नको भुलू जाहिरातींना !

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते. जाहिरात कंपन्यांनी ही कला धनप्राप्तीसाठी अवगत करून घेतली आहे.

भारत हा एक प्रगतशील, जास्त लोकसंख्या असलेला तसेच जगातील सर्वात जास्त, जवळजवळ ६५ टक्के तरुणवर्ग असलेला देश आहे. इथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यापारासाठी भरपूर वाव आहे. असे असले तरी स्पर्धाही तितकीच आहे. त्यामुळे या कंपन्यांना आपले उत्पादन इतरांपेक्षा वेगळे व जास्त चांगल्या प्रतीचे कसे आहे, हे पटवून देण्यासाठी जाहिरात या साधनाचा आधार घ्यावा लागतो.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपलेच उत्पादन उत्तम हे ठासून सांगताना या जाहिरातीचा ब-याचदा तोल सुटतो. पाहणा-या ग्राहकाला ते कळत नाही पण त्याचा दुष्परिणाम जाहिरात बघणा-यावर म्हणजेच ग्राहकावर होतो.

जाहिरात करण्यासाठी रेडिओ, वृत्तपत्र, चित्रपटगृह, होर्डींग्स्, कार्यक्रमाची स्पॉन्सरशीप तसेच बस, ट्रेन व इंटरनेटचे महाजाल या सर्वाचा वापर केला जातो. यापैकी टिव्ही हे माध्यम अतिशय प्रभावशाली माध्यम आहे. कारण आज देशातील सर्वस्तरातील लोकांपर्यत टीव्ही पोहोचलेला आहे. या माध्यमाद्वारे दृकश्राव्य पद्धतीने प्रसारित केलेल्या जाहिराती थोडय़ाच वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचू शकतात.

जाहिरातीच्या प्रसारणासाठी काही नियम व कायद्याचे बंधन आहे.

जसे की या जाहिराती सत्याला धरून असाव्यात, त्यातील दावे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध करता यावेत, तसेच स्त्री देहाच्या अश्लील प्रदर्शनास बंदी व जात-धर्म, देश यांचा अपमान करण्यासही जाहिरातींना बंदी आहे. याशिवाय मद्याच्या जाहिरातींनाही मनाई आहे.

या कायद्याचे व नियमांचे पालन जाहिरात करताना केले जाते का, याचे उत्तर काही जाहिराती बघताना तरी नाही असेच येते. एखादे ब्रॅण्ड नेम, सेलेब्रिटी यांना घेऊन बनवलेल्या जाहिराती दाखवताना पंचलाईनचा वापर केला जातो. तसेच लहान मुलांचा वापरही मोठय़ा प्रमाणात केला जातो. लोकसंख्येच्या १/२ भाग पंधरा वर्षाखालील मुलांचा आहे, मुले दिवसातून तीन तास व सुट्टीच्या दिवसात तीन ते सात तास टीव्ही बघतात, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

याचाच फायदा घेऊन जाहिरात बनवताना लहान मुलांना लक्ष्य केले जाते. मुलांनी शाळेत जाताना डब्यात काय न्यावे, मधल्या वेळेत किंवा सुट्टीत मुलांना काय द्यावे हे दाखवताना मुलांचाच वापर करून जाहिराती चित्रीत केल्या जातात. चपातीला केवळ जाम लावून रोल करून नेला की मुले पटापट डबा संपवतात, मधल्या वेळात पटकन होणा-या चायनीस नुडल्स् मुलांना आया पण खुशीने देतात. या वाढीच्या वयात मुलांना लागणारी भाज्या, कडधान्ये यातील पोषणमूल्ये रोज जाम/नुडल्स् खाऊन मिळतील का? या व्यतिरिक्त या पदार्थातील साखरेचे जास्त प्रमाण, कृत्रीम रंग, प्रिझर्वेटिव्ह याचा दुष्परिणाम शरीरावर होणार तो भाग वेगळाच.

कित्येकदा जाहिरातीतून मुलांच्या तोंडात वडीलधा-यांना उद्धटपणे बोलणारे संवाद दिले जातात. जसे की मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, ‘तुम समझते नही हो क्या?’ सतत चालू असणा-या या जाहिरातीतून मुलांवर खाण्यापिण्याचे व वागण्याचे काय संस्कार केले जातात? देशाची पुढील पिढी सुदृढ सुसंस्कृत कशी बरे बनेल?

लिक्विड सोपची जाहिरात दाखवताना जास्त वेळ घेऊन स्वच्छ हात धुणा-या विद्यार्थ्यांला दुसरा विचारतो. ‘तुझा साबण स्लो आहे का?’ या इथे साबणाचा मळ काढण्याचा गुणधर्म न दाखवता त्याचा उल्लेख ‘स्लो’ असा करून दिशाभूल करण्यात आली आहे. त्याच ब्रॅण्डचा बेदिंग सोप एका नव्या रूपात येऊ घातला आहे. त्यात ‘चांदीचे शक्तीशाली संरक्षक’ असा दावा केला आहे. (आंघोळीच्यावेळी काही क्षणच अंगावरून फिरणा-या साबणातला जो काही चांदीचा अंश असेल तो संरक्षक कसा असू शकेल?) प्रत्यक्षात काय ते बाजारात साबण आल्यावरच कळेल.

परंतु तो परिणामकारक आहे हे दाखवताना त्याची तुलना लाडवावरील चांदीच्या वर्खाशी केली आहे, जो अ‍ॅल्युमिनिअमचा ही असू शकतो. (लाडवाच्या किमतीत चांदीची किंमत आकारली असतीच). तसेच चांदीच्या चमच्यातून बाळाला पाणी पाजण्याच्या परंपरेचा केलेला उपयोग, ग्राहकांना पटकन् आकृष्ट करणारा ठरतो. शिवाय ही तुलना सुप्रसिद्ध नायक/नायिका करतात त्यामुळे ग्राहकावर त्याचा निश्चितच प्रभाव पडू शकतो. ज्याचा परिणाम साबणाची किंमत प्रचंड मोठी आकारण्यास होऊ शकतो.

हेल्थड्रिंकची जाहिरात करताना, त्याचा प्रयोग मुलांच्यावर केला आहे व तो सकारात्मक झाला आहे असे दाखवतात, पण पोटभर धड अन्न न मिळणा-या मुलांच्यावर हा प्रयोग होतो का? हे कोण पडताळून पहाणार? तसेच तो जाहिरात करूच शकत नाही, त्यामुळे डॉक्टरांचा कोट घालून एखादा कलाकार डॉक्टर बनतो. हा खोटेपणा सामान्य प्रेक्षकास कळतोच, असे नाही.

मद्याच्या जाहिरातींवर मनाई असल्याकारणाने सोडा, स्पोर्ट्स् ड्रिंक किंवा मिनरल वॉटर या नावांखाली मद्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. या संदर्भात ग्राहक संरक्षण कायद्यातील जाहिरात विषयक तरतुदींचा सखोल अभ्यास करून, मुंबई ग्राहक पंचायतीने जो ऐतिहासिक निर्णय मिळवला, तो महत्त्वाचा आहे. त्यावेळी ‘युनायटेड ब्रेवरिज्’ या मद्याच्या जाहिराती रेल्वेच्या डब्यावर लावण्यात आल्या होत्या. या विरोधात संस्थेने यशस्वी न्यायालयीन लढा दिला, आणि पाठपुरावा करून त्या काढायला लावल्या.

त्या बदलत्यात आठ दिवस ‘नैसर्गिक पेय हेच उत्तम पेय’ आहे, अशा स्वरुपाच्या जाहिराती कंपनीच्या खर्चाने करण्यास भाग पाडल्या. हे खरच प्रशंसनीय आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा.
नुकताच ‘युथ सर्वे’ या सर्वेक्षणा अंतर्गत ७७ टक्के तरुणाई फेसबुक व ६४ टक्के तरुणाईसाठी ट्विटरप्रिय आहे, असा अहवाल प्रसिद्ध झाला. या माध्यमाद्वारे ही तरुणाई सेलेब्रिटीजना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देऊ शकेल काय? त्यासाठी याच तरुणाईने जाहिराती योग्य कोणत्या आणि आक्षेपार्ह कोणत्या, हे अभ्यासपूर्वक जाणून घेतले पाहिजे.

- रंजना मंत्री, मुंबई ग्राहक पंचायत

दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या कायद्याचे व नियमांचे पालन जाहिरात करताना केले जाते का, याचे उत्तर काही जाहिराती बघताना तरी नाही असेच येते. एखादे ब्रॅण्ड नेम, सेलेब्रिटी यांना घेऊन बनवलेल्या जाहिराती दाखवताना पंचलाईनचा वापर केला जातो. तसेच लहान मुलांचा वापरही मोठय़ा प्रमाणात केला जातो.

सेलिब्रीटींना घेउन जहिरात करणे बेकायदेशीर आहे का?
लहान मुलांचा वापर हा शब्द प्रयोग वाचुन बालमजुरी वगैरे डोळ्यासमोर आले. असे काही नसते हो भरपुर मोबदला मोजला जातो.

मुलांनी शाळेत जाताना डब्यात काय न्यावे, मधल्या वेळेत किंवा सुट्टीत मुलांना काय द्यावे हे दाखवताना मुलांचाच वापर करून जाहिराती चित्रीत केल्या जातात. चपातीला केवळ जाम लावून रोल करून नेला की मुले पटापट डबा संपवतात, मधल्या वेळात पटकन होणा-या चायनीस नुडल्स् मुलांना आया पण खुशीने देतात. या वाढीच्या वयात मुलांना लागणारी भाज्या, कडधान्ये यातील पोषणमूल्ये रोज जाम/नुडल्स् खाऊन मिळतील का?

हे काहीतरीच आहे हो, पालकांना ठरवु दे ना काय खायचे आणि काय मुलांना द्यायचे. तुम्ही थोडे दिवसानी, कुठली भाजी करायची वगैरे पण पुश करायला लागाल.

या व्यतिरिक्त या पदार्थातील साखरेचे जास्त प्रमाण, कृत्रीम रंग, प्रिझर्वेटिव्ह याचा दुष्परिणाम शरीरावर होणार तो भाग वेगळाच.

तुमचे असे म्हणणे आहे का की भारतात कोणीही काहीही प्रॉडक्ट मार्केट मधे आणु शकते. सरकारी एजन्सी नाहीये का परवानगी देण्यासाठी? जर असेल तर तुम्ही कुठल्या बेसिस वर म्हणत आहात की दुष्परीणाम होतो वगैरे.
आणि जर होत असेल दुष्परीणाम तर परवानगी देणारी सरकारी एजन्सी दोषी नाही का? तुम्ही कोर्टात का केस करत नाही.

कित्येकदा जाहिरातीतून मुलांच्या तोंडात वडीलधा-यांना उद्धटपणे बोलणारे संवाद दिले जातात. जसे की मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, ‘तुम समझते नही हो क्या?’ सतत चालू असणा-या या जाहिरातीतून मुलांवर खाण्यापिण्याचे व वागण्याचे काय संस्कार केले जातात? देशाची पुढील पिढी सुदृढ सुसंस्कृत कशी बरे बनेल?

हास्यास्पद आहे. माझी आणि माझ्या आधीची पिढी घरातच वडीलधार्‍यांना उद्धट बोलताना, शिव्या देताना, अर्वाच्य बोलताना बघत आहेत.

मद्याच्या जाहिरातींवर मनाई असल्याकारणाने सोडा, स्पोर्ट्स् ड्रिंक किंवा मिनरल वॉटर या नावांखाली मद्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. या संदर्भात ग्राहक संरक्षण कायद्यातील जाहिरात विषयक तरतुदींचा सखोल अभ्यास करून, मुंबई ग्राहक पंचायतीने जो ऐतिहासिक निर्णय मिळवला, तो महत्त्वाचा आहे.

ही कधीची गोष्ट आहे. मी तरी अश्या जहिराती रीसेंटली बघितल्याचे आठवते.

----------
तुम्ही संस्कृती रक्षक का बनताय?

>>तुम्ही संस्कृती रक्षक का बनताय?

ते त्यांच्यातलेच आहेत. (पण त्यांचा काही संबंध नाही बर्का !!)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

>> मी तरी अश्या जहिराती रीसेंटली बघितल्याचे आठवते.

अश्या म्हणजे कश्या? रीसेंटली म्हणजे कधी? आणि कोणत्या जाहिराती? आणि कुठे?

आता हा घ्या थोडा डेटा :

How Kingfisher found a way around advertising norms in India to promote new beer

त्यातून उद्धृत :

All these are clear violations of the surrogate advertising norm in India, which prohibits an alcohol and tobacco brand from directly advertising its products.

लेख नोव्हेंबर २०१५चा आहे. तुमच्यापाशी डेटा नसला तर गूगल करत जा. कधी कधी बरं असतं तब्येतीला.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोव्हेंबर १५ म्हणजे रीसेंट नाही का? तसेही, नक्की आठवत नाही पण गेल्या काही महिन्यात पण बघितल्या आहेत ह्या जहीराती. पुन्हा दिसल्या की तुम्हाला कळवते नक्की.

गुगल करुन डाटा शोधायचे काम तुमच्या सारख्या गुगल एक्पर्ट कडे आहे. मी फक्त तुमचा डेटा वापरते.

>> पण बघितल्या आहेत ह्या जहीराती. पुन्हा दिसल्या की तुम्हाला कळवते नक्की.

'ह्या' म्हणजे नक्की कसल्या? सरोगेट की प्रत्यक्ष मद्याच्या? सरोगेट असतील तर धागालेखकाचा दावा (मद्याच्या जाहिराती करायला बंदी आहे) खराच आहे. मग तुम्ही त्या विरोधात नक्की काय वेगळा मुद्दा मांडता आहात? आणि प्रत्यक्ष मद्याच्या असतील, तर तपशील द्या.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सरोगेट बद्दल म्हणतीय. सोडा, म्युझीक अल्बम वगैरे वगैरे.

खालील पॅरॅ वाचुन काय वाटते? मला तरी असे वाटते की युनायटेड स्पिरीट नी सरोगेट जहिराती केल्या होत्या त्या ग्रा.प. नी काढायला लावल्या. थेट मद्याच्या जहिराती लावल्या होत्या असे म्हणायचे आहे का? थेट मद्याच्या जहिराती केल्या असतील तर त्या काढायला लावायला सखोल अभ्यासाची काय गरज आहे?

मला अजुन ही असे वाटते की युनायटेड स्पिरीट थेट मद्याच्या जहीराती लावल्या नसणार. कारण ते थेट मद्याच्या जहिरातींना बंदी भारतात कित्येक वर्ष आहे. जर थेट मद्याच्या जहिराती लावल्या तर त्या काढायला कायद्याचा सखोल अभ्यास वगैरे करायची गरज नसावी.

लेख असा दावा करतोय असे वाटते की ग्रापं नी सरोगेट जहिराती पण काढायला लावल्या.

मद्याच्या जाहिरातींवर मनाई असल्याकारणाने सोडा, स्पोर्ट्स् ड्रिंक किंवा मिनरल वॉटर या नावांखाली मद्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. या संदर्भात ग्राहक संरक्षण कायद्यातील जाहिरात विषयक तरतुदींचा सखोल अभ्यास करून, मुंबई ग्राहक पंचायतीने जो ऐतिहासिक निर्णय मिळवला, तो महत्त्वाचा आहे. त्यावेळी ‘युनायटेड ब्रेवरिज्’ या मद्याच्या जाहिराती रेल्वेच्या डब्यावर लावण्यात आल्या होत्या

>> मला तरी असे वाटते की युनायटेड स्पिरीट नी सरोगेट जहिराती केल्या होत्या त्या ग्रा.प. नी काढायला लावल्या. थेट मद्याच्या जहिराती लावल्या होत्या असे म्हणायचे आहे का? थेट मद्याच्या जहिराती केल्या असतील तर त्या काढायला लावायला सखोल अभ्यासाची काय गरज आहे?

संदर्भ : COMMISSION CRACKS THE WHIP ON SURROGATE ADS (२००७ची बातमी)

बातमीतून उद्धृत :

Volunteers of the Mumbai Grahak Panchayat found that there was no Bagpiper or Pilsner soda available in the market.

The Advertising Standards Council of India had found the ads to be misleading, with ‘soda’ in some cases in fine print and the commercial names of the products in a bigger size.

The council also held that advertising of alcohol-containing products was in violation of Chapter III.6 of the advertisement code.

निष्कर्ष : सरोगेट जाहिरातींसाठीचे किमान निकषही पाळलेले नव्हते म्हणून जाहिरात प्रत्यक्ष मद्याची मानली गेली.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपण प्रतिसादांचा दांडिया खेळतो, आणि धागालेखक फाल्गुनी पाठकची सीडी लावायलाही येत नाही....

*********
आलं का आलं आलं?

Smile
हे लेख टाकणारे नक्की ग्राहक पंचायतीचे हितचिंतक आहे का हेच कळत नाहीये. लोक दुर जातील हे असले वाचुन आणि उत्तर न देण्याच्या ठामपणामुळे,

>> आपण प्रतिसादांचा दांडिया खेळतो, आणि धागालेखक फाल्गुनी पाठकची सीडी लावायलाही येत नाही.

खरी कमाल ही आहे की तरीही लोकांना प्रश्न पडतात की ही अस्मिता कोठून येते? Wink

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुरुजी, असे क्रिप्टिक प्रतिसाद समजत नाहीत आम्हाला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धागालेखक सोडून द्या. इथे आपण ज्यावर वितंडवाद घालतो ते ट्रम्प नाही तर मोदी तरी कुठे येतात आपल्याला भीक घालायला? तरीही सूर्याखालच्या, क्रिप्टॉनवरच्या किंवा इतर कोणत्याही विषयांवर घालत बसतो की नाही आपण वितंडवाद? थोडक्यात, 'जगातलं सगळं काही ज्ञान आम्हालाच आहे आणि कुणी ढुंकून न पाहू देत, आम्ही आमची ढिशूम्ढिशूम खेळणारच, कारण त्यात आम्हाला मजा येते' ही अस्मिता कोणत्या गावाची, सांगा बघू? Smile

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा हा हा. तुम्हाला पेठी ( किंवा निओ पेठी) म्हणाल्या रावकाकू हे आवडलं नाही का Wink

पण पण, सोशल मिडिआला अंडरेस्टिमेट नका करू. पं.प्र आणि त्यांचे मंत्री ट्विटर/चेपू अमाप वापरतात. आणि ऐसी देखील सो.मी.च आहे की. आता आपण मराठीतून चर्चा करतो ती त्यांना नाही समजणार मेबी पण गेला बाजार काका-पुतणे, फडणवीस वगैरेंना समजण्याचा चांस आहे की. कुणी सांगावं उद्या ऐसीवर झालेल्या चर्चांचे पडसाद विधानसभेत देखील उमटतील!

आता ट्रंपपर्यंत आपल्याच्या चर्चा पोचतील का हा प्रश्न अवघड आहे. त्यावर विचार चालू आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ट्रंप बिंप जाऊ देत इथे अवधूत गुप्ते किंवा मिलिंद सोमण आल्यास त्यांनी मल व्यनीत संपर्क करावा ROFLWink

इतकी व्हास्ट रेन्ज? Blum 3

झालंच तर सुबोध भावेचं नाव नै दिसलं ते? Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अमोल पालेकर , निळू फुले ,गणपत पाटिल, जितेंद्र आव्हाड ,जॉनी लिव्हर ह्यांचीही नावं राहिलित.
(जॉनी लिव्हार व्यवस्थित मर्राठी बोलतात.)

>>इतकी व्हास्ट रेन्ज?

मिलिंद सोमण कित्येक मुलींना हॉट वाटतो. आणि 'अवधूत गुप्ते एकदम कडली (cuddly) आणि क्यूट आहे' असं म्हणणाऱ्या काही स्त्रिया (आणि दोघे पुरुष) मला ठाऊक आहेत. Smile

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय अवधुत गुप्ते गोड आहे.
त्याची चांगलं गाणं ऐकल्यावरची एक कमेंट मला आवडली होती - "चाबूक गायलीस" म्हणे ROFL

पुरुषांनीपण मंगळसूत्र वगैरे प्रकार सुरू करावेत का? असा विचार मनात तरळून गेला.

ROFLROFL

मद्याच्या विक्रीतून कमावणार्‍या सरकारने मद्याची खुलेआम जाहिरात करायला बंदी घालणे, हा दांभिकपणा आहे. एकतर पूर्ण दारुबंदी करा नाहीतर सर्वांना मुक्त जाहिरात करायला परवानगी द्या.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

ग्राहक पंचायतीला करोडो मद्य ग्राहकांबद्दल सहानभुती नसणे हे फारच रोचक आहे.