मेडिकल स्कुल्स - माहीती हवी आहे

एक प्रश्न बर्‍याच दिवसापासून मनात रुंजी घालतो आहे.
.
पार्श्वभूमी - मेडिकल स्कूल चा अमेरीकेतील खर्च ४ ते ५ लाख डॉलर्स आहे. त्यामानाने भारतात कदाचित १ लाख डॉलर्स असावा. जर एखाद्या अमेरीकन सिटीझन मुला-मुलीस बी जे मेडीकल ला जायचे असेल तर. माझ्या मुलीस जी की अमेरीकेत आहे, तिला पुण्यात शिक्षणाकरता पाठवावे किंवा कसे, भारतातील पदवीचा , पुढे अमेरीकेत कितपत उपयोग होइल, आदि प्रश्न डोक्यात आहेत.
अजुन तिचाच होकार नाहीये. पण घरात ती धरुन , सर्वच जण विचार करत आहोत. ती ८ वी नंतर आता कॉलेजमध्ये आहे. फ्रेशर्स-सॉफमोअर-ज्युनिअर - सिनीअर असा क्रम इथे असतो. ती सॉफमोअर (पूर्ण) आहे. सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरु होइल तेव्हा ती ज्युनिअर क्लासमध्ये असेल. पुढील वर्ष खूपच क्रुशिअल आहे.-

प्र १ - भारतात मेडीकल स्कुलचा किती खर्च आहे?
.
प्र २ - बी जे मेडिकल ला हॉस्टेल आहे का?

.प्र ३ - बी जे ची एन्टरन्स असते ती भारतात कॉमन असते का की फक्त महाराष्ट्रात? असल्यास किती % लोकांना अ‍ॅडमिशन मिळते? अन्य लोकांना, त्याच एन्ट्रन्सच्या बेसिसवरती, अन्य मेडीकल स्कुल्स्मध्ये जाता येऊ शकते का?
.
प्र.४ - पुण्यात किती मेडीकल स्कुल्स आहेत? त्यांची नावे काय?
.
प्र ५ - ही एन्ट्रन्स कोणत्या वर्षी द्यावी लागते. म्हणजे तिचे प्रि-रिक्विझिटस?
.
प्र ६ - नॉर्मली (नापास न होता) किती वर्षे शिक्षण घ्यावे लागते?
.
प्र ७ - अन्य कोणी असे केल्याचे ऐकीवात आहे का? असल्यास त्यांचा अनुभव काय आहे?
.
अन्य माहीतीचेही स्वागत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एका सज्जन सदस्यांनी पुढील माहीती दिली त्याबद्दल त्यांचे आभार.
.
मिसळपावावर हा आणि हाही लेख आहे, तिथे भारतातल्या मेडिकल अभ्यासाबाबत थोडी माहिती मिळू शकेल.
.

मुद्दा १० - . परदेशातील मंडळीना तिथले नागरिकत्व नसल्याने भारतात वैद्यकीय प्रवेश पाहिजे असल्यास व्यवस्थापन कोट्यातून तो मिळतो. पण बारावीला पी सी बी शिवाय इंग्रजी विषय असावाच लागतो. अन्यथा भारतात कुठेही प्रवेश मिळत नाही. तिकडे शिकताना शास्त्र शाखेत राहून इंग्रजी विषय घेता येत नाही त्यामुळे इथे परत येउन निव्वळ इंग्रजीसाठी पुन्हा बारावी करावी लागते! मग तुम्ही इंग्लंडमध्ये बारावी झालात तरीही यातून सूट नाही!

हा मुद्दा महत्त्वाचा वाटला.
.
पुण्यातील ए एफ एम सी माहीत होते. इन फॅक्ट घराच्या अगदी शेजारी होते. पण बी जे, ए एफ एम सी, अन्य काही कॉलेजेस च्या साईटस मिळाल्या.
.
या दोन्ही दुव्यांचा खूप उपयोग होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वोरा वर प्रश्न विचारा जास्त व्यापक वाचकवर्ग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑह ओके. आतापर्यंत दोन चांगले इनपुटस तर मिळाले आहेत. पुढे पहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0