तुम्हाला कसलीकसली भीती वाटते?

खरडफळ्यावर सध्या गप्पा सुरू आहेत; तुम्ही कोणत्याशा गर्दीच्या ठिकाणी असताना तिथे कोण्या माथेफिरूने अचानक गोळीबार सुरू केला तर. ह्या चर्चेमुळे मला कसली भीती वाटते ते मला स्पष्टच लक्षात आलं.

१. माझ्याकडे बंदूक असणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यामुळे माथेफिरूशी माथेफिरूपणा करणं मला शक्य नाही. (ट्रोलांशी ट्रोलिंग करणं तसं सोपं; त्यासाठी सरकारी परवाना वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत.) - ही भीती नाही.

२. "पळून जाणे हा बेस्ट उपाय." असं एक मत आलं. मी नियमितपणे थोडी पळते हे खरं आहे. पण आता काय मी लहान मुलगी राहिलेली नाही; गेल्याच महिन्यात सोळावं वरीस लागलंच. त्यामुळे आता स्वयंचलित बंदुका किंवा छोट्या पिस्तुलींच्या गोळ्यांपेक्षा जोरात धावून, त्या चुकवणं मला शक्य नाही. गजगामिनी हे सौंदर्याचं लक्षण नाही का? (अर्थात आम्ही सिंहकटी नसून गजकटी आहोत, पण ते इथे अवांतर आहे.) - ही पण भीती नाही; हा आत्मचरित्राचा एक तुकडा आहे.

३. मग एकच पर्याय उरतो. मेल्यासारखं पडायचं. तसंही 'आडवी झाल्यावर मेल्यासारखी झोपते' (ह्यातला मेल्यासारखी हा शब्द महत्त्वाचा) अशी असूयायुक्त वर्णनं आईकडून लहानपणापासूनच ऐकत आले आहे. त्यामुळे मेल्यासारखं पडणं मला जमण्यासारखं आहे. ह्यात वेगवेगळ्या शक्यता येतात :

अ. मला भीती वाटते की मेल्याचं नाटक करताना मी झोपले आणि स्वप्न पडून बडबडले तर बिंग फुटेल.
आ. समजा माझं मरण्याचं नाटक आहे का मी खरंच मेल्ये हे बघायचं म्हणून त्याने मला लाथ मारली; आणि माझ्या शरीरातून रक्तच बाहेर येत नाही हे दिसलं तर माझं नाटक साफच फसेल. पण बहुदा शूटर लोकांना ह्यापेक्षा बरी कामं असतील. आपण प्रयत्न करून बघायचा. समजा प्रयत्न फसलाच तर पुढची बहुदा वेळ येणार नाही. त्यामुळे आपला कितीही मोठा पोपट झाला तरी 'आता लोकांना तोंड कसं द्यायचं' अशा विचाराने जी खिन्नता (डिप्रेशन) येईल त्यापासून तरी सुटका होईल.

तर मला मेल्याचं नाटक करताना झोप लागून, स्वप्नात बडबड करून बिंग फुटण्याची भीती वाटते. तुम्हाला कसली भीती वाटते?

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मी Blink करेन आणि दिवाळी

मी Blink करेन आणि दिवाळी संपेल, दिवाळीअंक संपेल याची भीती वाटते Sad .... I want it to go on forever.

नहींऽऽऽ

ओ ताई, गरीबांचा विचार करा थोडा. गरीबांना हॅलोवीनच्या मुहुर्ताला भुतं नाचवायची संधी मिळणार आहे, ती उपभोगू द्या!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरं बाई आमचा पाडवा आणि तुझा

बरं बाई आमचा पाडवा आणि तुझा हालोवीन मे गो ऑन फॉरेव्ह(र) & एव्ह्ह!! (डोळा मारत)

जन्माने

केवळ जन्माने ब्राह्मण आहे, कर्माने तर अजिबात नाही, तरी रुपाने असल्यामुळे, चारचौघांत पटकन ओळखला जातो. त्यामुळे, यापुढे येऊ घातलेल्या सामाजिक अभिसरणांत, माझ्यासारख्यांचे आस्तित्वही सहन केले जाणार नाही, अशी भीति वाटते.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

माझ्यात विशेष आणि अनहेल्दी

माझ्यात विशेष आणि अनहेल्दी इन्टरेस्ट घेऊन माझ्या प्रत्येक बदलेल्या आय डीची उगाचच उच्चारवाने घोषणा करणार्‍या विघ्नसंतोषी आय डीज ची मला फार भीती वाटते.

फेमिनाझी सिरिअस चर्चेतला

फेमिनाझी सिरिअस चर्चेतला संदर्भ घेऊन मौजमजा कॅटेगरीतला धागा काढतील अशी भीती वाटते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

भित्यापाठी

१. मला सांस्कृतिक दहशतवादापेक्षा सांस्कृतिक उपासमारीची भीती जास्त वाटते.
२. ब्लॅक मिरर सारख्या सर्व भित्या मला वाटतात.
३. ऐसीच्या भारदस्तक अ‍ॅपमधून विवेक पटाईत यांचे लेख बाहेर काढले तर प्रतिकुरुंदकर जन्माला येण्याची भीती वाटते.
४. मला पारलैंगिक होण्याची फारच भीती वाटते. सुंदर एलियन्स (गुगुलून पाहा)पाहिले की मी लगेच पेटतो.

हे काय हे!

प्रतिकुरुंदकर आणि पारलैंगिक ह्या दोन मोत्यांसाठी नमस्कार.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विविध

भीती वाटणार्‍या काही बाबी --

  1. ट्रम्प किंवा हिलरी ह्यातलं कुणीतरी निवडून येइल का काय, अशी भीती वाटते. (डोळा मारत)
  2. ऐसीकर सध्या आहेत तसेच वागत राहतील की काय अशीही भीती वाटते.

भिति

Self-congratulatory behavior of NRIs - आणि शिवाय भारतात येऊन इथल्या परिस्थितीला घातलेल्या शिव्या ऐकाव्या लागण्याची.

भिती

मी ब्यान होईन की काय हे सोडलं तर जगात मला कशाकशाची म्हणून भिती वाटत नाही.

पक्ष्यांची प्रचंड भीती

पक्ष्यांची प्रचंड भीती वाटते.खास करून वटवाघळांची.ती पंखांची फडफड ऐकवतसुद्धा नाही.काटा येतो अंगावर.याला इंग्रजीत ऑर्निथोफोबिया असं काहीतरी नाव आहे.

वटवाघूळ...

...हा पक्षी नाही.

बाकी चालू द्या.

....

वटवाघूळ...

...हा पक्षी नाही.

यत्ता तिसरीत "माझा आवडता प्राणी" हा निबंध लिहिताना वरील वाक्य घातल्याचे, आणि ८ पैकी ८ मार्क मिळाल्याचे आठवते. रम्य त्या आठवणी.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बॅटमॅन यांनीच मी आठवीत

बॅटमॅन यांनीच मी आठवीत (बहुतेक )असताना मला वटवाघूळ कातडीला चिकटून कातडी सोलून काढतं असं सांगत वटवाघळाबद्दलची भीती अजूनच गडद केल्याचं सपष्ट आठवतंय ( हा आरोप नाही)

आं? मी असे कधी सांगितल्याचे

आं? मी असे कधी सांगितल्याचे आठवत नाही. जे लोक असे कैतरी सांगत त्यांनाच उलटे सांगत असे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

क्षीण जाहिरात

आपले (लटकलेले?) पाय पाळण्यात दिसत, ह्याची क्षीण जाहिरात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मार्मिक दिली आहे.

मार्मिक दिली आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

दुरुस्त करतो.पक्ष्यांची

दुरुस्त करतो.पक्ष्यांची वाटतेच.वटवाघळाची पण वाटते.

मला गर्दीची, गर्दीत जाण्याची

मला गर्दीची, गर्दीत जाण्याची आणि चेंगरले जाण्याची जबरदस्त भीती वाटते !
बाकी, वरच्या सगळ्या 'भीती' वाचून जबरदस्त करमणूक झाली..!

नाईट-क्लब मध्ये नाचतानाचे

नाईट-क्लब मध्ये नाचतानाचे फोटो छान येत असतील. किंवा पंढरपूरला डोकं टेकवल्यावर पांडुरंग पण बुचकळ्यात पडत असेल - "आता मी काय केलं कि ह्या एवढ्या घाबरल्यात?"

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

नाईट-क्लब मध्ये नाचतानाचे

नाईट-क्लब मध्ये नाचतानाचे फोटो छान येत असतील.

टिकलु काका, ह्या प्रश्न विचारण्यामागचा / विधान करण्याबद्दलचा कार्यकारण भाव विस्तारानी सांगा.

टिकलू सारखं नाव ठेवलं तरी

टिकलू सारखं नाव ठेवलं तरी काका? Puzzled

टिकलू काका म्हणणं म्हणजे नवाज शरीफ म्हणण्यासारखं आहे, सूट होत नाही.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हा हा. नवाज तशरीफ जास्त सूट

हा हा. नवाज तशरीफ जास्त सूट होईल बहुतेक.

तशरीफ़...

...चा अर्थ 'honor' की कायसासा होतो, म्हणे.

('तशरीफ़ म्हणजे ढुंगण' ही कोणीतरी केवळ विनोदाखातर उठवून दिलेली वावडी असून तीत तसूभरही तथ्य नाही. हं, आता ती ढुंगणास चड्डीहूनही फिट्ट बसते, ही बाब अलाहिदा.)

तर मग काय म्हणत होता? नवाज़रावांना honor अधिक शोभतो?

(अवांतर: शरीफ़ आणि तशरीफ़ हे तसे एका धातूपासून बनलेले आणि अर्थाने एकमेकांशी निगडित शब्द असावेत. बोले तो, ज्याचेजवळ तशरीफ़, तो शरीफ़, असे काही? चूभूद्याघ्या. गंमत म्हणजे, शरीफ़ आणि मुशर्रफ़ हेसुद्धा अशाच काहीश्या प्रकारे संबंधित (शब्द) आहेत, असे कळते.)

हे पहा

z

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

Need to click Feedback and

(लोळून हसत)
Need to click Feedback and point out Google's mistake.

तशरिफ य उर्दू शब्दाचा मूळ अर्थ honour किंवा तसाच काहीतरी आहे. पण गेल्या काही वर्षात कॉमेडी वाल्यांनी तो बदलून टाकलाय.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

गर्दीच्या ठिकाणी भीती वाटते.

गर्दीच्या ठिकाणी भीती वाटते. नाईट-क्लबमध्ये गर्दीच्या ठिकाणी घाबरलेला फोटो कसा येईल? किंवा देवा-धर्माच्या ठिकाणी गर्दीतून गेल्यावर विठोबा जेव्हा ह्यांचा घाबरलेला चेहरा बघेल....जाऊदे दोन्ही जोक फेल गेले. Sad(

मला माझा पंच फुटणार नाही याची भीती वाटते.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

नाईट-क्लब मध्ये नाचतानाचे

नाईट-क्लब मध्ये नाचतानाचे फोटो छान येत असतील.

आपल्याला काय म्हणायचे आहे ? आपण नाईट क्लबमध्ये नाचता का ?

जाऊदे, पंच फुटला नाही.

जाऊदे, पंच फुटला नाही.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

.

.

(No subject)

invisible reply

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

टिकलुजी आतापर्यंतची ही

(लोळून हसत) (लोळून हसत)
टिकलुजी आतापर्यंतची ही चवथी वेळ मी तुम्हाला प्रतिसाद देऊन मग काढून टाकला (स्माईल)
आपमे ऐसा क्या है जो औरोमे नही (डोळा मारत)

द्यायचा हो ठोकून प्रतिसाद.

द्यायचा हो ठोकून प्रतिसाद. उद्या कोणी बघितलंय. हाय काय नि नाय काय. Davie

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मला हे आणि सांगताय? लेसण्स

(लोळून हसत) मला हे आणि सांगताय? लेसण्स घ्या माझ्याकडुन औथल्याची (डोळा मारत)

घाईची परसाकडे लागली आन परस

घाईची परसाकडे लागली आन परस उपलब्ध नसेल तर? याची भीती वाटते

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ओह शूट हे असे झालेले आहे

ओह शूट हे असे झालेले आहे व्हरमॉन्टला. आय हॅड टू नॉक ऑन अ स्ट्रेन्जर्स डोअर. कारण मी आणि गुरमीत आम्ही मरीना, लेकशोअर वरती सकाळी वॉक घेत होतो. कुठेही रेस्टरुम नव्हती, निदान आम्हाला माहीत नव्हती. त्या स्त्रीने वापरु दिले हे तिचे उपकार, देवदूत असणार ती बाई. नंतर मी तिल जाऊन गिफ्ट्कार्ड दिलेले (लोळून हसत)

म्हंजे तुमच्या कं बी अस

म्हंजे तुमच्या कं बी अस व्हतय? येक त होल वावर इज अवर पाहिजे नाही त मंग तुमच्या भाषेत रेस्टरुम तरी पाहिजे मला आयबीएस च्या त्रासामुळे फूड व टॉयलेटची विशेष दखल घ्यावी लागते

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

नाही इथे ५-५ मिनीटावर रेस्ट

नाही इथे ५-५ मिनीटावर रेस्ट रुम्स सापडतात, दुकानात, मॉलमध्ये वगैर. पण आम्ही निर्जन भागात वॉक घेत होतो त्यामुळे ... Sad

'टॉक द्यायचंय'

'वॉक घेत होते' अशा छापाचं मराठी बोलेन का काय, अशी भीती वाटते. कधी 'पोर्सलीनच्या सिंहासना'वर बसून 'रेस्ट' घ्यावीशी वाटली तर ... ह्या भीतीने माझी गाळण उडते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरं रपेट घेत होतो, फिरत होतो,

बरं रपेट घेत होतो, फिरत होतो, बागडत ,भटकत होतो. चालत चालत कालक्रमणा करीत होतो.

पार्किंग

मला कुठेही कार घेऊन जाताना पार्किंग मिळेल की नाही याची भीति वाटते. मिळालं तरी, परत गाडीशी येईपर्यंत, ती टो करुन नेली असेल का, याची भीति वाटत रहाते.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

मला सध्या कुठचा नवीन विषय

मला सध्या कुठचा नवीन विषय वर्तमानपत्रात दिसला तर 'हे होऊन बारा तास होऊन गेले, पण ऐसीवर चर्चा का नाही झाली? उत्तर द्या! संपूर्ण देश तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे!' असं हाताच्या आक्रमक हालचाली करत कोणीतरी विचारेल अशी भीती वाटत असते.

टू लेट.

तुम्ही बघितलं नाही का? दुसऱ्या धाग्यावर मी सोडून बाकी सगळे स्त्रीद्वेष्टे आहेत, हे मी सिद्ध केलेलं आहेच.

पुढच्या वेळेस, वेळेत घाबरून टाका बघू!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी आधीच घाबरलेलो आहे. कारण

मी आधीच घाबरलेलो आहे. कारण मला 'डोळे बघ, घाबर, घाबर' म्हणणाऱ्या लोकांची त्यांच्या डोळ्यांकडे न बघताच भीती वाटते.

काढलाच एकदा विषय बरे वाटले

काढलाच एकदा विषय
बरे वाटले असेल आता गुरुजींना. (डोळा मारत)
.
असल्या लोकांची एक फार भीती वाटते बाबा. (डोळा मारत)

मला भीती वाटते हे फारमसी वाले

मला भीती वाटते हे फारमसी वाले बॉटस, ऐसी गिळंकृत करतील Sad

बॉट्स!

"लॅव्हिश इज व्हल्गर, न्युडिटी इजन्ट." म्हणजे 'नग्नता नाही तर अति भपका, चकमकाट हा हिडीस असतो.'

तुला नग्नतेची भीती वाटत्ये का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नंगे से खुदा भी डरता है , तो

नंगे से खुदा भी डरता है , तो मै क्या चीज हूं (डोळा मारत)

मी न केलेल्या कृत्त्याबद्दल

मी न केलेल्या कृत्त्याबद्दल बायको माझ्यावर खार खाऊन बसेल याची भीती वाटते.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मग कृत्य करुन मोकळंच व्हायचं

मग कृत्य करुन मोकळंच व्हायचं म्हणजे "न केलेल्या" कृत्याबद्दल खार खायची संधीच मिळणार नाही. हाकानाका (डोळा मारत)

"न केलेल्या" कृत्याबद्दल खार

"न केलेल्या" कृत्याबद्दल खार खायची संधीच न देण्याची युक्ती चांगली आहे. पण खंत हीच आहे कि आम्हाला कृत्य करण्याची संधीच मुळी मिळत नाही ना Sad

शोकांतिका...

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

खंत हीच आहे कि आम्हाला कृत्य

खंत हीच आहे कि आम्हाला कृत्य करण्याची संधीच मुळी मिळत नाही ना

हे खरे दु:ख आहे तुमचे, उगाचच बायकोची कारणे देताय.

.

As usual I have put my foot in where my mouth belongs .... TYPICAL Sagittarian syndrome.

सार्वजनिक ठिकाणी जिथे लायनीत

सार्वजनिक ठिकाणी जिथे लायनीत वॉशबेसिन्स असतात, तिथे बाजूची व्यक्ती, स्वतःच्या तोंडावर 'ताजगी देने वाला' पाण्याचा हपका निष्काळजीपणे जोरात (उदा. 1942मधे मनिषा कोईराला एका दृष्यात तोंड धुताना दाखवल्ये तसं) मारेल आणि ते पाणी आपल्या अंगावर उडेल की काय अशी भीती. तीच भीती लांबून चूळ फेकणार्‍यांच्या बाबतीत.

प्रयत्न

1942मधे मनिषा कोईराला एका दृष्यात तोंड धुताना दाखवल्ये तसं

हे असं करण्याचा बराच प्रयत्न मी तेव्हा केला होता, १९४२ मध्ये नाही, सिनेमा आला तेव्हा. पण बेसिनच्या आजूबाजूला पाणी सांडलं तर आपल्यालाच ते साफ करायला लागणार ह्याची जाणीव तीर्थरूपांनी करून दिल्यावर हे प्रकार बंद केले.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१९४२ मध्ये नाही आँ लब्बॉड!

१९४२ मध्ये नाही

(लोळून हसत) (लोळून हसत) आँ लब्बॉड! वय असं चोरायचं नाही.

व्वा व्वा...!

कोणालाही दहशतवादी हल्याची अथवा ट्रंप निवडुन येइल अथवा पडेल याची अजुनही भिती वाटत नाही ही किती सकारात्मक बाब आहे. जिओ.

actions not reactions..!...!

...

भीती वाटते, नाही असे नाही. पण 'होईल तेव्हा पाहून घेऊ' असे धोरण तूर्तास ठेवले आहे.

ट्रंप निवडुन येइल अथवा पडेल याची

(स्माईल)

भलती भीती

गेल्या काही दिवसांतल्या बातम्या बघून मला भीती वाटायला लागली आहे की ट्रंप हा डेमोक्रॅट पक्षाशी इमान राखून असणारा इसम आहे का काय! हे असे मित्र असले तर शत्रूंची गरज काय, वगैरे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे शक्य आहे. हिलरी इतकी कपटी

हे शक्य आहे. हिलरी इतकी कपटी आहे की तिच्या डोक्यातुन असल्या कल्पना निघु शकतात.

१९८४ चा बदला घेण्यासाठी ममो सोगांना धरुन राहीले अशी एक कॉन्स्परसी थिअरी आहे. पण ती खोटी असावी कारण ममोंना क्रेडीट दिल्यासारखे होईल.

भीती?

जवळपास खात्री होऊ लागली आहे.

सक्काळी सक्काळी अध्यात्मिक

सक्काळी सक्काळी अध्यात्मिक पोस्ट टाकून whats app ग्रुप भरून टाकणाऱ्या लोकांची आणि त्यांच्या भंकस पोस्ट्स ची .... भीती वाटते

मी बऱ्याच वेळेस सक्काळी

मी बऱ्याच वेळेस सक्काळी सक्काळी उपटणाऱ्या अध्यात्मिक पोस्टला (लोळून हसत) चा रेप्लाय देतो. पाठवणारे चिडत असावेत.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मी अगदी असेच नाही पण काडीसारू

मी अगदी असेच नाही पण काडीसारू रिप्लाय देतो.

परवा एकाने शहीद या शब्दाची खरी व्युत्पत्ती सांगून, शहीद ऐवजी हुतात्मा म्हणा असे सांगणारा मेसेज फॉर्वर्डला. मी म्हणालो की मराठीत आणि हिंदीत असे शेकडो शब्द आहेत. आहे का तुमच्या **त दम, सगळ्या 'त्या' शब्दांना हाकलायचा? तर लगेच 'योग्य शब्दयोजनेपेक्षा मोठे प्राब्ळम देशासमोर आहेत' वगैरे बोलू लागले. मी म्हणालो मग अगोदरच्या मेसेजलाच हे पर्फेक्ट लागू होतं. त्यावर आज भाईंनी कडीच केली, प्रपंचात रमणारे कसे मूर्ख असतात आणि मोक्षाला मुकलेले इ. असतात वगैरे सांगणारी रामदासकृत ओवी सादर केली निरूपणासोबत. त्याला रिप्लाय इतकाच दिला की अध्यात्मापेक्षा मोठे प्राब्ळम देशासमोर आहेत. त्याला अजून रिप्लाय आलेला नाही. पाहू काय येतो रिप्लाय ते. इतरांनी सांगितलेलं चालत नाही पण स्वतः तेच करतात. लय मजा येते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मला अशा वेळेला पु.लंचं तुझं

मला अशा वेळेला पु.लंचं तुझं आहे तुजपाशी नाटक आठवतं. किती eternal नाटक आहे ते, आजच्या काळात सुद्धा लागू होतंय.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

कडक !!! बराच पेशन्स आहे

कडक !!! बराच पेशन्स आहे तुमच्यात ( तारुण्य अजून काय ?)

+१

तारुण्यच, दुसरे काय? अजून काही वर्षांत ही रिअ‍ॅक्शन फक्त स्मायलीपुरती आणि नंतर ब्लॉकपुरती उरेलसं वाटतं.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बॅट्या

वय वाढायचे अटळ असते, शहाणपण येणे मात्र पर्यायी मूल्य आहे (डोळा मारत)

अगदी अगदी!

अगदी अगदी!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कळतात बरं ही तिरकस "अगदी

कळतात बरं ही तिरकस "अगदी अगदी" (डोळा मारत) (लोळून हसत)

किंवा Inspirational post.

किंवा Inspirational post.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

Olympics चा ओपनिंग सरेमोनी

Olympics चा ओपनिंग सरेमोनी बघण्याची , आणि तो चवीचवीने बघून मग इतरांना चावणाऱ्या लोकांची .... भीती वाटते

शुचि ची

कधीकधी एखादं रटाळ लिखाण, कविता किंवा धागा, वाचत असतो.
इतकं भिकार लिखाण असतं की वाचवत नाही तरी पुढे रेटत असतो.
अशा वेळी त्या लिखाणाच्या खाली शुचिचा 'सुंदर, अप्रतिम,' वगैरे प्रतिसाद आलेला असेल की काय ह्याची मला भीती वाटते!!!
(स्माईल)

ह्याचा कॉन्व्हर्स पण खरा आहे

ह्याचा कॉन्व्हर्स पण खरा आहे का? म्हणजे शुचिने सुंदर, अप्रतिम म्हणले म्हणजे लेख्/कविता भिकारच असणार.

हा ना, आपण काहीही लिहिलं तरी

हा ना, आपण काहीही लिहिलं तरी शुचि अप्रतिम म्हणेल या भीतीनेच मी काही लिहित नाही.
शुचिमामी एकादा दिवस तरी जरा धुलाईचा काढ. फालतू, बोगस, टुकार, भंकस, वाईट, दरिद्री अशा विशेषणांचा पण वापर कर. नाहीतर गंजतील ते.

(व)स्तु(स्थि)ती

अशा वेळी त्या लिखाणाच्या खाली शुचिचा 'सुंदर, अप्रतिम,' वगैरे प्रतिसाद आलेला असेल की काय ह्याची मला भीती वाटते!!!

सारखी स्तोत्रं म्हटल्यामुळे स्तुती करावीशी वाटत असेल.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

अगागागागागागा

अगागागागागागा (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

काय हे पिडां!

(लोळून हसत) (लोळून हसत) काय हे पिडां!

अपेक्षाभंगाची भीती वाटते.

मला वाटलं होतं, शुचि आता म्हणेल की, मला पिडांची भीती वाटते!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे बघा. मुक्तपिठीय टाकलं तर

हे बघा. मुक्तपिठीय टाकलं तर अजुनच घाबरतील ते. (जीभ दाखवत)

ड्रायविंग!

मला चार चाकी गाडी चालवायची भिती वाटते.
दुचाकी कशीही रपटवू शकते पण चार चाकी चालवताना पोटात गोळा येतो.

त्यापेक्षा डायवरच्या बाजूला बसून शायनिंग मारायला मजा येते.
(स्माईल)

बाकी मला कशाकशाचीही भिती वाटत नाही .

मला पालीची भीती वाटते. जवळची

मला पालीची भीती वाटते.

जवळची व्यक्ती मला सोडून जाईल हि भीती वाटते .

जवळची व्यक्ती मला सोडून जाईल

जवळची व्यक्ती मला सोडून जाईल हि भीती वाटते .

का? Sad कोणी जात नाही. स्तोत्रं म्हणत जा (डोळा मारत)

जवळची पाल

जवळची पाल सोडून गेली तर काय वाटेल?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याईक्स. ती जळ्ळी पाल जवळची

याईक्स. ती जळ्ळी पाल जवळची झाली कधी? Sad Sad

!!!

ती जळ्ळी पाल जवळची झाली कधी?

Alter ego.

('Bum पाल' म्हणणार होतो, पण न जाणो उगाच भलता अर्थ घेतला जायचा, म्हणून आवरते घेतले.)

अवांतर: पा.ब.थां.!!!!!!
------------------------------
अतिअवांतर: हिंदीतल्या 'बम फटना' या वाक्प्रचाराने आमची जाम करमणूक होते.

Pal you know, Pal. not paal )

Pal you know, Pal. not paal (स्माईल))

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नोकरी जाण्याची

मला नोकरी जाण्याची भीती बरेच दिवस असायची. तरीही १५-१६ वर्षं एकाच शाळेत चिकटून होते आणि हल्लीच ती स्वतःच सोडली. आता कशाला उद्याची बात??

-गौरी

ऑपरेट केलेल्या पेशंटला जखमेत

ऑपरेट केलेल्या पेशंटला जखमेत इन्फेक्शन होण्याची भीती वाटते. ते होऊ नये म्हणून हजार काळज्या घेतलेल्या असल्या तरीही.

बास. बाकी कसलीच नाही.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-