होता, मनाला भोवळ येईपर्यंत प्रदक्षिणा घालत होता आणि अस्तित्वातच नसलेल्या शून्याचा आधार घेऊन जीवनाचे आणि विश्वाचे गणित सोडवू पाहत होता.

शंकराचार्यांची इथेच फसगत झाली. गौतम बुद्धांची इथेच फसगत झाली. एवढेच नव्हे, तर जगातील मोठमोठे धर्मप्रेषित येशू ख्रिस्त, पैगंबर महमंद, झरतुष्ट्र आणि अशांसारख्यांचीही हीच फसगत झाली. हे सर्व तत्त्ववेत्ते, धर्मद्रष्टे, अमावस्येच्या रात्री, काळोख्या खोलीत, अजिबात अस्तित्वात नसलेल्या काळ्या मांजराचा आंधळ्या हातांनी आणि डोळ्यांनी शोध घेत होते.

अशा प्रपंचविन्मुख करणार्‍या रिअ‍ॅक्शनरी तत्त्वज्ञानाच्या चिखलात रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी खजुराहो, कोनार्क वगैरे मंदिरांवरील मैथुनशिल्पे क्रांतिकारक शिल्पकारांनी घडविलेली असावीत, असे माझे निश्चित मत आहे.

---

अभिजात कला धीट असते. ती जीर्ण जर्जर संस्कृतीला कृतनिश्चयाने सामोरी जाते. अशा वेळी रतिक्रीडेतील वस्त्रे आपोआप गळावीत, आभरणे बाजूला व्हावीत, नग्नतेचा आडपडदा पारदर्शक व्हावा... यात नवल ते काय!

चुंबन घेणे, आलिंगन देणे अथवा संभोग घेणे याची नग्न चित्रे रेखाटणार्‍या कलाकारांना नावे ठेवणार्‍या समाजाची आणि टीकाकारांची खरोखर कीव येते; परंतु नग्नतेविषयी, मैथुनक्रीडेविषयी अशा तर्‍हेची भावना का निर्माण व्हावी? याचा आपण शोध घेतल्यास असे दिसते, की क्लासिकल म्युझिक समजण्यासाठी जसे तुमचे कान 'ट्रेन' व्हावे लागतात, उंची मद्य घेण्यासाठी जशी तुमची 'टेस्ट' ट्रेन व्हावी लागते, कथकली-मणिपुरी अथवा भरतनाट्यम् नृत्य पाहताना त्यातले सौंदर्य कळण्यासाठी जशी तुमची दृष्टी ट्रेन व्हावी लागते; त्याप्रमाणे कोनार्क व खजुराहो येथील प्राचीन मंदिरांवरील मैथुनशिल्पे पाहताना तुमचे मन, तुमची अभिरुची, तुमची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जर 'ट्रेन्ड', सुसंस्कृत आणि विदग्ध नसेल - तर त्या मैथुनशिल्पातील अप्रतिम सौंदर्य तुम्हांला दिसणार नाही. तुम्हांला त्यातील अश्लीलता आणि बीभत्सता तेवढी दिसेल.

खजुराहो व कोनार्क येथील मैथुनशिल्पांत आढळणार्‍या शिल्पबंधांचा अभ्यास आज खरोखर गंभीरपणे व्हायला हवा. कामक्रीडेतील आलिंगन, बंधन, चुंबन, आरोहण, बाहुकस, अधररसकोष, नैत्रालिंगन, मुखलिंगन या सर्वांच्या आकृतिबंधातून दिसणारी परम्युटेशन्स अ‍ॅन्ड कॉम्बिनेशन्स पाहिल्यानंतर तुम्ही खरे प्रामाणिक असाल तर म्हणाल, ते शिल्पकार सेडिस्ट नव्हते, मासोकिस्ट नव्हते, लेस्बियन नव्हते, परव्हर्ट नव्हते, मॉर्बिड नव्हते. कामकुंडात केवळ वीर्याहुती देणार्‍या आजच्या संभावित आणि शिष्ट ऋत्विजांना आणि आचार्यांना त्या मैथुनशिल्पांत अश्लीलतेचा गंध आढळणारच! खरोखर मैथुनशिल्पन्यासातील अंगोपांगाचा विचार केला, तर असे वाटते, की कुणीतरी आजच्या नव्या शिल्पप्रवर्तकाने ही शिल्पमीमांसा करावी. छिन्नीच्या आघाताखाली वाकणार्‍या पाषाणाला मानवाच्या मानसिक विकृतीचा तेव्हा स्पर्शही झाला नसावा. हा पाषाण खरोखर अव्यभिचारी, अंतःप्रेरणेने विशुद्ध आणि शिल्पसौष्ठवाने पुरेपूर भरलेला दिसतो. या पाषाणावर वशीकरणाचे अथर्ववेद लिहिले गेले नव्हते नव्हते, तर संमोहनाचा वितळता बिंदू पकडण्यासाठी ते पाषाण टपलेले होते. कामपूर्तीनंतरच्या विकलांगांतल्या कैवल्याचा क्षण पकडणे सोपे नसते. त्यासाठी मनाळ (Psychedelic) दृष्टी असावी लागते. मैथुनशिल्पात व्यक्त होणारी आतुरता, उत्कंठा, अधीरता किती अस्पष्ट आणि किती अस्फुट असते! पाषाणांचे ते नम्रतेने ताठरलेले भाव होते. चुंबने मागण्यात तिथे लाचारी नव्हती, लीनता होती. कोकिळेच्या पंचमात राजहंसाची लवचीक कंठरेषा भिजवून काढलेली ती मैथुनचित्रे आहेत!

---

मूर्तिशिल्पाचे वैशिष्ट्य :

रॉय किणीकर कामशिल्प

खजुराहोच्या मूर्तिशिल्पांची वैशिष्ट्ये विविध प्रकारची आहेत. मुद्रा, अलंकार, वेषभूषा, केशरचना व देहाकार ह्यांचे रेखाटन. वक्ररेषापद्धतीची नि दक्षिणांग व हातांच्या सरळ रेखाटनाची, पुष्ट नितंब व स्तनयुगुलाच्या वर्तुळाकाराशी समतोलपणाने सांगड घातलेली आहे. शिल्पाची गतिमानता नुसती रेषांमध्ये नसून त्रिमित स्वरूपाची आहे. तत्कालीन शिल्पकाराने केलेला मानवदेहाचा अभ्यासही ह्या मूर्तीच्या मुद्रारेखाटनात आढळतो. चेहर्‍याचे अंडाकृती रेखाटन, कोरीव नक्षीकाम, अर्धोन्मीलित नेत्र आणि बाकदार भुवया, ही खजुराहोच्या मुद्रा रेखाटनाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.

खजुराहोच्या शिल्पांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर्शनी भागावरचे रतिशिल्प. ह्याचे मिथुनशिल्प असे सामान्यतः वर्णन केलेले आढळते. प्रेमाचे विविध आविष्कार ह्या शिल्पात इतक्या सूक्ष्मतेने व यथातथ्यतेने रेखाटले आहेत, की दगडाला गतिमान करणार्‍या शिल्पकाराच्या कौशल्याने प्रेक्षक अक्षरशः भारावून जातो. चुंबन, आलिंगन, अवयवाचे विळखे व कित्येकदा सु-रत प्रसंगांचे रेखाटन पाहताना त्याच्या अशिष्टतेपेक्षा तादात्म्याच्या रेखाटनाचेच विशेष कौतुक वाटते. कलेच्या उत्कट आविष्काराकडे रसिक प्रेक्षकांचे विशेष लक्ष्य जाऊ नये किंवा त्याचा वासनात्मक परिणाम सामान्य प्रेक्षकांवर होऊ नये, इतके सामर्थ्य ह्या रतिशिल्पात प्रत्ययास येते.

आधुनिक नीतिशास्त्राच्या दृष्टीने ह्या रतिशिल्पातल्या रेखाटनात अशिष्टतेचे अधिक्य वाटले, तरी त्यातले सूक्ष्म मुद्राभाव प्रसंगोपात प्रकट झालेले आहेत.

खजुराहोचे हे रतिशिल्प पुराणमतवादी पाश्चात्त्यांना व त्यांच्या मतप्रणालीचे सहीसही अनुकरण करणार्‍या एतद्देशीयांना असभ्य वृत्तीचे निदर्शक वाटते.

---

रतिशिल्पातील कामपुरुषार्थ :

ह्या रतिशिल्पाची वैचारिक बैठक समजण्यासाठी प्रथम प्राचीन भारतीय समाजरचनेचे थोडे निरीक्षण करणे उपयोगाचे ठरेल. वेदकालीन समाजरचनेची वैशिष्ट्येच साकल्याने किंवा तपशीलवार जाणणे जरी युक्त असले, तरी रतिशिल्पाचा अभ्यास करताना तत्कालीन जीवनात कामपुरुषार्थाचे महत्त्व काय होते व त्याचा आविष्कार ललितकलांमध्ये कसा होऊ शकला, ह्याचा मागोवा घेणे प्रस्तुत ठरेल.

रॉय किणीकर कामशिल्प

वेदकाळात निरनिराळ्या शास्त्रांचे अध्ययन प्रचलित होते असे आढळते. व्युत्पत्ती, व्याकरण, नीती, भूमिती, खगोलविद्या, चिकित्सा इत्यादी शास्त्रांचे संदर्भ उपलब्ध आहेत. ह्याच काळी कामशास्त्राची सुरुवात झाली असावी व इतर शास्त्राबरोबर भारतात मानवी संस्कृतीच्या प्रगतीला त्यांनी हातभार लावला असावा.

मानवी देहाचे नैसर्गिक व्यापार व व्यवहार काय आहेत, शरीरवासना कशा पूर्ण कराव्यात, कामव्यवहाराची पार्श्वभूमी, परिचर्या आणि पूर्ती यांचे उद्देश काय आहेत इत्यादींचे वैज्ञानिक विवरण प्रस्तुत शास्त्रात स्पष्टपणे केलेले आढळते. आपल्या वासनांची पूर्ती व त्याबरोबर निग्रह कसा करावा; तेणेकरून कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा जबाबदार घटक कसे व्हावे याचे शास्त्रीय शिक्षण नागरिकाला प्राप्त व्हावे; हा ह्या कामशास्त्राचा प्रधान हेतू होता. वेदकालीन व तद्नंतरचे ग्रंथ पाहिले, तर ह्या शास्त्राच्या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास त्यात केलेला आढळतो.

वात्स्यायनाचे कामसूत्र, कन्दर्पचुडामणि, कोकापण्डिताचे रतिरहस्य उर्फ कोकशास्त्र, पद्मश्रीचे नागरसर्वस्वम, कल्याण मल्लाचे अनंगरंग, कवी शेखराचे पंचसायक, हरिहराची शृंगारदीपिका, नागार्जुनाचे रतिशास्त्र हे प्राचीन ग्रंथ मुद्रित झालेले आहेत. ह्याशिवाय अनङ्ग-तिलक, अनङ्ग्दीपिका, अनङ्ग-शेखर, कामसमूह, भगवत कवीचे अष्टनायिका दर्पण, ईश्वर, कामित, कलावाद तंत्र, कलाविधितंत्र, कोकापण्डिताचे कलाशास्त्र, कामप्रकाश, गुणाकराचा कामप्रदीप, कामप्रबोध (या नावाचे दोन ग्रंथ), नित्यनाथकृत कामरत्न, वामनाचे कामशास्त्र, कामदेवाचे कामसार, कौतुक मंजिरी, पद्ममुक्तावल, मदनमंजिरी, मनोदय, योगरत्नावली, जयदेवाची रतिमंजिरी, विद्याधरकविकृत रतिरहस्य, हरिहरकृत रतिरहस्य, रतिरहस्य टीका, कांचीनाथकृत रतिरहस्यदीपिका, रामचंद्र सूरिकृत रतिरहस्य व्याख्या, रतिसर्वस्व रतिसार, विश्वेशवरकृत रसचंद्रिका, रसविवेका, वाजीकरण तंत्र, क्षेमेंद्रकृत वात्स्यायन-सूत्र-सार, वेश्याङ्गना कल्प, वेश्यांङ्गना वृत्ती, शांङ्गधकृत शृंगारपद्धती, शृंगार-भेदप्रदीप, शृंगार मंजरी, चित्रधरकृत शृंगारसारिणी, विष्णवङ्गिरसकृत समर काम-दीपिका, सुरतोत्वर कामशास्त्र, देवेश्वरकृत स्त्रीविलास, रेवणाराध्यकृत स्मर-तत्त्व प्रकाशिका,स्मरदिपिका, देवराज महाराजकृत रति-रत्न-प्रदीपिका, स्मर-रहस्य-व्याख्या, केशवकृत काम-प्रभृत, वरदार्यकृत कामानन्द, हरिहरकृत रतिचंद्रिका, आनंदकृत कोकसार भाषा ह्या ग्रंथांचे संदर्भ आणि हस्तलिखिते बिकानेर, औंध, मद्रास आणि पॅरिसच्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचा उल्लेख त्यांच्या सूचीत आढळतो.

ह्याशिवाय कामव्यवहाराचे उल्लेख अथर्ववेद, ऋग्वेद, तैतिरेय संहिता, बृहद्दारण्यक ह्या वेदकालीन उपनिषदांत; महाभारत व रामायण ह्या महाकाव्यांत; अग्नी, भविष्य, देवीभागवत, गरुड, हरिवंश, स्कंद, श्रीमद्भागवत, विष्णुधर्मोत्तर ह्या पुराणांत; आगर, आपस्तम्ब, अत्रिसंहिता, बृहद्यम, दक्ष, मनु, मारद, प्रजापती, शंख, वशिष्ट वृद्दहरित, विष्णु व याज्ञवल्क्य स्मृतीत; महाभाष्य ह्यासारख्या व्याकरणग्रंथात; कौटिलीय अर्थशास्त्रात; आयुर्वेदप्रकाश बृहत्संहिता, चरकसंहिता, शुशृतसंहिता ह्या वैदक ग्रंथांत; अश्वघोषकृत बुद्धचरित, चौरपंचशिका, गीतगोविंद, जानकीहरण, किरातार्जुनीय, कुमारसम्भव, मेघदूत, नैषधीयचरितम्, रघुवंश, शिशुपालवध इत्यादी काव्यग्रंथांत; कादम्बरी, दशकुमारचरित ह्या प्रबंध ग्रंथांत; अमरुशतक, आधारशतक, समयमातृका, शृंगारशतक, सुभाषितरत्नकार इत्यादी संकीर्णग्रंथांत; शृंगारतिलक, धूर्तसमागम इत्यादी भाणग्रंथांत; धूर्ताख्यान, पौमचरियम्, कुट्टनीतम्, गाथासप्तशती इत्यादी प्राकृत ग्रंथांत आढळतात.

अलंकारशास्त्राचा संबंध कामशास्त्राशी असल्यामुळे केशवमिश्रकृत अलंकारशेखर, गोविंदकृत काव्यप्रदीप, वाग्भटाचे काव्यानुशासन, रुद्रटकृत काव्यालंकार, जयदेवकृत चंद्रलोक, जगन्नाथकृत रसगंधार, भरतमुनीकृत नाट्यशास्त्र, भोजकृत सरस्वती कण्ठभरण, विश्वनाथाचे साहित्यदर्पण व मम्मटाचा काव्यप्रकाश इत्यादी ग्रंथांत अनेक ठिकाणी कामशास्त्रासंबंधीचे उल्लेख आढळतात.

---

साधारणतः १९६८-१९७२ ही पाच वर्षे माझा मुक्काम कोल्हापुरात होता. संस्कृतीच्या अनेक अंगांचा अभ्यास करण्यात माझे जगणे असते. जिवंत राहण्यासाठी मी भारतात अनेक ठिकाणी हिंडलो आहे आणि त्या-त्या वास्तव्यात मी अनेक प्रकारचे अनुभव घेतले आहेत. मुख्यतः कोनार्क-खजुराहो येथील मुक्कामात माझे जीवन विशेष समृद्ध झाले, दृष्टी आणि जाणिवा विशेष प्रगल्भ झाल्या. परिणामी माझ्या चिंतनाला दिशा मिळाली आणि हे सर्व लेखन मी अनुभवांमुळे लिहू लागलो. काम (Sex) या विषयावर मी उपखंडात 'कोनार्क' नावाची कादंबरी लिहिणार आहे. त्यातील पहिला भाग लिहून झाला आहे. गंमत म्हणजे, चिंतनपर लेखन मी करू लागलो ते मात्र काही कविता लिहूनच! म्हणूनच त्या कविता इथे वाचकांसाठी देण्याचा मोह मला आवरत नाही.

ह्या सर्व कविता वेळोवेळी जशा सुचल्या, तशाच त्या पुढे देत आहे.

मृद्गंध उमलला, आले मृग नक्षत्र
चालली अवेळी, ओलेती अपरात्र।
वाकली जरा, पिळताना ओला पदर
आतून जरासे, हलले अर्धे दार॥

चांदणे सोडले, गालावरती चिंब
पदरात झिरपले, पुनवेचे प्रतिबिंब।
दे भरुनि आणखी, पुन्हा भरू दे पेला
एकदाच आला, क्षण गेला तो गेला॥

हा असा राहू दे, असाच खाली पदर
हा असा राहू दे, असाच ओला अधर।
ओठात असू दे, ओठ असे जुळलेले
डोळ्यांत असू दे, स्वप्न निळे भरलेले॥

ही रात्र आजची, पुन्हा न भेटायाचे
हे दार आतुनी, पुन्हा न लागायाचे।
मिटू नकोस डोळे, अर्ध्यावर मिटलेले
पुसू नकोस ओघळ, स्वप्नांचे फुटलेले॥

काळोख खुळा, अन् खुळीच काळी राणी
संकोच मावला, मिठीत सुटली वेणी।
अंजिरी चिरी, विस्कटे, सुटे निरगाठ
ओठात चुंबने, भरली काठोकाठ॥

भरदार कुसुंबी काठ, दाटली चोळी
येतसे अपूर्वा, उषा सावळी भोळी।
रोमांचित झाली, कितीक येथे युगुले
चुंबने दिली घेतली, बिलगुनी जवळी॥

बेसावध पदराआड, भेटले डोळे
अन् टोक जिभेचे, अधरावरुनी फिरले।
रंगला रक्तचंदनी पदर, अन् पोत
पान्हावली स्वप्ने, भरलेल्या पदरात॥

या इथे घेतली, त्या दोघांनी शपथ
चुरगळले पदराआड, जरासे हात।
घातली मिठी, आवळून दोन्ही बाहू
अडवून म्हणाली, नका नका ना जाऊ॥

ओठात अडकले चुंबन, रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा, विरघळे लाल।
घालता उखाणा, फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत, ढळता नाभीकमळ॥

मधुचुंबन म्हणजे, क्षणभर धुंद विरक्ति
आलिंगन म्हणजे, विरहाची आसक्ति।
हे जीवन म्हणजे, दीर्घ स्वप्नसंभोग
हे जीवन म्हणजे, मृगतृष्णेची आग॥

==========

संदर्भ :
कामसूत्र : वात्स्यायन मुनी
रतिरहस्य : कोका पंडित
अनंगरंग : कल्याणमल्ल
नारदीय सूक्त : अहिताग्नी राजवाडे
The wonder that was India: B.L. Bashaam
Introduction to Indian Art: Dr. Anand K. Coomorswamy
Hindu culture: Radhakamal Mukerji
Indian Temples & Sculpture : Dr. goswamy
Kam-kala: Dr. Mulkraj Anand
Konark: Rustum J. Mehta
The Erotic sculpture of India: Max-Pol Fouchet
The Ancient Art & Architecture of India: S.B.Havell
Khajuraho: Vidya Prakash
An Approach to Hindu Erotic Art: Alain Danielou
G.D.Khosha's report on Oscenity and Nudity

---

'शिल्पायन' या पुस्तकातील 'कामशिल्पे' या लेखाचे अंशात्मक पुनर्प्रकाशन

विशेष आभार :
लेखक : रॉय किणीकर
संपादक : अनिल किणीकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कविता खूप आवडली. बाकी सावकाश वाचेन.

काळोख खुळा, अन् खुळीच काळी राणी
संकोच मावला, मिठीत सुटली वेणी।
अंजिरी चिरी, विस्कटे, सुटे निरगाठ
ओठात चुंबने, भरली काठोकाठ॥

अप्रतिम!!!!!!!!!
.

या इथे घेतली, त्या दोघांनी शपथ
चुरगळले पदराआड, जरासे हात।
घातली मिठी, आवळून दोन्ही बाहू
अडवून म्हणाली, नका नका ना जाऊ॥

वा!

बाकी लेख तर उत्तम आहेच. पण ही यादी लेखकाचा व्यासंग दाखवणारी व त्याने स्तिमित करणारी आहे. विशेषतः हे लेखन संगणक उपलब्ध नसणार्‍या काळात झालं आहे हे लक्षात घेतलं तर ही यादी संकलीत करायलाच किती अभ्यास हवा हे लक्षात येईलः

वात्स्यायनाचे कामसूत्र, कन्दर्पचुडामणि, कोकापण्डिताचे रतिरहस्य उर्फ कोकशास्त्र, पद्मश्रीचे नागरसर्वस्वम, कल्याण मल्लाचे अनंगरंग, कवी शेखराचे पंचसायक, हरिहराची शृंगारदीपिका, नागार्जुनाचे रतिशास्त्र हे प्राचीन ग्रंथ मुद्रित झालेले आहेत. ह्याशिवाय अनङ्ग-तिलक, अनङ्ग्दीपिका, अनङ्ग-शेखर, कामसमूह, भगवत कवीचे अष्टनायिका दर्पण, ईश्वर, कामित, कलावाद तंत्र, कलाविधितंत्र, कोकापण्डिताचे कलाशास्त्र, कामप्रकाश, गुणाकराचा कामप्रदीप, कामप्रबोध (या नावाचे दोन ग्रंथ), नित्यनाथकृत कामरत्न, वामनाचे कामशास्त्र, कामदेवाचे कामसार, कौतुक मंजिरी, पद्ममुक्तावल, मदनमंजिरी, मनोदय, योगरत्नावली, जयदेवाची रतिमंजिरी, विद्याधरकविकृत रतिरहस्य, हरिहरकृत रतिरहस्य, रतिरहस्य टीका, कांचीनाथकृत रतिरहस्यदीपिका, रामचंद्र सूरिकृत रतिरहस्य व्याख्या, रतिसर्वस्व रतिसार, विश्वेशवरकृत रसचंद्रिका, रसविवेका, वाजीकरण तंत्र, क्षेमेंद्रकृत वात्स्यायन-सूत्र-सार, वेश्याङ्गना कल्प, वेश्यांङ्गना वृत्ती, शांङ्गधकृत शृंगारपद्धती, शृंगार-भेदप्रदीप, शृंगार मंजरी, चित्रधरकृत शृंगारसारिणी, विष्णवङ्गिरसकृत समर काम-दीपिका, सुरतोत्वर कामशास्त्र, देवेश्वरकृत स्त्रीविलास, रेवणाराध्यकृत स्मर-तत्त्व प्रकाशिका,स्मरदिपिका, देवराज महाराजकृत रति-रत्न-प्रदीपिका, स्मर-रहस्य-व्याख्या, केशवकृत काम-प्रभृत, वरदार्यकृत कामानन्द, हरिहरकृत रतिचंद्रिका, आनंदकृत कोकसार भाषा ह्या ग्रंथांचे संदर्भ आणि हस्तलिखिते बिकानेर, औंध, मद्रास आणि पॅरिसच्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचा उल्लेख त्यांच्या सूचीत आढळतो.

ह्याशिवाय कामव्यवहाराचे उल्लेख अथर्ववेद, ऋग्वेद, तैतिरेय संहिता, बृहद्दारण्यक ह्या वेदकालीन उपनिषदांत; महाभारत व रामायण ह्या महाकाव्यांत; अग्नी, भविष्य, देवीभागवत, गरुड, हरिवंश, स्कंद, श्रीमद्भागवत, विष्णुधर्मोत्तर ह्या पुराणांत; आगर, आपस्तम्ब, अत्रिसंहिता, बृहद्यम, दक्ष, मनु, मारद, प्रजापती, शंख, वशिष्ट वृद्दहरित, विष्णु व याज्ञवल्क्य स्मृतीत; महाभाष्य ह्यासारख्या व्याकरणग्रंथात; कौटिलीय अर्थशास्त्रात; आयुर्वेदप्रकाश बृहत्संहिता, चरकसंहिता, शुशृतसंहिता ह्या वैदक ग्रंथांत; अश्वघोषकृत बुद्धचरित, चौरपंचशिका, गीतगोविंद, जानकीहरण, किरातार्जुनीय, कुमारसम्भव, मेघदूत, नैषधीयचरितम्, रघुवंश, शिशुपालवध इत्यादी काव्यग्रंथांत; कादम्बरी, दशकुमारचरित ह्या प्रबंध ग्रंथांत; अमरुशतक, आधारशतक, समयमातृका, शृंगारशतक, सुभाषितरत्नकार इत्यादी संकीर्णग्रंथांत; शृंगारतिलक, धूर्तसमागम इत्यादी भाणग्रंथांत; धूर्ताख्यान, पौमचरियम्, कुट्टनीतम्, गाथासप्तशती इत्यादी प्राकृत ग्रंथांत आढळतात.

अलंकारशास्त्राचा संबंध कामशास्त्राशी असल्यामुळे केशवमिश्रकृत अलंकारशेखर, गोविंदकृत काव्यप्रदीप, वाग्भटाचे काव्यानुशासन, रुद्रटकृत काव्यालंकार, जयदेवकृत चंद्रलोक, जगन्नाथकृत रसगंधार, भरतमुनीकृत नाट्यशास्त्र, भोजकृत सरस्वती कण्ठभरण, विश्वनाथाचे साहित्यदर्पण व मम्मटाचा काव्यप्रकाश इत्यादी ग्रंथांत अनेक ठिकाणी कामशास्त्रासंबंधीचे उल्लेख आढळतात.

उत्तल लेख. अंकात दिल्याबद्दल आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता जितक्या 'चढल्या' तितका बाकी लेख 'चढला' नाही. या शिल्पांची नुसती माहितीवजा जंत्री न देता, त्यांवर कुणीतरी विस्तृत लिहायला हवं होतं. होता होईतो आजच्या काळातली संवेदनशीलता घेऊन. मग श्लीलाश्लीलाचे नवे संदर्भ या शिल्पांना मिळाले असते. थोडं व्योमकेश बक्षीवर सिनेमा केल्यासारखे, किंवा शरलॉकला एकविसाव्या शतकात आणल्यासारखे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

I bought Mr. Kinikar's book last year but was disappointed by it....I did not like a single article from that...Mr. Kinikar founded "Deepawali" magazine with Dalal...I guess, for me, his skills lay not in writing

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

बय्राच ठिकाणी वाचलंय की खजुराहोपेक्षा कोनार्कमधली कामशिल्प अधिक चांगली आहेत.स्त्रीपुरुषांच्या चेहय्रावरचे भाव फक्त कोणार्कमध्येच साधले गेलेत,खजुराहोत फक्त यांत्रिक हालचाली आहेत.नंतर टिव्हीवरती डॅाक्युमेंट्रीजमध्ये हे स्पष्ट झाले.बाकी रॅाय किणीकरांनी जे विवेचन केलंय ते कंटाळवाणे आहे.माझ्या मते भारतातली देवळावरची कामशिल्पं पिरामिडसइतकीच तोलाची आहेत.पद्मनाभस्वामी मंदिर ( तिरुवअनंतपुरम ) देवळातल्या प्रदक्षिणामार्गात मोठीमोठी कामशिल्पे म्हणण्यापेक्षा योगिक कामशिल्पे संभोगातून मोक्षाकडे पद्धतीची आहेत.या देवळात परदेशींना प्रवेश नसल्याने आणि इथले भारतीय केरळी तिथे शिल्पांकडे पाठ करून गप्पा मारत बसल्याने प्रसिद्धीत आली नाहीत.शिल्पे खांबांवर आहेत आणि खूप आहेत.

रॉय किणीकरांच्या लेखनाचा काळ बघता हे लेखनही पुरेसे बंडखोर म्हणायला हवे. लेखन शैली रटाळ/शब्दबंबाळ आहे हे खरे पण कित्येक वाक्ये त्या काळाच्या पार्श्वभूमीवर दमदार आहेत.

बाकी कामशिल्पे अंबरनाथच्या मंदीरापासून अनेक ठिकाणी पाहिली आहेत. हे केवळ कोनार्क/खजुराहोचे पेटंटेड काम नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Probably true but I did not realize it probably because I came to him after reading D G Godse and Durga Bhagwat...so there was bound to be disappointment....

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

<.> In aesthetics, I agree....

but in engineering? Read what the late Prof. P V Indiresan, ex-Director of IIT, Madras said: “…it is proper for us to enquire why we built temple halls with a thousand pillars a millennium after others had mastered the design of the arch…”

Since I read this assessment, I have always felt it every time I have entered an old temple....

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

हे पुस्तक वाचायला हवे.
मला मंदिरांत शिरले की आचवल नि त्यांचे 'किमया' मधील प्रकाशाच्या संबंधित प्रकरणच आठवत असते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

“…it is proper for us to enquire why we built temple halls with a thousand pillars a millennium after others had mastered the design of the arch…”

भारतात कमानीचे तंत्रज्ञान हे मुसलमानांबरोबर आले, साधारण १२००-१३०० च्या आसपास. सहस्रखांबी मंडपांची परंपरा ही १५०० सालानंतर सापडते. त्यामुळे दोहोंमध्ये हजार वर्षांचा फरक वगैरे विधाने निराधार आहेत. आणि मुळात असे मंडप बांधायची प्रेरणा ही विजयनगर काळात इस्लामिक आर्किटेक्चरमधून घेतली गेली असे प्रतिपादन करणारा एक पेपर मध्ये वाचला होता.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

read Prof. Indiresan's article here http://www.lchr.org/a/36/qe/food1.html

I am not going to elaborate/debate further on India's past technology backwardness...in case you are interested, here is an example on my blog....

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

वैदिक काळात विमाने होती वगैरे बकवास करण्यात मलाही रस नाही. पण या लेखातून इन्दिरेशन यांचे इतिहासाबद्दलचे अज्ञानच दिसते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्थात त्यांचा दोष नाही, कारण प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाचा इतिहास धडपणी कधी शिकवलाच जात नाही. एक तर वैदिक विमाने तरी असतात नाहीतर अनादिकाळापासूनचा तांत्रिक मागासलेपणा तरी असतो. सत्य या दोन्हींच्या मध्ये आहे. जोवर योग्य त्या पुराव्यांच्या आधारे भारतातल्या तंत्रज्ञानाचा इतिहास शिकवला जात नाही तोवर लोक असे लेख वाचूनच मत बनवणार हे कटू सत्य आहे. असो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ही शिल्पे म्हणजे त्या काळातील हॉस्टेल रूम मधली पोस्टर्स असे म्हणता येईल का?

नाही. होस्टेल रूममधली पोस्टर्स विद्यार्थी स्वतः, विथौट एनी पेट्रनेज चिकटवत असतात. देवळांच्या भिंतींवर किंवा शिखरांवर चढून कुणीही उगा टाईमपास म्हणून ती शिल्पे कोरत नसे. शिल्पकारांना स्पेसिफिक शिल्पे काढायला म्हणून पैसे दिलेले असत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ओके. पण दोन्हीमागच्या "भावना" सारख्याच असतील ना? श्रीमंत लोकांचे पोस्टर = शिल्प..(?)

जर भावना सारख्या असत्या तर सगळे सोडून देवळावर कशाला कोरली असती शिल्पे? घरात घेऊन बसता आले नसते का?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

...It's true to some extent...but the characteristic of Maharashtra's sculptures, most notably places such as Nashik's Pandav Leni, is that they were funded by not just by the royalty and the rich but also by middle class people like traders

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

(valva) नव्हे. vulva.

तेवढा टायपो रिपेअर केला तर बरे.

बाकी प्रतिसाद पुढचे वाचून.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-