मराठी संकेतस्थळं - इतिहास, प्रकृती, प्रवृत्ती वगैरे

मिसळ पाव वर ऐसी ची बरीच मंडळी बरीच रेंगाळताना दिसतात .... मिसळ पाव काय मातृसंस्था आहे का स्फूर्तिस्थान ? ( हा कोणी कुठे जावे वगैरे असले दुहेरी निष्ठा टाईप भंकस प्रश्न नसून, फक्त कुतुहूल म्हणून विचारत आहे ) च्यायला काय extreme right ऑफ extreme right मंडळींनी भरलेला ग्रुप आहे . बिचारे कोण ताम्हणकर काहीतरी लिहितात आणि लोकं तुटून म्हणजे तू टू न पडताहेत ... एखादाच कोणी मुटे उलटी fight देतोय .. जबरदस्त करमणूक ... एक कुणी श्री गुरुजी नावाच्या id " हा विषय ऐसी वर बरा दिसेल " किंवा तत्सम डाव्या हाताची बॅक हँडेड कॉमेंट मारतंय ... गंभीर करमणूक आहे. असो

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मिसळपाव+ : हे बहुतांश

मिसळपाव
+ : हे बहुतांश सर्वसामान्यांच्या सध्यकालीन विचारां/प्रश्ना संबंधित त्वरीत दखल घेणारे व त्यासंबंधी सर्वाधीक लिखाण प्रकाशीत होणारे संस्थळ आहे परिणामी तिथे विषय / सदस्य/ प्रतिसाद/ अवांतर ज्ञान याची अजिबात वनवा नाही.

- : मिसळपाववर लेखकांना(च) प्रचंड किंमत आहे. यात लेखांचा दर्जा हा अतिशय दुय्यम क्रायटेरीया आहे त्यापेक्षा तुम्हाला तुमचे सामाजिक व वैचारीक हितसंबंध जोपासायचे कौशल्य इथे कोणाही सामान्याला (एका मर्यादेत) प्रसिध्द लेखक बनवायला पुरेसे आहे. बहुतांश लोकांचे हे आवडीचे संस्थळ असायचे कारण मिसळपावचे कार्यरत सदस्य संख्येने भरपुर असल्याने लिखाण व प्रतिसादाला मिळणारी अतिसुलभ प्रसिध्दी.

परंतु प्रतिसादकांची इथे अजिबात वनवा नसल्यामुळे कोणत्याही प्रतिसादकांना इथे विषेश किंमत नाही. तठस्त व रोखठोक प्रतिसाद तर टिकतील याची तर अजिबात शाश्वती नाही परीणामे बहुतांश प्रतिसाद कंपुधारीत स्तुतीसुमने ( तु माझी खाजव मी तुझी खाजवतो) अथवा विरुध्द (बॅण होइ पर्यंत स्कोर सेटलींग ) अथवा नवखे हौशे गौश्यांनी संयमीत व पॉलेटीकली करेक्ट भाषेचा अवलंब केलेले वाचायला मिळतात. इथे समोरच्याची खाजवायला पुर्ण परवानगी आहे पण सोलायला कट्टर बंदी. स्वतःची विषेश मते नसणार्‍या ( अथवा तसे भासवणार्या धुर्त) लोकांसाठी मुक्त वैचारीक कुरण म्हणजे मिपा.

माझा अनुभवः- मला मिपा सर्वात जास्त आवडते, पण तिथे स्त्रियांचा स्वतंत्र विभाग सुरु झाल्यामुळे(च) मी या संस्थळाचा व त्याला पाठींबा असणार्या सर्व सदस्यांचा उघड वैचारीक विरोधक आहे. यावर मी सदैव कडकडीत टिका केल्याने व मी कोणी प्रसिध्द विचारवंत, लेखक वगैरे नसल्याने मिपा आणी मी एकत्र नांदु शकत नाही (स्माईल) पण तरीही पहीलं प्रेम मिपाच.

ऐसी अक्षरे
+ : हे बहुतांश बुध्दीवंतांच्या विचारमैथुनाचे व त्यासंबंधी सर्वाधीक लिखाण प्रकाशीत होणारे संस्थळ आहे परिणामी इथे विषय / सदस्य/ प्रतिसाद/ यावर तुलनेने मर्यादा आहे. लिखाणाला असलेली श्रेणी व्यवस्था हा या संस्थळाचा विषेशगुण. काही अति शहाणे सोडले तर श्रेणीदान बरेच निपक्षपातीच असते. चुका श्रेणीदात्यांकडूनही होणारच, ती माणसेच आहेत परंतु तरेही त्याचा अनिर्बंध गैरवापर झालेला आता आढळुन येत नाही.

-: तुलनेने कमी विषय चर्चेला येता परीणामी लवकरच बहुतांश लिखाण क्लिशे भासु लागते.

माझा अनुभवः- मला ऐसी अक्षरे पसंत आहे कारण इथे विचार स्वातंत्र्यावर नसलेली मर्यादा.

उपक्रम

+ : दर्जेदार लिखाण. अधुन मधुन पुन्हा पुन्हा वाचावे असे.

- : फक्त विज्ञानाधारीत तर्कवाद.

माझा अनुभव :- कधी विषेश लिखाण केलेले नाही दोन आयडी होते पण ते चालु आहेत अथवा नाहीत हे माहीत नाही.

मीमराठी

+ : सुरेख संस्थळ, फॅमिली ऑडियन्ससाठी उत्तम.

- : मालकांचा सतत उघड (पडद्या आड नसलेला) वैचारीक व कृतीशील वावर इतर सदस्यांना संस्थळ "आपलं" म्हणवुन घेताना अडचण निर्माण करत असे, विषेशतः मालकांना न ओळखणारे सदस्य त्यांना ओळखणार्‍या सदस्यां इतपत कंफर्टेबल बनणे इथे अवघड भासले परीणामी त्याच्या विस्ताराच्या कंक्षा आपोआप अरुंदावत गेल्या.

माझा अनुभव :- मला मीमराठी आवडले, पण इतर संस्थळाच्या तुलनेत ते काहीतरी वेगळे व भरीव देण्यास अपयशीच वाटले.

actions not reactions..!...!

धन्यवाद

स्पष्ट मतांबद्दल धन्यवाद !!! ,(न कावता प्रतिसाद दिल्याबद्दल डबल धन्यवाद ).

मला सर्वसाधारण अंदाज आला आता या space बद्दल . तसा आदूबाळाच्या बाकड्यां नि थोडा आला होता पण आता आणखीन जास्त आला .

सर्वांचे धन्यवाद

(No subject)

f

होल वावर इज अवर्स ;)

एकदा थोडी सक्तीची विश्रांती घ्यायला लागली होती, तेव्हा उपक्रम संपूर्ण वाचून संपवलं होतं. एकन एक धागा. ते आठवलं. उपक्रम सध्या वाचनमात्र उपलब्ध आहे.

मनोगत नामक किच्चकट प्रकार फारसा आवडत नाही. कधीकाळी ते जरा जिवंत असेलही कदाचित. त्यामुळे तिथे जाणं होत नाही. आयडी आहे.

मीम बंद पडले. छोटेस छान होते. गब्बरसिंग मीम स्पेशल होते.

बॅटम्यान मिपावर जास्त असत. तिकडून ब्यान पुन्हा अ‍ॅक्टिवेट केले गेलेत, पण तिकडे लिहिणं कमी केलंय असं दिसतं. इथेही अशात फार दिसले नाहीत. पण माझं इथे/ओएल येणं आजकाल फार होत नाही.

मिपा वाचायला/प्रकृतीने वेगळं आहे. काही खरेच छान लिखाण तिथे आहे. फक्त जुन्या लिखाणाचा शोध घेण्याची सुविधा फारशी नाही.

मायबोलीवर माझ्या आयडीजची सेरीज आहे (डोळा मारत) ते एक वेगळं रसायन व गम्मत आहे.

ऐसी तो अपने जैसे टाईप के लोगोंकी साईट हय.

तेव्हा, वर उल्लेखिलेल्या सर्व संस्थळांवर वावर आहे.
होल वावर इज अवर्स (डोळा मारत)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

किमान दोन संकेतस्थळांवर लेख

किमान दोन संकेतस्थळांवर लेख टाकला कि तो चोरी होण्याची शक्यता संपते. शिवाय दोन्ही मिपाव आणि ऐसीअक्षरे वर प्रतिसाद हि वेगवेगळे मिळतात.

ऐसीवर पुरोगामी, लिबरल, वैचारिक असे लेख/विचार अधिक प्रमाणात येतात तर मिपावर कंझर्व्हेटिव्ह विचारांना अधिक पाठिंबा मिळतो.

बाकी आजकाल कुणी स्वत:ला पुरोगामी, लिबरल आणि वैचारिक म्हणेल तर दिल्लीत तरी लोक शंकेने त्याच्या कडे पाहतात. ...

पिवळा डांबिस म्हणतात त्यात

पिवळा डांबिस म्हणतात त्यात तथ्य आहे.लेखी माध्यमांच्या तुलनेत अशी संस्थळं जिवंत लेखन आहे.टोला प्रतिटोला लगेच मिळतो.जिकडचं तिकडेच भांडं फोडावं.अमुक हवा तमुक बाकडी ही नंतरची कल्पना आहे.मी सर्व ठिकाणी आहे ( बंद पडलेल्या स्थळांना धरून)वेगळ्या नावांनी वेगळ्या लेखनाने

शरम

ह्या कॉमेंटवर अन्य ऐसीकरांचे अभिप्राय वाचून एक ऐसीकर म्हणून शरम वाटली.

माझा अभिप्राय,

मिसळ पाव वर ऐसी ची बरीच मंडळी बरीच रेंगाळताना दिसतात ....

बॉर्र, मग?

च्यायला काय extreme right ऑफ extreme right मंडळींनी भरलेला ग्रुप आहे . बिचारे कोण ताम्हणकर काहीतरी लिहितात आणि लोकं तुटून म्हणजे तू टू न पडताहेत ... एखादाच कोणी मुटे उलटी fight देतोय .. जबरदस्त करमणूक ... एक कुणी श्री गुरुजी नावाच्या id " हा विषय ऐसी वर बरा दिसेल " किंवा तत्सम डाव्या हाताची बॅक हँडेड कॉमेंट मारतंय ... गंभीर करमणूक आहे. असो

हे सगळं मिसळपाव वर लिहा, इथे का लिहिताय? तिथे लिहा, मिसळपावकर समाचार घ्यायला समर्थ आहेतच.

मिसळ पाव काय मातृसंस्था आहे का स्फूर्तिस्थान ? ( हा कोणी कुठे जावे वगैरे असले दुहेरी निष्ठा टाईप भंकस प्रश्न नसून, फक्त कुतुहूल म्हणून विचारत आहे )

काय फरक पडतो नव्या सभासदांना? नव्या सभासदांनी इथे लिखाण करायचं असेल तर इथे करावं, मिसळपाव वर करायचं असेल तर तिथे करावं. दोन्हीकडे करायचं असेल तर तसं करावं. अजूनतरी ह्या दोन्ही संस्थळांनी त्यावर आक्षेप घेतलेला माझ्या पहाण्यात नाही.

पण उगीच हिकडच्या काड्या तिकडे सारायचा विफल प्रयत्न नसावा. मिसळपावकर आणि ऐसीकर हे दोन्ही अशा प्रयत्नांना पुरून उरलेले आहेत.

बाप रे !! पिवळा डाम्बिस काका

बाप रे !!
पिवळा डाम्बिस काका , एका अजाण बालकाच्या कुतुहलात्मक प्रश्नाने तुम्ही फारच व्यथित झालेले दिसता

"ह्या कॉमेंटवर अन्य ऐसीकरांचे अभिप्राय वाचून एक ऐसीकर म्हणून शरम वाटली."

एका बॉल वर ५ -६ सिक्सर ?????

"पण उगीच हिकडच्या काड्या तिकडे सारायचा विफल प्रयत्न नसावा. मिसळपावकर आणि ऐसीकर हे दोन्ही अशा प्रयत्नांना पुरून उरलेले आहेत."

काड्या बिड्या नाय हो , साधी शंका !!!!एवढेच

"हे सगळं मिसळपाव वर लिहा, इथे का लिहिताय? तिथे लिहा, मिसळपावकर समाचार घ्यायला समर्थ आहेतच."

आता मिपा वर sign up करणे आलेच म्हणजे.

व्यथित वगैरे नाही, त्याला

व्यथित वगैरे नाही, त्याला "आबा कावत्यात!" मोड म्हणतात. (स्माईल)
बाकी वैयक्तिक काही नाही.

आता मिपा वर sign up करणे आलेच म्हणजे.

करा, जरूर करा.
ऐसीवर वावरणे आणि मिपावर वावरणे ह्यात वरून गॅलरीतून पाण्याची बादली ओतणे व्हर्सेस गोविंदामध्ये दहीहंडी फोडण्यात प्रत्यक्ष भाग घेणे इतका फरक आहे!
(स्माईल)

काय इतर ड्युएल मेंबरांनु, मी म्हणतंय तां खरां की खोटां?

व्यथित वगैरे नाही, त्याला

व्यथित वगैरे नाही, त्याला "आबा कावत्यात!" मोड म्हणतात.

अगदी अगदी..

ऐसीवर वावरणे आणि मिपावर वावरणे ह्यात वरून गॅलरीतून पाण्याची बादली ओतणे व्हर्सेस गोविंदामध्ये दहीहंडी फोडण्यात प्रत्यक्ष भाग घेणे इतका फरक आहे!

हाहा.. एक्दम खरां. (दात काढत)

सदैव शोधात..

होळीची धुळवड/रंगपंचमी

होळीची धुळवड/रंगपंचमी दोन्हीकडे असते.रंगल्यावर/रंगवल्यावर किती थयथयाट करायचा /नाचायचं यात फरक असतो इतकेच.लागिन न करता वाचतात ते ग्यालरीतून बघण्यासारखे.

अगदी अगदी

सहमतच सहमत

ऐसीवर वावरणे आणि मिपावर

ऐसीवर वावरणे आणि मिपावर वावरणे ह्यात वरून गॅलरीतून पाण्याची बादली ओतणे व्हर्सेस गोविंदामध्ये दहीहंडी फोडण्यात प्रत्यक्ष भाग घेणे इतका फरक आहे!

लौल! एक नंबर!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

अगदी खरा आण्णा, 10 थरासहित.

अगदी खरा आण्णा, 10 थरासहित.

अंमळ हळवे झालो

काही आठवणींनी अंमळ हळवे झालो.

राईट / लेफ्ट या

राईट / लेफ्ट या शिक्क्यांपलिकडे बघितलंत तर बरीच गंमत दिसू शकेल.

ही तुलना आधीही केली आहे, पण तरीही...

मराठी आंजा शाळेतल्या एखाद्या वर्गासारखं आहे.

  • त्यात मिपा हे शेवटचे दोन बाक आहेत. टवाळक्या, हाणामार्‍या हे सकृद्दर्शनी दिसत असलं तरी प्रचंड ज्ञानी लोकही तिथे वावरतात.
  • उपक्रम पहिला आणि दुसरा बाक होतं. चष्मा लावून गंभीर चर्चा करणारे विद्वज्जन तिथे बसत असत.
  • ऐसी हा तिसरा आणि चौथा बाक आहे. विद्वत्तापूर्ण चर्चा, सभ्यतेचा कासोटा सांभाळून होणार्‍या टवाळक्या आणि opinionatedness असा एक वेगळाच फ्लेवर आहे. (ऐसीचे विशेषांक हाही एक "ब्रिटिश वेदर"** सारखा प्रकार.)
  • मायबोलीवर प्रचंड गर्दी असते. त्या अर्थाने ते 'मधले बाक' आहेत. पण मी माबो सहसा वाचत नाही, त्यामुळे हे मत गंभीरपणे घेऊ नये.

शाळेच्या वर्गाची उपमा दुसर्‍या अर्थानेही चपखल आहे. काही लोक आपापल्या बाकाशी पदरकुंकूचुडा निष्ठा ठेवून असतात. काही लोक तितक्याच सहजतेने सगळीकडे वावरतात.

___________
**You like it, though you grumble about it

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

वर्गातल्या बाकांची उपमा

वर्गातल्या बाकांची उपमा आवडली. पण त्यात एक थोडा स्टॅटिकपणा येतो. संस्थळंच नाही, तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या मूडप्रमाणे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बाकांवर बसते. तसंही हे संस्थळांचं विश्व छोटंसंच आहे. दोनचारशे लोक सातत्याने संस्थळांवर येतात. त्यातले काही एका विशिष्ट संस्थळाला जोडलेले - पदरकुंकूचुडा निष्ठा ठेवून - असतात. पण बाकीच्या अनेकांसाठी अशा बांधलेल्या निष्ठा नसतात. त्यांचा दोन्ही संस्थळांवर सहज वावर असतो. कॉलेजच्या दोन ग्रुप्समध्ये काही जण दोन्हीकडे येऊनजाऊन असतात तसेच. त्यात अजून एक डायनॅमिक्स म्हणजे अनेक लोक काही काळ संस्थळांवर वावरतात आणि मग नाहीसे होतात. मिसळपाव किंवा ऐसीच्या दोनतीन वर्षं जुन्या लेखांकडे बघितलं तर अनेक सध्या न दिसणारे आयडी दिसतात. त्यांच्या आयुष्यातली ही संस्थळाची फेज संपते किंवा दुसरी अजून महत्त्वाची काहीतरी सुरू होते आणि वेळ राहात नाही. काहींची बरीच वर्षं टिकून असते. त्यामुळे संस्थळाच्या छत्रीची मूठ आणि काड्या त्याच राहून कापड बदलताना दिसतं.

या मूठ आणि काड्यांच्या सांगाड्यानुसार संस्थळाचं व्यक्तिमत्व ठरतं, आणि त्याभोवती अनुरूप सदस्य जमतात आणि तात्पुरते स्थायी होतात. ऐसीवर पुरोगामी, लिबरल, वैचारिक असे लेख/विचार अधिक प्रमाणात येतात तर मिपावर कंझर्व्हेटिव्ह विचारांना अधिक पाठिंबा मिळतो. असं पोलरायझेशन असलं तरी त्यामधले अनेक चांगले विषय दोन्ही ठिकाणी हाताळले जातात. आणि ते करू शकणारी विद्वान मंडळी दोन्हीकडे आहेत.

जन्माची कहाणी कधी लिहिताय ?

जन्माची कहाणी कधी लिहिताय ?

कहाणीची व्हर्जन्स लिहावी

कहाणीची व्हर्जन्स लिहावी लागतील.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

हा हा हा! राशोमन चालुए काय?

हा हा हा! राशोमन चालुए काय? (स्माईल)

बोले तो, आम्हालाही माहिती नाही ऐसी-जन्माची कहाणी. मिपाजन्माबाबत थोडी माहिती आहे ( मनोगतावरची संपादकीय अनुमती वगैरे). पण या सायटीचा जन्म का झाला माहिती नाही. ( कोणी मालक ब्यान वगैरे झालेले असण्याची शक्यता असू शकेल प़ण मग आताही त्यांची खाती चालू आहेत मिपावर. )

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

थोडा शोध घेतला आणि .....

थोडा शोध घेतला आणि ..... आयला हितं ( बी )तात्या ? .....मग बाकी तुम्ही लिहिलेल्या सगळ्याचा उलगडा होऊ लागला .....

आदूबाळाचे परफेक्ट आहे मत.

आदूबाळाचे परफेक्ट आहे मत. माबोचे काय माहीत नाही पण मिपावर जवळपास असेच वातावरण असते. लिहिणारे पब्लिक प्रतिसादोत्सुक असतेच. मिपावर चिल्लर चिल्लर जोकना पण बॅकबेंचर्स लोकांचा फुल्ल प्रतिसाद दिसतो. नॉर्मल लिहिणारे पब्लिकबरोबर काही स्पेशालिस्ट लोक जब्बरद्स्त हुशार आहेत. माझ्यासारख्या मिपावर लिहिणार्‍या माणसाला इथे लिहायची चक्क भीती वाटते.(आत्ता आत्ता प्रतिसाद अथवा खफवर तरी लिहितो आहे) ललित, कथा, लघुकथा वगैरे साहित्य इथल्या बोर्डावर जास्त दिसत नाही. आपल्या लेखनाची/विषयाची चिरफाड होइल का? त्याला काय उत्तर द्यावे लागेल? अथवा दुर्लक्षितच केले जाईल (प्रतिसाद न मिळणे ह्याचा मी हाच अर्थ घेतो) ह्या भीतीने ऐसीवर कथा टाकावी की न टाकावी एवढ्या विचारात तिकडे मिपावर ४०-५० प्रतिसाद आलेले असतात. ऐसीवरच्या काही चर्चा वगैरे उच्च असतात पण त्या खरोखरीच उच्च असतात. टवाळक्या पण उच्च दर्ज्याच्या असतात त्यातल्या कित्येक कन्सेप्टस माझ्या डोक्यावरुन जातात. छान छान असेच प्रतिसाद हवेत असे काही नसते पण दुर्लक्षास्त्राची भिती वाटते.

घासुगुर्जी ऐसी जन्माची कहानी

घासुगुर्जी ऐसी जन्माची कहानी लिहिणार होते. माहिती नाही लिहिली का नाही/

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ऐसी जन्मा ही तुझी..

ऐसी जन्मा ही तुझी कहाणी. इत्कुसे प्रतिसाद बाकी श्रेणी.

इतिहासमनोगत -> मिसळपाव ->

इतिहास

मनोगत -> मिसळपाव -> ऐसी अक्षरे असा इथल्या बर्‍याच जणांचा संस्थळ प्रवास आहे
समांतर- उपक्रम, मी मराठी ही संस्थळेही होती.

मराठी संस्थळावरचे बरेचसे सदस्य एकमेकांना प्रत्यक्षात ओळखतात.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

इतिहास

इतिहासच पण अजून किंचित मागे ...

"मायबोली" ही सर्व मराठी संस्थळांची आई (आजी म्हणा हवे तर!)

मनोगतकार (ज्यांनी "मनोगत" सुरू केले) ते स्वतः मूळचे मायबोलीकरच.

मिपाकार (ज्यांनी "मिसळपाव" सुरू केले) ते स्वतः मूळचे मनोगतकरच (आणि मायबोलीवरदेखिल त्यांचा राबता असे)

ऐसीकार (ज्यांनी "ऐसी अक्षरे" सुरू केले) ते स्वतः मूळचे मिपाकरच. (त्यांच्या मनोगत अथवा मायबोलीवरील वावराची कल्पना नाही)

मीमराठीकार (ज्यांनी "मी मराठी" सुरू केले) तेदेखिल तसे मिपाकरच! (ते मायबोलीवरदेखिल होते असे वाटते)

"उपक्रम" ही ह्या फ्यामिली-ट्रीमध्ये न बसणारी वेगळीच शाखा!

पैकी मिपा आणि ऐसीचा कॉमन बेस बराच मोठा आहे. फक्त मिपावर अथवा फक्त ऐसीवर अशी वावरणारी मंडळी फार थोडी (पण आहेत!).

परंतु, फक्त मायबोलीवर किंवा फक्त मनोगतावर वावरणारी मंडळी त्यामानाने बरीच जास्त.

(सर्वव्यापी) सुनील

ऐलपैल आणि बजबजपुरी माहिती आहे

ऐलपैल आणि बजबजपुरी माहिती आहे का कोणाला?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

हो.

हो.
'ऐसी'वरचे काही आय्डी मनोगतावर होते असे वाटते. विक्षिप्त अदिती होत्या. राजेश घासकडवीसुद्धा शेवटीशेवटी होते. (मिपा निघता निघता २००७ साली) 'न'वीबाजूशेठ होते, आहेत. फारच क्वचित लिहितात. जवळ जवळ नाहीच. नाईल? बाकी संजोप राव आता फारसे लिहीत नाहीत. सर्किटराव एक वेगळीच कथा. राज जैन मला वाटते वेगळ्या नावाने होते. मुक्त सुनीतसुद्धा होते बहुतेक आणि नंदन, धनंजय, आजानुकर्ण.
बाकी मनोगतावरची आयडी नावे त्या काळी विचित्र वाटायची. अद्वैतुल्लाखान, पाळलेला राक्षस. आता मिपामुळे चांगलीच सवय झालीय चित्रविचित्र नावांची.

सर्किट या आयडी असलेल्या दोन

सर्किट या आयडी असलेल्या दोन व्यक्ती अस्तित्त्वात आहेत का?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

बर्‍याच प्रकारचे लाडू सुद्धा

बर्‍याच प्रकारचे लाडू सुद्धा होते. आता ते कुणी नाहीत.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

व्हय व्हय

मिसळपाववरचे सर्किटकाका निराळे. ते पुढे मिसळभोक्ता आयडीने लिहायचे. ऐसीवरचा सर्किट निराळा; तो कुठे गायब असतो शोधलं पाहिजे.

बाकी इतिहासात सुधारणा, माझा मनोगतावर फक्त आयडी आहे. तिथे काही लिहिलं असेल तर सर्वसमावेशकतेपोटीच. मनोगतावर माझा वावर कधीच नव्हता. मिसळपाववर बरीच सर्व्हर स्पेस मी खाल्ली हे मात्र खरं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राजेश घासकडवीसुद्धा

राजेश घासकडवीसुद्धा शेवटीशेवटी होते. (मिपा निघता निघता २००७ साली)

तुम्हाला दुसरा कुठचातरी आयडी आठवत असणार. कारण माझा मराठी संस्थळांवर पहिला प्रवेश जानेवारी २०१० मध्ये झाला. उपक्रमवर कुठचातरी लेख वाचून त्यावर प्रतिसाद दिला, आणि तिथे लिहिता झालो. मग मिसळपावचा शोध लागला. मीमराठीवर काही काळ होतो, ऐलपैलवरही काही लिखाण केलं. मनोगत आणि मायबोलीवर थोडंसं काही लिखाण केलं. पण काही कारणाने रुळलो नाही.

साधारण आठवतेय

कदाचित नसालही अथवा २०१०पासून असाल. अंधुक आठवतेय.

तसा नव्हतोच

मनोगतावर माझा आयडी होता (असेल अजूनही). पण मी मनोगताला नमोगत म्हणून ओळखणार्‍यांपैकी. तेव्हा, तसा नव्हतोच असं म्हणायला हरकत नाही.

नमो शब्द तेव्हापासून आहे.

नमो शब्द तेव्हापासून आहे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आमच्या येथे

आमच्या येथे एकही वाईड बॉल सोडून दिला जाणार नाही.!

हम्म्म्म्म्...

बोले तो, 'नमोगत' म्हणजे साधारणतः आपण म्हणतो ना की 'गेले ***च्या **त', तशा धर्तीवरचे काही असावे काय?